Saturday, July 20, 2013

एक गर्भ-सूर्य....

कधी कधी जीवनच असे बनून जाते
कि रात्रीचे पावसाळे होतात
कालांधाराचा पाऊस झेलत
उजेडाचे आडोसे शोधावे लागतात...
उजेडाची व्याख्याही बदलत जाते
काजव्यांनाच सूर्य म्हणायची वेळ येते!
(सूर्य पाहिलाच नाही कधी...)

अशा काळात जगतोयत आम्ही
ज्या काळात फक्त आग ओकत्या हिंस्त्रतेचे
डोळे दशदिशांतून
ओसंडत येतात
ती श्वापदे आपले बळी शोधण्यासाठी आपली ओंगळ
बोटे अंधाराच्या फटींत घुसडतात
...

खूप सूर्य
गर्भांतच
मरून पडलेले सापडतात...
आम्ही अंधार-वर्षा
तुडवत राहतो
या क्षितीजापासून
त्या क्षितीजापर्यंत
एक गर्भ-सूर्य जपण्याच्या प्रयत्नात...

4 comments:

  1. aho sanjayji he kaay? Itake ajubajula ghadat asatana kavita kaay karatay? Aho bodhgayetil sfotatil brahmani shadyantra kinva Bihar madhil mid-day mill durghatanemaage Narendra Modincha haat yawar ka lihit nahi? PUROGAMI BANA

    ReplyDelete
  2. संजय सर
    तुम्ही ज्या चैतन्याने हे सर्व वेगळे पण महत्त्वाचे विचार मांडत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आज पर्यंत समाज एका ठरवून दिलेल्या कोषातच विचार करत होता. अलिकडच्या काळात समाजात जी आंदोलने दिसू लागली आहेत त्याचे श्रेय तुमच्यासारख्या सर्व विचारवंतांना आहे. समाजातील काही विघ्नसंतोषी लोक जुनेच राग आळवत बसतात त्यांच्याकडे लक्ष न देऊन तुम्ही तुमच्या वैचारिक क्षमतेचा आणि सहनशीलतेचा परिचय देवून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवत आहात. वेगळ्या विचारांचे महत्त्व समाजाला आधी उशीराच कळायचे. पण आजच्या सुधारणावादी व पुरोगामी समाजाला तुमच्या वेगळ्या विचारांचे महत्त्व लवकरच कळू लागेल

    ReplyDelete
  3. अरेरे

    अतिशय अर्थ हीन

    तुम्ही इतके फालतू असाल असे वाटले नव्हते


    दुसरी गोष्ट ,

    तुम्हाला कसे कळत नाही की तुम्ही म्हणजे एक उगीचच आहात !

    त्या अस्तित्वाचा कुणालाच काही उपयोग नाही


    कवीता तर तुमच्या चित्रा इतक्याच गचाळ आणि रुचीहीन असतात

    तुमचे विवेचन प्रचारकी असते - आपल्याला श्रेणीच नाही !

    तुम्ही काव्य शास्त्र विनोदाचे प्राथमिक धडे का घेत नाही ?




    तुम्ही पुस्तके लिहून किती पैसे मिळवले ते बढाया मारत सांगता त्या सांगलीकराला

    किती फालतू रुचीहीन आहे असे सांगणे

    अत्रे खांडेकर पु ल किंवा शांता शेळके ,

    कुसुमाग्रज ,किंवा रा. चिं ढेरे ,

    महात्मा फुले - धर्मानंद कोसंबी

    ह्या लोकांनी अशी वायफळ टिमकी वाजवली नाही

    किती मिलियन कमावले हे साहित्यिकाने सांगणे ही कीव करण्याची गोष्ट आहे



    तुमचे सर्व लिखाण हे मुळात साहित्य म्हणून काय लायकीचे आहे - या लोकांच्या तुलनेत

    मग त्या बहिणाबाई असोत , जी ए कुलकर्णी असोत माडगुळकर बंधू असोत वा भालचंद्र नेमाडे असोत किंवा महानोर असोत !

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...