Sunday, February 2, 2014

सातवाहन: प्राकृत आणि संस्कृत! (२)


"सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." असे विधान करुन वा. वि. मिराशी "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात पुढे म्हणतात कि, "आर्य लोक भारतात आले तेंव्हा त्यांची भाषा वैदिक पद्धतीची संस्कृत होती यात संशय नाही. पण तिच्यातील क्रियापदांचे दहा प्रकार, तीन भुतकाळ, दोन भविष्यकाळ, नाम-सर्वनामांची विविध प्रकारची विभक्ति-प्रत्ययांत रुपे इत्यादि बारकावे त्यांच्याशी व्यवहारात संबंध आलेल्या आर्येतरांना पेलने शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातील संस्कृत भाषेत परिवर्तन होऊन प्राकृत भाषा अस्तित्वात आल्या. आर्यांनाही त्यांच्याशी व्यवहारात त्यांचा उपयोग करावा लागला."

मिराशींनाच नव्हे तर गेल्या शतकातील सर्वच विद्वानांनी आर्य आक्रमण अथवा स्थलांतर सिद्धांत हे केंद्रीय ग्रुहितक ग्राह्य धरलेले आहे. १९ व्या शतकापासून "आर्य" वंश संकल्पनेने अकल्पित विस्तार केला. या संकल्पनेचा जन्मदाता म्यक्समुल्लरने "आर्य हा कोणी वंश मानतो तो मोठेच पाप करतो..." असे म्हणुनही या संकल्पनेने नाझीवाद आणि फ्यसिस्ट विचारांना जन्म घातला. यामागे वंशश्रेष्ठ्त्वाची भावना होती हे उघड आहे. भारतही या विचारांपासून अलिप्त राहिला नाही. "आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ लिहून टिळकांनी त्यात भरच घातली. उत्तरेतील आर्य व आर्यभाषा व दक्षीणेतील द्राविड व द्राविडभाषा यात सांस्कृतिक व राजकीयही संघर्ष पेटला. आजही त्याचे निराकरण झालेले नाही. वंशवादी लोकांनी आजही "मुलनिवासी विरुद्ध आक्रमक युरेशियन" अशी मांडणी कायम ठेवली आहे व त्याचे प्रतिबिंब दोन्ही बाजुंच्या वैचारिक साहित्य, संशोधने व ललित लेखनांवर पडलेले आढळून येते. त्यामुळे सत्याप्रत जाण्याचे मार्ग दोन्ही बाजुंनी बंद करून ठेवले आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे.

या वादात न शिरता जिनेव्हा (युनेस्को) येथे मानववंश शास्त्रज्ञ आणि जनुकीय शास्त्रज्ञ यांनी जुन १९५१ मद्धे एक मताने जारी केलेल्या निवेदनापासून या प्रश्नाकडे पाहुयात. संदर्भ: The Race Question in Modern Science: The Race Conceipt- Results of an Inquiry, युनेस्को प्रकाशन)

खाली या निवेदनातील मुद्दे थोडक्यात दिलेले आहेत.

१. संपुर्ण मानवजात होमो सेपियन या एकच एक मानवगटातून विकसीत झालेली आहे. एकाच गटातील माणसांचे जगभर वितरण नेमके कधी आणि कसे झाले हे मात्र सांगता येणार नाही.
२. मानवी समाजांत आज दिसनारे शारीरीक (रंग/जबड्यांची ठेवण इ,.) अनुवांशिकी घटना आणि विविध भुभागांतील पर्यावरणीय स्थानिक वैशिष्ट्यांमुळे दिसतात.
३. राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक, आणि सांस्कृतिक विभेदांचा व वेगळ्या वंशाचे असण्याचा काही संबंध नाही.
४. आजवर वंशशास्त्रज्ञांनी शरीरमान/रंगाच्या आधारे कितीही गट पाडले असले वा कल्पिले असले तरी एका विशिष्ट शरीरलक्षणावरून (उदा. रंग) एक गट दुस-या गटापेक्षा वेगळा आहे असे नाही. या गटांत वांशिकी कारणावरून एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ (Superior) आहे अशी जी सध्याची लोकप्रिय संकल्पना आहे ती निराधार आहे.
५. बहुतेक वंशशास्त्रज्ञ मानवी गटांची विभागणी करतांना बौद्धिक क्षमतेचा त्यात अंतर्भाव करत नाहीत. मानवाच्या (कोणत्याही कथित वंशाचा असला तरी) बौद्धिक क्षमता या जन्मजात व तो ज्या समाजव्यवस्थेत राहतो (मानवी पर्यावरण) त्यावर अवलंबून असतात. मानसिक क्षमतेवरून दोन गट पडत नाहीत.
६. संस्कृती आणि सांस्कृतिक उपलब्धी ही जनुकीय फरकांवर अवलंबून नसते.
७. "शुद्ध रक्ताचा वंश" ही संकल्पना सिद्ध करणारा एकही पुरावा पुढे आलेला नाही.

यानंतर आपण Center for Cellular & Molecular Biology  हैदराबाद, University of Tartu, इस्टोनिया,  Chettinad Academy of Research and Education, चेन्नई आणि बनारस हिंदू विद्यापीठाने भारतातील जनसंख्येचे जे व्यापक जनुकीय सर्वेक्षण केले त्यांच्या निष्कर्षाकडे वळुयात.

या निष्कर्षाप्रमाने गेल्या किमान साडेतीन हजार वर्षांपासून भारतात युरेशियन जनुकीय प्रवेश आढळुन येत नाही. भारतातील जनुकीय वैविध्य हे युरेशियापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. युरेशियातून आर्य अथवा आर्यभाषा बोलणारे लोक कधीकाळी आले मत हे जनुकीय पुराव्यांवर टिकत नाही.  "It is high time we re-write India's prehistory based on scientific evidence. There is no genetic evidence that Indo-Aryans invaded or migrated to India or even something such as Aryans existed". असे मत  डा. लालजी सिंग यांनी व्यक्त केले असून ते Center for Cellular & Molecular Biology  चे संचालक होते. हा अहवाल २०११ मद्धे प्रसिद्ध झाला.

वरील बाबींवरून दोन बाबी सिद्ध होतात.

१) आर्य नांवाचा वंश अस्तित्वात नव्हता, हे वंशशास्त्रज्ञांच्या व आताच्या जनुकीय संशोधनाने सिद्ध केले आहे. सध्याच्या ऋग्वेदात १०१२८ ऋचांपैकी फक्त ३४ ऋचांत आर्य हा शब्द ३६ वेळा येतो. हे आदरार्थी संबोधन असून हे संबोधन विशेषता: सुदास राजाला आणि इंद्रादि देवतांना वापरलेले आहे, वंश म्हणून नाही.
२) आर्य अथवा कोणी युरेशियन मानव गट भारतात प्रवेशला हे पारंपारिक मत कोणत्याही आधारावर टिकत नाही.

या नवीन शास्त्रशुद्ध संशोधनांनंतर टिळक, वा. वि. मिराशी ते सर्वच भारतीय विद्वानांची आर्यांविषकची मते बाद होतात हे ओघाने आले. जर आर्य अस्तित्वात नव्हते तर त्यांची संस्कृत भाषा आर्येतरांना पेलत नव्हती म्हणून अशुद्ध झाली आणि  त्यातून प्राकृत भाषा जन्माला आल्या हे मिराशींचे वरचे मतही बाद ठरते. उलट मिराशी येथे अजून एक अत्यंत मोठा विरोधाभास जन्माला घालत आहेत. तो म्हणजे "उच्च थरांमधील लोकांमद्धेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." हे त्यांचे उपरोम्क्त ग्रंथातील विधान. येथे मिराशींना उच्च थर म्हनजे "त्रैवर्णिक" म्हणायचे आहे हे उघड आहे. मिराशी येथे हे विसरले आहेत कि वैदिक धर्मात तिन्ही वर्णांत वेद/वेदांगे/शिक्षा/व्याकरण इ. गुरुगृही जावून शिकणे अनिवार्य आहे. जर वेद संस्कृतात असतील तर स्वाभाविकपणेच या तिन्ही वर्णातील लोकांना संस्कृत येणे अनिवार्य आहे. शिवाय सातवाहन हे ब्राह्मण होते, तत्पुर्वीचे शृंग व काण्व ही राजघरानीही ब्राह्मण होती असे त्यांचेच दावे आहेत. सातवाहनांनी केलेल्या श्रौत यज्ञांचे वर्णन त्यांनी संस्कृतात लिहिण्याऐवजी प्राकृतात लिहिल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलेले आहे. डा. अजय मित्र शास्त्री यांनी "महाराष्ट्र ग्यझेटियर: इतिहास: प्राचीन काळ" मद्धेही असेच वर्णन केले आहे. एकीकडे प्राकृत ही सामान्य जनांची भाषा होती आणि हालाच्या गाथा सप्तशतीतील गाथा ही जनसामान्यांची काव्ये होत असे विधान करतांना अगदी स. आ. जोगळेकर (गाथा सप्तशतीचे संपादक) विसरतात कि गाथा सप्तशतीतील हाल, आढ्यराज, प्रवरसेन ई. हे गाथा रचनाकार राजे व सामंत होते. जनसामान्य नव्हते.

या विवेचनाचा संक्षिप्त अर्थ एवढाच निघतो कि संस्कृतातून आर्येतरांना झेपली नाही म्हणुन प्राकृत निर्माण झाली हे मत चुकीचे आहे कारण कोणताही युरेशियन मानवगट भारतात संस्कृत वा तत्सम भाषा घेऊन आला होता हे मतच मुळात निराधार आहे. त्याला कसलेही (अगदी ऋग्वेदांतर्गतही) पुरावे उपलब्ध नाहीत.

आणि दुसरी बाब म्हनजे तथाकथित उच्च थरही प्राकृतच बोलत होता कारण अन्य भाषा अस्तित्वात नव्हती. त्रैवर्णिक जेही वेद शिकत होते ते आता आहेत त्या संस्कृत भाषेत असणे शक्य नाही कारण तसे असते तर संस्कृतचा पुरेपूर अभाव आपल्या चर्चेत असलेल्या प्रदिर्घ काळात दिसला नसता. उलट सातवाहनांच्या लेखांत ४६० वर्षांच्या कालावधीत प्राकृत संस्कृतात उत्क्रांत होत असल्याचे संकेत कसे मिळतात हे पुढील लेखात पाहु.

(क्रमश:)

85 comments:

  1. hello mr sonavani....considerable time has passed since you have posted this and people have not yet started fighting (brahaman-non brahman, maratha-brahmin, dalit non dalit, the usual stuff)....dont you ever get bored of this?..your blog has become just another place for people to abuse each other...just nothing else

    ReplyDelete
    Replies
    1. It is a sort of catharsis...let them fight...one day they will understand follies of it and will start thinking in right direction.

      Delete
  2. उत्तम आहे !
    ब्रेक के बाद असे समजा !

    ReplyDelete
  3. सातवाहन वंश : प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे; जैन ग्रं थ वगैरेंतून मिळते. या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही विद्वानांत मतभेद आहेत. तसेच या राजवंशाच्या कालखंडाबद्दल आणि राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखांतल्या पुराव्याशी जुळत नाहीत; तथापि सामान्यतः या वंशातील तीस राजांनी सु. ४५० वर्षे राज्य केले असे मानण्यास हरकत नाही. पुराणांत याराजांना आंध्र किंवा आंध्र भृत्य म्हटले आहे; परंतु त्यांचे आरंभीचे लेख व नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली, त्यांवरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणांतील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती; म्हणून त्यांना पुराणांत आंध्र वा आंध्र भृत्य अशी नावे मिळाली असावीत.

    सम्रा ट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. या वंशाला कोरीव लेखात ‘सातवाहन कुल’ असे म्हटले आहे, त्यावरून त्याचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात व विदर्भात सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननांतही ती सापडली आहेत. या पुराव्यांवरून त्यांची सत्ता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत होती असे दिसते.

    सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही; कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे; तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले असावेत. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणांत येते. तो इ. स. पू. २०० च्या सुमारास राज्य करू लागला असावा. जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव ‘सिमुक सातवाहन’ असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावे अवशिष्ट आहेत.

    सिमुकाने २३ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याच्या राज्यात पुणे, नासिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण) येथे होती असे दिसते.

    सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी (कार. इ. स. पू. २००–१७७ ) हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा.
    पुढे चालू.........

    ReplyDelete
  4. कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे; तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते; पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा.

    सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे. तत्कालीन कलिंगनृपती खारवेल याने त्याच्या राज्यवर स्वारी करण्याकरिता चतुरंग सेना पाठविली होती; पण ती नागपूरजवळच्या कन्हान (कृष्णवेणा) नदीजवळ आल्यावर बहुधा सातकर्णीच्या सेनेच्या आगमनाची वार्ता मिळाल्यावर तिला परत फिरावे लागले.

    सातकर्णीने नागाधिपती महारठी कळलाय याची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता. त्याने दोनदा अश्वमेध करून दक्षिणेतील आपले सार्वभौत्व प्रस्थापित केले. याशिवाय त्याने राजसूय, अग्न्याधेय, आप्तोर्याम, दशरात्र, त्रयोदशरात्र, अंगिरसत्रिरात्र, गवामयन इ. अनेक श्रौत याग करून बाह्मणांना हजारो गाई, हत्ती, घोडे, कार्षापणनामक तत्कालीन नाणी दान दिली. त्यांचा तपशील नागनिकेच्या नाणेघाटातील लेखांत दिला आहे. सातकर्णीच्या नाण्यांच्या प्राप्तिस्थानावरून त्याचे राज्य मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र व माळवा अशा विस्तृत प्रदेशांवर होते. तसेच नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, संकर्षण, वासुदेव व चार लोकपालांचा उल्लेख आला आहे. त्यावरून सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

    सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात. अनेक विद्वानांनी वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे; पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, बह्मचर्यव्र ताचे पालन करणारी, दीक्षा, व्र त आणि यज्ञ यांच्या
    अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’ असे केले आहे. [⟶ नागनिका].

    वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत; पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे. सतरावा राजा ⇨हाल हा गाथा सप्तशतीनामक सुप्रसिद्घ प्राकृत भाषेतील सातशे गाथांच्या संग्रहाचा कर्ता म्हणून विख्यात आहे.

    हाल राजानंतरच्या पाच राजांच्या कारकीर्दीविषयी पुराणांत किंवा इतरत्र काहीच माहिती मिळत नाही. या कालात कुशाण सम्रा टांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचे साम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते. प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रा मदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र बाह्मणभोजने घालून बाह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे.
    पुढे चालू.........

