Thursday, March 28, 2013

रुद्र आणि शिव...दोन धर्मांचे दोन देव...!



रुद्र आणि शंकराला एकच मानण्याची प्रथा आहे पण ते वास्तव नाही. रुद्र ही एक वैदिक देवता आहे तर शंकर ही अवैदिक देवता आहे. शिवपिंडीवर रुद्राभिषेक करणे हा खरे तर अधर्म आहे आणि तो आता तरी थांबवायला हवा. त्यासाठी आधी आपण रुद्र कोण होता याची तपासणी करुयात.

१. ऋग्वेदातील रुद्र इंद्रासारखाच सुंदर असून गौर (अथवा सोनेरी) वर्णाचा आहे, त्याच्या गळ्यात निष्कांचा (सुवर्ण-नाण्यांचा) हार आहे, त्याच्या हातात सुवर्णाची कु-हाड असते. तो हरवलेली जनावरे शोधून देतो.
२. रुद्र "तवस्तम: तवसाम", म्हणजे वृद्धांत अत्यंत वृद्ध आहे.
३. प्रजापती हा रुद्राचा पिता आहे. (मैत्रायणी संहिता-६/१-९) रुद्राने प्रजापतीची हत्या केल्याचीही एक कथा येते.
४. रूद्राचे अग्नी हेही एक अभिदान असून "अग्निर्वै रुद्र:" असे त्याला वारंवार संबोधले गेले आहे.
५. अग्निचयनात (एक प्रकारचा यज्ञ) अग्नी प्रज्वलित राहण्यासाठी तुपाची धार धरण्यात येते त्यावेळीस शतरुद्रीय म्हटले जाते व त्यात रुद्रास विसर्जित होण्याची प्रार्थना केली जाते.
६. रुद्रांची संख्या ११ आहे.
७. रुद्रसावर्णी हा बारावा मनू रुद्राचा पुत्र आहे.
८. कल्पसूत्रकारांनीरुद्राध्याय (रुद्रसूक्त) हे यज्ञाचे अंग म्हणून सांगितले आहे.
९. रुद्रासाठी हवन केल्याने तो अग्निरुप इंद्र यजमानाला ऐश्वर्य मिळवून देतो असे तैत्तिरिय संहितेत (५.४.३) सांगितले आहे.
१०. "रुद्र" देवतेसठी ऋग्वेदात फक्त तीन पुर्ण सुक्ते आहेत. ती वैदिकांचे दुय्यम देवता होती.
११. रुद्र पशु आणि मनुष्यांचा संहार करणारी देवता आहे. (ऋग्वेद २.३३.१०)
१२. कुत्रे व लांडगे हे रुद्राचे पशु आहेत. (अथर्ववेद-११.२.२.)

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुद्राची लिंगरुपात पुजा केली जात नाही.

"पण पौराणिक शैव धर्माचे काही अंश असे आहेत की त्यांचा उगम वैदिक रुद्राच्या उपासनेत सापडत नाही. असा एक प्रमुख अंश म्हनजे शिवाची लिंगरुपात पुजा. ही लिंगपुजा फार प्राचीन असून तिचे अवशेष सर्व जगात आढळतात......पण तरीही फक्त शिवाचेच पूजा लिंगरुपात का, हा प्रश्न उरतोच!.......वैदिक रुद्र हा संहारक आणि भयकर्ता होता. पण आर्येतर जाती-जमातींचा उपास्य असलेला शिव हा निर्माणकर्ता होता, जगताचा उत्पादक होता. भुमीची सुफलता आणि उपजावु शक्ती याच्याशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. सारी मानवसृष्टीही शिवनिर्मितच आहे अशे सर्व जनतेची धारणा होती. अर्थात तिला अनुरुप असे त्याचे प्रतीक प्रजोत्पादक पुरुषलिंगापेक्षा अन्य कोणते असू शकेल?" (भारतीय संस्कृती कोश, खंड ९, पृष्ठ ३०८-३०९)

