Tuesday, February 9, 2016

व्यास कोण होते?

महाभारत हे संपुर्ण महाकाव्य व्यासांनी लिहिले असा समज असला तरी ते खरे नाही. व्यासांनी "जय" नामक काव्य रचले होते व ते ८८०० श्लोकांचे होते. या मुळ काव्यात नेमके काय होते हे आज आपणास माहित नसले तरी त्यात कौरव-पांडवांच्या युद्धाचे वर्णन असावे असा तर्क अनेक विद्वान करत असतात. पुढे त्यात सौती-जनमेजय आणि इतर अनेक अज्ञात कवींनी भर घातली. त्यामुळे त्याचा विस्तार "भारत" ते लक्ष श्लोकांचे "महाभारत" असा झाला. या महाभारतात अनेक प्राचीन आख्याने-उपाख्याने यांची भर पडली असल्याने अनेक प्राचीन समजुती, श्रद्धा व भारतातील विविध गणांतील लोकांमधील संघर्षावर प्रकाश पडतो.

महाभारत खरेच घडले कि ती एक काल्पनिक कथा आहे यावरही विद्वानांत अनेक वाद होत असतात. अ. ज. करंदीकरांसारखे विद्वान तर महाभारत मध्य आशियात घडले असाही तर्क देत असत. सर्वसाधारणपणे महाभारत कथा आजच्या दिल्ली परिसरात कुरु-पांचाल भागात घडली असावी असे मानले जाते. शिवाय रामायणकथा आधीची कि महाभारत कथा हाही एक वाद आहेच.

या लेखात आपल्याला महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे व ती म्हणजे भारतकर्ते व्यास. व्यासांच्या नांवावर अठरा पुराणे तर आहेतच पण वेदांचे चार विभाग केले म्हणूण त्यांना "व्यास" अशी संज्ञा मिळाली असे सांगितले जाते. वैदिक परंपरेत अनेक नवीन लेखकांनी आपापल्या (स्वरचित अथवा रुपांतरित) कृतींना स्वत:चे नांव न देता एखाद्या इतिहासप्रसिद्ध व्यक्तीचे नांव कर्ता म्हणून द्यायची एक प्रथा होती. असे केले म्हणजे आपल्या कृतीला जनमान्यता व पावित्र्य लाभेल अशी काहीतरी भावना त्यांच्या मनात असावी. खरे म्हणजे व्यासांची अशी एकही संपुर्ण कृती आज उपलब्ध नाही. जय काव्य हे महाभारतात हरवलेले आहे. सौती-जनमेजयाचेही नेमके काय होते, त्यांनी नेमकी कोणती भर घातली याचाही अंदाज लागत नाही. दुसरे म्हणजे भारत कथा कोणत्याही काळात घडली असेल, सध्याचे आपल्याला उपलब्ध असणारे महाभारत हे तिस-या-चवथ्या शतकात अंतिम संस्करणाच्या अवस्थेत पोहोचले आहे. भारतकथेच्या अलोट लोकप्रियतेमुळे भारतातील अनेक धर्मांनी महाभारतावर आपापले संस्कारही केले आहेत. वेदांचे व्यासांनी चार भाग केले ही तर सर्वस्वी भाकडकथा आहे.

व्यास हे मुळ कवी. त्यांची कृती म्हणजे जय हे आपण पाहिलेच. कोण होते हे व्यास? त्यांच्या जन्माभोवती महाभारतातच अनेक भाकडकथा गोवल्या गेलेल्या आहेत. महाभारताचे एक वैशिष्ट्य असे कि ज्याही थोर माणसाचे जन्मकुळ अथवा जन्मदाता माहित नाही अथवा अवैदिक आहे अशा व्यक्तींच्या जन्माभोवती चमत्कारकथा रचल्या गेलेल्या आहेत. द्रोण, भिष्म, कर्ण, दृष्टधुम्न इत्यादि उदाहरणे या संदर्भात पाहता येतील. चमत्कार वगळत कथांचे परिशिलन केले तर मात्र सत्याच्या थोडेफार का होईना जवळ पोहोचता येते. व्यासांची जन्मकथा आदिपर्व अध्याय ६३ मद्ध्ये येते. त्यावर धावती नजर फिरवून व्यास नेमके कोण होते याचा शोध घेऊयात.

