Saturday, April 30, 2011

....तर बहुजन महामुर्ख होते म्हणुन....

मनुष्य जन्मतो तेंव्हा स्वतंत्र असतो पण जसा तो सामाजिक व्युहात येतो तसे पारतंत्र्याचे एकामागुन एक जोखड त्याच्या मानगुटीवर बसत जाते. "संस्कार" हे प्राय: माणसाला व्यवस्थेचे गुलाम करण्यासाठीच असतात. हे करा...ते करू नका या भडिमारात मुलांना वाढवले जाते. त्यामागे एक समाज म्हणुन त्या मुलाला जगायचे आहे आणि त्यात मान्य मुल्ये शिकवली गेली पाहिजेत ही रास्त भावना असते म्हणुन तेवढ्यापुरते ते समजावुनही घेता येते. पण संघटना मात्र व्यक्तिला एका बंदिस्त विचारव्युहात अडकवण्यासाठी सज्ज असतात. संघटना म्हटले कि तीचे म्हणुन काही तत्वद्न्यान असते. काय साध्य करायचे आहे याचा लेखाजोखा असतो. आपापल्या तत्वद्न्यानाचा प्रचार प्रसार करणारी यंत्रणा असते. त्यासाठी क्याडरही बनवल्या जातात. क्याडरमधील मंडळीला त्या=त्या तत्वद्न्यानाचे डोस देवून एक यंत्र बनवले जाते. चळवळीबाह्य स्वतंत्र विचार नाकारणे, किंबहुना त्यावर चढवता येतील तसे हल्ले चढवण्याचे प्रशिक्षण अशा रितीने दिले जाते कि अंधानुयायांची मांदियाळी निर्माण केली जाते. कोणाचे चुकुन दोळे उघदले तर त्याला हरप्रकारे संपवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रसंगी खुनही पडतात हे आपण कामगार संघटना ते काही समाज-राजकीय संघटनांच्या संदर्भात पाहिलेच आहे.

हा एक फ़्यासिझमच असतो.

एकाधिकारशाही हा समग्र मानवी जीवनाला लागलेला अभिशाप आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सम्यक...संतुलीत विचारधारा पेलण्याचे सामर्थ्य या संघटना आणि चळवळींनी गमावलेले असते. मानवी संबंध हे व्यापक परिप्रेक्षात न पहाता ते विशिष्ट वैचारिक चष्म्यातुन पाहिले जातात. त्यामुळे जीवनाचा समग्र पट त्यांच्या आवाक्यात कधीच येत नाही. ही त्यांची स्वत:चीच वंचना होवून जाते. स्वातंत्र्याच्या नावाखाली ही मंडळी मन:पुत पारतंत्र्य भोगत असते. म्हणजे इतर परतंत्र नसतात असे नाही...पण हे पारतंत्र्य सर्वच मानवी संवेदनांना ग्रहण लावणारे ठरते.

महाराष्ट्रात सध्या जातीय संघटनांची रेलचेल आहे. ब्राह्मणी वर्चस्ववाद गाजवू पहाणा-या आर.एस.एस. ची भुते जशी आहेत...मग त्यात अभिनव भारत काय वा सनातन प्रभात काय...तशीच काही प्रमाणात प्रतिक्रियात्मक...पण तशीच आणि तशीच कार्यप्रणाली असणा-या मराठा सेवा संघ आणि त्यांची उपांगे, भारत मुक्ती मोर्चा काय किंवा बामसेफ काय...या सर्वांतील एकच साम्य आहे ते म्हणजे या सर्वच संघटना फ्यासिस्ट आहेत. ब्राह्मणी संघटनांना एव-तेव ब्राह्मणी विचारधारेचे प्रस्थ...प्रसंगी दहशतवादी होवून सिद्ध करायचे आहे तर या अन्य संघटनांना मराठा-दलित वर्चस्व सिद्ध करायचे आहे. कोण श्रेष्ठ हा एक झगडा आहे. तो अव्याहत सुरुच असल्याचे आपण सध्याच्या महाराष्ट्रीय समाज वास्तवातुन पहातो आहोतच. यातून एक बाब अधोरेखित होते ती म्हनजे या सर्वांचाच वैचारिक पाया हा मुळात द्वेष आहे.

पण हे असतात दाखवण्याचे दात. अनुयायांच्या सहजी ते लक्षातही येत नाही. म्हणजे ज्या गोष्टी ब्राह्मणी संस्क्रुतीच्या आहेत असे ब्राह्मणी चळवळीवाल्यांना वाटते त्यांना सत्त्याचा कसलाही मुलाधार नसतो. सरस्वती पुजन हा जेथेही ब्राह्मणी पक्षप्रेणीत सरकारे आली तेथे राबवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण सरस्वती ही तथाकथित हिंदु मांदियाळीतील देवीच नाही हे मात्र ते सांगत नाहीत. तीला कोणतेही पुराण नाही. ज्या काही पुराणकथा आहेत त्या काही तिची शोभा वाढवणा-या नाहित. पण ऋग्वेदाची रचना सरस्वती नदीच्या काठी झाली असल्याने वैदिकाभिमानी मंडळीला सरस्वती पुज्य वाटने स्वाभाविक असले तरी तिचे अन्यांवर थोपन करणे हे असांस्क्रुतीक आहे. हे मात्र कोणी लक्षात घेत नाही. आर.एस.एस प्रणित शाळांमद्धे सती प्रथेच्या उदात्तिकरणाचे धडे आहेत. पण मुळात सती प्रथा भारतीय नाही...ती परकीय शक-हुण लोकांमुळे आली हे त्यांनाही समजत नाही. महाभारतात माद्री सती गेली असे सांगणारे महाभारताचा नीट अभ्यास करत नाहीत. पांडुचे शव हस्तिनापुराला आनले होते...आणि माद्री तत्पुर्वीच दिवंगत झाली होती. ती कशी मेली हे माहित नाही. पण ती सती गेली नव्हती हा इतिहास आहे. (महाभारताची चिकित्सक आव्रुत्ती.) राजपुत या सिथ्हियन जमातीमुळे (त्यांच्यात ती प्रथा अपरिहार्यपणे असल्याने) सती प्रथेचे उदात्तीकरण होवू लागले आणि सोयीने ब्राह्मणी संस्क्रुतीने ती नुसती उचलली नाही तर तिचे उदात्तिकरण केले. भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "मनु" या क्षत्रियाच्या नावावर खपवली...अशी अस्म्ख्य उदाहरणे सांगता येतील. सावरकरांचे उदातीकरण हे त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक केल्यानेच त्यांच्यावर टीका होते आणि त्यात नथुरामाचे उदात्तीकरण करणे हा सांस्क्रुतिक मुर्खपणाचा कळसच आहे.

आता असे धडधडीत खोटे सांगणारी अभिजनीय (?) संस्क्रुती असल्याने बहुजनीय म्हणवणारे आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे आम्ही बळी आहोत असा आक्रोश करत शाहु-फुले-आंबेडकरांचे नाव घेत समाज सुधारणेचा वसा घेतला असे दर्शवणारे तरी कसे मागे राहतील? "खोटारडेपणा हे भारतीय संस्क्रुतीचे अव्यवछेदक लक्षण आहे." असे मी पुर्वीच्या लेखांत म्हटलेच आहे. :"ठोकून देतो ऐशा जे..." यात कोण कशाला मागे राहील? सिंधु संस्क्रुती ही फक्त नागवंशीयांची होती...जातीप्रथेचे निर्माते ब्राह्मण आहेत...शिवाजी महाराज हे नागवंशीय होते...म्हणुन दलित आणि मराठे एकवंशीय आहेत...सईबाईच्या समाधीस्थळी कुत्र्याचा पुतळा बसवला...शनिवार वाडा हाच लाल महाल आहे...आद्य मानव हा मराठा होता इ.इ.इ.इ.इ.इ.

खरे तर भारतात प्रतिक्रांतीची गरज होती आणि आजही आहे. पण या अशा बावळ्या लोकांमुळे ती वायफळ जात असून तिचा कोणालाच उपयोग नाही. ब्राह्मण स्वांतसुखात जाण्यासाठी पु.ना.ओक ते मधुकर ढवळीकरांच्या कोशात लपतात तर कथित बहुजनीय खंदारे, सदार ते नावे घेण्याएवढीही योग्यता नसणा-या विचारवंतांच्या पदराआड लपतात आणि शरसंधान करत राहतात. जे शहाणे असतात...मानवतेचे खरे मुल्य समजते ते निराश होवून यांना लाथ मारत दूर जातात.

प्रतिक्रांती हवीच आहे. ब्राह्मणी सम्स्क्रुतीने स्वत:ची वंचना करत करत इतिहासाची असह्य मोडतोड केलेली आहे. बहुजनीय व्यक्तींचे-देवतांचे अपहरण केलेच आहे. ते त्यांनी केले ते फार बुद्धीवंत होते म्हणुन नव्हे तर बहुजन महामुर्ख होते म्हणुन. बुद्धाला विष्णुचा दहावा अवतार घोषित का केला हे तरी या मुर्खांना माहित आहे काय? असुरांच्या मनात संभ्रम निर्माण करून बुद्धाने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणुन बुद्धाला वैदिकांनी हा सन्मान दिला. पण बहुजनीय चलवळवाले आजही महामुर्ख आहेत आणि तात्कालिक यशांनी शेफारुन जात आपल्या अक्कलेचे दिवाळे काढत आहेत. द्वेष आणि फक्त द्वेषाने जागरण होत नसून ते सत्य मांडल्यामुळेच होवू शकते.

मानवी स्वातंत्र्याची कदर जे करू शकत नाहीत त्यांनी पुरोगामी म्हनवून घेण्यात मुळात अर्थ नाही. उलट सर्वांना व्यापक स्वातंत्र्य मिळेल हाच चळवळीचा निर्धार असायला हवा.

चुका सर्वांच्या झाल्या आहेत...होत आहेत...पण त्यांची पुनराव्रुत्ती होवू नये अशीच सर्वच चळवळवाल्यांकडुन अपेक्शा आहे. धन्यवाद.

Wednesday, April 27, 2011

पण ज्यासाठी मुळात हा सारा मानवी संघर्ष सुरू असतो...

यावज्जीव मनुष्य प्रयत्न करत असतो तो आहे या स्थितीपासून स्वातंत्र्य मिळवत अधिकाधिक मानसिक/आर्थिक आणि सत्तेचे अधिकाधिक अवकाश प्राप्त करण्यासाठी. आहे ती स्थिती सुखावह न वाटणे हे मानवी मनाचे एक अव्यवछेदक लक्षण आहे. मग ती स्थीती कोणतीही असो. एकपट धन असणारा दुप्पट धनाची अपेक्षा बाळगत असतो हे पुरातन औपनिषदिक विधान या परिप्रेक्षात ध्यानात घ्यावे लागते. याला "हाव" हा शब्द पुरेसा नसून तो मानवी मनोभुमिकेवर अन्याय करणारा आहे. खरे तर आपले स्वातंत्र्य, आपले अवकाश सीमित न राहण्यासाठी, किमान ती टिकुन राहण्यासाठी रक्षणात्मक अशी जी आर्थिक/सत्तात्मक/ धर्माधारीत तरतुद मनुष्यमात्र करत असतो, वा स्व-वाच्छित व्यवस्था बनवण्याच्या नादाला लागलेला असतो त्यालाच आपण मानवी स्वातंत्र्याचा अविरत चालत असलेला संघर्ष म्हणतो. परकीय सत्तांशीचा स्वातंत्र्य संघर्षही खरे तर याच मुलभुत भावनांच्या विकारांवर आधारीत असतो. परंतू वैश्विक परिप्रेक्षात स्वकीय आणि परकीय अशी मुळात तरतुदच नसते. जे स्वकीयांच्या म्हणुन स्वातंत्र्याच्या बंडात असतात तेच आपापल्या व्यवस्थेतीलही पारतंत्र्याच्या भावना देणा-या कथित परकियांच्या विरुद्ध पवित्र्यात उभे राहायला सज्ज होतांना दिसतात. त्यामुळे स्वकीय आणि परकीय या शब्दांना जरा तारतम्यानेच घ्यावे लागते.

भारतावर शक, हुण, कुशाणांनी अनेक शतके राज्ये केली. ते तसे परकीयच होते. ग्रीकांनीही काही काळ सीमावर्ती प्रदेशांवर शासन केले. ते येथे असे मिसळुन गेले कि आज त्यांचे स्वतंत्र आस्तित्व दाखवता येणे अशक्यच आहे. मुस्लिमांनी (यात अनेक वंशीय मुस्लीम होते...तुर्क, पर्शियन ते मोगल) भारतावर अनेक शतके सत्ता गाजवली. ते परकीय आहेत, अन्यायकर्ते आहेत म्हणुन राजपुतादिंनी त्या सम्राटांना आपल्या कन्या देण्यात अनमान केल्याचे दिसत नाही. किंबहुना मोगल साम्राज्य टिकण्यात राजपुतांचा मोठाच वाटा होता हे अमान्य करता येत नाही. याची सांस्क्रुतीक परिणती अशी झाली कि मोगल हे रक्ताने जवळपास ७५% भारतीय बनले. याची खंत शाह वलीउल्लाह सारख्या धर्मांध व्यक्तीला एवढी पडली होती कि १७३६ ते पुढेही त्याने भारतातील मुसलमान अजलाफ (हीण) काफिर झाले असुन शुद्ध इस्लाम आनायचा असेल तर जिहाद करायला हवा आणि हा जिहाद शुद्ध इस्लामी रक्ताचाच मनुष्य करु शकतो म्हणुन त्याने भारतावर आक्रमण करण्यासाठी नादिरशहा ते अब्दालीला प्रेरीत केले.

थोडक्यात शाह वलीउल्लाहलाही भारतीय मुसलमान आपले नाहीत, स्वकीय नाहीत म्हणुन भौगोलिकद्रुष्ट्या परकीय पण धार्मिक द्रुष्ट्या स्वकीय वाटल्या मुस्लिम सत्तांना निमंत्रण द्यावे वाटले. त्यतून जो इतिहास घडला तो आपणा सर्वांना माहितच आहे. नाझी हिटलर जर द्वितीय महायुद्धात जिंकला असता आणि सुभाषबाबुंनी भारत जिंकला असता तर आजचा आपला वर्तमान खुप वेगळा असता...किंबहूना हे लिहायला मी एक्तर जन्माला तरी आलो नसतो वा कधीच मारला गेलो असतो.

स्वकीय आणि परकीय या तर्तुदी परिस्थितीसापेक्ष बनत जातात त्या अशा. या सर्व तरतुदींमागे मानवी स्वार्थांच्या अविरत मशाली तेवत असतात...भडकत असतात. स्वातंत्र्यात असणारेही कोणत्यातरी पारतंत्र्याच्या भावनेत असतात...कोणी धार्मिक पारतंत्र्याच्या भावनेत असतो तर कोणी राजकीय. कोणी प्रांतीय सापत्नभावाच्या भावनेत असतो तर कोणी आर्थिक... कोणी जातीय...परस्पर संघर्ष एवढा तीव्र होत असतो कि शेवटी कोणीच स्वकीय नाही हा साक्षात्कार घेत मानसिक नैराश्याचे बळी होतांना दिसतात.

पण मुळात स्वातंत्र्याचा अर्थच कळालेला नसल्याचे हे लक्षण आहे. मुळात मानवी जीवनधारणांचा नेटका अर्थ न समजल्याचे हे लक्षण असते. मानवी आदिम प्रेरणा मनुष्याला आजही कशा जखडुन ठेवत आहेत याचे हे उदाहरण असते.

मनुष्य जन्मता:च एक संघर्षरत प्राणी आहे. निसर्गाने त्याला असंख्य जीवनावश्यक साधने जी अन्य प्राणिजातीला बहाल केली आहेत ती नाकारलेली आहेत. त्यामुळेच डोनिकेनसारखा अभ्यासक मनुष्य हा मुळचा या भुतलावरील नाहीच अशी साहसी विधाने करत असतो. मनुष्याला आहे ती अपार बुद्धी आणि तीचेही वितरण सर्वच मानवप्राण्यात समान नाही. तिची मुक्त-स्वतंत्र वाढ होवू नये याचीही तरतुद माणसानेच धर्म/राज/अर्थसत्तेच्या रुपाने प्राचीन काळापासून करुन ठेवली आहे. "प्रश्न विचारु नका" अशी तंबी धर्मसत्ता देते तर कायद्याचा सन्मान करा असे कायदा बनवणारे धमकावतात. अर्थसत्ता तर शोषणासाठीच असते.

मग माणसाच्या संघर्षाचे परिमाण निसर्ग वा नियतीशीच्या संघर्षाशी मर्यादित रहात नाही तर तो संघर्ष मानवनिर्मित पारतंत्र्याशी येवून ठेपतो. असंख्य लोक यालाच नियती मानत तीचा निमुट स्वीकार करत जातात आणि आहे त्या बंदिस्त स्वातंत्र्यालाच मन:पूत स्वातंत्र्य समजतात तर असंतुष्ट लोक याहीपेक्षा अधिक चांगली स्थीति आणण्यासाठी बंडे पुकारतात. अव्यवस्थेत अव्यवस्था आणु पहाणा-या या स्थित्या मानवाला दिल्या गेलेल्या बुद्धी नामक एकमेव हत्त्याराचे असे वाटोळे करत जातात.

