Sunday, April 29, 2012

वाघ्या...पुन्हा आणि पुन्हा वाघ्या!


"कुत्र्यासारखे एखाद्याच्या मागे लागणे" हा वाक्प्रचार सर्वपरिचितच आहे. पण एखाद्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या मागे हात धुवुन लागणे यासाठी काय नवा वाक्प्रचार बनवावा या गहन चिंतेत मी सापडलो आहे. या चिंतेचे निमित आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांनी कालच पुण्यात पत्रकार परिषदेत "रायगडावरील वाघ्याचा पुतळा ६ जुनपुर्वी हटवा अन्यथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुतळा उध्वस्त करतील." असा इशारा त्यांनी दिला आहे. (संदर्भ. दै. सकाळ, दि.३० एप्रिल १२, प्रुष्ठ क्र.६, पुणे आव्रुत्ती) गेल्या वर्षीही याच सुमारास प्रवीणदादांनी हाच इशारा दिला होता. त्यावेळीस मी दै. लोकमतमद्ध्ये लेख लिहुन वाघ्या कुत्र्याचा इतिहास आणि तुकोजीराजे होळकरांची शिवस्मारक व वाघ्याच्या समाधीसाठी केलेली रु. ५०००/- ची आर्थिक मदत याचे पुराव्यासहित विश्लेषन केले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणुन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महादेव जानकर यांनी "वाघ्याच्या पुतळ्याला हात लावुन दाखवाच...!" असा प्रति-इशारा संभाजी ब्रिगेडला दिला होता. फलस्वरुप संभाजी ब्रिगेडला आपला "तोडफोड" प्रकल्प स्थगित करावा लागला होता.या घटनेला तब्बल अकरा महिने उलटुन गेले आहेत. आता अचानक जाग आल्याप्रमाने "वाघ्या कुत्त्र्याला कसलाही ऐतिहासिक पुरावा नसुन हा पुतळा हटवण्यासाठी युवराज संभाजीराजे यांच्या नेत्रुत्वाखाली ब्रिगेडचे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार चालु आहे. सहा जुनपुर्वी हा पुतळा हटवावा ही आमची लोकशाही मार्गाने केलेली मागणी असुन शासनाने याबाबत टाळाटाळ केली तर आम्हालाच तो हटवावा लागेल" असे प्रवीणदादांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. खरे तर जर एवढे पुरावे होते तर गेल्या अकरा महिन्यात कोणते जनजागरण ब्रिगेडने केले हा प्रश्न उपस्थित होतो. समजा शासनदरबारी "लोकशाही" मार्गाने पुतळा हटाव मोहीम सुरु आहे तर मग सहा जुनची मर्यादा घालत, त्यापुर्वी हटवला नाही तर आम्ही उद्ध्वस्त करु, ही मागणी कोणत्या लोकशाहीत बसते? असा कोणता नवीन शोध लागला आहे कि ज्यामुळे वाघ्याचा पुतळा ज्या ठिकाणी आहे तेथे मुळात वाघ्याऐवजी सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची समाधी होती हे सिद्ध होते? कि आम्ही सांगु तोच इतिहास हा सनातनी फंडा य्यांच्याही मनात रुजला आहे...फोफावतो आहे?शिव इतिहासात वाघ्या होता. लोकांनी पिढ्यानुपिढ्या दंतकथांच्या रुपात त्याची स्म्रुती जीवंत ठेवली. त्याचे शिवस्मारकासोबत स्मारक व्हावे या अपेक्षेने तुकोजीराजे होळकरांनी शिवस्मारक व वाघ्याच्या स्मारकाला आर्थिक मदत केली. शिवस्मारकाचे काम पुर्ण झाल्यावर उरलेल्या पैशांतुन हे स्मारक उभे राहिले. हे सारे ब्रिगेडच्या विचारवंत व इतिहासकारांना माहित आहेच. पण असे असुनही ते वाघ्याच्या स्मारकामागे हात धुवुन लागले आहेत याचे कारण म्हनजे पराकोटीचा ब्राह्मणद्वेष. ब्राह्मणांनी शिवरायांचा अवमान करण्यासाठी म्हणुन शिवस्मारकासमोर कुत्र्याचा पुतळा बांधला असा त्यांचा अजब तर्क आहे. पण शिवस्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेणारेही ब्राह्मणच होते...सातारकर वा कोल्हापुरकर काही केल्या स्वत:हुन पुढे आलेले नव्हते, त्याचे काय करायचे? म्हनजे इमानदार शिवप्रेमींचा व ज्या धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे त्यांचा अवमान करण्यासाठी ही तोडफोड मोहीम आहे, असेच नाही कि काय? कि हा सवंग प्रसिद्धीचा हव्यास आहे? तोडफोड, जाळपोळ असला अजेंडा घेत जी ही विध्वंसक वाटचाल सुरु आहे त्यावर ब्रिगेडने आत्मचिंतन करायला हवे. बहुजनांचा एवढाच कळवळा आहे तर शेतकरी आत्महत्त्या, पीण्याच्या पाण्याचा प्रश्न, बहुजनांतील वाढती बेरोजगारी असे सामाजिक प्रश्न हाती घेण्याऐवजी तरुणांना खोटी महिती देत त्यांना भडकावत त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा अधिकार कोणी दिला हा प्रश्न या निमित्ताने उठतो.याच पत्रकार परिषदेत त्यांनी मागणी केली आहे कि "स्वतंत्र महामंडळाच्या ताब्यात स्मारके व किल्ले द्यावेत. शिवछत्रपतींवरील नाटक, चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी त्यांचे परिक्षण करण्याचा अधिकारही या महामंडळाला देणे आवश्यक आहे." डा. आनंद यादव यांच्या संतसुर्य तुकाराम या कादंबरीवर वाद झाल्यानंतर ब-याच ह.भ.पं. नी "संतांवर लेखन करण्यापुर्वी वारकरी संप्रदायाची परवानगी घेतली पाहिजे व त्यांना दाखवल्याखेरीज प्रसिद्ध करता कामा नये." अशा अर्थाचा फतवा निघाला होता. मला वाटते ब्रिगेड हीच चुक करत आहे. शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवत त्यांचे पुरेपुर अपहरण करण्याचा हा कट आहे. त्यासाठी जो मार्ग वापरला जात आहे तो सांस्क्रुतिक दहशतवादाचाच एक भाग आहे. तमाम महाराष्ट्रीयांनी या प्रव्रुत्तीपासुन सावध राहण्याची गरज आहे.