पुरु वंशात एक वसू नांवाचा चेदी प्रांतावर राज्य करणारा राजा होता. शस्त्रांचा त्याग करून त्याने आश्रमात तपाचरण सुरु केल्याने आपले पद जाईल या भितीने इंद्र ग्रस्त झाला. त्याने वसुला पटवले, एक विमान भेट दिले तसेच इंद्रमालाही अर्पण केली आणि तपापासून परावृत्त केले. पुढे हा राजा वसू इंद्राने दिलेल्या स्फटिकमय विमानातच (म्हणजे अवकाशातच) राहु लागला म्हणून त्याला "उपरिचर" हे नांव पडले. एकदा असा चमत्कार झाला कि त्याच्या नगरीजवळुनच वहाणा-या शुक्तिमती नामक नदीला कोलाहल नांवाच्या पर्वताने कामवासनापुर्वक अडवल्याचे त्याच्या लक्षात आले. राजाने पर्वताला लाथ मारुन विवर निर्माण केले व नदीचा मार्ग मोकळा केला. पर्वतसंगामुळे नदीला एक मुलगा व एक मुलगी असे जुळे झाले होते. नदीने प्रसन्न होऊन राजाला दिले. राजाने मुलाला सेनापती बनवले तर मुलीशी लग्न केले. तिचे नांव गिरिका.

ती वयात आल्यावर ऋतूदान द्यायचे त्याच दिवशी पितरांनी त्याला मृगयेस जा अशी आज्ञा केली. तो नाईलाजाने मृगयेस गेला खरा पण सुगंधी पुष्पांनी नटलेल्या अरण्यात  त्याचा कामाग्नी भडकला. अशाच कामविव्हळ स्थितीत अशोक वृक्षाखाली तो बसला असता कामोन्मत्त राजाचे वीर्यस्खलन झाले. आपले अमोघ रेत वाया जावू नये म्हणून त्याने ते द्रोणात धरले व श्येनपक्षा मार्फत आपल्या पत्नीकडे पाठवायची व्यवस्था केली. श्येन पक्षी तो द्रोण नेत असता वाटेत दुस-या श्येनपक्षाशी त्याची झडप झाली. द्रोण यमुनानदीत पडला. नदीत अद्रिका नावाची शापित मत्सी होती. तिने त्या द्रोणातील वीर्य भक्षण केले. पुढे दहा मासांनी त्या मत्सीला धीवरांनी पकडले. तिचे पोट फाडले तर तिच्या उदरातून एक मुलगा व एक मुलगी असे जुळे निघाले. धीवरांनी हा चमत्कार उपरिचर राजाला सांगितला. राजाने मुलाचे नांव मत्स्य असे ठेवले व मुलगी एका नावाड्याला अर्पण केली. अद्रिका मत्सी शापमुक्त होऊन स्वर्गधामी रवाना झाली. मुलीचे नांव सत्यवती असे त्या धीवराने ठेवले, पण मासे धरणा-या कोळ्यांच्या संगतीत रहात असल्याने तिच्या अंगाला मासळीचा वास येत असे.

पुढे पराशर ऋषी तीर्थाटनाच्या निमित्ताने त्या नदीवर आले असता सत्यवतीच्या नावेत पैलतीरावर जाण्यासाठी बसले. सत्यवतीचे लावण्य पाहून ते कामातूर झाले आणि तिला रतिदान मागू लागले. तिचे कौमार्य अभंग ठेवण्याचे, तिच्या शरीराला सुगंध येईल आणि संभोगकाळात अंधार उत्पन्न करण्याच्या अटी पराशरांनी पाळल्या.  सत्यवती गर्भवती झाली. तिला जे अपत्य झाले ते म्हणजे व्यास. त्यांचे आधीचे नांव यमुनाद्वीपात जन्म झाल्याने द्वैपायन असे ठेवले गेले. रंगाने ते काळे-पिंगट असल्याने त्यांना कृष्ण असेही म्हणत. "माझे स्मरण करशील तेंव्हा मी प्रकट होईल" असे वचन मातेला देवून ते तपश्चर्येला निघून गेले. हीच सत्यवती पुढे कुरु वंशातील शंतनु राजाची राणी बनली.

वरील कथा वाचली तर एखाद्या परीकथेची आठवण येणे स्वाभाविक आहे. पण आपण परिकथेतील कल्पना दूर ठेवू. या कथेत उपरिचर राजाला अकारण गोवण्यात आले आहे हे उघड आहे. सत्यवतीचा पिता राजवंशातील होता हे दाखवण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे. तसेच व्यासांचा पिताही कोणी ऋषी-मुनी होता असेही दाखवायचा प्रयत्न यातून झालेला आहे. एक बाब लक्षात घ्यायला हवी कि मुक्त लैंगिक संबंधाच्या अनेक घटना महाभारतातच पहायला मिळतात. जेंव्हा कुळ-शीळ आणि स्त्रीयांच्या योनीशुचितेच्या कल्पना बदलल्या त्या काळात अशा प्रत्येक व्यक्तीच्या जन्माभोवती मिथके तयार केली गेली. हे करणेही आवश्यक अशासाठी होते कि खुद्द कुरु वंशात सत्यवतीचा जसा प्रवेश झाला तसाच व्यासांपार्फतच नियोगाद्वारे कुरू वंश विस्तारला. कुरु वंशाची महाराणी धीवर (कोळी) होती व वंशविस्तार करणारा कोळणीचा विवाहबाह्य संबंधांतुन झालेला मुलगा होता हे नंतरच्या नीतिविदांना मान्य होणे अवघड होते. त्यासाठी वरील संपुर्ण कथा रचली गेली हे उघड आहे. किंबहुना महाभारताचे वैदिकीकरण करण्याच्या नादात नंतरच्या वैदिक प्रचारकांनी अनेक बाबींचे भान ठेवले नाही.