वरील माहिती पाहता सरळ सरळ दिसनारी बाब म्हणजे शिव आणि रुद्र यांचा कसलाही संबंध नाही तर तो उत्तरकाळात ओढुन-तानून लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रुद्राची कोणतीही वैशिष्ट्ये अवैदिक शिवाशी जुळत नाही. शिव हा सिंधुपुर्व काळापासून लिंगरुपातच देशभर पुजला जात होता. पुजा हे मुळात वैदिक धर्माचे अंग नाही. पुजा हा शब्द द्राविड भाषेतील असून शिवही द्राविड शब्द आहे. ऋग्वेदात शिवाला "शिस्नदेव" अशी उपाधी दिलेली आहे. शिव देवता (शिव या नांवाने) ऋग्वेदात येत नाही. यज्ञकर्मात शिवाला हविर्भाग दिला जात नाही, कारण शिव हा स्मरारी म्हनजेच यज्ञविध्वंसक आहे. अवैदिकांचा महादेव आहे. महोदेव हा व्रात्यांचा (अवैदिकांचा) देव होता असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. शिवमंदिरांचे पुजारी गुरव (अथवा जंगम) हेच असतात. शिवव्रते केल्यानंतर महानैवद्य गुरवालाच देण्याची प्रथा आहे.

जो फक्त यज्ञांसाठी राखीव होता तो रुद्राभिषेक शिवाला घालण्याची प्रथा का पडली असावी?
हे वैदिक धर्मीय आणि शैवधर्मियांसाठीही पाखंड नव्हते काय? आजही हे पाखंड केले जात नाही काय?

वैदिक धर्मियांना कालौघात यज्ञसंस्था बंद पडल्याने अवैदिक देवतांचे पौरोहित्य उपजिविकेसाठी करंणे भाग पडु लागले. पण शिवाचे पौरोहित्य स्वीकारणे वैदिकांना अवघड होते कारण तो वैदिक धर्माचा विरोधी होता. (वैदिक विष्णुला दुस-या-तिस-या शतकापासून पुढे आनले गेले त्याचे कारण हेच आहे.) पण शिवपुजा करणे जड जाते तर मानसिक वैदिक समाधान करण्याच्या प्रवृत्तीतून शिवाला रुद्राभिषेकाची पद्धत रुढ केली गेली. रुद्र आणि शिव एकच असे समाधान करुन घेतले गेले. रुद्राध्यायाची निर्मिती याच कारणांनी केली गेली असेही आपल्याला दिसते.

शिवलिंगपुजा ही पुर्णतया अवैदिक असून पुरातन आहे. अवैदिक मानवी समुदायांनी तिचे जतन हजारो वर्ष केले आहे. अशा स्थितीत शिवाला रुद्राभिषेक करणे म्हणजे मशिदीत बायबल वाचल्यासारखे नाही काय?

13 comments:

  1. संजयजी,तुम्ही शिवाला जर पौ्राणिक म्हणत असाल तर त्याच एका पुराणात भृगू ऋषीची एक कथा आहे.ज्यात भृगू ऋषींच्या श्रापामुळे शिवाची लिंगरूपात पूजन केल्या जाते.शिवाला ’शिस्नदेव’का म्हणतात ही ह्याच कथेत वदवलेले आहे.आणि ह्यात तुच्छ लेखण्या सारखे काहिही नाही.जनन प्रक्रिया हा सृष्टीचा नियम आहे.हा जो कोणी वैदिक रूद्र आहे तो कदाचित दुसरा कोणीही असेल व मला वाटत नाही त्या रूद्राला कोणी आज पूजतही असेल.तुम्ही म्हणता सारी सृष्टी ही शिवाने निर्माण केली तर ही बाब अगदी बरोबर आहे. शिव पुराणात एका शक्ती स्तंभाची कथा आहे ,ज्याच्या प्रभावातुन विष्णू आणि ब्रह्मदेवाची निर्मीती होते.सध्या टी.व्ही. वर एक महादेवावर मालिका सुरू आहे.त्यात महादेवाला ’श्री रामाचा ’जप करताना दाखवले आहे ज्या श्रीरामाचा अवतार हा झालेला ही न्ह्वता.हे जरा अतिशयोक्ती वाटत असले तरी ही कथा पुराणातिलच आहे.राहिला शिवाला संहारक दाखवण्याचा प्रश्न तर शिव जेवढा भोलेनाथ म्हणुन प्रसिद्ध आहे तेवढाच रागीट ही आहे.तेव्हा रूद्र ही उपमा त्यांच्या रागीट स्वभावाला ही दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा वैदिक देव रूद्रच असेल हे गरजेचे नाही.साक्षात मदनाला भस्मसात करणारा शिव हा जर निर्माणकर्ता आहे तर भस्मकर्ता ही आहेच.......

