Thursday, February 11, 2016

मग गांधीजींनाच नेमके ठार का मारले

हिंदू गांधीजींची वैदिक नथुरामाने का हत्या केली?

निरंजन टकले यांच्या वीकमधील "Lamb Lionised" हा लेख प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाने सावरकर भक्त संतापले. टकले यांच्या लेखातील उणीवा शोधण्याची स्पर्धाच लागली. असेच एक खंडण करण्यासाठी माझे मित्र अभिराम दीक्षित यांनी दोन लेख लिहिले. "लाला लजपत राय - फाळणीचे कट्टर समर्थक" हा लेख त्यात महत्वाचा आहे. त्यांचे अभिनंदन. तो लेख सर्वांनी मुळातुनच वाचावा. http://drabhiram.blogspot.in/2016/02/blog-post_11.html

हा लेख एका सावरकरप्रेमीने लिहिला असल्याने त्याचे महत्व जास्त आहे. या लेखात त्यांनी दिलेले काही मह्त्वाचे मुद्दे आणि त्यालाच जोडून अधिकची माझी माहिती खालीलप्रमाणे मी देत आहे.

१) लाला लजपत राय यांनी १९२४ साली सर्वप्रथम फाळणीची योजना मांडली. त्यांच्याच मुळ योजनेप्रमाणेच फाळणी झाल्याचे दिसते.) १९२५ साली ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. तत्पुर्वी ते पंजाब हिंदू सभेचे संस्थापक अध्यक्ष होते. ही सभा मुस्लिमविरोधी होती.

२) डा. बाबासाहेब आंबेडकर १९४५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेल्या "Pakistan or Partition of India" या ग्रंथातही फाळणीचीच भुमिका मांडतात.

३) सर सय्यद यांनी १८८७ सालीच द्विराष्ट्रवाद मांडला होता. द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम उघडपणे मांडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

४) नंतरचे हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर हेही द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थक होते. हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे असल्याचे ते जाहीरपणे म्हणत असत...लिहित असत. जिनांनीही लाला लजपतराय यांचाच सिद्धांत उचलून धरला किंवा त्यांच्या स्वत:च्या सिद्धांताला तो सहायक वाटला.

५) हिंदु महासभेने मुस्लिम लीगशी युती करुन सिंध, नोर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने पाकिस्तान स्थापनेचा ठराव केला. या ठरावाला वरकरंणी विरोध केला तरी हिंदू महासभेच्या एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. (हे तिनही भाग आजच्या पाकिस्तान व बांगला देशात आहेत.)

६) टिळकांनी लखनौ करार करून फाळणीची बीजे रोवली (अथवा तिची अपरिहार्यता मान्य केली)

७) अखेरपर्यंत गांधीजी फाळणीच्या विरोधात होते.

थोडक्यात फाळणी होणार याची कल्पना हिंदू महासभेलाही होती. किंबहुना फाळणीला मान्यताच होती. सावरकरांचा द्विराष्ट्रवाद आणि अखंड हिंदू राष्ट्र संकल्पना हातात हात घालून जाऊ शकतच नव्हत्या.

वरील मुद्दे पाहता आता प्रश्न असा पडतो कि-

नथुराम गोडसेने फाळणीला जबाबदार गांधीजींनाच ठरवत त्यांनाच नेमके ठार का मारले?

अभिराम दीक्षितांनी याचे उत्तर दिलेले नाही. फाळणी ही खुद्द हिंदू महासभेलाच मान्य होती. तपशिलात फरक असतील पण लाला लजपतराय, जीना आणि सावरकर वेगळे काय सांगत होते? त्यांनी तर मुस्लिम लीगशी युत्याही केल्या. एकत्र सरकारे चालवली. पाकिस्तानचा ठराव होऊनही त्याला राजीनामा न देता अप्रत्यक्ष स्विकृतीच दर्शवली. एकीकडे मुस्लिमद्वेष आणि दुसरीकडे युत्या करुन सत्ता मिळवणे यात कोणती नैतिकता होती?

नथुराम हा सावरकर अनुयायी होता. हिंदू महासभेचाच कार्यकर्ता होता. फाळणीचेच कारण देत त्याने गांधीजींची हत्या केली. पण जेंव्हा या बाबी अस्तित्वात आल्याही नव्हत्या तेंव्हा महाबळेश्वरला या नथुरामनेच गांधीजींची हत्या करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न का केला?

वरील मुद्दे व वास्तव पाहता गांधीजींना फाळणीसाठी जबाबदार धरणे हा खोटारडेपणा झाला. जबाबदार असेल तर खरे तर वैदिक वर्चस्वतावादी हिंदू महासभा. कारण त्यांचे तत्वज्ञान फाळणीलाच नुसते अनुकूल नव्हे तर तीचे कृतीशील समर्थक होते. अन्यथा सिंध प्रांतिक सरकारने स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडल्यावर महासभेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असते. पण तसे झाले नाही.

