Tuesday, January 1, 2013

प्रश्नांच्या गुंतवळ्यात अडकलेला महाराष्ट्र...



प्रश्नोपनिषद...(1)




महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य मानले जाते. आकडेवा-या पाहिल्या तर त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. पण  हा दर्जा वाढवणे सोडा, आहे तो दर्जा टिकवणेही महाराष्ट्राला दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. राज्यातील अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेरची वाट चालू लागले आहेत. नवीन उद्योग महाराष्ट्राला प्राधान्य देतांना दिसत नाहीत. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण याला जबाबदार असेल असे वरकरणी वाटणे संभव आहे, परंतु ते एकमेव कारण नाही. कोणताही प्रश्न स्वतंत्रपणे वेगळा काढून त्याचा अन्वयार्थ लावायला गेलो तर आपल्याला एकुणच प्रश्नांच्या मुळाशी जाता येणार नाही. त्यामुळे समग्र प्रश्नांचा स्वतंत्र विचार करत असतांनाच त्या प्रश्नांची एकमेकांशी असलेली गुंतागुंत, परस्परसंबंध आणि त्यातून निर्माण झालेले तिढे यांचा एकत्रीतपणे विचार केल्याशिवाय आपल्याला उत्तरे शोधता येणेही अवघड होवून जाईल. परंतु सामान्यतया प्रत्येक प्रश्नाचा स्वतंत्र विचार करत स्वतंत्र उत्तर शोधण्याची आपली सवय आपल्याला घातक बनली आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि शेवटी सर्वच प्रश्न अर्थोन्नतीशी येवून ठेपतात हेही विसरता येत नाही.

महाराष्ट्र राज्याला इतिहासाचा उदंड वारसा आहे. सातवाहनांपासून सुरु होणारा महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास यादवकाळापर्यंत सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असाच आहे. पारतंत्र्याच्या बेड्यांनी महाराष्ट्र जखदला गेला असला तरी नंतर शिवरायांच्या रुपात माहाराष्ट्री स्वातंत्र्याचा तेजस्वी उद्गार उमटला. पानिपत युद्ध व त्यानंतरही महाराष्ट्राने राष्ट्रीय राजकारण करत आपला राष्ट्रव्यापी ठसा उमटवण्यात यश मिळवले. सामाजिक सुधारणांचाही पहिला उद्गारही महाराष्ट्रातच उमटला. एकोणिसाव्या शतकानंतर महाराष्ट्रात पुरोगामी चळवळी सुरु होत समाजमन पारंपारिकतेच्या जोखडातून बाहेर पडु लागले असे आपण सर्वसाधारणतया मानतो. पुरोगामी चळवळींचे यशापयश हा आपल्या चर्चेचा विषय नाही. कोणत्यातरी पद्धतीने का होईना, जनसामान्यही विचार करु लागले एवढे तरी श्रेय पुरोगामी चळवळींना द्यावेच लागते. एवढेच!

असे असले तरी महाराष्ट्र आजच्या जागतिकीकरनाच्या प्रक्रियेत नेमका कोठे बसतो याचा विचार केला तर उत्तर फारसे समाधानकारक येत नाही. आजही महाराष्ट्राची ६५% लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे. शेतीचे प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याऐवजी आपला भर समस्यांवर तात्पुरत्या मलमपट्ट्या करण्यावर राहिलेला आहे. सरासरी तीन वर्षांनी अवर्षनाचे चक्र येते हा इतिहास सर्वांना तोंडपाठ असुनही जलसंधारण व सिंचन योजना तसेच पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आम्हाला घोर अपयश आले आहे. आता आम्ही जानेवारीत असुनही हजारो गांवांना साधे पिण्याचे पाणी नाही, शेती सुकली आहे...उन्हाळ्यात काय होईल?

शेतमालाच्या विक्रीयंत्रणेतील आडत्यांची साखळी संपवत शेतक-यांनाच थेट विक्रीयंत्रणा उभारुन देण्याची जबाबदारी आपल्यावर होती. पण ते झाले नाही. आज आम्ही विक्रीयंत्रणेसाठी एफडीआयला साकडे घालत आहोत पण शेतक-यांन मात्र आपला माल थेट विकण्याचीही परवानगी नाही. आता पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या दिशेने पाऊल उचलले असले तरी ते आडत्यांची लोबी कितपत ते यशस्वी ठरु देईल याबाबत शंका आहेच. शेतमालाधारीत प्रक्रिया उद्योगांची व साठवणक्षमतेची पुरेपूर वानवा असल्याने वाया जाणा-या शेतमालाचे प्रमाण आजही ३०% एवढे अवाढव्य आहे पण त्याबाबत आपले कसलेही धोरण नाही.

महाराष्ट्रतुन असंख्य उद्योग आता बाहेर जावू लागले आहेत याचे महत्वाचे एक कारण आहे व ते म्हणजे वीज पुरवठ्यात नसलेले सातत्य. केंद्रीय योजना आयोगाचा अहवाल म्हणतो कि महाराष्ट्रात आवश्यक वीज स्वबळावर निर्माण करण्याची पायाभुत क्षमता असुनही एन्रोनसारखे नको ते पर्याय शोधत बसल्याने वीजउत्पादनात महाराष्ट्रची पीछेहाट झालेली आहे. उद्योगांनाच पुरेशी वीज नाही तर शेतीला कोठुन? पुन्हा त्याचा दुष्परिनाम शेती व औद्योगिक उत्पादनावर होतो...पण भारनियमनमूक्त राज्य या फक्त घोषणाच का राहिल्या आहेत यावरही आपल्याला विचार करावा लागणार आहे.

उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण बव्हंशी पश्चिम महाराष्ट्रात झाल्याने महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोलाची विलक्षण परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच मुळे विदर्भ आणि मराठवाडा आता स्वतंत्र राज्याची मागणी करु लागले आहेत. उद्योगव्यवसायांच्या केंद्रीकरणामुळे एकीकडे काही शहरे प्रमानाबाहेर फुगत जात सामाजिक समस्यांनाही जन्म देत पायाभुत सुविधांवर पराकोटीचा ताण निर्माण करत आहेत तर दुसरीकडे बकालपना वाढतो आहे. अविकसीत प्रदेशांच्या सर्वकश विकासासाठी व उद्योगधंद्यांच्या विकेंद्रीकरनासाठी आमच्याकडे आज तरी ठोस योजना दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राचे बकालीकरण होणे अपरिहार्य बनले आहे. आपल्याला वेळीच या समस्येकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

पशुपालन हा महाराष्ट्राचा शेतीखालोखालचा महत्वाचा उद्योग आहे. य घटकाबाबत तर आपले मुळीच धोरण नाही असे म्हतले तरी वावगे ठरणार नाही. चरावू कुरणांची अन्य कामांसाठी राजरोस लूट करत पशुपालन व्यवसायाचा गळा घोटला जातो आहे. एवढेच नव्हे तर यामुळे पर्यावरणाचाही गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाची पारंपारिक व नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांचे औद्योगिक/व्यावसायिक उपयोग करण्यातही आम्ही अपेशी ठरलो आहोत. कोकणचा क्यलिफोर्निया करण्याचे स्वप्न काही लोक पाहतात, परंतू क्यलिफोर्निया सोडा आम्हाला कोकनचा केरळही करता आलेला नाही. हीच बाब महाराष्ट्राच्या अन्य प्रदेशांबाबत लागू पडते. तसे न करता आल्याने आम्ही फार मोठ्या रोजगाराला व व्यवसायांना मुकलो आहोत. हे कसे साध्य करायचे हाही महाराष्ट्रासमोरील तातडीचा प्रश्न आहे.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राने एके काळी मोठी आर्थिक क्रांती घडवली, हे सत्य नाकारता येत नाही. विशेषत: साखर उद्योगात सहकार मोठ्या प्रमाणात फैलावल्याने व उस उत्पादन ज्या भागांत सहज शक्य होते त्या भागांत लाखो हेक्टर जमीन उस उत्पादनाखाली गेल्याने शेतीचे एक नैसर्गिक चक्र बिघडले ते बिघडलेच. शेतक-यांनी सुरुवातीच्या काळात भरभराट पाहिली असली तरी सहकारी साखर कारखाने हे राजकारणी नेतृत्व निर्माण करण्याच्याच प्रयोगशाळा बनल्या हे एक वास्तव आहे. उसाचा प्रति-टन उतारा कमी कमी होत चालला आहे आणि दुसरीकडे भावाच्या बाबतीत मात्र शेतकरी आक्रमक असतात. एक दिवस सहकार क्षेत्र संपेल कि काय असा प्रश्न या निमित्ताने उठतो, परंतू अद्यापही या संदर्भात दीर्घकालीन धोरणाचा व पर्यायी व्यवस्थेच्या संकल्पनांचा अभावच असल्याचे आपल्याला दिसून येते.  खरे तर कापुस उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर असतांना जेथे उत्पादन होते तेथे सुतगिरण्यांना, मग त्या सहकारी असोत कि खाजगी, परवानग्या न देता, जेथे कापुस होतच नाही तेथे मात्र सहकारी सुतगिरण्या उभारल्या गेल्या. आजमितीला अपवाद वगळले तर या सर्व सुतगिरण्या बंद आहेत. अशा स्थितीत दिर्घकाळाचा विचार केला तर महाराष्ट्र आर्थिक संकटात बुडत जाणार हे नक्कीच आहे. केंद्राकडुन येणारी मदतीची प्यकेजेस, मुळातच अनुदानेच क्रमश: संपवायची हे धोरण असल्याने, कधीतरी बंद पडणार याचे भान आपल्याला नाही. त्यासाठी कसलीही पर्यायी व्यवस्था वा योजना आपल्याकडे नाही.

वर उल्लेखिलेले काही महत्वाच्या व काही संबंधित प्रश्नांनी महाराष्ट्राच्या भविष्याला ग्रहण लावायला आताच सुरुवात केलेली आहे. ग्रामीण बेरोजगारीचा विस्फोट, शहर विरुद्ध खेडी यांमद्ध्ये निर्माण होत जाणारी भिषण दरी आणि प्रादेशिक विकासाचा असमतोल यातून  महाराष्ट्राचे आज वरकरणी दिसनारे सामाजिक स्वास्थ्य कधीही कोलमडुन पडेल यात शंका बाळगण्याचे कारण नाही. सध्याच्या पाणी प्रश्नाने त्याची चुणूक दाखवायला सुरुवात केलेली आहेच...!

अशा अवस्थेत आज महाराष्ट्र स्मारकांच्या राजकारणात अडकवत मुख्य प्रश्नापासून दूर भरकटवला जात आहे. कोणी ओबीसींच्या धर्मांतराच्या घोषणा करतोय तर कोणी जातीयवादाला खतपानी घालण्याचा उद्योग करतोय. आपल्याला सजगपणे या सर्व गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे.

आपल्याला या सर्वच प्रश्नांचा स्वतंत्रपणे तसेच त्या प्रश्नांचे एकमेकांशी असलेले अंगभुत साहचर्य यावर पुढील लेखांत चर्चा करत एक स्वस्थ, समृद्ध आणि विवेकीही महाराष्ट्र घडवण्यात कसा हातभार लावता येणे शक्य आहे हे पहायचे आहे.

(क्रमश:)

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
मी हिंदुंनी उपरेंसारख्या सद्ग्रुहस्थांच्या ओबीसी धर्मांतराच्या आवाहनांना बळी पडु नये असे जेंव्हा म्हणत असतो तेंव्हा मला एवढेच म्हणायचे असते कि स्वत:च्या धर्मात घुसलेल्या वैदिक धर्मियांना आणि त्यांच्या धर्मतत्वांना बाहेर काढायचे ज्यांचे सामर्थ्य नाही असेच भेकड धर्मांतराच्या वार्ता करू शकतात. आणि धर्म बदलला तरी वैदिक धर्मतत्वांचे सावट ज्यांच्या मनातून जात नही त्यांनी धर्म बदलला काय आणि न बदलला काय...काय फरक पडतो?
मी हिंदू आहे...माझ्या धर्मात काही घाण घुसली असेल तर ती दूर करणे माझे कर्तव्य आहे...ते न करता पलायनवादी लोकांचे मी समर्थन करु म्हणाल तर ते शक्य नाही. म्हणुन उपरे आणि त्यांन समर्थन देणा-यांना माझा विरोध राहीलच!
(आणि याबाबत ज्या सुपारीबाजांनी टिप्पण्या आज केल्या त्यांना एकच सांगतो...मला सुपारीचे व्यसन नाही. आणि मला सुपारी देवू शकतील एवढे कोणीही मोठे नाहीत!)

