Monday, October 22, 2012

हिंदुत्ववाद्यांना हिंदू का मानत नाही?


सध्या काही मंडळीला "मोदी" तापाने पछाडले आहे असे दिसते. लोकशाहीत कोणी कोनाला पछाडावे यावर बंधन असू शकत नाही. लोकशाही मार्गाने मोदी पंतप्रधान झाले तरी कोणाची हरकत असू शकत नाही. परंतू असे करण्यासाठी वा होण्यासाठी मोदी समर्थक हिंदुत्ववादी किती खालच्या स्तरावर जावू शकतात याची प्रचिती येते आहे. खालील मजकुर शैलजा शेवडे यांनी आर्कुटवर प्रसिद्ध केला होता. हा मजकुर जसाच्या तसा माझे मित्र डा. मधुसुदन चेरेकर यांनी फ़ेसबुकवर प्रसिद्ध केला व "मोदी लाओ..देश बचाओ" अशी उद्घोषणाही केली. हा मजकुर पहा:

"शैलजा शेवडे - Oct 17
धक्कादायक.....!

आताच शेजारी रहाणा-या सेकंड इयर बी.कॊम. ला असणा-या मुलीचं फाऊंडेशन या विषयावरचा पाठ्यपुस्तकातला एक धडा पाहिला. ह्युमन राईटस विषयावरचा. त्यात बहुसंख्यांक लोकांनी अल्पसंख्यांकावर केलेल्या अत्याचाराचे वर्णन आहे. त्यांनी लिहिलं आहे, की आसाममध्ये अल्पसंख्याक ख्रिश्चनांवर हिंदू अनन्वित अत्याचार करतात.. गुजताथमध्ये मुस्लिमांवर हिंदु अत्याचार करतात. अल्पसंख्याक स्त्रियांवर हिंदु बलात्कार करतात. गुजराथमध्ये हिंदुंनी मुसलमान स्त्रियांची अब्रु लुटली. मुसलमानांच्या मशिदी फोडल्या.

कुणाला कल्पना आहे, आपल्या मुलांना हे असले शिकवले जाते. आणि आपली मुलं घोकंपट्टी करून तसच्या तसं पेपरात लिहितात. तसचं समजतात.

पाठ्यपुस्तकात दिलेल्या असल्या विधानांबद्दल आपण काय करू शकतो? कुणाला जाब विचारावा?"

वरीलप्रमाणे जर खरेच अभ्यासक्रमात असते तर ते निषेधार्ह व निंदनीय ठरले असते व विधीवत मार्गाने निषेध करत शासनाला असा भाग वगळायला भाग पाडले गेले असते. खातरजमा करुन घेण्यासाठी मी प्रत्यक्ष या अभ्यासक्रमाच्या नोट्स व मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम बारकाईने पाहिला. तो पाहता वरील मजकूर धादांत खोटा, दिशाभुल करनारा व अकारण तेढ वाढवनारा आहे हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात "मानवाधिकार" भागात तृतीय सेमीस्टरला खालील भाग शिकवले जातात....

अनुसुचित जाती/जमाती, स्त्रीया, मुले व अल्पसंखंक अशा दुर्बल घटकांबाबत होवू शकणारी मानवाधिकार उल्लंघने व तत्संबंधीचे कायदे. यात गुजरात आसामबाबत शेवडे बाई म्हणतात तशी कसलीही उदाहरणे दिलेली नाहीत. हिंदूवर असले आरोप नाहीत. परंतु केवळ हिंदुंच्या भावना भडकावून हिंदुंची मते हिंदुत्ववाद्यांकडे खेचण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. हे असले हिंदुत्ववादी हिंदू धर्मावरील कलंक आहेत. आम्ही अशा खोटारड्या हिंदुत्ववाद्यांना हिंदू का मानत नाही हे आता तरी स्पष्ट होईल!

चेरेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी तरी शहानिशा केल्याखेरीज अशा गोष्टी प्रसारित करु नये ही त्यांना विनंती आहे.

