Friday, March 16, 2012

यांच्याशी संवाद होत नसतो...

यांच्याशी संवाद होत नसतो...

ज्यांना काहीच माहित नाही आणि माहित करुन घ्यायची इच्छा नाही...ज्यांना असे वाटते कि आपल्यालाच फक्त माहित आहे आणि बाकी अन्य सारे मुर्ख आहेत...ज्यांना असे वाटते कि बाकी सारे द्न्यानी आहेत आणि आपणच काय तेवढे अद्न्य आहोत...
अशांशी संवाद होवू शकत नाही!


फक्त अशांशी संवाद होवू शकतो...

ज्यांना आपण द्न्यानार्थी आहोत आणि द्न्यान हे प्रत्येकातच कोणत्या ना कोणत्या पातळीवर अस्तित्वात असते याची जाण असते...

ज्यांना द्न्यान आणि अद्न्यान यातील सीमारेषेची जाण असते...

अवघे जग जरी त्याला द्न्यानी मानत असले तरी जो स्वत:ला केवळ द्न्यानोपासक समजतो...

अद्न्याहुन अद्न्य समोर आला तरी त्याच्यातील सुप्त द्न्यानाला जो उघड करु इच्छितो...

अद्न्यानातच द्न्यान असते आणि द्न्यानातही अद्न्यान असते असे जो मानतो...आणि अद्न्यानाला द्न्यानात बदलवण्याचा जो प्रयत्न करतो...

त्यालाच द्न्यानी म्हणावे...
आणि अशाच लोकांत संवाद होवू शकतो...!

1 comment:

Sanjay Nahar: A Man Who Works in India's MOST troubled zones!

  Sanjay Nahar   A Man Who Works in India's MOST troubled zones! By Sanjay Sonawani           India requires numerous socio-economic r...