22 comments:

  1. ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
    http://www.loksatta.com/mumbai-news/obc-is-in-way-to-change-the-religion-35367/

    भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार!

    ReplyDelete
    Replies
    1. KRUPAYA WISHAYASHI SAMBANDHIT NAHI ASYA COMMENTS TAKU NAYET.

      Delete
    2. संजयजी,
      लोकसत्तेमध्ये असे लिहिले आहे की
      १४ ऑक्टोबर २०१६ ला ओ.बी सी.प्रचंड संख्येने बुद्ध धर्म स्वीकारणार !
      "बुद्धीवाद आणि विज्ञान वादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजात जागृती घडवून आणण्यासाठी "
      राज्यभर मोहीम सुरु केल्याची माहिती
      सत्यशोधक ओ.बी.सी.परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी जाहीर केली आहे.
      हे वाचल्यावर अतिशय आनंद झाला .
      कारण इतके जर काही भव्य घडणार असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे !
      बुद्ध धर्म हा अतिशय चांगला धर्म आहे.आणि त्यांना तिथे अतिशय चांगले साक्षात्कार होऊन जीवनाचा नवा अर्थ समजेल !
      कदाचित त्यांच्या अनुभवामुळे संपूर्ण भारतातच बौद्ध धर्माची लाट येईल !असा आनंदी आनंद होणार असेल तर आपल्या सर्वाना मुक्तीचा नवा मार्गच सापडेल !
      मग मा.मुंडे आणि मा.भुजबळ यानापण नवीन वाट सापडून हळू हळू सर्वजण मुक्त होत जातील.
      त्यामुळे श्री.हनुमंत यांनी आपले बदललेले नाव काय ते ठरवून टाकावे !हनुमंत हे नाव बुर्झ्वा आहे !रामापुढे हात जोडणारा- हे बरोबर नाही.राम उच्च वर्णीय ! त्याच्यापुढे हात जोडणारा ! अशक्य- आम्हाला हे मान्यच नाही.राहुल कस छान नाव आहे !सिद्धार्थ ! -?

      Delete
    3. दत्तात्रेय हे नाव शोभून दिसेल!

      Delete
    4. हनुमंत उपरे यांनी "ओबीसी बांधव धर्मांतराच्या मार्गावर" असे विधान करावे हे निषेधार्ह आहे कारण ते वास्तवही नाही कारण उपरे हे ओबीसींचे सर्वांनी एकमेवाधिकार दिलेले नेतेही नाहीत वा ते स्वत: बौद्ध धर्मीयही नाहीत. अशा स्थितीत सर्व ओबीसी धर्मांतराच्या वाटेवर आहेत असे जाहीर विधान करण्याचा ओबीसींच्या वतीने त्यांना कसलाही अधिकार पोहोचत नाही. शिवाय ओबीसी फक्त हिंदू धर्मातच नाहीत तर अन्य धर्मांतही आहेत याचे भान श्री. उपरे यांनी ठेवलेलेही दिसत नाही. आपापल्या धर्माचा शांततामय मार्गाने प्रसार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे मान्य आहे पण उपरेंनी स्वत: आधी धर्म तर बदलावा आणि मग प्रचार करावा कि नको? बौद्धांच्या वा ओबीसींच्या वतीने बोलायचा अधिकार त्यांना कोणी दिला? बरे, हे प्रचार न करता ओबीसींच्या वतीने सरसकट घोषणा कसे करु शकतात? उद्या मी "सर्व बौद्ध बांधव हिंदू होण्याच्या मार्गावर" अशी घोषणा उपटसुंभाप्रमाने केली तर? उपरे यांचा निषेध यासाठी आवश्यक आहे कि ते फक्त ओबीसींचा बुद्धीभेद करत नाहीहेत तर बौद्ध आणि हिंदुंत तेढ निर्माण करत आहेत. माझा विरोध व निषेध त्यासाठी आहेच पण त्याचवेळीस यामागे धर्मकारणापेक्षा राजकारण आहे यासाठीही आहे. (My comment on FB on Upre issue.)

      Delete
    5. सोनवणी सर आपण एक स्वतंत्र लेख लिहून या विषयातील बारकावे आणि राजकारण आमच्यासारख्या सामान्य लोकांना कृपया समजावून सांगावे ही विनंती. ओबीसींचा बुद्धिभेद करण्याची ही मनुवाद्यांची नवी चाल असावी.

      Delete
  2. मला असे वाटते की महाराष्ट्रात औद्योगिक कारणांसाठी रेव्हेन्यू जो मिळतो त्यात मुख्य भरणा हा त्या त्या कंपन्यांची मुख्य कार्यालये ही मुंबईत आहेत
    आणि त्यामुळेच महाराष्ट्राला त्यांच्याकडून कर रूपाने प्रचंड पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो.
    समजा,
    महाराष्ट्रातील या कंपन्या इथल्या कंटाळवाण्या आणि असुरक्षित वातावरणाला वैतागून इतर लगतच्या प्रांतात कायमच्या गेल्या तर दोष कुणाचा ?

    इथल्या सरकारचाच !
    दुसरी गंभीर बाब -
    साधारणपणे १९६० पासून आढावा घेतला तर असे दिसते की,
    २०१३ पर्यंत ५३ वर्षात -
    वसंतराव नाईक १९६३ ते १९७५ आणि सुधाकरराव नाईक १९९१ ते १९९३ असे विदर्भातील मुख्यमंत्री होते.
    शंकरराव चव्हाण १९७५ ते १९७७ ,विलासराव देशमुख १९९९ ते २००३,आणि २००४ ते २००८ तसेच अशोक चव्हाण २००८ ते २०१० हे मराठवाडा इथून होते.
    साधारणपणे कॉंग्रेस राजवटीतील निम्मा अधिक काळ मुख्य मंत्री होता तो मराठवाडा - विदर्भाचाच !
    सांगायचा मुद्दा असा की मराठवाडा विदर्भ हे दुष्काळी का राहिले याचे उत्तर देण्याची जबाबदारी या मुख्य मंत्र्यांवर येत नाही का ?राज्य सरकारमधील सर्वोच्च पद निम्मा अधिक काल विदर्भ-मराठवाडा येथील नेतृत्वाकडे होते !याची नोंद घेतली गेली पाहिजे .

