नाचुन घ्या गड्यांनो...हासुन घ्या गड्यांनो
पुन्हा मिळेल संधी?...ना माहिती गड्यांनो!
जागतात भुते अंधारी...हैवानी प्रेरणांच्या
फुटतील ब्वांब कोठे...ठाउक कुणा गड्यांनो?
ते हिरवे कि भगवे...दिसतात सर्व काळे
रंगांधळे तर नव्हे....झालो अम्ही गड्यांनो?
मदांध राजसत्ता नि हिंस्त्र धर्माभिमानी
गर्दीत आसवांच्या...शोधुया धर्म गड्यांनो!
ही रात्र घोर आहे...जिला अंतच कसला नाही
होवुन भयभीत लपला प्रकाश कोठे गड्यांनो?
Subscribe to:
Post Comments (Atom)
अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!
२०५० पर्यंत , वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
ओ सर.......... क्या बात है. मस्त जमलं बघा........
ReplyDelete