Tuesday, June 26, 2012

दंभ-विकृत विचारवंतांपासुन सावध रहा!


सामान्यपणे सामान्य हे सहसा दांभिक असतात असा आपला समज असतो. राजकारण्यांबाबत तर बोलायलाच नको कारण दांभिक असणे हे त्यांच्या पेशाचे एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. परंतु साहित्त्यिक-विचारवंत म्हणवणारे जेंव्हा दांभिक बनतात, वागतात, आचरण करतात तेंव्हा मात्र चिंता वाटते. खाजगीत असणारा आणि जाहीर प्रतिमा बनवत तिला तडा जावू नये म्हणुन मुखवटे पांघरणा-यालाच आपण साधारणतया दांभिक म्गणतो. पण स्वत:चे विचार इतरांच्या व स्वत:च्याही सोयीसाठी हवे तेंव्हा हवे तसे वाकवणा-यांना आणि तरीही वर विचारशिरोमणी म्हनवून घेणा-यांबाबत तर दांभिकच नव्हे तर दंभ-विकृत अशीच संद्न्या शोभुन दिसेल. दुर्दैवाने असे विचा दंभ विकृत महाराष्ट्रात आहेत हे महाराष्ट्रचे दुर्दैव म्हणावे लागेल.

मी अनेक दांभिक खोटारडे लेखक पाहिले अनुभवले आहेत ते प्रकाशक या नात्याने. एकच हस्तलिखित शिर्षके बदलुन दोन-तीन प्रकाशकांना देत मानधने लाटणारे लेखक मी जसे पाहिले आहेत तसेच नवीन लेखकांच्या हातात काही रुपये टिकवून त्यांची लेखने स्वत:च्या नांवावर प्रसिद्ध करुन घेणारे लेखकही पाहिले आहेत. तो त्यांचा पोट जाळण्याच्या कसरतीतुन निर्माण झालेला उपद्व्याप आहे असे एक वेळ म्हणत त्यांना क्षमाही करता येइल, पण जे स्वत:ला विचारवंत म्हणतात, मिरवतात, ज्यांना समाजाने भरभरुन सन्मान दिले आहेत, ज्यांना गमावण्यासारखे उतार वयात उरलेले नाही, असे विचारवंतही जेंव्हा दंभ-विकृत होतात तेंव्हा चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

मी अशाच एका विचारवंताचा आजतागायत तीनदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. हे विचारवंत पुण्यात एकदा बालगंधर्वच्या एका कार्यक्रमाला तत्कालीन वादांमुळे उपस्थित राहिले नव्हते. त्यांना धमक्या आल्या असल्याचा कयास होता. मी फ़ेसबुकवर तेंव्हा सक्रीय होतो. मी ती आशंका व्यक्त केली तर त्यांच्याच (वरकरणी संघटनात्मक दुरावलेल्या) तरुण कार्यकर्त्याने माझ्यावर आगपाखड केली. त्यानंतर मला या विचारवंतांचा फोन आला व त्यांनी मला सांगितले कि काहीही असले तरी मला वाद नकोत, तेंव्हा कृपया फ़ेसबुकवरील तुमची विधाने मागे घ्या. मी त्यांचा एवढा आदर करत होतो कि मी ती विधाने डीलीट केली. प्रथमच मला माझी विधाने मागे घ्यावी लागली. त्याचा खेद नाही. त्यानंतर माझ्या एका मित्राने बौद्ध धर्म आणि त्यांची मते याबाबत एक लेख त्यांच्या ब्लोगवर प्रसिद्ध केला. त्यातील भाषा अश्लाघ्य असली तरी मी त्यांचा (माझ्या मित्राचा) निषेध का केला नाही म्हणुन माझ्यावर शाब्दिक हल्ले झाले. त्यांचा आविर्भाव असा होता कि जणु काही माझे मित्र माझे ऐकुन लिहितात...किंवा त्यांना जे गैरसोयीचे वाटते त्याचा मी निषेध केलाच पाहिजे. हे मला काय गुलाम समजतात कि काय? असो. या प्रकरणानंतर माझा या महनीय महाविचारवंतांबाबत भ्रमनिरास झाला तो झालाच. त्यांनीही नंतर सार्वजनिक जीवनात घ्यायच्या तेवढ्या वैचारिक कोलांटउड्या घ्यायच्या त्या घेतल्याच. म्हनजे एका नवीन धर्माशी आपला काही संबंध उरला नाही असेही ते जाहीरपणे म्हणालेच आणि पुन्हा त्या नवधर्मनिर्मितीच्या प्रक्रियेत सामील झाले ते झालेच. उच्चवर्णीय आणि बौद्ध धर्मीयांची नाळ जुळवण्याच्या राजकारणात ते अडकुन राहिले ते राहिलेच. त्याचे वेळी लोकायताचा आदर्शही ठेवत अजुन एका नव्या धर्माची संहिता लिहिण्याचा सन्मान त्यांनी मिळवायचा तो मिळवलाच.