    या नेतृत्वाला मुंबईमध्ये खिळवून ,त्यांचे लक्ष आपापल्या क्षेत्रातून वळवून त्यांना मुंबईचे चराऊ कुरण दाखवून देणे आणि आपल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात
    सर्व विकास कामे तत्परतेने करून घेणे ही सातारा सांगली कोल्हापूर पुणे इथल्या नेतृत्वाची खेळी होती असा एक प्रवाद मांडला जातो.
    तो जर अभ्यासला तर एक विचित्र चित्र - एक गंभीर प्रादेशिक नाटय नजरेसमोर येते.

    ब्याक बे रेक्लमेशन आणि यु एल सी मुळे आपल्या विभागाकडे दुर्लक्ष झाले असेल का या नेत्यांकडून!
    एके काळी सर्वांच्या भल्यासाठी उत्कृष्ठपणे राबवली गेलेली सहकार चळवळ त्यातील अग्रणी नेत्यांनीच
    सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीच्या कथेसारखी जीवे मारली- सहकार क्षेत्राची या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी कशी धूळधाण केली
    त्यावर अजून इथे बोलायची गरज नाही.
    पक्षीय राजकारणामुळे मराठी लॉबी कधीच कणखर बनू शकली नाही. हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आत्ताच्या बेळगावच्या प्रश्नापर्यंत स्पष्ट दिसते आहे !
    ह्या अशक्त आणि अदुरदर्शी राजकारणामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.
    पूर्वीचे विरोधी नेत्तृत्व हे शहरीच असल्यामुळे ग्रामीण प्रश्नांना कधी प्राधान्य मिळाले नाही.१९६० पासून १९७५ पर्यंत विरोधी पक्ष महागाई,सीमा प्रश्न,आणि शहरी वेदना मांडण्यातच मश्गुल होता.एसेम ,नाना गोरे,जॉर्ज,मधु लिमये मधु दंडवते असे पहिल्या फळीचे नेते या शहरी प्रश्नांच्या विळख्यात अडकून बसले.त्यांना क्रांतीचे वेध लागले होते.
    एक शेतकरी कामगार पक्ष मात्र जिवंतपणा दाखवत होता.
    वसंत सेनेने एक एक पाउल टाकत, सर्व कामगार चळवळ निकालात काढली.आणि मुंबईची कुतरओढ सुरु झाली.
    कन्नमवार,पी .के.सावंत,आणि अशोक चव्हाण ,अंतुले,मनोहर जोशी बाबासाहेब भोसले ,निलंगेकर ,अशा खुज्या नेत्यांनी महाराष्ट्राला अजूनच ठेंगणे करून ठेवले !
    आता कुणीतरी महात्माच या महाराष्ट्राला वाचवू शकेल.
    कुणीतरी छात्रापाडी अवतरला तरच आपला निभाव लागेल.
    नाहीतर आपले ६८ टक्के असलेले मराठी बाहुल्य कमी कमी होण्यास वेळ लागणार नाही !

    ReplyDelete
    Replies
    1. shakun1956, उत्तम निरिक्षण व विश्लेशन. धन्यवाद.

      Delete
    2. संजय जी,
      शकुन १९६५ यांनी केकेले अवलोकन काही प्रमाणात रास्त आहे.
      आपण तिचे केलेले कौतुक अशा प्रसंगात तिला स्फूर्ती देणारे ठरेल आणि असेच सकस
      अजून वेळोवेळी नवीन वाचकांकडून वाचायला मिळेल अशी आशा करायला जागा आहे.

      संजय जी,
      आणि राजमान्य राजश्री उपरे महाराज ,
      आपल्या इथे जात पात वगळून लिहिलेले वाचायला खूप आनंद होतो.परिणामी त्या आधीची एक प्रतिक्रिया काहीसा वेगळा आनंद देते.
      गीतांजलीच्या शेऱ्याला कुणीतरी अनोनिमसने बुद्धाच्या संदर्भात एका वक्तव्यावर श्री.रा.रा.हनुमंत उपरे यांनी केलेल्या टिपणावर,
      राहुल ,सिद्धार्थ बरोबर दत्तात्रेय हे नाव सुचवले आहे. ते वाचून असे सुचवावेसे वाटते की
      त्या धर्मात दत्तात्रेय नाव चालेल का ते श्री.रा.रा.हनुमंत उपरे यांना नम्रपणे विचारले पाहिजे.
      त्यांचा हिरमोड व्हायला नको. ते या वयात नव्याने बरसे करणार त्याला गालबोट लागायला नको - नाही का ?

      मी याच नावाने लिहितो आणि मी आहे हिंदू ,तर तेच नाव धर्म बदलूनही चालेल का ते त्यांच्या नजरेस आणले पाहिजे नाही का ?
      तर श्री.रा.रा.हनुमंत उपरे यांनी कृपया याचा विचार करावा.
      परत उपरे यांच्या वैयक्तिक निर्णयाचे अभिनंदन.

      आणि संजय सर म्हणतात ते मात्र उपरे साहेब आपण विसरू नका - हं - तुम्ही सर्व ओबीसींचे रूपकात्मक सुद्धा प्रतिनिधित्व करत नाही ! अजिबात नाही.
      १०० टक्के नाही ! टक्क्यांच्या भाषेत लगेच समजेल !
      तुम्हाला स्वघोषित ओ.बीसी.चे हिरो बनायची इच्छा समजू शकते.
      कारण २०१६ पूर्वी २०१४ येते,आणि २०१४ ला आपल्याकडे निवडणुका असणार - हो की नाही ?लाखोंच्या संख्येने असे म्हणताना मला सांगावेसे वाटते की
      लाख म्हणजे १० X १०००० ,आपल्या मागे १० लोक येणे हे पण फार फार अवघड असते असे म.गांधींचे चरित्र सत्याचे प्रयोग वाचताना जाणवते !
      असे १० लोक १०००० पटीत आले की एक लाख .तुम्हाला कदाचित धर्म बदलला की सगळेच स्वयम्प्रकाशामुळे - दिव्य ज्ञानाने समजू लागेल हा भाग वेगळा.
      आमच्या शुभकामना तुमच्या बरोबर आहेतच !
      फक्त मागे कितीजण येताहेत तिकडे लक्ष ठेवा - अंधार पडायला लागलाय - उगीच धडपडाल एकटे दुकटे !
      किती लिहू - जय - चला - सगळ्यांचाच जयजयकार - ते एक बरे असते - कुणी राहायला नको चुकून !
      वाट बघतोय - १४ ओक्टोबर २०१६ ! बरोबर ना ? घाईची झाली तर त्यापूर्वी !
      संजयजी,
      आपण सुरवातीसच सूचना केली आहे की जात पात धर्म इत्यादी टाळावे ,पण दत्तात्रेय नाव ऐकल्यावर मोह आवरला नाही.
      क्षमस्व ,