16 comments:

  1. " आपल्याकडे वर्णसंकर हा अगदी शास्त्रोक्तपणे होत आलेला आहे.
    पितृसावर्ण्य , मातृसावर्ण्य ,अनुलोम आणि प्रतिलोम असे ते चार प्रकार !उद्दालक ऋषींचा काल - ज्या वेळेस विवाहसंस्थाच निर्माण झाली नव्हती
    ब्राह्मण इतर तीनही वर्णाच्या स्त्रियांशी लग्ने करत असत.आणि त्यांच्या पोटी झालेली संतती हि ब्राह्मणच मानली जात असे !
    त्रिषु वर्णेषु जातो हि ब्रह्मणो ब्राह्मणात भवेत - -
    आणि हे भिन्न्वर्ण ब्राह्मण संतान ब्राह्मणांच्या कन्येशी अभिन्नपणे विवाह करी !
    मातृ सावर्ण्य : आईची जात तीच मुलाची जात ठरू लागली
    " शुद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वा विशः स्मृते -ते चं स्वा चैव राज्ञश्च स्वा चाग्रजन्मनः -"
    अनुलोम प्रतिलोम प्रथांमुळेच संकारामुळेच पोटजाती उत्पन्न झाल्या
    खुद्द पाण्डवांचेच कुल पहा.
    ते कुल म्हणजे धर्म संरक्षक आर्योत्तम सम्राट भरताचे ! पांडवांचा काल म्हणजे " चातुर्वर्ण्यं मया सृष्टम "अशी घोषणा करून चातुर्वर्ण्याची
    हमी घेतलेल्या वासुदेव श्रीकृष्णाचा .
    प्रतीपाने शंतनूस सांगितले कि राजा ! हि स्त्री कोण कुठली - काय जात असे काहीही न बघता तिच्याशी लग्न कर त्यावरून शंतनुने
    गंगेशी लग्न केले.त्याचा मुलगा भीष्म ! पुढे शंतनुने कोळ्याच्या मुलीशी - सत्यवती शी - जात गोत माहित असून लग्न केले .
    शंतनुची जात गेली नाही .उलट सत्यावातीचे दोनही मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य -भारतीय ब्राह्मणांचे शास्त्रोक्त सम्राट झाले !
    पुढे त्या कोळ्याच्या मुलीच्या मुलाने - विचीत्रविर्याने अंबिका आणि अंबालिका या क्षत्रिय राजकन्यांशी विवाह केला
    विचित्रवीर्य अकाली मेल्याने त्या राण्यांपासून नियोग पद्धतीने व्यासांपासून पुत्रप्राप्ती केली.
    हा व्यास कोण ? तर ब्राह्मणश्रेष्ठ पराशर पुत्र ! आणि हा पराशर नेमका कोण तर " श्वपाकाच्च परशरः -एका अस्पृश्य श्वपाकाचा पुत्र !
    त्या अस्पृश्याचा हा पुत्र पराशर ब्राह्मण श्रेष्ठ ठरला त्यास कोळीण कुमारीकेपासून जो पुत्र झाला तोच महाज्ञानी महातपी महाभारतकार व्यास होय !
    व्यासानी नियोगाने पंडू आणि धृतराष्ट्राला जन्म दिला.दासीपासून नियोगाने विदुर जन्मला.पुढे पंडूच्या आज्ञेने
    कुंती आणि माद्रीने अज्ञात पाचजणांपासून पाच पांडवांना जन्म दिला ! भीमाने हिडीम्बेशी आणि कृष्णाने जम्बुवान्तिशी लग्ने केली होतीच !
    तात्पर्य , आजकाल स्वघोषित तथाकथित हिंदुराष्ट्र जसे बेटीबंदी , रोटीबंदी , लोटीबंदीच्या चीरेबंदीने चिणून टाकलेले आहे तसे ते त्याकाळी मुळीच नव्हते !
    राजकुळाची हि कथा तर प्रजेची काय ?
    अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे
    कृष्णाचा एकही पुत्र प्रतीकृष्ण निघाला नाही.
    डोळस व्यासांचा पुत्र आंधळा तर नातू दुर्योधन दुःशासन !
    शुद्धोधनाचा पुत्र बुद्ध आणि बुद्धाचा राहुल !
    शिवाजीचा पुत्र संभाजी , आणि नातू शाहू .
    पहिल्या बाजीरावाचा पुत्र राघोबा आणि नातू पळपुटा बाजीराव ! कर्तृत्ववान आणि त्याच्या पुढच्या पाच पिढ्या यातच सगळे आटपते !

