Monday, June 25, 2012

शैव आणि जैन धर्मातील साम्ये व विभेद...





शैव धर्म हा जगातील सर्वाधिक पुरातन धर्म आहे याबाबत आता सर्वच विद्वनांत एकमत आहे. सिंधु संस्कृतीच्या काळात या धर्माने कलस गाठायला सुरुवात केली. लिंगपुजा हा या धर्माचा आद्य प्राण होय. ही एकार्थाने प्रतीक पुजा होती. निर्मितीचे...अगदी विश्वनिर्मितीचे मुळही त्या काळातील समाजाने लिंगप्रतीकात पाहिले. आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, पूजा आणि संन्यास या महत्वाच्या तत्वांवर शैवांचा पुरातन काळापासुन ते आजतागायत विश्वास आहे.

शैव सिद्धांतांत, स्वत: शिव जरी कफल्लक मानला गेला असला तरी त्याचा मित्र कुबेर हा असूर मात्र धनाढ्य मानला गेला आहे. सिंधु संस्कृती जशी व्यापार, शेती, उत्पादकतेमुळे धनाढ्य बनत गेली तसतशी सुखासीनता वाढत गेली. पंचमकार साधनादि तंत्रांकडे समाज आकर्षित होवू लागला. समाजात अशा कालात नेहमीच एक उदासीनता येते व विचारवंत नवीन तत्वधारांच्या शोधात लागतात. याच काळात (इसपु. ३२००) या प्रक्रियेला प्रतिक्रिया म्हणुन एक नवीन विचारधारा उदयाला आली व ती म्हणजे समन संस्कृती. या विचारधारेतुन निर्माण झालेला धर्म म्हणजे जैन (जिन) धर्म. ज्याने कर्मेंद्रियांवर विजय मिळवला तो जिन अशी अत्यंत साधी व्याख्या होती. शैव योग हा या तत्वधारेचा मुलाधार बनला. कारण योगाचा अर्थही कर्मेंद्रियांवर विजय असाच आहे.


कोणताही नवीन धर्म ज्या धर्मातुन तो उदयाला आला त्याची सर्वस्वी कास सोडत नाही हे आपण ज्यु धर्मातुनच उदयाला आलेल्या ख्रिस्चन आणि इस्लाममद्धे सहज पाहु शकतो. शैव आणि जैन धर्मातील साम्ये पाहुन मग आपण त्यांच्यातील विभेदही पाहुयात.

१. शैव धर्म आत्म्यावर विश्वास ठेवतो. जैनही ठेवतात.
२. आत्मा हा सर्वोपरी असुन स्वत:तच तो संपुर्ण द्न्यानी आहे, परंतु कर्मबंधांमुळे त्याला अद्न्यानाचा आभास होतो हे दोन्ही धर्मांच्या तत्वद्न्यानाचा मुळ गाभा आहे. पुनर्जन्मावर दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
३. प्रत्येकाला मोक्षाचा अधिकार आहे. दोन्ही धर्म मुलत:जातीयता मानत नाहीत.
४. कर्मबंधातुन मुक्ती म्हनजेच मोक्ष अशी दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
५. ओंकार हा दोन्ही धर्मांनी श्रेय:स्कर व श्रेष्ठ मंत्र मानलेला आहे.
६. ब्रह्मचर्याला दोन्ही धर्मांनी विशेष स्थान दिले आहे. शैव यती आणि जैन हे प्राय: आजन्म ब्रह्मचारीच असत.
७. शिव हा नग्नच असतो. सर्वच तिर्थंकर हेही नग्न असतात व त्यांच्या प्रतिमाही विवस्त्रच बनवल्या जातात.
८. षैव व जैन धर्म हे अवैदिक धर्म मानले जातात.