आजचा माणुस हा मुळात मानवी व्यवस्थेचा अपरिहार्य गुलाम आहे. स्वकीय आणि परकीय ही त्याची टोळी काळातील आदिम भावना आजही पुरेपूर जीवंत आहे. किंबहूना अभिव्यक्तिचे असंख्य मार्ग आज उपलब्ध झाल्याने ती बळावतच चालली आहे असे दिसते. या परिप्रेक्षात मानवी स्वातंत्र्य हे जसे विस्तारीत व्हायला हवे होते तसे न होता ते मात्र उलटपक्षी अधिकाधिक संकोचायला लागले आहे आणि याची समाजशास्त्रीय काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

संघटना या मानवी स्वतंत्र्याचा विस्तार घडवून आणण्याचा अविरत प्रयत्न करणा-या विविध परिप्रेक्षातील मानवी समुदायाच्या संस्था असाव्यात असाच मुळात "संघटना" या शब्दाचा अर्थ आहे. हे स्वातंत्र्य आहे त्या जातीय/वंशीय/धर्मीय/आर्थिक/राजकीय आणि सामाजिक अवकाशापेक्षा व्यापक अवकाश मिळावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी असतात/असाव्यात. अंतिम उद्देश्य हा अवकाशांचे विस्तारीकरण करत एकूनातीलच मानवी समाजासाठी ते उपयुक्त व्हावे आणि इतरांची अवकाशेही स्वीकारत जात एकजीव अवकाश निर्मान व्हावे हा असावा.

परंतू प्रत्यक्षात मात्र संघटना या प्राय: स्वता:चे, स्वता:च्या अनुयायांचे अवकाश नुसते सीमितच नव्हे तर संकोचत नेण्यात धन्यता मानत जातात हे एक वास्तव आहे. ही एक वंचना असते. या वण्चनाखोरांच्या बहुलतेमूळे आजच्या सर्वच जागतीक समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. पारतंत्र्य हे फक्त राजकीय नसते. त्याची परिमाणे असंख्य असतात. पण आपापल्या अनुयायांना या सर्वच संघटना (यात राजकीय पक्ष ते अगदी एन.जी.ओ. ही आले) या पारतंत्रातून बाहेर काढण्यास राजी नसतात कारण त्यांना अनुयायांना पारतंत्र्यात ठेवत थोडके का होईना स्वताचे स्वतंत्र अवकाश हवे असते. त्यासाठीच सारा आटापीटा चालू असतो. विचारांच्या कोलांट उड्या कराव्या लागतात...भागही पडते...कारण ती त्यांची त्यांच्या पारतंत्र्याची एक अपरिहार्य गरज असते...आणि म्हणुन भावनीक लाटेवर स्वार झालेल्या अनुयायांचीही.

पण अनुयायांचाही कधी ना कधी भ्रमनिरास होतो...संघटना फुटत जातात...राजकीय पक्ष फुटत जातात...आर्थिक संस्थाही फूटत जातात...

पण ज्यासाठी मुळात हा सारा मानवी संघर्ष सुरू असतो...ते म्हणजे स्वातंत्र्य...ते कोठे असते?

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? कशासाठी आहे? मनुष्याचे एकमेव हत्यार, जे निसर्गाने त्याला दिले, ती म्हणजे बुद्धी, तीच जर बंदिस्त व्युहात गेली असेल...आम्ही म्हणतो तसाच विचार करा अशी धर्माद्न्या/राजाद्न्या/अर्थाद्न्या असेल आणि ती अगणित गुलाम स्वेछेने पाळत असतील तर माणसाला बुद्धी नावाचे हत्त्यार/साधन आहे हे कसे मानायचे? आणि नव्य विचार करतात असे म्हननारेही जर नवे बंदिस्त अवकाश (मग ते जातीचे असो कि धर्माचे, राजकीय व्यवस्थेचे असो कि अर्थव्यवस्थेचे) निर्माण करण्याच्या नादी लागणार असतील तर खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?

Tuesday, April 26, 2011

पण हा एकाकीपणा वाढतच जात असतो!

मानवी समाजाची प्रगल्भता ही एकतेत असते कि संघटीत पण जातीय/वंशादि पायावर विखुरले असण्यात? जीवा-शिवात ऐक्क्य पाहनारे, स्रुष्टी आणि अखिल मानवादि प्राणिमात्रात अद्वैत पाहणारे तत्वद्न्य याच भुमीत होवुन गेले. कणाद, कपिल मुनी, भ्रुगू (हे सारे असूर संस्क्रुतीचे होते) यांनी भौतिक तत्वद्न्यानाला/शास्त्राला महत्ता दिली. प्रजा ज्या तत्वद्नानामुळे जीवनधारण करते तोच धर्म असतो असे युधिष्ठीर सांगतो. फक्त पाच गावांवर सला करु पाहणारा युधिष्ठीर एक प्रकारे तत्कालीन गांधीयन तत्वद्न्यान वापरतांना दिसतो. प्रजा म्हणजे अवघा समाज यातील ऐक्याची संकल्पना मुळात नवीन नाही. बुद्ध-महावीरानेही याच महनीय संकल्पनांची महती सातत्याने गायलेली दिसते. बुद्धाचे असंख्य अनुयायी ब्राह्मणच होते. जात-वर्ण धर्मनेत्यांनी नाकारुनही अनुयायी मात्र कोरडेच राहीले. मानवतेची अगाध करुणा कधी त्यांना स्पर्शलीच नाही. अनुयायांनी धर्माला जे रुप दिले ते धर्मसंस्थापकांना अभिप्रेत होते काय?

थोडक्यात धर्मद्न्य वा संस्थापकांना कोठडीबंद करून अनुयायांनीच धर्मांचे वाभाडे काढले असल्याचे आपल्याला दिसते. उदाहरणे असंख्य आहेत. उदा. बुद्धाला नेमका कोणता धर्म सांगायचा होता यावर वाद होत कुशाणकाळात तिसरी धर्मसंगिती भरवावी लागली...बुद्ध धर्मात दोन गट पडले. जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर हे दोन तट पडले. ख्रिस्त्यांत क्यथोलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन गट पडले. उपगटांची तर गणतीच नाही. म्हणजे धर्म जो सांगितला होता तो, धर्म ज्याचे आकलन झाले आहे तो आणि धर्म असा असला पाहिजे असे वाटतो तो...असे धर्माचे व्यक्तिनिष्ठ तुकडे पडत गेले आहेत असे दिसुन येते.

संघटनांचेही/पक्षांचेही असेच होते. बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष स्थापला तो आज किती हिस्शांत वाटला गेला आहे? बाम्सेफ आज किती आहेत हाही संशोधनाचा विषय आहे. मराठा सेवा संघातुन किती फुटुन निघाले? मराठा हितवर्धीनी आज किती संघटना आहेत? खुद्द ब्राह्मणांच्या जातीनिहाय...चित्पावन ते देशस्थ किती संघटना आहेत? छोट्या जाती...उदा...शिंप्यांच्याही किमान १०-१२ संघटना असतील.

याला आपण विखुरलेपण म्हणु शकतो. याला काहीकेल्या एकतेचे तत्वद्न्यान राबवू पाहणारे भारतीय उदात्त संस्क्रुतीचे पाईक म्हणता येणार नाही. संघटणेपुरती अभेद्य एकता अभिप्रेत असते हे खरेच आहे पण एकुणातील समाज म्हणुन एकता नाकारली जात असते आणि तेथेच समाजाचा एकुणातील अभ्युदय खंडित केला गेलेला असतो.

त्याच्या परिणामांची जाण मात्र मानवी घटकांना नसते.

मानवी इतिहास लाखो वर्ष जुना आहे. भारतातील इतिहास आता किमान १४-१५ लाख वर्ष मागे जातो. तो अबोल इतिहास आहे आणि दगडी शस्त्रांच्या मार्फतच ढूडाळावा लागत आहे...शस्त्रे हाच मानवी पुरातिहेसाचा पुरावा आहे...आजचाही आहे...भविष्यातील वेगळा काय असणार आहे?

शस्त्रे बदलली. भाषा, संस्क्रुती, जात, धर्म, वंश यांचीही अभिनव शस्त्रे बनवली...

मानवी इतिहास हाच मुळात युद्धांचा इतिहास बनलेला आहे.

तेच वर्तमानही आहे.

मग भविष्य युद्धायमान नाही तर काय असणार?

प्रतिक्षणी आम्ही कोणत्या ना कोणत्या युद्धात असतोच. कोनती ना कोणती बाजु आम्ही घेतलेली असतेच. कारण युद्धात जिंकायचे आहे. ते मग अन्य जातीयाविरुद्ध असो कि वंशीयाविरुद्ध, पक्षाविरुद्ध असो कि संस्क्रुतीविरुद्ध...

असे बाजु घेनारे नेहमीच विवेक हरवून बसलेले असतात...कारण आपला पक्ष/जात/धर्म हरला तर तो आस्तित्वचा प्रश्न आहे असे वाटते...
पण जे विवेकी असतात...व्यापक पायावर एकुणातीलच समाजाचा विचार करू लागतात त्यांना संपवणे हे या सर्वच टोळीबहाद्दरांचे काम बनून जाते.

मानवाने आहे त्या स्थितीपेक्षा व्यापक विचार करावा हे धर्ममार्तंड काय किंवा संत काय, राजे-महाराजे काय किंवा नेते काय यांना कधीच अभिप्रेत नसते. "ठेविले अनंते तैसेची रहावे..." असे संत तुकारामादि संतांची शिकवण असते तर पुर्वजांनी जी रुढी घालुन दिली तसेच पुढेही वर्तन करावे असे बाप सांगत असतो. रुढीसंकेत तोडण्याची हिम्मत सहसा भारतात कोणी दाखवलेली दिसत नाही. त्यामुळे एका अभद्र संकेत परंपरेत समाज/जाती/धर्मीय डुबवले जातात आणि त्यांचा अखेर कडेलोट होतो. केला जातो. तुकाराम कालसुसंगत कि कालविसंगत हा वाद त्यामुळे निर्माण झाला तर उद्रेकी प्रतिक्रिया उठणे स्वाभाविक आहे. पण चिकित्सा नाकारणे त्याहुन भयंकर आहे. रामदासांनी तर जे तत्वद्न्यान (?) मांडले आहे, त्यातील काही बाबी वगळता ते सांप्रदायिकच आहे...पण हेही ऐकायचे नाही असे ठरवून बसलेल्या नवसांप्रदायिकांचे काय करायचे? चिकित्सा नको...हाच काय तो अट्टाग्रह आहे.

याचा अर्थ ख-या स्वातंत्र्याच्या संध्या मिळतच नसतात असे नाही. जे ते मिळवतात त्यांना रोखता येण्याचे सामर्थ्य नाही म्हणुन कथित अनुयायी वाट पाहतात आणि अशा पद्धतीने त्याभोवती जाळे विणत जातात कि अंतत: त्या महानायकाचा अंत अपरिहार्य होवून बसतो. येशु ख्रिस्ताचा घातकी त्याचाच अनुयायी होता. परिणाम येशुला क्रुसावर चढावे लागले. ज्युलियस सीझरचे खुनी त्याचेच एकेकाळचे मित्र आणि अनुयायी होते. शिवाजी महाराजांची हत्त्या करणारे शेवटी कोण होते? संभाजी महाराजांच्या हत्येचा कट करणारे कोण होते? (पहा: "शिवपुत्र संभाजी": कमल गोखले.) सावरकरांनी नेमके कोणत्या परिस्थितीत प्रायोपवेशन केले? गांधींची हत्या करणारा गांधीअनुयायी नव्हता...पण गांधी मेले तर बरे अशी भावना कोन्ग्रेसींत होतीच...नाहीतर गांधीजींना मारण्याचे आधे किमान ४ प्रयत्न हौन गेल्यानंतरही त्यांच्या रक्षणासाठी कोन्ग्रेसी सरकारने कसलीही तजवीज का केली नाही?
अनुयायांना आपला नायक जोवर डोईजड होत नाही तोवर हवाच असतो. जोवर त्यांचे स्वार्थ बिनदिक्कत साधले जातात तोवर नायक/नेते हवेच असतात. पण अनुयायीच नायकाचा घात घडवतात हा इतिहासच आहे.

मग नायकाचे/नेत्याचे तत्वद्न्यान...मेल्यावर सांगायला कामाला येतेच कि नाही? खुपच.

वरील उदाहरणे वा विवेचन मी प्रवचनार्थी दिलेली नसुन मानवी समाज हा अखिल ऐक्याच्या मानसिकतेत न जाता विखंडित आणि कधी फायदेशीर तर कधी विनाशक परिणाम भोगण्याची अव्याहत आव्हाने नियतीला का देत असतो या प्रश्नावर चिन्तन करण्यासाठी आहे.

एकटेपना, जीवनाची वर्तमानकालीन आणि भवितव्याची अनिस्चितता, गोंधळलेले नातेसंबंध, जीवनाची पेलवता न येणारी अव्याहत वाहत राहणारी गती, मानवी संबंधातील बदलत जानारे जातीय/धर्मीय/वर्गीय संबंध....

या आणि अशाच अनेक भावना मानसाला केंद्रीक्रुत करत जात त्याचे मानसिक सौख्य हिरावत नेतात. त्यातुन द्वेषाचा विखार मानवी सहज-स्वाभाविक सहजीवनाच्या प्रेरणांवर मात करत जातात. नैसर्गिक चलाखी जाग्रुत होत कोणाशी कसे वागायचे याचे स्वयंनियम बनवले जातात आणि मानवी वर्तन हे स्वाभाविक न रहाता क्रुत्रिम बनुन जाते. याचा फायदा धर्मांध/जात्यंध/वंशवादी वा पक्षीय राजकारणी घेतात...ते सांगतात...आम्हीच तुमचे भले करु शकतो...आणि हे दिशांध लोक त्या-त्या लाटांवर वाहवत जातात. संघश/युद्ध सुरुच राहते. तीव्र होते.

सध्याच्या सर्वच यंत्रणा माणसाला माणुस म्हणुन जगु देण्यासाठी नसुन त्याला अधिकाधिक एकाकी करण्याची संयंत्रे आहे. ते समुहाचा/तात्कालिक सुरक्षेचा अभास देतात...आणि त्या त्या परिस्थीतीत त्या त्या लोकांना बरेही वाटते...

पण हा एकाकीपणा वाढतच जात असतो. आज आपण एकुणातील मानवी व्यवस्था पहाल तर जातीत असुनही मानसे एकाकीच आहेत. धर्मात असुनही ते एकाकीच आहेत. जातीय संघटना वा पक्षीय/धार्मिक संघटनांत समष्टी म्हणुन जात आहोत असे वाटत जे जीवापाड प्रयत्न करतात...सर्व आदेश बिनतक्रार पालतात...आपले शोषण होवु देतात...पण त्यांचे विचार करण्याचे, मन:पूत जगण्याचे स्वातंत्र्य नाकारले जाते.

अंतता: त्यांच्या पदरी काय पडते?

असंख्य संघटना, चळवलींचे कार्यकर्ते या शोकांतिकेतुन गेले आहेत...जात आहेत.

त्यात आपल्याला अजून किती काळ भर घालायची आहे?

परत भेटुयात.

Monday, April 25, 2011

पण म्हणुन समाजातील मानवाचा म्हणुन....

मनुष्य प्राणी हा मुलत: भावनीक आहे. त्याचे जीवनसिद्धांत/धर्मसिद्धांत/राजकीय सिद्धांत/सामाजिक सिद्धांत हे भावनेच्या बळावरच हेलकावत असतात. त्यामुळे मुलभुत तत्वे निरलसपणे आकलन करण्याची क्षमता तो अनेकदा हरपुन बसलेला असतो. चतूर लोक हे ओळखुन असल्याने भावनांच्या लाटा कशा उत्पन्न करायच्या आणि त्या ओघात समाजाला वाहवत नेत आपापले स्वर्थ कसे साध्य करायचे हे त्यांना चांगलेच माहित असते. आजवरच्या अनेक क्रांत्या, चळवळी, आंदोलने ही वास्तवतेच्या मार्गाने न जाता भावनीक होत गेली आहेत आणि म्हणुनच त्यातुन कोणत्याही समाजाचे शाश्वत कल्याण झाले आहे असे दिसून येत नाही. हा जगभरचा प्रश्न आहे.

खरा प्रश्न हा नेहमीच नेत्रुत्त्वाचा असतो. डा. बाबासाहेब, मार्टिन ल्युथर किंगादि नेत्यांनी त्यांच्या चळवळीला भावनिकतेपेक्षा वैचारिकतेचा सखोल पाया दिला. त्यामुळेच त्यांना व्यापक यशही मिळाले. पण ते यश टिकवून चळवळ अधिक व्यापक मानवी हितासाठी पुढे नेण्याची जबाबदारी ही अनुयायांवर असते. पण तसे झाल्याचे आपल्याला भारतात तरी दिसत नाही. गांधीविचारांची होळी गांधीवाद्यांनीच कशी पेटवली आणि आज कसा धुडगुस चालु आहे हे आपण पहातोच आहोत. समाजाच्या गरजेतुन नेते निर्माण होतात, नेते समाज घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात...पण जसा काळ पुढे सरकतो तशी त्या-त्या काळातील सर्वच तत्वे कालबाह्य होवू लागतात हे भावनांच्या लाटांवर स्वार होणा-यांना...स्वार करवणा-यांच्या लक्षात येत नाही. वर्तमान आणि भविष्याच्या परिप्रेक्षात तत्वद्न्यानांची नव्याने मांडणी करणे आवश्यकच असते हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे या चळवळी ख-या अर्थाने सामाजिक होत नसुन मानवी समाजाला प्रतिगामी बनवण्यासच हातभार लावतांना दिसतात.