    तुकारामांच्या आज २० - २० पिढ्या होऊन गेल्या पण दुसरा तुकाराम निपजला नाही !
    किंवा पांडुरंगाने पुन्हा कधी त्यांच्या नातवंडांसाठी विमान पाठवले नाही !मला तरी माहित नाही !
    गेल्या सात पिद्ध्यात रामदासांच्या घरात दुसरा रामदास झाला नाही , न नेपोलियनच्या घरात दुसरा बोनापार्ट !
    हा लेख लिहिला आहे -विनायक दामोदर सावरकर यांनी.
    ते जातीभेदाची कशी खिल्ली उडवत त्याचे हा लेख उत्तम उदाहरण आहे.
    त्यांचा अजून एक लेख खुद्द डॉ .आंबेडकर यांच्या संदर्भात आहे.
    एक पत्र दिनांक १३ -११-१९३५ चे .आणि त्या संदर्भात इतर लेख .डॉ .आंबेडकर निमंत्रण वजा लेख आहे.
    सावरकर हे आजच्यासारखे वांझोटे राजकारण करणारे नव्हते.डॉ .आंबेडकर धर्मांतर करणार असे ऐकल्यावर त्यांनी लिहिलेले लेख आणि आजचा काळ
    हे सर्व अभ्यास करण्यासारखे आहे.
    सावरकरांनी जगत्गुरू बौद्ध पंडित अश्वघोष याचे वज्र सूची हे भाष्य आणि त्यावर केलेली मनमोकळी चर्चा अभ्यास करण्यासारखी आहे.

    भा.ज.प.आणि संघ यांना सावरकर कधी झेपलेच नाहीत.
    सावरकरांचे विचार लोकानुयायी नसल्यामुळे आणि ते स्वतः सवंग लोकप्रियतेच्या मागे जाणारे नसल्यामुळे
    कालौघात ते मागे पडले.हिंदू महासभा आणि संघ यांच्यात -त्यांच्या वैचारिक बांधणीत अतिशय फरक आहे.
    सध्या भा .ज.प.सावरकर आपलेच मानतो. तर डॉ हेडगेवारांनी १९१५ साली हिंदू महासभेची सावरकरांनी स्थापना केली असताना ,
    इसविसन १९२५ ला स्वतंत्र आर एस एस ची का स्थापना केली ?काय हेतू होता या वेगळेपणात ?

    ReplyDelete
  2. खूप छान...सावरकरांना चौकटीत बंधने फार कठीण आहे...सावरकरांची असे आणखी लिखाण कोठे वाचावयास मिळेल?
    सोनवणी सर मी तुमच्या ब्लॉग खूप पूर्वी पासून वाचत आलोय...खूप छान लिहिता तुम्ही...शाहनिशा अरुण लिहिणे हा तुमचा गुण भावाला...

    ReplyDelete
    Replies
    1. आपण मराठी शुद्धलेखन लक्षात ठेऊन जर लिहिले तर लेखन जास्त प्रभावी होईल असे सांगावेसे वाटते.
      खाली सावरकरांच्या ज्या पुस्तकातून हा उतारा घेतला त्या पुस्तकाचे मिळण्याचे ठिकाण - किंमत दिली आहे.

      Delete
  3. नमस्कार ,
    सध्या पुण्यात अत्रे सभागृह येथे प्रदर्शन चालू आहे - पुस्तकांचे -त्यात सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध नावाचे पुस्तक आहे.
    जन आवृत्ती -रु.१०० - रिया पब्लिकेशन , कोल्हापूर.
    त्यात १५ वा लेख वज्रसुची हा आहे-पृष्ठ क्र .१२६
    प्रमुख वितरक - अजय दिस्त्रीबुतर्स - ६७८ - ई ,निदान हॉस्पिटल समोर .
    .शाहूपुरी - २ री गल्ली , कोल्हापूर.
    प्रदर्शन संपले असण्याची शक्यता आहे .