    ReplyDelete
  5. या काळात सातवाहन राजांची सत्ता प्रतिष्ठानजवळच्या प्रदेशात सीमित झाली असावी; परंतु इ. स. दुसऱ्या शतकाच्या द्वितीय पादांत गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२–८६) या महाप्रतापी सातवाहन नृपतीने शकांचा उच्छेद करून दक्षिणेत विशाल साम्राज्य स्थापिले. त्याने प्रथम विदर्भ काबीज केला आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रावर स्वारी केली. शकांवरील विजयानंतर लवकरच कोरविलेल्या लेखांत त्याने आपला उल्लेख ‘बेनाकटकस्वामी’ (वैनगंगा जिल्ह्याचा अधिपती) म्हणून केला आहे. त्याच्या राज्यांत ऋषीक (खानदेश), अश्मक (अहमदनगर आणि बीड), आकरावन्ती (पूर्व व पश्चिम माळवा), सुराष्ट्र आणि अपरांत (कोकण) हे देश अंतर्भूत होते, असा तत्कालीन लेखांत उल्लेख आहे. यांच्याही पलीकडे आंध्रा दी प्रदेशांवर याचा अंमल होता, म्हणून कोरीव लेखांत त्याला ‘त्रिसमुद्राधिपती’ म्हटले आहे. त्याने निदान चोवीस वर्षे राज्य केले असे दिसते.

    गौतमीपुत्रानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र वासिष्ठीपुत्र पुळुमावी (कार. इ. स. १०६–१३०) हा गादीवर आला. याचेही राज्य बरेच विस्तृत होते; पण शकक्षत्रप चेष्टनाने उत्तरेतील सुराष्ट्र आणि आकरावन्ती हे देश परत जिंकून घेतले होते. टॉलेीने (इ. स. १४०) याचा ‘प्रतिष्ठानाधिपति’ म्हणून उल्लेख केला आहे. याने अठ्ठावीस वर्षे राज्य केले असे पुराणांत म्हटले आहे.

    वासिष्ठीपुत्र पुळुमावीनंतर त्याचा भाऊ वासिष्ठपुत्र सातकर्णी (कार. इ. स. सु. १३०–१५९) हा गादीवर आला. त्याने माळवा-काठेवाड या देशांचा अधिपती प्रथम रुद्रदामन याच्या कन्येशी विवाह केला होता, असे कान्हेरी येथील लेण्यांतील लेखावरून समजते.

    यानंतरचा बलाढ्य नृपती यज्ञश्री सातकर्णी हा होय.याचे कोरीव लेख व नाणी पश्चिमेत कोकणपासून पूर्वेस आंध्रा पर्यंत सापडली आहेत. त्यांवरून त्याच्या विस्तृत साम्राज्याची कल्पना येते. याने क्षत्रपांकडून जिंकलेल्या प्रदेशाकरिता त्यांच्या नाण्यांसारखी चांदीची नाणी आणि पूर्वेच्या कोरोंडल किनाऱ्यावरील प्रदेशाकरिता दोन शिडांचे जहाज असलेली शिशाची नाणी पाडली होती.

    यज्ञश्री सातकर्णीनंतर विजय सातकर्णी, चंडश्री (चंद्रश्री) आणि पुळुमावी यांची नावे पुराणांत येतात. याशिवाय स्कंद सातकर्णी, कुम्भ सातकर्णी, शक सातकर्णी वगैरे काही राजांची पोटिन धातूची नाणी अकोला जिल्ह्यात तऱ्हाळा येथे काही वर्षांपूर्वी सापडली होती; तथापि यज्ञश्रीनंतर सु. ५० वर्षांत (इ. स. २५० च्या सुारास) सातवाहन घराण्यास उतरती कळा लागली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आभीरांचे व विदर्भात वाकाटकांचे राज्य आले. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर-सातारा भागांत ‘कुर’ घराण्यातील सातवाहनांचे मांडलिक घराणे राज्य करीत होते, असे काही नाण्यांवरून ज्ञात झाले आहे.

    सातवाहन राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत प्रगती झाली. सातवाहनांचा धर्म आणि वाङ्मययांना उदार आश्रय होता. आरंभीच्या काही राजांनी श्रौत यज्ञ करून बाह्मणांवर विविध दानांचा वर्षाव केला होता. त्याचा उल्लेख नाणेघाटातील लेखात आहे. त्यांचा बौद्घधर्मालाही आश्रय होता. कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुळुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्घ भिक्षूंकरिता लेणी कोरवून ग्रा मदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आले आहेत. अशी अनेक लेणी महाराष्ट्रात भाजे, कोंडाणे, कऱ्हाड, बेडसा, कार्ले, नासिक, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा वगैरे ठिकाणी अद्यापि विद्यमान आहेत. त्यांतील लेखांवरून राजांपासून सामान्य ग्रारामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि धंद्यांच्या लोकांनी दाने देऊन ती कोरविली आणि शिल्पे, चित्रे इत्यादींनी ती भूषविली होती असे दिसते. कार्ले-भाजे ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीने लक्षणीय असून येथील बौद्घ शिल्पे तसेच स्त्रीपुरुष नर्तकांची दंपती व मिथुन शिल्पे लक्षणीय आहेत. ही लेणी बौद्घधर्माच्या हीनयान पंथाची आहेत. त्यांतील काही ‘चैत्य’ व इतर काही ‘विहार’ प्रकारची आहेत. त्यांतील काही चित्रांत गौतम बुद्घांच्या चरित्रातील प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखविल्या आहेत.
    पुढे चालू.........

    ReplyDelete
  6. सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. एका सातवाहन राजाने आपल्या अंतःपुरात प्राकृत भाषेचाच उपयोग केला पाहिजे, अशी आज्ञा काढली होती असे राजशेखर सांगतो. या कालातील हाल नृपतीने कोट्यवधी गाथांतून सातशे गाथा निवडून त्यांचा संग्रह गाहा सत्तसई (गाथासप्तशती) नावाने प्रसिद्घ केला होता. त्यांतील गाथा विविध दर्जाच्या कवींनी रचल्या होत्या. त्यांत कवींप्रमाणे काही कवयित्रीही होत्या. या कालातील दुसरा सुप्रसिद्घ प्राकृत ग्रं थ बृहत्कथा हा होय. हा आता उपलब्ध नाही; पण त्याची इ. स. अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुकमे केलेली कथासरित्सागर आणि बृहत्कथामंजरी ही संस्कृत रूपांतरे प्रसिद्घ आहेत. त्यांतील कथेवरून गुणाढ्य हा विदर्भातील सुप्रतिष्ठ नगराचा रहिवासी असून राजाश्रयार्थ सातवाहनांच्या प्रतिष्ठान नगरीस गेला होता असे समजते.

    सातवाहन काळात दीर्घकाळ शांतता आणि समृद्घी नांदली. सातवाहन राजांनी यज्ञयागांप्रमाणेच लोककल्याणार्थ पूर्तकर्मे (वापी, कूप, तडाग इ.) केली. नासिकच्या देवी लेण्यातील लेखात ऋषभदत्त म्हणतो की, भरुकच्छ (भडोच), दशपूर (मंदसोर), गोवर्धन आणि शुर्पारक (सोपारा) येथे प्रवाशांकरिता धर्मशाळा बांधल्या. तसेच बगीचे, तलाव, पाणवठे निर्माण केले होते; इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली होती. शिवाय या नद्यांच्या दोन्ही तीरांवर विश्रांतिगृहे उभारली होती आणि पाणपोया घातल्या होत्या. तत्कालीन आपस्तंब धर्मसूत्रावरून असे दिसते की, त्या काळच्या न्यायदानात पुरुषवध, चौर्य, भूमीचा अपहार या गुन्ह्यांबद्दल कठोर शिक्षा होत्या. अपराध्याची मालमत्ता जप्त करून त्याला देहान्ताची सजा दिली जाई. याशिवाय या आपस्तंब धर्मसूत्रात परिश्रमाचे मूल्यवर्णन केले असून परिश्रम न केल्यामुळे जमिनीतून उत्पन्न कमी आल्यास नुकसानभरपाई वसूल करावी, तसेच शेतावरील कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांना दंडताडन करावे असेही सांगितले आहे.
    या काळात व्यापार भरभराटीत असल्याचे दाखले मिळतात. तत्कालीन राजधानी प्रतिष्ठान हे व्यापारी मार्गांचे मुख्य केंद्र झाले होते. कल्याण, चौल, सोपारा इ. महत्त्वाची बंदरे सागरी व्यापार हाताळीत होती. याउलट जुन्नर, नासिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन आणि कोल्हापूर (बह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारी व राजकीय केंद्रे होती. उत्तरेतील उज्जयिनी आणि पश्चिमेतील नासिक, कल्याण, शूर्पारक, भरुकच्छ इ. नगरे व बंदरे व्यापारी मार्गांनी जोडली होती. प्रतिष्ठान व तेर येथून विविध प्रकारचे मणी, मलमलीसारखे तलम कापड आणि विविध प्रकारचा माल गाड्यांतून पश्चिमेकडील बंदरांना पोहोचविला जात असे, असे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रि अन सी या ग्रं थावरून समजते. सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त नगरे होती, असे उल्लेख परदेशी प्रवाशांनी नोंदविले आहेत. व्यापाराबरोबरच सातवाहन साम्राज्यात कलाकेंद्रेही उदयास आली. या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तीदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा) व इतर अनेक वस्तू मिळाल्या. भोकरदन व तेर येथील उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या असून त्या इटलीतील पाँपेई येथील स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवितात. यांशिवाय काही रोमन नाणी आणि देवतांचे बाँझ पुतळे मिळाले. त्यांवरून सातवाहन साम्राज्याचा रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होता, हे स्पष्ट होते. (चित्रपत्र).
    समाप्त.

    ReplyDelete
  7. आमचा संशोधन विषय असा आहे
    संजय सर साधारणपणे एकदा सातवाहन , दुसऱ्या वेळेस आधुनिक राजकारण , तिसरी वेळ एखादी कविता नंतर चौथ्या वेळेस शिवाजी संभाजी ,त्यानंतर शेतकरी, नंतर एखादे चित्र , नंतर भ्रष्टाचार ,त्या नंतर शैव वैष्णव किंवा वैदिक असे काहीतरी लिहित असतात , मध्येच जगाची अर्थ व्यवस्था किंवा भारताची आणि चीनची तुलना वगैरे फेरे मारत परत मौर्य बौद्ध असे करत असतात असे आमचे संशोधन आहे !त्यामुळे आपल्याला आता प्रश्न असा पडतो कि यांचा खरा अभ्यास आणि आवडीचा विषय कोणता आणि परत ओ बी सी वगैरे आले की परत चालूच गाडी !
    अशी एकंदर मजा असते - खरा कस कशातच नसतो -आणि एक ना धड भाराभर चिंध्या
    असा मामला असतो !मध्येच अपा विमं यांचे साटेलोटे असतेच , कदाचित ते प्रत्येक महिन्याला संजय सराना ब्लोगवर त्यांचा प्रचार करण्याचे पैसे देत असणार !
    असे का वागता सर तुम्ही ?

    ReplyDelete
    Replies
    1. धडधडीत खोटा आरोप!

      Delete
  8. I am surprised to see lot of bogus research work and writing printed for no reason and making this blog unnecessarily a boring one
    as pointed out earlier also sanjay sonawani is not giving root references and exact details of the quotes , and thus his writing is not reliable at all and he turns out to be a joker which is very upsetting ,
    If he is writing and fighting for some social cause he must give exact details of the quotes and references which he includes in his writing to strengthen his side
    Some times he again and again tries to bring in the subjects which have no relevance
    in the modern school of thoughts
    I like his efforts but I am sorry to say that he has no skill of writing and his thinking process is not scientific and his so called research work is not based on a regular
    systematic style
    Sometimes I wonder he is not at all a researcher ,or a good writer , but an immature
    one , probably a student in the village who earned some name in his early youth and then kept on enjoying his dream of changing the society !

    ReplyDelete
  9. संजय सर ,
    असा पण एक सिद्धांत होता की आर्य मूळचे भारतीय आणि त्यांच्यातले काही मुशाफिरी करायला बाहेर पडले आणि शेकडो वर्षे जगभर फिरत राहिले त्या नंतर ते परत भारतात आले त्या वेळेस त्यांची भाषा इथे नव्हतीच त्यामुळे हा भाषांचा घोळ सुरु झाला पशुपालन करताना असा नव्या प्रदेशांचा शोध घेतला जाऊ शकेल आणि भारता इतका हवे तसे हवा पाणी असलेला प्रदेश न मिळाल्यामुळे त्या लोकांचे पुनरागमन झाले असेल + असाच काहीसा प्लॉट रिटर्न ऑफ द आर्यन्स मध्ये मिळतो असे वाटते
    तसा विचार केला तर हा भाषांचा उगम आणि एकमेकांवरचा प्रभाव समजायला मदत होईल का ?

    जगभर पसरलेली जिप्सी जमात अभ्यास करण्यासारखी आहे
    तसेच हरप्पन स्त्रियांच्या बांगड्या भरण्याचा रिवाज आणि स्वस्तिक , स्नान आणि कुंडे तसेच हिंदू कुंभ मेळा आणि धर्मातील स्नानाचे महत्व यांचापण विचार करता येईल
    विद्याधर सांकलिया

    ReplyDelete
  10. भागवतांचा बॉम्बस्फोटांना पाठिंबा?

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मालेगाव आणि समझौता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोटांची पूर्ण कल्पना होती, किंबहुना स्फोटांना त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबाच होता, असा सनसनाटी दावा करणारी, आरोपी असीमानंद यांची मुलाखत 'कॅरावॅन' मॅगझिनमध्ये झळकल्यानं देशात एकच खळबळ उडाली आहे. परंतु, असीमानंद यांनी अशी कुठलीही मुलाखत दिली नसल्याचा खुलासा त्यांच्या वकिलांनी केलाय. तसंच, हे आरोप रा. स्व. संघानंही फेटाळून लावले आहेत.

    २००६ ते २००८ या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्सप्रेस, हैदराबादेतील मक्का मशीद, अजमेर दरगाह आणि मालेगावमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते. मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनीच हे स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. या स्फोटांप्रकरणी अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना अटकही करण्यात आलेय आणि त्यात असीमानंद यांचाही समावेश आहे. ते सध्या अंबाला सेंट्रल जेलमध्ये आहेत. तिथे जाऊन 'कॅरावॅन' मॅगझिनच्या प्रतिनिधी लीना गीता रघुनाथन यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यातच, समझौता एक्सप्रेस आणि मालेगावमधील स्फोटांना रा. स्व. संघाचाही पाठिंबा होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

    गेल्या दोन वर्षांत चार वेळा आपण असीमानंद यांची मुलाखत घेतल्याचं 'कॅरावॅन'नं आपल्या कव्हर स्टोरीत म्हटलंय. त्यांनी या संभाषणांच्या दोन टेपही जाहीर केल्यात. त्यानुसार, जुलै २००५ मध्ये सुनील जोशी, रा. स्व. संघाचे नेते मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार यांनी शबरी धाम (गुजरात) इथं असीमानंदांची भेट घेतली होती. त्यावेळी देशात बॉम्बस्फोट घडवून मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा कट जोशींनी भागवतांना सांगितला होता आणि त्यांनी स्फोटांना समर्थनही दिलं होतं. रा. स्व. संघ स्वतः या स्फोटांमध्ये सहभागी होणार नाही, पण असीमानंद यांनी यात पुढाकार घेतल्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं वचनच भागवतांनी दिल्याचं असीमानंदांनी मुलाखतीत सांगितल्याचा दावा मॅगझिननं केला आहे.