वैचारीकतेचा अभाव हे एक कारण आहेच पण त्याचवेळीस जेवढा पुरातनवाद अधिक तेवढे स्वश्रेष्ठत्व अधिक असा एक गंड निर्माण होवू लागतो. भारतातील सारेच मिश्रवंशीय असून शुद्ध म्हणता येईल असा एकही मानवी गट आस्तित्वात नाही असे खुद्द डा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतले असतानाही अजुनही आर्य वंशीय, नागवंशीय, मुलनिवासी अशी सरधोपट मांडणी केली जात आहे. ती बाबासाहेबांची उंची खुजी करणारी आहे हे या मंडळीच्या लक्षात येत नाही. भारतात नाग, गरुड, कासव, वानर, सिंह, व्याघ्र अशी असंख्य प्राणी/व्रुक्षादिंना प्रतीके (Totems) मानणारे जनसमुदाय रहात होते. त्यांच्यात कधी वैर तर कधी मित्रत्व असे संबंध होते. भारतीय शैवप्रधान धर्म त्यातुनच अनेक जमातींची प्रतीके स्वीकारत झाला. ही ऐक्याची एक उदात्त सुरुवात होती. नागवंशीयांचा नव्हे तर नाग प्रतीक मानणा-यांना पुरातन इतिहासात (किमान खांडववन भागात) संहार करण्याचे कार्य क्रुष्णाने महाभारतात पार पाडले व त्याला अर्जुनाची मदत झाली हे विख्यातच आहे. क्रुष्ण स्वता:ला यदुवंशीय म्हनवून घेत असे तर अर्जुन कथित अर्थाने माअत्रुसत्तक पद्धतीचा पाईक होता. (एका स्त्रीशी पाच भावांचा विवाह किंवा विविध पुरुषांकडुन कर्ण ते नकुल-सहदेव यांची निर्मिती करुन घेणारी कुंती ही उदाहरणे या गटात मात्रुसत्ताक पद्धतीचे अवशेष दाखवतात.) मग हे पुरातन (वैदिक नव्हे) संस्क्रुतीचे पाईक नागांच्या जीवावर उठले ते काही भिन्न वंशीय म्हणुन नव्हेत तर त्यामागील तत्कालीन राजकीय कारणे पहावी लागतात.

भिन्न देवके, भिन्न जीवनपद्धती असणारे असंख्य सामाजिक घटक तेंव्हा होतेच. ते कोणत्याही धारणेने एकवंशीय नसून मिश्रवंशीय (समाजगट या अर्थाने) होते. नाग जरत्कारु या स्त्रीने जरत्कारु नावाच्या ब्राह्मण पुरुषाशी विवाह केला ही महाभारतातील घटना या अर्थाने बोलकी आहे. महाभारतातच युधिष्ठीर तत्कालीन स्थितीत ब्राह्मण कोणाला म्हनावे कारण वर्णसंकर स्थितीमुळे शुद्ध रक्ताचे कोणी रहिले नाही याबद्दल चिंतीत तर दिसतोच पण तो उत्तरही देतो कि ज्याच्या अंगी द्न्यान, दया, शील आणि करुणा असेल त्यालाच ब्राह्मण म्हणावे. पण हाच युधिष्ठीर मात्र क्षत्रियांच्या संदर्भात कसलेही विधान करत नाही हेही येथे लक्षात घ्यावे लागते. वैष्य आणि शुद्र तर फार दुरची बाब झाली. कर्णाला गुण बघुन क्षत्रिय माना असे तो कोठेही म्हणत नाही. महाभारत हे ब्राह्मण माहात्म्याने अतिरंजित बनले आहे हे मान्य केले तरी वर्णसंकर ही फार मोठी समस्या बनली होती आणि कोणीही कोणाशी वर्णापार जात विवाह करत होते हे सामाजिक वास्तव होते एवढेच येथे लक्षात घ्यायचे आहे.

अशा विराट सामाजिक इतिहासाच्या पार्श्वभुमीवर आज वांशिक भाग हा हद्दपार झालेला आहे असेच म्हणावे लागते. असे असतांनाही, ज्या महानायकांनी व्यापक विचारांची बैठक दिली ती पुढे विस्तारित करण्याचे, त्यांना नवे आयाम देण्याचे आणि ते वास्तवात आणित समाजाचे व्यापक हित घदवुन आनण्याचे कार्य करण्याऐवजी वैदिकांप्रमाणेच वेद वाक्य प्रमाणम अशी अविवेकी/अप्रागतीक भुमिका घेणारे जी चूक करत आले आहेत तीच नेमकी चुक बहुजनीय नेत्यांच्या/आदर्शांच्या वैचारिकतेबाबत केली जाते. सोयीचे तेवढे घ्यायचे, गैरसोयिचे दुर्लक्षित करायला भाग पाडायचे हा नव-पुरोहितांचा धंदा आहे. उदा. बाबासाहेबांनी शेतकरी प्रश्न व ते दुर न झाल्यास संभाव्य आत्महत्त्या, वीजेचा, पाण्याचा प्रश्न, नदीजोड करण्याची संकल्पना, स्त्रीयांचा प्रश्न, कुटुंबनियाजनाची गरज, जेंव्हा भारताची लोकसंख्या ३५ कोटींवर नव्हती तेंव्हा वारंवार मांडली....हे प्रश्न फक्त दलितांचे नव्हते. आज ते वास्तव आपण पहात आहोत. एवढी सर्वसमावेशक समाजव्यापक भुमिका घेतलेली असुनही आंबेडकरवादी म्हणनारे गेल्या ७०-८० वर्षात कोणताच धडा घेवू शकले नाहीत हे कोणाचे दुर्दैव आहे?
बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते बनवून हे महाभाग मोकळे झाले. त्यांच्या जयंत्यांना दारु पिवुन ओंगळ नाचत ओर्केस्ट्रा पार्ट्या करायला हे मोकळे झाले. हे एक उदाहरण मी देतो आहे तश्याच प्रकारे अनुयायी अन्य महनीय नेत्यांबद्दल वागतांना दिसतात. त्यांच्या नावाला देवत्व देवून टाकायचे...त्यांची साररुपातील, बीजरुपातील विचार विसरुन जायचे वा विसरायला भाग पाडायचे, त्या विचारांना पुढती न्यायचेच नाहीत कारण मग त्यांच्या नावावर धंदे कसे चालणार?

या महनियांच्या नावावर दैवत्व चढवुन तो विचार पुढे नेण्याची, त्या विचाराला बदलत्या काळपरिप्रेक्ष्यात सुसंगत बनवत त्यातील महनीयता वाढवायची असे करायला वैचारिक प्रगल्भता लागते आणि त्याच्या पुरेपुर अभाव या मंडळीत आहे. शिवाजी महाराजांचा विचार/क्रुती कालसुसंगत स्थितीत प्रगल्भ करण्याऐवजी स्वर्थासाठी ते नागवंशीय होते असा सिद्धांत मांडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होत केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याला ऐतिहासिक पार्श्वभुमीवर कसलाही पुरावा नाही असे कोणी सिद्ध करु लागले कि या भावनिक अद्न्यांचा तिळपापड होतो. पण त्यातून त्यांच्याच लेखन/संशोधनांतुन निर्माण होणारे प्रश्न उपस्तित केले कि लिहिणारा हा बाबासाहेबांचा, (म्हणजेच पर्यायाने बौद्धांचा), शिवाजी महाराजांचा अवमान करणारा ठरवून शरसंधान केले जाते. पण महाराज नागवंशीय होते आणि दलित हेही नागवंशीयच होते यातील पुरावे देत कोणी सिद्ध करायचे? हा जावईशोध मी तर लावलेला नाही. ज्यांनी लावला ते उत्तरदायी नव्हेत का? ही संशोधनाची पद्धत असते का? आणि जर शिवाजी महाराज नागवंशीय होते...म्हणजे त्यांच्या भाषेत मुलनिवासी होते तर मग त्यांनी क्षत्रियत्वाचा अधिकार मागितला याचे नेमके स्पष्टीकरण काय? म्हनजे तीढ्यातील खोटे तुम्हीच सांगायचे, ते नागवंशीय आहेत असेही बिनदिक्कतपणे सांगायचे...आणि दलितही नागवंशीयच असेही सांगुन त्यांनाही तिढ्यात पाडायचे याचा नेमका अर्थ काय होतो? (या प्रश्नांची उत्तरे मिलतील अशी आशा आहे...न मिळाल्यास मी ती नंतर देईलच.)

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातुन काय साध्य होणार आहे? मराठे आणि दलितांत ऐक्य प्रस्थापित होवून रोटी-बेटी व्यवहार सुरु होणार आहे कि काय?

असे जर घडले तर तो या देशातील सर्वात गौरवशाली इतिहास लिहिणारा अध्याय असेल यात शंकाच नाही. पण हे असे घडवून आनण्यासाठी इतिहासाला वेठीला धरायची काय गरज आहे? त्याची असंयुक्तिक तोडमोड करण्याची काय गरज आहे?

असे असंख्य प्रश्न आहेत आणि ते चर्चौघात मी विचारतच राहील आणि उत्तरांची अपेक्षा ठेवतच जाईल. ही सुर्यावर थुंकण्याची बाब नव्हे तर सुर्यालाच वेठीला धरणा-यांना जाब विचारायची बाब आहे.

पण या क्षणी प्रतिपाद्य विषय आहे तो हा कि नवी महनीये निर्माण करायची नाहीत, गतकाळांतील महनीयांना देव्हा-यात बसवून त्यांचे पुतळे-विहार-मंदिरे बांधुन पुजणीय करणारे भाट प्रत्येक समाजात असतात आणि ते केवळ स्व-स्वार्थसिद्धीसाठी समाजाला/स्वजातीयांना आणि जेही कोणी स्वजातीयांचे राजकीय हीत साध्य करण्यात मदतगार ठरु शकतात त्यांना बहकवण्यासाठी आहे.

आणि त्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे शस्त्र म्हनजे भावना...
चिकित्सा नाकारणे...
आणि चिकित्सकांचा सरळ घात करणे...
आणि बव्हंशी सर्वसामान्य समाज हा नेहमीच भेकड असतो. किंबहुना त्याने नेहमीच या ना त्या भीतीत जगावे यासाठी सर्वच यंत्रणा काम करत असतात.
भयाच्या अखंडित जोखडाखाली समाज पिचलेला असतो.
तोही भयभीत भावनेचा बळी असतो.
पण म्हणुन समाजातील मानवाचा म्हणुन जोही काही विवेक आहे तो संपलेला नसतो.

पुन्हा भेटुयात.

Sunday, April 24, 2011

समाजाचे एकुणात भले व्हावे यासाठी?

वांशिक/धार्मिक/प्रांतिक आणि जातीय नागांचा एक विखारी डंख भारतीय समाजाला बसलेला आहे आणि त्यामुळेच जी ऐहिक प्रगती एव्हाना साधता आली असती ती एका संभ्रमाच्या तिठ्य़ावर रेंगाळलेली आहे. या संभ्रमांना अनेकविध आयामे आहेत. परिमाणे आहेत. ब्राह्मणांमुळे बहुजनांची प्रगती झालेली नाही असा बहुजनांचा (?) आरोप आहे तसाच मराठा या राज्यकर्त्या समाजामुळे मराठेतर बहुजनांची प्रगती झाली नाही असा आरोप आहे. दलित -भटके-विमुक्त-आदिवासींची परगती झाली नाही यामागे सर्वच सवर्ण जबाबदार आहेत असा आक्रोश आहेच. मुस्लिम-ख्रिस्ती हेच हिंदुंचे शत्रु असुन त्यांच्यामुळे हिंदुंना सापत्नभाव मिळतो आणि पर्यायाने त्यांचे शोषण होते हाही आरोप आहेच. बहुसंख्य हिंदुंमुळे आम्ही असुरक्षित बनलो आहोत असाही उलटपक्षी आरोप आहेच. या आरोप-प्रत्यारोपात तथ्य नाही असे म्हणता येणे अवघड आहे कारण समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी, समस्येची मुलभुत कारणे शोधण्याऐवजी, वरकरणी सोपी वाटणारी उत्तरे शोधणे हेच कार्य या सर्वांनीच केले आहे असे स्पष्ट दिसते. आणि हेच कार्य स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात आजही सातत्याने होत असेल तर कोणीही कसलीही मानसिक/वैचारिक/बौद्धिक प्रगती केलेली नाही असे सिद्ध होते असे नाइलाजाने म्हणावे लागते.

आपण सारेच आरोप-प्रत्यारोपांच्या दलदलीत अपरिहार्यपणे अडकुन पडलो आहोत.

यात उद्याचा सुर्य कोठे आहे?

कि या घनतमात हिंस्त्र श्वापदांच्या गुरगुरी आणि कुरबुरी ऐकत असेच भयभीत-असुरक्षित जीवन जगायचे आहे? मानवी समुदायांना वास्तव वा काल्पनिक भयात ठेवले कि जसे धर्ममार्तंडांचे फावते तसेच राजकारण्यांचेही. एक भय पारलौकिक असते तर दुसरे ऐहिक. एक आर्थिक भय असते तर दुसरे सुरक्षिततेचे. भयाच्या सावटाखाली मानवी समुदायांना ठेवत आपापले स्वर्थ साधणे हे चतुर लोकांचे अव्याहत कार्य असते. राजसत्ता, धर्मसत्ता, जातीय सत्ता, प्रांतीय महत्ता, वांशिक सत्ता.......कोणत्याही प्रकारची असो सत्ता...ती शेवटी मानवी समाजाला एका आंतर-कलहात ढकलत वास्तव प्रश्नांपासुन दूर ढकलत असते. जीना हा कधीच कट्टर मुस्लिम नव्हता पण तो एक नव्हे तर दोन कट्टर मुस्लिम राष्ट्रे निर्माण होण्यास कारणीभुत झाला. येथील जातीय समुदायांचे महानायकही ज्यांचा द्वेष करायला अनुयायांना सांगतात त्यांच्या दावणीला आपापले घोडे बांधुन मस्तीत असतात. हे अनुयायी कधीच समजावुन घेत नाहीत...किंबहुना तेवढी वैचारिक योग्यताही नसते..वा एवढे त्यांचे brain washing झालेले असते कि ते आपली स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरपुन बसलेले असतात.

भारतीय समाजापुरते बोलत असतांना त्याचे एवढे मानसिक स्खलन झाल्याचे दिसते कि त्यांना आपला नेमका अभ्युदय कशात आहे हेच कळेनासे झाले आहे. विवेकी लोक एकाकी पडलेले असुन सांस्क्रुतीक/जातीय/आर्थिक माफिया त्यांचे सर्वस्व हरपुन घ्यायला नित्यशा: सज्ज झालेले दिसतात. विकावु/भाडोत्री तथाकथित साहित्य-विचारवाले मात्र सोयिचे असल्याने त्यांना हवे तेंव्हा प्रोजेच्ट केले जाते आणि हवे तेंव्हा घरी बसवले जाते. मुळात हा सारा व्यवहारच असल्याने कोणी कोणाविरुद्ध बोंब मारण्याची शक्यता नसते आणि मारली तर त्याला पुरेपुर बदनाम करण्याची सर्वच साधने या माफियांकडे असल्याने आणि समाज सर्वच पातळीवर भयभीत असल्याने तर त्यांना कोण पुसतो?

भारतीय मानसिकता एबढ्या रसातळाला जावुन पोहोचली आहे कि विवेक हा शब्द फक्त शब्दकोशातच उरलेला आहे. स्वर्थाच्या दलदलीत समाज एवढा अडकलेला आहे कि आपले बहुमोल मतही विकले जाते. आणि ते विकले याची लाज कोणालाही वाटत नाही. कोणी पैशांच्या मोबदल्यात मत विकतो तर कोणी आश्वासनांच्या. कोणी धर्माच्या नावावर विकतो तर कोणी जातीच्या. पण विकासासाठी कोणी सहसा मत देत नाही. ही मानसिकता राजकिय माफियांनी ओळक्खली आहे. मग मनातील सुप्त क्रांतीच्या वांझ अपेक्षांपोटी स्वत:ला एक्स्पोज होवु न देता अशांविरुद्ध आंदोलने होतात तेंव्हा त्यांचा आत्मा थोडाफार जागा होतो...पण ज्यासाठी आंदोलने होतात वा ज्यासाठी केली जातात त्याचे आकलन असते काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारुन पहावा. कोठेतरी guilt कोन्शंस असतो...कोठेतरी टोचतेय...पण व्यवस्था बदलत नाही...बदलणार नाही...एवढी बदलुही नये असा विचार सुप्तपणे जागा असतो आणि समाज-मानसशास्त्रीय प्रयोगांत एक्स्पर्ट जे आहेत त्यांना ते चांगलेच माहित असते.

येथे एक उदाहरण देणे गरजेचे आहे. ब्राह्मणांचे आहे ते सारे नाकारा असा कथित बहुजनीय संघटना सांगत असतात. कारण ब्राह्मण हे भारताबाहेरचे असुन युरेशियन आहेत असा त्यांचा, खुद्द ब्राहमणांनीच खतपानी घातलेला दावा असतो. तो मान्य केला तर ब्राह्मणांचे नाकारतांना तुम्ही पाशात्यांचे सर्वच काही का स्वीकारत आहात? पास्चात्य हे युरेशियन नाहीत का?

