Thursday, November 13, 2014

चुंबन जिहाद !
"किस ओफ लव" हे कथित संस्कृती रक्षकांच्या दंडेलशाहीविरुद्धचे अभिनव आंदोलन प्रथम केरळात सुरु झाले. पाहता पाहता ते दिल्ली ते मुंबई येथेही पसरले. संस्कृतीरक्षकांनी दंडेलशाही, विकृत धमक्या अशा सर्व अस्त्रांचा वापर केला असला तरी तरुणाई मात्र मागे हटली नाही. भारतात सांस्कृतीक दंडेलशाही ही आजची नाही. रा. स्व. संघ व त्या परिवारातील बजरंग दलापासून ते विश्व हिंदू परिषदेने अनेकदा दडपशअही ते हिंसक घटनांतून सांस्कृतिक वर्चस्ववाद समाजावर लादायचे अनेक प्रयत्न केले आहेत. २००६ मद्ध्ये एम. एफ. हुसेनसारख्या जागतिक दर्जाच्या चित्रकारावर भारतमातेचे विवस्त्र चित्र काढल्याने  "धार्मिक भावना" दुखावल्याचे गुन्हेही दाखल केले गेले. त्यांची कथित वादग्रस्त (?) चित्रे लिलाव व त्यंच्या वेबसाईट वरुन काढून टाकायला सांगत शेवटी माफीही मागावी लागली. या कलावंताचा मृत्युही विजनवासात झाला. विश्व हिंदु परिषद आणि हिंदू जागृती समिती यामागे होती.

या संघटनांनी वेळोवेळी जे उपद्व्याप केलेले आहेत ते पाहता सामाजिक कलात्मक अथवा अभिव्यक्तीच्या भानावर गदा आणण्याचे यांचे प्रयत्न नवीन नाहीत. मुलींनी बारमद्ध्ये जावू नये, विशिष्ट प्रकारचे (अंगप्रदर्शन न करणारेच) कपडे घालावेत, सातच्या आत घरात इत्यादि सांस्कृतीक फतवेही काढले गेले. बलात्काराचे मुळ मुलींच्या वेषातच आहे असेही जावईशोध लावले गेले. अनेक (पुस्तके/संशोधनांसहित) कलाकृतींवरही घोषित-अघोषित बंद्या घातल्या गेल्या. अलीकडचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे वेंडी डोनिगर यांच्या "द हिंदू : अल्टरनेट स्टोरी" या पुस्तकाविरुद्ध प्रचंड गदारोळ उडवत ते पुस्तक मागे घ्यायला लावले गेले. यामागे संघाशीस संबंधीत "शिक्षा बचाओ आंदोलन" समिती होती. डा. रामानुजन यांच्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या प्रबंधावरही हिंदुत्ववाद्यांनी गदारोळ करत दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून या प्रबंधाला काढून टाकायला भाग पाडले गेले. अशी उदाहरणे अनेक आहेत.

म्हणजे लिखित वा कलात्मक अभिव्यकी ते व्यक्तीचे घटनेने दिलेले आचारस्वातंत्र्य यावर दंडेलशाही करत गदा आणण्याचे प्रयत्न नवे नाहीत. त्यासाठी धर्माचा आधार घेतला जातो. भाजपाचे शासन आल्यापासून या प्रकारांत तर चिंता करावी एवढी वाढ होत आहे. धर्माचे नांव घेत दंडेलशाही होते पण धर्मात असे खरेच आहे काय यावरही आपण नंतर चर्चा करुयात, आधी या "किस ओफ लव" या अनोख्या आंदोलनाचा उदय आणि प्रसार कसा झाला हे पाहुयात!

केरळमद्ध्ये सुरुवात!


केरळमद्ध्येही सांस्कृतिक दंडेलशाही नवीन नाही. २०११ मद्ध्ये विवाहित स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून एका तरुणाची धर्मवाद्यांनी हत्या केली. जून १४ मद्ध्ये एका रंगमंच अभिनेत्रीने सहकलाकाराबरोबर रात्री प्रवास केला म्हनून पोलिस स्टेशनवरच अडकवून ठेवले. जुलै २०१३ मद्ध्ये अलापुझा बीचवर "अनैतिक कृत्य" करत आहे या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्यात भर पडली ती जय हिंद या मल्याळी वाहिनेने कोझीकोडॆ येथील एका क्यफेच्या पार्किंगमद्ध्ये एक तरुण जोडपे प्रेमाराधना करत असल्याचा व्हिडियो प्रसारित केल्याने. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यावर संतप्त होऊन त्या क्यफेवरच हल्ला केला. मोडतोड व मारहानी केल्या.

सांस्कृतिक दंडेलशाहीचा हा नमुना पाहून केरळभरचे तरुण संतप्त झाले. हजारो तरुणांनी २ नोव्हेंबर रोजी कोची येथील मरिन ड्राईव्हवर "किस ओफ लव" आंदोलन छेडन्याची घोषणा केली. त्याप्रमाणे तरुण जमा झाले. आधी शांततामय मोर्चा काढला...पण पोलिसांनी तरीही पन्नास कार्यकर्त्यांची प्रतिबंधात्मक अटक केली. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही जमा झाले. त्यांनी अक्षरश शारीरीक बळ वापरत चुंबन घेऊ पाहणा-यांना अडवायला सुरुवात केली. पोलिसांनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांना अडवायचा कसलाही प्रयत्न केला नाही. उलट आंदोलकांनाच आत घातले गेले.

यामुळे तरुणांत अस्वस्थता पसरणे स्वाभाविक होते. आम्हाला आमच्या प्रेम करण्याच्या, प्रणयाराधना करण्याच्या हक्कापासून कोणीही रोखू शकत नाही हाच संदेश या "प्रेम-चुंबन" आंदोलनातून द्यायचा होता. सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन या आंदोलनाने प्रचंड लोकप्रियता गाठली. या आंदोलनापासून स्फुर्ती घेत त्याचे लोन दिल्ली व मुंबईतही पसरले.