अशी अनेक महत्वाची साम्ये असतांनाच महत्वाचे विभेदही पाहिले पाहिजेत. ते असे:

१. शैव धर्मात हिंसा, बळी याला महत्व आहे. जैन धर्म हा अत्यंत टोकाची अहिंसा हे आपले मुलतत्व मानतो.
२. सत्याला व अस्तेयाला दोन्ही धर्मात महत्व असले तरी अपरिग्रह हे अत्यंत महत्वाचे तत्व जैनांनी शोधले.
३. शिव व शक्तीच्या आद्य मिलनातुन विश्वाची निर्मिती झाली अशी शैव श्रद्धा आहे, परंतु जैन मात्र विश्व हे कोणीही निर्माण केले नसुन ते आहे तसेच अनादी अनंत आहे असे मानतात. एका अर्थाने बिग ब्यंग सिद्धांत विरुद्ध स्थिर विश्व सिद्धांत यात विभेद असावा तसाच हा विभेद आहे.

हे महत्वाचे विभेद दोन धर्मांत असले तरी ते अतंर्गतत: सुसंगतच आहेत कारण जैन धर्म हा शैव धर्माची पुढची पायरी होता. आधीचे दोष दूर करत पुढे जाणे हीच मानवी समाजाची प्रागतिकता असते.

जैन धर्म आणि शैव यांतील अत्यंत महत्वाचे साम्य म्हणजे जैनांच्या चोवीसपैकी २० तीर्थंकरांच्या नांवात "नाथ" हे शिववाचक पद आहे. शिवाला आदिनाथ मानले जाते...हे आपल्याला माहितच आहे..वृषभनाथांचे पर्यायी नांव हेही आदिनाथ असेच आहे. एवढेच नव्हे तर नंदी (वृषभ) हे शिवाचे एक प्रतीक असून आद्य तीर्थंकर वृषभनाथांचे प्रतीकही वृषभच आहे. थोडक्यात जैन विचारधारा ही शैव धर्माला पर्याय म्हणुन नव्हे तर शैव सिद्धांत पुढे नेण्यासाठी झाली असे स्पष्टपणे म्हणता येते.

जैन धर्मानंतर या दोन्ही धर्मांना पर्याय म्हणुन एक नवीनच धर्म उदयाला आला व तो म्हणजे वैदिक धर्म. सरस्वती नदीच्या काठी जन्माला आलेला, वसिष्ठ ऋषीने प्रवर्तीत केलेला हा धर्म अत्यंत विरोधी तत्वद्न्यान घेवुन पुढे आला. या धर्माची महत्वाची मुलतत्वे अशी:

१. आत्मा-मोक्ष-पुनर्जन्म-प्रतीक पुजा या तत्वांवर विश्वास न ठेवता अग्नीच्या (यद्न्याच्या) माध्यमातुन हविर्द्रव्ये अर्पण करत निसर्ग-रुपकमय देवतांना प्रसन्न करुन घेणे.
२. ब्रह्मचर्य-संन्यासावर विश्वास नाही. निपुत्रिकाला कोणतीही गती नाही हा विश्वास.
३. लिंगपुजा पुर्णतया नाकारली. नागरी अवस्थाही नाही आणि पुर्ण गृहस्थी जीवनाचा त्यागही नाही अशी मध्यम जीवनव्यवस्था.
४. मुर्तीपुजा सर्वस्वी अमान्य.
५. पुरुषसत्ताक पद्धतीचा पुरस्कार.

हा धर्म इसपु १००० च्या आसपास एका परिणत अवस्थेला पोहोचला होता. परंतु त्याचा प्रचार उत्तर भारतात काही प्रमानात झाला असला तरी तो सर्वमान्य धर्म नव्हता. याचे कारण म्हणजे वैदिक धर्मात असलेली वर्णव्यवस्था. यद्न्यकर्मांतील क्लीष्टता आणि त्यामुळेच पुरोहितांचे वाढलेले स्तोम. शिवाय यद्न्य हे खर्चीकही असत. सर्वांना ते परवडणे शक्यही नव्हते. त्यामुळे पुजादि अत्यंत सोपे मार्ग सांगणारा मुर्ती/प्रतीकपुजक शैव धर्म अव्याहत वाढतच राहिला तसाच जैन धर्मही. हे दोन्ही धर्म मानवी समुदायांना मानसिक समाधान देण्यात सक्षम होते.

