Monday, May 16, 2022

काशी विश्वेश्वर

 १. काशी हे प्रख्यात शिवक्षेत्र असल्याचे उल्लेख इसवी सन तिस-या शतकानंतरच्या पुराणांत आहेत. तेथे मंदिर असल्याचे मात्र उल्लेख नाहीत. आठव्या शतकानंतरच्या काशी खंडात (स्कंद पुराण) मात्र तेथे एक मंदिर असल्याचा उल्लेख आहे.

२. सन ११९४ मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने कनौजवर स्वारी करण्याच्या दरम्यान हे मंदिर उध्वस्त केले. काही वर्षांनी येथे रझिया मशीद उभी केली गेली.
३. सन १२३० मध्ये सुलतान उल्तमुशच्या काळात त्याच जागेवर एका गुजराती व्यापा-याने मशिदीच्या जागेवर पुन्हा मंदिर उभे केले. त्यानंतर दोनशे वर्षांनी सिकंदर लोधीच्या काळात पुन्हा उध्वस्त केले गेले.
४. सम्राट अकबराच्या काळात सन १५८५ मध्ये राजा तोडरमलने तेथे पुन्हा मंदिर बांधले. ब्राह्मणांनी या मंदिरावर बहिष्कार घातला कारण म्हणे मंदिर बांधणा-या मानसिंग आणि नंतर तोडरमलने आपल्या घरातील स्त्रिया मोगलांना विवाहात दिल्या होत्या.
५. जहांगीरच्या काळात वीर सिंघ देव याने मंदिराचा जीर्णोद्धार केला.
६. सन १६६९ मध्ये कच्छच्या राणीवर या मंदिराच्या तळघरात बलात्कार झाला म्हणून राजपुत सरदारांच्या आग्रहामुळे हे मंदिर जमीनदोस्त केले आणि तेथे पुन्हा मशीद बांधली पण मुळ अवशेष शक्यतो तसेच ठेवले.
७. सन १७४२ मध्ये मल्हारराव होळकर यांनी ही मशीद पाडून मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता पण शहरातील ब्राह्मण मंडळीने त्याला विरोध केला. कारण “तुम्ही येथून निघून जाल पण आम्हाला कोणी जिवंत ठेवणार नाही...” असे त्यांचे म्हणणे होते.
८. सन १७५० मध्ये जयपूरच्या महाराजांनी या स्थानाचे पर्यवेक्षण करून मंदिर उभारण्याचा घाट घातला होता पण दुर्दैवाने त्यांच्गे प्रयत्न यशस्वी झाले नाही.
९. सन १७८० मध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी ज्ञानव्यापी मशिदीच्या शेजारची जागा विकत घेऊन तेथे सध्याचे काशी विश्वेश्वराचे मंदिर बांधले. या वेळेस तेथील नबाब मुस्लिमच होता.
१०. काशी हीच प्रकाशनगरी असून पुराणप्रसिद्ध अग्निस्तंभ येथूनच आदी नाही अंत नाही असा फोफावला होता आणि देवादिकांनी प्रयत्न करूनही त्याना ना आरंभ शोधता आला ना अंत. येथे मंदिर असल्याचे कसलेही पुरातन अवशेष नाहीत. काशीत ज्योतिर्लिंग म्हणवणारी अनेक मंदिरे आहेत. मुळात काशी हेच “प्रकाशाचे नगर" असल्याने तेच ज्योतिर्लिंग आहे.
११. मंदिराच्या जागी मशीद आणि मशीद पाडून पुन्हा मंदिर हे मुस्लीम सत्तांच्याच काळात झाले आहे.
१२. हे मुळचे शिव मंदिरच असल्याने तेथे शिवाचे अस्तित्व मिळणे स्वाभाविक आहे. तळघर जे आहे तेथेच एका राजपूत राणीवर पूजा-यांनी बलात्कार केला होता आणि शिवभक्त राजपुतांनीच हे मंदिर उध्वस्त करायला लावले किंवा केले हा इतीहासही दुर्लक्षिता येत नाही.
पुनरुज्जीवनवादी हे असलेच उद्योग करत राहतील तर जैन आणि बुद्धांना अनेक हिंदू मंदिरे अर्पण करावी लागतील.

1 comment:

  1. का कळत नाही, पण कठुआ कांड'ची आठवण होत आहे...असेच एका मंदिरात मुस्लिम बकरवाल अर्थात मेंढपाळ/धनगर समाजातील एका लहान मुलीवर केलेल्या अन्यायाची आठवण होत आहे....

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...