 म्हणजेच फाळणी हे गांधीहत्येचे कारण ठरु शकत नाही. ५५ कोटी ही तर शुद्ध भुलथाप आहे. मुस्लिम अनुनय म्हणाल तर तो खुद्द हिंदू महासभा व टिळकांनीही केला आहे. गांधीजी तर फाळनीच्या अखेरपर्यंत विरोधात होते. म्हणजे गांधी हत्येची खरी कारणे अन्यत्रच शोधावी लागतात.

गांधीजी हे हिंदुंचे खरे लोकनायक विरुद्ध स्वत:ला हिंदू राष्ट्रनायक ठरवु पाहणा-या वैदिकवादी अल्पसंख्यंक सावरकरवादी संघी प्रवृत्ती यातील हा संघर्ष होता असे स्पष्ट दिसते.

हिंसावादी तात्पुरते जिंकले. गांधीजींची हत्या झाली. कोणा फाळणीसमर्थकाची नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे आता भारतात हिंदु बहुसंख्य असल्याने आपले वैदिकवादी राजकारण राबवणे सोपे जाणार नाही हे जाणवल्याने आणि एक हिंदू स्वातंत्य्र्याचा उद्गाता ठरतो हे सहन न झाल्याने ही हत्या अपरिहार्य झाली होती. फाळणी होण्याची जेंव्हा शक्यताही दृष्टीपथात नव्हती तेंव्हापासून गांधीजींची हत्या करण्याचे प्रयत्न झाले आणि यातील पहिला प्रयत्न पुण्यातच व्हावा हा योगायोग नाही. याचे कारण वैदिक वर्चस्वाला शह देणारे हिंदू गांधीजी वैदिकांच्या वर्चस्ववादी मार्गातील सर्वात मोठी धोंड होते. किंबहुना त्याने वैदिकांच्याही वर्चस्वाला शह देणे त्यांना सहन होणे शक्यच नव्हते.

त्यामुळे त्यांना संपवणे ही त्यांची प्राथमिकता बनली असणे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे त्यांनी गांधीजींना मारलेही. नथुराम हा एक प्रकारचा आत्मघातकी प्यादे होता. खोटी कारणे देत नंतरही गांधीजींची बदनामी मोहिम संपली नाही. आजही ती सुरु आहे. पण फाळणीचे तत्वज्ञान ज्यांनी प्रसृत केले ते मात्र टीकेचे धनी होत नाहीत, झालेले नाहीत. हा असला बाष्कळ पण हिंसक वैदिकवाद आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते ते यामुळेच.

मगर गांधी मरते नहीं...!

सावरकरांना कशा प्रकारचा अखंड हिंदूस्तान पाहिजे होता हे या लिंकवर वाचा.

सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्रवाद...?

5 comments:

  1. संजय सर ,
    आपले म्हणणे १०० % अगदी योग्य आहे , द्विराष्ट्रवाद ही इतिहासाची देणगी आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट आहे , परंतु त्यानन्तरच्या पाकिस्तानच्या खोडसाळ हाल्चालीना प्रत्युत्तर कसे द्यावे ?भारतावर १२०० वर्षे राज्य केल्यावर मुस्लिमाना पाकिस्तानचा तुकडा मिळाला त्यावर ते समाधानी नसतील तर तेही संयुक्तीकच आहे .
    खरेतर कॉंग्रेसने कल्पकतेने फाळणी करून फार चलाखपणे उत्तम राजकारण केले आहे आणि त्यासाठी इंग्लंड चा आपल्याला पाठींबा मिळाला हे आपले भाग्यच आहे. सावरकरांचे राजकारण कधीही लोकाभिमुख नव्हते आणि ते लोकप्रियही होणार नाही हे स्वतःला सावराकरानाही माहित असावे.
    आपली लोकशाही मजबूत होण्यासाठी द्विपक्षीय राजकारण अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी समाजवादी पक्ष एकत्र येण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि पराभूत झाले , भान्दवल्शाहि तत्वज्ञान जोपासणारे आता दोन पक्ष उरले आहेत ,काँग्रेस आणि भाजप !
    द्विपक्षीय वाटचाल होण्यासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे समाजवादी आणि आंबेडकरवादी पक्षांची दैना झाली आहे अशा वेळी यापुढे काश्मीर प्रश्न आणि तत्सम प्रश्न जिवंत ठेवून राजकारण करत भांडवलशाही इथे स्थिर होणार हे सत्य आता समोर दिसते आहे . पंतप्रधान मोदी यानितर महात्मा गांधी याना आपलेसे करून नवा गांधीवाद जोपासायची तयारी सुरु केली आहे .भाजप आणि गांधीवाद एकत्र हा फारच मोठा विनोद त्यांनी करून दाखवला आहे . राजकारणात काहीही होऊ शकते !
    आपला लेख अतिशय सुंदर आहे ! अभिनंदन !