पण यानंतर जन्माला आला तो बौद्ध धर्म. हिंदु धर्माला आव्हान देणारा धर्म म्हणुन बौद्ध धर्माकडे आजही लोक पाहतात. पण मुलात हिंदु नामक धर्मच अस्तित्वात नसल्याने गौतम बुद्धाने मग नेमक्या कोनत्या विचारधारेच्या विरुद्ध आणि कोणत्या विचारधारेच्या समर्थनार्थ आपले तत्वद्न्यान निर्माण केले हे पाहणेही रोचक ठरेल.

त्यासाठी आधी आपण बौद्ध धर्माची मुलतत्वे पाहुयात:

१. बौद्ध धर्माला मुळात मुर्तीपुजा मान्य नव्हती.
२. बौद्ध धर्माने यद्न्यांतील पशुहिंसा नाकारली, पण यद्न्यांना विरोध केला नाही.
३. बौद्ध धर्माने इंद्र-वरुणादी वैदिक देवता स्वीकारलेल्या आहेत.
४. बौद्ध धर्माचा आत्मा-मोक्ष-पुनर्जन्मावर मुलत: विश्वास नाही. (फार उत्तरकाळात याही सद्न्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. पण थेरवाद, जो मुळ बौद्ध धर्म आहे, तो या संकल्पनांना मान्यता देत नाही.)
५. बौद्ध धर्म हा मुलत: पुरुषप्रधान आहे. स्वत: गौतम बुद्धांनी भिक्खु संघात स्त्रीयांना प्रवेश नाकारला होता. पण त्यांचा शिष्य आनंद याच्या आग्रहाने अत्यंत खेदाने त्यांनी स्त्री प्रवेश मान्य केला.
६. बौद्ध धर्म मांसाहाराला विशिष्ट स्थितीत अनुद्न्या देतो.
७. बौद्ध धर्म कोणताही आत्यंतिक मार्ग न स्वीकारता मध्यम मार्ग स्वीकारतो.
८. विश्वनिर्मितीबाबत बुद्ध मौन आहेत. अनित्यतावाद हा बौद्ध धर्माचा पाया आहे.

थोडक्यात बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म यांच्यात सुसंगती आहे. मी एका पुर्व लेखात लिहिले होते कि बौद्ध धर्म ही वैदिक धर्माची सुधारणा आहे. शैव अथवा जैन धर्माचा त्याशी ऐतिहासिक संबंध नाही. बौद्ध धर्माने जरी समन सम्स्कृतीची, सांख्य तत्वद्न्यानाची उसनवारी केली असली तरी हा धर्म म्हणजे वैदिक धर्मासाठीचा नवसुधारणावाद होता.

अर्थात तो वैदिक धर्मियांनी मान्य केला नाही. जरी बौद्ध धर्माचे सर्वाधिक अनुयायी ब्राह्मणच झाले असले तरी ब्राह्मणांनीच भारतातुन बौद्ध धर्म हद्दपार केला हा इतिहास विसरता येत नाही.

त्याउलट जैन धर्माशी शैव धर्मीयांचे कधीही वाकडे झाल्याचा इतिहास नाही. जैनांबाबत शैव नेहमीच सहिष्णु राहिले आहेत. आजतागायत भारतात जैन-हिंदु असा वाद झालेला नाही. कोणत्याही खेड्यात जैन दुकानदाराचे एखादेच कुटुंब असते...पण कोणालाही विद्वेषाने वागवले गेल्याचा इतिहास नाही.  त्या धर्माचा सुधारणावादही कोणाच्याही पचनी पडलेला नाही. वैदिक धर्म हा जगातील आद्य मिशनरी धर्म. बौद्ध धर्मही मिशनरी तत्वावरच वाढला. वैदिक धर्म हा जगातील आद्य मिशनरी धर्म. बौद्ध धर्मही मिशनरी तत्वावरच वाढला.  त्यांनी धर्मप्रचारक निर्माण केले. ख्रिस्ती मिशनरी त्याच चालीवर वागु लागले.  सामाजिक कारणांसाठी एखाद्या मृत धर्माचे पुनरुत्थान करणे मी समजु शकतो, परंतु तसे करत असतांना आपण नेमक्या कोणत्या विचारधारेचे अंगिकरण करत आहोत हे समजणेही गरजेचे आहे. बौद्ध तत्वद्न्यान आणि वैदिक तत्वद्न्यान यात साम्ये अधिक विभेद कमी असे चित्र आहे.

