Sunday, April 20, 2014

रिसडी....

कंदिलाला वात नसायची आणि चिमणीत रोकेल नसायचे...अशा भुताळ अंधारात आई रिसडीची गोष्ट सांगायची. रिसडी म्हणजे अस्वलीन. तर काय असते, ही रिसडी डोंगरवाटेवरुन चुकला-माकला प्रवासी आला तर त्याला ठार मारुन त्याची दौलत लुटायची आणि आपली डोंगरकपारीतील गुहा सजवायची.

अशाच वाटेवरुन एक साम्राज्य हरपलेला दुर्दैवी राजकुमार जात असतो. रिसडी त्याला लुटायचा प्रयत्न करते...पण काय? त्याच्याकडे काहीच नाही..फक्त रूप...

रिसडी त्याच्या रुपावर मोहित होते...त्याला आपल्या गुहेत नेते...त्याच्यावरील अभंग प्रीत व्यक्त करते...राजकुमार पळून जायचे जेवढेही प्रयत्न करतो ते ती हाणूनही पाडते...

हतबल राजकुमार शेवटी तिच्या इच्छेचा बळी होतो.

पण तो खूश नाही...

वर्षामागून वर्ष जातात...रिसडीला बाळेही होतात...पण राजकुमार खूश नाही...

ती त्याला विचारते...

"का रे? मी तुझ्यावर अनंत प्रेम करतेय...पण तू का उदास आहेस?"

खूपदा प्रश्नाचे उत्तर टाळलेला राजकुमार एकदाचा म्हणतो..."माझे त्या डोंगरापारच्या आदिवासी राजकन्येवर प्रेम होते...मी तिलाच भेटायला चाललो होतो...पण तू मला बळकावलेस...आता मला माहित नाही...कशी असेल माझी प्रिया...मला तिला भेटावेसे वाटतेय..."

रिसडी दयाद्र होते. कळवळते...पण म्हणते, "तुला खरेच जायचे आहे लाडक्या?"

त्याचा होकार त्याच्या निश्वासातून मिळाला.

"ठीक आहे...जा तू!"

रिसडी त्याला सोडायला रस्त्यावर आली. राजकुमार मागे न पाहता झपाझप त्याच्या इप्सिताकडे चालू लागला. तो शेवटपर्यंत दिसावा यासाठी रिसडी झाडावर चढू लागली. तो जसजसा दूर जात होता तसतशी रिसडी झाडावर उंच चढत होती....

तो वळतच होता त्या वळनावर...

रिसडी झाडाच्या टोकावर...

तो अदृष्य झाला...

ती झाडावरून कोसळली....

4 comments:

  1. आप्पा - राजकुमार आणि अस्वलीण यांच्या मुलाना मतदानाचा अधिकार होता का ?
    बाप्पा - आणि ती मुले दिसायला कशी होती
    आप्पा - त्यांचे शिक्षण इंग्लिश शाळेत झाले का मराठी मिडीयम मध्ये ?
    बाप्पा - मुलाना डॉ आंबेडकर आणि इतर थोर नेते माहित होते का ?
    आप्पा - तिला कुणी हरभऱ्या च्या झाडावर चढवले असेल सुरवातीला !
    बाप्पा - असाच प्रसंग आपल्याला मोहोन्जो दरो येथे विटांवर कोरलेला दिसतो !
    आप्पा - त्यामुळे पूर्वीपासून अस्वले आणि माणूस यांच्यात प्रेम आणि शरीर संबंध होते हे सिद्ध होते
    बाप्पा - म्हणून तर आपल्या ३३ कोटी देवात त्याना स्थान मिळाले
    आप्पा - त्याना मराठी येत होते का , प्राकृत येत होते का , संस्कृत ?
    बाप्पा - कित्ती कित्ती प्रश्न ! नुसतेच प्रश्न - पण त्यांची उत्तरे आपल्या संजय कडे असतातच ! चला , त्याच्याकडे जाउन विचारू या !
    चांदोबात अशी कथा वाचली होती , पण शेवटी , उत्तर माहित असून जर सांगितले नाही तर तुझ्या डोक्याची हजार शकले होऊन तुझ्या पायाशी लोळण घेतील असे काहीतरी लिहिले होते , किती घाबरायला होते नाही का ?त्यापेक्षा हे लग्न करणे बरे वाटते !

    ReplyDelete
  2. लोककथा नीट समजावून घ्यायला हव्यात...आठवतील त्या जतन करायला हव्यात. लोककथांत गाढवेही बोलतात...जशी अनेकदा माझ्या ब्लोगवर मानवी गाढवे बोलतात!

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया गाढवांचा अपमान करू नये. ती बिचारी काम नसले तर निमूटपणे उकिरडे फुंकत असतात. विनाकारण कोणाच्या अंगणात घाण करत नाहीत. ह्या मानवी गाढवांना बहुतेक घरातही आणि उकिरड्यावरही उभे करत नसावेत. म्हणून इथे येतात आणि फ्रस्ट्रेशन काढतात !

      Delete
  3. संजय सर , अशा मूर्खाणा गाढव म्हणून हिणवणे हा गाधवाञ्चा अपमान आहे !
    गाढव हा प्राणी उपमाच द्यायची झाली तर दलित आहे !कारण हजारो वर्षे त्याने इतरांसाठी खस्ता खाल्या आहेत , कधीही मान वर करून काही मागितले नाही आणि कोणाला दोष दिला नाही किंवा खास मागण्या केल्या नाहीत !आपल्या समाजात दलितांनी असेच आयुष्य घालवले आहेत , तसेच प्राणी राज्यात गाढवाचे आहे !त्याचा अपमान करणे म्हणजे सर्व पद दलितांचा अवमान आहे !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...