      Delete
  3. दत्तात्रेयजी, हिंदू धर्माचे महाद्वेष्टे वामन मेश्राम यांच्या नांवात चक्क "वामन" असू शकतो तर दत्तात्रेय नांव असायला हरकत नसावी. पण यामुळे दत्तात्रेयाचा अवमान होईल त्याचे काय? असो. ही टिप्पण्णी गंमत म्हणुन घ्यावी. मी आज उपरेंच्या निकटतम स्नेह्याला भेटलो. त्यांना या सर्व प्रकरणातील मुर्खपणा दाखवून दिला. किमान ते तरी दूर झाले...म्हणजे माझ्यासमोर फोन करुन सहा तारखेच्या कार्यक्रमात भाषण करणार नाही व सहभागही घेणार नाही हे स्पष्ट सांगितले. धर्मांतर किती लोक करणार? कोणी नाही. माझ्या दृष्टीने तो इस्श्युच नाही. उपरेंची "ओबीसीला पर्याय धर्मांतर" ही पुस्तिका मला उपरेंच्या स्नेह्याने दिली...मलपृष्ठच ब्राह्मण्द्वेष्टे आहे. आतील मजकुर काय असेल याची कल्पना येते. मी हिंदू समाज एकाकारतेच्या दिशेने जावा यासाठी लिहितो...कामही करतो, पण हे लोक सामाजिक तेढ मात्र वाढवू शकतात आणि असे लोक समाजघातक असतात. आपण आपल्यातील दोष मनमोकळेपणे स्वीकारत ते कसे दूर करायचे हे पाहु...पण या मार्गात असे लोक अडथळे बनतात आणि ते अधिक खेदकारक आहे. मला आज काही माझ्या बौद्ध मित्रांचेही फोन आले. ते अर्थात खुशीत होते. मी त्यांना म्हणालो..."मैत्री वेगळी आणि धर्म वेगळा. हिंदु धर्माअगोदर नवबौद्धीयांनी त्यांच्यातील पोटजाती जरी संपवून दाखवल्या तर मी उपरेंना विरोध करणे बंद करुन टाकीन." यावर मौनात्मक उत्तर मिळाले. असो. उपरेंमागे बुद्धिस्ट संघटनांनी बरीच ताकद उभी केली असली तरी अनोनिमस म्हनतात त्याप्रमाणे यामागे आर.एस.एस.चाही हात असल्याची चर्चा आहे. आर.एस.एस. कसल्याही कोलांटौड्या घेवू शकते हा इतिहास मी जवळुन पाहिला आहे. मराठा सेवा संघ आरेसेसशी छुप्या पद्धतीने निगडीत असण्याचा तर्क खरा वाटावा अशा काही घटनांचा मी साक्षीदार आहे. आरेसेसला आर्थिक मदत वाढावी (हिंदू खतरेमें हैं म्हणुन) यासाठी हिंदुत्ववाद्यांनी ही ओबीसी धर्मांतराची बातमी भयप्रद वाटेल अशा पद्धतीने पेरली असा तर्क दिला जातोय. मी आरेसेसला हिंदू मानत नाही हे माझ्या वाचकांना माहितच आहे...पण या प्रकरणात आर.एस.एस. असेल असे मला मात्र मुळीच वाटत नाही. पुरोगामी चळवळीतील म्हणवणा-या मराठा समाजाने बुद्धीझम नाकारल्याने बुद्धिस्टांनी आता ओबीसी टार्गेट करायला सुरुवात केली आणि उपरेंसारखे राजकीय महत्वाकांक्षा असनारे आपसुक त्यांना मिळाले एवढेच सध्या तरी दिसते. सत्य काय ते कळेलच.

    ReplyDelete
    Replies
    1. Dear All,
      Buddhist religion is from Indian soil. It has roots in India. We all Indians are buddhist by origin.

      Delete
    2. गौतम बुद्धाचे पप्पा कुठल्या धर्माचे होते ?
      आणि त्यांचे पप्पा ?
      ते मुसलमान होते का जैन का हिंदू का बौद्ध ?
      का ख्रिस्चन होते ?
      सांगा हो लवकर ! सांगा !

      Delete
    3. बघा जरा विचार करून,'
      सगळे बुद्धिस्ट हे भारतीय आहेत असे तुम्हाला वाटते का .
      आणि ते सुद्धा चूकच आहे.
      आणि सगळे भारतीय हे मूलतः बुद्धिस्ट आहेत असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर -
      तर सांगा लवकर लवकर दिल्लीच्या शाही इमामाला,
      गोव्याच्या कार्डीनलला किंवा कोणत्याही जैन स्वामीला.
      सांगा अमृतसरच्या सुवर मंदिरात कि सगळे भारतीय मूलतः बुद्धिस्ट आहेत !
      कसे जोडे खून याल प्रत्येक ठिकाणाहून ते सांगा मला !

      Delete
  4. संजय सर ,
    मुंबईसह महाराष्ट्र ही एक चांगली घटना घडली असली तरी त्यातून काही वाईट संकेतही निर्माण झाले !
    १९६० पूर्वी द्विभाषा राज्य असल्यापासून मुंबईत मराठी लोकांचे स्थान तसे दुय्यमच आहे .
    ठराविक दशकातून परभाषिक बदलत गेले,पण बाहेरचे लोंढे येतच राहिले .

