Tuesday, May 27, 2014

जीवनाशी सांधा कसा जुळवता येईल?

विकासाच्या संकल्पना अनेक आहेत. अत्याधुकिकरणाने प्रश्न वाढतात, कमी होत नाहीत असाही मतप्रवाह आहे. गांधीजींचे "खेड्याकडे चला" याचा शब्दश: अर्थ न घेता कृत्रिम गरजा कमी करा आणि संतुलित जीवनाचा आनंद घ्या असा आता घ्यायला हवा. विकास म्हणजे हाव नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबादत राहणे तर नक्कीच नाही. उदा. सर्व खनीजे, कृड सुद्धा ज्या गतेने आम्ही उपसा करत चाललो आहोत त्या गतीने किती वर्ष टिकतील? आमच्या आजपासून चवथ्या वा पाचव्या पिढीला आम्ही काय शिल्लक ठेवणार आहोत?

शेती अतिउत्पादनासाठी रासायनिक बनत चालली आहे. शेत जमीनींचे खारवत नापीक होण्याचे प्रमाण वाढत आहे. मंगळ-चंद्रावरून आम्ही खनिजे आणु हा कल्पनाविलास ठीक आहे पण वास्तवात ते कितपत व्यवहार्य असेल याचाही विचार करायला हवा. मनुष्य जीवन आनंदासाठी जगतो. आनंदाची-सुखाची आमची नेमकी कोणती व्याख्या आहे? आनंद-सूख या सापेक्ष बाबी असल्याने व्यक्तीपरत्वे त्या बदलतात अथवा बदलवता येतात हे आपण वर्तमान जगातही पाहू शकतो. आनंदाची पुर्ती भौतिक सम्साधनांनी होऊ शकते तशीच साधेपणानेही होऊ शकते. आज भौतिक संसाधनांचा पक्ष प्रबळ आहे हेही वास्तवच आहे.

पण तरीही सूख का नाही? असंतोषच अधिक का आहे? निवदणुकातील निकाल नेमके कोणत्या असम्तोषामुळे लागले? विकासाचा हव्यास हे त्याचे कारण आहे. पण विकास म्हणजे नेमके काय याची व्याख्याही आपल्याला करावी लागेल याचे भान आपल्याला आहे काय? प्रश्न अनेक आहेत. भौतिक प्रगतीने सुखच साधते असे नाही...उलट असंतोष, स्पर्धा आणि मानसिक तणावांचे वर्धनच होते हे थोडा विचार केला तरी लक्षात येईल.

याचा अर्थ भौतिक प्रगती नको असा मुळीच नाही. सर्वांना किमान जगण्याचे साधन मिळालेच पाहिजे याबाबतही दुमत नाही. पण आर्थिक प्रगतीही सापेक्ष असल्याने गरीब वर्ग सापेक्षतया मोठाच राहणार कारण उत्पन्नातील असमानता ही कोणत्याही प्रगतीच्या बिंदुवर असनारच. म्हणजे "गरीबी हटाव" या घोषणा राहणारच. अमेरिकेतही कथित गरीब आहेतच कि! एकीकडे आम्हाला वस्तू स्वस्त हव्यात आणि पगार मात्र वाढते पाहिजेत...कोणत्या अर्थशास्त्रीय नियमांनी असे होऊ शकेल, हे एक कोडेच आहे.

आपल्याला दोहोंत संतुलन कसे साधता येईल, अनावश्यक गरजांच्या मोहापासून दूर राहत जीवनाशी सांधा कसा जुळवता येईल हा खरा प्रश्न आहे.

5 comments:

  1. अगदी स्पष्टपणे संजय सर चर्चेतून पळ काढत आहेत ,मूळ मुद्दा विकासाचा आहे
    पण पार खरा विकास म्हणजे काय आणि खरा आनंद आणि सुख म्हणजे काय असे म्हणत चर्चा विनाकारण भौतिक प्रगतीच्या कडून जणूकाही आध्यात्मिक पातळीवर नेऊ पहात आहेत !
    आज सर्व प्रगती ही बौतिक सुखे आणि आरोग्य निवारा आणि मूलभूत सेवा यांच्याशी निगडीत आहे
    अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत
    पूर्वी अशोक आणि इतर राजे रस्ते आणि रस्त्यांच्या बाजूने झाडे लावत असत , विहिरी खणत असत
    पाणपोया आणि अन्नछत्रे ,दवाखाने उभारत असत !जेंव्हा संपूर्ण भारत आध्यात्मिक पातळीवर भरभराटीला आला होता असे म्हणू , त्यावेळेसही माणसाच्या भौतिक सुखाकडेही राजे लोकांचे पूर्ण लक्ष होते ! भौतिक सुखे ही दुर्लक्ष करता न येण्यासारखी आहेत ! विहार आणि माठ आणि त्यांच्यासाठी सुविधा हेही ते कर्तव्य समजत असत हे लक्षात घेण्यासारखे आहे !

