Wednesday, November 1, 2023

आरक्षण

 आरक्षण हाच आपल्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे असे जेंव्हा कोणत्याही समाज घटकाला वाटू लागते, आणि कोणी आहे ते आरक्षण टिकवण्याच्या अथवा मिळवण्याच्या प्रयत्नात सर्वस्व पणाला लावते तेंव्हा आपली सामाजिक/आर्थिक अवनती तर झालेली असतेच पण सर्व समाजांची मानसिक अधोगती झालेली आहे याचे ते विदारक दर्शन असते.

खरे तर आरक्षण कालौघात कमी होत जावे हा घटनाकारांचा होरा होता. ते कमी होण्याचे दूरच, वाढतच गेले आणि आता तर ते अजून वाढवावे असे प्रयत्न सुरु आहेत. हे सर्व समाजाचे घोर अपयश आहे. सरकार प्रगती सर्व स्तरांत पसरवू शकले नाही आणि नोकरीकेंद्रित मानसिकता बदलवू शकले नाही याचे निदर्शक आहे.
खरे तर आता सर्वांनाच आरक्षण द्यावे किंवा सर्वांचेच आरक्षण रद्द करावे. अनेक पिढ्या आरक्षण भोगत आलेल्यांनी आरक्षणाच्या रांगेतून दूर व्हावे ही अपेक्षा बाळगणे तर मूर्खपणाचे होईल. आरक्षण हा सामाजिक विद्वेषाचा भाग बनत असेल तर ते नसणे हे अधिक योग्य राहील. ज्यांना बराच काळ आरक्षण भोगुनही अजूनही आरक्षणाच्या कुबड्या हव्या वाटतात त्यांनी आपण अजूनही मानसिक अपंग असल्याचे घोषित करावे म्हणजे हाही वाद उरणार नाही.
आरक्षणाचा मूळ हेतू काय होता आणि त्याचे आज काय झाले आहे हे पाहता भारतीय माणूस क्रमश: मतीमंद होत गेलेला आहे एवढेच सिद्ध करते. येथे विवेक नावाची बाब कधीच इतिहासजमा झालेली आहे आणि तरीहे उज्ज्वल धवल इतिहासाच्या गावगप्पा हाकल्या जाताहेत ती अवस्था शर्मनाक नाही असे कोण म्हणेल?
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...