हे आज लिहिण्याचे कारण म्हणजे माझे अजुन एका मित्रालाही आजच असा दंभ-दुष्टतेचा अनुभव आला. माझे मित्र त्यांना भेटायला गेले होते. चर्चेत अनेक विषय झाले. त्या चर्चेचा सारांश माझ्या मित्रांनी फ़ेसबुकवर प्रसिद्धही केला. त्यात काहीएक वावगे नव्हते. प्रसिद्ध माणसांचे जीवन हे "खाजगीपणाची" सीमा ओलांडुन बसलेले असते. पण खाजगी चर्चेतील आपल्या स्वीकृत्या आपल्या जाहीर प्रतिमेच्या विरोधात जाताहेत हे लक्षात येताच त्यांनी माझ्या मित्राला फोन करुन त्यांनी लिहिलेला मजकुर ४५ मिनिटांत उडवुन टाकायचा आदेश दिला. माझ्या मित्रासमोर दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी तो फ़ेसबुकवरुन उडवला. ही दहशतच आहे हे माझे स्पष्ट मत बनले आहे.

हे विचारवंत अत्यंत भावनीक, प्रगल्भ आणि संवेदनशील आहेत असा माझा समज होता. खरे तर मला त्यांच्याबद्दल अत्यादर एवढा होता कि माझे एक पुस्तक मी त्यांना विनम्रतापुर्वक अर्पणही केले होते. परंतु तुकारामांचा मोकला-ढाकळा विद्रोह त्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही असे या व अशा अनेक अनुभवांवरुन म्हणावे लागत आहे.  आपल्याच विचारांशी वारंवार प्रतारणा करणा-यांना मी विचारवंत मानुच शकत नाही. नव्या पुराव्यांच्या द्न्यानांच्या परिप्रेक्षात मते बदलतात हे मला मान्यच आहे पण मुलभुत मतेच ज्याची स्थिर नाहीत त्यांची मते ही कस्पटासमान असतात हेच काय ते खरे...अभ्यास कितीही असो.   बुद्ध, तुकाराम, लोकायत तत्वद्न्यान या भुलथापा मारायच्या बाबी नव्हेत. त्या अत्यंत गंभीर आणि चिरंतन बाबी आहेत. त्यांवर विशिष्ट स्वार्थी द्रुष्टीकोन बाळगत लिहिणे हा त्या महनीयांवरील अन्याय आहे.

महाराष्ट्राची एकुणातच वैचारिक पीछेहाट होते आहे. त्याला जर स्वतंत्र प्रतिभेचे विचारवंत म्हनवनारे जर हातभार लावत असतील तर ती एक शोकांतिका आहे. खाजगीत एक आणि जाहीर दुसरे बोलणारे राजकारणी आम्हाला माहित आहेत. विचारवंतांकडुन तशी अपेक्षा नाही. जेही विचारधारा स्वीकारली आहे, ती न गोंधळता, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, कसल्याही स्वार्थाचा, टीका-स्तुतीचा विचार न करता मांडत राहणे हे खरे श्रेय:स्कर आहे. अशांनाच मी विचारवंत मानतो, अन्यथा असे दंभ-विकृत विचारवंत जन्माला येतात जे कोणत्याही, अगदी त्यांच्याही समाजाच्या भल्याचे नसतात. माणसाचे विचार बदलु शकतात. पण त्या विचारपरिवर्तनाची अशीही एक दिशा असते...त्यामागे नवे चिंतन, नवे पुरावे वा नवा दृष्टीकोन असू शकतो. पण कोलांटउड्या घेत जे स्वत:चे शंकराचार्यपद निर्माण करु पाहतात ते कधीही टिकावू चिरंतन असे असू शकत नाही.