    पण आज चित्र जरा भडक आहे जाहिरात युगामुळे गरजा आणि चैन यामधली पुसत असलेली रेषा पूर्ण पुसली गेली आहे ! आणि घराच्या अपुऱ्या संस्कारामुळे नवीन पिढी भरकटले जाण्याची शक्यता आहे !
    मोबाइल हा आवश्यक बनला आहे ! काही लोक तर ते अन्न आणि वस्त्राप्रमाणे अत्यंत गरजेचे मानतात ,
    आणि
    त्याना वारन बफे सारखे अति यशस्वी लोकसुद्धा मोबाईल अजिबात वापरत नाहीत याची माहितीही नसते !हाच तो मुख्य फरक आहे !
    चैन आणि गरज यातील फरक मुलाना समाजात नाही आणि खोट्या चढाओढीमुळे वातावरण फारच गढूळ झाले आहे !

    ReplyDelete
  2. Sanjsy Sonawani,
    Very nice intetpretatation!
    Some people think about development in wrong side, they do not know difference between peace of mind and physical comfortableness.

    ReplyDelete
  3. आप्पा - अहो बाप्पा , या या , सावकाश !खाचखळगे बघून या -
    बाप्पा - खरे आहे हो ! काय विशेष !
    आप्पा - नेहमीचेच ! संजय पुराण - विषय कोणत्या ओघात आलाय ? तर विषय चाललाय मोदी आणि त्यांचा विजय - त्यातच एक विषय - विकास !त्यांचाच मुद्दा होता ना ?पण संजयची खुबी अशी की उद्या हात झाडायला तो मोकळा , मी मोदींच्या संदर्भात बोललोच नाही !वगैरे !
    बाप्पा - पण एक मात्र खरे , संजय च्या सर्व मित्रांची दातखीळ बसली आहे - अविनाश , श्रुती शर्मा ,सांगलीकर , कारंजकर ,साठे ,अंकुश सुर्वे , सगळे चमचे पसार !
    आप्पा - विकास हा राजकारणात मुद्दा बनतो तेंव्हा तिथे मानसिक आणि आत्मिक विकासाच्या गप्पा मारून काय उपयोग ?
    बाप्पा - जाती परिवर्तनीय होत्या आणि आहेत या लेखात त्यांनी येशु ख्रिस्ताचा उल्लेख भविष्य पुराणात केला आहे असे म्हटले आहे पण त्याचे साल अंदाजे देण्याचे टाळले हीच
    संजयची खासियत आहे !
    आप्पा - भविष्यपुराण अतिशय अलीकडचे आहे !सह्याद्री खंड चे पण तसेच आहे !असो !
    बाप्पा - तर विकास हा राजकारणात येतोत्यावेळेस आत्मिक विकासाची चर्चा अपेक्षित नसते -
    बाप्पा - गरजा कमी करा म्हणजे काय ? टोपीच्या ऐवजी विनोबा भावे टायर दोरीला बांधून त्याची टोपी करत असत !आणि सूर्याच्या उष्णतेत पाणी गरम करून दुपारी २ वाजता आंघोळ करत असत !आप्पा - स्त्रियांनी आणि पुरुषांनी गरजा कमी करताना , छत्री आणि रेनकोट ऐवजी इरले वापरायचे काय ?म्हणजे कोणतीही सुविधा हा शापच समजून वागायचे का ? मग तसे करू लागलो तर फ्रीज , एसी ,फोन आणि मोबाइल डब्यातच जातील नेत अनावश्यक ठरेल ! गरजा कमी करा म्हणजे नेमके काय ?कुणालाही आत्मानंदाची गरज नाही!

    ReplyDelete
  4. संजय सर , आपली विधाने मूलतः जरी विचार करायला खाद्य देणारी असली , तरीही राजकारणी व्यक्ती ,नेहमीच सांघिक पातळीवर देशाचा उत्पादन आणि बाजार याभाषेत विचार करणार !
    आपण शिवाजी महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांची भेट झाली असे म्हणतो ,
    मग त्यांचा खून कसा झाला ? त्यांच्या मनातला विकास हा पांडुरंग भक्तीशी सुसंगत होता आणि महाराज जे राज्यकर्ते असल्यामुळे त्याना वेगळी स्वप्ने पडत होती हे उघड आहे !
    बाबा रामदेव आणि नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कल्पना वेगळ्याच असणार !विकास हा करावा लागतो ,
    भौतिक विकासात योजना आखाव्या लागतात - धरणे बांधावी लागतात , कालवे खोदावे लागतात , वीज निर्मिती करावी लागते ,रस्ते आणि जलमार्ग यांचा विचार करावा लागतो ! त्यासाठी निधी लागतो , आणि त्याचा विनियोग भ्रष्टाचार टाळून व्हावा लागतो !त्यासाठी राष्ट्रीय बना असावा लागतो !आणि तेच या सरकारकडून अपेक्षित आहे !
    सत्तेत आल्याआल्या , ३७० कलम या विषयावर चर्चा होणे आन एक धाडसाचा निर्णय घेणे अपेक्षित आहे ,सारे राष्ट्र एक , सारे धर्म एक आणि सर्वाना समान नियम ही काळाची गरज आहे !
    सर्व धर्म समभावाचा ओरडा करताना सर्वाना समान कायदा असा ओरडा का केला गेला नाही ?
    ही आणि अशीच आधीच्या सत्तेचा पराभव होण्याची मूळ !
    अल्पसंख्यकांचे फाजील लाड झाल्याने मुलायम आणि काँग्रेस यांचे प्रचंड नुकसान झाले आहे !
    या देशाची बांधणी करायला जे नवचैतन्य हवेआहे ते अशा समान कायद्याच्या भाषेतूनच मिळेल !
    विकास होण्यासाठी असा विचार जोपासला जाणे महत्वाचे आहे - विकास मग सोपा होत जाइल