मुळ भारतकथा घडली तो काळ अनेकार्थांनी प्रागतिक होता. लैंगिक संबंधंबाबत समाजबंधने एवढी तीव्र नव्हती. कुंतीही विवाहपुर्व (आणि विवाहानंतरही) पतीशिवाय पुत्र प्रसवू शकली ती त्यामुळेच. अशी असंख्य उदाहरणे (चमत्कार कथा वगळल्या तर) महाभारतातच दिसतात. सत्यवती मत्सीच्या पोटी जन्मू शकत नाही. एवतेव ती कोळ्याचीच मुलगी होती आणि व्यासांचा जन्म (पिता अनाम असला तरी) कोळणीच्या पोटी झाला जी नंतर कुरु राज्याची राणी बनली हे वास्तव आहे. जाती तेंव्हा आजच्यासारख्या नव्हत्या. प्रतिभा कोणाही व्यक्तीत असते हे मान्य करायचा तो काळ होता. वैदिक वर्ण-माहात्म्य तेंव्हा प्रस्थापित नव्हते. स्मृतीकाळ तर यायचाच होता. नंतरच्या काळात महाभारतावर वैदिक संस्करने झाली असली तरी ते करतांना मुळ सर्वस्वी बदलता येणे शक्य नव्हते. यातुन सुटका करुन घेण्यासाठी लढवली गेलेली युक्ती म्हणजे चमत्कारकथा निर्माण करत व्यास-द्रोणादिकांचे पितृत्व तथाकथित उच्चकुलीन व्यक्ती/देवता/अप्सरादिंना देण्यात आले व त्यांचे मुळ वास्तव धुसर करुन टाकले. त्याचा भारतीय समाजजीवनावर केवढा दुष्परिणाम झाला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

मुळात मूळ भारतकथा घडली तेंव्हा वैदिक भारतात प्रवेशलेही असण्याचे शक्यता नाही. कारण महाभारताच्या बीजकथेत जी सामाजिक स्थिती आहे तशी स्थिती वैदिकांत असल्याचे कसलेही सूचन नाही.

उदा.: १. पाच भावांनी एका स्त्रीशी लग्न करणे या प्रर्थेचा दुरान्वयानेही वैदिक साहित्यात निर्देश नाही.

२. वैदिकांत वर्णसंकर हा गहन चिंतेचा विषय होता. वर्णसंकर होऊ नये म्हणून प्रचंड बंधने घालण्यात आली. पण भारतकथेतील बव्हंशी  मुख्य पात्रे ही तथाकथित वर्णसंकरीत आहेत. त्यांना राज्य करताच येत नाही. मुळात केवळ त्याच आधारावर ते वैदिकही ठरू शकत नाहीत.

३. भिमाने हिडिंबेशी केलेला एक वर्षीय करार विवाह हा वैदिक विवाहप्रकारांत कोठेही बसत नाही.

४. वसिष्ठ, विश्वामित्र वगैरे ऋषी ऋग्वेदरचनेत सामाविष्ट होते. ही रचना मुळात अफगाणिस्तानात झाली. त्यामुळे कुरु-पांचाल प्रदेशात घडणा-या कथेत ते कसे असू शकतात? प्रदिर्घ आयुष्याच्या भाकडकथा दुर ठेवल्या तर ही घालघुसड लक्षात येते.

५.  वैदिक साहित्यातील राज्यव्यवस्था, ग्रामव्यवस्था कोठेही महाभारतातील चित्रणाशी यत्किंचितही जुळत नाही. वैदिक भारतात आल्यावर महाभारत घडले असते तर धार्मिक साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले असते, पण तसे वास्तव नाही.

६. महाभारतातील नगरे हे सिंधूकालीन नगररचनांशी साधर्म्य दर्शवतात. शिवाय ती असुरांनी निर्माण केली ता मुळ सत्याचे अवशेष नंतरच्या भाकडकथा घुसवणा-यांना पुसता आलेली नाहीत. वैदिक साहित्य हे नगररचनाशास्त्राशी दुरान्वयानेही संबंध दर्शवत नाही. किंबहुना त्यांचे अज्ञानच त्यातून प्रतीत होते.