    ReplyDelete
  4. आगाशे सर,सावरकर १९१५ साली अंदमानात होते.हिंदू महासभा १९०८ साली स्थापन झाली.कारण १९०७ साली मुस्लीम लीग स्थापन झाली होती.सावरकर १९३७पर्यंत हिंदूमहासभेत नव्हते.कारण त्यांना राजकारण बंदी होती आणि हिंदूमहासभा एक राजकीय पक्ष होता.१९२४साली सावरकरांनी रत्नागिरी हिंदूसभा नावाची सामाजिक अराजकीय संघटना स्थापन केली.सावरकरांचा कठोर विद्न्याननिष्ठ हिंदुत्ववाद सामान्य हिंदू मानसिकतेस आजच्या आधुनिकतम काळातही पेलवत नाही.जरी यावरून तात्विक मतभेद असले तरी हिंदूंचे संघटन महत्वाचे असल्यामुळे सावरकरांचे हेडगेवारांना मार्गदर्शन लाभत होते.सावरकरांचे धाकटे बंधू आणि हेडगेवार एकाच कालेजातून डाक्टर झाले.सावरकरांच्याच प्रेरणेने हेडगेवारांना संघटनाची कल्पना सुचली असणार.पण सावरकरांची विद्न्याननिष्ठा मात्र त्यांना कठोर वाटणे स्वाभाविक होते.तरीही सावरकरांनी कांही वेळा संघाच्या कार्यक्रमांतून भाषणे दिली आहेत.

    ReplyDelete
  5. सावरकरांचे सम्पूर्ण वांग्मय www.savarkarsmarak.com येथे उपलब्ध आहे.

    ReplyDelete
  6. रा.रा.चेरेकर ,
    मी विकी पडिया वरून माहिती घेतली , तिथे हिंदू महासभेची स्थापना १९०७ साली झाली आणि
    तिचे पहिले अधिवेशन १९१५ साली हरद्वार येथे भरले असे म्हटले आहे .
    आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद,

    ReplyDelete
  7. वरील बातमी खरी आहे , अगदी लेखकाने , विद्यापीठाने व प्रकाशनानेही मान्य केलेले आहे .

    प्रकाशनाने हिंदूंची माफ़ी मागून धडा वगळण्याचे कबूल केलेले आहे .


    सोनावणीसाहेब आपण उताणे पडलात .
    http://timesofindia.indiatimes.com/india/Mumbai-University-book-dubbed-communal/articleshow/18066961.cms

    टिप : रविवारी या विषयावर पत्रकार परिषद आहे .


    शहानिशा न करता , आपला जात्यांधांना पाठीशी घालण्याचा प्रकार निंदनीय आहे .

    याबद्दल आपला निषेध ....


    शैलजाजी यांचे अभिनंदन .

    ReplyDelete
    Replies
    1. कालगांवकरजी, तुम्ही दावा करताय तसे काहीही बातमीत म्हटलेले नाही. कोणत्याही गोष्टीला "विवादास्पद" म्हटले म्हनजे ते खरे अथवा खोटेच असते असे नाही.

      Delete
  8. अजून गिरे तो भी उपरच का ?
    तो मजकूर प्रसिद्ध झालेला आहे . त्यात अनेक गोष्टी आक्षेपार्ह आहेत हे सिद्ध झालेले आहे .
    मायकेल वाझ यांनी मनन प्रकाशन साठी लिहिलेल्या या पाठ्यपुस्तकातील मजकुरावर सर्वांनीच टीका . केलेली आहे
    मनन प्रकाशन ने बिनशर्त माफी मागितलेली आहे व हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागून पुढील छपाई पासून तो धडा वगळण्याचे कबुल केलेले आहे .
    आश्चर्य म्हणजे मायकेल वाझ यांनी " काय लिहिले ते आठवत नाही व तपासून त्यात सुधारणा करू असे स्पष्टीकरण दिलेले आहे " . यास प्राध्यापक म्हणावे का असा प्रश्न पडत आहे ?

    मूळात , हे खोटे आहे असे आपण म्हणालात किंवा त्यांच्या समजण्यात चूक झाली असेल , असे म्हणालात तरी एक समजून घेतले असते .

    परंतु , तुम्ही मनन प्रकाशनच्या त्या पुस्तकातील धद्याबद्दल शहानिशा न शैलजा काकुंच्या हेतूविषयी शंका उपस्थित करून चूक केली .
    आता , तुम्ही व अनेक तथाकथित निधर्मी लोकांच्या विद्वत्तेचा बुरखा फाटला आहे . तुम्ही इतरांच्या हेतूविषयी विना कारण शंका उपस्थित केल्यावर तुमच्या हेतूविषयी व उतावळेपणा विषयी शंका उपस्थित होणारच .

    सध्या ओर्कुटवर व फेसबुकवर आपली खिल्ली उडवली जात आहे .

    आपण पुन्हा एकदा शहानिशा करून जे योग्य आहे ते मत मांडावे व काही काही चुकीचे असल्यास खुलासा व्यक्त करावा .