मग जर पाशात्य आजही युरेशियन आहेत तर त्यांची पेहराव पद्धती, वाढदिवस साजरे करण्याची पद्धती, त्यांचे तंत्रद्न्यान, त्यांचे विवाहोत्तर reception , हन्नीमुनादि असंख्य बाबी पाळता तर मग तुम्ही कोण? युरेशियनांचे मानसिक/सांस्क्रुती गुलाम असा शब्द येथे अयोग्य आहे का? पास्चात्य कंपन्यांचे नोकर होतांना लाज का वाटत नाही कि मग तुम्ही स्व-निर्मितीची योग्यताच हरपुन बसला आहात? त्यांची गुलामी हवी पण जे स्वता:च नेहमीच गुलाम राहिले त्या ब्राह्मणांची गुलामी तुम्हाला जास्त टोचते? जेवढे तुम्ही ब्राह्मणांचे गुलाम होतात ते ब्राह्मनही प्रत्य्येक सत्तेचे गुलाम होतेच कि! शक/हुण/पारद/मुस्लिम/ख्रिस्ती इइइइ सतांचे ते नोकरच होते. मग तुम्ही आजही नोकरांचे नोकर/गुलाम म्हणुन आक्रंदन करत असाल तर ती तुमची नालायकी आहे. एवढेच नव्हे तर तुमच्या वास्तुशांत्या/विवाह/सत्यनारायणादि विधी ब्राह्मण नसेल तर अपवाद वगळता तुम्हालाच चालत नाही. नव्य-शिव धर्म मानणारे गुपचुप अनेक विधी ब्राह्मणाहातीच करुन घेता ही तुमची गुलामांची गुलामी नाही काय? असंख्य नवबौद्ध सुद्धा काळुबाई ते रेणुकेपर्यंत जातात कि नाही? का बरे?

ब्राह्मण हा घटक नेहमीच सत्ताश्रयी राहिलेला आहे. ज्याची सत्ता त्याची मत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. पण मग तुम्हीही वेगळे काय केले आहे? एक शिवाजी महाराजांचे उदाहरण पुरेसे नाही. अपवादानेच नियम सिद्ध होतो. बसवेश्वर माहात्म्य गाणारेही जाती जपतात...शिख धर्मातही जाती आहेत...मराठा म्हनवणारेही (आणि आजकाल आम्ही कुणबी आहोत ते नागवंशीय असल्यामुळे महारच आहोत) प्रत्यक्षात जाती जपतात...( आणि हे खरे आहे अशी मराठा समाजाची खात्री आहे वा त्या संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांची खात्री आहे, तर किती कार्यकर्त्यांच्या घरात बुद्ध आणि आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत?...जावुद्या हा मोठा शोधाचा विषय आहे.)

प्रतिपाद्य विषय हा आहे कि भावनिक पायावर देशाचे भवितव्य उभे राहु शकत नाही. सर्वच सर्वांचे शत्रु अशी दांभिक भुमिका घेत एकही चळवळ चालु शकत नाही. ती तात्पुरती एखाद-दुस-या इश्युवर यशस्वी झाली आहे असा अभास निर्माण होईल पण ते काही चिरकाळ टिकणारे सत्य नव्हे वास्तवही नव्हे. यातुन चळवळींची वैचारिक दुर्दशाच स्पष्ट होते. द्रविड मुन्नेत्र कळघम ही संघ्हतना मुळात आर्य द्वेष करण्यासाठी उभी राहीली....पार स्वतंत्र द्राविडिस्तान मागण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हिंदी ही संस्क्रुओत्भव भाषा असल्याचे सांगत हिंदीविरोधी त्यांनी जी हिंसक आंदोलने केली त्याला तोड नाही. एका विचारवंताने (बहुदा डा. य.दि. फडके) महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र बनायला हवे असा लेख एका दिवाळी अंकात २५-३० वर्षांपुर्वी लिहिला होता. असे विघटनकारी घटक कालौघात जन्माला येतात. आताही खुप आहेत.

नवे काहीएक नाही. समाजाचे एकुणात भले व्हावे यासाठी मात्र प्रयत्न करणा-या संघटना सहजी दिसत नाहीत हेच काय ते सध्याचे वास्तव आहे.

Friday, April 22, 2011

आता तरी जागे होणार आहात काय?

धर्म-जात-प्रांत-वंश या आधारावर संघटना बांधणे सोपे जाते हे मी आधी म्हटलेच आहे. अन्य जातीय, धर्मीय, प्रांतीय वा वंशांचा द्वेष हा मुलभुत पाया असल्याखेरीज संघटन करणे सहसा सोपे जात नाही आणि ज्यांना दीर्घकालीक धोरणच नसते वा पुरेसा वैचारिक/सैद्धांतिक आधारच नसतो त्यांना द्वेषमुलक चळवळी उभ्या कराव्या लागतात. पण यातुन साध्य काय होते? नेमके काय घडते?
१. हिटलरी पद्धतीने एकचालुकानुवर्ती संघटन निर्माण होत चळवळीचा प्रवास बहुदिश न होता एक-दिश होवुन जातो.
२. स्वजातीय/धर्मीय/प्रांतीय/वंशीय पुरातन असलेले नसलेले महात्मे शोधुन काढले जातात, त्यांच्या दैवत्वीकरणाची प्रक्रिया सुरु होते आणि चिकित्सा नाकारली जाते. चिकित्सा करणारे या चळवळींचे शत्रु ठरवले जातात. प्रसंगी हिंसक होत वैचारिकतेला दडपले जाते.
३. इतिहासाला सोयिस्करपणे बदलले जाते. विरुद्ध पक्षीयांच्या दैवतांना हीनवत, चारित्र्याची मोडतोड करत स्व-जाती/धर्म/प्रंत/वंश अभिमान वाढवण्यासाठी अपार बौद्धिके घेतली जातात. "आपल्यावर अन्यांनी केवढा भीषण अत्त्याचार केला आहे" याचे कधी अतिरंजित तर कधी खोटे चित्रण केले जाते.
४. हे सारे करीत असतांना, चळवळीतील फौज वाढवली जाते परंतु या फौजेचा स्वता:चे डोके वापरण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. त्यांचे brain washing एवढे केले जाते कि ते सारासार विवेकी विचार करणेच विसरलेले असतात. थोडक्यात बौद्धिक क्लोन बनवले जातात.
५. शत्रु पक्षावर लिखित तर कधी हिंसक हल्ले करणे आणि दहशत माजवणे हेच एकमेव कार्य बनुन जाते. शत्रु पक्षीय संघटनाही प्रत्त्युत्तर म्हणुन हेच कार्य करत जातात आणि त्यातच अराजकाची बीजे पेरली गेलेली असतात हे कधीच या चळवळींच्या लक्षात येत नाही.
६. या चळवळी स्वर्थासाठी अन्य संघटनांशी प्रत्यक्ष वा वैचारिक युती करत असतात, जेथे समान स्वार्थाचे काही धागे गुंफले गेलेले असतात. उदा. बौद्ध धर्म हा हिंदु धर्माचाच भाग आहे असे आर.एस.एस. वाले सांगत एक नाळ बांधायचा प्रयत्न करतात...तर दलित आणि मराठे हे नागवंशीयच असल्याने एकच आहेत असा प्रचार करु लागतात. ऐतिहासिक वास्तव आणि वर्तमान यांचे धागे विक्रुत पद्धतीने उसवत तर्कविसंगत तत्वप्रणाल्या निर्माण केल्या जातात ज्या एकुणातीलच सर्व समाजाला घातक ठरत जातात. ऐक्य करणे हे स्वागतार्ह आहे...पण त्यासाठी चुकीचे तत्वद्न्यान वापरणे हे विसंगत आहे. समान शत्रु शोधा आणि एकत्र या, त्यासाठी इतिहासाचा बळी द्या असा हा धंदा सुरु होतो. हिटलरने आर्य सिद्धांत जमेस घेत ज्युंची सर्रास कत्तल केली. भारतात गुजरात मद्धे मुस्लिमांची कत्तल केली गेली. दलितांच्या असंख्यवेळा कत्तली होत आल्या आहेत. उद्या कधी भारतात ब्राह्मणांची कत्तल केली गेली तर आश्चर्य वाटणार नाही कारण अनेक संघटनांचा पवित्रा तोच आहे. द्वेषाचा विखार वीषवल्लीप्रमाणे वाढत जात असतो आणि त्याचे कधी विस्फोटात रुपांतर होईल हे कोणीही सांगु शकत नाही.

कोणत्याही समाजात जाग्रुत लोकांची, लेखक-पत्रकार-विचारवंतांची गरज असते. प्रसंगी अप्रिय होत सत्य सांगण्याचा प्रयत्न होण्याची गरज असते. पण असे लोक या सर्वच प्रकारच्या संघटनांना अडचणीचे ठरत असल्याने त्यांचे काटे काढले जातात हा इतिहास आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करतो म्हणुन सोक्क्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागतो. कम्युनिस्ट रशियाने किती जणांना ठार मारले, हद्दपार केले वा सैबेरियात शिक्षा ठोठावत पशुवत जीवन जगायला भाग पाडले हे सर्वांना माहितच आहे. किंबहुना जगाचा इतिहास हा अशा क्रुरातिक्रुर घटनांनी भरला आहे. आजही स्वत:ला आधुनिक समजणारा मानव त्यातुन बोध घेवु शकलेला नाही हे जगाचेच दुर्दैव आहे.

खरे तर संघटना द्वेषविरहित प्रागतिक कार्य करु शकतात-रचनात्मक होवू शकतात. हा असा मार्ग थोडा प्रदिर्घ असेलही पण त्यातुन मानवी समुदायाचे प्रदिर्घ हित होवु शकते. येथे मला महाभारत समाप्तिसमयी व्यासांनी केलेली आर्त विनंती आठवते ती: "उर्द्व बाहू विरोम्येश:: न:कशित श्रुणोति माम..." उर्ध्व बाहु उभारुन मी आक्रंदन करत आहे कि ज्यायोगे अर्थ, काम, मोक्ष साधला जाईल असा धर्म का आचरत नाही?" येथे धर्म हा शब्द
religion या अर्थाने वापरलेला नसुन मानवी स्वभावधर्म या अर्थाने वापरलेला आहे. (आता व्यासांचे नाव घेतले तर बहुजनवादी म्हनणा-यांना राग येईल. ते व्यासपीठ हा शब्द न वापरता विचारपीठ हा शब्द वापरतात. व्यास हे कधीच ब्राह्मण नव्हते हे त्यांच्या लक्षातही येत नाही. द्वेषाने आंधळे झालेले आपल्याच लोकांना कसे पायतळी तुदवतात त्याचे हे एक उदाहरण.)

संघटना आवश्यक असतात त्या त्या-त्या जाती-समुदायावरील होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. अन्याय न्यायात बदलवुन घेण्यासाठी. दुस-यावर अन्याय होणार नाही पण आम्हालाही न्याय मिळावा यासाठी. स्वातंत्र्यासाठी. समतेसाठी. आपल्यावर अन्याय झाला म्हणुन दुस-यावर अन्याय करावा हे काही महावीराने वा गौतम बुद्धाने वा शिवाजी महाराजांनी सांगितलेले नाही. संघटना आवश्यक असतात त्या आपापल्या समाजघट्कांना आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक द्रुष्ट्या उंचावत त्यांना प्रगल्भ करण्यासाठी. त्यांचे वैचारिक, सामाजिक, आर्थिक दारिद्र्य घालवण्यासाठी...ख-या अर्थाने आपापल्या संघटीत म्हनवणा-या समाजाचे नैतीक उत्थान व्हावे यासाठी. संघटनांचे हेच खरे नैतीक कर्तव्य असते. अशाच रितीने देशाचा आणि म्हणुनच जगाचाही खरा अभ्युदय होवू शकतो. नाहीतर २१व्या शतकातही आपण आदिमानवाचा हिंसक टोळीवाद जपणारे आहोत हे सिद्ध करत आम्ही कसलीही मानसिक प्रगती केलेली नाही हे वारंवार सिद्ध करत जातो...जात आहोत...आणि असेच सारेच रसातळाला जावून पोहोचणार आहोत...मग वाचवायला ना क्रुष्ण येणार ना बुद्ध...ना शिवाजी महाराज ना सावरकर...ना गांधी. मानवी जगताच्या पापाचे घडे या असल्या द्वेषमुलक संघटनांमुळे भरतच चालले आहेत.

आता तरी जागे होणार आहात काय? हा माझा कळवळुन केला गेलेला प्रश्न आहे.
पुन्हा उद्या लिहितो. धन्यवाद.

धर्म...जात...महापुरुष आणि आपण!

धर्माची निर्मितीच मुळात भयाच्या आधारावर झाली. भयाने मानवी जीवन अव्याहत व्यापलेले आहे. नैसर्गिक आपत्ति, निसर्गाची न उलगडणारी गुढे आणि म्रुत्यु...जो सारेच हरपुन नेतो...त्याच्या अनिवार भयाने मानवी मन आदिम काळापासुन ग्रसित आहे. या सर्व अद्न्यात शक्ती/संकटांपासुन मानवाने शोधलेली युक्ती म्हणजे धर्म. या अद्न्यात शक्तिंना प्रसन्न केले म्हणजे आपण या संकटांपासुन दुर राहु या भावनेतुन मानवाने ज्या दैवत शक्ती कल्पिल्या...जी कर्मकांडे निर्माण केली तो म्हणजे धर्म. तो बदलत राहिला आहे. तो त्या-त्या भौतिक परिस्थित्यांत वेगळा राहीला आहे. छोटे उदाहरण म्हणजे वाळवंटात हिरवळ नसल्याने अरबी लोकांनी जसा हिरव्या रंगाला पावित्र्य दिले तसेच चंद्र हाच रात्री दिशादर्शक असल्याने त्यालाही महत्ता दिली. जेही मानवी जीवनाला मदतकारक होते त्याला दैवत्व बहाल केले गेले तसेच जेही अहितकर होते...विनाशक होते त्याला जास्त महानत्व देत त्या नैसर्गिक शक्तिंचे दैवत्विकरन केले. मानवी मन हे नेहमीच असुरक्षित राहिले आहे याला वर्तमान परिस्तिती आणि आदिम सुप्त भावना जबाबदार आहेत.
म्हणुनच धर्म, जात, प्रांत, वंश, संस्क्रुती या आधारावर माणसांना एकत्र करता येणे सोपे जाते. एकत्र आलो तर आपण ऐहिक आणि पारलौकिक संकटांतुन मुक्त होवू अशी आशा त्याला असते. पण दुर्दैवाने या दैविकत्वाची चाहुल आजतागायत कोणत्याही महामानव ठरवलेल्या लोकांनाही झाली आहे याचे उदाहरण सहसा मिळत नाही. अपवाद असतात पण अपवादच नियम ठरवत असतात.
उलट या कथित महाभागांचे अनुयायी म्हणवून मिरवणारे महाभाग याच असुरक्षिततेचे मानदंड वापरत नवी भयभीत सत्त्ता निर्माण करण्याच्या प्रयत्नांत असतात.
भारतात धर्म, जाती, प्रांत या आधारावर त्या त्या समाज घटकांच्या भयभीत मानसिकतेचा वापर करत संघटना निर्माण झालेल्या आहेत. या संघटनांचे नेते नकळत एका कल्पित दैवत्व-व्युहात सापडलेले दिसतात. गांधी अहिंसक हुकुमशहा होते तर हिटलर हा हिंसक हुकुमशहा होता. फरक हिंसेचा आहे...एवढाच. पण ही चिकित्सा गांधीप्रेमियांना आवडत नाही. हिटलरची प्रेमबाळे या देशातही आहेतच. त्यांनाही हुकुमशाहीच हवी असते आणि ते म्हनतील तसेच शासन, समाज व्यवस्था आणि सरकार चालले पाहिजे असा अट्टाग्रह असतो. किमान आपापल्या जातीतिल लोकांनी, आपापल्या धर्मातील लोकांनी आम्ही सांगतो तशीच जात आहे, धर्म आहे असा अट्टाग्रह असतो. आणि कथित त्या-त्या जातीचे-धर्माचे-प्रांतांचे लोक या भावनिक भयातुन मुक्त होण्यासाठी या संघटनांचा भाग बनत असतात. संघटन केले तर प्रतिपक्षाला संखेच्या बळावर शह देता येईल, प्रसंगी रस्त्यांवर उतरावे लागले तरी आपण यशस्वी होवू असा वास्तववादी वा अवास्तववादी दावा करणे सोपे जाते. पटवणे सोपे जाते.
आणि यातुन भारत नामक देशात काही विखारी मतप्रवाह निर्माण झाले आहेत आणि त्यांचा समाचार घ्यायलाच हवा.