    * सुशीलकुमारांनी वाढवला संशय

    'कॅरावॅन'च्या या दाव्यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. असीमानंदांच्या दाव्यात तथ्य असू शकतं, असं सूचक विधान करून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संघाभोवतीचा संशय अधिकच वाढवलाय. दुसरीकडे, बसपच्या नेत्या मायावती यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

    संघाने आरोप फेटाळले

    अर्थात, स्वामी असीमानंद यांनी कॅरावॅनला अशी कुठलीही मुलाखत दिली नसल्याचं स्पष्टीकरण त्यांच्या वकिलांनी दिलंय. तसंच, संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी भागवतांवरील आरोप फेटाळलेत. या प्रकरणाशी संघाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी नमूद केलंय.

    दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या असतानाच हे सगळं संशयास्पद प्रकरण समोर आल्यानं राजकारण ढवळून निघणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. काँग्रेस मधली रा. स्व. संघ विचाराचे लोकच बॉम्ब स्फोट तपासाला मुद्धामहून विलंब लावीत आहेत काय? ते बॉम्ब स्फोट कोणी केले हे सूर्य प्रकाशा एवढे स्पष्ट आहे, मग तपासाला वेग का बरे येत नाही?

      सुशील जोशी

      Delete
  11. समझौता एक्स्प्रेससह इतर स्फोटांना मोहन भागवतांची परवानगी?


    समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे घडविण्यात आलेल्या स्फोटांना सरसंघचालक मोहन भागवत यांची परवानगी होती, असा खळबळजनक आरोप या तिन्ही स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केला असल्याचे एका नियतकालिकाने म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
    'द कॅरावॅन' नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत असीमानंद यांनी भागवत यांच्यावर आरोप केले आहेत. भागवत हे त्यावेळी संघाचे सरचिटणीस होते. स्फोट घडवले गेले पाहिजेत. मात्र, तुम्ही संघाशी त्याचा संबंध जोडू नका, असे भागवत यांनी आपल्याला त्यावेळी सांगितल्याचे असीमानंद यांनी म्हटले आहे. असीमानंद हे सध्या अंबाला येथील कारागृहात आहेत.
    नियतकालिकामध्ये करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी म्हटले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.

      Delete
  12. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि संघटना विषारी विचारावर उभी राहिलेली संस्था आहे ,जिचे बीज विषाचे आहे तिची फळे हि विषारीच असणार ,या देशाचे दुर्भाग्य असे कि जी कॉंग्रेस लोकांच्या चळवळी मधून उभी राहिली जिचा सामान्य माणूस हा चाहता होता तिचा उत्तरोतर सत्तेच्या उबेमुळे ऱ्हास होत गेला, सर्व समावेशक पुरोगामी विचाराचा राष्ट्रीय पातळीवर कोणी दुसरा पक्ष निर्माण झाला नाही.

    अदिती.

    ReplyDelete
  13. संघाचा छुपा पाठींबा असल्याशिवाय हे शक्य नाही. असीमानम्द उगाचच कशाला त्यांचे नाव घेईल? सावरकरानी नथुरामला शिवाजी पार्क येथील त्यांच्या घरात गान्धी हत्येच्या आधी काही दिवस भेटून 'यशस्वी भव' म्हणून आशीर्वाद दिला होता. हा पण तसाच प्रकार दिसतोय. संघाच्या मुखंदाना पुराव्यासकट पकडणे म्हणजे कर्मकथीन काम असते.

    नितीन थत्ते

    ReplyDelete
  14. रा. स्व. संघ आणि विध्वंस

    एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.

    □ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.

    □ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.

    □ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार.

    □ रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.

    □ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.

    □ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

    □ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.

    प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)

    ReplyDelete
  15. संघाला लोकशाही अमान्य: संघाच्या कार्यकर्त्यांची, अधिका-यांची निवड कशी होते? जे कार्यकर्ते संघात काम करतात त्याना चांगल्या प्रकारे माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. संघात कुठल्याही कार्यकर्त्याची वा अधिका-याची निवड लोकशाही पद्धतीने होते नाह तर थेट नेमणूक होते. अगदी सरसंघचालकासारख्या सर्वोच्चपदासाठी सुद्धा संघात निवडणूक होत नाही तर थेट नेमणूक होते. कुणी म्हणेल ही आमची अंतर्गत बाब आहे, तुम्हाला काय त्याच्याशी? पण ही अंतर्गत बाबच संघाला लोकशाहीचा कसा तिटकारा आहे हे अधोरेखीत करुन जाते. संघाला कार्यकर्त्यांद्वारे निवडून आणलेला सरसंघचालक नको असतो, तर नेमलेला एका विशिष्ट गटातला माणूस हवा असतो. का? सोप्प...लोकशाही विरोधी मनोवृत्ती. थोडक्यात संघाचा लोकशाहीला तीव्र विरोध असून संघ ही हुकूमशाही मनोवृत्तीची संघटना आहे. अन्यथा त्यानी लोकशाही पद्धतीने सरसंघचालक निवडला असता.

    गजोधर

    ReplyDelete
  16. संघ आणि संघाचे सेवक जर इतके राष्ट्रभक्त असते तर त्यांनी सैन्य जोइन केल असत, संघाचे किती लोक पुढे अमेरिकीत न जाता सैन्यात जातात हा खरच संशोधनाचा विषय असेल, राहील प्रश्न मदत कार्याचा, तर रस्त्याच्या कडेला उभे राहून पाण्याच्या बाटल्या वाटण्याच्या पलीकडे ते जास्त काही करत नाहीत हा माझा अनुभव आहे, भूज मध्ये सडलेली प्रेत उचलायला विंनती करून देखील एक सुधा संघातला जवळ यायचा नाही, नाकाला रुमाल बधून फोटो काढत बसायचे. राहिला प्रश्न उत्तराखंडचा तर तिथे दुर्गम भागात मदत कार्य फक्त सैनिक करू शकतात संघाचे लोक त्यासाठी ट्रेन नाही हे लक्षात घ्या.

    ReplyDelete
  17. मी सहमत आहे., जे संघात जातात तेथे त्यांच्यावर सुरुवातीला फार वेगळे संस्कार करतात प्रथम त्याना काबीज केले जाते, आणि मग सुरू होतो सगळा खेळ, आत्ता तर मोदिच व संघाचा तोच प्रचार चालू आहे, की जसे आमच्या हातात सत्ता जर दिली नाही तर भारतात अराजक्ता च माजेल, हिंदू हा हिंदू राहनरच नाही, अरे हे संघा वाले ह्या ट्रेन केलेल्या च्या खांद्यावर बंदुका तेयून पडद्यच्या मागून गोळ्या झडतात, जसे की मधे 3 मुळे असावित हा फतवा काढला आणि याच्या तील सर्वाना 1 च मूल काहींची लग्नेच झालेली नाहीत. असेच सारे काही.

    -अतुल

    ReplyDelete
  18. हे काँग्रेस आणि भाजप यांचे साटे-लोटे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नांदेड, मालेगाव, अजमेर, तसेच समझौता Express बॉम्ब स्फोट हे कोणी घडवून आणले हे दोघांना पक्के माहित आहे, परंतु तातडीने तपास करून RSS च्या मुसक्या आवळायला सध्याचे सरकार का कचरत आहे हेच समजत नाही. काँग्रेस सरकार मुद्दामच RSS ला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे हे उघड आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे कि काँग्रेस मध्ये सुद्धा हि RSS ची पिलावळ अस्तित्वात आहे म्हणूनच ते त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. खरे सत्य बाहेर येवूद्या. राजकारण करणे आतातरी थांबवा आणि या बॉम्ब स्फोटात सहभागी असलेल्या RSS वादी / RSS प्रणीत संघटनांचा त्वरित बंदोबस्त करावा.

    अद्वैत कुलकर्णी, ठाणे.

    ReplyDelete
    Replies
    1. पूर्णपणे सहमत.

      जिज्ञासा

      Delete
  19. "सातवाहन: प्राकृत आणि संस्कृत!" वगैरे बस करा.

    संजयजी, आता इतिहासातले तात्पुरते सोडून द्या आणि चालू घडामोडींवर लिहायला चालू करा!

    अद्वैत कुलकर्णी, ठाणे.


    ReplyDelete
    Replies
    1. अरे अद्वैत ,
      मला एक सांग ,तुझे वय किती ? आणि तुला इतका त्रास का होतोय ?अरे बाळ हे सगळे ठरलेलेच आहे ! अगदी म गांधींचे विचार पाहिले तर काय दिसते ?" हिंदुस्तानचे तुकडे करू नका , आणि हवे असल्यास ब्या .जीनाना एकसंध हिंदुस्तानचे पहिले पंत प्रधान बनवा " हे त्यांचे म्हणणे होते !
      म्हणजे थोडक्यात काय ?तर एकसंध भारत हे गांधीजींचे पण स्वप्न होते हे लक्षात घेतले पाहिजे !
      संघाचे पण तेच स्वप्न होते किंवा आहे !
      इंग्रजाना मात्र वाटले की भारत एक राहू शकणार नाही - म्हणून आत्ताचा जो भारत आहे त्याला या मागासलेल्या टोळीवाल्या मुसलमानांकडून वेगळे करणे हे योग्य !
      मागेच मी या ब्लोगवर असे वाचले होते की बंगाल काश्मीर पंजाब अशा मजबूत संस्कृती असलेल्या प्रांतांमुळे असे होऊ शकते की काही वर्षांनी त्यांचीच वेगळ्या
      राष्ट्राची मागणी सुरु होईल ( खलिस्तान ची आठवण कर )काश्मीर मध्ये असेच थोडेसे आहे - याची तर गम्मतच आहे एकप्रकारे -हा प्रांत हिंदू राजाने विकत घेऊन आपले राज्य स्थापन केल्याचे मला स्मरते -त्यांनी एकत्रितपणे पाकव्याप्त काश्मीर आणि इथला उर्वरीत काश्मीर असा स्वतंत्र देश अपेक्षिला तर ?ते म्हणू शकतात - आम्हाला स्वतंत्र अस्मिता आहे - इंग्रजांनी एक हिंदू राजाला आमचा देश विकला आणि आम्ही त्याचे गुलाम झालो !
      बंगालचे पण तसेच आहे दोन धर्मात जर याचे तुकडे झाले नाहीत तर तो उद्या संपूर्ण बांगला अस्मितेचा देश बनेल - मग समजा असेच तामिळ जनतेने म्हटले आणि मराठी जनतेने पण म्हटले तर उरले काय ?नुसतेच शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा आपण काय राजकीय व्यवस्था जगात आहोत ते बघुया !माझ्यामते आपण कृत्रिम राजकीय व्यवस्था जगात आहोत का ? कारण निधर्मीपणा आणि एक राष्ट्र या कल्पना मेळ खात नाहीत ! एकदा का आपण आपली संस्कृती सांगायला लागलो तर त्याची सुरवात वैदिक अवैदिक , बौद्ध , अनेक आपापसातील लढाया आणि आक्रमणे , अशीच करावी लागते - आर्य अनार्य हा अजून एक वेगळा विषय !त्यातील पहिला मुसलमान येइपर्यन्तचा एक भाग आणि मुसलमानी कारभार हा दुसरा भाग - आणि इंग्रजांचा तिसरा - म्हणजेच आपण कधीकाळी सर्व हिंदू असताना सुद्धा आपापसात युद्धे होतच होती , रक्ताचे पात वहातच होते ,वैदिक आणि शैव अशा लढाया होताच होत्या - बौद्ध आणि हिंदू संघर्ष होताच - हे सर्व पाहिल्यावर असे दिसते की छोटी ग्राम्राज्ये , मध्यम राज्ये आणि साम्राज्ये अशा चक्रातून भारत गेला आणि त्यातून अनेक सत्ता इथे आल्या आणि गेल्या !बाहेरून मुसलमान आले हे नक्की ! इंग्रज आले बाहेरून हेपण नक्की !आर्य ? चर्चा चालू आहेत - संजय सर त्यावर अभ्यास करून लिहित असतात - त्यांना टीकेचे लक्ष बनवणे चुकीचे आहे ! संशोधन आणि त्यावर आधारलेले निर्णय हे नेहमीच काळाच्या ओघात बदलू शकतात ! आपण नवीन संशोधन मांडावे त्याचे संजय सराना अप्रूप आहेच ! पण ज्यांनी तुमची मते मोकळेपणे मांडायला मोकळीक दिली त्यांनाच असे गुरकावणे हे कोणत्या सभ्यतेत बसते ते तू अद्वैत जरा मोकळेपणे सांगशील का ?

      Delete
    2. @अमृता विस्वरुप,

      किती बिघडली आहेस? काय हा अवतार बनवून घेतला आहेस? स्वतःला काय ८० वर्षाची आजीबाई समजतेस कि काय? वयाचा आणि विचाराचा काहीही संबंध नसतो. उगीच डोके फिरल्या सारखा संबंध लावू नकोस. माझे वयच तुला हवे असेल तर सांगतो तुझ्या बापापेक्षा ११ वर्षांनी जास्त, बस! झाले समाधान. तुझा बकवास इतिहास ऐकण्यात कोणालाही रस नाही.

      अद्वैत कुलकर्णी, ठाणे.

      Delete
    3. AMRUTA VISHVARUP February 6, 2014 at 10:27 PM

      तुझ्या पोटात का गोळा उठला आहे, ते तरी सांग!

      Delete
    4. अमृता का बहकली आहेस?

      समीर, अटाळी-कल्याण

      Delete
    5. संजय सर सांगा जरा या मुलाना !
      या ठाणे कल्याण च्या लोकांच्या तोंडी लागणे टाळले पाहिजे ;फार बोलतात आपल्या दादरची सर कशालाच नाही ,बालमोहनचे संस्कार आणि ठाणे मुलुंड कल्याणची उघडी गटारे यांची कशी तुलना होणार ?
      काय रे अद्वैत तू काय वडा पाव ची गाडी चालवतोस का - मग अशी का रे भाषा तुझी ?
      तसे नसेल तर नक्कीच त्या उद्धवच्या किंवा राज च्या नादी लागलेला दिसतो आहेस
      अरे आता शिवसेनेत आपल्याला कोणी विचारणारे नाही ,
      जोशी सरांचे काय हाल चालले आहेत बघ ना !
      तुला जर दुखल खुपल तर जरूर सांग , तुझे बाबा काय करतात ? फोरास रोडला टपरी आहे पानाची ?
      कष्ट करतात ना , मग ठीक आहे ! आता आई काय करते ते मात्र मी नाही विचारत ! समीर तिला सुखात ठेव रे बाबा ! अद्वैतची कशी का असेना आई आहे ती ! आणि लब्बाडा मी काय तुला ८० वर्षांची वाटते काय रे ? माझा बाप पण तेव्हडा नाही - तू माझा बाप काढलास - असे करू नये मित्त्रा ! माझे ऐक ! तुझे भले व्हावे असे वाटते न तुला ? उगी उगी ,घाबरू नकोस !कुलकर्णी ना तू , बोरुघाशी खर्डेघाशी करणारे तुमचे खानदान !असूदे ,तू खूप लहान आहेस माझ्या नातवा सारखा
      लहान मुलाची सावलीपण मोठी होते मावळतीला !
      आमचा अद्वैत आणि समीर भारी खट्याळ !