दिल्ली एपिसोड

दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील पखुरी झहीर आणि अबार सुमित्रन या तरुणांनीही हे आंदोलन दिल्लीत करायचे ठरवले. फेसबुकवर आंदोलनाची तारीखही घोषित केली गेली. तरुणांनी लाखोंच्या संख्येत या घोषणेला प्रतिसाद दिला. दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थीही पुढे सरसावले. संघ परिवाराला हे सहन होणे शक्य नव्हते. आंदोलकांन अक्षरश: असांस्कृतिक अश्लील धमक्या जावू लागल्या. "चुम्माच कशाला, संभोगही द्या कि!" अशा अश्लील मागण्या आंदोलकांकडे वेबवरुन होऊ लागल्या.झहीर डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो...याच प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी आम्ही आंदोलन करत होतो...अशा हल्ल्यांनी, फोनवरुन दिलेल्या धमक्यांनी उलट आमचा निर्धार प्रबळ झाला." त्यातच कलकत्ता येथे एका तरुणीला केवळ मिनिस्कर्ट घातला म्हनून थिऎटरमद्ध्ये प्रवेश नाकारला गेला. याची प्रतिक्रिया कलकत्त्यातही उमटली. आंदोलकांचा निर्धार अधिकच प्रबळ झाला.

विरोधकांचे म्हणणे होते कि किस ओफ लव तोही रस्त्यावर हे आमच्या हिंदू परंपरांच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही या प्रकाराचा कठोर निषेध करनारच! पण तरुणांनी या निषेधाला न जुमानत, शिव्या-धमक्यांना न घाबरता ८ नोव्हेंबर रोजी रा. स्व. संघाच्याच कार्यालयासमोर हे आंदोलन छेडायचे ठरवले. सोशल मिडियावरुन संघपरिवाराच्या धमक्यांत वाढ होऊ लागली.

आंदोलनाच्या दिवशी हिंदू सेनेच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. पहिले चुंबन घेतले गेले तेंव्हा हाणा-मारीचाही प्रयत्न झाला. तरीही तरुण घाबरले नाहीत. पोलिसांनी यावेळीस अपेक्षित अशी पक्षपाती भुमिका घेतली. आंदोलकांना डी. बी. रोडवरून रा.स्व. संघाच्या कार्यालयाकडे जाण्यापासून त्यांनी आंदोलकांना अडवले. असे असले तरी आंदोलकांनी आपला निषेध नोंदवण्यात यश मिळवले हे येथे उल्लेखनीय आहे.

विरोध समजावून घ्या!

 "किस ओफ लव" हे आंदोलन म्हणजे कोठेही सार्वजनिक ठिकाणी चुंबने घेत फिरण्याला समर्थन देण्यासाठी तरुणांनी हे आंदोलन केले असे संघवाद्यांचे म्हणणे आहे. ते पुढे जावून म्हणतात कि पुढे हे सार्वजनिक ठिकाणी संभोगही करण्याचे आंदोलन चालवतील.याही पुढे जावून ते म्हणतात, तुमची मुलगी, बहीण सार्वजनिक ठिकाणी असे "चाळे करेल" तर चालेल काय? मला वाटते संघवादी मुर्ख आहेत. त्यांना या आंदोलनाचा मतितार्थ मुळीच समजलेला नाही. चुंबनाचे आंदोलन म्हणजे या तरुण आंदोलकांनाही सार्वजनिक ठिकाणी चुंबने घेत हिंडायची हौस आहे असे पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे संघाच्या कुजबुज मोहिमेचा एक भाग आहे. त्यांचा तर्क हा तर्कहीण आहे. गांधीजींनी पदयात्रा काढत मीठ उचललले म्हणजे त्यांना मीठ चोरायची हौस होती असे नव्हे. संघवादी स्थापनेपासून हिंदुत्ववादाची ढाल पुढे करत  ज्या पद्धतीने व्यक्तीगत आचरण आणि अभिव्यक्ती याबाबत जे स्तोम माजवत बंधनांची रेलचेल उभी करत आहे त्याचा असाच निषेध तरुणाई करु शकत होती. तरुणांनी हिंसकता दाखवली नाही. "प्रेमाचे चुंबन"...कोणाचेही जबरी चुंबन आंदोलकांना अभिप्रेतही नव्हते व नाही. तो आपला निषेध नोंदवायचा भाग म्हनुन तरुणांनी अंमलात आणला.

बरे, कायदा याबाबत काय म्हणतो? भारतीय दंड विधानाच्या कलम २९४ (अ) नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे हा दंडार्ह गुन्हा आहे व हा गुन्हा शाबित झाल्यास तीन महिन्यापर्यंतच्या कारावासाची शिक्षाही आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयाने चुंबन अथवा मिठी मारणे याला अश्लील म्हणता येणार नाही असा निवाडा रिचर्ड गेरे आणि शिल्पा शेट्टीच्या जाहीर चुंबनाबाबत दाखल केल्या गेलेल्या खटल्याच्या संदर्भात दिला आहे. (मार्च २००८). आलिंगन-चुंबन ही प्रेमाची स्वाभाविक अभिव्यक्ती आहे, त्याला अश्लील मानता येत नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

बरे, संघवाद्यांचा चुंबनाला विरोधच मुळात तत्वहीन आहे...दांभिक आहे. खुद्द वसुंधराराजे यांने किरण शा-मुजुमदार या उद्योजिकेचे जाहीर कार्यक्रमात चुंबन घेतले होते. भाजपावाल्यांच्या अशा चुंबनांची रेलचेल आहे. एका स्त्रीने दुस-या स्त्रीचे चुंबन घेणे हे तर संघवाद्यांच्या दृष्टीने महाभयंकर पाप....पण ते चालते. हा संघवाल्यांचा निखळ दांभिकपणा आहे.

धर्म काय होता?

वैदिक धर्मात यज्ञाभोवती सामुहिक संभोग कार्यक्रम चालत. किंबहुना यज्ञसंस्थेची निर्मितीच या लैंगिककतेतून झाली असे वि. का. राजवाडे यांनी "विवाहसंस्थेचा इतिहास" यात नोंदवून ठेवले आहे. कामातूर (कोणत्याही) स्त्रीला संभोग देणे हाच धर्म होय असे वैदिक साहित्य उच्च रवाने सांगते. एवढेच नव्हे तर स्वत:ची पत्नी अतिथीला उपभोगू देण्याचीही प्रथा एके काळी होती. यजुर्वेदातील अश्वमेध प्रकरणात अश्व व राजस्त्रीच्या संभोगाची जी अश्लील वर्णने आहेत ती आजच्या बीस्टयलिटी पोर्नमद्ध्येही सापडणार नाहीत. (यजुर्वेदातील हा भाग त्याच्या इंग्रज अनुवादकाने अनुवादितच केला नाही...त्यालाही तो अश्लील वाटला होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे.) "कुट्टनीमत" हा ग्रंथ तर तरुण मुलींना आदर्श वेश्या कसे बनवावे याचे प्रशिक्षण देण्यासाठीच लिहिला गेला आहे. संघवाद्यांना ही संस्कृती जपा असे कोणी सांगितले तर ते केवढे भडकतील बरे? संस्कृती म्हणजे कोणाची, कधीची याचे भान संघाला नाही. मग त्यांची सांस्कृतिकता तकलादू असणार हे उघड आहे.