20 comments:

  1. I am not sure but it seems you have written about A H salunke Sir. Then you should write it openlly. I am fan of Salunke Sir. Though I have not seen him personaly yet. I loved his Vidrohi Tukaram, Gautam BUddha Khara Bhumiputra etc.....I have seen one photo on face book yesterday somebody claiming that Salunke sir had praised Manusmruti and some part of it is really good...........Many people were confused by this...................

    ReplyDelete
  2. सोनवणी सर,मी तुमच्याशी १००% सहमत आहे.विकास,साळुंखे सरांचे लिखाण वाचावयास खरोखरच खूप सुंदर असते.पण आपले ब्रिगेडला न पटणारे विचार प्रकट झाले तर ब्रिगेड आपल्याला खावून टाकेल की काय अशी त्यांना कायम भीती वाटत असते असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.

    ReplyDelete
  3. साळुंखे सर एकाच वेळी लोकायत, बौद्ध धर्म, तुकाराम, शिवधर्म या चार डगरीवर हात ठेवून उभे आहेत. शेवटी सर्वानी बुद्धाकडे जायचे आहे असे ते म्हणतात. शेवटी जाण्यापेक्षा आताच गेलेले काय वाईट? इतरांचे जाऊ द्या, निदान त्यांनी स्वत; तरी आताच बौद्ध धर्मात यायला पाहिजे, आम्ही त्यांचे स्वागत करू.

    ReplyDelete
  4. अनोळखी मित्रा, जो आत्मा मनात नाही, स्वर्ग , नरक मनात नाही, मूर्तीपूजा करत नाही, नवस करत नाही तो बुद्धाच त्याला अधिकृत धम्मा स्वीकारण्याची गरजच काय? जो बुद्धाच्या मार्गाचा अवलंब करतो तो बुद्ध.....

    ReplyDelete
  5. A upper caste Maratha or Brahmin Hindu will never convert to Buddhism. No matter how much they agree with the philosophy. Only those people would convert who has emptied caste from their mind and still has interest in belonging to some religion. Mr. Salunkhe is surely a world class expert but I think he still holds enough pride which stops him from being one with the Buddhist. Being among the Buddhist also mean among the Amberkarite Dalits and that is the source of conflicting stands from his side. That is what created the urge to create a new religion called Shiv-Dharma.

    ReplyDelete
    Replies
    1. This is partially true. But you can not expect change will come in one night. there are 1000 years of castiest customs and tradition ruling Maratha people' mind. So this is the beginning. Once they start thinking in way of Buddha, change will automatically come. Marathas have started respecting and worshiping Babasaheb Ambedkar, Phule, and buddha this is miracle. You could not have expected this 15 years ago. So have a patience. As Salunke sir says all ways will go ultimately to Buddisam.........that is a rationalism. Because ir-respective to cast we all were Budhha for 500 years. That is called buddhist era in India.