परंतु शैव तत्वद्न्यान आणि जैन तत्वद्न्यान यात साम्ये अधिक आणि विभेद कमी असे चित्र आहे म्हणुनच जैन धर्म कोनताही सामाजिक विवाद निर्माण न करता अखिल समाजाच एक भाग म्हणुन अव्याहत जीवित आहे, एवढेच!

15 comments:

  1. Replies
    1. bodh dharma stapne agodal ling puja hoti

      Delete
    2. मुलानो ,
      आपल्याला कळत नसेल तर जास्त बोलू नये .
      इतके जरी समजले तरी जेंव्हा खरोखरच टाय लाऊन समाजात वावराल त्या वेळेस लोक
      तुमच्याकडे पाहून हसणार नाहीत आणि असे म्हणणार नाहीत की हेच ते बावळट !
      आत्ता कसा बावळट दिसतोय पाहिले का स्वतःकडे - जादूचे प्रयोग करणारा किंवा
      एस टी च्या स्टोप वर पेन आणि कंगवे विकणारा असतो तसा दिसतोय हा !
      बोलताना , लिहिताना काळजी घे .
      ओ.के ? बाय !

      Delete
  2. सोनावानिजी, मला एक गोष्ट समजत नाही, जेवा तुम्ही देवालाच मनात नाही तेवा लिंग पूजा, शैव धर्म यांना का मानता. तुम्ही एका ठिकाणी मला उत्तर दिले आहे कि विठ्ठलाची कोणी बदनामी केली तर तुम्हाला राग येईल. मला पण येईल कारण ती माझी संस्कृती आहे. पण जर चांगल्या हेतूने बहुजनांना मुर्तीपुजेकडून , देव धर्म, कर्मकांडे, स्वर्ग , नरक , या गोष्टीतून मुक्त करत असेल.......तर त्याचे स्वागत होयला नको का?

    बुद्ध धम्माच्या पुनर्त्थोना विषयी जे आपले मत आहे ते मला अजिबात मान्य नाही....धम्मा का पुनर्जीवित (जो भारतातून नामशेष झाला होता पण अमेद्कारणी पुनर्जीवित केला आहे ) करावा हा आपला प्रश्न आहे.

    माझा प्रश्न आहे , जे चांगले ते समोर आणावे.......तुम्ही जैनिसम विषयी चं लिहिले आहे. तो तुमचा अधिकार आहे. पण त्याव्लेई तुम्ही आत्मा मानता का> स्वर्ग मत का हे पण लोकासमोर येवू द्या.........याला उत्तर नाही असेल.....तर तुम्ही वागता वेगळे, लिहिता वेगळे असे होईल.

    जी धर्मामध्ये, ख्रिस्ती धर्म मध्ये, इस्लाम धर्म मध्ये आणि वैदिक धर्म मध्ये जगाची उतपत्ती कशी झाली आहे हे सांगितले आहे ते तुम्हाला मान्य आहे का?

    बुद्धाने इमानदारीने सांगितले कि हे जग कसे निर्माण झाले हे मला माहित नाही आणि कुणी त्याच्या भानगडीत पण पडू नये कारण तो वेळेचा अपव्यय असेल. त्यापेक्ष्य जे जीवन मिळाले आहे ते चांगल्या पद्धतीने जगण्याचा मार्ग मला सापडला आहे.