खरे तर "कामसूत्र" हे जगातील या विषयाला पहिले पुस्तक. त्याची निर्मिती शिवाने दिलेल्या ज्ञानातून झाली असे वात्स्यायन ग्रंथाच्या सुरुवातीलाच सांगतो. कालिदास "कुमारसंभव" मद्ध्ये शिव-पार्वतीच्या प्रणयाची-शृंगाराची जी वर्णने करतो ती तर संघाच्या सांस्कृतिक व्याख्येनुसार अश्लील म्हणता येतील अशीच आहेत. त्याच्यावरही बंदी घालायची मागणी त्यांनी कशी केली नाही याचे मला आजही नवल वाटते. 

हालाची गाथासप्तशती तर मोकळ्या-ढाकळ्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब. त्यात पती, दिर ते बाह्य प्रेमिक यांच्या मोकळ्या ढाकळ्या शृंगाराची वर्णने काव्यात्मकतेने पुढे येतात. याचा अर्थ तत्कालीन समाजाला ते कधीही अश्लील वा अनैतिक वाटलेले नाहीत. एके काळी भारतात बहुजन वसंतोत्सव साजरा करत. तरुण-तरुणींनी काव्य-संगित मैफिली भरवाव्यात, उद्यानांत फिरावे, मनसोक्त श्रुंगार करावा...जोडीदार मिळवावा हा हेतू त्यामागे होता. तो वैदिकांनी आपल्या नैतिकतेच्या भाकड संकल्पनांपायी बंद पाडायला लावला.

म्हणजे लक्षात घ्या कि खुद्द वैदिक संस्कृतीच एवढी अश्लीलतेने भरली असतांना तेच सम्स्कृतीच्याच नांवाखाली साधे प्रेम-चुंबन-कपडे यावर बोट ठेवत दादागिरी करत असेल तर ते कसे चालणार आणि कोण सहन करणार? संस्कृती ही स्थिर नसते. त्री प्रवाही असते. अमुकच संस्कृती श्रेष्ठ हे ठरवायचे कसलेही मापदंड नाहीत. बलात्कार कपड्यांमुळे होत नसतात. त्यामागे हजारो सामाजिक/आर्थिक आणि मानसशास्त्रीय कारणे असतात. प्रेम करणे हा माणसाचा मुलभूत अधिकार आहे. त्यात निकोपपणा हवा, सेक्सपेक्षा आत्मिय प्रीत महत्वाची असावी ही अपेक्षा चुकीची नाही. पण त्यात अपरिहार्यपणे सेक्स असतोच. आलिंगन-चुंबन हे त्या प्रेमाच्याच आविष्काराचे भाग असतात. संस्कृत्या यामुळे बिघडत नाहीत. वैदिक संस्कृतीवर त्यांच्याच ग्रंथांचे दाखले देत, "हीच का तुमची संस्कृती?" असे जर आता तरुणांनीच विचारले नाही तरच नवल!

रा.स्व. संघ हा संस्कृतीचा उद्धारक नसून विनाशकर्ता आहे हे आता तरी आपल्याला समजावून घ्यावा लागेल. देशभरच्या तरुणांनी ज्या अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले याबाबत ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मनमोकळा समाज अस्तित्वात आणायचा असेल तर तरुणांना पुरेसे समंजस स्वातंत्र्य असलेच पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी प्रत्येक पालकावर...समाजावर आहे. संघाचे हे अ-सांस्कृतिक उपद्व्याप सर्वांनी मिळून थांबवावे लागतील याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

(साप्ताहिक "कलमनामामद्ध्ये प्रकाशित झालेला लेख)

40 comments:

 1. You are absolutely right. But i think the best way of supporting this, is perhaps, kissing your wife in public. What say? Why just write some blog? Take active part also. Then only people will believe you.

  ReplyDelete
  Replies
  1. Amit, I have already done that....kissed my wife several times in pubnlic!

   Delete
  2. I thought you were some kind of historian who needed proof for everything. Was wondering if above statement can be backed by some proof. It's just a request. Else people will not believe. Especially those vaidik guys.

   Delete
  3. Mr. Sanjay, give proof. Else don't make baseless statement.

   Delete
 2. आप्पा- अहो बाप्पा - चला चला लवकर लवकर !
  बाप्पा - काय शाल काय ?
  आप्पा - अहो शनवार वाड्यावर चला
  बाप्पा - कशाला ?
  आप्पा - अहो संजय सोनावानिला कुणी एकाने सल्ला दिला की आपल्या विचारांची सुरवात घरापासूनच करावी - आणि त्याला ते एकदम पटल आहे !आज तो आपल्या पत्नीचे चुंबन सर्वांच्या समोर शनवार वाड्यासमोर मस्तानीच्या साक्षीने घेणार आहे !
  बाप्पा - म्हणूनच तिकडे इतके ट्राफिक जाम आहे , कारण मी आपला अडकून पडलो होतो -
  आप्पा - चाल चाल - काय बोलतो ते तर ऐकू !
  बाप्पा - मात्र त्या अमितला मानला पाहिजे !चांगलाच टोला लगावला !
  आप्पा - संजयचे वैदिक आणि शैव चालूच आहे - अमित तरी काय करणार ?
  बाप्पा - अमित संजयला योग्य सल्ला दिला त्याबद्दल अभिनंदन ! इतकेच पुरे !
  आप्पा - नाहीतर संजय काय काहीही करत सुटेल -
  बाप्पा - मराठा आरक्षण रद्द झाले - सेलिब्रेट करणारच तो !

  ReplyDelete
 3. संजयजी,
  संघ वाले मुर्ख और प्रतिगामी है, क्या मुस्लिम मौलवी, ईसाई पादरी, बौद्ध भिक्खु और जैन आचार्य इसतरह के सार्वजनिक प्रेम प्रर्दशन के पक्ष में हैं.
  और तो और क्या आज के सबसे प्रगतिशील लोग अपने बच्चों को खुद पब ले जाते है या उसके लिए गर्लफ्रेंड और बोयफ़्रेंड खोज कर देते है. फिर सारी बददुआ और गालियाँ केवल संघवालो को ही क्यों? क्या यह हिप्पोक्रेसी नहीं है?
  दिनेश शर्मा

  ReplyDelete
  Replies
  1. मैं मेंरे धर्म के बारे में बोलुंगा.....मेरे धर्म मे स्वतंत्रता मेंरे लिये सर्वोपरी है!