रा.स्व.संघ., बजरंग दल ते सनातन प्रभात वाल्यांची मानसिकता अशी बनवली गेली आहे कि जणु मुसलिम हाच काय तो देशाचा-राष्ट्राचा शत्रु आहे आणि त्याला संपवले कि देशाची प्रगती कोणीही रोखु शकणार नाही. मुस्लिम्द्वेष या आधारावर हिंदु नावाची जमात आजतागायत एकत्र आलेली नाही याचे कारण समजावून घेण्याची कुवत या नेत्यांत नाही. ८५% हिंदु असणा-या देशात आजतागायत हिंदुत्ववादी पक्ष सार्वभोम सत्त्ताधारी का झाला नाही हा प्रश्न या निमित्ताने उठतो. पण याचा दुसरा अर्थ असा आहे कि हे ८५% हिंदु मुळात स्वता:ला हिंदू समजतात कि नाही? असले तर या संघटनांना त्यांचे हिदुत्वीकरण करण्याचे अव्याहत प्रयत्न का करावे लागतात? आणि तरीही ते त्यात आजतागायत यशस्वी का होत नाहीत? याचे उत्तर एवढेच आहे कि मुळात हिंदु असल्याने वा नसल्याने या देशात कोणाला विशेष फरक पडत नाही. अगदी हिंदुंनाच...कारण येथे जात ही धर्मापेख्शा श्रेष्ठ आहे. धर्माच्या आधारावर कितीही विषमता असली तरी जातीय आधारावर प्रत्येक जात ही अन्य जातींपेक्षा महानच असते. खुद्द ब्राहम्णांत ५५० पेक्षा अधिक जाती आहेत आणि त्याही एकमेकांत श्रेष्ठत्वाचा संघर्षात असतात. इतरांचे वेगळे काही नाही. ब्राह्मणांनी हा देश बिघडवला/धर्म बिघडवला हा आरोप करतांना स्वजातीयांना एकत्र आणता येईलही. संघटना उभ्या राहतीलही. ब्राह्मणांचा विखारी द्वेष करता येईलही. पण ब्राह्मण हा स्वतंत्र्य पण जातीत वाटला गेलेला समुदाय आहे तसाच अन्य जातीयांचाही आहे...कुलदेवते ते श्रद्धा वेगळ्या आहेत...काही समानही आहेत...पण या देशात प्रत्येक जात हा एक स्वतंत्र्य धर्म आहे.

या असंख्य धर्मियांच्या जातसमुहांचा संघ म्हणजे "हिंदु" का? हा एक विचारणीय प्रश्न आहे. शिवपुजक आहे म्हणजे शैव असा सिद्धांत मलाच मोडकळीत काढावा लागत आहे. द्न्यानेश्वर हे नाथ पंथीय होते (ते कधीच वारकरी संप्रदायाचे नव्हते.) म्हणजे शैव होते तर ते वैष्णव कधी झाले? केवळ गीतेवर टीका लिहिल्याने? त्यांचे "अम्रुतानुभव" पुन्हा नीट वाचा. शिवपुजक असतांना शिवाबद्दलच्या विभिन्न विचारधारांचा संयुक्य समुह म्हनजे शैव असे म्हणता येणे सहज असले तरी वीर-शैव-लिंगायत-तांत्रिकदि संप्रदाय एकमेकांचा तिरस्कारच करतांना दिसतात. म्हणजे शैव म्हनने जसे एकार्थाने निरर्थक होवुन जाते तसेच वैष्णवांचे होते.
वैदिकांचा तर येथे प्रश्नच नाही.

या पार्श्वभुमीवर विभिन्नार्थाने का होयिना, विखंडित पण श्रद्धार्थाने का होईना, शिव वा विष्णु पुज्य असतो हे तर खरेच आहे. हरिहरेश्वर ऐक्य उद्घोषित आहेच. या दोन्ही विचारधारांतील साम्य म्हणजे जाती प्रथेला येथे तत्वार्थाने अर्थ नाही. पण या देशातील लोक वैचारीक हराम्खोर एवढे कि जाती सोडुच शकले नाहीत.

मग त्याला कथित महापुरुष कसे अपवाद राहणार? शिवाजी महाराजांच्या नावातच शिव असुनही त्यांना वैष्णव ठरवण्याचे प्रयत्न त्याच काळापासुन केले गेले. महाराजांना क्षत्रियत्वाची गरज नसतांनाही त्यांना ख्षत्रियत्वाचे सेर्टिफ़िकेट दलालांहातुन मिळवुन घ्यावे लागले. गागाभट्ट तेनदा फिरलेला अमनुश्यत्वाचा पुरावा देणारा तीनदा फिरला. चन्द्रशेखर शिखरेंनी त्यांच्या "प्रतिइतिहास" या पुस्तकातही या ब्राह्मणी दलालीचे विस्त्रुत साधार वर्णन केलेले आहे. प्रचंड दक्षिणा घेवुनच या गागाभट्टने महाराजांचे क्षत्रियत्व मान्य करत राज्याभिषेक केला...पण दुर्दैव हे कि मुळात गागाभट्टाने जो शिवराज्याभिषेक केला तो वैदिक नव्हे तर पौराणिक पद्धतीने. म्हणजेच गागाभट्टाने महाराजांना क्षत्रिय मानलेच नव्हते.

वेदोक्त क्षत्रियांसाठी असते तर पुराणोक्त शुद्रांसाठी.

शिवाजी महाराज ब्राह्मणांसाठी जर शुद्रच होते आणि त्यांचे कार्य लोकोत्तरच होते तर त्यांनी क्षत्रियत्व मागितले (जे कधी मिळालेच नाही) तर ते नकळतपणे मनुस्म्रुतीलाच बळकटी देत होते हे माझे विधान या वरील परिप्रेक्षात पहा. ते महापुरुष होते म्हणुन त्यांचा गौरव गाण्याचा ठेका स्वता:ला मराठा समजणा-यांनी घेण्याची काहीएक गरज नाही. कारण तत्कालीन सर्वच मराठे (?) अगदि महाराजांचे सरदार आणि शत्रु-पक्षीय असंख्य मराठे महाराजांना शुद्रच मानत होते. महाराजांना कथित रुपाने क्षत्रीय ठरवले म्हणुन अन्य मराठे क्षत्रिय ठरले नाहीत हे शल्य अगदी नागपुरकर भोसलेंना शेवटपर्यंत छळत होते. त्यामुळेच कि काय...महाराजांनी ज्यासाठी अट्टाहास केला होता तो प्रयत्न फक ब्राह्मणांमुळेच नव्हे तर तत्कालीन स्वता:ला मराठा समजणा-यांमुळेही सपशेल अयशस्वी ठरला.

त्यांचा अवेळी म्रुत्यु झाला.

का?

हे फक्त ब्राह्मणांवर ढकलण्याऐवजी पुन्हा एकदा इतिहासाची चिकित्सा करा.
आपलेही लोक तेवढेच नालायक होते यावर विचार करा!
हे सारे लक्षात न घेता...किंवा समजुनही अडाण्याचे सोंग घेणारे स्वता:ची वंचना करत, आपापले असामान्य अल्प्द्न्यान दाखवत शिव्या ( मला माफ करा...हा शब्द कोणी वापरु नका कारण तो शिवाचा अनमान करतो...) न देता पुराव्यांसहीत टीका करा. मी तुमचे स्वागतच करतो.

पण अनेक मुद्दे राहिले आहेत.

उद्या भेटुयात.....

Wednesday, April 20, 2011

ही व्यवस्था बदललीच पाहिजे.

तारतम्याचा अभाव हे भारतीय संस्क्रुतीचे एक लक्षण आहे. भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात. संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे. भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे...उलट पक्षी पहाता अगणित महनीय व्यक्तित्वे आणि त्यांची कर्तुत्वे आजही आदर्ष्वत वाटतील अशीच आहेत. पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने हाच समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.

पुरातन संस्क्रुतीबाबत संघ परिवार जेवढ्या थापा मारतो...विशिष्ट जातीसमुहातीलच लोकांना महत्ता प्रदान करत जात इतिहासाची अक्षरशा: मोडतोड करतो त्याला तोड नाही आणि त्याच संस्क्रुतीचे पाईक असलेलेही उलटार्थी इतिहासाची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न करत तोच एड्चापपणा करतो तेंव्हा हे दुषित-तत्व सर्वत्र पसरलेले आहे हे लक्षात येते. याचा अर्थ असा काढता येतो कि भारतीय इतिहास अपवाद वगळता जातीय द्रुष्टीकोनातुनच लिहिला जात असल्याने त्याची विश्वासार्हता केवढी मानायची हा प्रश्न निर्माण होतो. जदुनाथ सरकार असोत कि राजवाडे, रोमिला थापर (त्या मार्क्स्वादी.) असोत कि शरद पाटील...या सर्वांचीच समस्या ही आहे कि ते इतिहासाचे अन्वेषण करत असतांना जातीय/वर्गीय भावनेतुन बाहेर पडतांना सहसा दिसत नाही.

थोडक्यात निरपेक्ष भावनेने इतिहासाचा पहाड उचलण्याची हिम्मत कोणी करत नाही.

दुसरा भाग असा कि इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैद्न्यानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे. काबाचा पत्थर म्हनजे शिवलिन्ग (म्हणजे मुस्लिमही हिंदु), येशु काश्मीरमद्धे आला आणि तेथेच त्याला खरे द्न्यान मिळाले...मग ख्रिस्तीही हिंदुच...कोलबिया-मेक्सिको मधील संस्क्रुती संस्थापक मुळ हिंदुच होते......यादी खुप मोठी आहे. या बाबत ब्राह्मणांना किंवा नवब्राह्मणाना खुप अभिमान वाटतो. हिरिरीने ते यावर चर्चा करत असतात. पण इतिहासाचा कालप्रवाह माहित नसणा-या या अद्न्य लेखक-संशोधकानी जी इतिहासघातकी धादसी मांडणी करण्याचा प्रयत्न करत एक विक्रुतमानसिकतेला जन्म देण्याचे कार्य केले आहे म्हणुन ते नक्किच निषेधाला पात्र आहेत.

माया संस्क्रुतीचा काळ हा कसल्याही स्थितीत इ.स. पुर्व जात नाही. ग्रीक संस्क्रुतीचा काळ हाही इ.स. पुर्व १००० ही जात नाही. तरी या वैदिकांनी तेथे आपले तळ बनवले आणि त्या वेद-विसंगत संस्क्रुत्या स्थापन केल्या हा दावा म्हणजे इतिहास-अहंकाराचे एक अत्यंत दुर्दैवी विधान आहे. इतिहासाची मांडणी करतांना समांतर काळप्रवासाचेही भान ठेवावे लागते कारण ऋग्वेद निर्मितीचा काळ जर किमान इ.स.प. २५०० वर्ष असेल आणि ती रचना सरस्वती नदीच्या परिघात झाली असेल तर हे वैदिक इ.स.पु. १००० मद्धे कसे निर्गमित झाले याचा एकही उल्लेख खुद्द वैदिक वाद्मयात का नाही या प्रश्नांना यांच्याकडे उत्तरच नसते. साधे दाशराद्न्य युद्ध नोंदवणारे ऋग्वेदकर्ते ही घटना का नोंदवत नाहीत हा प्रश्नही त्यांना पडलेला दिसत नाही. आणि हे इतिहास कशाशी खातात हे न समजल्याचे लक्षण आहे. या अहंकारातुन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वा भांडारकरही सुटलेले नाहीत.

आता हीच आणि अशीच भारतीय इतिहास लेखन परंपरा असल्याने सवरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहास तद्न्य नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?

खोट्यावर विश्वास ठेवतो तो भारतीय अशी दुर्दैवी व्याख्या येथे करावी लागत आहे.

पण याची प्रतिक्रिया म्हणुन जो नवा इतिहास लिहिला जात आहे त्याचे काय करायचे हाही प्रश्न आहे.

प्रतिक्रिया म्हणुन येणारा इतिहास हा अधिक काटेकोर, अजातीय, अहंकारविरहित आणि नावडला तरी मान्य करावा लागेल असा असायला हवा ही अपेक्षा अयोग्य ठरु शकत नाही. पण एक वेळ ब्राह्मणी अहंकाराने सांगोपांग भरलेला इतिहास परवदला पण या नवजातीयवाद्यांचा इतिहास नको अशी म्हणायची वेळ आली आहे.

शिवाजी महाराज नागवंशीय होते हा शोध...पुरावे काय तर ते दसरा सण साजरा करत...
(यात कोनते पुराव्याचे तारतम्य आहे?)
गुढीपाडवा साजरा करु नका कारण त्या दिवशी संभाजी महाराजांचे मुंडके काठीला टांगले त्याचा हा उत्सव...
(गुढीपाडवा हा सण सिंधु काळापासुन साजरा होत आहे...तो क्रुषिवल संस्क्रुतीचा उत्सव आहे.संभाजी महाराजांच्या दुर्दैवी म्रुत्युशी त्याचा काहीएक संबंध नाही. पुरावाच हवा तर ढोलवीरा येथील पत्थराची आजही उंचावलेली काठी पहा..)
आर्य बाहेरुन आले...ते युरेशियन ब्राह्मण आहेत. त्यांना देशाबाहेर हाकलायला हवे.
(आर्य या शब्दाचा एकही वेद न वाचता काढलेला हा अर्थ. टीळक ते तर्कतीर्थ येथे तर्कहीण होत जातीयवादी/वंशवादी बनलेच...पण ब्राह्मणांना अजून एक अहंकार प्रदान करण्याचे महापाप त्यांनी केले... याबाबत त्यांचा निषेध आवश्यक आहेच पण हा सिद्धांत सोईस्करपणे उचलत जातीय/वांशिक द्वेष वाढवण्याचे पाप करणे याला इतिहास संशोधन म्हणतात का?)

असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यातुन एकच बाब स्पष्ट होते ती ही कि ब्राह्मणांनी सांगितलेला इतिहास जर चुक आहे तर आता मराठ्यांनी सांगितलेला अतार्किक इतिहास स्वीकारा. ही अट दोन्ही पक्षी मुर्खपणाची आहे. कारण तेथे इतिहासच नाही. द्न्यात इतिहासाची चिकित्साही नाही. या उभयपक्षात एक विलक्षन साधर्म्य आहे...मग तो ब्राह्मणी असो कि मराठे प्रणित...

चिकित्सा करायची नाही....

मग यांच्यात आणि ब्राह्मणी संस्क्रुतीत नेमका काय फरक आहे?

काहीही नाही.

स्व-श्रेष्ठत्व मिरवण्याच्या नादातुन इतिहास-इतिहास असे बोंबलत हे लोक इतिहासाचे मुडदे पाडतात आणि वर इतिहासाची मोडतोड होते यावरही बोंब मारतात.

हीच जर भारतीय समाजाची मनोवस्था असेल तर एक लक्षात घ्या कथित बहुजनीय विरुद्ध ब्राह्मणी विचारधारा यात मुळात काही एक फरक नाही. फरक दैवतांबाबतचा आहे...कोणाला सावरकर हवा तर कोणाला शिवाजी...कोणाला राम हवा तर कोणाला बळी, कोणाला क्रुष्ण हवा तर कोणाला गांधी. कोणाला बुद्ध हवा तर कोणाला पुष्यमित्र श्रुंग. हे सारेच अव्यवस्थेत अधिक अव्यवस्था माजविण्यासाठी सज्ज आहेत आणि सामान्य मात्र वैचारिक बलात्कारित होत जाताहेत.

ही व्यवस्था बदललीच पाहिजे.
तटस्थ व्हा...जातींपार जा...
धर्मालाही दूर ठेवा...
एवढेच काय ते मागणे.

Tuesday, April 19, 2011

या सर्वच संघटनांना नेमके काय साध्य करायचे आहे?

मी काही संघटनांना पराकोटीचा विरोध करत आहे हे खरेच आहे पण तो विरोध या संघटना नष्ट व्हाव्यात या दुष्ट हेतुने नक्किच करत नाहीहे. मी आजन्म आर.एस.एस. चा विरोधक राहिलो आहे आणि त्या मतात बदल व्हावा असे काही आर.एस.एस. चे वर्तन आजही नाही आणि होईल याची शक्यता दिसतही नाही. उलट ही संघटना कधी नव्हे एवढी भरकटलेली आहे आणि त्यातच कदाचीत तिचा अंत आहे.

बहुजनीय संघटना आर.एस.एस. च्या विचारांचा विरोध करतात कि त्याला केवळ प्रत्युत्तर म्हणुन ब्राह्मण द्वेषाचा अजेंडा राबवतात हा प्रश्न आहेच. आर.एस.एस. ही ब्राह्मण्यवादी, वैदिक संघटना आहे याबद्दल ब्राह्मनांचेही दुमत असु शकत नाही. केवळ अब्राह्मण काही अध्यक्ष बनवले हे सांगणे म्हणजे निव्वळ थोतांड आहे. पण याच धरतीवर बहुजनीय संघटना जेंव्हा उभारल्या जातात तेंव्हा ही एकच एक विचारधारा आहे हे लक्षात येते. द्वेषाचे लक्ष्य बदलले आहे एवढेच...पण द्वेष हाच मुलाधार आहे हे तर उघडच आहे. तरुण पीढ्यांना द्वेषाधारीत राजकारण आवडते. त्यासाठी तरुणांना दोष देता येत नाही. कारण त्यांची मनोभुमिका तयार करण्याचे कार्य करायला वेळ नसतो या नेत्यांना...तर अद्न्य को-या पाटीच्या मुलांना भडकावणे सोपे जाते. सनातन प्रभात अशाच कोवळ्या पोरांचा उपयोग करुन घेते हे आता सिद्ध झाले आहे.

माझा प्रश्न असा आहे कि या सर्वच संघटनांना नेमके काय साध्य करायचे आहे?