(गेल्या वर्षी मी या विषयावर याच ब्लोगवरही लेखन केले होते त्याच्या लिंक्स:

http://sanjaysonawani.blogspot.in/2011/06/blog-post_03.html


http://sanjaysonawani.blogspot.in/2011/06/blog-post_12.html

http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html 

 

19 comments:

 1. तुम्ही इथे दिलेल्या लिंक्स उघडत नाही आहेत. कृपया त्या तपासून पुन्हा टाका.

  ReplyDelete
 2. Mi try kele. ughadtat. kinva ase kara, link copy karun varachya bar var paste kara. Ughadel aes vatate. Kinva saral maajhyaa blogvaril lables madheel vaad-charchaa yaa lablevar click kara, tethe tumhaalaa yaa sandarbhaatil sarv articles sapadatil. Thanks.

  ReplyDelete
 3. धन्यवाद सर आपले इतिहास संशोधन आणि आपण प्रसिद्धीस आणलेले विविध वृताप्रतारातील लेख या मुलेच हा मुद्दा संपला होता .....एकी कडे दुष्काळाने जनता त्रस्त असताना ..शेतकरी अताम्हात्या करत असताना..या भ्रष्ट सरकाचे घोटाळे रोज बाहेर येत असताना खरतर ११ महिन्या पूर्वीचा मिटलेला विषय उकरून काढायची संभाजी ब्रिगेडला गरजच न्हवती .
  .
  .
  शिवाजी महाराजांचा व त्यांच्या प्रिय व इमानी अश्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा महाराजा तुकोजीराव होळकर याच्या निधीमधून उभारला आहे त्यामुळे त्याला हात लावायची रकारला व संभाजी हे नाव वापरून समाज कंटक आशी कामे करून संभाजी महाराजांचा अवमान करणर्या ब्रिगेडला काही अधिकार नाही

  ReplyDelete
 4. सोनावानिजी अतिशय चं विवेचन केले आहे. मला वाघ्याच्या इतिहासात जायचे नाही. जेवा तुमचे पुरावे वाचले तेवा ते खरे वाटले जेवा संभाजी ब्रिगेडचे पुरावे वाचले ते पण खरे वाटले.