७. "पुरू" या नांवाची वैदिकांची एक टोळी होती. पुरु नांव अवेस्त्यातही विपूल प्रमाणात आढळते. ऋग्वेदातील पुरु हे टोळीनाम आहे, व्यक्तीनाम नाही. इसवीसनपुर्वी तिस-या शतकातही गांधारी प्राकृत जीवंत होती याचे लिखित पुरावे अस्तित्वात आहेत. तिच्याच निकटची दारी (अवेस्त्याची पर्शियन भाषेची एक बोली) भाषा त्याच वेळीस अस्तित्वात होती. हे भाषिक जाळे आजही जीवंत आहे. त्यामुळे समान शब्द आले म्हणून वैदिकांना कशाचेही श्रेय देणे गैर आहे. संस्कृत भाषा मुळात दुस-या शतकापर्यंत अस्तित्वात आलीच नव्हती हेही येथे लक्षात घ्यावे लागते. पुरु हा शब्द प्राचीन काळी वेगवेगळ्या अर्थाने विविध संस्कृत्यांत वापरला जात होता हे  स्पष्टपणे दिसते. नामसाधर्म्यावरून अथवा त्यातून अनुकूल अर्थ काढत झरथुस्ट्राचा जन्म हस्तिनापूरला झाला, गया येथे त्याला ज्ञान प्राप्त झाले असा अर्थ काढणारे आजही कमी नाहीत! तसाच उद्योग महाभारताबाबत केला तर मग अ.ज. करंदीकरांच्या म्हणण्याप्रमाणे महाभारतकथा मुळात पश्चिम आशियात घडली हेही मान्य करावे लागेल. पण ते वास्तव नाही.

८. विवाहप्रकारांत पाहिले तर असूर विवाह हा प्रकार आहे व तो नेमका क्षत्रियांस लागू आहे असे स्मृती सांगतात. कृष्णाने केलेला  विवाह त्याच प्रकारचा होता. पण कृष्ण कथेनुसारच मुळात क्षत्रिय नाही. तो स्वत: असूर कुळातला आहे, त्याची आईही असूर कुळातील आहे. असूर वैदिक असू शकत नाहीत. म्हणजेच तथाकथित क्षत्रियही असू शकत नाहित. किंबहुना असते व वैदिक धर्म तेंव्हा भारतात असता तर यावर मोठा धार्मिक गहजब माजवला गेला असता.

येथे मी अत्यंत अल्प उदाहरणे दिली आहेत. महाभारतातील समाज व्यवस्था वैदिक समाजव्यवस्थेशी दुरान्वयानेही जुळत नाही. प्राचीन असुरांच्याच कथांना एनकेन प्रकारेन वैदिक प्रचारासाठी वापरण्यासाठी त्यावर वैदिक कलमे करण्यात आली आहेत. भारतकथा वैदिक धर्म भारतात येण्याच्या बराच काळ आधी घडून गेली आहे. महाभारतातील वैदिक कलमे बाजुला केली की वास्तव दिसू लागते.

13 comments:

  1. अगदी छान विश्लेषण,
    अजून अशा बर्याच कल्पित कथा रचल्या गेल्या आहेत आणि धार्मिक मंडळी तर्क न वापरता डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात. आणि काही सांगायला गेलं तर देवाबद्दल असं बोलू नकोस नाहितर नर्कात जाशील अशी भीती घालतात.
    मुळात देवाधर्माचा विषय असला कि लोक चिकात्सा करू पाहत नाहीत,जे चालत आले आहे ते खरे मानून बसतात,पण ही मानसिकता घातक आहे.

    ReplyDelete
  2. Atishay chan watla Sir wachun, pan references kuthale waparlet aapan?

    ReplyDelete
  3. सर त्यावेळी कॉपीराईट वगैरे नितीमत्ता जपणारा प्रकार नव्हता का? कोणीही कोणाच्या काव्यरचनेत घुसखोरी करायचा म्हणून शंका आली!! निदान लेखक, कवी ह्यांनी तरी असले नीतीहीन कृत्य करू नये अशी एक भाभडी अपेक्षा. पण शेवटी आदीमानवच ते. त्यांचे ते उडणाऱ्या विमानांचे प्रताप ऐकून डोक्याला सूज येते. बहुतेक जास्त प्रमाणात सोम ह्या रसाचा वापर केल्याने असल्या कथांना जन्म दिला गेला असावा. ऐकणारेही त्याच रसात डुंबून ऐकत असावेत असे वाटते. काहीतरी रहस्य नक्कीच आहे ह्या भाकड कथांमध्ये हे मात्र नक्की. विमान म्हणजे एखादा महाकाय पक्षी मानवाला पाठीवर घेऊन उडायचा कि काय असेही कधीकधी वाटते (खरे कि स्वप्नात हे त्यांचे त्यांनाच माहित) पण ह्या कथातले हवेत उडणे अजिबात पटत नाही. गम्मतच करतात बुवा आपले पूर्वज. सांगणारे सांगतात आणि ऐकणारे ऐकतात हि मोठी गम्मत होती त्या काळात.

