Friday, February 12, 2016

ही स्वप्नेच अशी टुक्कार आणि निरर्थक

जाऊद्या...
ही स्वप्नेच अशी टुक्कार आणि निरर्थक
साकार व्हायला लाजतात लेकाची
अन
मनावर स्वार राहत गुलाम करतात आपल्याला
आज ...उद्या करत
ही स्वप्नेच का असतात?
खड्ड्यात गेली ती स्वप्ने
खड्ड्य़ात गेली ती स्वप्नांची गुलामी
माणसं मरतात...
मरुद्यात
जगतात
जगुद्यात
स्वप्नांची काय गरज?
माणसांना दिशाहीन करायला?
स्वप्नांनो....
पाठलाग करु नका
या बेड्याच ब-या आहेत
मनुष्य नसण्यातलेच अहोभाग्य
आम्हाला उपभोगू द्या...
स्वप्नांनो....
आमच्या नादी लागू नका
तुम्हाला साकार करण्यातले धैर्य
आम्ही कधीच गमावले आहे!

1 comment:

  1. आतला आवाज लिहिलाय सर तुम्ही.
    फार पूर्वी एका चांभाराच्या शेजारी त्याचा नातू खेळत होता ,त्याचेच हत्यार घेऊन चामडे कापत होता , परत आजोबांकडे टुकु टुकु बघत होता ,
    रस्त्याच्या फूट पाथवर,इवलेसे डोळे
    आणि भिरभिरती नजर !
    मी माझ्या मित्राला म्हणालो ,
    काय स्वपणे बघत असतील हे आजोबा आणि त्याचे नातवंड ?
    मित्र म्हणाला अरे वेडा आहेस तू -
    त्याना स्वप्नेच पडत नाहीत .
    आपल्या सारखी !
    बापरे , सरसरून माझ्या अंगावरून काटा आला !
    किती माज हा ?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...