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा प्रयत्न चांगला आहे पण जर तर पेक्षा सोनवणी सरांसारखं पुरावे देता आले तर तसं टाका म्हणजे तुमचं म्हणणं खरं मानता येईल..

      Delete
  2. खूपच छान लेख आहे, सर. चांगली माहिती मिळाली. हा लेख मी माझ्या ब्लॉग वर लिंक सह टाकू इच्छितो. कृपया परवानगी मिळावी.

    ReplyDelete
  3. I agree...good read. It is true that Shaivism or lingism whatever you call it, is much older than all religions or religious thoughts. Linga worship, sometimes called phallic religion is the base of all humanity. It is a worship that can be called the purest amongst all. Rudra and mahadev both could have been different deities or could possibly the same ones; however, the thing which is cristle clear is that linga worship is the oldest one and there is no god except linga itself, which is more human than a spirit.

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी यांच्या दारापाशी रांगच रांग - भली मोठ्ठी

    अनेक लोक ऐंशी पासून आठ वर्षा पर्यंत सकळ समाज जणू एकच गर्दी करून राहिलाय - प्रत्येकाच्या हातात काहीतरी कागद -

    काही खास हातात " संजय सर अमर रहे " अशा पाट्या तर काहींच्या हातात मनुवाद गाडून टाका - आणि अंतिम विजय बहुजनांचाच अशे फलक - पण जरा मळकट -

    बहुदा यापूर्वी अनेक ठिकाणी वापरून मळले असावेत !- गर्दीतले चेहरे खास

    गर्दी करणारे असतात तसे !- मग विषय कोणताही असो - शिवाजी,बाबासाहेब,- त्यापुढे की जोडून जय ! असे म्हणणारे !- चेहऱ्यावर प्रचंड कुतूहल आणि आशा घेऊन आलेले -

    रणरणत्या उन्हात वळचणीला उभे -


    आप्पा - अहो जरा बाजूला व्हा हो !



    बाप्पा - माझा नंबर तुमच्या आधी आहे हो शहाणे !


    आप्पा - बास का बाप्पा - आता आमच्यावर पण दादागिरी का ?


    बाप्पा - हो हो ! तुम्ही होय - वा वा - सॉरी बर का - त्याच काय झालं

    हे इतक ट्राफिक आणि गर्दी -पाण्याचे प्रोब्लेम - त्यामुळे सारख हमरीतुमरीवर यायची सवय झाली आहे .


    आप्पा - अहो प्रत्येकालाच अडचणी आहेत !

    बाप्पा - अहो मग नगर सेवकाच्या कडे जायचे - अशा रांगा लावण्यापेक्षा !

    आप्पा - अहो तसे मुद्दे नाहीत हो - उगाच आपलं - नगरसेवक काय करणार कप्पाळ ! हे सगळ आर्य अनार्य असं आहे !

    बाप्पा - म्हणजे ?

    आप्पा - अहो हे कागद बघा - एक श्याम्पल दाखवूका - अहो भीमराव - जरा बघू हो तुमचा कागद - हे बघा - यांना हवय की द्रविड जर इथले आणि ते लिंगपूजा करत असत तर मग पार्वती सती गेली ती कशी काय - योग्य म्हणायची का ?आणि नंदी हा पण आर्यपूर्व का आर्यांनी घुसडलेला ? गाय बैल हे मोहनजो दारोचे असेच का ते पण आर्यांचे ?-



    बाप्पा - अहो हे संजय चे लेख वाचून शिव आणि रुद्र आणि विष्णू आणि काय काय - आम्हाला कळेना की

    समजा आम्हाला जप करायचाय ओम नमः शिवाय - किंवा फोर अ चेंज - ओम विष्णवे नमः

    तर प्रोब्लेम असा झालाय की - बाकी सर्व कळतंय असं वाटतंय अशी समजा क्षणभर समजूत करून घेऊ असं कुणी म्हणतय असं धरल तर -

    अहो हा जो ओम आहे ना - तर तो शैव का वैष्णव ?