हिंदुत्ववादी संघटना आधी विचारात घेवुयात. त्यांना प्रश्न असे कि:

अ. तुम्हाला हिंदु राष्ट्र म्हणुन मिरवायचे आहे तर प्रथम हिन्दु शब्दाचीच व्याख्या करा.
ब. मुसलमानांना कापायच्या नुसत्या वार्ता नव्हे तर संधी मिळेल तेंव्हा क्रुती करता...तुम्ही दहशतवादी नाहीत का?
क. सांस्क्रुतीक दहशतवाद हा तुमचा खरा चेहरा आहे. तुम्हाला तरुण-तेरुणींचे प्रेमे-बिमे मान्य नाहीत...त्यासाठीचे उत्सव मान्य नाहीत...भारतीय संस्क्रुती म्हणजे कधीच खड्ड्यात गेलेल्या वैदिक संस्क्रुतीचे पुनर्निर्माण तुम्हाला अभिप्रेत आहे...पण ती संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे माहित तरी आहे काय?
ड. वैदिक गणीत, वैदिक विद्न्यानादि गोष्टी मुळात आस्तित्वातच नसतांनाही त्याचा टेम्भा का? उदा. वैदिक गणित नावाचे प्रकरण २०व्या शतकात जन्माला आले आणि त्याचा एकाही वेदाशी सम्बंध नाही. मुळात या देशातील वैदिक परंपरा संपुन २००० वर्ष झालीत...तरी हे वैदिक प्रकरण काय आहे बरे?
इ. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम सावरकरांनी मांडला...त्याच्याच शिष्याने गांधीची हत्या केली. तीही गांधी फाळणीला जबाबदार म्हणुन...त्याबद्दलचा खेद का नाही?
फ. आसिंधुहिमाचल राष्ट्र असावे हे भाबडे स्वप्न ठेवणा-यांना मुळात या देशाला कधीच भुगोल नव्हता हे का सांगत नाहीत?

असो. प्रश्न अनंत आहेत. किमान वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

आता काही प्रश्न आहेत ते या आताच्या कथित बहुजनीय संघटनांना:

१. ब्राह्मण द्वेष/वैदिकांचा द्वेष हे सगळे चळवळीचा आरंभ म्हणुन ठीक आहे. पण द्वेष म्हणजेच चलवळ असा अर्थ तुम्हाला कोणत्या मुर्खाने सांगीतला?
२. शिवाजी महाराज महान लोकोत्तर होते हे खरेच आहे...पण केवळ ते मराठा जातीचे होते म्हणुन ते तुमचेच असला ठेका तुम्ही कोणत्या तत्वावर घेतला?
३. मराठी समाजाची नाळ नुसते सातवाहन नव्हेत तर त्याही पुर्व असलेल्या पुंड्र-नागादि मानवी समुहाशी सरळ न भीडता केवळ शिवोत्तर काळ म्हनजेच मराठी समाजाचा इतिहास (आणि तोही फक्त मराठ्यांचा...) असे कोनत्या कलमबहाद्दरीने सिद्ध करु पहाता?
४. महार हे फक्त नागवंशी? शिवाजीमहाराजही नागवंशी म्हणुन महार? हे असले फालतु संशोधने तुम्ही कोणत्या बळावर करुन दलितांना फसवत आहात? शिवाजी महाराज लोकोत्तर असले तरी ते स्वत:ला क्षत्रीयच समजत होते, वर्णाश्रम व्यवस्था मानत होते, म्हणजेच मनुस्म्रुती मानत होते, हे कबुल करायला लाज का वाटते?
५. मराठा ही मुळात जात नसुन एक पद होते आणि कालौघात ती जात बनली कारण आपापसातले सामंती विवाह. ही नेहमीच एक राजकीय जात होती. तिचे कोठेही धार्मिक पोथ्यांतही जात म्हणुन निर्देश सापडत नाहित. त्यामुळे या मंडळीची खरी जात कोनती?
६. दलितांना न्याय देण्यासाठी म्हणुन असंख्य संघटनांचे वादळ सध्या आहे. असंख्य संघटनांमुळे खरे दलित विखुरले आहेत. मराठे आणि दलित एकवंशीय आहेत असा सिद्धांत मांडुन मराठा सेवा संघ वा भारत मुक्ती मोर्चा एक आघाडी उघडत असेल तर "सारे मानव एक" असे उदात्त तत्वद्न्यान या आघाडीला लागु होत नाही कारण मराठे जर नागवंशीय आहेत आणि महारही नागवंशीय आहेत आणि म्हणुन दोन्ही एकच आहेत असा भाबडा अर्थ काढणारे चुक आहेत...कारण हे फसवे राजकीय समिकरणाचे वास्तव आहे. पण हे का लपवले जाते?
७. मराठे आणि दलित एकवंशीय आहेत असा सिद्द्धांत मांडतांना अन्य जातीय नेमक्या कोणत्या वंशाचे आहेत हे पण सांगायला हवे कि नको? ब्राह्मण युरेशियन आहेत-परके आहेत...ठीक आहे...पण बाकिच्यांनी काय फक्त तुमच्या आरत्या ओवाळाव्यात कि काय? आम्ही उरलेले कोण?
८. जातीभेद-जातीद्वेष सोडुन तुमच्या संघटनांकडे समाजाच्या उन्नतीसाठी नेमका काय कार्यक्रम आहे? जाळुन टाका...कापुन काढा...हे आर.एस.एस. सनातन प्रभात सुद्धा सांगते आणि तुम्हीपण....या दोन्ही पक्षीय पण सम-विचारसरणीच्या संघटना किमान मारायची वा जाळायची साधने निर्माण करणा-या कारखान्यांत काम तरी द्याल ना? जे मारले जातील...त्यांना जाळायचे कि गाडायचे? हाही प्रश्न आहेच...कि तसेच सडु द्यायचे? मारणे हाच कार्यक्रम असेल तर तोही सुनियोजित नको का? काय योजना आहे बरे?
९. बहुजन म्हणजे नेमके कोण? कोणी सांगतो ब्राह्मण आणि मराठे सोडुन जे आहेत तेच बहुजन. कोणी सांगतो दलित-आदिवासी-भटके-विमुक्त हेच बहुजन ...बाकी सारे अत्याचारी उच्चवर्णीय...हेही खरे कि खोटे?
१०. सर्वांची पोटे कशी भरतील याची पर्वा नसणा-या या सर्वच चळवळ्यांचे सर्वच समाजाने काय करायचे?

मला वाटते यावर चिंतन व्हायला हवे. मला कल्पना आहे कि अगदि जे वीर सामाजिक द्वेषाच्या पायावर सामाजिक चळवळ उभ्या करतात त्यांच्या व्यक्तिगत भावना प्रामाणिकही असतील पण त्या अंतता: विनाशाकडे नेणा-या ठरतात म्हणुन हे प्रश्न आहेत...हे आक्रंदन आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रबुद्धीसाठी चळवळी आवश्यकच अहेत...भारतात...विशेशता: हिंदु सम्जणा-या समाजात तर आवश्यकच आहेत. पण त्यांचा नेमका उद्देश काय आहे? नेमके काय साध्य करायचे आहे? ते कसे साध्य करायचे? साध्य मिळाल्यानंतर नेमके काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर या चळवळींनी आताच त्या बंद केलेल्या ब-या कारण भविष्यातील पीढ्या नासवल्याचे पाप त्यांच्या शिरावर पडेल.

Monday, April 18, 2011

निर्जलीकरन: यंत्रसामग्री आणि बाजारपेठ


निर्जलीकरण प्रक्रिया मी आधीच्या लेखात थोडक्यात विषद केलेली आहेच. थोड्याशा चाचण्या घेवून प्रत्येक भाजीसाठी ती निर्धारीत करता येते. येथे मी यंत्रसामग्रीबद्दल माहिती देत आहे. हे लघुत्तम प्रकल्पासाठी आहे जे शेतक-यांना सहज वापरता येणे शक्य आहे. यात थोडेफार बदल प्रत्यक्ष स्थितीप्रमाणे व गरजांप्रमाणे करता येतील.
१. कटर्स/स्लायसर्स: हे काम मानवी श्रमाने करणे छोट्या क्षमतेच्या प्लांटसाठी सोयीस्कर आहे. कटर्स/स्लायसर्स हे प्रत्येक भाजीचा वकूब बघुन किती जाडी-लांबी ठेवायची याचा पुर्वनिर्नय घेवून ते करता येते. यासाठी अल्युमिनियमचे आछादन असलेले टेबल्स असावेत. भाजी स्वछ्छ धुतल्यानंतर प्रथम मुळे, अवांछित गवतादी भाग बाजुला करावेत. नंतर त्यांचे सुयोग्य, एकच परिमाण राहील या पद्धतीने कटिंग करावे. बटाटे, टोम्यटोदि फळ भाज्यांचे स्लायसिंग करावे. समजा १ टन प्रतिदिन क्षमतेचा प्लांट असेल तर ताशी १०० किलो माल प्रक्रियेसाठी तयार ठेवावा लागतो.
२. ब्लांचींग साठी batchनुसार सरासरी १५ ते २५ किलो माल २-५ मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात ठेवावा लागतो म्हणजे उत्पादित मालाचा दर्जा उंचावतो. त्यासाठी कोणत्याही धातुची, एवढा माल सामावु शकेल भांडी लागतील...लग्नात भोजन बनवायला लागतात तशी.
३. जाळीदार गाळण्या: माल थोडा वेळ उकडला कि तो स्टीलच्या चाळण्यात घ्यावा आणि पुर्ण पाणी निथळु द्यावे. या पाण्याचा पुनर्वापर करता येतो. करावा. काही वेळ त्याला नैसर्गिक तापमानातच सुकु द्यावे. जर हवेत पावसाळी आद्रता असेल वा उन्हाचा अभाव असेल तर मात्र सुकवण्यात अर्थ राहणार नाही...मालाला सरळ सुकवण्याच्या प्रक्रियेत न्यावे.
४. ड्रायर: दोन प्रकारचे ड्रायर मी सुचवतो. दोन्ही टनेल ड्रायरच आहेत पण रचना वेगळी आहे.
अ. कन्वेयर बेल्ट ड्रायर: यात ड्रायरमद्धे एक फिरता बेल्ट असतो जो जाळीदार स्टेनलेस स्टीलचा असतो. हा बेल्ट ड्रायरच्या बोडीच्या मधोमध रोलर्सवरुन फिरवला जातो. हा वेग अत्यंत कमी असल्याने हे काम मानवी श्रमानेही करता येते वा टायमिंग स्पीड कंट्रोलर मार्फत नियंत्रीत ठेवता येतो. मालात पाण्याचे प्रमाण जेवढे अधिक तेवढाच याचा वेगही कमी असतो. या बेल्टवर सरासरी २ ते २.५ इंच उंच एवढाच थर समप्रमाणात विखरावा लागतो. बेल्ट जसजसा पुढे सरकेल त्या प्रमानात माल सतत विखरवत रहावा. ५ ते १० तासांत सायकल पुर्ण होते...म्हणजे सुकलेला माल दुस-या बाजुने बाहेर येवु लागतो. त्याची टेस्ट (म्हणजे त्यातील उर्वरीत जलांश, रंग आणि राखेचे प्रमाण) घेवून जर जलांश अधिक झाला असेल तर नंतर असा माल ड्रायरमधुन जास्त वेगाने पास करावा म्हनजे अधिकचा जलांश निघुन जाईल.
ब. ट्रे टनेल ड्रायर: यात ड्रायर तसाच असतो पण त्याची उंची अधिक असते. यात ट्रे वर ट्रे ठेवता येतील अशा ट्रोली लागतात. माल वर सांगीतल्याप्रमाणेच सम प्रमानात पसरवायचा असतो. वेगातही बदल नसतो पण हे काम मानवी श्रमानेच पण अत्यंत दक्षतेने करावे लागते.
हे दोन्ही पद्धतीचे टनेल ड्रायर बनवणे सोपे आहे. त्यासाठी फार उच्च दर्जाची तांत्रीक क्षमता लागत नाही. महत्वाचे म्हणजे जी उष्ण हवा आत सोडली जाते तीचे आवर्तन आणि वितरण समप्रमानात झाले पाहिजे. अन्यथा त्याचा अंतिम उत्पादनावर विपरीत परिणाम होवु शकतो. या ड्रायर्स मद्धे २-४ इन्स्पेक्शन विंडो (काचेच्या) ठेवलेल्या असतात. रंगावरुन मालाची प्रत तपासता येते. तसेच कोन्वेयर बेल्ट ड्रायरमद्धे ठरावीक अंतरावर माल उलत-सुलट करता येईल या पद्धतीने प्रयुक्ती योजलेली असते म्हनजे सर्व माल उचीत उष्णता मिळवुन समप्रमानात निर्जलीक्रुत होवु शकेल.
५. होट एयर ब्लोवर: प्रत्येक पदार्थासाठी आवश्यक उष्णता वेगळी असते. हा ब्लोअर शक्यतो एलेक्ट्रिकल असावा म्हनजे वांछीत तापमान कंट्रोलर्स मार्फत साधता येते. यासाठी फारशी वीज लागत नाही कारण आवश्यक तापमान हे अधिकाधिक १५० डिग्री लागते. पण ब्लोअरची क्षमता ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने फ़ोर्सड ड्राफ़्ट निर्मान करत एकंदरीत वोल्युम हा टनेलच्या आकारानुसार ठरवावा लागतो. या ब्लोअर मधुन बाहेर येणारी उष्ण हवा चार वेगवेगळ्या पाईप्स मधुन टनेलची सुरुवात (वरुन एक व खालुन एक आणि ३५% अंतर ओलांडले जाते तेथेही खालुन आणि वरुन अशा पद्धतील नि:श्वास द्यावे लागतात. ही रचना प्रत्यक्ष लोकेशन आणि ड्रायरचे आकारमान यावरुन ठरवावे लागते.
बाहेर येणारी गरम हवा ही पुर्ण स्यचुरेट होते कारण भाज्यांतील जलांश काढुन घेतल्याने ती हवा वाफेने परिपृक्त झालेली असते. तिचा पुनर्वापर करु नये. या हवेस बाहेर पडण्यासाठी दोन निश्वास देता येतात.
६. बाहेर येणारा माल दोन पद्धतीने तपासावा:
अ. रंग समान आहे हे पहावे, अत्यंत वाळलेला वा ओला राहीलेला निरुपयोगी असा माल हाताने बाजुला काढावा.
ब. इलेक्ट्रोनिक उपकरणाने सरासरी जलांश पहावा.
उपयुक्त मालात आद्रतेचे/जलांशाचे प्रमाण कोणत्याही स्थितीत जर ९५% पेक्षा कमी असेल तर प्रक्रिया वेगात/तापमानात आवश्यक बदल करावा.
७. प्याकिंग: येथे माल कोणत्या ग्राहकासाठी बनवत आहोत याचा विचार करुनच प्याकिंग करायला हवे.
अ. जर होटेल्स, मसाला उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग हे ग्राहक असतील तर २ ते ५ किलो क्षमतेच्या प्लास्टिक पिशव्यांत प्याकिंग करुन ते सील करावे.
ब. जर हा माल सरळ ग्राहकांसाठी असेल (अंतिम उपभोक्ता) मॉल्स मधुन विकायचा असेल तर अत्यंत आकर्षक अशा पोचेस मधुन ते प्याक करावे. अर्थात त्यासाठी प्याकिंगची अत्यंत काळजी घ्यावी लागेल.
माल जोवर नैसर्गिक तापमानाला आलेला नाही तोवर कधीही प्याकिंग करु नये. तोवर अर्थात माल पुन्हा हवेतील आद्रताही शोषणार नाही यासाठी तो कार्टन्स मद्धे साठवावा....आणि बाष्प-शोषक द्रव्यांचे प्यकेट्स पसरवुन ठेवा.
बाजारपेठ:
निर्जलीक्रुत मालाची बाजारपेठ अवाढव्य आहे. ती जागतीक आहे. घरोघर आहे. सैन्यदलांसाठी आहे तशीच पार ट्रेकिनंगला जाणा-यांसाठी आहे. पण या दिशेने विशेष प्रयत्न झालेलेच नसल्याने आपल्याला कळत नाही एवढेच.
पण त्याआधी आपण निर्जलीक्रुत मालाची वैशिष्ट्ये समजावुन घ्या.
१. निर्जलीक्रुत माल हा साध्या पाण्यात ५-१० मिनिटे ठेवताच ते पाणी शोषुन पुन्हा ताज्या मालासारखे बनतो.
२, मुळ चवीत किंचीत फरक असला तरी भाज्या बनवल्या तर त्या जास्त चविष्ट होतात.
३. ड्राय टोम्यटो, बटाटे, फुलकोबी इ. पदार्थ स्न्याक्स्प्रमाणे सरळ वापरता येतात.
४. कोथींबीर तर सरळ जशी एरवी ताजी कोथींबीर वापरतो त्याप्रमाणे वापरता येते...वाया जाण्याचे प्रमाण शुन्य. एरवी आपण ताजी आनली तरी ३० ते ५०% (अगदी फ़्रीझ मद्धे ठेवुनही) वाया जातेच.
५. सुप्स ते बिर्याण्या-पुलावात सरळ वापरता येतात.
६. सकसता वाढली असल्याने प्रोटीन्सचा लाभ मिळतो...फ्याट्स मात्र निघुन गेलेले असतात...
७. अनेक पदार्थ जे १२ महिने उपलब्ध नसतात ते उपलब्ध होतात. उदा. कै-या...फळे... इ.इ.इ. अनेक प्रकारच्या पालेभाज्या वा फळभाज्या ज्या फक्त सीझनल असतात.
८. हे पदार्थ किमान २ वर्ष टिकत असल्याने बाजारपेठेतील बदलत्या भावांचा फरक पडत नाही.
९. ताज्या भाज्यांपेक्षा वजनाने कमी...निवडणे...कापत बसणे ही कटकट नाही त्यामुळे आजच्या गतीमान युगात झटपट स्वयंपाकासाठी अत्यंत उपयुक्त.
१०. हवे तेंव्हा हवा तो पदार्थ उपलब्ध...सीझनची वाट पाहण्याची गरजच नाही.
अर्थव्यवस्थेचा-नागरिकांचा आणि उत्पादकांचा फायदा:
१. कोन्ताही शेतमाल वाया जाणार नसल्याने जवळपास प्रतिवर्षी ७० ते ८० हजार कोटींची राष्ट्रीय बचत.
२. शेतक-यांना बाजारभाव नाही म्हणुन काहीही फेकायची नसलेली गरज. यातुन शेतक-यांची होणारी आर्थिक भरभराट.
३. गावोगाव वा पंचक्रोशीत किमान एकेक उद्योग निघाल्यास किमान १० ते १०० जणांना मिळणारा रोजगार. शहराकडे पळण्याची गरज नाही. शहरांवरचा बोजा कमी.
४. एकुणातील शेती अर्थव्यवस्था ख-या मालकांच्या हातात जाईल कारण दल्ल्यांचा सहभाग अत्यल्प.
५. उपभोक्त्यांना समाधान कारण कमी श्रमात अन्न बनवणे सोपे आणि सुघड.
६. होटेल्स फार मोठे ग्राहक कारण त्यांचा कामगारांवरचा खर्च वाचतो आणि व्यक्तिगत ग्राहकाचा वेळ वाचतो.
७. राष्ट्रात अन्न-दुर्भीक्ष निर्मान होवु शकणार नाही.
८. सैन्याला/ट्रेकर्सना अत्यंत कमी वजन वहावे लागेल...थैल्याच्या थैल्या भरुन खाद्य बरोबर ठेवायची गरज नाही.
९. उत्पादकास नेहमीच उत्पादन खर्चाच्या वर किमान २५% आर्थिक फायदा.
१०. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो...तो वाचेल...म्हनजेच पुन्हा अर्थिक भरभराटच!
मी येथे मोठ्या प्रकल्प-उभारणीची गोष्ट करत नाहीहे. तो करुही नका कारण मोठ्या प्रकल्पाच्या अडचणी मोठ्याच असतात...विशेशता: अन्न प्रक्रिया उद्योगात. कारण तेवड्या मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळवणे सोपे नसते. शेतकरीही सहकार्य करतील याची खात्री नसते. स्थानिक पातळीवर जे करता येईल तेच कायम टीकणार आहे. एका अर्थाने ग्राम-विकास हा अशाच लघु-औद्योगीकरणाने होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या...आज big is beautiful
हा काळ आला आहे...पण small is beautiful हे आपल्याला कधीच कळाले नाही. कारण त्यामागे आपली भारतीय मानसिकता आहे.
-संजय सोनवणी