      Delete
  6. आ.ह. साळुंखे सरांनी मनुस्मृती बद्दल चांगल म्हटलं आहे. अशी पोस्ट फेसबुक होती. पण ती मत एका खाजगी चर्चेतील होती. जर मनुस्मृती अनि सावरकर यांच्याबद्दल त्यांची मत जर बदलली असतील तर ती त्यांनी जाहीरपणे पुसाताकातून मांडलीच असती. त्यामुळं फेसबुक वर त्या चर्चेचा सारांश टाकण्याची घाई करण्याची गरज न्हवती. वादंग निर्माण करणे हाच त्यामागचा हेतू होता. तो सफल होतोय असा दिसतंय. साळुंके सरांबद्दल अश्लील भाषा वापरल्यानंतर भाषेबद्दल तुम्ही निषेध नोंदवन गरजेच होत. टीका केली म्हणून न्हवे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रमोदजी, दबावाखाली मी कोणाचा निषेध करू शकत नाही. मी ती पोस्ट पाहण्याआधीच फ़ेसबुक ते खाजगी संदेशांतुन "तुम्ही निषेध का केला नाही?" असा भडिमार झाल्यानेच मग मी निषेध नोंदवला नाही. मी सरांना फोन करुन मी "फ़ेसबुक सोडतो आहे" असे कळवले व त्यानंतर मी आजतागायत फ़ेसबुकवर नाही, हे आपण समजावुन घेणे गरजेचे आहे. मी फ़ेसबुक सोडायला खरे कारण हा एपिसोड झाला. तुम्ही याची खात्री खुद्द साळुंखे सरांना विचारुन करुन घेवू शकता. (ते येथे तरी सत्य बोलतील अशी आशा आहे, एवढेच...) दुसरे असे कि सार्वजनिक व्यक्तीचे खाजगी आणि जाहीर असे काही नसावे हे माझे मत आहे. एक तर अभ्यागताच्या वरकरणी समाधानासाठी म्हणुन मतच व्यक्त करु नये वा केले असेल तर त्याची जबाबदारी घ्यावी. ते मत चुकीच्या पद्धतीने अभिव्यक्त झाले असेल तर दुरुस्ती करावी वा स्वत: निषेध करावा. डा. चेरेकर व माझे सावरकरांसंबधीचे वाद किमान गेल्या तीन-चार वर्षांतील आहेत. खाजगीत काय आणि जाहीरपणे काय, माझ्या मतांत बदल झाला नाही कि त्यांच्याही. पण एक गोष्ट सांगतो, डा. चेरेकर हे एक अत्यंत प्रामाणिक गृहस्थ आहेत व ते त्यांच्या विचारांशी सुसंगत असेच असतात, याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे मुळात "अगा जे झालेची नाही" असे धादांत असत्य ते लिहितील यावर माझा मुळात विश्वास नाही. म्हणुन त्यांनाही एखादी पोस्ट उडवून टाकायच्या सुचना देणे हे अन्यायकारक आहे. असे प्रा. नरके, श्रावण देवरे, डा. आनंद यादव, डा. सदानंद मोरे आदि साहित्त्यिक-विचारवंतांनी केलेले माझ्या पाहण्या-ऐकण्यात नाही. अपेक्षा आपण महनियांकडुनच बाळगत असतो. पण असे अपवाद खेदकारक आहेत. आपल्याला पटत नाहीत ते बहुजनीय विच्रारवंत आर एस एस चे हस्तक, पेड कामगार ठरवुन जाहीर करनारे असतातच...त्यांना फारश्या अक्कलेची गरज नसते.

      स्व-विचारांशी अव्यभिचारी निष्ठा हेच विचारवंतांचे एकमेव लक्षण असते. प्रसंगपरत्वे सातत्याने विचार/भुमिका बदलणे याला काही वैचारिक महत्तेचे लक्षण मानता येत नाही. असो.

      आपण माझ्या आत्मचरित्रावर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मी नितांत आभारी आहे. खरे तर अजून खुप घडले आहे, घडायचे होते...पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी...धन्यवाद.

      Delete
  7. संजय सर,धन्यवाद!माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल!प्रमोदजी सावरकरांबद्दल चांगले लिहिण्यास साळुंखे सरांनी यापूर्वीच सुरुवात केली आहे.त्यांचे परशुराम हे पुस्तक आपण वाचले नाही काय?माझा हेतू ब्राह्मणांच्या मनात साळुंखे सरांविषयी आदर निर्माण करणे आणि ब्राह्मणेतरांच्या मनातील सावरकरांविषयीचे गैरसमज दूर करणे असाच होता.वादंग माजवणे हा नव्हता.