    ReplyDelete
  4. संजय सर ,
    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन ! अभिनंदन !
    इरावती कर्वे यांच्या युगान्तची आठवण झाली
    त्यांनीही व्यासांचा परामर्श असाच घेतला आहे आणि थोर कुळांची व्युत्पत्ती कशी झाली आहे ते आपल्या प्रमाणे स्पष्ट मांडले आहे. एकंदरीतच त्या काळात वंशवृद्धी ला किती महत्व होते ते समजते ,तसेच त्यांचे द्रौपदी आणि श्रीकृष्ण याबद्दलचे लेखही अभ्यासपूर्ण आहेत "वासुदेव " या कल्पनेचा आपणही सैद्धांतिक परामर्श घेतलात तर फारच उत्तम होईल
    रामायणातही रावण हा शिवभक्त आहे आणि रामही रामेश्वराची पूजा करतो हा विरोधाभास म्हणायचा का ? रचनाकारांनी शिवाचे महत्व लोकमानसावर बिंबवण्यासाठी केलेली योजना म्हणायचे ?आज अनेक संशोधक असे मानतात की ,
    कैकयीने रामास वनवासास पाठवणे हा एक मोठा राजकीय मास्टर प्लान होता , वैदिकांचे दक्षिणेत आश्रम संस्थेच्या सहाय्याने घुसण्याचे प्रयत्न चालू होते आणि त्यात जो व्यत्यय येत होता त्याचा निःपात करण्यासाठी यज्ञसंस्था चालवणाऱ्या ऋषींनी रामाची मदत मागितली आणि दक्षिणे पर्यंत वैदिकांचे राज्य वाढवण्याच्या महत्वाकांक्षेने वानरांच्या मदतीने आणि बिभिषणाच्या सहाय्याने वैदिकांनी हे काम यशस्वीपणे सिद्ध केले.
    वाल्मिकी मात्र व्यासा सारखे भासत नाहीत. त्यांच्या बद्दलही आपण लिहिलेत तर दुग्ध शर्करा योग म्हाणावे लागेल .

    ReplyDelete
  5. कैकयीने रामास वनवासास पाठवणे हा एक मोठा राजकीय मास्टर प्लान होता.....च्यायला हे वैदिक म्हणजे अवघड जागीच दुखण आहेत ब्वा.. कैकेयी सावत्र द्वेषानी पछाडलेली होती तरी ह्यांना त्यात राजकीय मास्तर प्लान दिसतो.. "गिरे तो भी टांग उपर"" म्हणणारे हे लोक काय बादरायण संबंध आणि शोध झोपेत असताना लावतात हे त्यांच्या बापालाच माहित..

    ReplyDelete
    Replies
    1. Racially in India there are neither Dravidians, not Aryans. North Indians are termed Aryo-Dravidian by D.N. Mazumdar, South Indians are called Dravido-Aryans and East Indians - Mongolo-Dravidians. But this is again a dated work. Indigenous tribes in India were not Dravidian but Mundas and Santhals - Australoid race. The language group Elamo-Dravidian suggests that Dravidians migrated into India from South Persia (the Elam kindgom was in ancient South Persia). Aryans are believed to have migrated from Central Asia or Persia. As per genetic tests (Genome Project) only people of a small portion of Tamil Nadu (not the whole of Tamil Nadu but about 1/3 to 1/4th) are racially distinct from the rest of Indians to indicate alternate origins. The entire Aryan vs. Dravidian argument was a British imperialist construct of divide and rule to sow hatred between North Indians and South Indians and also suggest that Dalits and Upper castes are racially different (which is not true) which was later picked up by enthusiastic South Indian career politicians for their own political agenda, caste-based politicians for their own political agenda and leftists of various hues because of their usual hatred for roots and traditions. The whole racial discourse and its crooked linking up with regional differences in skin color or differences in skin color among castes is an unfortunate colonial construct. The evidence from archaeology, literature, historical records, linguistics, physical anthropology and genomics point in the opposite direction. Some things that seem to lend support to 'race theory' have been over interpreted - pure speculation, whereas historians have avoid examining contrary evidence. The term 'Arya' did not mean race but 'noble' much like the word 'Sirji'. The term 'Dravida means land of the confluence of 'three oceans'. The term 'Dasyu' doesn't mean 'Das' just because it sounds close (politically motivated speculation). And the term 'Das' itself meant servant not slave.

      Delete
    2. Racially in India there are neither Dravidians, not Aryans. North Indians are termed Aryo-Dravidian by D.N. Mazumdar, South Indians are called Dravido-Aryans and East Indians - Mongolo-Dravidians. But this is again a dated work. Indigenous tribes in India were not Dravidian but Mundas and Santhals - Australoid race. The language group Elamo-Dravidian suggests that Dravidians migrated into India from South Persia (the Elam kindgom was in ancient South Persia). Aryans are believed to have migrated from Central Asia or Persia. As per genetic tests (Genome Project) only people of a small portion of Tamil Nadu (not the whole of Tamil Nadu but about 1/3 to 1/4th) are racially distinct from the rest of Indians to indicate alternate origins. The entire Aryan vs. Dravidian argument was a British imperialist construct of divide and rule to sow hatred between North Indians and South Indians and also suggest that Dalits and Upper castes are racially different (which is not true) which was later picked up by enthusiastic South Indian career politicians for their own political agenda, caste-based politicians for their own political agenda and leftists of various hues because of their usual hatred for roots and traditions. The whole racial discourse and its crooked linking up with regional differences in skin color or differences in skin color among castes is an unfortunate colonial construct. The evidence from archaeology, literature, historical records, linguistics, physical anthropology and genomics point in the opposite direction. Some things that seem to lend support to 'race theory' have been over interpreted - pure speculation, whereas historians have avoid examining contrary evidence. The term 'Arya' did not mean race but 'noble' much like the word 'Sirji'. The term 'Dravida means land of the confluence of 'three oceans'. The term 'Dasyu' doesn't mean 'Das' just because it sounds close (politically motivated speculation). And the term 'Das' itself meant servant not slave.