    ReplyDelete
  5. बाई बाई ! कमालच झाली !मोदी साहेबांनी धडाकाच लावला आहे !
    ३७० कलमाचे प्रकरण मला खूप आवडले ,हे कलम रद्द झाले तर कितीतरी प्रकारे देश जास्त जवळ येईल आणि घट्ट एकसंध होईल !
    कायम मला वाटत असायचे की असे का बरे ?
    आईला सर्व मुले सारखीच , मग असे वेगवेगळे कायदे का ?
    मुस्लिम लौ आणि हिंदू कायदा असे का ?
    सर्व सत्ता हातात असताना काँग्रेसनेच असे लेचेपेचे काम का करून ठेवले ?आपला देश एक आहे का आणि नसल्यास तो लवकर लवकर एक कसा होईल या ऐवजी प्रत्येकाचा सवता सुभा उभा करायचे काय कारण ?भाषिक प्रांत रचनेने नेमके नुकसान झाले का फायदा झाला ?आपली भाषा म्हणावे तर आजकाल इंग्रजी माध्यमाने सर्व प्रकारच्या राहणीमान असलेल्या लोकाना भुरळ पाडली आहे ,आणि हिंदीनेही काळजी करण्यासारखे इतर भाषांवर आक्रमण केले आहे .
    तसे पाहिले तर काँग्रेस संस्कृतीत एक राष्ट्रीय स्पिरीट कधी दिसतच नाही !
    अमेरिका असो वा ब्रिटन , " निधर्मी संघराज्य " असले अवधड शिवधनुष्य उचलायचे प्रयत्न त्यांनी केलेच नाहीत ! लोकाना आपला देश हा आपल्या धर्माशी जोडलेला बघायला आवडतो ही अगदी प्राथमिक बाब आहे ! इथे अस्मितेचा प्रश्न येतो -मग त्यातूनच सणवार , पोषाख आणि भोजन आहाराचे प्रकार आणि पुढे जाऊन जीवनशैली -विचारशैली - कलाशैली ,काव्य नाट्य आणि चित्रकला अशी संस्कृती फुलत जाते
    समतेचा उदोउदो आणि असमतेचा विनाकारण अति बाऊ करण्याने आपल्याला योग्य अस्मिताच लाभली नाही !आपला संपूर्ण इतिहास हा जणू अन्याय आणि अत्याचार यांनीच भरला आहे असाच संस्कार आपल्यावर लादला गेला आहे !म्हणूनच सरकारचा जुन्याचे पूजन ही बाब टाळण्यावर जास्त भर दिसतो !
    आपल्या परंपरा आणि श्रद्धा या जणू असमता आणि अन्यायाचीच तळी उचलून धरतात असा विषारी प्रचार करणे आधुनिक समतेचे डोहाळे लागलेल्या समाजवादी आणि कोन्ग्रेसी सभ्यतेला सोयीचे वाटत गेले , आणि आपले सण आणि चालीरीती या फक्त पोशाखी ठरवण्यात त्यांचा सर्व वेळ त्यांनी घालवला !त्यातून समाजप्रबोधन होऊच शकत नाही फक्त परंपरा म्हणून त्यांचा आदर करण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय केविलवाणा ठरत गेला
    आजही नागपंचमी आणि संक्रांत ,दीपावली आणि नवरात्र याबाबत त्यांची धोरणे हास्यास्पद ठरतात ! मात्र त्याचवेळी संघ परिवाराने त्याच सणांचा समाज बांधणी साठी केलेला उपयोग स्वीकारार्ह वाटतो !- मग ते रक्षा बंधन असो किंवा विजया दशमी असो !समाजाला प्रतिकात्मक रुपात स्वतःची ओळख हवी असते - देश , धर्म , जात आणि प्रांत अशा सर्व पातळीवर आपण ते अनुभवतो !
    संघाचे कार्य चिकाटीचे आणि अफाट आहे !त्याचा तिरस्कार करण्या ऐवजी समजूतदारपणे अभ्यास व्हावासा वाटतो !आज अशी परिस्थिती झाली आहे की हा सर्व धर्म संभाव अतिशयोक्ती झाल्यामुळे तकलादू ठरला आहे !पाठ्यपुस्तकात त्या विचाराने केलेली इतिहासाची फेर रचना आणि पुनर्मुल्यांकन क्लेशकारक आणि विसंगत वाटते !

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...