Sunday, April 10, 2011

निर्जलीकरण: प्रक्रिया पद्धती (तोंडओळख)

जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येत्या २० वर्षांत अन्नाची गरज किमान ३०% नी वाढणार आहे असे तद्न्य सांगतात. भारताची लोकसंख्या १२० कोटीची सीमा पार पाडुन बसली आहे आणि जवळपास ३०% जनता ही आजच कुपोषित आहे....तर भविष्यात काय होईल? आणि याच वेळीस जर लक्षावधी टन शेतमाल वाया जात असेल तर तो एक अक्षम्य अपराध आहे. एवढेच नव्हे तर शेतक-यांचे जे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. आज दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्त्या करत आहेत याचे कारण म्हणजे शेती अर्थव्यवस्था शेतक-यांच्या ताब्यातुन निसटुन दलालांच्या हाती गेली आहे. यात शेतक-यांच्या चुकाही आहेतच...पण प्रस्तुत लेखाचा तो उद्देश नाही.

निर्जलीकरणाबाबत मी मागील लेखात तोंडओळख करुन दिली आहेच. त्यामुळे अधिक टिप्पणी न करता मी प्रतिपाद्य विषयाकडे वळतो.

निर्जलीकरण म्हणजे नेमके काय?

१. भाजीपाला हा नाशवंत असतो कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोम्यटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे.
२. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.
३. पुर्व-प्रक्रिया ते packaging हा झाला महत्वाचा टप्पा. यात भाज्यांच्या मगदुराप्रमाणे (त्यातील जलांश व एकूनातील घनता...) यानुसार प्रक्रियापद्धत पुर्वनियोजित करणे. ती राबवने आणि त्याचे अंतिम परोक्षण करून packaging करने.

आता आपण प्रक्रिया समजावून घेवुयात. त्याचे खालील टप्पे पडतात.

१. स्वछ्ता: ज्या भाज्या/फळभाज्या वा फळे निर्जलीकुत करायची आहेत त्या स्वछ धुवुन घेणे. यासाठी साधे प्रेशर स्प्रेयर्स वापरता येतात. (मांस-माशांसाठी वेगळी पद्धत आहे. ती मी नंतर स्पष्ट करेलच.)

२. कापणे: मुळे वा खराब भाग दुर करून प्रक्रियायोग्य मालाचे कटिंग/स्लायसिंग करने. त्याचा आकार काय ठेवायचा याचा निर्णय घेणे. समजा मुळ कोबीचा आकार वेगवेगळा असु शकतो. त्याचे एकसमान पद्धतीने कटिंग होणे आवश्यक असते.

३. ब्लांचिंग: मुळ पदार्थाचा मुळ रंग प्रक्रियेत हरपु नये, उलट तो अधिक उठावदार असावा यासाठी ही एक अत्यंत साधी पद्धत आहे. म्हनजे २ ते ५ मिनिट (पदार्थाच्या घनतेनुसार) उकळत्या पाण्यात बुडवुन काढने. जाळीदार ट्रे मद्धे ते ठेवुन सारे पाणी निथळुन जावू देणे. फळे ही नायट्रेट असिडच्या सौम्य द्रावणात बुडवुन ठेवावी लागतात.) वरील दोन्ही कार्ये मानवी श्रमाने करायची आहेत. आवश्यकता भासली तरच यांत्रिक साधनेही वापरता येतात.

४. निर्जलीकरण: निर्जलीकरण हे टनेल ड्रायर मद्धे करने सर्वोत्तम आहे. टनेल ड्रायर म्हणजे १० मीटर ते २० मीटर लांबीचा, क्षमतेनुसार वेगवेगळ्या रुंदीचा एक हवाबंद पण नित्य-प्रक्रिया करणारा महत्वाचा घटक आहे. या ड्रायरमद्धे स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा फिरता पट्टा असतो. या टनेलमद्धे उष्ण हवा मध्यम वेगाने वाहती ठेवायची असते. हवेची उष्नता नियंत्रकांमार्फत नियंत्रीत ठेवली जाते. (प्रत्येक प्रकारच्या पदार्थासाठी वेगळी उष्णता पुरवावी लागते.)

या बेल्टवर सरासरी १ ते २ इंच उंचीचा समांतर स्तर येईल अशा पद्धतीने कापलेल्या भाज्या पसरवायच्या असतात. बेल्ट सरकावण्याचे हे कार्य यांत्रिक वा मानवी असू शकते.

या टनेलमद्धुन जो उष्ण हवेचा प्रवाह आहे तो इलेकत्रिकल हीटर्स वा स्थानिक शेत-कच-याला जाळुन निर्माण करता येवू शकतो. पण ईलेक्ट्रिकल हीटर्स हे समतोल तापमान पुरवु शकत असल्याने तेच अधिक उपयुक्त ठरतात.

या टनेल ड्रायरला काचेच्या निरिक्षण खिडक्या असतात. तसेच वाळला जात असलेला माल खालीवर करणारे पट्टे असतात. रंग आणि टेक्स्चर या अनुभवाने आलेल्या बाबींनुसार मालाची वाळल्याची प्रत कळते. माल बाहेर येतांना त्याची सातत्याने पडताळणी करुन योग्य प्रमाणात निर्जलीकरण झाले आहे कि नाही...नसल्यास ते नंतर पुन्हा छोट्या ड्रायरमद्धे वा टनेल ड्रायरमद्धेच वेगात करुन घेता येते.

मालात कोणत्याही प्रकारचा अनुपयुक्त वा घातक (उदा. पिना, टाचण्या वा चुकीचा.) कोणताही पदार्थ नाही ना...याची खात्री करुन घावी लागते.

टनेलमधुन माल बाहेर आला कि तो नैसर्गिक तापमानाच असेल याची खात्री मुळात टनेळ ड्रायर बांधतांना करुन घेतली असल्याने हवेतील नैसर्गिक आद्रता माल पुन्हा शोषणार नाही याची खात्री असली तरी त्यावर लक्ष ठेवावे लागते.

५. बाहेर येनारा माल दर्जाची पातळी गाठत असेल तर तो लगोलग कारटन्स मद्धे प्याक करायचा असतो. म्हनजे वातावरणातील आद्रता शोषली जाणार नाही.

आता:

प्रत्येक शेतमालात नैसर्गिक जलाचे प्रमाण वेगवेगले असते. हे प्रमाण ५०% ते ९०% एवढे असू शकते. एवढेच नव्हे तर एकाच प्रकारच्या भाज्यांत त्यांच्या स्थिती=परिप्रेक्षात ते बदलते असु शकते...अगदी एकाच गावातील. एकाच शेतातील. यावर तोडणी कधी-कोणत्या क्रमाने झाली आहे वा अकाळी पावुस आला आहे वा आद्रता वाढली आहे...इ.इ.इ. घटक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ड्रायिंग प्रक्रिया सुरु करण्याआधी पदार्थांतील सरासरी जलांश माहित असणे गरजेचे आहेच पण त्यासाठी उपयुक्त अशी स्वस्त उपकरणे उपलब्ध आहेतच. त्यांचा काटेकोरपणे उपयोग करणे आवश्यक आहे.

५०% जलांश असणा-या भाज्यांना सरासरी ६० ते ८० डीग्री तापमानात वाळवण्यास पदार्थाच्या जाडीनुसार सरासरी ३ ते ६ तास लागतात. म्हणजे कोथींबीरीला ३ तास लागणार असतील तर फुलकोभीला ६ तास लागतील. जलांश वाढेल तसतसे हे प्रंआण वाढत जाते. त्याचे शास्त्रीय फार्म्युलेही मी नंतर देतोच आहे. त्यामुळे गोंधळ उडनार नाही.

एका गावात वा परिसरात सरासरी फळ-फुल-पालेभाज्या यांचे सरासरी उपलब्ध होवू शकनारे प्रमाण लक्षात घेवुनच प्लांटची क्षमता ठरवता येईल. हा प्लांट १२ महिने जरी नाही तरी किमान ८ ते १० महिने चालवता येईल अशाच प्रकारे डीझाईन करायला हवा. मी शोधलेल्या पद्धतीमुळे (म्हणजे जाळीदार बेल्ट आणि तोही टनेलच्या मध्यातुन प्रवास करणारा) यामुळे किमान ४०% उत्पादन क्षमता वाढते आणि हे सत्य मानेस्मान डीम्याग सारख्या जर्मन कंपनीने मान्य करुन तसे बदल त्यांच्याही डिझाईनमद्धे करुन घेतले आहेत.

हे फार सोपे आहे. यात कोणतीही रोकेट टेक्नोलोजी नाही. यातील गुंतवणुक अत्यंत लहाण आहे. सरकारी योजनाही दिमतीला आहेत. पण यातील आर्थिक बाजु मी तुम्हाला पुढील लेखात स्पष्ट करेलच...आणि मुख्य मुद्दा...हे सारी ठीक आहे...पण हा निर्जलीक्रुत माल विकायचा कोठे? काळजी करु नका...मी त्यावरही सविस्तर लिहितो. मला तुम्हाला सर्व टेक्निकल डिझाईन्सही द्यायचीच आहेत...ती मी वेगळ्या पद्धतीने अपलोड करतो...तुम्हीच व्हा तुमच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनाचे खरे शिल्पकार....माझी साथ आहेच.

Saturday, April 9, 2011

निर्जलीकरण का?


भारतात निर्जलीकृत शेतमालाच्या प्रकल्पांची चर्चा सुरु झाली ती जागतिकीकरण आल्यावर. मलाही यात रस असल्याने मी नेदरलँड, इंग्लंड व अमेरिकेतील लहाण ते अवाढव्य प्रकल्पांना भेटी दिल्या. यात विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे भारतात वापरता येणार नाही हे माझ्या लक्षात आले. भारतातील कांदा निर्जलीकरणाचे प्रकल्प का यशस्वी झाले नाहीत तेही लक्षात आले. पण मुलभूत तंत्रद्न्यान मात्र समानच राहनार होते पण बाकीचे अनेक पॅरामीटर्स बदलावे लागणार होते. मी भारतात परत येऊन स्वतंत्रपणे एक पायलट प्लांट टाकला आणि त्यात जवळपास सहा महिने विविध प्रकारच्या भाज्या, फळे ते मासे यावर प्रयोग केले. ते अत्यंत यशस्वी झाले. त्या काळात मला काश्मिरमध्ये हा प्रकल्प नेण्याची कल्पना (माझ्या अनेक मित्रांच्या मते अवदसा) सुचली. यावर तिकडे खर्च केलेले पैसे तर गेले पण प्रकल्प झाला नाही. २००३ साली मी दुस-या अन्य कारणाने एवढ्या प्रचंड अडचणीत आलो की मला माझे होते ते अन्य ४-५ उद्योग बंद करावे लागले. पण निर्जलीकरण हा विषय कधीच मनातून गेला नाही. मी शक्य तेवढा या तंत्रज्ञानाचा प्रचार करतच राहिलो. शेतक-यांना संकटातून कायमचे मुक्ती देणे हे केवळ निर्जलीकरणाचे सोपे तंत्रद्न्यान वापरण्यावर अवलंबून आहे असे मला वाटते. जे मला माहित आहे ते दुस-यांना देण्यात मला आनंदच आहे.  

भारतामद्धे दरवर्षी ५८००० कोटी मुल्याच्या फळ-पालेभाज्या आणि फळे वाया जातात. हा झाला सरकारी आकडा..प्रत्यक्षात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने वाया जाण्याचे प्रमाण आहे. याला मुख्यत्वे कारण आहे प्रक्रिया उद्योगांचा आणि शीतग्रुहांचा अभाव. एकुण उत्पादनापैकी २-३% पेक्षा अधिक शेतमालावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया अनेक पद्धतीने होवू शकतात...पण त्या अत्यंत महागड्या असल्याने (उदा. डीप फ्रीझिंग) अंतत: त्याच्या किंमती अवास्तव वाढतात व त्याला हवी तशी बाजारपेठ मिळत नाही.

निर्जलीकरण ही सर्वांच्या परिचयाची, मानवाने हजारो वर्षांपुर्वी शोधलेली प्रक्रिया आहे. आपण रोज कितीतरी निर्जलीक्रुत पदार्थ आहारात रोज वापरत असतो. धने असोत कि हळद, सुके मासे असोत कि वाटान्यादी कडधान्ये. अर्थात ती उन्हात उघड्यावर वाळवलेली असतात. पण त्यामुळे ती हायजिनिकही नसतात. सुदैवाने भारतात सुर्यप्रकाशाची कमतरता नाही. पण वेळोवेळी होणारे वातारणीय बदल, अवकाळी पावुस इ. कारणांनी केवढे फटके बसतात हे आपण दरवर्षी बघत असतो त्यामुळे वाया जाणारा माल ही राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संपत्तीचा नाशच असतो. शिवाय साराच शेतमाल उन्हात वाळवता येत नाही.

क्रुत्रीम रित्या नियंत्रीत तापमानात अत्यंत आरोग्यदायी पद्धतीने शेतमालावर निर्जलीकरणाची प्रक्रिया करता येते हा शोध औद्योगीक क्रांतीनंतर कल्पक संशोधकांनी लावला आणि त्यातुन अवाढव्य पकल्प उभे राहीले. भारतात उन-वाळवणी सोडली तर नवे आर्थिक धोरण येईपर्यंत हे तंत्रद्न्यान आले नव्हते. अजुनही ते अत्यंत मर्यादित आहे. याचे खरे कारण म्हणजे त्यांनी युरोपियन तंत्रद्न्यान जसेच्या तसे येथे वापरण्याचा प्रयत्न केला. भारतातील वातावरणीय परिस्थीती, ठिकठिकाणचे बदलते वायुमान, हवेतील आद्रता, तापमान याचा विचारच केला नव्हतात त्यामुळे अनेक कारखाने बंद पडले. काहींचे हेतुही प्रामाणिक नव्हते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुळात अत्यंत साधे-सोपे असणारे हे तंत्रद्न्यान पुरस्क्रुत केले गेले नाही...सरकार यात मागे पडले.

शेतमालाचा विनाश तसाच चालु राहिला.

आणि आजही आपण बदललो नाही तर तो तसाच सुरू राहील.

निर्जलीकरणामुळे शेतमालाचे आयुष्य तर वाढतेच (किमान २ वर्ष) पण वजनही कमी झाल्याने वाहतुकीचा खर्च कमी होतो. चवीतही वाढ होत असल्याने ती जनसामांन्यात लवकर लोकप्रिय होवू शकतात. किंचीत खराब झालेला, बाजारात नेता येवु शकत नसलेलाहे माल प्रक्रियाक्रुत करता येवु शकतो.