    बुद्धाने सांगितले कि भीती हे जगातील जवळ जवळ सगळ्या दुक्खाचे कारण आहे तिच्यावा र्विजय मिळवा/ दुसर्या धर्माचा पायाच मुली भीतीवर आधारलेला आहे. नरकाची भीती, पापाची भीती.....मारण्याची भीती....देवाची भी आणि सैतानाची भीती.............तुमचं शैव धर्मात तिसरा डोळा उगधाण्याची भीती......मी कोत्या धर्मात जातीत जन्माला आलो यापेक्ष्य सत्य काय आहे ते जाणून घेणे महत्वाचे ...उगाच कश्याचा पण अभिमान बाळगण्या पेक्ष्या जगातून भीती कमी करण्याचा प्रयत्न करावा त्याचे मार्ग मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही......

    माफ करा मी लेखक नाही पण धर्म आणि देव या गोष्टीनी जगाचे खूप नुकसान केले आहे म्हणून ...हा प्रपंच

    ReplyDelete
    Replies
    1. Great reply 👌🏻👌🏻🙏🏻👌🏻👌🏻🌺🌺🌺

      Delete
  3. Why do you write anything about Buddha when your primary aim is distort him and his dhamma. I think you are by nature against Buddha or you are against the people who have converted to thier original faith .i.e. Mahars. One hand you write some imaginary book about the history of Mahars, then expect they should accept whatever crap you wrote. You should join RSS. Actually believing in any false notions in not a religion. Andhashraddha mag ti atmachya astivabaddal kinva nasanyabaddal, ha dharm hot nahi, Are you against Brahmins/Buddha or Mahars? Be clear yourself. i think more than that your are definitely against BAMCEF and hence against Buddha. Even Balasaheb Thakre tried to divide Dalits as Hindu Dalit and other. But barring few occasions he could get success, hence he now tying up with Dalits who are followers of Buddhism.

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonimous, the article is aimed to discribe differences and similarities in the Asdian religions. It is called comparative studies. I am not against or in favor of any religion,caste. This doese not mean that comparative studies be avoided. If you think my book on Mahar is crap it is your opinion and I respect it.

      Delete
  4. बुद्धाने सांगितले की माझा शब्द अंतिम मानू नका.....

    What about that?

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणून तर मला तो धर्म सर्वात योग्य वाटतो....याचा अर्थ साप्मुर्ण पाने मी धर्मी (बुद्ध) वगैरे होईल असा होत नाही. पण ह्या धर्मात अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही. देव तुमचे दुक्ख दूर करणार नाही ते तुम्हालाच दूर करायचे आहे.......हेच अंतिम सत्य आहे.....
      आणि जेवा बुद्ध म्हणतो कि माझे सुद्धा ऐकू नका तेवा तो खरे बोलत असतो, बुद्ध म्हणतो.....तुम्ही प्रश्न विचार , विचार करा, तुमचा सद्सद विवेक बुद्धीला पटले आणि तर्कावर सिद्ध झाले तर त्याला मान्य करा. ह्याच्या खरा धर्म कोणता हवा. .....दुसर्या धर्मासार्काहे नाही मी जे बोलतो तेच खरे......पृत्व्ही नागाच्या फण्यावर उभी आहे, पृथ्वी सपाट आहे आणि तिचे वय ६००० वर्ष आहे, माझे धार्मिक पुस्तक म्हणजे अंतिम सत्य आहे आणि जो तो मनात नाही ते नरकात जाणार. हे जर सत्य असेल तर साधारण २५०० वर्षापुर्विचेह सगळे लोक अपोआप नारकर गेले ....आणि एक दुसर्या धर्माच्साठी......च्रीस्ती लोक्साठी बाकी सगळे, मुस्लीम लोकासाठी बाकी सगळे, आणि हिंदू लोकासाठी बाकी सगळे..नरकात गेलेच महानायाचे कि, जैन धर्मासाठी बाकी सगळे . असे काय बुद्ध धर्म भीती घालत नाही हेही नसे थोडके.