    ReplyDelete
  2. संजय सर ,
    आपले म्हणणे १०० % अगदी योग्य आहे , द्विराष्ट्रवाद ही इतिहासाची देणगी आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट आहे , परंतु त्यानन्तरच्या पाकिस्तानच्या खोडसाळ हाल्चालीना प्रत्युत्तर कसे द्यावे ?भारतावर १२०० वर्षे राज्य केल्यावर मुस्लिमाना पाकिस्तानचा तुकडा मिळाला त्यावर ते समाधानी नसतील तर तेही संयुक्तीकच आहे .
    खरेतर कॉंग्रेसने कल्पकतेने फाळणी करून फार चलाखपणे उत्तम राजकारण केले आहे आणि त्यासाठी इंग्लंड चा आपल्याला पाठींबा मिळाला हे आपले भाग्यच आहे. सावरकरांचे राजकारण कधीही लोकाभिमुख नव्हते आणि ते लोकप्रियही होणार नाही हे स्वतःला सावराकरानाही माहित असावे.
    आपली लोकशाही मजबूत होण्यासाठी द्विपक्षीय राजकारण अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी समाजवादी पक्ष एकत्र येण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि पराभूत झाले , भान्दवल्शाहि तत्वज्ञान जोपासणारे आता दोन पक्ष उरले आहेत ,काँग्रेस आणि भाजप !
    द्विपक्षीय वाटचाल होण्यासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे समाजवादी आणि आंबेडकरवादी पक्षांची दैना झाली आहे अशा वेळी यापुढे काश्मीर प्रश्न आणि तत्सम प्रश्न जिवंत ठेवून राजकारण करत भांडवलशाही इथे स्थिर होणार हे सत्य आता समोर दिसते आहे . पंतप्रधान मोदी यानितर महात्मा गांधी याना आपलेसे करून नवा गांधीवाद जोपासायची तयारी सुरु केली आहे .भाजप आणि गांधीवाद एकत्र हा फारच मोठा विनोद त्यांनी करून दाखवला आहे . राजकारणात काहीही होऊ शकते !
    आपला लेख अतिशय सुंदर आहे ! अभिनंदन !

    ReplyDelete
  3. म.गांधीजींची लोकप्रियता किंवा गांधीजींना असलेले समर्थन याची जाणीव स्वा.सावरकर किंवा नथुराम गोडसे यांना निश्चितच होती. या बद्दल गोडसे यांनी स्वत: गांधी हत्या प्रकरणाची ज्यावेळी सुनावणी सुरु होती त्यावेळी कोर्टात तशी मते व्यक्त केली आहेत. म्हणजे गांधीजी हे लोकनायक होते याची जाणीव हिंदू महासभेला नक्कीच होती. शिवाय त्याआधी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये
    हिंदू महासभेचा पराभव झाला होता. शिवाय श्यामाप्रसाद मुखर्जी यासारखे दिग्गज असलेले नेते हे सुद्धा महासभेपासून दूर झाले होते.
    अशा परिस्थितीत गांधी हत्या करून आपल्या हातात सत्ता येईल अशी दिवास्वप्ने पाहण्याएवढे स्वा. सावरकर निश्चितच मूर्ख नव्हते.
    तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गांधी हत्येची कारणे दुसरीकडे शोधावी लागतील पण सत्तावेध हे हत्येचे कारण निश्चितच नव्हते. त्यामुळे हा लेख तुम्ही ज्या उद्देशाने लिहिला आहे तोच मुळीच चुकीचा आहे असे वाटत आहे.

    ReplyDelete
  4. परत एक भन्नाट लेख ! संजय सर तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद. फाळणी संदर्भात ही माहिती मला नव्हती. तुम्ही दिलेली लिंक सुद्धा वाचली. तिथल्या कॉमेंट्स वाचून परत एकदा करमणूक झाली.
    प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्ही संदर्भ देवून सुद्धा अगदी कामारेखाल्ची टीका करणारे स्वताला सुसंस्कृत कसे म्हणतात ?


    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  5. पराकोटीचा जाज्वल्य धर्माभिमान,आंधळी धर्मांधता एकीकडे आणि भोंदू सेक्युलर आणि अतिउदारमतवादी दुसरीकडे, हे दोन्ही प्रकार देशासाठी घातक आहेत.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...