   Delete
  2. Which is your religion? Vaidik or shaiv? Because if vaidik are opposing this why you are bothered? Because you are not vaidik. I am now confused.

   Delete
  3. My religion is Hindu which alternatively is said to be Shaivait. Vedic is distinct religion and the enforcers of the so-called Vedic culture needs to be stopped. They are loluting Hindu religion of mine!

   Delete
  4. Are all shaiv people ready to kiss in public? Because as you said your religion is hindu and that means shaiv, and you want freedom in your religion, then all people in your religion should agree to it. And give proof. Don't make baseless statement.

   Delete
 4. रा.स्व. संघ हा संस्कृतीचा उद्धारक नसून विनाशकर्ता आहे हे आता तरी आपल्याला समजावून घ्यावा लागेल. देशभरच्या तरुणांनी ज्या अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले याबाबत ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मनमोकळा समाज अस्तित्वात आणायचा असेल तर तरुणांना पुरेसे समंजस स्वातंत्र्य असलेच पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी प्रत्येक पालकावर...समाजावर आहे. संघाचे हे अ-सांस्कृतिक उपद्व्याप सर्वांनी मिळून थांबवावे लागतील याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

  ReplyDelete
 5. प्रिय संजयजी,
  गाथा सप्तशती में स्त्री के देवर और प्रेमी के साथ संबंधों का रस भरा वर्णन है जो शायद उस दौर की हकीकत रही होगी. किंतु समस्त विवाह कानून और भारतीय दंड विधान संहिता विवाह बाह्य संबंधों को अपराध और अनैतिक मानने है. क्या उसमें भी संघ वालों का दोष है? क्या हिंदु कोड बिल के रचनाकार डॉ. आंबेडकर प्रतिगामी थे?
  क्या तस्लीमा नसरीन को बंगाल से संघवालो ने निकाला था? क्या मकबूल फ़िदा हुसैन ने कभी किसी मुस्लिम आदरणीय देवता के नग्न फोटो उतारे थे? क्या जिस जगह उनकी मृत्यु हुयी, वहाँ उन्हें वह स्वतंत्रता हासिल थी? क्या कट्टनिमत रामायण और महाभारत की तरह मुख्य धारा का लोकप्रिय ग्रन्थ रहा है? क्या उसमें दर्शाये जीवनमूल्यो से आप स्वयं सहमत है? क्या वेंडी डोनीगर की किसी आपत्तिजनक लगने वाली पुस्तक पर सभ्य समाज के किसी न्यायालय से न्याय माँगना अपराध है?
  प्रिय संजयजी, आजादी की कामना प्रत्येक व्यक्ति की आदिम पिपासा है, किंतु परम्परावादी लोगों को केवल उनके विचारों के लिए लताड़ना उतना ही बुरा है जितना उनके द्वारा दूसरों को. इस मामले में सभी तथाकथित आधुनिक विचारक अपने विरोधियों की बात समझे बगैर उनपर अपने विचार थोपते रहते है. उनके मामूली विरोध को भी मिडिया की सहायता से फुगाया जाता है और स्वयं की खोखली वीरता के तराने गाये जाते है. जब किसी महिला के साथ बेइज्जती होती है, ये सभी आधुनिक वीर पुरुष कहाँ चले जाते है?
  सभी धर्मो के विचारक अपनी अपनी तथाकथित आधुनिकता का रंगपेंट केवल हिंदुओं के कपडों पर ही क्यों उतारते है? आपको ये अधिकार है कि आप अवश्य अपनी आधुनिकता का बखान करें. लेकिन क्या यह दूसरों को मुर्ख, प्रतिगामी, बदमाश, अत्याचारी, षड्यंत्रकारी समझे बगैर नहीं हो सकता?
  दिनेश शर्मा

  ReplyDelete
  Replies
  1. Your examples of Muslims are irrelevant here. Your comments regarding constitution are meaningless because the constitution allows enough freedom to the individuals that the so called Vedic culture of recent centuries does not. I again will reiterate that meddling with individual freedom is a crime under our constitution. You may like to get it changed....but then see the eruption of the protests, such as of now!

   Delete
 6. आप्पा- पुष्पा ताई म्हणाल्या , आमचे हे थापाडे आहेत
  बाप्पा - हो तेच ना !
  आप्पा - उगीच आपला मुद्दा खरा करण्यासाठी काहीही कोटे बोलत असतात
  - म्हणाल्या , आमचे हे खोटारडे आहेत - तसलं त्यांनी काहीही केले नाही - कधीही !
  बाप्पा - माझ्या फोटोचे जरी त्यांनी अवग्रहण चार चौघात केले तरी मानला म्हणेन मी !
  बाप्पा - अहो काहीही थापा मारत असतात आमचे हे - उगीच वादाचे साल पिंपळाला लावत बसतात - अगदी लहान असल्यापासून त्यानां विकृती आहे - वैदिक आणि शैव अशी बडबड करण्याची !
  आप्पा - असणारच हो पुष्पाताई - तुमची सहनशक्ती मानली - तू कीते करता माका समजेनाच ! - हा असा बावरा - वैदिक वैदिक करत बरळत असतो - आता सिनेमा काढणार म्हणतो -गोडसे आणि गांधींवर - तुम्ही जरा जपूनच बर का पुष्पाताई - हिंदी आणि इंग्लिश म्हणजे - "गांधींच्या तोंडी
  " पुष्पा , रो मत पुष्पा - आय हेट टीयर्स "असले वैदिक डायलॉग मारतील आणि त्यांचा शैव धर्म संकटात आणतील - जरा जपून -

  ReplyDelete
  Replies
  1. Reply to me first. Else I will call you liar as you make baseless statement.

