Sunday, October 12, 2014

मी कृतज्ञ आहे....

होय
मी कृतज्ञ आहे
पानाफुलांशी
ओहळ, निर्झर, महानद्या आणि दिगंतापर्यंत पसरलेल्या
तळ नसलेल्या सागरांशी
अगणित आकाशगंगा
आणि धरतीच्या कणाकणाशी
रोजच अंग निथळवणा-या सुर्यकिरणांशी
आत्मा चिंब भिजवत
आसमंत व्यापून राहणा-या
पावसाळ्याशी
कासाविस करणा-या वेदनांना
अंगाई बनणा-या शब्दांशी...

होय,
मी कृतज्ञ आहे
तुमच्या...माझ्या
सर्वांच्या हृदयांतून उसळत असलेल्या
मानवतेच्या
अखंड उद्गारांशी!

4 comments:

  1. सुंदर भैरवी !

    ReplyDelete
  2. अतिशय ओघवते गद्य काव्य - फारच छान !
    अजून लांबले असते तर अजून छान झाले असते
    आम्हाला अजून भिजवून गेले असते आपले बोल !
    आनंद झाला
    श्रावणात घन निळा बरसल्या रिमझिम रेशीम धारा ची आठवण झाली -
    जियो संजय जियो !

    ReplyDelete

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...