    म्हणजे तो मोहनजो दारो मधला का आर्यांचा -

    तो लिंगाला जवळचा का यज्ञाला ?- त्यातून मिळणारे पुण्य कोणत्या अकौंट ला जमा होणार ? शैव का वैष्णव -?- अहो एका ओमचे इतके प्रोब्लेम तर बाकीच्यांचे किती ?


    आप्पा - म्हणजे ?


    बाप्पा - अहो ओम हा अर्थहीन हुंकार ! त्याच्या इतक्या कटकटी तर अर्थगर्भ शब्दांचे काय ?

    आप्पा - भलताच गंभीर मुद्दा आहे कि हो !

    बाप्पा - आता आपले कसे होणार ?

    आप्पा - त्या सर्वेश्वरालाच साकडे घालू आणि या रांगेत शेवट पर्यंत उभे राहू - उत्तर मिळणार हे नक्की - काय असेल ते सांगता येत नाही -

    ReplyDelete
  5. लिंग पुजा पुरातन आहे काही पुरावा आहे की दिले ठोकुन सोनावणी साहेब .

    ReplyDelete
  6. Sanajay Sir, According to my reading of Shiv Puran, Lord Shiva is the creator of this world and he would also end this world. As far as the phallic worship Of Shiva is concerned, the story goes that Vishnu and Brahma saw an unending pillar of light, which claimed itself as the creator of this world.Both decided to find its end which none of them ever reached and hence the pillar is denoted as Linga.
    As far as calling it a Phallic symbol, its found in the story of Sage Bhrigu, who had decided to find the most favourable lord for his Puja .

    After reading so many articles of you on Vedic and Hindu being different, I have a question for you; whom does Shiva meditate on where he is shown meditating at the Mount Kailash.? When I asked this question to a priest , he said that Both Lord Shiva and Lord Vishnu meditate on each other.
    Kindly clarify the difference if there is another story on this.

    Thanks.

    ReplyDelete
  7. मुळात संस्कृतमधील लिंग या शब्दाचा अर्थ चिन्ह / लक्षण / Symbol असा आहे - जननेन्द्रिय हा मूळ अर्थ नाही, तो भाषेमध्ये Derived रूपाने वापर झाल्यामुळे आला आहे. मानव अपत्य जन्माला आले की जननेन्द्रिय पाहून स्त्री की पुरुष हे समजते. म्हणजेच जननेन्द्रिय हे योनि / व्यक्ति ठरवण्याचे "चिन्ह" आहे. या अर्थाने जननेन्द्रियाला "लिंग" म्हटले जाते. शिवलिंग म्हणून जो आकार दाखवला जातो - तो आणि लिंग या शब्दाचा derived वापर यामुळे ते शिश्नाचे शिल्प असल्याचा समज प्रस्थापित झाला असावा. परंतु कित्येक ठिकाणी - विशेषत: ज्योतिर्लिग किंवा महत्वाच्या क्षेत्राच्या ठिकाणी असलेले शिवलिंग या आकाराचे नाही. उदा. गोकर्णमहाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, केदारनाथ, ओंकारेश्वर, हरिहरेश्वर इ. अन्य ठिकाणी मूळ शिवलिंगावर मुखवटे लावले जातात त्यामुळे हे ध्यानात येत नाही. म्हणजेच प्राचीन / मूळ / स्वयंभू म्हटली जाणारी शिव"लिंगे" अशा लंबगोल आकाराची नाहीत. त्याहीपलिकडे जाऊन - अंडाकृती लंबगोल आकार हा पुरुष-जननेन्द्रियाचा आकार आहे का? फारफार तर हा आकार अंडाकृती म्हणता येईल, त्या अर्थाने काही लोक त्याला ब्रह्मांडाचे चिन्ह मानतात. आणि ज्यांना शिवलिंग आणि त्याभोवतीचे "पीठम" (शाळुंका) म्हणजे पुरुष आणि स्त्रीयोनी वाटते - त्यांनी त्यातील दिशेचा विचार केला आहे का? ज्याच्या मनात सतत भिन्नलिंगी आकर्षण असते (जवळपास प्रत्येकाच्या मनात असते असे फ्रॉईड सांगतो) किंवा सेक्सचा विचार असतो त्याला समोर दिसणारा प्रत्येक आकार तसाच वाटतो. पण, स्पष्ट बोलायचे झाले तर पुरुषलिंग हे स्त्रीलिंगातून बाहेर आलेले असू शकेल का? हे काहीतरी विचित्रच नाही का?