   Delete
 7. अहो , संजय शेठ , का हो अस करता आणि पुष्पाताईनां अडचणीत आणता ?
  नंतर म्हणाल तिच्या फोटोचे अवग्रहण केले होते , आधी भडक बोलायचे आणि नंतर पळवाटा
  काढायच्या हा तर तुमचा हातखंडा उद्योग !असे चार चौघात बोलणे बरे नाही - बर एक सांगा - इथे शैव - वैदिक कुठे आले ? खरच तुमच डोकं फिरलंय असं आप्पा बाप्पा म्हणतात ते खर आहे !
  तुम्ही धाडसी असाल - कदाचित युरेका युरेका म्हणत तसेच पळाले असाल आणि नंतर तुम्हाला आठवण झाली असेल - अरेच्च्या ! हे तर पूर्वीच घडलंय ! नंतर तुम्ही तो आर्किमिडीज ग्रीक कसा नव्हता आणि शैव कसा होता ते सिद्ध करत बसला असाल !- तो भाग वेगळा !पण -

  अस करू नये - दिनेश शर्मा म्हणतात ते खरे आहे - आमच नाही निदान त्यांचे तरी मानत जा !
  खरेतर तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे - मानसिक संतुलन बिघडल्या सारखे आपण काहीही बोलत सुटता !नवीन सिनेमा काढणार आणि गोडसे गांधीवर - म्हणजे कहरच आहे - काळ कुत्र सुद्धा फिरकणार नाही थिएटरात त्या गोडसे गांधीला बघायला !- अहो ती कथा जुनी झाली - आता नवीन काहीतरी पाहिजे - एक साधी मजा बघा - आजकाल सिने संगीतातून तबला गेलाच - तसेच असले विषयही गेले !- "पुष्पा , आय हेट टियर्स " हे पण आता जुने झाले - बघा पटतंय का ते -
  एक मात्र अगदी शंभर टक्के खरे बर का ! -
  दिनेश शर्मा आणि आप्पा बाप्पा - असे काही तुमच्या श्रीमुखात भडकवतात - की तुमची बोलटी बंद होते - कारण त्यांचे विश्लेषण इतके बिनतोड असते की तुम्हाला काहीच करता येत नाही - मग तुम्ही फ़ेसबुकचा आधार घेत पळ काढता - आम्हाला तुमचा अभिमान तर दूर - तुमची अशावेळी कीव येते -

  आणि संजय शेट - तुमची पुस्तके इतकी बोअर आणि फालतू का असतात - याच विषयावर अनेक थोर लोकांनी उत्तम लिखाण केले आहे मग ते मोहोन्जोदारो असो किंवा शिवाजी - सरस्वती नदी असो वा ऋग्वेद - तुम्ही पुरते गोंधळलेले असता - आणि अगदीच पांचट सिद्धांत मांडत असता !
  तुमचा गोडसे गांधी सिनेमा तर केवळ १५ कोटीचा चुराडा असणार आहे !
  तुम्हाला झेपणार आहे का हा विषय - ?
  आज जवळजवळ सर्व समाज मानतो आहे की म गांधी कितीही थोर असले तरी त्यांनी अनेक चुका केल्या ! ते आज कुणीही नाकारू शकत नाही -आज भाज प सरकार सत्तेत आले याचा अर्थच नवीन समाज हे मानतो आहे की नेहरू गांधीनी देशाची वाट लावली - आणि गोडसेने एक कडवट कर्तव्य पार पाडले !
  तुम्ही एकदा राम कृष्ण म्हणता की शैव आहे - एकदा म्हणता कोल्हापूरची देवी आणि तिरुपतीचा बालाजी असा संबंध आहे कधी म्हणता आदिशक्ती आणि कोल्हापूरचा संबंध आहे - - खरच तुम्ही डोके तपासून घ्या !- तुमचे उत्तर तितकेच जाज्वल्य असणार - कारण तिखट प्रत्युत्तर हा तुमचा स्थायीभाव आहे !

  ReplyDelete
  Replies
  1. Great entertainment...your comment...thanks!

   Delete
  2. First give proof to your statement regarding your act of kiss in public. Else don't make baseless statement. And stop your claim of historian. You will be called as liar henceforth till you give proof. And also tell if all shaiv people agree with you. Else stop making baseless statement.

   Delete
  3. I am not LIke Modi to get selfies or being photographed of my every acts. Perverted people only can demand such stupid proofs.

   Delete
  4. Mind your language first of all. I am asking for proof of your public act and that too after you made a statement. If you are not ready to give proof take back your false statement. I have today again proved that you are a liar. And also prove that all shaiv people are ready to kiss in public. Else don't make statement on behalf of your hindu religion.

   Delete
 8. सध्या भाजप सत्तेत आल्यापासून अनेक लोक दिग्मूढ झाले आहेत - संजय सोनावणे हे पण त्यातलेच एक - त्याना समजतच नाही की ज्या तरुण वर्गाने भाजप ला निवडून दिले ते काय संदेश देत आहेत ?
  १-शैव वैदिक असल्या किरकोळ बिनडोक चर्चेत त्याना अजिबात रस नाही
  २-त्या तरुणाना जातपात मान्य नाही आणि त्यासाठी वर्षानुवर्षे उगा काथ्याकुट करत बसण्याची त्यांना गरजाही वाटत नाही तथाकथित जात पंचायती मध्ये ब्राह्मण वर्गाचा काहीही हात नाही
  ३-धर्म हि त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट नाही ,मानवता हा त्यांचा धर्म आहे आणि त्यांना ब्राह्मण वर्ग हा तितका प्रचार केल्या प्रमाणे घातक वाटत नाही उलट अत्यंत समंजस अशी ब्राह्मण वर्गाची प्रतिमा प्रस्थापित होत आहे आणि नेमके हेच संजयचे दुखणे आहे
  ४ आजरोजी बहुतांशी जातीना आरक्षण आणि इतर फायदे अनेक वर्षे मिळत आहेत तरीही समाज सुधाराकाना अपेक्षित सुधार या आरक्षणामुळे घडून आलेला दिसत नाही त्यातच मराठा समाजाने राजकारण केल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे आणि मेटे प्रभूती जी बिनडोक विधाने करत आहेत त्यामुळे खरोखर त्यांच्या घटनेच्या अभ्यासाविषयी शंका निर्माण होते आहे
  ५ - नारायण राणे आणि काँग्रेस यांचे वक्तव्य त्यांना अजूनच अडचणीत आणत आहे त्याच वेळी भाजप मुख्य मंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत नियोजित आणि सावध वाटते -
  ६-अजूनही कोणत्याही राजकीय पक्षाने शैव वैदिक वाद हा महत्वाचा मानलेला नाही तसेच इतर सामाजिक संस्थांनी त्यात रस घेतलेला नाही - संजय सोनावणे यांचे ते स्वतःचे करमणूक करून घ्यायचे एक खेळणे आहे अशी जनतेची ठाम समजूत झाली आहे त्यामुळे त्यांचे चांगलेच हसे होत आहे - आम्हाला संजय विषयी आत्मियता आहे त्यामुळेच आम्हाला वाटते की त्याने अजूनही चिंतन करून असे फुकाचे वाद विसरून जाउन अत्यंत प्रामाणिक पाने भौतिक व्यावहारिक प्रगती बद्दल योजना मांडाव्यात - त्या भरीव असाव्यात - नदीजोड प्रकल्प सारखे मुद्दे अभ्यास करून त्यावर मते नोंदवावीत , त्यांच्या शैव वैदिक वादाकडे कुणीही लक्ष देणार नाही किंवा त्यांच्या गांधी गोडसे चित्रपटाने काहीही मूलभूत विचार मंथन होणार नाही - कारण तो वाद पं मोदी यानी कधीच मोडीत काढला आहे

  ReplyDelete
  Replies
  1. First produce proof of your public kiss else take back your false statement.