      Delete
    6. @अमृता विस्वरुप,

      "दादरची सर कशालाच नाही ,बालमोहनचे संस्कार आणि ठाणे मुलुंड कल्याणची उघडी गटारे यांची कशी तुलना होणार?

      "तुझे बाबा काय करतात ? फोरास रोडला टपरी आहे पानाची ?"

      "अद्वैतची कशी का असेना आई आहे ती !"

      "कुलकर्णी ना तू , बोरुघाशी खर्डेघाशी करणारे तुमचे खानदान !असूदे ,तू खूप लहान आहेस माझ्या नातवा सारखा "

      अमृता, वरील तूच लिहिलेली अवतरणे बघ, याच्यावरून हेच सिद्ध होते कि तू स्वतःचीच मानसिक दिवाळखोरी जाहीर केली आहेस! हीच ती भडक लक्षणे आहेत.

      जर स्वतःला सांभाळ, उगीच तोल ढळू देऊ नकोस! तुलाच त्रास होईल, सुधारायचे आहे ना तुला? मग तुला असले बालिश, वायफळ, अर्वाच्च, टिंगल-टवाळी वाले लिखाण बंद करायलाच हवे, नाही काय?
      तुझ्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा!

      अद्वैत कुलकर्णी, ठाणे.

      Delete
    7. ""सातवाहन: प्राकृत आणि संस्कृत!" वगैरे बस करा.

      संजयजी, आता इतिहासातले तात्पुरते सोडून द्या आणि चालू घडामोडींवर लिहायला चालू करा!

      अद्वैत कुलकर्णी, ठाणे."

      यांनी असे लिहिल्यावर अमृता विश्वरुपला सोनवणी यांचा एवढा पुळका येण्याची गरजच नव्हती! उगीच भलताच फापट-पसारा लिहित बसली, वेंधळ्या प्रमाणे! जाऊ दे,
      "विनाशकाले विपरीत बुद्धी" नाहीतर काय?

      आकाश, वाशी.

      Delete
    8. अमृता विस्वरुप हि व्यक्ती बाई नसून बाईल्या आहे, असे स्पष्ट दिसत आहे!

      समीर.

      Delete
    9. तुम्ही सुद्धा अचूक ओळखले राव. माझा पण तोच कयास होता.
      अमृताच्या बापाचे रस्त्याच्या कडेला खाटीकाचेच दुकान (VISHWARUP MATAN SHOP) असल्याची शक्यता जास्त आहे. लिखाणावरून आणि विचारांवरून असेच वाटते आहे.

      प्रमोद जाधव

      Delete
    10. "ठाणे मुलुंड कल्याणची उघडी गटारे"

      अशा शब्दात ठाणेकर-कल्याणकर यांच्या संदर्भात खट्याळ लिखाण करणाऱ्या आणि दादरचे गुणगान गाणाऱ्या अमृताचा जाहीर निषेध!

      ठाणेकर-कल्याणकर-मुलुंडकर.

      Delete
    11. अमृता विश्वरूप हा स्त्री आहे का पुरुष माहित नाही ,
      अमृत असेल तर पुरुष आणि अमृता असेल तर स्त्री
      त्यामुळे अद्वैत कुलकर्णीला कसे माहित असणार ? पण तरीही विश्वरूप हे कधीच ऐकलेले आडनाव नाही ,त्यामुळे हे नाव कृत्रिम असावे पण कसेही असले अतरॆहि त्यांनीपण अतिशय व्रात्य शब्दात प्रत्युत्तर दिले आहे आणि त्याचापण निषेध केला पाहिजे असे सांगण्यासाठीच हे लिहावे लागत आहे

      अमृता खाडिलकर

      Delete
  20. मानवाच्या किंवा सर्व जनावरांच्या विचार प्रणालीत एकच भावना कोटी कोटी वर्षे अधोरेखित झालेली दिसते ती म्हणजे बळी तो कान पिळी ! ,
    प्रत्येक प्राणी वंश ,जनावरे आणि माणूस ,आपण वरचढ असण्याचा मुद्दा सिद्ध करण्याचा अतोनात प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच आपले श्रेष्ठत्व किंवा दुसऱ्याचे नीचत्व सिद्ध करताना त्यामागे , प्रादेशिक बाबिंसकट इतर अनेक गोष्टींचा त्याच्या अस्तित्वाशी संबंध जोडला जातो त्यातून आपली ताकद दाखवताना आणि दुसऱ्या ची पराभूत मनोवृत्ती जाहीर करण्याची नैसर्गिक वृत्ती ही सर्व पशूना आणि माणसाना एकेका वर्गवारीत ढकलत असते निरनिराळे प्राणी जसे आपली शिकारीची आणि वहिवाटीची हद्द आखून व्यवहार सांभाळत असतात , तसेच मानवी गट समुहातही घडताना दिसते ,
    आदिवासी जमातीत लग्न जुळताना याचे विशेष प्रत्यंतर येते
    वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या प्रथा आणि पायंडे पडलेले दिसतात ,सूक्ष्म निरीक्षणाने ते पायंडे प्राणी आणि पक्षी यामध्ये पण आढळतात !
    दोन भटके मानवी समूह प्रथम प्रसंगोपात एकमेकासमोर आले असतील त्यावेळेस एकमेकाची ताकद अजमावण्याचे प्रकार झाले असणारच आणि मग जेता वर्ग आपल्या पद्धतीने प्रसंग हाताळताना टोळीच्या गरजा आणि विस्तार यांचा विचार करताना आपल्या अटीनुसार जेत्याना वागवत असणारच !
    राजा आणि प्रजा आले की पुरोहित वर्ग निर्माण होतो , कारण राजा हे पदच नैसर्गिक नाही !
    राजा हा प्रकारच अन्यायाकारक आहे !
    त्यातूनच अनेक जाती निर्माण झाल्या असणार ! गुलामांचे गट विभाजन झाले असणार !
    दुसरी बाजू म्हणजे वर्षानुवर्षे एकच उद्योग पिढीजात सांभाळला गेल्याने जातीनिश्चीती झाली त्यातून कलाकुसरीने आपले महत्व सिद्ध करणारे होतेच - धातुकाम , सोनार लोहार , शेती , गोपालन , औषधे आणि शिंपीकाम असे अनेक वर्ग ! त्यात टोळीचे रीतीरिवाज ठरवणारे आणि ते हाताळणारे निर्माण झाले - संकट म्हणजे कुणाचा तरी प्रकोप हि भावना आली आणि तो प्रकोप दूर करणारे , मांत्रिक तांत्रिक आले -तात्पर्य , समाजाला त्यांची गरज होती म्हणून ते निर्माण झाले ,समाजाला ज्याची गरज नाही ते नष्टच झाले पाहिजेत - होणारच - मग ते मांत्रिक असोत वा ब्राह्मण !

    ब्रह्म जाणण्याची गरजच उरली नसेल तर ? ब्राह्मणाच्या अस्तित्वालाच अर्थ नाही - उलट त्यांनीच काळाची पावले ओळखून आपली जीवन पद्धती बदलली पाहिजे ! आणि तेच इतिहासात झाले -
    कधी अपघाताने , योगायोगाने तर कधी समजून उमजून !
    पौरोहित्य सोडून ब्राह्मण क्षत्रीय बनले , वैद्य बनले शिल्पकार बनले , वादक झाले , लेखक , नाटककार कलाकार नकलाकार झाले -पण हीच मोकळीक त्यांनी इतर वर्गाना दिली नाही आणि वाद वाढत गेले - एकेकाळच्या पराभूत वर्गाला हा अन्याय वाटत गेला आणि वर्ग विद्रोह वाढत गेला -
    हे जगभर कमी अधिक प्रमाणात सर्वत्र दिसते -फक्त भारतीय किंवा हिंदूंचाच हा मुद्दा नाही !
    प्रागतिक विचार सरणीनी आता सर्व बदलत चालले आहे !
    जागातीकीकरणाने तर प्रचंड बदल घडत आहेत !
    आपण सर्वानीच चिंतन करूया !
    वृंदा गुप्ते

    ReplyDelete
  21. मराठा अस्मितेचे खांदे प्रसारक डॉ जयसिंगराव पवार यांनीसुद्धा असेच मत बदलले आहे
    एम ए च्या च्या क्रमिक पुस्तकात ( मराठी सत्तेचा उदय : डॉ जयसिंगराव पवार )१९७७ साली लिहितात की दादाजी कोंडदेव शिवरायाचे गुरु होते !
    त्यांचे मत बदलले ते
    परमानन्दाचे " शिवभारत " मुळे असे ते सांगतात ,पण हे शिवभारत तर फार पूर्वीपासून उपलब्ध होते , एम ए च्या वेळीही आणि चौथीच्या वेळेसही !मग डॉ जयसिंगराव यांनी नव्याने अभ्यास तो काय केला ? आणि एम ए चे पुस्तक लिहिताना त्यांनी अर्धवट अभ्यास करून एम ए चे पुस्तक लिहिले असे समजायचे काय ?
    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने मराठा कालखंड भाग १ शिवकाल १६३० ते १७०७ हा ग्रंथ डॉ वि गो खोबरेकर एम ए पी एच डी यांनी लिहिला असून त्यात दादोजी कोंडदेवाने प्रथम पंढरीची शांत करून गावावरून सोन्याचा नांगर फिरवला - - शिवाजीराजे यांचे शिक्षण व जहागीरीची
    व्यवस्था पाहून शहाजीराजे संतोष पावले आणि त्यांनी दादोजीस त्याबद्दल बक्षिसे पोशाख आणि तनखावाढ ७०० होन इतकी केली आणि दादोजींचा गौरव केला
    डॉ जयसिंगराव यांनी जर (मराठी विश्वकोश खंड ७ प्रथम प्रकाशन १९७७ पृष्ठ ७०० कमाल गोखले )वाचला असता तर दादोजी यांच्या वरील अन्याय्य मते बनली नसती त्यांनी तो अजूनही वाचवा कारण संशोधन ही अखंड प्रक्रिया आहे
    डॉ जयसिंगराव पवार यावर आपली बहुमुल्य टिपण्णी करतील का ?
    अनुजा ठोमरे

    ReplyDelete
  22. प्रसिद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी ,
    " इतिहास लिहिण्याची एक पद्धत असते इतिहास लिहिण्यामागे सत्य शोधण्याशिवाय अन्य कोणताही हेतू असता कामा नये सध्या शालेय क्रमिक पाठ्य पुस्तकातून इतिहास चुकीच्या मार्गाने शिकवला जातो . आक्रमकांचा सत्य इतिहास झाकून टाकून देशाच्या संस्कृतीच्या शत्रूंना राष्ट्रपुरुष ठरवण्याचे काम सरकारी प्रोत्साहनाने होत असून छ शिवाजी महाराजाना ठार मारण्यासाठी आलेल्या अफझुल खानापासून टिपू सुलताना पर्यंत सर्वांचा इतिहास दडपण्याचे काम स्वातंत्र्यानंतर सतत चालू आहे
    इंग्रजांचे राज्य संपले परंतु इंग्रजांनी देश दुबळा व्हावा म्हणून समाजाची जातिजातीत विभागणी करून भांडणे लावली आपल्या आजच्या राजकारण्यानीही ती परंपरा तशीच पुढे चालू ठेवली आहे त्यामुळे भावी पिढीला सत्य सांगण्याचे काम पुराव्यासह केले पाहिजे "
    ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक श्री एम एल भैरप्पा यांनी पंढरपूर येथे केलेल्या भाषणातून - दि . २२ जानेवारी २०१३
    भोगीलाल पांडे

    ReplyDelete
  23. सर्वजण एकमेकाना सामील आहेत नक्षलवाद निर्मितीचे हेच खरेतर कारण आहे

    ReplyDelete
  24. चीन किंवा इतर शक्तींनी प्रत्यक्ष आपला देश जिंकला नाही ही आपल्यावर कृपा आहे
    आजच्या काळात तसे घडणारही नाही
    पण चीनने ते तसे दाखवून दिले आहे
    सर्व लगतचे देश आपल्याविरुद्धच असतात म्हणजे त्याना कुणीतरी भडकवत असते

    सात वाहनाच्या काळात कुणीतरी आठवाहन त्याना भडकवत असेल का ?

    ज्योतिबा १२ वर्षाचे असताना त्यांचा आणि सावित्रीबाई यांचा बालविवाह झाला होता
    शिवाजी महाराज यांचा विवाह १० व्या वर्षी सईबाईशी झाला याचा अर्थ असा नव्हे की
    यांचा बाल विवाहाला पाठींबा होता !
    आपल्याकडे आजकाल पुरावे देत असताना कोणत्याही मुद्द्यातुन कोणताही अर्थ काढतात !
    त्या काळात जसा धर्माचा प्रभाव असेल त्या प्रमाणे धार्मिक वातावरण असणार खरेतर म फुले किंवा शिवाजी यांनी बालविवाह केला हा मुद्दा अतिशय मूर्खपणाचा ठरेल कारण धार्मिक चालीरीती प्रमाणेच राजे किंवा सामान्य लोकाना वागावे लागत असे
    पण आजकाल अत्यंत विचित्रपणे कोणताही मुद्दा कशासाठीही वापरला जातो !
    अनेकांनी राजर्षी शाहू महाराजांवर इंग्रज धार्जिणे असल्याचा आरोप केला होता परंतु शाहू कालखंडाच्या अभ्यासिका डॉ मंजुश्री पवार याना नवीन ऐतिहासिक पुरावे मिळाले आहेत .रा शाहू महाराज आणि सशस्त्र क्रांतीकारकांचे संबंध उघड करणारी ६ अस्सल कागदपत्रे मिळाली आहेत त्यामुळे रा महाराजांच्या वरील एक ठपका आता पुसला जाऊ शकतो !
    परंतु डॉ जयसिंग राव पवार यांनी मात्र चौथीच्या पाठ्य पुस्तकात " शिवराय तुकोबांच्या कीर्तनाला जात असत " असली विधाने छापली आहेत आणि दादोजी कोंडदेव यांच्या बाबत एक प्रकारे जुनेच लिखाण नव्याने सापडल्याचा आव आणून घुसडून नवी माहिती उजेडात आणल्याचा बहाणा केला आहे दादोजी कोंडदेव यांच्यावर डॉ जयसिंगराव पवार यांनी अन्याय केला आहे
    अशाप्रकारे जगात दुष्ट लोक असतात त्याना खरे संशोधनाचे कार्य करायचेच नसते तर त्यातून दुसरेच काहीतरी साधायचे असते
    भीमराव हिंगमिरे

    ReplyDelete
  25. 'कॅरावॅन'ला धमकीचे फोन!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना गोत्यात आणणारी असीमानंद यांची मुलाखत छापणाऱ्या 'कॅरावॅन' या मॅगझीनच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयामध्ये धमकीचे फोन खणखणत असून या दोन्ही कार्यालयांना आज आंदोलकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, 'कॅरावॅन'च्या कार्यालयांना पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.