      Delete
  5. विकासजी, तुमची प्रतिक्रिया गैरसमजतुन आलेली आहे. मी चार धर्मांपैकी कोणाला मानतो वा माझ्या व्यक्तिगत श्रद्धा काय आहेत हा मुळात चर्चेचा विषय नसुन धर्मांची तुलना हा आहे. विट्ठलाचीच नव्हे तर कोणत्याही धर्मातील कोणत्याही महनीयाची बदनामी झाली तर मला राग येईल, तुम्हालाही यावा. माझा आक्षेप धम्माच्या पुनर्जीवनाबाबत आहे असे तुम्हाला का वाटले हे समजत नाही. धम्माच्या कोणत्या नेमक्या भागाला...म्हणजे थेरवाद, महायान कि हीनयान, यापैकी नेमके कशाचे पुनरुज्जीवन आहे हा प्रश्न आहे कारण तीन्ही पंथांत बुद्धाचे तत्वद्न्यान वेगवेगळ्या स्वरुपात पुढे नेण्यात आले आहे. आपल्याकडे धर्मविषयक तुलनात्मक चर्चा करतांना आपण फार संवेदनशील असतो, परंतु अशा चर्चांनीच मुलभुत धर्मतत्वे, त्यातील साम्य व विभेद समजायला मदत होते. एखाद धर्म static होवू लागला कि एक तर नवीन धर्म स्थापन होतात (जसा अलीकडचाच शिवधर्म) किंवा नवीन पंथ निर्माण होवू लागतात आणि हे जगभरच्या धर्मांबाबत झालेले आहे. कोणी कोणत्या धर्माचे अनुसरन करावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणतही धर्म महन अथवा सर्वश्रेष्ठ असतो असे नाही. मुळात दोन धर्म वेगळे ठरतात ते साम्यांमुळे नव्हे तर विभेदांमुळे, पण मुळात ज्या धर्मातुन नवीन धर्म निर्माण होतो तो काही मुळ अंश आपल्यात ठेवतोच. उदा. इस्लाम व ख्रिस्ती धर्मामद्धे ज्यु धर्माचे भरपुर अवशेष आहेत. ते स्वाभाविकही आहे. भारतात हिंदु धर्म म्हणजे वैदिक धर्म असे मानायची प्रथा आहे पण ते वास्तव नाही. वैदिक धर्म आणि शिवप्रधान मुर्तीपुजकांचा धर्म या सर्वस्वी वेगळ्या धर्मपरंपरा आहेत हे लक्षत घ्यावे लागते.

    ReplyDelete
  6. सर् तुम्ही हिंदू धर्म आणि वैदिक धर्म वेगळे आहेत हे म्हणतात पण माझ्या माहिती नुसार शैव आणि वैष्णव असे हिंदू (वैदिक )धर्मात दोन पंथ आहेत आहेत अनि त्यांची सांगड हि शंकराचार्य यांनीघराघरात पंचायतन पुजा सुरु केली त्याकाळी आंगण कसे सारवले आहे या वरून वैष्णव आणि शैवओळखत बहुदा यात काही कमी जास्त असेन कारणअसंग माझा तुमचा इतका व्यासंग नाही पण हे नक्की कि वैदिक आणि शैव वेगळे नाहीत.तच त्यात आणखी द्वैत अद्वैत वाद आहे. बाकी तुमचा अभ्यास पूर्ण लेखनास सलाम फक्त एवढीच विनंती आहे कि आयते कोलीत कोणास देऊ नका...