    महानगरे हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो,

    तसेच शेतकरी हासुद्धा एक अतिशय हळवा विषय आहे.टक्केवारी ६५% असल्याने तिकडे दुर्लक्ष होऊ न देणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
    महाराष्ट्राच्या जन्माचा काळच देशाच्या फाळणी सारखा मुंबई प्रांताच्या फाळणी चा होता.मोरारजी सारख्या हेकट माणसाशी सामना करत, स.का.पाटलांच्या सारख्या माणसला बाजूला ठेवत ,प्रगतीचा मार्ग शोधण्याचे अवघड काम श्री .यशवंतराव चव्हाणांनी केले.
    ते शहरी नेतृत्वाच्या विरुद्ध एकप्रकारे दंड थोपटून उभे राहिले.विरोधक पण शहरी मध्यम वर्गातील.आणि साहेबाना काम करायचे होते खेड्यापाड्यातील लोकांसाठी.
    त्यांना या प्रांताला एक अस्मिता द्यायची होती.एक ओळख , एक चेहरा द्यायचा होता.

    रशियन राज्याक्रांतीवर भाळलेल्या नेहरूंसारख्या नेतृत्वाशी गाठ होती.

    आणि देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या महानगरात बसून पिडीत, दलित, गरीब शेतकऱ्यांचे कल्याणकारी सरकार चालवायचे होते.सहकाराचा नवीन मंत्र देशाला भुरळ पाडत होता.तो मार्ग आपल्याला कुठे नेईल ते कुणालाच माहीत नव्हते !
    आर्थिक फायदे थेट खेड्यापाड्यातील जनतेच्या हातात पोहोचवणारी चळवळ राज्य कारभार हाकणाऱ्या पक्षाने चालवायची हा एक जिवंत रसरशीत अनुभव होता.त्यात श्री .यशवंतराव यशस्वी ठरले !.मुंबईतील बनियाना समजून घेत , प्रसंगी वेसण घालत समाजवादी लोकांना आपलेसे करत आणि प्रसंगी कम्युनिस्ट लोकांशी दोन हात करत ,त्यानी राज्यकारभार पुढे नेला.
    काव्य शास्त्र विनोदाच्या क्षेत्रात सुद्धा दाखल घेण्या इतपत त्यांची उठबस असायची.
    मात्र ,
    आपल्या नंतर प्रांताची धुरा काही काळ श्री. कन्नमवार आणि नंतर सलग १२ वर्षे विदर्भातल्या श्री.वसंतराव नाईक यांच्याकडे देण्यात त्यांचे काय गणित असेल ?काय आडाखे असतील ?यावेळी प्रसिद्ध सिद्धांताची आठवण होते - कधीही आपल्या जवळचा , आपल्या भागातला माणूस डोईजड होईल इतका
    मोठ्ठा होणार नाही याची सतत काळजी घ्यावी- असे काहीसे घडले असेल का ते अभ्यासण्यासारखे आहे !
    हा काही योगायोग नाही.त्यामागे स्पष्ट धोरण दिसते.- आपल्याच भागातील नेतृत्वाला त्यानी आपल्या मागून वाव का दिला नाही ?
    पहिली कापूस एकाधिकार योजना कै .मारोतराव कन्नमवार यांनी चालू केली.
    यशवंतराव यांच्या नंतर फक्त खुर्चीशी इमान राखणारे अनेक मुख्यमंत्री झाले. त्या कलेत सर्वात पारंगत श्री शरद पवार म्हणता येतील .
    कदाचित,सत्तेशिवाय आपले विचार , योजना पुढे रेटता येत नाहीत अशी त्यानी खुणगाठ बांधली असावी.

    सध्या विलासरावांच्या आणि अशोक चव्हाणांच्या उघड भ्रष्टाचारी राजवटी नंतर चेहेरेपट्टी सुधारण्यासाठी
    दिल्लीवरून नेमल्या गेलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे दोन्ही राज्यकर्त्या पक्षांमध्ये शीतयुद्ध चालू आहे.आणि ते
    महाराष्ट्राच्या प्रगतीस खीळ घालणारे आहे.पूर्वी कै .लाल बहादूर शास्त्री यांचे रेल्वेमंत्री असतानाचे उदाहरण आदर्श धरले जात असे.
    आता ते हास्यास्पद धरले जाते ही अधोगती काय दर्शवते ? त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी ज्या वेगाने राज्य यंत्रणा एकहाती हलवीत आहेत त्याचे कौतुक करावेसे वाटते !
    वैचारिक ,मतभेद असतातच,पण त्या खुर्चीकडून जो निर्णयाचा वेग आणि नेमकेपणा अपेक्षित आहे तो महाराष्ट्रात दिसत नाही आणि गुजराथ मध्ये दिसतो.
    शेवटी लोकांना ,गुंतवणूकदारांना शांतता सभ्यता आणि निर्वेध मुलभूत सुविधा असे जे त्रिकुट अपेक्षित असते ते नसेल तर बाकी भाषणबाजी व्यर्थ जाते.
    आजकाल तर परकीय गुंतवणूक वाढत जाताना , फक्त लोकांना खुश ठेवणारे सरकार असून चालत नाही.तर ते निकाल - रिझल्ट देणारे पण लागते.
    त्यात महाराष्ट्राचा क्रमांक फार वरचा नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे.पक्षीय सुंदोपसुंदी जर प्रांताचे आर्थिक आरोग्य बिघडवणार असेल तर त्या पक्षांचा उपयोग काय ?