   Delete
  2. समीर हा घाटगे आहे की गाडगीळ?

   Delete
 9. अमित , तुमच्या आग्रही भूमिकेला तुम्ही मुरड घातली पाहिजे आणि संजय सोनावणी याना विनंती करूया - की त्यांनी शनिवार वाड्यासमोर एकदा आपले शब्द खरे करून दाखवावेत - किती सोपे आहे ?बिचारे !

  मूळ मुद्दा तो बनवायचा आणि शब्दांचा चिखल करत भावना भडकवत रहायच्या - हा तर संजय सोनावणे यांचा चमत्कारिक खेळ आहे -मी शहाणा - मीच शहाणा - एकमेव मीच शहाणा - असे जर कुणी वेगवेगळ्या प्रकारे म्हणू लागले तर त्याला लोक जोकर म्हणतील तशी अवस्था संजय यांची झाली आहे - आपल्या बोलण्यात सातत्य असावे हे पण भान त्याना नसते - परशुराम , रावण कृष्ण यांचे मूळ अस्तित्वाबद्दल त्यांचे विचार विचित्र असतात असे नव्हे तर ते सदोष असतात -

  दुसरी गम्मत अशी आहे की संजय स्वतःला एक उच्च इतिहास संशोधक समजतात -आणि मिरवतात त्याची फारच चेष्टा होत असते - फुकटात अध्यक्ष म्हणून त्याना लोक निवडतात याचे पण त्याना भान नसते -
  सध्या मजेची गोष्ट अशी आहे की सर्व आंबेडकरवादी मूग गिळून गप्प आहेत - कारण जनतेने त्याना सपाटून मार दिला आहे - आता संजय म्हणत आहेत की ५ वर्षे थांबा - त्यांचे सुखद स्वप्न असेल की भाजप ची ५ वर्षानंतर गच्छंती होईल - पण तो भाग कार्य कुशलतेचा असेल तत्वाचा नाही - तरुणाईने ज्याना आज नाकारले आहे तीच तरुणाई जर परत जुन्या खोदडाना परत निवडून आणेल तर तो पराभव कार्य क्षमतेच्या बाबतीतला असेल -
  आता हीच गम्मत बघा - श्री रा रा मेटे साहेब किती बाष्कळ बोलत आहेत ? त्यांचे बोलणे ऐकतना भरपूर करमणूक मात्र होते ! पण त्यांना इतके समजत नाही की आपल्याला या राजकारणात काडीचीही किंमत नाही - त्यांना जनतेने नाकारले - त्याचा अर्थच त्यांना समजला नाही - तीच गोष्ट राजू शेट्टी यांची ! मतदार तेच आहेत यांनीच काँग्रेस ला डोक्यावर घेतले होते , पण शिशुपालासारखे त्यांचे १०० अपराध भरले आणि ते बाजूला फेकले गेले - ते कायमचेच असे आमचे अजिबात म्हणणे नाही - पण शैव वैदिक सारखी फालतू बडबड मात्र जनतेला कधीच मान्य होणार नाही !हिंदू कोण हेपण ठरवायचा हक्क संजय याना कुणी दिला - कायदा काय म्हणतो ?कायदा बदलायची ताकद संजय मध्ये आहे का ?
  आधी मूलतः आजच्या सामाजिक बांधणीत या वादाची गरज किती आहे ?लोकाना धर्माची गरज किती असते याचा निवांत विचार आज करायला गेले तर हाती उत्तर काय लागते ते फारच गमतीदार आहे - आणि ते चिरंतनही आहे -धर्म हि करमणुकीची गोष्ट बनली आहे आणि ती तशीच असली पाहिजे - कारण धर्मातून समाज प्रबोधन करण्याचे दिवस १०० वर्षापूर्वीच संपले आहेत -आज कीर्तने , भजने आणि प्रवचने यांच्यात जी उपस्थिती दिसते ती केवळ आत्मसंतुष्टता फुलवण्याचा एक प्रकार आहे - कुणीही खरेपणाने यामुळे ईश्वर भेटतो असे म्हणणार नाही - मग तो शैव असो नाहीतर वैष्णव किंवा वैदिक -
  खरेतर गोष्ट इतकी सुटसुटीत आहे - पण संजय ती मान्यच करत नाहीत - हिंदू असा खरोखर धर्म आहे का ?- त्याचे उत्तर नाही असेच आहे , खरोखर देव असा कुणी आहे का - त्याचे उत्तर नाही असेच असणार - शैव फार थोर आणि वैष्णव अगदीच फालतू असे काही आहे का ? - नाही- वैदिकांची मते त्यांच्यापाशी लखलाभ असूदेत -
  हिंदू हा धर्मच नाही असे म्हटल्यावर शैव म्हणजेच हिंदू असे उर बडवून घेण्यात काय अर्थ आहे - पण अशावेळी संजय तोंड बंद ठेवतो आणि दुसराच कुणीतरी अविनाश किंवा दवे उभा राहातो - ऊत आल्यासारखा तो वाद फोफावत नेतो - ब्राह्मणांचा उद्धार करतो - हे तंत्र संजयने अनेक वेळा अनुभवले आहे - चोखाळले आहे - आणि तो त्याचा तोंड बंद करण्याचा हुकमी मार्ग बनला आहे - त्यामुळे अमित सर , संजयचे मत खोडत बसण्यात काहीही अर्थ नाही - कुणापुढे गीता वाचायची तेपण आपण अनुभवाने सांगू शकतो !नाही का ?
  नाहीतर कालचा गोंधळ बारा होता म्हणायची आपल्यावर वेळ येते !-हो की नाही संजय सर ?