    ReplyDelete
  7. I m Hindu,Hindu word is nigher in Ramyana,Mahabharat nor in Vedas and n types of Purans.Now a days First identity of Human started from religion,cast,location,property.Common point of discussion is Corruption ( Money,culture).
    When corruption had started ? After Independence or at the time of Chaturvarna formation like Brahamins,Kshetriya,Vaishya,Sudras.I m sure this was the 1st step of corruption.Second step is Home havan and here started nonveg foods and Daxina(Hinsa).At that time Pralhad,Charvak and vairochan are against above two and become isolate and carry there original humanities aspects.These are today's jin-jain-jinedras.Except profit Jain religion having maximum original and ancient scientific aspects like one of the best 1) Not to marry with Five surnames within relation.Hence they are almost free from genetic disease. I m proud i m Hindu but very gilt y about Unacceptability,Devdasi Pratha( Bramins girls never become devdasi,while every where first priority given to brahmins),sati prata( Except Brahmin women applicable for all Hindus).Home Havan or Balipratha stopped by Gotam( Pali)Buddha is real truth.I m not sure but vairochan is in pali literature also.Any way we are now in transformation phase mean toward golden age which was dream of Lord Mahavir,Lord Buddha,Guru Nanakdeo,Basveshra, saint Namdeo,saint Tukaram and Chatrapati,Gurugovind singh and Maharana Rana Pratap.

    ReplyDelete
  8. -स्वत: गौतम बुद्धांनी भिक्खु संघात स्त्रीयांना प्रवेश नाकारला होता. पण त्यांचा शिष्य आनंद याच्या आग्रहाने अत्यंत खेदाने त्यांनी स्त्री प्रवेश मान्य केला.
    हे सांगताना स्पष्ट दिसुन येते की, बुद्धांनी आपली मते कोणावर ही लादलेली नाहीत.

    -विश्वनिर्मितीबाबत बुद्ध मौन आहेत. अनित्यतावाद हा बौद्ध धर्माचा पाया आहे.
    हे योग्यच आहे, बुद्धांनी कधीच हवेतील उत्तरे दिली नाहीत.
    काळानुसार मते बदलतात पण मानवता बदलत नाही...

    -शैव धर्म आत्म्यावर विश्वास ठेवतो. जैनही ठेवतात.
    आत्मा हा सर्वोपरी असुन स्वत:तच तो संपुर्ण द्न्यानी आहे, परंतु कर्मबंधांमुळे त्याला अद्न्यानाचा आभास होतो हे दोन्ही धर्मांच्या तत्वद्न्यानाचा मुळ गाभा आहे. पुनर्जन्मावर दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
    इथे अगदिच काहीच कळत नाही जरा इथे आमच्या सारख्या सामन्यांसाठी जरा कठीण होत आहे. उदाहरण दिले तर बरेच होईल.
    पुनर्जन्मावर दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे परंतु तो विषय कठीण आहे परंतु त्याचे ही उदाहरण जगाला जरुरीचे आहे.

    -ओंकार हा दोन्ही धर्मांनी श्रेय:स्कर व श्रेष्ठ मंत्र मानलेला आहे.
    काय असतात हे मंत्र व काय करतात हे देखिल मला वाटते जगाला बघायला आवडेल.
    कोणीही व कोणत्याही धर्मींयांनी मंत्राद्वारे काही केले याचे पुरावे सादर केलेले नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अननोन मित्रासाठी,
      ओम मंत्र म्हणण्याने हिलिंग इफेक्ट होतो असे फारतर डॉक्टर लोकांच्या भाषेत सांगता येईल.-म्हणता येईल.
      आई हा काही मंत्र नाही आपल्या मोठ्या लोकांसाठी ! पण लहान मुल विनाकारणच आईच्या मागे मागे
      फिरत सारखे आई आई असे करत असते.त्याला शेवटी आई खेकसून विचारते की काय हे कारट ! सारखी भिण भिण लावल्ये .
      त्या मुलाला असे म्हटले तरी मजा वाटते आणि ते परत आई आई म्हणत पळत सुटते .
      मंत्र म्हणजे काहीही जादू नसून उत्स्फूर्त उद्गार आहे !
      मूळ हुंकार जो आहे तो सुधारीत रुपात ओम च्या रुपात आला आहे.
      तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टोम ,कोम ,ठोम काहीही म्हणू शकता किंवा काहीच नाही म्हटले तरी कुणी तुम्हाला पकडायला येणार नाही !
      भारतातले सर्व धर्म इतके उदारमतवादी आहेत की कुणीही आपल्याला जाब विचारत आपल्या दाराशी येत नाही -
      धर्म म्हणजे यथार्थपणे जगण्याची पद्धत इतकाच आपल्याकडे अर्थ आहे .