      Delete
    3. Racially in India there are neither Dravidians, not Aryans. North Indians are termed Aryo-Dravidian by D.N. Mazumdar, South Indians are called Dravido-Aryans and East Indians - Mongolo-Dravidians. But this is again a dated work. Indigenous tribes in India were not Dravidian but Mundas and Santhals - Australoid race. The language group Elamo-Dravidian suggests that Dravidians migrated into India from South Persia (the Elam kindgom was in ancient South Persia). Aryans are believed to have migrated from Central Asia or Persia. As per genetic tests (Genome Project) only people of a small portion of Tamil Nadu (not the whole of Tamil Nadu but about 1/3 to 1/4th) are racially distinct from the rest of Indians to indicate alternate origins. The entire Aryan vs. Dravidian argument was a British imperialist construct of divide and rule to sow hatred between North Indians and South Indians and also suggest that Dalits and Upper castes are racially different (which is not true) which was later picked up by enthusiastic South Indian career politicians for their own political agenda, caste-based politicians for their own political agenda and leftists of various hues because of their usual hatred for roots and traditions. The whole racial discourse and its crooked linking up with regional differences in skin color or differences in skin color among castes is an unfortunate colonial construct. The evidence from archaeology, literature, historical records, linguistics, physical anthropology and genomics point in the opposite direction. Some things that seem to lend support to 'race theory' have been over interpreted - pure speculation, whereas historians have avoid examining contrary evidence. The term 'Arya' did not mean race but 'noble' much like the word 'Sirji'. The term 'Dravida means land of the confluence of 'three oceans'. The term 'Dasyu' doesn't mean 'Das' just because it sounds close (politically motivated speculation). And the term 'Das' itself meant servant not slave.

      Delete
    4. Unlikely. Even under your various - and even offensive (to me, at least - I regard The Ramayan as History) - assumptions. Remove the words "assume Ramayan was real", and you and me are just fine.\

      First off. it is very clear indeed in The Ramayan that Ravan was from illustrious Brahmin stock (not saying non-Brahmins werent - or aren't illustrious, or that dravidians arent brahmins or illustrious); the brother of Kuber. There is no evidence of any Dravidian links; indeed - there is no evidence of any aryan or dravidian or any such race inferences. If skin colour is the criterion, then be informed that even the Lord Krishna is considered shyaam-varaneeya - or dark-skinned. Should we then assume that The Lord was Dravidian? There is no evidence to support either hypothesis

      Second, the timeline involved is also ambiguous. But one thing is certain: they predate the drying of the Saraswati, which is now known to have dried up around 1900 BC. The drying up is supposed to have begun some hundreds of years earlier; thus the Mahabharata is clearly 3000 - 2000 BC; The Ramayan is said to refer to The Saraswati as a mighty river; we further know that The Ramayan predates The Mahabharata by quite a long time. This would place the Ramayan prior to 3000 BC. There are other evidences - but most people here would find them hard to digest - but fact remains the astronomical anaylsis of the star positions mentioned in The Ramayan state only 3 possible star combinations - and none come close to the earlier dates. I need more corroboration on this; so not stating the aging - but suffice it to state that The Ramayan is far, far older than imagined, We already have the hard scientific evidence of the Saraswati river to corroborate. But convincing our educated younger generation will take a lot more than this!!!!!

      Moving on, from the above we can see that we are looking at a timeline of something at a bare minimum of 5000 years ago. Let us add one more scientific data: The Indus-Saraswati Civilization has now been officially dated to 7280 BC - This was declared on 5th November 2012 by the ASI.. Add to this the possibility of precise descriptions of the settlements of the Indus-Saraswati in the Mahabharata. Add to this the data presented above - and one can see a picture emerging; at no point in this picture does skin colour or race feature. What it does clear is the timeline - we are looking at a timeline that can be anytime between 7000 BC to 2500 BC at the latest for the Mahabharat, and 7000 BC to 3500 BC for the Ramayan, Beyond that, there is no mention of race or skin colour etc. We must hence assume that this was not an important factor then; that given the geographical spread of the Ramayan, both were involved. There is nothing in the historical record from this period to guide us either; there is nothing in the spiritual record as well.