    अन हो , एखाद्याच्या हेतूविषयी शंका व्यक्त करताना कधीही उतावळेपणा करू ही विनंती .
    अर्थात , तुमच्या हेतूविषयी आम्हास काडीमात्र शंका नाही म्हणून हे सांगतोय .

    ReplyDelete
    Replies
    1. कालगांवकर साहेब, मूळ प्रश्न विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा आहे आणि त्यात कोठेही शेवडेबाई म्हणतात तसा मजकूर नाही. दुसरे म्हनजे चेरेकरसाहेबांमार्फत त्या दावा करतात तो मजकुर नेमका कोठे आणि कोनत्या पुस्तकात आहे हे अनेकदा विचारले गेले, बाईंनी त्यावर कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. आता या बातमील वादास्पद मुद्दा तुम्ही दाखवता आणि मला जाब विचारता, हे काय आहे? विवादास्पद पाठ्यपुस्तक आहे काय? त्यामुळे तुमचा निषेध मी साभार परत करतो.

      दुसरे असे कि सैनिक आणि पोलिस अस्टोसिटी करत नाहीत का? महोदय...करतात. दलित, फासेपारधी, नंदीबैलवाले अशांवर किती अत्याचार होतात हे तुम्हाला माहित नाही काय? ते हिंदू नाहीत असे तुम्हाला व शैलजा बाईंना वाटत असावे असाच निष्कर्ष मी काढु काय? काश्म्निरमद्ध्ये जवान मुस्लिमांवर आजिबात अत्याचार करत नाहीत असे तुमचे म्हणणे आहे काय? ओरिसात ख्रिस्त्यांवर आजिबात अत्याचार हिंदुत्ववाद्यांनी केलेले नाहित असाही तुमचा दावा आहे काय? अभ्यासक्रमाचा विषय आहे अल्पसंख्यंकांवर बहुसंख्यकांनी केलेले अत्याचार...मग जे अल्पसंख्यंक आहेत त्यांच्यावरीलच अत्याचारांची माहिती येणार ना? बहुसंख्यंकांवर अट्रोसिटी कधी लागते काय? समज त्या पुस्तकात चुकीची अथवा अर्धवट माहिती आहे, पण ती सर्वस्वी असत्य आहे असे आपणास म्हनायचे आहे काय?

      Delete
  9. कालगांवकर साहेब, मूळ प्रश्न विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा आहे आणि त्यात कोठेही शेवडेबाई म्हणतात तसा मजकूर नाही. दुसरे म्हनजे चेरेकरसाहेबांमार्फत त्या दावा करतात तो मजकुर नेमका कोठे आणि कोनत्या पुस्तकात आहे हे अनेकदा विचारले गेले, बाईंनी त्यावर कसलाही प्रतिसाद दिलेला नाही.
    =============================================================
    मी डीटेल्स दिलेले .आहेत . मनन प्रकाशन नाव .दिलेले आहे .
    विद्यापीठाचा अभ्यासक्रम असतो पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशनाची .असतात विद्यापीठास जबाबदार धरलेले नाही . प्रकाशन व लेखकास नक्की .
    एका पाठ्यपुस्तकात ती भाषा योग्य आहे का ?


    आता या बातमील वादास्पद मुद्दा तुम्ही दाखवता आणि मला जाब विचारता, हे काय आहे? विवादास्पद पाठ्यपुस्तक आहे काय? त्यामुळे तुमचा निषेध मी साभार परत करतो.
    ==================================================================================================
    वादास्पद आहेच व सर्वानीच त्याचा विरोध केलेला आहे .
    पाठ्यपुस्तकातील मजकूर जर विवेदास्पद व विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या लायकीचा असेल तर लेखक ठाम राहिले असते .
    प्रकाशकांनी जाहीर माफी मागून धडा वगळण्याचे मान्य नसते केले .