    ReplyDelete
  8. https://www.facebook.com/note.php?saved&&note_id=1531633670707
    [परशुराम,पृ.क्र.२१३-२१५]
    रत्नागिरी येथे वि.दा.सावरकरांनी केलेल्याएका भाषणातील काही अंश मी येथे उद्धृत करू इच्छितो-
    "..चित्पावनांत जन्मलो म्हणून मला लवलेश अभिमान वाटत नाही.मला अभिमान वाटतो तो चित्पावन जातीत जन्मलेल्या थोर थोर विभुतींचाच तो काय..
    शेवटचे बाजीरावही त्याच चित्पावन कुळातील..पण मला महादजी शिद्यांचा अभिमान त्यांच्याहून दसपट अधिक वाटतो.
    दुसर्या बाजीरावाच्या जागी महादजी पेशवे होते तर किती बरे होते असे मला वाटते.
    ..
    बाष्कळ अहंकारी हिंदुविघातक कल्पनांस ब्राह्मणांनी स्वत:च तिलांजली देण्यास पुढे सरसावे..
    आम्ही केवळ जन्मानेच कोणासही उच्च किंवा नीच मानीत नाही अशी घोषणा करावी हेच मी ब्राह्मण्य समजतो.
    ..
    शेवटच्या बाजीरावासारखा खोटा मोठेपणा व भिकारडा अहंकार सांगू नका तर कर्णासारखे गर्जून उठा-
    सूतो वा सूतपुत्रो वायो वा को वा भवाह्यम/
    दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरूषं//
    "
    सावरकरांच्या अनेक विचारांशी माझे तीव्र मतभेद आहेत.पण येथे जे त्यांनी मांडले आहे ते संकुचित भूमिका नाकारून राष्ट्रहिताचा व्यापक विचार करणारे आहे.
    त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या विचाराचे संस्कार अंशत: जरी स्वीकारले,तरी या देशा ला खूप प्रकाश लाभेल असे मला वाटते.

    ReplyDelete
  9. डा.आ.ह.साळुंखे हे एक महान संशोधक आहेत.त्यांचे लेखण अतिशय मौलिक असते,असे माझे मत आहे.ते संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ यांच्यासोबत गेले तेव्हा आम्हाला फार दु:ख झाले.पुढे ते अनेक अपमानास्पद अनुभव आल्याने तेथुन दूर झाले.तसे सातारा परिषदेत त्यांनी जाहीरही केले होते.१२ जानेवारी २०१२ ला ते पुन्हा स्वगृही परतले.त्यांचा हा प्रवास उलट्या पावलांचा असला तरी त्यांचे स्वातं-य आपण मान्य केले पाहिजे.आयुष्यभर त्यांनी अनेक मोठमोठे सन्मान मिळवले.ग्रंथसंपदा निर्माण केली.आता त्यांनी काही मिळविण्यासाठी तडजोड केली असेल हे पटत नाही.त्यांचा स्वभाव खुप संवेदनशील आहे, शिवाय जातीचे प्रेम कोणाला सुटले आहे?साळुंखेंवर अनेकांनी प्रेम केले,पण त्यातले आज त्यांच्यासोबत किती आहेत?गेले ते सगळे वाईटच होते?जातीच्या गडावर शरण जाणारा किल्लेदार कितीही महान असला तरी त्याचे असे होणे अटळच नसते काय? सर,सत्ताधारी जातीची छत्रचामरे गमावु नका.आधुनिक तुकाराम जातीच्या मंबाजींना लोटांगण घालताणाचे नवे शिल्प आपण जन्माला घालीत आहात.आगे बढो.!