      Vedic Literature does not go beyond this; neither does science. Yes, Scientific Analysis of Vedic Literature - taken alone - takes us far, far beyond; but this would require a true Vedic Scholar... with a doctorate in science. This would corroborate some of the datings and other evidence presented elsewhere on the internet...

      That Aryans are core Indian subcontinental stock is beyond dispute - this has been established in a genetic research conducted across Europe and Asia. It was found that the Aryans originated around Gujarat. We also know that Ravan was closely connected to the Yadu race, which was from around Maharashtra and Gujarat. But that is as far as it goes. No one can say for certain as to whether he was dravidian or not!

      Delete
    5. Unlikely. Even under your various - and even offensive (to me, at least - I regard The Ramayan as History) - assumptions. Remove the words "assume Ramayan was real", and you and me are just fine.\

      First off. it is very clear indeed in The Ramayan that Ravan was from illustrious Brahmin stock (not saying non-Brahmins werent - or aren't illustrious, or that dravidians arent brahmins or illustrious); the brother of Kuber. There is no evidence of any Dravidian links; indeed - there is no evidence of any aryan or dravidian or any such race inferences. If skin colour is the criterion, then be informed that even the Lord Krishna is considered shyaam-varaneeya - or dark-skinned. Should we then assume that The Lord was Dravidian? There is no evidence to support either hypothesis

      Second, the timeline involved is also ambiguous. But one thing is certain: they predate the drying of the Saraswati, which is now known to have dried up around 1900 BC. The drying up is supposed to have begun some hundreds of years earlier; thus the Mahabharata is clearly 3000 - 2000 BC; The Ramayan is said to refer to The Saraswati as a mighty river; we further know that The Ramayan predates The Mahabharata by quite a long time. This would place the Ramayan prior to 3000 BC. There are other evidences - but most people here would find them hard to digest - but fact remains the astronomical anaylsis of the star positions mentioned in The Ramayan state only 3 possible star combinations - and none come close to the earlier dates. I need more corroboration on this; so not stating the aging - but suffice it to state that The Ramayan is far, far older than imagined, We already have the hard scientific evidence of the Saraswati river to corroborate. But convincing our educated younger generation will take a lot more than this!!!!!

      Moving on, from the above we can see that we are looking at a timeline of something at a bare minimum of 5000 years ago. Let us add one more scientific data: The Indus-Saraswati Civilization has now been officially dated to 7280 BC - This was declared on 5th November 2012 by the ASI.. Add to this the possibility of precise descriptions of the settlements of the Indus-Saraswati in the Mahabharata. Add to this the data presented above - and one can see a picture emerging; at no point in this picture does skin colour or race feature. What it does clear is the timeline - we are looking at a timeline that can be anytime between 7000 BC to 2500 BC at the latest for the Mahabharat, and 7000 BC to 3500 BC for the Ramayan, Beyond that, there is no mention of race or skin colour etc. We must hence assume that this was not an important factor then; that given the geographical spread of the Ramayan, both were involved. There is nothing in the historical record from this period to guide us either; there is nothing in the spiritual record as well.

      Vedic Literature does not go beyond this; neither does science. Yes, Scientific Analysis of Vedic Literature - taken alone - takes us far, far beyond; but this would require a true Vedic Scholar... with a doctorate in science. This would corroborate some of the datings and other evidence presented elsewhere on the internet...

      That Aryans are core Indian subcontinental stock is beyond dispute - this has been established in a genetic research conducted across Europe and Asia. It was found that the Aryans originated around Gujarat. We also know that Ravan was closely connected to the Yadu race, which was from around Maharashtra and Gujarat. But that is as far as it goes. No one can say for certain as to whether he was dravidian or not!

      Delete
    6. अनानिमास प्लीज शांत व्हा !आणि हे वाचा , कारण रावण हा ब्राह्मण होता शिवभक्त होता हे आपणास माहित आहे का ? अनानिमास साहेब , दुसऱ्याचा बाप उगीचच कृपया काढू नये ही नम्र विनंती आणि स्वतःची ओळख कधीही लपवू नये अशीही विनंती , आपण एका गंभीर विषयावर बोलत आहोत म्हणून हि विनंती !व्यक्तिगत स्तरावर आपले काहीही भांडण नसावे ही अपेक्षा !

      A comparison of anglo-saxon settlement when romans invaded them, and later on, anglo-saxons choosing king arthur, a romanic king of english world will help us to bring light on ravan's rise in the non aryan world.

