Saturday, June 7, 2014

दहशतवादी....

दहशतवादी तत्वज्ञानाच्या पाय-या-

१. शत्रू गट निश्चित करणे.

२. त्याला बदनाम करण्यासाठी व्यापक मोहिम सुरू करणे. कडव्या कार्यकर्त्यांची ब्रेनवाशिंग करत फौज बनवणे.

३. त्याच वेळीस स्वता:च्या गत-संस्कृतीचे आणि त्यातील पुरातन असलेले-नसलेले महात्मे शोधून काढत त्यांचे भव्य उदात्तीकरण सुरु करणे. जात/पंथ/धर्म/राष्ट्र इत्यादि सहज भावनिक बनवता येईल अशा घटकांचा त्यासाठी आधार घेणे.

४. आपल्या सर्व अवनतींचे खापर शत्रू गटावर फोडत हिंसक असंतोष, पराकोटीचा द्वेष निर्माण करत राहणे. यासाठी अर्थातच "सत्य" या तत्वाची गरज नाही. आपण म्हणतो तेच सत्य.

५. सत्तेत येणे, सत्तेमद्धे शिरकाव करुन घेण्याचा प्रयत्न करणे अथवा सत्तेत सहानुभुतीदार वाढवणे.

६. शत्रू गटावर शारिरीक हल्ले सुरु करणे...हत्या करणे. हल्ले व हत्यांसाठी प्रबळ कारणे आधीच शोधून ठेवणे अथवा निर्माण करणे.

७. शत्रू गटाचा नरसंहार करणे.

या महत्वाच्या पाय-या जगभरच्या बहुतेक प्रकारच्या दहशतवादी, हुकुमशाहीवादी संघटनांनी वापरल्या आहेत. एकचालकानुवर्ती संघटन हे अशा गटांचे मुलभूत वैशिष्ट्य असते.

7 comments:

  1. RSS is one of them organization, Bajarang Dal, Abhinav Bharat, Vishwhindu Parishad, Shriram Sena, Hindu Sanskruti Sena are sister conserns.

    RJ Pathak

    ReplyDelete
  2. सोनवणी साहेब तुमच्या लेखाला (?) डावा जळफळाट इतकंच म्हणता येईल बाकी काही नाही.
    असो, चालू ठेवा, लोकं आता शहाणी होत चालली आहेत…. जुनाट idea of India ची ओझी उचलायला नकार देऊ लागली आहेत.

    ReplyDelete
  3. एका विशिष्ट व्यक्तीवर, गटावर टीका करायची मनात इच्छा असताना त्याला तत्वज्ञानाचे व्यापक रूप देण्याचा काही जण प्रयत्न करतात. आपल्याला न आवडणाऱ्या विचारसरणीच्या लोकांनी प्रचलित संविधानानुसार प्राप्त केलेली सत्ता मान्य करण्याचे मनाचे मोठेपण अशी मंडळी दाखवू शकत नाहीत. शक्यतो अशी मंडळी केवळ पुस्तकी ज्ञान देतात. त्यांचे व्यावहारिक अनुभव शून्य असतो.

    ReplyDelete
  4. सोनवणी सर थेट हल्ला करा आता आपण आडपडदा ठेवला तर ह्यांना आवर घालू शकणार नाही.
    “In such a world of conflict, a world of victims and executioners, it is the job of thinking people not to be on the side of the executioners.”
    - Albert Camus

    ReplyDelete
  5. very true....same applies to jaish e mohammad, lashkar e toyba, isi, etc....sonavani sir is right in pointing this out....this islamic terrorism should be rooted out
    shailesh

    ReplyDelete
  6. राष्ट्रीय स्वयंसेवी संघाला आणि त्याच्या पिलावळीला वरील लेख जबरदस्त फीट (fit /match) होत आहे, होय अगदी तंतोतंत!

    वेदांत

    ReplyDelete
  7. Ha ha . frustration at peak after namo became PM !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...