    मालेगाव आणि समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची मोहन भागवत यांना पूर्ण कल्पना होती, असा दावा बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अंबाला सेंट्रल जेलमध्ये असलेल्या असीमानंद यांच्या मुलाखतीत करण्यात आला आहे. याप्रकरणी एकीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशीची तयारी सुरू केली असताना 'कॅरावॅन'ला मात्र आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

    'कॅरावॅन'च्या कार्यालयांमध्ये आज अज्ञात व्यक्तींनी धमकीचे फोन केले. सकाळी १० च्या सुमारास पहिला फोन मुंबई कार्यालयात आला. मुलाखतीबाबत जाब विचारतानाच ही व्यक्ती 'आम्ही येतोय', असे धमकीच्या स्वरात म्हणाली. त्यानंतर दुपारी मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयांवर शंभरेक जणांचा जमाव चालून आला. याबाबत आम्ही तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, असे मॅगझीनचे कार्यकारी संपादक विनोद के जोस यांनी सांगितले.

    मुलाखतीतील शब्द न् शब्द असीमानंदांचा!

    असीमानंद यांनी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही असे स्पष्टीकरण त्यांच्या वकिलांनी दिलेले असले तरी 'कॅरावॅन' मात्र प्रसिद्ध झालेल्या मजकूरावर ठाम आहे. आमच्याकडे असीमानंद यांच्याशी झालेल्या संवादाची ९ तासांची टेप आहे. कोणत्याही प्रकारचे स्टिंग न करता रितसर कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन तसेच असीमानंद यांच्या संमतीनेच ही मुलाखत घेण्यात आलेली आहे, असेही जोस यांनी ठासून सांगितले. हे वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. यांच्या कडून अजून काहीही अपेक्षा नव्हती.
      RSS's modus operandi !

      Delete
    2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि संघटना विषारी विचारावर उभी राहिलेली संस्था आहे ,जिचे बीज विषाचे आहे तिची फळे हि विषारीच असणार ,या देशाचे दुर्भाग्य असे कि जी कॉंग्रेस लोकांच्या चळवळी मधून उभी राहिली जिचा सामान्य माणूस हा चाहता होता तिचा उत्तरोतर सत्तेच्या उबेमुळे ऱ्हास होत गेला, सर्व समावेशक पुरोगामी विचाराचा राष्ट्रीय पातळीवर कोणी दुसरा पक्ष निर्माण झाला नाही.

      अदिती.

      Delete
  26. संघाने केलेली कपटी कारस्थाने जाणून घ्यायची असल्यास खालील पुस्तके वाचा:

    १. संघाचा बुरखा, लेखक- मुकुंद शिंत्रे.
    २. संघाचा असली चेहरा, लेखक- भाई वैद्य.
    ३. एक होता कारसेवक, लेखक- अभिजित देशपांडे.

    ReplyDelete
    Replies
    1. हि पुस्तके BOOKGANGA.COM वरती उपलब्ध आहेत.

      Delete
  27. अद्वैत कुलकर्णी ,
    अरेरे ,
    कितीही फजिती
    थोडीशी सभ्यता दाखवली असतीस तर असे प्रसंग टाळता येतात
    कुणाचा बाप किती वयाचा आहे हे तुला सांगायची गरज नाही
    आणि बाई माणसाला तर अजिबात असे बोलू नये !
    निषेध व्यक्त करायला अनेक मार्ग आहेत !
    तुझी मात्र लाज निघाली
    असे परत करू नकोस ,तुझ्या सारख्या ब्राह्मणाला ते शोभूनही दिसत नाही
    त्या समीर घाटगे ला पण सांग

    ReplyDelete
    Replies
    1. @pratibha pratima February 8, 2014 at 7:20 AM

      अमृता विश्वरुपची सख्खी बहिण? हा, हा, हा ssssssssss

      Delete
  28. ब्राह्मण असून एखाद्या स्त्रीचे असे या ब्लोगवर अवमुल्यन केल्याचा प्रयत्न केल्या बद्दल आम्ही अद्वैत कुलकर्णीचा निषेध करतो आणि त्याच्या आई वडीलाना विनंती करतो की यापुढे त्याला योग्य मार्गदर्शन करा आणि अशा ब्लोगवर कसे लिखाण करायचे ते जरा शिका दादरचे शिवाजी पार्क महिला मंडळ


    अरे अद्वैता ,
    जरा ऐक ,

    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
    प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्
    समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३
    भारत माता की जय ।।

    ReplyDelete
    Replies
    1. अवमुल्यन (?) वगैरे काहीही नाही, अशा लोकांना (बोगस नावाने लिहिणाऱ्या) यापेक्षाही तीव्र / कडक शब्दात खडसवायला हवे होते!

      समीर, अटाळी- कल्याण.

      Delete
  29. संजय सर ,
    आम्हाला अनेक फोन आले आणि आम्हाला फारच वाईट वाटले
    अद्वैतने असे लिहायला नको होते
    अमृता विश्वरूप हा स्त्री आहे का पुरुष माहित नाही ,
    अमृत असेल तर पुरुष आणि अमृता असेल तर स्त्री
    त्यामुळे अद्वैत कुलकर्णीला कसे माहित असणार ? पण तरीही विश्वरूप हे कधीच ऐकलेले आडनाव नाही ,त्यामुळे हे नाव कृत्रिम असावे पण कसेही असले अतरॆहि त्यांनीपण अतिशय व्रात्य शब्दात प्रत्युत्तर दिले आहे आणि त्याचापण निषेध केला पाहिजे असे सांगण्यासाठीच हे लिहावे लागत आहे
    अमृता खाडिलकर

    ReplyDelete
  30. @अमृता विस्वरुप,

    "दादरची सर कशालाच नाही ,बालमोहनचे संस्कार आणि ठाणे मुलुंड कल्याणची उघडी गटारे यांची कशी तुलना होणार?

    "तुझे बाबा काय करतात ? फोरास रोडला टपरी आहे पानाची ?"

    "अद्वैतची कशी का असेना आई आहे ती !"

    "कुलकर्णी ना तू , बोरुघाशी खर्डेघाशी करणारे तुमचे खानदान !असूदे ,तू खूप लहान आहेस माझ्या नातवा सारखा "

    अमृता, वरील तूच लिहिलेली अवतरणे बघ, याच्यावरून हेच सिद्ध होते कि तू स्वतःचीच मानसिक दिवाळखोरी जाहीर केली आहेस! हीच ती भडक लक्षणे आहेत.

    जर स्वतःला सांभाळ, उगीच तोल ढळू देऊ नकोस! तुलाच त्रास होईल, सुधारायचे आहे ना तुला? मग तुला असले बालिश, वायफळ, अर्वाच्च, टिंगल-टवाळी वाले लिखाण बंद करायलाच हवे, नाही काय?
    तुझ्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा!

    अद्वैत कुलकर्णी, ठाणे.

    ReplyDelete
  31. RSS च्या विचाराने गांधींना मारलं!

    महात्मा गांधींच्या मृत्यू मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच विचार धारा होती, असा हल्ला चढवत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि संघाला लक्ष्य केले. इतकेच नाही तर गांधी हत्येनंतर सरदार पटेल हे संघावर बंदी आणणार होते, असा उल्लेख त्यांनी आपल्या बार्डोली येथे आयोजित सभेच्यावेळी केला.

    गुजरातच्या बार्डोली भागात आज राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेच्यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव घेता त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली. काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की काँग्रेस हा केवळ पक्ष नसून विचारधारा आहे, असा टोलाही राहुल यांनी या वेळी लगावला.

    सरदार पटेल आणि गांधीजी आमच्या हृदयात राहातात आणि त्यांची विचारधारा आमच्या डोक्यात आहे. त्याचा दिखावा आम्हाला कारावा लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.

    इथल्या नेत्यांना इतिहास माहित नाही, असे म्हणत त्यांनी मोदींच्या वक्तव्यातील चुकांवर टीका केली. तसेच इथे तर तुरुंगाची हवा खाल्यानंतर देखील लोकांना मंत्री बनवले जाते, असे म्हणत अमित शाहा यांच्यावर हल्लाबोल केले.

    गुजरातचा विकास हा इथल्या लोकांच्या घामातून झाला आहे, मेहनतीतून झाला आहे. कोण्या एका व्यक्तीमुळे विकास झालेला नाही, असेही राहुल म्हणाले. तसेच आम्ही प्रत्येक व्यक्तीला मानसन्मानानं वागवतो. मग तो 'चहावाला' असो किंवा अन्य कोणी. परंतु आम्ही त्यांच्यावर राजकारण करून त्यांना मूर्ख बनवत नाही, असा टोलाही राहुल यांनी लगावला.

    भाजपला जर भ्रष्टाचार संपवायचा आहे तर मग त्यांनी गुजरातमध्ये गेल्या नऊ वर्षात लोकायुक्त का नाही नेमला, असा सवाल त्यांनी यावेळी केला. काँग्रेस गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न करते मात्र हे गरीबांनाच हटवत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी मोदींचे नाव न घेता केला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

      Delete
  32. गांधीजीना कोण मारले, का मारले या गोष्टीना आता देश महत्व देत नाही. आजचे प्रश्न वेगळे आहेत. आता देश भावनिक नाही तर वास्तविक झालाय. कॉंग्रेस बरखास्त करा अस गांधीनी देश स्वातंत्र झाल्यावर सांगितल होत पण तुमच्या पणजोबानी (पंडित नेहरूनी) ते ऐकल नाही व स्वता पंतप्रधान होऊन महात्मा गांधीच्या विचाराना 60 वर्षापूर्वीच मारुन टाकल. 1984 साली कित्येक सीख लोकाना तुमच्या नेत्याने मारले त्या वेळी कोणती विचारसरणी होती तुमची. इतिहास पाठ असन म्हणजे माणूस हुशार नसतो तर खर्‍या गोष्टीच विश्लेषण देश हितासाठी करतो तो माणूस हुशार असतो. तुम्ही व तुमचा पक्ष कसा आहे ते लोकाना कळलय. बी. जे. पी. कशी आहे? आर. एस. एस. काय करते ते आता देश विसरून गेला आहे. आता फक्त एकच लक्ष कॉंग्रेस मुक्त भारत. कोण्या एकामुळे विकास होत नाही ना मग एका गांधी घारामुळे पण देश स्वातंत्र झाला नाही. मग तुम्ही का देशावर उपकार केल्यासारखे सतत बोलत रहता. गुजरात ने लोकायुक्त का नाही नेमला ते जाऊ द्या तुम्ही का लोकपाल साठी इतके नाटक केलीत.

    राहुल

    ReplyDelete
  33. राहुल गांधी हे काहीही बोलण्याआधी आपण काय बोलत आहोत याचा विचार करत नसल्याने त्यांच्या तोंडून अशीमुक्ताफळे बाहेर पडत आहेत. महात्मा गांधी यांची हत्या होऊन आज ६५ वर्षे झाली तरीही हे गांधी अजुनही त्याच महात्मा गांधींचे नाव घेऊन गलिच्छ राजकारण करत आहेत. महात्मा गांधी यांच्याबद्दल टाहो फोडणाऱ्याराहुल गांधींना सांगावेसे वाटते की महामाजींनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर खांग्रेस बरखास्त करण्याची स्पष्ट सुचनादिली होती. पण त्यांचे पणजोबा पंडीत नेहरू यांना सत्तेची प्यास असल्याने त्यांनी खांग्रेसच्या स्वातंत्र्यसंग्रामातीलसहभागाचे(?) राजकारण करून सत्तेची प्यास विझवून घेतली. आज त्यांची चौथी पिढीसुद्धामहात्मा गांधींचेच नाव घेऊन मतांचा जोगवा मागत आहे ही शरमेची बाब आहे. खांग्रेसकडे गेल्या साठ वर्षांमध्येकेलेल्या कामाचा काहीही लेखाजोखा नाही. त्यांनी जे काही पराक्रम केले आहेत ते जनतेसमोर आहेच. तेसांगण्यासारखे नसल्याने जुनेच मुद्दे उगाळणे,सांप्रदायिकतेचे तुणतुणे वाजवणे एकमेव कार्यक्रम आहे.

    शिवराम, पुणे

    ReplyDelete
    Replies
    1. मिर्ची...मिर्ची लागली...अरे कोणी पाणी द्या मोदीभक्ताना.......

      Delete
  34. महात्मा गांधी सारख्या राष्ट्र पित्याची हत्त्या करून वर संघाच्या प्रभात आरतीत त्यांनाच वंदन करायचे हे लबाड खोटे काम जगात फक्त संघच करू जाणे. बोलताना म्हणायचे आम्ही गांधी 'वध' केला, भेकाडानो वध राक्षसाचा करतात तो तर निशस्त्र भारत मातेचा पुण्यात्मा होता, आणि जो खरा राक्षस होता नथुराम त्याला खर्या 'वध स्तंभावर' चढवले. भारत मातेच्या ऐक्याच्या मुळा वर उठलेल्या संघाच्या साडेतीन टक्के घुबडानो खिशात हात घातला तर हातात येणाऱ्या कोणत्याही नोटीवर महात्माजींचेच चित्र दिसेल, हेगडेवार, गोवळकर गुरजी, देवरस, भागवत, नथुराम, सावरकर यांचे कदापि दिसणार नाही. अजूनही सुधारा वेळ्गेली नाही, खरोखरच्या भारत मातेचे पुत्र व्हा, छुपे पणाने समाजाला जाती पतीत दुभंगू नका, जागे व्हा तुम्ही म्हणता तो अखंड भारत, मनुस्मृती, चार वर्ण आता शक्य नाही, खोटी आश्वासने प्रभोलने दाखऊन समाजाची दिशाभूल करायची थांबवा. परमेश्वर वरून सर्व बघत आहे. महात्माजींची शिकवण लक्षात ठेवा 'नेहमी सत्याचा विजय होतो'......

    अंकिता (मुंबई)

    ReplyDelete
  35. हे अगदी बरोबर आहे. आर एस एस ने कधीही विधायक कामे केली नाही. सगळ्यात जास्त खोटे आर एस एस बोलते. सगळ्यात जास्त राजकारण आर एस एस करते. पण हे कधीही ते मान्य करत नाही. स्वतला नेहमी सामाजिक कामे कॅरणारी संस्था समजते. पण हे काय करतात हे सार्‍या जगाला म्हीत आहे.

    sac (kolhapur)

    ReplyDelete
  36. महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाची विचारसरणी आहे हे राहुल गांधी यांचे मत अगदी बरोब्बर आहे. इतकेच काय तर महात्माजींच्या खून खटल्यात संघ हा प्रमुख आरोपी होता हा इतिहास विसरून चालणार नाही. महात्माजींनी पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा आग्रह धरला होता म्हणून त्यांची हत्या केली असा कांगावा संघाने त्यानंतर केला होता. (फसवेगिरी आणि भामटेपणाची परंपरा जुनी आहे) पण गोडसेने गांधी यांच्यावर पहिल्यांदा हल्ला १९४५ साली केला होता (संदर्भ: विकिपीडिया तसेच इतिहासाची इतर पुस्तके) १९४५ साली कुठे पंचावन्न कोटींचा विषय होता? पण याला मात्र त्यांच्याकडे काही उत्तर नाही. मोदींना मत देणे म्हणजे वंश वर्चस्ववाद जोपासणाऱ्या संघाला सत्तेत आणण्यासारखे आहे हे सामान्य जननी विसरू नये. धार्मिक अजेंड्या खाली भेसूर वंश वर्चस्ववाद लपलेला आहे हे लक्षात ठेवा. यांच्या भूल थापांना बळी न पडता या देशाचे सेक्युलिरिझम अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.