    ReplyDelete
  5. संजयजी ,
    आपण केलेल्या खुलाशाने सर्व संशय मिटले..
    धन्यवाद !
    या निमित्ताने मला आपणास एक नम्र विनंती करावीशी वाटते.
    कुठलाही मूलतत्ववादी हा घातकच ! धार्मिक मूलतत्ववादी तर अजूनच घातक !
    त्यातच हल्ली सगळेच मतप्रदर्शन करू लागले - विनोदाच्या अंगाने सांगायचे तर
    पूर्वी पुराणिक पोपटपंची करत असत,समोर ठेवलेल्या तांदूळ आणि पै पैशावर नजर ठेवत त्यांचे बैठक उबवणे चाललेले असे.
    आता बदल असा झालाय की सगळेच बोलू लागले आहेत !. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ची ती भीतीदायक आणि निर्विकार चेहऱ्याने केलेली मख्ख
    भाषणे ऐकली की डोक्याला मुंग्या येतात.
    या सगळ्यांचा परिपाक म्हणजे
    अशा अनेक संघटनांच्या पत्रकांना आणि निवेदनांना साक्षीदार व्हावे लागते आणि एकप्रकारच उबग येतो.
    तीच तीच विधाने आणि तेच शब्द !.पूर्वी हिंदू महासभावाले चिरकत असत आता ब्ल्याक कोब्रा किंवा अनिता पाटील - असेच कुणीतरी अशीच पत्रके काढतात.
    आम्ही लहानपणी नियतकालिके काढत असू, त्यावेळची आठवण होते. आपल्या लेखनाने आपण सगळ्या शहराचे जीवनच बदलणार आहे असे वाटायचे.त्यातच कुणीतरी अभिप्राय पण देत असे -मग जास्तच चेकाळायला होत असे !
    दिवाळीत किल्ले करायचो त्यावेळेस रस्ताभर खडूने बाण काढून - येथे प्रेक्षणीय किल्ला आहे असे लिहून येणाऱ्या लोकांची वाट बघत बसायचो !
    लहानपणी ते ठीक आहे.
    आता हे मोठमोठे दाढीमिशा वाढवून हिंडणारे ,लाल डोळे आणि तारवटून ओरडत सांगणारे लोक पाहिले की त्यांना सांगावेसे वाटते की
    दादानो , बाबानो जीवनावर प्रेम करायला शिका आधी. मग हा आरडा ओरडा करूया - मीपण येईन तुमच्या बरोबर-
    आम्ही लहान असताना शा.अमरशेख भाषणांच्या आधी गात असे ,किती गोड पहाडी आवाज -
    कोंग्रेसच्या बैलाला मत द्या म्हणता - बैलाला मत कस द्यायचं
    बैलाला मत देऊन का आम्ही बैलोबा म्हणून ऱ्हांयचं !
    किंवा
    कुनिएक मेला सावकार कोल्हा हिसकून घेतोबाई लोण्याचा गोला
    उपाशी रहाऊ नग आम्ही मरव किती,
    डोंगरी शेत माझग मी बेनु किती - - असे चालायचं ! गाणारे गाऊन गेले !

    आपण सर्व वाचकांना या अशा तथाकथित क्रांतीची भाषा करणाऱ्या लोकांनी , वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या जाडजाड शब्दांचे अर्थ परत अगदी बाळबोध स्वरूपात समजावून सांगण्याची वेळ आली आहे ! ही मराठी अशीच एकदा अर्थ हरवून बसली होती ,ज्ञानोबांची मराठी एकनाथांनी परत शुद्ध केली होती.
    आपण तेच कार्य परत करायची वेळ आली आहे.
    सध्या सगळीकडे अर्थहीन शब्दांचा चिखल झाला आहे.त्यात विचारांची कमळे तुम्हीच उमलवू शकता !
    ही अतिशयोक्ती नाही ! आमच्या सारख्याना खात्री आहे !

    ReplyDelete
  6. DEAR ALL,

    1)PRATYEK DHARMAT KAHI BHAG WAIT ASATO ,TAR KAHI CHANGLA.

    2)BAHUSANKHYA LOK DHARMATIL WAIT GOSHTI NA JAWAL KARTAT,

    WA CHANGALYA GOSHTINA LATH MARTAT.

    3)PUR-STRI(WIFE OTHER THAN SELF) ANI PUR-DHUN YA GOSHTI

    JAGATIL PRATYEK DHARMANE NAKARLYA AHET.

    4)JAGATIL SURWANI FUKTA YA DON GOSHTI N CHA TYAG KELA

    TARI, JAG AJ AHE TYA PESHA KITI TARI SUKHI HOIL.

    5)JAR RUDYAT DAYA ,PREM NASEL TAR JAGAT KUTHALYAHI DHARMAT

    GELE TARI PARISTITI BADALNAR NAHI.

    6)HINDU DHARMACHYA TIKAKARAN-CHE ABHAR MANALE PAHIJET.KI TE

    AMCHYA DHARMATIL ANISHTA GOSHTI KADHUN TAKAYLA MADATACH

    KARAT AHET.
    7)NINDA WA TIKA YAMULE ANEK CHANGALE BADAL ,HINDU DHARMAT GHADAT

    AHET WA BHAWISHYAT GHADTIL.

    8)SWATA ISWAR HINDU DHARMACHYA WIRODHAKAN CHYA RUPANE AWATIRNA

    ZALA ASUN ,KATHOR TIKA W PARISHAN YACHYA MADATINE HINDU DHARMATIL

    JUNI GHAN KADHUN TAKAT AHE.

    9)YA PURISTITUN BAHER PADUN HINDU DHARMA PUNHA EKADA NAVYA TEJANE

    TALPU LAGEL YACHA PRATYEK HINDUNE WISHWAS DHARAWA.

    ReplyDelete
  7. अहो अनोनिमास ,
    तुमचे विचार उच्च आहेत,निर्मल आहेत,थोर आहेत,सहजशक्य आहेत,
    पण
    १६ डिसेम्बरला तर हिंदू धर्माचे तेज दिल्लीत फारच जाणवेल इतके प्रखर होते .
    डोळे दिपले.मती कुंठीत झाली,रात्रीला हा धर्म सूर्य कसा तळपू लागला असे सर्वाना वाटले.
    एक बस धावत होती आणि त्यात ४-५ हिंदू बेहोष होऊन जे कृत्य करत होते त्यांनी जगातील इतर धर्मीय चक्राऊन गेले.

    त्यानंतर कुणी एका दिव्य मंत्र्याने सांगितले की बायकांनी नीट वागले पाहिजे-नीट राहिले पाहिजे -
    माझा सांगायचा मुद्दा असा आहे की धर्म काय सांगतो यापेक्षा तुमच्यावर संस्कार काय होतात याला महत्व आहे.

    सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचारा बरोबर ज्या अनेक महत्वाच्या गोष्टींचे भान आपण ठेवले पाहिजे त्यामध्ये
    स्त्री दाक्षिण्य ,सामाजिक शिस्त,स्वच्छता,सभ्यता आणि शिक्षण नि सार्वजनिक आरोग्य याचा अग्रक्रमाने उल्लेख केला पाहिजे.
    त्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवता का ,देवाला मानता का ,आणि तुमची धार्मिक मूल्ये काय आहेत यांना काहीही किम्मत नाही.
    तुम्ही उत्तम नागरिक होण्यासाठी धार्मिक असण्याची अजिबात गरज नाही.
    तसे पहिले तर जगातील सर्व धर्मानी ह्या मुलभूत गोष्टींचा पुरस्कार केला पाहिजे.आपापल्या धार्मिक रोजच्या कार्यक्रमात या मूल्यांची वाढ कशी होईल ते पाहिले पाहिजे .
    धर्मातील घाण आपणच काढली पाहिजे.सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे हे मात्र नक्की.!
    आपले अवगुण देखे
    विरक्तीबळे ओळखे आपणांसी निंदी दुख्खे
    त्या नाव मुमुक्षु

    ReplyDelete
  8. ashi krutya fukta hinduch kartat ase apnas mhanayche asel tar kay bolnar.

    atirekyana/gundana jat/dharma nasato ase mhantat

    dharma kiti uccha ahe te tya dharmatil wait goshtin warun tharat
    nasate,tar tya dharmat kiti udatt tatwa ahet tya warun tharte.

    ISWARA KADE JANYACHA FUKT AMCHACH MARG BAROBAR AHE ASE SANGNARYA

    ITAR DHARMAHUN ,ISWARAKADE JANYACHE ANANT MARG AHET ASE SANGNARA

    HINDU DHARMA KITI UDATT PATALILA POCHLA HOTA?_KALA-CHYA PRACHAND OGHAT PRATYEK SANSTHA ,ASHUDHA HOTE,TYACHE SHUDDHIKARAN KARUN

    TILA NAW-CHAITNYA PRAPT KARUN DENE HE KAM SUDHARAK KARAT ASTAT.

    AJ HINDU DHARMA WAR JEVDI TIKA HOT AHE,TEWADHI JAGATLYA KUTHALYA

    DHARMAWAR HOT AHE?YACHA ARTHA ASA AHE KA ,KI ITAR DHARMIYA LOKANI

    KAHICH ATTYACHAR KELE NAHIT?ITAR DHARMA 100%YOGYA CH SANGTAT?

    ReplyDelete
  9. हा चक्क आदर्शवाद आहे फक्त.
    तथाकथित धर्मासाराखी घात करणारी दुसरी गोष्ट नाही .
    धर्म याचा अर्थ काय ते अभ्यासा .-धर्म - एक शिस्त- एक जगण्याचा ठरीव साचेबद्ध मार्ग .
    कुठेतरी बर्फात किंवा ढगात किंवा डोंगरावर एक किंवा अनेक महामानव दिव्य पुरुष किंवा नारी बसले आहेत -
    अशा भ्रमात राहून जगणे म्हणजे एक मानसिक आजार आहे.


    विज्ञान हाच खरा धर्म आहे.
    बाकी सर्व झूट !
    देव कसा असेल हो या जगात ? इतकी पोरकट गोष्ट मी कधी ऐकली नाही.
    देव भक्ताच्या मदतीला धावून येतो यासारखे धादांत असत्य आणि हास्यास्पद मत आपण का पसरवत असतो ?
    सगळ्या धर्मात असे प्रकार आहेत .हिंदू,ख्रिस्चन ,मुसलमान,ज्यू,बौद्ध,असे सगळे धर्म - सगळे अनावश्यक आहेत या जगात !.

    चमत्कार वगैरे फालतू गोष्टी आहेत.निदान समाजमनात त्याला काही स्थान असता कामा नये.
    प्रेम ,आपलेपणा , माया , जिव्हाळा या भावना आणि देव या कल्पनेची उत्पत्ती आणि मनाचा दुबळेपणा
    या मिश्रणातून आपण धर्म हा अतिशय हिणकस प्रकार जन्माला घातला आहे .
    जगात देव असूच शकत नाही त्यामुळे त्यावर बोलणे हा व्यर्थ प्रकार आहे.
    आचरत पणा आहे.
    तो थांबवणे अतिशय गरजेचे आहे.
    " तथाकथित धर्म " ही कालबाह्य गोष्ट आहे.त्यामुळे प्रसिद्ध तत्वज्ञ चार्वाकाचा अभ्यास करा .
    तुमच्याच हिंदू धर्मात सांख्य तत्वज्ञान आहे.ते वाचा .
    आद्य शंकराचार्य - ते बघा.
    फक्त एकदाच ! मनापासून .
    मग बघा - तुमच्यात जमीन अस्मानाचा फरक पडेल - मला खात्री आहे.
    तुम्ही तत्वज्ञ व्हा पण धार्मिक असू नका अशी माझी विनंती आहे.

    ReplyDelete
  10. सर
    आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले आहे की विठ्ठल हा विष्णुरूप नसून,
    शिवरूप आहे.साधारणपणे अशा प्रकारचा आपला आशय आहे.
    आता समज कुणीतरी ब्रिटीश लेखकाने जर सुरुवात केली -
    छत्रपतींचे खरे वडील अमुक तमुक आहेत आणि सर्व मराठे पेटून उठले ,
    त्या प्रकाराशी आपण हे आपले वागणे जुळवून बघा.

    वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला ज्या रुपात पूजले आहे त्या रूपातच त्यांना तो आमम्द घेऊ दे !
    जर दादोजीला शिवाजीचा बाप ठरवणे हे पाप असेल तर,
    आपण पाप करत आहात .वारकरी तुमच्या कडे दुर्लक्ष तरी करतील किंवा
    तुम्हाला क्षमा तरी करतील तरीही तुमचे पाप शकले जात नाही.
    आपण सर्व वाचकांची क्षमा मागितली पाहिजे.

    ReplyDelete
  11. येई गे विठ्ठले माझे माउली ये
    माझे माउली ये
    निढळा वरी कर ठेउनी वाट मी पाहे

    आलीया गेलीया हाती धाडी निरोप
    पंढरपुरी आहे माझा मायबाप

    पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला
    गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला

    विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
    विष्णुदास नामा जय जय भावे ओवाळी

    ReplyDelete
  12. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
    वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
    पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा
    चरणी वाहे भीमा उद्धरी जागा

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...