Tuesday, May 16, 2017

निष्प्राण जगणे!

Image result for lifeless life paintings


विगताच्या सुन्न छायेत 
अस्वस्थतेचे पीक भयंकर
घेत विकराल मिठीत विश्वाला
गुदमरवत आहे 
वर्तमान!

आत्मघातासाठी
सुसाट धावत निघालेल्या 
सावल्या
पण त्यांना कडे मिळत नाहीत.
लुतभ-या कुत्र्यासारखे
जगणे
पाठ सोडत नाही.

सर्वत्र तरी असतात गप्पा
चकदंभी श्रेयांच्या
अभिमानांच्या
आणि विझलेल्या तेजांच्या
जोमात.

गुदमरवणा-या वर्तमानात
निष्प्राण जगणे 
तरीही असते जोशात!

2 comments:

  1. संजय सर ,
    एक सुंदर उत्स्फूर्त रचना झाली आहे !
    एक सांगू का ? शेवटच्या ओळीतील जोशात हे खरेतर जोषात असे असले पाहिजे म्हणजे रसभंग होणार नाही !
    बरोबर ना ? रचनेच्या उत्फुर्ततेचे कौतुक केले पाहिजे !
    सर्वानीच शैव आणि वैदिकांनी !

    ReplyDelete
  2. फारच वास्तववादी अंत:र्मुख करणारी.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...