    डी. जे., मुंबई

    ReplyDelete
  37. नग्नता आणि अश्लीलता.....

    नग्नता आणि अश्लीलता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, याचे भान प्रत्येक सुसंस्कृत समाजाला असते. तसे ते प्राचीन भारतीय समाजाला असणार. तसे ते नसते तर खजुराहोची नितांतसुंदर शिल्पे मंदिरांच्या साक्षीने उभी राहिली नसती. आता सुप्रीम कोर्टाने एका खटल्याच्या निमित्ताने पुन्हा या दोन्ही संकल्पनांचा ऊहापोह केला आहे. जगविख्यात टेनिसपटू बोरिस बेकर व त्याची तेव्हाची अभिनेत्री मैत्रीण बार्बरा फेल्टस यांचा नग्न फोटो 'स्टर्न' या जर्मन कालिकाने १९९३मध्ये प्रकाशित केला. नंतर, 'स्पोर्ट‍्सवर्ल्ड' या भारतीय कालिकाने तोच फोटो कव्हरवर पुन्हा छापला. हा देशातील अश्लीलताविरोधी कायद्याचा भंग आहे, अशी फिर्याद कोलकत्यातील एका वकिलाने केली. ती निकालात काढताना सुप्रीम कोर्टाने ज्या नग्न चित्रामुळे कामभावना चाळवल्या जात नाहीत, त्याला अश्लील म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला. बार्बरा ही कृष्णवर्णी, तर बोरिस हा श्वेतवर्णी. या दोघांच्या एकत्र येण्यातून जो संदेश द्यायचा होता, तो छायाचित्रातून दाखविण्याचे काम बार्बराच्या वडिलांनीच केले होते. अशा फोटोला 'अश्लील' ठरविणे म्हणजे, तिघांच्याही वर्णभेदविरोधी दृष्टीचा अपमान ठरला असता. सुदैवाने, सुप्रीम कोर्टाने भारतीय दंडसंहितेतील १५४ वर्षांपूर्वीची अश्लीलतेची कलमे आज लागू पडणार नाहीत, असे स्पष्ट केले. देशभरात अशा प्रकारचे अनेक खटले वारंवार उभे राहात असतात. त्यावेळी, न्यायाधीशांनी कसा विचार करायला हवा, याचेही दिग्दर्शन न्यायमूर्तींनी केले आहे. ते म्हणतात की, स्वतःला नैतिकतेचे राखणदार समजणाऱ्यांच्या भावनांचा विचार करण्याऐवजी, निकाल देताना वर्तमानकालीन मूल्ये आणि आपल्या राष्ट्रीय दंडकांचा विचार करावयास हवा. प्रत्येक नग्न शरीर हे अश्लील नसते, हे भारतीय कलावंतांना शेकडो वर्षे माहीत आहे. आजही असंख्य भारतीय चित्रकार, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि शिल्पकारांना नग्नतेतील सौंदर्य भुरळ घालते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये देशातील 'नैतिक पोलिसां'नी सर्व प्रकारच्या कलाकारांच्या मनात एक अबोध भय निर्माण केले आहे. ही कथित नैतिक दादागिरी चालणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्वच्छपणे सूचित केले आहे. भारतीय समाज सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा कसा अर्थ लावतो व त्याचा निर्मळ आदर कसा करतो, हे कळेलच.

    ReplyDelete
    Replies
    1. अत्यंत परखड विचार. स्वतःला नैतिकतेचे राखणदार समजणाऱ्या राजकीय पक्षांनी यातून बोध घ्यावा आणि त्यांच्या नैतिक पोलिसांची कथित नैतिक दादागिरी दूर करून, कलाकारांच्या मनात स्वतःला कलेद्वारे व्यक्त होण्यात अबोध भय राहणार नाही हे बघावे.

      अरुण खिरे

      Delete
  38. खरे आहे ती शिल्प आणि चित्रे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे, त्यातील सुंदरता पहाणे शिकावे.

    सुनील महादेव

    ReplyDelete
  39. धार्मिक तेढीची भूते

    जातीय आणि धार्मिक तंट्यांमध्ये, संघर्षांमध्ये हा देश आजवर खूप पोळला आहे. फाळणीच्या वेळी झालेल्या जखमांच्या वेदना अनेकांच्या मनात आजही ठसठसत असतात. देशाची फाळणी हे कितीही कटू असले तरी सत्य आहे आणि फाळणीनंतर या देशात मागे उरलेले सगळेच भारतीय आहेत हे पचवणेही अनेकांना जड जाते. याच भावनेचे राजकारण करण्याचे उद्योग गेली ६५ वर्षे काँग्रेसने केले आणि आणि जनसंघ-भारतीय जनता पक्ष यांनीही केले आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच असीमानंद यांची मुलाखत प्रसिद्ध व्हावी आणि त्यांनी 'सरसंघचालक मोहन भागवत यांची समझौता एक्सप्रेसमधील स्फोटाला मूक संमती होती,' असे वक्तव्य करावे हा योगायोग राजकीय असल्याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच नाही. देशाची प्रगती, आर्थिक विकासाचा अजेंडा, विदेशी गुंतवणूक, भ्रष्टाचार हे सगळे मुद्दे एका विशिष्ट टप्प्यावर मागे पडतात आणि जातीय, धार्मिक घटनांची भूते जागी होऊ लागतात. असीमानंदांची मुलाखत हे असेच एक 'राजकीय भूत' आहे. 'कॅरवॅन' या मासिकाच्या प्रतिनिधी लीना गीता रघुनाथ यांना असीमानंदांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात चार-पाच मुलाखती दिल्या. त्यांचेच संकलन आता प्रसिद्ध झाले असल्याचा दावा हे मासिक करीत आहे. असीमानंदांनी आपण असे काही बोलल्याचा लगोलग इन्कार करणे, मासिकाने आपल्याकडे या मुलाखतीचा रेकॉर्डेड पुरावा असल्याचा दावा करणे, सुशीलकुमार शिंदे यांनी अशा शक्यतेचा तपास करण्याचे सूचीत करणे आणि भाजपने यात राजकारण असल्याचा आरोप करणे हे सगळे कसे शिस्तीत, एखाद्या पटकथेनुसार झाले आहे.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  40. माणसाच्या जगण्यापेक्षा त्याच्या धार्मिक गरजा कधीही अधिक महत्त्वाच्या असू शकत नाहीत. एका धर्माच्या हिंसेला दुसऱ्या धर्मानेही हिंसक होणे, हे उत्तर असू शकत नाही. बॉम्बस्फोटासारखी कृत्ये करणाऱ्या अतिरेकी हिंदू संघटना अस्तित्वातच नाहीत, असा दावा काही वर्षांपूर्वी केला जात होता. प्रज्ञासिंग ठाकूर, श्रीकांत पुरोहित, दयानंद पांडे यांच्या 'अभिनव भारत' या संघटनेचे अस्तित्व आणि कारवाया सिद्ध झाल्यानंतर एटीएसने आणखी बरीच माहिती उघड केली. या जहाल अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांनी मोहन भागवत यांच्या हत्येची योजना आखली होती, असेही काही वर्षांपूर्वी उघड झाले होते. याबाबत केले जाणारे उलटसुलट दावे, या दाव्यांच्या सत्यतेचा तपास आणि त्याबाबत पुरावे सादर होण्याची कायदेशीर प्रक्रिया प्रदीर्घ असते. या काळात दोन्ही धर्मांच्या मतदारांना भावनिक साद घालण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातेत झालेल्या धार्मिक अत्याचारांचा, मोदींच्या त्यातील कथित सहभागाचा विसर पडू देणे काँग्रेसला परवडत नाही आणि दिल्लीत झालेल्या शिखांवरील अत्याचारांच्या कथा भाजपलाही हव्या असतात. या दंगलींची चौकशी झाली पाहिजे, त्यातील गुन्हेगारांना शिक्षाही झाली पाहिजे, यात वाद नाही. मात्र या सगळ्याचा उपयोग राजकीय कारणांसाठी होता कामा नये. धार्मिक श्रेष्ठत्व आणि सुडाची भावना, काही लोक या देशात उपरे असल्याच्या भावनेला खतपाणी घालणाऱ्या वृत्ती यांना भीक घालणे सामान्य माणूस जोवर बंद करत नाही, तोवर राजकारणी आपल्या मतलबाच्या भाकऱ्या या आगीवर भाजत राहतील. भागवतांवर असीमानंदांनी आरोप करण्यात काँग्रेसचा राजकीय फायदा आहे आणि मोहन भागवत हे हिंदुत्वाची हाक देणारे असूनही कडवे हिंदुत्ववादी त्यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण करण्यात संघाचा, पर्यायाने भाजपचा, फायदा आहे. यात देशाचा फायदा कुठे आहे? या प्र्रकारच्या बातम्या आल्यानंतर काही विशिष्ट प्रवृत्ती कामाला लागतात आणि मतदार त्यांच्या धार्मिक भूलथापांना बळी पडतात. अशा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे आजवरच्या निवडणुकांतून सिद्ध झाले आहे. ही धार्मिक तेढीची भुते मतदारांनी आपल्या खांद्यावर घेणे बंद केले, तिला मूठमाती दिली, तरच राजकीय पक्ष शहाणे होतील.
    समाप्त.

    ReplyDelete
  41. संजय सर ,
    आपण सुरवातीला सांगितलेलेच खरे आहे
    सगळे झपाटल्यासारखे प्रत्येक विषय ठराविक चक्रव्युहात नेतात आणि फसतात
    त्यांचा अभिमन्यु होतो हेच खरे
    इतके प्रचंड लिखाण आणि प्रतिक्रिया आल्या आहेत पण
    एकही मूळ मुद्द्याशी संबंध असलेली नाही
    खरच आपल्या सहनशीलतेचे कौतुक करावे तितके कमीच !
    अंधारात वाटचाल करताना अशी भूते आपल्या पायवाटेवर असणारच आणि ती अंधारात
    असे बीभत्स वेडेवाकडे नाच करणारच !
    आपल्या सभ्यतेला प्रणाम!
    अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. आगाशे,

      हांग असे !

      Delete
    2. लोकांना त्यांचे विचार मांडू द्यात, उगीच विषयाला धरून नाही, असे म्हणू नका, लोक लिहितात, हेही नसे थोडके! विचार पटत नसतील तर वाचून तेथेच सोडून द्या. काही संदर्भ उपलब्ध असल्यास त्यांचा विचार खोडून काढा.त्यांचे विचार दाबून टाकण्याचे प्रयत्न करू नका, प्लीज.

      संजय पाटील.

      Delete
  42. संजय सर ,
    आपण इतके मनःपूर्वक सहनशीलता दाखवत लिखाण चिकाटीने करत असता त्याचे कौतुक करावेसे वाटते
    आपण इतका सोशिक पणा दाखवता हेच विशेष
    इतकी गरळ हे सर्व कशासाठी ओकत असतात तेच समाजात नाही
    मूळ अभ्यासू वृत्तीने कोणीच सहभाग घेत नाही आपल्या सर्जनशीलते बद्दल लिहावे तितके कमीच !
    एकदम एखादी वावटळ यावी तसे अपावीमं किंवा त्याविरुद्धचे दुसरे टोक म्हणजे संघवाले ,
    एकदम एकाच हुल्लड उडवतात - शेवटी सगळ्याचा एक गुंता होतो आणि शेवटी हसू येऊ लागते
    आपला ब्लोग हा त्यांच्या विचारांच्या प्रचाराचा अड्डा होतो याचेच वाईट वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. आगाशे,

      अभिनंदन !

      Delete
    2. अपावीमं ?

      Long form, please !

      Delete
    3. अत्यंत पारमार्थिक विचार मंडळ
      अदमाने पाटील विचार मंच
      अशिक्षित पाटील विचार मंच
      अलबेला पाकिस्तान विरोधी मंडल
      अखिल पार्श्वनाथ विपश्यना मंडल
      इनमेसे कुछ तो होना चाहिये ?

      Delete
    4. अनिता पाटील विचार मंच
      anita-patil.blogspot.in

      Delete
  43. रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना

    भटजीबुवांना 'रिझर्व्हेशन'ची दक्षिणा देण्याचा सरकारचा घाट

    सरकारी नोक-या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज गेल्या दशकभरापासून लढत आहे. मराठा संघटनांनी विविध पातळ्यांवर आंदोलन चालविले आहे. या आंदोलनांतून शेकडो मराठा तरुणांनी रक्त सांडले. हजारो तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ही मुले न्यायालयांच्या खेट्या मारीत आहेत. या आंदोलनाची दखल तर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकारने घेतली आहे. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणात ब्राह्मणांना फुकटचा वाटेकरी करण्याचे पाप हे सरकार करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. रक्त सांडले मराठ्यांनी आरक्षण मात्र मिळत आहे ब्राह्मणांना, तेही न मागता. या उलट्या न्यायाला काय म्हणावे? आंदोलन करणा-या मराठा समाजातील तरुणांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार करीत आहे.

    ब्राह्मणांना ५ हजार वर्षांपासून आरक्षण मिळतेच आहे!
    गेल्या किमान ५ हजार वर्षांपासून ब्राह्मणांना फुकट लाभ मिळत आले आहेत. धर्मक्षेत्रात फुकटचे आरक्षण हा समाज उपभोगित आला आहे. भारतातील सर्व मंदिरे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. भारत सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षाही मंदिरांची मिळकत जास्त आहे. मंदिरांकडे जमा होणारा हा सर्व पैसा ब्राह्मणांच्या खिशात जातो. ख्रिश्चन मिशन-यांकडे येणा-या पैशांतून शाळा, रुग्णालये असे समाजसेवी उपक्रम राबविले जातात. मंदिरांच्या पैशांतून असे काही होत नाही. दान-दक्षिणांचा फुकटचा लाभ उपटणा-या ब्राह्मणांना सरकार आरक्षणाचीही फुकटची दक्षिणा द्यायला निघाले आहे.

    ६० टक्के आहे मराठा समाजाची लोकसंख्या
    कोणी काहीही म्हणत असले तरी, राज्यातील मराठा समाजाची लोकसंख्या सुमारे ६० टक्के आहे. उरलेल्या ४० टक्क्यांत सर्व जाती आहेत. असे असले तरी मराठा समाजाने काही ६० टक्के आरक्षण मागितलेले नाही. २५ टक्केच मागितले आहे. ते देतानाही सरकार नफ्या-तोट्याचा विचार करून इतर जातींना मराठा आरक्षणात घुसडण्याचा प्रयत्न करीत आहे. वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, २५ टक्के आरक्षणातून ५.५ टक्के वाटा ब्राह्मण समाजाला देण्याचा घाट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने घातला आहे. याशिवाय मुस्लिमांनाही १० टक्क्यांच्या आसपास आरक्षण देण्याचे घाटत आहे. अशा प्रकारे नव्या आरक्षणातून १५ टक्क्यांपेक्षाही जास्त वाटा सरकारने बाजूला काढला आहे. खाली उरतो जेमतेम साडेनऊ ते दहा टक्के वाटा. तेवढ्यावर मराठा समाजाची बोळवण होणार असे दिसते.