      Ravan was a brahman, so by all means, he was an aryan. He was also known as a vedic scholar, so he is a vedic brahman, and was a shiva bhakta.
      Yes, there were migrations of aryans, long time back. I will not disagree with this. From where these migrations happened, that cannot be confirmed, and people play politics on this.
      I have no problem with ravan being the kings of those world, called as dravida or nether world, because, he was elected by the natives of these lands.
      And since, he was a brahman king, hence, defeated indra, who was king of brahmans(deva,aryans). Remember, we are in vedic period, means, brahmans were rulers/lords/supreme. After indra got defeated by ravan, capital shifted to lanka. After all, he is a ruler, and all rulers aspire to become JAGATPATI or lord of the world. Not to forget, there are many indras.
      Now what happened? Defeated indra then goes to rishis, that I have been defeated by ravan who is king of non aryans. Kindly help me to avenge this defeat.

      But then, there was one person at ravan's house, Bibhishana , who was pro aryan. Everyone loves to rule at the end of the day. There is no right or wrong, when it comes to ruling. Only end justifies the means.

      And this is how the battle begins. The capital then shifted to ayodhaya. After ayodhaya, the capital shifted to hastinapura, then, a war where all the commnoers or working class revolted under the leadership of krishna took place. This is known as the war of mahabharata, thus ending the vedic era and vedic civilization. Whatever hinduism we see now days is not vedic, though, sunga etc tried to revive it. We no longer have that aryan vedism.

      So politicizing these events will be of no help, because, battle of civilizations never stop. नाही का हो अनानिमास साहेब ?

      Delete
  6. संजय सरांनी उपयुक्त लेख लिहिला आहे.अतिशय थोर ऋषी आणि महाकाव्य लेखक यांचे मूळ काय आहे ते पाहताना एक गोष्ट जाणवते की वैदिक काळाच्या सुरवातीला जातपात आणि कुलाचाराच्या कल्पना शिथिल असतील नियोग पद्धती वगैरे पाहिले की सामाजिक आणि नैतिक बंधने खूपच सैल होती असे म्हणावेसे वाटते त्याच काळात शैव धर्मात काय चालीरीती होत्या त्यावर आपण प्रकाश टाकाल का सर ?व्यासांनी शिवस्तुती केली आहे का ?एकूणच महाभारतात शिव्स्तुतीचे किती दाखले देता येतात ?असे प्रश्न मनात येतात.
    नैतिक नियम हे फक्त राजे लोकांसाठी शिथिल होते का सर्वसामान्य लोकांसाठीही सामाजिक नियम कडक नव्हते ?मत्स्यगंधा आणि इतिहास हा असेच सांगतो ,राजे लोक दिलेला शब्द पाळत होते असेही दिसते ,हे राजेलोक कोणत्या वर्णाचे होते , क्षत्रिय ?म्हणजे वर्ण तयार झाले होते किंवा होत होते असे वाटते कृप द्रोण हे ब्राह्मण असावेत असे दिसते .कौरव पांडव यांची उत्पत्ती पाहिली की समाजाची रचना अत्यंत लिबरल होती असे म्हणावेसे वाटते .
    रामायण महाभारत या काळात शैव धर्माचे लिखित धर्मग्रंथ काय होते हा प्रश्न मात्र सारखा समोर उभा राहतो,कारण वैदिक इतके लिबरल होते तर शैव लोकांची सामाजिक धारणा काय होती तेही आपण सांगितले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करावेसे वाटते .
    नियोग पद्धती शैव धर्मियाना मान्य होती का ?शैव वर्णसंकर मानत नसतील तर व्यास आणि संपूर्ण कुरु वंशाच्या बाबतीत त्याना आक्षेपार्ह काहीच वाटत नसेल ,त्या काळात शैवांचा समाजावर प्रभाव किती आणि नेमका कुठे होता ते समाजात नाही .
    आपण अजूनही यावर लिहाल अशी आशा आहे ,
    संजय सर पुन्हा धन्यवाद !आणि आभार .

    ReplyDelete
  7. संजय सर,
    अरुण शरद आणि दत्तात्रेय आगाशे यांनी उत्कृष्ट विचार मांडले आहेत त्याबद्दल श्री संजय सरांनी लिहावे,अनानिमास यांचे अपशब्द वापरण्याचे काही कमी होत नाही आणि वैदिकांवर अनावश्यक आगपाखड काही कमी होत नाही ,बिच्चारा अनानिमास.आणि बिचारा नीरज .
    आजकाल मी भारतीय, लिहा वाचा,श्री पवार,श्री कांबळे,श्री सागर भंडारे आणि डॉ शर्मा अशा लोकांनी या ब्लोगवर लिहिणे सोडले की काय या कल्पनेने फार फार वाईट वाटते .
    पाटसकर साहेबांनी पण लिहिणे कमी केलेले आहे हे आपले दुर्भाग्य .त्यांच्या लिखाणातला खुसखुशीतपणा लिखाणात ताजेपणा आणतो.
    अरुण शरद आणि आगाशे यांनी आपले विचार मराठीतून मांडले तर ते जास्त लोकाना समजून घेता येतील आणि त्यांनी पुनरावृत्ती टाळली पाहिजे , काही तांत्रिक त्रुटीमुळे हि पुनरावृत्ती होत असावी . संजय सरांना ते टाळता येईल .

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...