  फक्त एकाच वाक्य खटकले......तुमच्या सारख्या सत्यशोधक (मी तुम्हाला सत्य शोधक मानतो ) शोधक माणसाने "धनगर समाजाला कुत्रा देवासमान आहे" हे वाक्य लिहिले आहे ते खटकले. किती दिवस आपण आजून कुत्र्याला, गायीला, दुकाराना देवासमान मानणार? यातून बाहेर यायला हवे!
  हा विषय मला वाटते धनगर विरुद्ध मराठा असे रूप घेणार आहे. पण यात काही अर्थ नाही हे सुजाण लोकांना कळते तुम्हाला पण कळते जाणकार साहेबाना पण काळात असेल आणि ब्रिगेडच्या लोकांना पण काळात असेल......पण या मध्ये सर्वांचा स्वार्थ साधला आहे.....जाणकारांना आपण मागासवर्गीयांचे नेते म्हणून प्रस्थापित करायचे आहे त्यसाठी अगोदर धनगरांचा ठोस पाठींबा हवा , जसे मायावतींना त्यांच्या जातीचा आहे......नंतर मागास्वरीगीयानाची मोठ बांधायची आणि सत्तेत जायचे......आपणास शुभेछ्या

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. navin putale ubhe karne ani padne yevdhech pudharyana kaam rahilele disat ahe.Ha purogamich maharashtr ahe ka? jantechya mul prashn sheti,pani,arogya hya prashnana bagal devun putlyachya madyamatun bhavnik rajkaran khelat basayche evdhach dhandha rahilela disat ahe.baki aam jantela hya visyache kahi soyarsutak ata rahile nahi karan to arthik prashnane adhich ganjla ahe

  ReplyDelete
 7. Sanjay ji, Sambhaji Brigade is following a prototype that was earlier used on a much grander scale by RSS. If RSS had Muslims as targets then Brigade's boogeyman is 'Brahmin'.

  Brigade has ulterior motives and it's a brainchild of some politicians for sure. It doesn't exist to do anything noble. So to expect anything constructive from them is futile. They are causing tremendous harm to the cause they proclaim to espouse. But they give a damn. Ultimately it's caste politics in it's worst form and misleading it's naive supporters. Most of the supporters of these fascist organizations are actually nice people. But they are emotional and hence are taken for a ride. Many realize it later but by then they have wasted many precious years of their lives.

  The issues or rather non issues they have taken up are eerily similar to the Babri masjid drama.

  Ultimately the intellectuals like you help us to see through the designs and guide people on the right path. I have observed that people who comment on your blogs are thoughtful ( most of the times) and well balanced. It's to your credit.

  We actually need a leader like you and I hope that you will seriously consider active politics someday soon.

  ReplyDelete
 8. धनगर आणि गवळी-धनगर समाजात कुत्र्याचे महत्व -


  धनगर आणि पशुपालक समाजात कुत्र्याचे महत्व हे एका घरच्या सदस्या प्रमाणे असते. तसेच आमच्या सातारा तालुक्यामध्ये कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानले जाते. अगदी अश्म युगापासून कुत्रा हा प्राणी मानवा बरोबर असल्याची आपल्याला माहिती मिळते.


  १ खंडी (खंडी म्हणजे २० अंकांची गणना धनगरी भाषेमध्ये करण्याची पद्दत आहे) म्हणजे १ खंडी म्हणजे २० गायी किव्हा २० मेंद्या असे म्हणू शकतो. अश्या १ खंडी मागे एक राखणी ला एक कुत्रा असणे गरजेचे असते.अश्या पाच ते सहा खंडी शेळी-मेंद्या आणि एक ते दोन खंडी गायी किव्हा याहून अधिक एवड्या मोठ्या प्रमाणात पशुधन धनगर आणि गवळी समाजाकडे असयाचे.पशुधनाची राखण करण्याची जवाबदारी कुत्रावर असते त्यामुळे त्याला देवाचा अंश मानले जाते.


  धनगरांच्या इतिहासामध्ये मध्ये याला खूप महत्व दिली आहे. जेजुरीचा मेश्पालक धनगर राजा खंडोबा हा सातवाहन काळामध्ये होयून गेला. या खंडोबा बरोबर नेहमी एक कुत्रा असायचा तो तुह्माला या मी या संदेश बरोबर तो फोटो पण जोडत आहे. खंडोबा जेह्वा असुराबरोबर युद्ध करायचे तेह्वा खंडोबा राजा चा कुत्रा पण शत्रू वर पूर्ण शक्ती निशी तुटून पडत असे.


  धनगर राजे तुकोजी होळकर महाराजांनी किल्ले रायगड वर वीस हजार खर्च करून कुत्र्याची समाधी बांधली होती. पण आता या पुतळ्या वरून राजकारण काही औरच चालले असून याचे धनगर आणि पशुपालक बांधवांच्या दुख आहे.