    निषेध कशाबद्दल आहे ते एकदा वाचा
    ============================================================
    १ . असे काही नाही शैलजा शेवडे खोट्या आहेत असे चुकीचे बोलल्याबद्दल .
    २. त्या खोटे बोलून द्वेष पसरवत आहेत अशा त्यांच्या हेतूबद्दल प्रशन निर्माण केल्याबद्दल .
    ३. काही शहानिशा न करता लेखक व प्रकाशक यांचे काही गरज नसताना समर्थन तेही खोटे बोलून व इतरांच्या हेतूबद्दल प्रश्न .ते विचारस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या व्यक्ती म्हणतात न तसे तुम्ही "शूट द मेसेंजर " करताय ..त्याबद्दल


    ReplyDelete
  10. दुसरे असे कि सैनिक आणि पोलिस अस्टोसिटी करत नाहीत का? महोदय...करतात. दलित, फासेपारधी, नंदीबैलवाले अशांवर किती अत्याचार होतात हे तुम्हाला माहित नाही काय? ते हिंदू नाहीत असे तुम्हाला व शैलजा बाईंना वाटत असावे असाच निष्कर्ष मी काढु काय? काश्म्निरमद्ध्ये जवान मुस्लिमांवर आजिबात अत्याचार करत नाहीत असे तुमचे म्हणणे आहे काय? ओरिसात ख्रिस्त्यांवर आजिबात अत्याचार हिंदुत्ववाद्यांनी केलेले नाहित असाही तुमचा दावा आहे काय? अभ्यासक्रमाचा विषय आहे अल्पसंख्यंकांवर बहुसंख्यकांनी केलेले अत्याचार...मग जे अल्पसंख्यंक आहेत त्यांच्यावरीलच अत्याचारांची माहिती येणार ना? बहुसंख्यंकांवर अट्रोसिटी कधी लागते काय? समज त्या पुस्तकात चुकीची अथवा अर्धवट माहिती आहे, पण ती सर्वस्वी असत्य आहे असे आपणास म्हनायचे आहे काय?
    =================================================================
    है शाब्बास , आता आलात ना लायनीवर ....
    आता हे तरी किमान मान्य केलेत की शैलजा काकूंनी जे लिहलेले आहे त्यात तथ्य आहे . मग शहानिशा न करता खोटे का बोललात ?

    हा विषय मांडल्यावर अनेक तथाकथित सेक्युलर मित्रांनी (हा उपहास नाही ) , ह्याचे डिटेल्स मागवले . माझाही यावर प्रथम विश्वास बसला नाही पण म्हणून लगेच कोणाला खोटॆ पाडायचे उद्योग केले नाहीत . नंतर खरे डिटॆल्स पाहिल्यावर अर्थातच खात्री झाली की शैलजा काकूंच्या म्हणण्यात तथ्य आहे .

    आता , लेखकाचे समर्थन अथवा विरोध करणे हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग आहे , माझ्या अनेक जवळच्या मित्रांनी समर्थन केले . हरकत नाही , त्यांनी त्यांची मते मांडावीत . इतर लोक त्यांची मते मांडतीलच .

    " भारतीय सैन्य व पोलिस हे प्रथम हिंदू असते नंतर देशभक्त " या वाक्यातून नक्की पराभव सेक्युलरवाद्यांचा होतो की हिंदुत्ववाद्यांचा ?

    टिप : लेखकाचाही माफ़ीनामा आलेला . लेखकाने मजकूराबद्दल खुलासा करताना , मजकूर स्वत:चा नसून आंतरजालावरुन घेतला आहे असे सांगून वेबसाईटसच्या लिंकस दिलेल्या आहेत .

    त्यातील एक पाकीस्तानी वेबसाईट असून , एक लिंक काश्मीरी फ़ुटिरतावाद्यांची आहे .
    करत बसा अजून समर्थन ...


    पण किमान खरे बोला व दुसर्‍यांच्या हेतूवर शंका घेणे थांबवा .

    ReplyDelete
  11. संजयजी,
    फाऊंडेशनकोर्समधल्या त्या विवादास्पद ध्ड्यातील मजकुर पाकिस्तानी साईटवरून घेतला होता.टाईम्स ऒफ़ इंडिया, लोकमत..वगैरे सगळ्या पेपरात मुंबई विद्यापीठाने असा देशद्रोही धडा मुलांना शिकवण्याबाबत निंदा केली आहे. मुंबई विद्यापीठाने यापुढे अभ्यासक्रमातून तो धडा वगळला आहे.
    मला नक्की माहित आहे, मी माझा कुठलाही स्वार्थ नसतांना ही भयानक चूक केवळ लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या नजरेत यावी, आणि चुकीच्या पध्दतीने आपल्या मुलांचं जे ब्रेनवॊशिंग होतं, हे थांबवावं, यासाठी सगळा खटाटोप केला होता. आणि मी जिंकले.
    नेहमी सत्याचाच विजय होतो.
    जय हिंद...!

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...