      मी अनुभवाने सांगतो की ओंकाराच्या म्हणण्याने छान वाटते.हा वैयक्तिक अनुभव आहे.तो आपण खोडून काढू शकत नाही.
      तुम्ही कसेही झोपून,मुतारीत ,रस्त्यावर,पोहोताना,कोणत्याही अवस्थेत तो म्हणू शकता.त्याने कोणतेही पुण्य जोडले जात नाही.
      मुळात पुण्य आले की पाप आले.
      पाप पुण्य आले की नरक स्वर्ग आले,पुनर्जन्म आला.
      जे सर्व खोटे आहे.

      Delete
  9. संजयजी,
    इतका छान लेख इतक्या उशिरा वाचनात आला .
    अतिशय सुंदर विवेचन आहे.
    यामध्ये नेमके सांख्य आणि चार्वाक यांचे भारतीय विचारसरणीत प्राबल्य कधी होते ते सांगायला हवे होते.
    आपला लेख फारच सुंदर झाला आहे.काही शब्द मात्र सर्वाना माहित असतातच असे नाही म्हणून बोलीभाषेत त्याचा अर्थ जर दिला ( उदा:अपरिग्रह )तर बरे होईल.
    तसेच बौद्ध धर्मात " थेरवाद " असे आपण लिहिले आहे ( शेवटून ५ वा प्यारीग्राफ ) - म्हणजे काय ?ती टायपिंगची चूक असावी असे वाटते.

    थोडा राग येण्याचे कारण असे की आपल्या लिखाणावर मत देणारे आपल्या लेखाच्या बैठकीला समजून घेत नाहीत.
    तत्व ज्ञानाचा अभ्यासक म्हणून प्रत्येकाला लिखाण करण्याचा हक्क आहेच !
    आपल्या लेखावर टिपण्णी करणारे असे वसवसलेले अंगावर धावून आल्यासारखे का वागतात ?
    आपण संयतपणे वैदिक,जैन आणि बौद्ध धर्माची तोंडोलाख करून दिली आहे.
    आणि तीसुद्धा आपण जो मुद्दा मांडत आहात त्या संदर्भापुरती आहे.

    माझी लोकांना विनंती आहे की त्यानी मराठीत लिहिले तर ते सर्वांना जास्तीत जास्त लोकांना समजेल.

    मुळात आपण लिहित आहात शैव आणि जैन यांच्यातील साम्यावर ,आणि त्या लिखाणाला पूरक म्हणून आपण इतर बाबींना स्पर्श केला आहे.

    एखाद्या मुद्द्यावर लिहिणारा त्या तत्वज्ञानाशी सहमत असतोच असे मुळीच नाही.
    (मी देव अजिबात मनात नाही तरीही या चर्चेतील गोष्टी समजून घेत त्यात भाग घेणे चुकीचे नाही ही शिस्त आपण सर्वानी सनजुन घेणे महत्वाचे आहे.)
    लिहिणारा एक अभ्यासक म्हणून लिहित असतो.तो त्या तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता असेलच असे मुळीच नाही.
    समजा मी निरीश्वरवादी आहे.आणि धर्म ही सध्या कालबाह्य झालेली गोष्ट आहे असे माझे मत आहे
    पण मी माझ्यावर संयम ठेऊन ती बाब आत्ता इथे मांडायला नाही पाहिजे.कारण त्याला वेगळे व्यासपीठ असू शकते .
    माझ्या मताचा इथे जर मी प्रचार करत बसलो तर ते विषयांतर होईल- आणि ते चुकीचे आहे.
    दुसऱ्याच्या जागेचा फायदा घेतल्यासारखे होईल ते !

    व्यासपीठाच्या मर्यादा सोडणे हे शिष्टाचाराला धरून नाही याचे भान सर्वांनी ठेवूया !
    शेवटी पुन्हा एकदा श्री संजयजी यांचे अभिनंदन !


    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...