  विठ्ठल खोत

  ReplyDelete
 9. मराठा संघटना या विचारात आहेत कि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जसा रातो रात कापला तसा आमच्या "खंडोबा रुपी वाग्या कुत्राचा " पुतळा कापू पण हे खूप अवगड काम असल्यामुळे या वादाचे रुपांतर "धनगर आणि मराठा"संघर्षात होवू शकते. आणि ब्राह्मण गप्प बसले म्हणून धनगर गप्प बसेल का ?

  ReplyDelete
 10. शिव इतिहासात वाघ्या होता. लोकांनी पिढ्यानुपिढ्या दंतकथांच्या रुपात त्याची स्म्रुती जीवंत ठेवली. except this your article is suparb and very nice.

  ReplyDelete
 11. संजयजी, अश्या लेखांमधून संभाजी ब्रिगेड असो व तुम्ही समाजात तेढ निर्माण करता आहात हे इथे आलेल्या कमेंट्स वरून दिसून येते. कृपया अश्या कमेंट्स ना योग्य उत्तर तरी द्या अथवा असे तेढ निर्माण करणारे विषय तरी बंद करा!

  ReplyDelete
  Replies
  1. संदीपजी, तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. मी तेढ वाढवत नसुन लोकांना जागे करत आहे. रायगडावर ५ व ६ जुन रोजीसाठी शासनाने जमावबंदी जारी केली आहे...का तर वाघ्याचे स्मरक कोणी समाजकंटकांनी उध्वस्त करु नये म्हणुन. मी जागे केले नसते तर ते कधीच कोसळले असते. मग जी तेढ निर्माण झाली असती तिच्या तीव्रतेचा विचार करा. माझ्या लेखनाचा कोणी हवा तसा अर्थ काढावा...अर्थात ते स्वातंत्र्य आहेच.

   Delete
 12. khup khup sundar lekh aahe sir , mala ya vishayi savistar bolayche aahe .maza no. 9922498177 aani facebook var hi asto mi : vivek sid

  ReplyDelete
 13. संजयजी, आपण वाघ्याचे स्मारक वाचवण्याचे केलेले कार्य निश्चितच स्तुत्य आहे! पण तुमच्या लेखाचा आधार घेऊन कुणी मराठा वि. धनगर असा वाद पेटवन्याचा प्रयत्न करत असेल तर ते तुम्हाला चालेल का? तुम्ही म्हणता कि माझ्या लेखाचा हवा तसा अर्थ काढावा, पण मला ते योग्य वाटत नाही! कारण समाजकंटक त्यातून अनर्थच काढण्याचा संभव जास्त असतो कारण त्यांना सत्यतेशी काही घेणेदेणे नसते!
  अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाला घातक ठरणार नाही इतपतच मर्यादित असावे असे मला वाटते! निदान आपल्या भारतीय समजात तरी! कारण आपला समाज आणि त्यातील घटक जराही विरोधी विचार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, हि एका महान देशाची तेवढीच करूण शोकांतिका आहे! म्हणून तुमच्या लेखातून कुणी गैर अर्थ काढू नये असे मला वाटते आणि ते इथे आलेल्या कमेंट वरून दिसून आले म्हणून मी लिहिले, तुम्ही तेढ निर्माण करत आहात हा समज मी करून घेतलेला नाही!
  आणि तुमच्या लेखाचा आधार घेऊन असा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा तुम्ही समाचार घ्यावा एवढेच माझे म्हणणे आहे!

  ReplyDelete
 14. अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाला घातक ठरणार नाही इतपतच मर्यादित असावे ..........!
  waaa SandeepRao... Tumchyasarkhyanchi Garaj Ahe Deshala..

  ReplyDelete
 15. वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने...

  http://panchphula.blogspot.in/2012/08/blog-post.html

  ReplyDelete
 16. sanjay sir, Tumche likhan ekdam sadetod ahe! tumchya matashi mi 100% sahmat aahe! तोडफोड, जाळपोळ असला अजेंडा घेत जी ही विध्वंसक वाटचाल सुरु आहे त्यावर ब्रिगेडने आत्मचिंतन करायला हवे. बहुजनांचा एवढाच कळवळा आहे तर शेतकरी आत्महत्त्या, पीण्याच्या पाण्याचा प्रश्न, बहुजनांतील वाढती बेरोजगारी असे सामाजिक प्रश्न हाती घेण्याऐवजी तरुणांना खोटी महिती देत त्यांना भडकावत त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा अधिकार कोणी दिला हा प्रश्न या निमित्ताने उठतो. barobar ahe tumche! aata paryanr asha kontyach samajik prashnasathi ya sanghatanani ka aawaj nahi Uthvala?

  ReplyDelete