    ReplyDelete
  8. यजुर्वेदात शिव / शंकर हे उल्लेख अनेक वेळा येतात. यजुर्वेदात असलेल्या रुद्राध्यायात तर ते अनेक वेळा येतात. त्यामुळे रुद्र वैदिक आणि शिव अवैदिक ही ओढूनताणून केलेली कल्पना दिसते. शिवमंदिराचे पुजारी गुरव असणे - ही गोष्ट त्याचा पुरावा म्हणून सांगणे याला ही काहीच अर्थ नाही. कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवमन्दिरांचे पुजारी असलेले गुरव लिंगायत असतात, लिंगायत-शैव पंथ बसवेश्वरांनी बाराव्या शतकात स्थापन केला. आपण ज्याला "फार प्राचीन" म्हणता त्या लिंगपूजेशी - गुरव पुजारी असण्याचा सांधा जोडणे अगदीच गैरलागू दिसते. आपण अनेक विधाने पूर्णत: काल्पनिक पेरून त्यावर अन्य काही निष्कर्षांचा डोलारा उभा करता. "वैदिक धर्मीयांना कालौघात यज्ञसंस्था बंद पडल्याने अवैदिक देवतांचे पौरोहित्य उपजीविकेसाठी - - " हा आपला केवळ एक व्यक्तिगत आडाखा आहे. "वैदिकधर्मीय" म्हणजे सगळे पौरोहित्य करणारे असतील - तर ते नक्की कोणासाठी पौरोहित्य करून "उपजीविका" करत होते? त्यापुढील वाक्य "कारण तो वैदिक धर्माचा विरोधी होता" हा आधी मांडलेला आडाखा इथे समर्थनासाठी येतो. पुरावे कशालाच नाहीत. आपलेच आधीचे विधान आपल्याच नंतरच्या विधानाला पुरावा म्हणून वापरल्यामुळे काहीच सिद्ध होत नाही. आजचा पुरोगामी म्हणवला जाणारा प्रस्थापित सामाजिक विचार एका तुलनेने निरुपद्रवी असलेल्या जातीला नावे ठेवण्याच्या पायावर आधारलेला आहे. ते संस्कार झालेल्या अनेकांना मत्सर सुखावण्यासाठी ही नवी कल्पना आकर्षक वाटू शकते. पण यामुळेच हे मूलभूत सत्य न ठरता नव्या बाटलीत भरलेली तीच जुनी नशा ठरते.

    ReplyDelete
  9. जोशीसाहेब, शिवाचे उल्लेख यजुर्वेदात फक्त रुद्राध्यायात येतात. रुद्राध्याय हा शिव आणि रुद्रात एकत्व वा समानता शोधण्यातल्या काळातील आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. शिवाचा रुद्राशी अथवा वैदिक धर्माशी संबंध नाही हे मत सर्वच विद्वनांनी व्यक्त केले आहे. शिवाय कृष्ण आणि शुक्ल यजुर्वेदातील ऋचासंख्याही वेगवेगळी आहे हे तुम्हाला माहित दिसत नाही. ऋग्वेदात शिवाचा एकदाही उल्लेख नाही हेही तुम्हाला माहित नसावे. विष्णु सहस्त्रनाम हे रुद्राध्यायाच्या धरतीवर चवथ्या शतकात लिहिले गेले. रुद्राध्यायाची रचना त्याआधी एक शतकभर झाली असावी. ही नामगिनती वैदिकांनी कधी व का सुरु केली? काय संबंध? त्यामागे, मी लेखात लिहिल्याप्रमाणे स्वर्थ होते हे उघड आहे. धार्मिक प्रदुषन करुन वैदिकांनी एके काळी स्वार्थ साधला असेल, पण ते तसेच होते हा अट्टाग्रह आज चालणार नाही. यजुर्वेदात हा अध्याय उपनिषदानंतर आलेला आहे हे तुम्हाला माहित आहे काय? तुमचा धर्म वेगळा आहे तर असेल वेगळा. त्यात तुम्हाला कोणती अडचण आहे? तसाही तुमचा वेगळा धर्म तुम्ही जपतच असता. सर्वच आमच्या बापाचे या उद्दाम-धुर्तपणाचे दिवस संपले आहेत एवढेच लक्षात घ्या!

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...