  ReplyDelete
 10. श्री दिनेश शर्मा , श्री अमित आणि श्री माननीय संजय सोनावणी ,
  मी काही गोष्टी आपणास विचारू इच्छिते -
  सांस्कृतिक धार्मिक दंडेलशाही ही गोष्ट काही आजची नाही त्याला तरुणाई विरोध करते हेही नैसर्गिक आहे असे म्हटले जाते - यातूनच पुढे स्वातंत्र्याची कल्पना मांडत मुक्त समाजाची स्वप्ने - पण पुढे काय ?- आणि त्यात शैव - वैदिक कसे आणता संजय राव ? कमाल आहे तुमची !
  मुस्कुटदाबी ही काही रा स्व संघाच्या स्थापनेपासून सुरु नाही झाली - तुमच्या सारख्या इतिहास संशोधकाने त्याचे मूळ तुमच्या स्वभावानुसार सरस्वती नदीच्या आसपास शोधले पाहिजे - किंवा मोहन्जोदारो मध्ये - तिथे लिंगपूजा होती त्या आधारावर मूळ समाज मुक्त कसा होता ते सांगता आले असते - कदाचित गोडसे गांधी मुळे तुम्हाला वेळ होत नसेल
  तो पण एक फार्स आहे म्हणा !१०० टक्के फसणारा !
  अहो तुमची कुवत काय - तुम्ही उडी कुठे मारताय ?आणि हो त्या सिनेमाचा शिनेमा करू नका , जरा गोडसे तरी शुद्ध बोलेल याची काळजी घ्या - तुमच्या हट्टापायी तुम्ही काहीही बोलता सांगता हे दिसतेच आहे - पण गोडसेला " आनि पानी " करायला लाउ नका - आणि गांधीनाही ( !"म्या इचार केला बग की या बांडगुळा ला टपकलाच पाहिजे बग -" असे गोडसे आपटेला सांगतोय असे नको ! )
  आपल्याकडे प्रसंगांची इतकी रेलचेल आहे की आपले म्हणणे पुढे रेटण्यासाठी पुराणे , महाभारत यात संदर्भासाठी काहीही उपयोगी पडेल अशी अवस्था आहे - मारुतीचा जन्म ( आणि तो तर तुमच्या शंकराचा अवतार आहे असे संजय सोनावाणीच म्हणतात ) ,पांडवांचा जन्म अशी मजा मजा आहे - म्हणून आज त्याच्या संदर्भाने आपण वागू का ?तुमच्या घरात तुमच्या भावाने कर्ज वसुलीसाठी तुमच्या पत्नीचे वस्त्रहरण करणे हे ऐतिहासिक संदर्भाने आज योग्य ठरवता येईल का ?

  कोणतीही नैतिक मुभा घेताना समाज तितका परिपक्व झाला आहे का हे तपासणे तुमच्या सारख्या परिपक्व विचारवन्तांचे काम आहे असे जर कोणी म्हणाले तर ते गळचेपीचे धोरण आहे का ?

  गप्पा मारणे सोपे आहे हो ! जर सर्व्हे केला तर आपण ठामपणे सांगू शकता का की या मुलांचे हे चुंबन जिहाद त्यांच्या घरच्यांच्या पाठींब्याने होत आहे ?ज्यांच्या जिवावर ते शिकत आहेत त्यांच्या विरोधात राहून असले चाळे करताना या मुलाना जबाबदारीची जाणीव कशी होत नाही ?

  डॉ आंबेडकर आणि इतरांनी सार्वजनिक शांततेबाबत कायदा करताना जे तारतम्य ठेवले आहे त्याचा आदर करूया !


  जसे डॉ दाभोळकर म्हणत त्याच प्रकारे तुम्ही सांगत आहात की "माझी सीमा फक्त हिंदू पुरती मर्यादित आहे" - असे का ? आणि कायद्यानुसार वैदिक हे हिंदूच आहेत त्याचे काय - तुम्ही कितीही प्रचारकी भाषेत सांगितले की वैदिक हे देशाला कलंक आहेत तरीही हिंदू म्हणजे फक्त शैव किंवा शैव म्हणजेच हिंदू हे कधीच कायद्याने मान्य होणार नाही किंवा जनतेलाही पचणार नाही !
  तिरुपतीचा बालाजी काय मुस्लिम समजायचा का ?
  अमेरिकेत काय घडले ते आपल्यापुढे ज्वलंत उदाहरण आहे - हिप्पी संस्कृतीमुळे काय झाले ?
  खरोखर समाज क्रांती -सांस्कृतिक रेनासन्स - झाली का ? "चुंबन जिहाद " हे पण मिडीयाचेच बालक आहे - अगदी अण्णा हजारे सारखे -अहो एक सांगा - आय आय टी किंवा अशाच थोर शिक्षण केंद्रातून खाजवायला वेळ नसतो - आणि असले चाळे करायला कोण वेळ वाया घालवेल ?
  मिडीयाने आजपर्यंत अनेक गप्पा मारल्या तेहेलका,जमिनीतून सोने निघणार ,आसाराम , दिल्लीतील हजारे यांचे उपोषण , काय झाले -?नुसतीच प्रसिद्धी - चार क्षण मजेत गेले इतकेच !
  आता एकच सांगा -
  एखादा तरुण त्याच्या बायकोशी चुंबनाच्या पुढची पायरी गाठत एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आगळीक करू लागला तर कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्यावर पोलिस कारवाई करू शकतात ते योग्य की अयोग्य ?म्हणजेच तुमची आणि संघाची नैतिक बाबीं बद्दलची कल्पना वेगवेगळी - म्हणजे थोडी मागेपुढे आहे इतकेच !

  कोणाची - तात्पुरते तुमचीच असे समजा - मुलगी सार्वजनिक ठिकाणी समजा खुलेआम संभोग करू लागली आणि संघाच्या भागवत महाशयांनी किंवा मोदींनी तिला काही चार खडे शब्द सुनावले तर तिच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होईल का ते स्पष्ट सांगा - आणि तसे प्रात्यक्षिक ताबडतोब करून दाखवा !

  उत्तर देण्याची तुमची मनोवृत्ती नाही हे माहितीच आहे

  ReplyDelete
 11. तथाकथित संस्कृतीरक्षकांची (वैदिकांची) फारच गोची करून टाकता तुम्ही, सोनवणी सर.
  त्यात आता गोडसेची चड्डी तुम्ही उतरवायला निघालात....
  किती छळता?
  अप्पा-बाप्पा आदि समस्त रक्षकवृंद तरी किती ठिकाणी ठिगळे लावीत फिरणार?
  ऋग्वेदात, मोहेंजोदडोत, वैदिकधर्मात, सरस्वतीत, संघात कि गोडसेत? कुठे कुठे ठिगळे लावणार?

  ReplyDelete
  Replies
  1. राकेशजी, तुम्ही अतिशय उत्तम पणे खरडपट्टी काढली आहे! धन्यवाद!

   Delete
 12. You are absolutely right. Poor vedic fellows. But then why the greatest historian of our time runs away from giving proof and so makes baseless statement?

