Saturday, February 1, 2014

आणि हीच नेमकी.....

जगणे हे महत्वाचे असते
हे जगणा-याला कधीच समजत नाही
समजणारही नाही
कारण
जगणारा जगत जातो
आपल्या मस्तीत
पण
कोणाचे जगणे महत्वाचे हे
नेहमी आजवर मेलेलेच ठरवत आलेत!


आणि हीच नेमकी जगणा-यांची शोकांतिका आहे!

2 comments:

  1. सर्व प्रथम अभिनंदन सर !
    जगणे आणि मरणे यातील शोकांतिका आपण सहजपणे सांगितली आहे
    तुटक मांडणी परंतु शब्दांचा चपखल वापर आणि शेवट करताना एक दिलेली मोकळी जागा
    आणि मग हीच खरी शोकांतिका आहे असे उद्गार
    यामुळे जणूकाही त्या कवितेस एका चित्राच्या सुंदर मांडणीचे कोंदण लाभले आहे असे वाटते
    ती मोकळी जागा मलातर एका निःश्वासा सारखी वाटली , नितांतसुंदर आणि आशयसंपन्न !

    मला कवितेविषयी काहीच समजत नाही
    आणि माझा अभ्यास कमी पडतो
    परंतु अशाच चार ओळी एकदम पाठीमागून आलेल्या झुळुकी सारख्या अकस्मात
    भेटतात आणि मन भानावर येते
    अजून एक सुचवावेसे वाटते - योग्यता नसतानासुद्धा - आणि ते आपणास पटणार नाही हेपण माहित आहे ,आपण तिसऱ्या ओळीत - समजनारही असे लिहिताना जर समजणारही असे जरा कष्ट घेऊन सांभाळले असते तर रसभंग झाला नसता - इतर ठिकाणी आपण न आणि ण यांचे सुंदर भान ठेवले आहे ,कदाचित घाई घाई मुळे आपणाकडून राहिले असेल ,असो - तो खरेतर माझा अधिकार नाही !
    अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. बदल केला आहे आगाशे सर, धन्यवाद!

      Delete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...