    दीड टक्के ब्राह्मणांना ५.५ टक्के वाटा;

    ६० टक्के मराठ्यांना मात्र अवघे ९.५ टक्के
    दीड टक्का लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजाला ५.५ टक्के आरक्षण आणि ६० टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजास साडेनऊ ते दहा टक्के आरक्षण, हा कुठला न्याय? ५.५ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करणा-या प्रत्येक ब्राह्मण तरुणाला हमखास नोकरी मिळेल. कारण त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या जवळपास ४०० टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा तरुणांना मात्र इतके कमी आरक्षण मिळेल की, त्याचा कोणताच लाभ समाजाला होणार नाही.

    मराठा समाजाच्या हिश्शातून इतरांना आरक्षण कशासाठी?
    इतर जातींना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. सर्वांनाच आरक्षण द्यायचे असेल, तर खुशाल द्या. पण ते मराठा समाजाच्या हिश्शातून देऊ नका. इतर जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणार असाल तर मराठा समाजालाही ते लोकसंख्येच्या प्रमाणातच द्या.

    ...तर मतदान करताना मराठा समाजाचेही हात थरथरतील
    मराठा समाजासाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा, सरकारचे हात का थरथरतात? मराठा समाजाला काही देण्याची वेळ येते तेव्हा सरकारला लकवा का भरतो? या निमित्ताने आम्ही एकच सांगू इच्छितो की, राज्यातील सरकार मराठा समाजाच्या मतांवरच हे सरकार टिकून आहे, हे कोणीही विसरू नये. तसेच मराठा समाजाच्या मताशिवाय कोणाचेही सरकार राज्यात बनू शकणार नाही, हेही लक्षात ठेवावे. मराठा समाजाला देताना तुमचे हात थरथरत असतील, तर तुम्हाला मतदान करताना समाजाचेही हात उद्या थरथरतील.

    ReplyDelete
  44. सलग सत्तेतून येते बेफिकीरी!

    कॉंग्रेसचं राज्य चांगलं की वाईट? जर असा प्रश्न विचारला तर सहज उत्तर देता येणार नाही पण चेकलिस्टवर कॉंग्रेसच्या एकूण राजकारणाची तपासणी केल्यास हल्लीचं बोकाळलेलं भ्रष्टाचार नि राजकरण्यांची उदासीनता पाहता कॉंग्रेसचं राज्य वाईटच म्हणावं लागेल. पण कॉंग्रेस नको तर मग कोण? असा प्रश्न लागूनच येतो व त्याचं उत्तर डाव्यांच्यांत असलेली वैचारीक विसंगती नि विस्खटलेलं नेतृत्व पाहता भाजप असेच म्हणावे लागेल. पण भाजप म्हटल्यावर ठसठशीत उमटतं ते म्हणजे त्यानी आजवर जपलेलं हिंदुत्व. हे हिंदूत्व आहे तोवर भाजपच्या नावाने सामान्य माणूस दचकतच राहील. त्यातल्या त्यात दलित व मुस्लीम समाज तर भाजपाच्या सत्तेच्या निव्वड केल्पनेनी सुद्धा अस्वस्थ होतो. यामागे भाजपाची भगवी भुमिका कारणीभूत असून समाजाचं हे रिएक्शन नैसर्गिक आहे. नरेंद्र मोदी काही असले तरी त्यांची विकास पुरुष म्हणून जी प्रतीमा आज निर्माण झाली आहे (मग ती मिडीयानी केली असली तरी)त्याला प्रतिउत्तर म्हणून तोडीचा नेता देण्यात कॉंग्रेसला अपयश आले हे सुद्धा तेवढच खर. राहूल गांधीचं सौम्य नि संयमी नेतृत्व तसं लोकाना भावलहीं असतं, पण कॉंग्रेसच्या पुढा-यानी सलग सत्तेतून आलेल्या बेफिकीरीतून, समाजकारण नि विकासाच्या प्रति पराकोटीची उदासीनता दाखवत जनसामान्याला कॉंग्रेसच्या प्रती उदासीन करुन सोडलं. आता ही उदासीनता कॉंगेसला भोवनार एवढं नक्की.
    आजच्या या उदासीनतेच्या वातावरणात सौम्य नि संयत नेतृत्व म्हणजे राहूल गांधी हे कॉंगेसला मारकच ठरत असून विरोधी पक्षानी उभं केलेलं तडाखेबंद व आक्रमक नेतृत्व नव्या पिढीला तरी आकृष्ट करत आहे. अत्यंत गाफील बनलेल्या व सुस्तावलेल्या कॉंगेसच्या राजकारण्यांमुळे लोकाना आता आक्रमक नि तडाखेबंद नेतृत्व आजमावून पाहण्याची खुमखुमी झाली नाही तरच नवलं. तसं कॉंगेसचा पारंपारीक मतदार पक्का आहे. तो कधीच भाजप व इतराना मत देत नाही, पण नव्या दमानी मतदानकेंद्रावर धडकणारा तरुण ही आजवरची पारंपारीक समिकरणं बदलून टाकेल असं दिसतय.
    २०१४ च्या निवडनूकांत भाजपनी सत्ता काबिज केली तरी फार काही दिवे लावणार नाही हे जाहीरच आहे पण त्यातून एक गोष्ट साध्य होईल ती म्हणजे यापुढे कॉंगेसपक्ष आपला आळस झटकून कामाला लागेल. पारंपारीक मतदारांच्या भरवश्यावर न बसता नव्या मतदारांचा नि बदलत्या समिकरणांचा अभ्यास करुन सुदृढ राजकराणाची सुरुवात करेल. आजवरचे आयतोबा व खायतोबांचे तिकट बाद करुन खरोखरच काम करणा-या कार्यकर्त्याना पक्षात महत्वाचे स्थान देणे सुरु होईल,(होईल का? न झाल्यास कॉंगेस संपणार एवढच!) यातून बाहुबली व घराणेशाहीलाही एका अर्थाने लगाम बसेल.
    परवा मिलिंद देवरा आपल्या मतदार संघात गेले तेंव्हा लोकानी अक्षरशा शिव्या हासडून देवराला पिटाळले. सगळ्यांचं म्हणनं हेच होतं की देवरा साहेब निवडून आल्यानंतर एकदाही आपल्या मतदार संघाकडे फिरकले नाहीत. मागच्या पाच वर्शात याना आपल्या मतदार संघाची साधी आठवणही झाली नव्हती नि आज निवडणूका तोंडावर आल्यावर हे थोबाड धरुन इकडॆ आले... वगैरे प्रचंड सुरु होतं. हे काय होतं? मतदारांचा राग होता. कशामुळे? तर सलग सत्तेतून त्यांचा नेता बेफिकीर बनल्यामुळे. म्हणजे आता या नेत्याना यांची बेफिकीरी नडणार एवढं मात्र खरं. म्हणजे यांच्या विरोधात जो कोणी निवडून येईल तो लायक आहे म्हणून नाही तर सध्याच्या नेत्याच्या विरोधात होणा-या मतदानाचा तो परिणाम असेल. अगदी असचं जिथे जिथे खदखदणे सुरु आहे तिथे तिथे विरोधात मतदान होणार...
    contd...

    ReplyDelete
  45. आजवरची गोष्ट निराळी होती. मतदार मुका, आंधळा, बहिरा होता. जातीच्या नावानी मतदान करणारा होता व आजही आहेच. कॉंगेसच्या प्रती प्रचंड आदर बाळगणारा होता. हे सगळं खरं असलं तरी, दोन निवडणूकीत पाच वर्षाचा काळ लोटत असतो. या पाच वर्षाच्या काळात नव्या दमाचा मतदार उभा होत असतो. हा तरुण मतदार कसा विचार करतो याचा विचार झालाच पाहिजे. सध्या मोदी नावाचं घोंगावणारं वादळ तरुणाना प्रचंड भुरळ घालत आहे. नव्याने होणारी मतदार नोंदणी लक्षणीय असून हा तरुण मतदार कॉंगेसच्या एकूण उदासीनतेपायी कंटाळलेला आहे. मोदीच्या नावानी दंगलखोर म्हणून कितीही खळे फोडले तरी तरुण मतदाराला भुतकाळाच्या भुताटकीत अडकवून ठेवणे अशक्य आहे. नव्या पिढीची मानसिकता वेगळी असून झालं गेलं विसरुन नवा प्रयोग अजमावयाला ती तयार असते. जुन्या जखमाना कवटाळून आयुष्य काढणारी पिढी संपत असून, जखमांवर समयसुचकतेची पट्टी बांधून नव्याने झेप घेणारी ही पिढी तौलनिकदृष्ट्या जास्त व्यवहारी आहे, प्रक्टीकल आहे. अस्मिताचं दळण फार दिवस दळता येणार नाही एवढा बदल नक्कीच झाला आहे. तो होऊ नये असं वाटणारे राजकारणी निव्वड मुर्ख असून वेळीच त्यानी स्वत:ला नाही बदलं तर तरुण त्याना बदलणार ही गोष्ट अटळ आहे.
    २०१४ मध्ये मोदी नावाचा प्रयोग अजमावण्यासाठी तरुण मतदार उत्सूक आहे तर या उत्सूकतेला एनकॅश करण्यासाठी भाजपही तेवढ्याच शिताफिनं फासे फेकतो आहे. त्यात तडाखेबंद मोदी समोर राहूल गांधी हे नेतृत्व कमी पडत आहे हे वेगळच दुखणं. वृत्तवाहिन्यांच्या चाचण्या सुद्धा भाजपचं पारडं जड असल्याचे समिकरण मांडत आहेत. एकूण वातावरण पाहता २०१४ मध्ये कुणाला बहुमत मिळॊ अथवा ना मिळॊ पण भाजपं सर्वात जास्त जागा मिळवेल असे चित्र आहे.

    हे घडण्याचे कारण भाजपची ती लायकी आहे म्हणून नव्हे तर सलग सत्तेतून कॉंगेसमध्ये आलेल्या बेफिकीरीचा तो परिणाम असेल.
    End.

    ReplyDelete
  46. संस्कृत विरूद्ध प्राकृत?
    कोणतीही संस्कृती ही सर्वांत प्रथम भाषिक संस्कृती असते. तिला धर्माची जोड मिळाली, तर इहपरलोकीचे हितसंबंध एकात्म होऊन ती अधिक बळकट होते आणि त्यात परत राजकीय सत्तेची भर पडली, तर तिची ओळख आणखी पक्की होते. सातवाहन काळातील महाराष्ट्राने हा अनुभव पहिल्यांदा घेतला म्हणून तो काळ महत्त्वाचा.
    प्राचीन महाराष्ट्राच्या सातवाहन पर्वात डॉ. श्री. व्यं. केतकरांनी एक अत्यंत महत्त्वाची बाब उजेडात आणली आहे. ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते लिहितात “”कुरुयुद्धापासून वररुचिकालापर्यंत देशी भाषांस आपले कार्यक्षेत्र बरेच मर्यादित करावे लागले. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाषा म्हटल्या म्हणजे दोन होत्या. धर्मकारणात संस्कृत भाषेची स्पर्धा होती व राजकारणात पैशाची भाषेची स्पर्धा होती.”
    केतकरांचे निरीक्षण पचायला तसे जडच आहे; पण अगदी 16व्या शतकाच्या अखेरीस भागवताच्या एकादश स्कंधावर मराठी भाष्य लिहिणाऱ्या संत एकनाथांनासुद्धा “संस्कृत भाषा देवे केली! प्राकृत काय चोरापासून झाली?’ असा प्रश्न विचारावा लागतो व त्याच्या आसपास होऊन गेलेल्या दासोपंतांना मराठी शब्दसंपत्ती संस्कृतपेक्षा समृद्ध असल्याचे सोदाहरण दाखवून द्यावे लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर त्याचे आश्चअर्य वाटणार नाही.
    कोणत्या भाषेतून कोणती भाषा निघाली, या प्रश्नाेवरील चर्चेतूनही ही स्पर्धा स्पष्ट होते. प्राकृत भाषा या संस्कृतोद्भव आहेत, असे संस्कृतच्या अभिमान्यांनी म्हणावे, तर प्राकृताभिमान्यांनी त्याच्या उलट भूमिका घ्यावी.
    या संदर्भात राजारामशास्त्री भागवतांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि निकोप वाटते. “प्राकृत’ मूळचा “पाअड’ दिसतो. “पाअड’ व “पअड’ हे दोन्ही “प्रकट’ शब्दाचे अपभ्रंश मानण्याचा संप्रदाय आहे. “पाअड’ भाषा म्हणजे “प्रकट’ भाषा. “प्रकट’ म्हणजे “उघड्या अर्थाच्या, कोश पाठ केल्याशिवाय व प्रकृतिप्रत्ययाची खटपट केल्याशिवाय अर्थ कळणाऱ्या’ असा “पाअड’ शब्दाचा मूळ अर्थ असावा. जे “संस्कृत’ नव्हे ते “पाअड.’ जी भाषा प्रकृतिप्रत्ययाची खटपट करावी तेव्हा येते ती संस्कृत. जी भाषा प्रकृतिप्रत्ययाच्या खटपटीस न पडता उपजत येते ती “पाअड.’
    अशा “पाअड’ अर्थात प्राकृत भाषेची “विचिकित्सा’ करून भागवत महाराष्ट्री प्राकृतकडे वळतात. त्यांच्या मतानुसार महाराष्ट्रीसह प्राकृत भाषांचे प्रकृतिविकृतीभावाचे नाते लौकिक संस्कृताशी नसून संस्कृताच्या पूर्वरूपाशी लागते.” (मराठी भाषेच्या संदर्भात असेच मत राजवाड्यांनी व्यक्त केल्यासारखे दिसते.) परंतु, ही गोष्ट येथेच संपत नाही. प्राकृत भाषा सर्वस्वी संस्कृताच्या पूर्वरूपापासून निघालेल्या नसून, बऱ्याच अंशी त्यांच्या संस्कृताच्या पूर्वरूपाशीही लागत नाही, अर्थातच त्यास “देशी’ असाही एक पाया आहे.’ ही गोष्ट आलंकारिक पद्धतीने व्यक्त करताना शास्त्रीबोवा म्हणतात, “”महाराष्ट्री लौकिक संस्कृतापासून निघालेली नसून, संस्कृताच्या पूर्वरूपापासून निघालेली आहे व जसा एक पूर्वरूपी भाग तसा दुसरा देशी भाग मिळून दोन्ही भाग सांधले जाऊन महाराष्ट्रीचे हरिहररूपी शरीर घडले आहे.”
    पुढे चालू...