  ReplyDelete
 13. अमित,
  भुसनळ्या, आगाऊ, चावट माणसा तुला थोडी तरी अक्कल आहे की नाही? कशाचे proof तू मागत आहेस, याचे भानच नाही तुला! kiss बघायची जास्त खुमखुमी आली आहे काय तुला? मुर्खा, तुला जास्तच खुमखुमी आली असेल तर सोनवणी यांच्या घरी जा! त्या नवरा-बायकोला घेऊन जवळच्या चौकात जा आणि public मध्ये ते नक्कीच kiss घेतील यात काडीमात्र शंका वाटत नाही! kiss बघायची तुला एवढी हौस? सुधर लेकाच्या सुधर, बावळट पणा खूप झाला तुझा, बालिश पणा आता तरी सोडून दे, म्हणजे कमावले! proof मागतोय proof !

  ReplyDelete
 14. I am asking proof of public act and that too after sanjay made the statement. Also please use proper language. And if he can't produce proof then he must take back his baseless statement. Also he had to prove that all shaiv people are ready to kiss. Else he should not speak on behalf of his so called hindu religion.

  ReplyDelete
 15. Amit, are you mad? You must think several times before write a single sentence, understand.

  ReplyDelete
 16. What's wrong in asking for proof? Or is sanjay some kind of authority who should be blindly trusted? Why is he afraid of giving proof? Else take back his baseless statement. Also he must prove that all shaiv people are ready to kiss in public. Else he should not make statement on behalf of his hindu religion.

  ReplyDelete
 17. अहो लिहा वाचा , काका ,काय
  जरा दमाने , उगीच तावातावाने लिहून काय साधणार आहे ?त्यात काय पुरुषार्थ ?आणि समजा ,

  कुणी संजय कडे पुरावा मागितला तर चुकले कुठे ?ती गोष्ट ते खाजगी मानत नाहीत -त्यामुळे पुरावा मागण्यात काहित गैर नाही - विकास आणि तुम्ही इतके का चिडता - अमित अगदी योग्य प्रश्न विचारात आहे - तुम्हीच तारतम्य सोडून भडकपणे काहीतरी बरळत आहात असे सांगावेसे वाटते -तुम्ही संजयाच्या पठडीतले दिसता - किंवा एक काम करा - तुम्हीपण संजय सारखेच वागून दाखवा !

  राधाकृष्णाचे प्रेम हे सौम्य आणि लाघवी आहे तो पर्यंतच तो संतांच्या कौतुकाचा आणि भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो , समजा , त्यात अश्लील लिखाणाचा भाग आला तर त्याची किंमत कवडीसमान होते हे उघड आहे - संजय सरांचे चुंबन जिहादचे भडक फोटो छापून लिखाण त्या श्रेणीतील वाटते !

  सध्या त्यांच्या कोणत्याच लिखाणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे ते मधेच आरक्षण , मधेच चुंबन जिहाद असे खेळत बसतात - त्यांची कीव येते -  पण म्हणून तुम्ही खालच्या पातळीवर जाउन आपले लिखाण बिघडवू नये हि विनंती!


  ReplyDelete
 18. मोहिनी परकर या नावाने लिहिणाऱ्या नराधमा, तुला येथे तोंड खुपसायला कोणी सांगितले आहे? नको त्या गोष्टीचे proof मागायला या अमितला जनाची नाही तर मनाचीही कशीकाय लाज सुद्धा वाटत नाही? हे मात्र समजायला मार्ग नाही! संजयजी या मूर्खांच्या नादाला लागून तुम्ही पुरावा देण्यासाठी पुढे येण्याची अजिबात आवश्यकता नाही. यांनी लाज पार सोडलेली आहे, म्हणूनच वारंवार तेच ते proof चे तुणतुणे यांनी लावलेले आहे. यांचा धिक्कार जेवढा करावा तेवढा थोडाच आहे! kiss चा आणि कोणत्याही धर्माचा येथे काडीचाही संबंध नाही, हे मात्र आपण विसरलेलो आहोत, नाही काय? एखाद्याचे मत वैयक्तिक असेल तर त्याचा संबंध धर्माशी जोडण्याचा अट्टाहास का?

  ReplyDelete
  Replies
  1. Why should i be ashamed of asking proof of kiss, if Mr. Sanjay is ready to do the act in public? And he himself said, that he kissed in public. And he said that he dont want such Vedik compulsions in his religion. And then he himself said, he belings to Hindu (Shaiv) religion. In that case, he is making statement on behalf of his religion. If he had said that he dont want such vedik compulsions on his personal life then its ok. But he says: "मैं मेंरे धर्म के बारे में बोलुंगा.....मेरे धर्म मे स्वतंत्रता मेंरे लिये सर्वोपरी है!" . So he has to prove that all people in his religion think in his way.

   Delete
 19. अहो लिहा वाचा , फारच बोअर करत आहात
  संजयला इतका आनंद झाला आहे आपल्याला कुणीतरी अमित वगैरे सार्वजनिक रित्या पुष्पाचे चुंबन घेण्यास सांगत आहेत याचा - आणि तुम्ही सर्वांनाच नावे ठेवता आहात -
  त्या पुढच्या संस्कृत वरच्या लेखात तर तुम्ही जी गाडी डबल स्पीडने सोडली आहे - मूळ विषय काय आणि तुम्ही काय रेकॉर्ड लावली आहे - अहो ज्याला जे परवडते आहे ते तो करेल - ज्याला सार्वजनिक चुंबने घ्यायची आहेत तर तो तसे करेल - अजून कोणाला सार्वजनिक रित्या आपल्या सखीला आसाराम बरोबर नाचवायचे असेल तर तो तसे करेल - कोणी कुठे थांबावे हेपण तुम्हीच ठरवणार का - हे म्हणजे संघाच्या वरताण झाले - धर्माच्या बुडण्याची चिंता करत बसू नका - बघता काय सामील व्हा - लढ बाप्पू !
  हे बरोबर नाही !
  आजच्या महागाईच्या दिवसात हीच स्वस्त आणि मस्त करमणूक आहे
  सर्विस टक्स नाही , एकदम धमाल , तुम्हीपण कुणाला तरी घेऊन याच - मज्जा !

  ReplyDelete
 20. मोहिनी परकर इथे काही करमणूक चालू नाही. तुम्हाला बोअर करण्यात तर अजिबात रस नाही. मज्जा करण्यासाठी लिहित असाल तर तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा! चालू ठेवा तुमचे रडगाणे अव्याहतपणे.........

  धन्यवाद!

  ReplyDelete
 21. अमित आता कुठे शेपूट घालून पळाला? कुठेतरी kiss बघायला मिळाला वाटते!

  ReplyDelete