    ReplyDelete
  10. चेरेकरजी फेसबुक वर त्या पोस्ट काही फेक अकौंट कडून प्रकाशित केल्या गेल्या आहेत. त्या पोस्ट चा आधार घेऊन हि फेक अकौन्त्स काहीही म्हणू शकतात.....
    मला त्यातील मजकुराविषयी काहीही आक्षेप नाही. अजूनही ती पोस्ट अनेक acc वर आहे (Ex- Illa Rande)

    ReplyDelete
  11. येथे साळुंके सर कोणाबरोबर गेले आणि परत आले हा विषय आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी गौण असतो कारण त्यांचे वाचन वाचूनच माझ्यासारखे तरुण सत्याशोधानाकडे वळलो. नाहीतर २००२ साली जेवा त्यांचे पहिले पुस्तक माझ्या हातात पडले तेवा मी त्यांना शिव्याच दिल्या होत्या (हिंदू द्रोही म्हणून) पण त्यांच्यामुळेच मला तुकाराम कळले, संभाजी महाराज कळले, बळी राजा माहित झाला, आणि बुद्ध कळले. जात सहसा कुणालाच सुटत नाही. आज पण जात आहेच फक्त स्वरूप बदलले आहे.....त्यामुळे अविनाश धर्माधिकारी जेवा जातीभेदा विरूध भाषण देतात तेवा त्यांच्यातला ब्राह्मण आणि हिंदू झाकत नाही, जे माझे मित्र आणि सहकारी बोलताना म्हणतांत कि पुरीवीची बलुतेदारी पद्धतच बरी होती, गावे स्वयंपूर्ण होती, तेवा आपल्या श्रेष्ट जातीचा अभिमान झाकात नाही....आता फक्त समोर बोलता येत नाही म्हणून वेगळे मार्ग शोधात आहेत.
    आजही पुण्यात मनुस्मृती नावाच्या ५० इमारती सापडतील.................आणि ते त्याचे समर्थन करतात कि "मानुस्म्रीतीतील काही गोष्टी चांगल्या पण आहेत त्या आपण घ्यायला काय हरकत आहे? ह्यालाच म्हणतात कावा.......फक्त साळुंके सरना आपल्या कळपात वोढून विद्रोहाची हवाच काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे....त्याला काही लोक बळी पडले आहेत पण साळुंके सर बळी पडणार नाहीत हा विश्वास आहे.

    ReplyDelete
  12. साळुंखे सर हे ब्रिगेडी मराठ्यांच्या राजकारणाला बळी पडलेले विद्वान आहेत. ते नवबौद्धांचे लांगूल चालन करणारे लेखक बनले आहेत असे दिसते. सर्वोत्तम भूमिपुत्र काय, बुद्ध आणि तुकाराम काय..... ब्रिगेडी मराठ्यांनी केवळ आरक्षणासाठी नवबौद्धांशी अभद्र युती केली आहे आणि साळुंखे सर या युतीला आपल्या लिखाणातून खाद्य पुरवत आहेत. ते दंभ-विकृत तर आहेतच, त्याचबरोबर धम्म-विकृत पण झाले आहेत.

    ReplyDelete
  13. अभद्र युती म्हणजे ते काय हेच नाही काळात मला. उलट साळुंके सारणी मराठ्यांना बुद्धाचा मार्ग दाखवा त्या बद्दल आभार.

    ReplyDelete
  14. संभाजी ब्रिगेडवाले मराठे म्हणजे पूर्ण मराठा समाज नव्हे. मराठा समाजला त्यांचा धर्म आहे, त्यांना बुद्धाची गरज नाही. तसेच ब्रिगेडवाल्यांनाही बुद्ध नको आहे, नाहीतर त्यांनी शिवधर्म कशाला काढला असता? ब्रिगेडवाले तुमचा हुशारीने वापर करून घेत आहेत, पण तुम्हाला ते कळा नाही एवढेच.

    ReplyDelete
  15. ब्रिगेडवाले तुमचा हुशारीने वापर करून घेत आहेत, पण तुम्हाला ते कळत नाही एवढेच.

    ReplyDelete
  16. विकास, आ.ह.सरांनी संभाजी महाराजांवर कोणते पुस्तक लिहिले आहे? प्रकाशन वर्ष आणि प्रकाशक सांगावा.

    ReplyDelete
  17. माफी असावी, संभाजी महाराजांचा उल्लेख चुकून झाला......

    ReplyDelete
  18. मनुस्मृतीला नाकारून शिवधर्माचा स्वीकार करणारेच "Atrocity Act" रद्द करण्याचा आग्रह का धरतात हे सामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...