    ReplyDelete
  47. भारतीय भाषांच्या यापुढच्या उत्क्रांतीचा प्रवास स्पष्ट करताना राजारामशास्त्री सांगतात, “”महाराष्ट्री व संस्कृत या जोडीपासून शौरसेनी निघून, शौरसेनीपासून मागधी व पैशाची निघाल्या, असे मानण्याचा संप्रदाय आहे. याप्रमाणे महाराष्ट्री हे सगळ्या प्राकृत भाषांचे माहेर ठरते.”
    भाषिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने मराठ्यांच्या इतिहासाचे स्पष्टीकरण करताना राजारामशास्त्री पुढे सांगतात, “”जर मरहट्टी (महाराष्ट्री) भाषा सूरसेनी भाषेची एक प्रकृती, जर सूरसेनी भाषा जशी मगधी भाषेची तशी पिसाची (पैशाची) भाषेची प्रकृती, तर मरहट्ट लोक पूर्वी कधी तरी हिमालयापर्यंत पसरलेले असून, हळूहळू त्यांच्यापासून सूरसेन निराळे पडले व पुढे सूरसेनास उतरती कळा लागली. तेव्हा पश्चिरमेकडचे पिसाच स्वतंत्र होऊन पूर्वेकडेस मगध्यांनीही स्वतंत्रपणा मिळवला, अशी अगदी जुनाट हकिगत समजणे भाग पडले.”
    या संदर्भात शास्त्रीबोवांची “महाराष्ट्र’ शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट करणे गरजेचे आहे. “”जो शब्द संस्कृतात महाराष्ट्र लिहितात, तो प्राकृतात मरहट्ट लिहिला जातो,” असे निदर्शनास आणून मूळच्या महरट्ट शब्दातील “”नुकसान-नुसकान’प्रमाणे व्यंजनाचा विपर्यास होऊन “महरट्ट’ शब्दापासून “मरहट्ट’ शब्द निघालेला दिसतो. याप्रमाणे या मूळच्या निव्वळ देशी शब्दाला महाराष्ट्र असे मोठे रूप देऊन संस्कृत भाषेने आपल्या शब्दांच्या भांडारात ओढून घेतले.”
    अशीच एक प्रक्रिया “मराठा’ आणि “मराठी’ या शब्दांच्या बाबतीत घडून आल्याचेही ते स्पष्ट करतात. “”टकारात प्राण घुसवून मराठा किंवा मराठी असा उच्चार करण्याचा व लिहिण्याचाही संप्रदाय पडला.” त्याचप्रमाणे “”प्राकृत भाषांची नावे त्या-त्या लोकांवरून किंवा त्या-त्या लोकांनी वसविलेल्या देशावरून पडलेली आहेत.” या आपल्या मताविषयी ते निःशंक आहेत.
    आता राजारामशास्त्री जेथे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या आर्यत्वाबद्दल साशंक आहेत, तेथे ते तेथील मराठ्यांना आर्य मानतील हे संभवत नाही. या संबंधीचे महाराष्ट्र हे यदुक्षेत्र व मराठे हे यादव असल्याचे त्यांचे विचार आपण यापूर्वीच पाहिले आहेत. त्यांची पुनरुक्ती करण्याची गरज नाही.
    भागवतांचा मुख्य भर भाषा या प्रमाणावर असल्याचे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अर्थात, या काळासंबंधी इतर प्रमाणे पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे त्याला भागवतांचाही इलाज नाही. महाराष्ट्री प्राकृताचे जे मध्यवर्ती स्थान ते सांगतात त्याला आधार अतिप्राचीन प्राकृत वैयाकरण वररुची ऊर्फ कात्यायन हाच आहे. कात्यायनाच्या “प्राकृतप्रकाश’ व्याकरण ग्रंथात एकूण बारा परिच्छेद असून, पहिले 9 परिच्छेद मरहट्टीस मिळाले आहेत व 10वा पिशाचीस, 11 वा मागधीस, 12 वा सूरसेनीस अशी राहिलेल्या 3 परिच्छेदांची वाटणी करण्यात आली आहे. या वाटणीवरूनच महाराष्ट्रीचे महत्त्व समजून येते; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शूरसेनीसारख्या प्राकृताची व्यवस्था लावताना खास तिच्याशी संबंधित असे नियम सांगून कात्यायन “शेषं महाराष्ट्रीवत्’ असे सूत्र घालतो. यावरूनच महाराष्ट्री ही अन्य प्राकृतांची प्रकृती असल्याचे विधान करता येते.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  48. महाराष्ट्रीला एवढे प्राधान्य मिळणे काही अभ्यासकांना रुचत नाही व उपलब्ध पुराव्याचा अन्वयार्थ वेगळ्या तऱ्हेने लावून ते महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. मनमोहन घोष हे असेच एक अभ्यासक. नाट्यशास्त्र परंपरेत शौरसेनीला अधिक महत्त्व असल्याचे विधान करताना घोषबाबू नाट्यशास्त्रात महाराष्ट्री भाषेचा उल्लेखही नसल्याचे निदर्शनास आणतात. वस्तुतः नाट्यशास्त्रातील वेगवेगळ्या भाषाविभाषा आणि त्यांचा उपयोग करणारी पात्रे यांच्या यादीतील “दाक्षिणात्या’ हा शब्द महाराष्ट्रीवाचक असल्याचे भागवतांनी खूप पूर्वी दाखवून दिले आहे. दक्षिणेतील द्रविडा नावाच्या भाषेची गणना तेथे विभाषांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे दाक्षिणात्या म्हणजे महाराष्ट्रीय याबद्दल संशयाला जागाच उरू नये. (हेमचंद्र हा उत्तरकालीन जैन व्याकरणकार कात्यायनाप्रमाणेच प्राकृत भाषांच्या व्याकरणाची व्यवस्था लावताना “शेषं प्राकृतवत्’ असा शेरा मारतो, तेव्हा त्यालाही तेथे “प्राकृत’ शब्दाने महाराष्ट्री प्राकृतच अभिप्रेत असणार.) “महाराष्ट्राश्रयां भाषाम् प्रकृष्टं प्राकृतम् विदु.’ हे दण्डीच्या काव्यादर्शातील वचन प्रसिद्ध आहे. यावरून महाराष्ट्र देश आणि महाराष्ट्री भाषा यांच्यातील अन्योन्य संबंध निर्विवादपणे प्रस्थापित होत असताना घोषमोशाय महाराष्ट्रीलाच शौरसेनीची नंतरची उत्क्रांती समजतात. इतकेच नव्हे, तर “महाराष्ट्र’ या भूमिवाचक शब्दाने उत्तर भारतातील मध्य देशाचा उल्लेख होतो, असेही सांगतात. या बाबतीत ते राजवाड्यांचे सहप्रवासी शोभतात खरे. अर्थात, महाराष्ट्राची उत्तरेत उचलबांगडी करण्यामागचे घोषांचे कारण प्रादेशिक अभिमान हे दिसते; तर राजवाड्यांचे जात्यभिमान!
    महाराष्ट्री ही शौरसेनीच्या कानामागून येऊन तिखट झाल्याची घोषांची भावना आहे. या परिवर्तनाचे श्रेय किंवा अपश्रेय ते सातवाहनांच्या राजकीय सत्तेला देतात. नंतरच्या काळात कानडीला सारून मराठी पुढे आली, याची मीमांसा विठ्ठल रामजी शिंदे यांनी अशीच म्हणजे (मराठ्यांच्या) राजकीय सत्तेचा संदर्भ देऊन केली आहे. अर्थात, महाराष्ट्री ही शौरसेनीची उत्क्रांत अवस्था असल्याचे घोषांचे मत मात्र कात्यायनापासून मार्कंडेय हेमचंद्रापर्यंतच्या सर्वच वैयाकरणांच्या विरुद्ध जाणारे आहे.
    हा मतामतांचा गलबला निश्चिलतच अंगावर येणारा आहे; पण त्यातून एक गोष्ट निश्चिततपणाने सांगता येते, ती ही, की महाराष्ट्राच्या अस्मितेच्या जडणघडणीत सातवाहन या राजघराण्याच्या सत्तेला महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही प्रादेशिक जनसमूहाच्या अस्मितेमध्ये भाषिक अस्मितेचा वाटा लक्षणीय असतो. भाषाबंध हा सर्वांना एकत्र आणणारा समान धागा तर असतोच. त्याने रोजच्या व्यवहारात सौकर्य येते. भावनात्मकदृष्ट्या जवळीक निर्माण होते. सांस्कृतिक संचिताची वृद्धी होते. संस्कृतिस्वभाव घडतो. सामूहिक इच्छाआकांक्षांची अभिव्यक्ती होते. कोणतीही संस्कृती ही सर्वांत प्रथम भाषिक संस्कृती असते. तिला धर्माची जोड मिळाली तर इहपरलोकीचे हितसंबंध एकात्म होऊन ती अधिक बळकट होते आणि त्यात परत राजकीय सत्तेची भर पडली, तर तिची ओळख आणखी पक्की होते. सातवाहन काळातील महाराष्ट्राने हा अनुभव पहिल्यांदा घेतला म्हणून तो काळ महत्त्वाचा.
    वर्तमान युग हे प्रातिनिधिक लोकसत्तेचे म्हणजेच लोकशाहीचे आहे. त्यात राज्यकर्ते हे प्रजेचेच प्रतिनिधी असल्यामुळे त्यांचे व प्रजेचे हितसंबंध समान असण्याची बरीच शक्य ता असते. पूर्वीच्या काळी तसे नव्हते. राजा एक प्रकारचा व प्रजा दुसऱ्या प्रकारची, अशी परिस्थिती असू शकायची. सातवाहन काळातील महाराष्ट्रात प्रजेची भाषा, तीच राजांची होती. प्रजेमध्ये जी धार्मिक सहिष्णुता होती, तशीच सहिष्णुता राजांमध्येही होती.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  49. सातवाहनांचा महाराष्ट्री प्राकृतला आश्रय असला तरी त्या काळात विदर्भात संस्कृत साहित्याचा विकास होत होता. सातवाहनांच्या भाषाविषयक धोरणावर प्रकाश टाकणारी कथा सर्वप्रचलित आहे. कथासरित्सागरातील कथेच्या हकिगतीनुसार बृहत्कथेचा कर्ता गुणाढ्य हा सातवाहनांचाच दरबारी पंडित होता. राजाला संस्कृत येत नव्हते. आपल्या राण्यांसह वर्तमान जलक्रीडा करीत असताना एका सुकुमार राणीच्या अंगावर जोराने पाणी उडवणाऱ्या या राजाला राणीने “मोदकैस्ताडय माम्’ असे संस्कृतमधून विनवले. त्याचा अर्थ मला पाण्याने मारू नका. परंतु, संस्कृत न कळणाऱ्या राजाने त्याचा अर्थ मला मोदकांनी म्हणजे लाडवांनी मार (पाण्याने नको), असा घेऊन लगेचच लाडू मागवते. राजाच्या या अडाणीपणास राणी कुत्सित हसली. त्यावर राजाने संस्कृत शिकण्याचा निश्चय केला. गुणाढ्याने यासाठी सहा वर्षे लागतील, असे सांगितले, तर त्याचा दरबारी प्रतिस्पर्धी पंडित शर्ववर्मा याने आपण हे काम सहा महिन्यांत करून दाखवू, असे खात्रीपूर्वक सांगितले. हे अशक्य असल्याचे जाणणाऱ्या गुणाढ्याने चिडून, तसे झाल्यास आपण संस्कृत, प्राकृत व देशी या भाषांचा उपयोग करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. विशेष म्हणजे एका दैवी उपायाने शर्ववर्मा राजाला सहा महिन्यांत संस्कृत शिकवण्यात यशस्वी झाला. त्यामुळे उद्विग्न होऊन गुणाढ्याने विंध्य पर्वताचा रस्ता धरला. तेथेच देहत्यागाचा त्याचा इरादा होता. उपरोक्त तीनही प्रकारच्या भाषा तो आता प्रतिज्ञाबद्धतेमुळे बोलू शकत नसला, तरी तेथील भूत, यक्ष, राक्षस योनीतील जीव बोलत असलेली पैशाची भाषा त्याच्या कानी पडली. वररुची या आपल्या पूर्वसूरीच्या कथांचा संग्रहच काणभूतीच्या मार्फत त्याच्या हाती आला. त्याला जणू जगण्याचा ध्येयार्थ गवसला. सात भागांत त्याने सात लांब कथांची व्यवस्था लावली, त्यांना एका सूत्र
    ात गोवून एक बृहत्कथा झाली.
    हे लेखन गुणाढ्याने स्वतःच्या रक्तात केले होते. शाई, काजळ या लेखनोपयोगी गोष्टींची अनुपलब्धता हे एक कारण; परंतु, आपला संग्रह विद्याधर योनीतील जीवांनी चोरून नेऊ नये, यासाठी ही खबरदारी. कारण ते रक्ताला स्पर्श करीत नसत.
    शिष्यांच्या आग्रहावरून गुणाढ्याने हा संग्रह पैठणातील सातवाहन राजाकडे पाठवला. त्याने त्याची कदर करण्याऐवजी पिशाच्यांची भाषा व तीही रक्ताने लिहिलेली म्हणून त्याचा तुच्छतापूर्वक अव्हेर केला. गुणाढ्याला ही गोष्ट खूपच लागली. निराश होऊन त्याने एका डोंगराचा आश्रय घेतला. तेथे पुस्तकाचे एकेक पान वाचून तो ते अग्निनारायणाला अर्पण करू लागला. त्याचे कथावाचन ऐकायला अरण्यातील पशुपक्षी गोळा झाले. खरे तर संपूर्ण ग्रंथच नष्ट व्हायचा; पण शिष्यांनी हट्ट केल्यामुळे सातवी कथा अग्नीच्या तावडीतून वाचली.
    इकडे सातवाहन राजाला एका चमत्कारिक व्याधीने पिडले. त्यावर उपाय म्हणून विशिष्ट प्रकारचे मांस हवे होते. ते तहानभूक विसरून अन्नपाणी वर्ज्य करून कथा ऐकत बसलेल्या तन्मय पशूंकडून कसे मिळाले? राजाला ही हकिगत कळली. मामला लक्षात आला. त्याचा पश्चासत्तापही झाला. तो तिकडे धावला. गुणाढ्याची क्षमायाचना करून त्याच्या शिष्यांकडून त्याने तो उरला वाचलेला सातवा भाग प्राप्त केला. मूळ पैशाची भाषेतील या ग्रंथाची संस्कृतात रूपांतरे सोमदेव सुरी आणि क्षेमेंद्र या काश्मितरी पंडितांनी एक सहस्रक उलटल्यावर केली.
    गुणाढ्याच्या बृहत्कथेच्या या कथेचा काय तात्पर्यार्थ निघायचा तो निघो; एक गोष्ट निश्चि्त-संस्कृत आणि पैशाचीसारख्या संस्कृताशी स्पर्धा करू पाहणाऱ्या इतर भाषांशी स्पर्धा करून सातवाहन राजांनी महाराष्ट्री भाषेची प्रतिष्ठा वाढवली.
    दुर्दैवाने, महाराष्ट्रीतील अशा कृती फारशा उपलब्ध नाहीत. तरीही प्रवरसेनाचे “सेतुबंध’ हे काव्य आणि सातवाहन राजा हाल याने जातीने केलेला सातशे गाथांचा संग्रह महाराष्ट्रीची वाङ्‌मयीन गुणवत्ता आणि महाराष्ट्राची अभिरुची सिद्ध करण्यास पुरेसे आहेत.
    समाप्त.

    ReplyDelete
  50. काहि पण लिहता फेका फाकी नुसतीच

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...