आपण खालील पदार्थ निर्जलीक्रुत करु शकतो:

कोथिंबीर ते सर्व पालेभाज्या, फळभाज्या, टोम्यटो ते सर्व प्रकारची फळे, मांस- मासे इ.

प्रत्येक पदार्थासाठीच्या प्रक्रियेत ठोडाफार फरक असतो जे मी ते पुढील लेखत स्पष्ट करेलच. या प्राथमिक लेखाचा उद्धेश आहे तो असा:

१. शक्य तेवढ्या शेतमालावर गावोगावी छोट्या निर्जलीकरण प्रकल्पातुन प्रक्रिया करणे.
२. स्थानिक रोजगार वाढवणे.
३. एक पातेही/फळही फेकुन द्यावे लागनार नाही याची कालजी घेणे.
४. बाजारभाव आपसुक नियंत्रीत करणे. (बाजारभाव उत्पादन किंमतीपेक्षा कमी असले तर एक किलोही ताजा माल बाजारात न पाठवणे.)
५. प्रक्रियाक्रुत मालाचे विपणन करण्याची यंत्रणा उभारणे.
६. शेतमालाची एकुणातील मुल्यव्रुद्धी साधणे.

यातुन शेतक-यांना मोठेच आर्थिक बळ मिळेल. गावोगावी (वा ४-५ गावे मिळुन एक) असे प्रकल्प उभे झाले तर ,मोठी शेतकी क्रांती घडुन येवु शकते. हे तंत्रद्न्यान खरोखर खुप सोपे आहे. मोठ्या भांडवलाची गरज नाही. कुशल तंत्रद्न्यांची आवश्यकता नाही. ट्रेनिंग/तंत्रद्न्यान द्यायला मी तयार आहे. (कसलीही अपेक्षा नाही). हा प्लांट आपल्या नजीकच्या वर्कशोपमद्धे बांधुन घेता येईल...असे प्लांट बनवणा-या कंपन्याही आहेत...पण त्यांचे दर अवस्तव असतात.

पुढील लेखांत मी खालील माहिती देणार आहे:

१. प्रक्रिया पद्धती (विविध फळ-पालेभाज्यांसाठी.)
२. तंत्रद्न्यान
३. भारतीय व जागतीक बाजारपेठ
४. विपणन (मार्केटिंग)
५. कशी सुरुवात कराल?

आपल्याला जर खरी शेतकी क्रांती घडवायची असेल, शेतक-यांना दैन्यावस्थेतुन बाहेर काढायचे असेल तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. एक लक्षत घ्या निर्जलीक्रुत शेतमाल जगभर मागणीत आहे. असंख्य पदार्थ आपण रोज आहारात वापरत आलेलोच आहोत. निर्जलीकरण केल्याने मुळ चवीत कसलाही फरक पडत नसून उलट त्यात वाढच झालेली असते. नियंत्रीत वातावरणात उत्पादन केल्याने ताज्या मालापेक्षा हे निर्जलीक्रुत पदार्थ कैक पटीने आरोग्यदायी असतात. निर्जलीकरण म्हणजे अन्य काही नसून फळ-पालेभाज्यांतील अतिरिक्त जल आपण नियंत्रीत तापमानात काढुन घेत त्याचे आयुष्य वाढवत असतो. त्यात कसलेली अन्य द्रव्य मिसळावे लागत नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे शुद्ध रहात असते. दिवसा १ टन ते १० टन कच्च्या मालावर पर्क्रिया करता येईल असे लघु प्रकल्प अधिक यशदायी ठरतील.

पुढील लेख मी टाकत जातोच...दर्म्यान जेवढ्याही शंका असतील...विचारा.

भ्रष्टाचार निर्मुलन.........?....अण्णा हजारे....?

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मुळात आजचे नाही. भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांची संख्या एके काळी नुसती अवाढव्य नव्हती तर तीच एके प्रकारे blackmailing ची हत्यरे वापरत पैसे उकलण्याचा धंदा करत होती. आता लोकपाल विधेयकाबाबत जोही काही आंदोलनाचा प्रकार देशात घदला आहे...अवघ्या ४ दिवसांत हे आंदोलन संपले आहे आणि गेल्या चार दिवसांत मी जो काही उन्माद पाहिला आहे यावरुन भारतीय जनता खरोखर भ्रष्टाचाराचा द्वेष करते असे चित्र प्रोजेक्ट झाले आहे...ते मुळात वास्तव आहे काय? या विषयामुळे भारतात खरोखर जस्मीन क्रांती अवतरणार आहे काय़? हे प्रश्न निर्माण होतात.

खरे तर या प्रश्नांचे उत्तर आहे कि मुळातच भारतीय जनमानस सन्माननीय अपवाद वगळता भ्रष्ट आहे. हे बदललेले लोकपाल विधेयक संम्मत होणे म्हणजे नव्या भ्रष्टाचा-यांना जन्म देणे असा आहे. मुळात भ्रष्ताचार हा उभयपक्षी असतो. देणारा आणि घेणारा अशा वाटण्या पडतात. भ्रष्टाचार जन्माला येतो कारण विधीवत कामे वेळेवर होत नाहीत वा अन्याय्य मार्गाने एखादी संपत्ती हडप करायची असते म्हणुन. या विधेयकात भ्रष्टाचाराच्या देणा-या बाजुचा काय परामर्श घेतला आहे हे अद्याप समजायचे आहे. न्यायाधीश, सेनानी, पुरस्कारप्राप्त सन्मान्य गणले गेलेले किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे कळण्याचे सामान्यांना एकही साधन उपलब्ध नाही. किंबहुना हे आपल्याला माहित असण्याची गरज आहे हे क्वचितच कळते. माहिती अधिकाराचा उपयोग कशासाठी बव्हंशी केला जात आहे हे आता समजले नसेल तर तो सर्वांचा वेडेपणा आहे.

सध्या लोकपाल विधेयकावर दोन मतप्रवाह आहेत...१. यामागे आर.आर.एस. चा हात आहे. २. शरद पवार यांना टार्गेट करण्याची ही कोन्ग्रेसी रणनीति आहे. ३. हा खरोखरच भ्रष्टाचार निर्मुलनाचा कार्यक्रम आहे.

यावर माझे मत हे कि सरकार एकतर दुध्खुळे आहे किंवा त्यालाही यातुन काहीतरी साध्य करायचे आहे...राजकीय फायदे...हे ते एक कारण असु शकते. सरकार हे बिल खरोखर पास करेल काय? थोडी वाट पाहुयात. आर.एस.एस. यामागे आहे (कारण रामदेव ते अनेक साधु यात पडल्याने व शिवसेना...या पक्षानेही समर्थन दिल्याने...(शिवसेना जर या विधेयकाच्या एकाही कलमात अडकली तर भाळासाहेब ते उद्धवजींचे काय होईल?) असा समज होणे स्वाभाविक आहे. पण तो प्रामाणिक आहे काय? अण्णांवर "वापरले जाण्याचे" आरोप अनेकदा झाले आहेत. या वेळी ते कोण आहेत हे लवकरच कळेल अशी आशा आहे. तरुणांनी अण्णांच्या या उपोषणाला फारच उत्स्फुर्त (?) पाठिंबा दिला...पण यातील किती "देणा-यांच्या" बाजुने होते याचा विचार ज्याचा त्याने करावा. क्यपिटेशन फी ते ज्युनियर के.जी. त प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजणा-यांनी आपल्या बापाला "हे पैसे कोठुन आनले" ते न विचारता, चंगळवादी भुमिका घेत मस्ती करत "आम्हीही भ्रष्टाचार विरोधी." अशी शेखी मिरवत मेनबत्त्या पेटवत अण्णांना पाठबळ देतात...हे अयोग्य आहे असे मला म्हनायचे नाही...किमान भ्रष्टाचार हा चुकीचा आहे एवढे क्रुतीशील नसले तरी मनोमन मान्य आहे असे त्यांना वाटले याचे अप्रुप आहेच. पण हे पुरेसे आहे काय?

मुळात अण्णांची भुमिका प्रामाणिक आहे काय? असती तर त्यांना हे सारे इषारे खुप आधी देता आले असते. मी म्हणेल तेच लोक समितीत असावेत याचा अर्थ ही नव-हुकुमशाही नव्हे तर काय आहे? भ्रष्टाचार दुर करता येईल अशा सरळ-साध्या बाबींना हात न घालता सरळ कायदाच व्हावा...आणि भारतात कोणता कायदा आजवर सरळ अन्याय न करता पाळला गेला आहे बरे? आणि लोकपाल विधेयक सम्मत झाले तर त्यांचे प्रतिनिधी केवळ निव्रुत्त न्यायाधिश, पुरस्कार विजेते आहेत म्हणुन प्रामाणिकच असतील याबाबत एवढी खात्री का बरे? हे प्रतिसरकार कोणत्या नियमांनी चालेल? कि त्यावरही नियंत्रण ठेवायला नवी यंत्रणा बनवावी लागेल?

भ्रष्टाचार ही एक मानसिकता आहे. कायद्यांनी ती कधीही बदलु शकत नाही. उच्च नीतिमुल्ये जेंव्हा बाळपणापासुन शिकवली जातात आणि साराच समाज जेंव्हा त्या नैतिकतेचा पुरेपुर अनुसरण करत असतो तेंव्हाच समाज नैतिक होतो. कायदे हे नेहमीच अनैतिकांच्या फायद्याची केंद्रे असतात. अण्णा जिंकले नाहीत तर हरले आहेत असे मला स्पष्टपणे नमुद करायचे आहे. अण्ण नव्हे तर त्यांना पाठिंबा देनारेही हरले आहेत. खरा मुलभुत प्रश्न चीप प्रसिद्धीच्या मार्गासाठी छपवुन भलतेच चित्र उभे करण्यात आले आहे. पण कदाचित आज त्यांना त्यांची चुक कळणार नाही...

उद्या खूप उशीर झाला असेल.

आधी काही झोटींग होते...
नंतर रक्तप्राशनकर्ते एवढे असतील कि ईसाप पुन्हा आठवावा लागेल...

Tuesday, April 5, 2011

प्रा. नरके, मी आणि जातीयवादी संघटना....

प्रा हरी नरके यांच्यातील आणि संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा ,बामसेफ़ मधील वादाने जो तळ गाठला आहे तो पहाता महाराष्ट्रचा विवेक केवढ्या रसातळाला जावून पोहोचला आहे हे पाहुन खेद वाटतो. यात संभाजी ब्रिगेड वा भारत मुक्ती मोर्चालाच दोष देत नाही तर तमाम विचारवंत, साहित्यिक...मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, तेही तेवढेच "मुक" बनले असल्याने दोषाला पात्र आहेत असेच म्हणावे लागते.

पराकोटीचा ब्राह्मण द्वेष ही भुमिका घेवून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ते भारत मुक्ती मोर्चा बहुजनीय चळवळ चालवत आहेत आणि द्वेषाच्य पायावर कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही हा इतिहास मी वारंवार मांडला आहे. हा आता फक्त ब्राह्मण द्वेष उरला नसून जे ही विरोधी भुमिका घेतात त्यांचाही तेवढ्याच स्तरावर जावुन द्वेष केला जात आहे.

कोणत्याही समाजात अनेक विचारप्रवाह असतात. नवी नवी प्रमेये सिद्ध होत असतात तशा विचारवंत संशोधकांच्या भुमिकेतही आवश्यक बदल होत असतो. सारेच मतप्रवाह हे सर्वमान्य होवू शकत नहीत...समर्थ्क आणि विरोधक हे राहणारच आणि त्यांच्यातील सर्वकाळ चालत असलेल्या मंथनातुन समाज वैचारिक प्रगती करत असतो. ग्रीक तत्वद्न्यांत असंख्य विभेद होते पण त्यातुन तत्वद्न्य, गणीत, भौतिक शास्त्रांची प्रगती झाल्याचेच आपल्याला दिसते. धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता यामधील संघर्ष युरोपने पाहिला आहे त्यातुनच पुढे लोकशाही, समता, बंधुतादि महनीय तत्वांची उभारणी झाली आहे. त्याचीच फळे आज आपण चाखत आहोत. केवळ मते विरोधी आहेत म्हणुन त्याला संपवुन टाका हा मध्ययुगीन कायदा आज कोणीही मान्य करणार नाही. ब्राह्मण द्वेषाने मराठ्यांचे वा बहुजनांचे हित होणार आहे, त्यांना कापुन काढले, दंगली घदवल्या व सा-या ब्राह्मण पुरुषांना मारुन टाकले म्हनजे कल्याण होणार आहे असा विचारच मुळात मानवताविरोधी आहे. राष्ट्रविरोधी आहे. आणि या वंशसंहाराच्या विधानात ब्राह्मण स्त्रीयांना वगळले गेले आहे...त्यामागील प्रव्रुत्ती कोणीही विचर करु शकणारा समजु शकतो. या प्रव्रुत्तीबद्दल ज्यालाही कोणाला समर्थन करायचे आहे वा करत आहेत त्यांनी सारेच सामाजिक नैतीक संकेत धाब्यावर बसवले आहेत असेच म्हनावे लागेल. एकीकडे आद्य मानव मराठाच होता असेही म्हनायचे...मग ब्राह्मण मराठेच झाले कि या सिद्धांतानुसार...मग विरोध का? मला वाटते कसलेही तारतम्य नसलेले तत्वद्न्यान घेवून ब्राह्मण द्वेष करणे म्हणजे नेमक्या कोणत्या ब्राह्मनी संस्क्रुतीचा विरोध करणे याचेच आकलन झाले नसल्याचे लक्षण होय. यातुन ही चळवळ जिंकु शकनार नाही, एकाही मराठ्याचे वा शोषितांचे कल्याण
होणार नाही असे खेदाने म्हनावे लागते. झाल्या तर या देशात वांशिक आधारावर दंगलीच घडतील...आणि तसाच प्रचार-प्रसार सध्या होतो आहे.
प्रा. नरके हे बामसेफ़ बरोबर ९-१० वर्ष होते. ब्रिगेड वा त्यांच्या मात्रुसंस्थांबरोबरही ते काही वर्षे आता-आतापर्यंत होते. "आपण ती केलेली मोठी चुक होती आणि त्याबद्दल पश्चाताप होतो आहे" असे त्यांनी अलीकडे जाहीरपने म्हटले आहे. तो का होतो आणि आधीच का झाला नाही याबद्दल साकल्याने विचार करता काही प्रश्न उद्भवतात आणि त्यांचाही येथे परामर्श घेणे आवश्यक आहे.

१. डा. साळुंखे व प्रा. नरके यांनी बामसेफ़च्या वा ब्रिगेदच्या चलवळीला वैचारिक अधिष्ठान दिले याबद्दल आतापर्यंत तरी कोणीही विरुद्ध मत नोंदवलेले नाही...नरके जोवर सोबत होते आणि आपले संशोधन विचार इ. या संस्थांना देत होते तोवर या संघटनांचाही त्यांच्यावर आक्षेप नव्हता.
२. मराठा आरक्षणाबद्दल नरकेंनी घेतलेली विरोधी भुमिका, नरके यांची भांदारकर इन्स्टित्युटवर सरकारी नियुक्ति ही उघड कारणे आहेत ज्यातुन फाटाफुट झाली. अंतर्गतही काही कारणे असु शकतील पण ती मला माहित नसल्याने आणि याबाबत दोन्ही पक्ष असत्य साम्गु शकत असल्याने मी त्यात जात नाही.
३. ब्रिगेदला वा बामसेफला नरके यांनी वैचारिक अधिष्ठान दिले असे म्हनावे तर मग या दोन्ही संस्थांनी मला तरी कोनतीही वैचारिक उंची गाठली असल्याचे दिसत नाही. पण संशोधन पुरवले हे खरेच आहे. उदा. म. फुलेंची जन्मतारीख, त्य्यंचे म्रुत्युपत्र, इंग्रज सरकारबरोबरचा पत्रव्यवहार, ओ.बी सी. जनगणना, बजेट, शिवराय रामदास-संबंध, इतिहासाचार्य राजवाड्यांचा दहशतवद, महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी प्रथम शोधली, पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली, केळुस्कर, ज्यांनी प्रथम गद्य शिवचरित्र लिहिले ते मराठा होते...(आधी ते ब्राह्मनच असावेत असा समज होता.), दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते इ.इ.इ. या संशोधनांनी या संघटनांना ब्राह्मणविरोधी बळ पुरवले आणि त्यात काही चुक नाही कारण ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेले असत्याचे डोंगर उद्द्वस्त करायला मदत मिळाली. पण त्यातुन एक भस्मासुरी तत्वद्न्यान जन्माला आनले गेले ते असे कि सारेच ब्राह्मण हे एकमात्र शत्रु असुन जेही सम्यक भुमिका घेतात ते बहुजनीयही शत्रु आणि त्यांचा उछ्छेद केला गेलाच पाहिजे. प्रा, नरके हे सत्य संशोधन करत होते ते यासाठी नक्किच नसनार असा माझा समज आहे. (नाहीतर मलाही माझे सातवाहन ते अन्य संशोधन अशा मनोव्रुतींमुले वापरले जावू शकते, समाजविघातक होवू शकते, त्याचा गैरवापर केला जावु शकतो म्हणुन आताच बंद केलेले बरे असे वाटु लागले तर त्यात काहीएक नवल नाही.) कम्युनिस्ट राष्ट्रांत असेच घडत होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. सत्य संशोधन हे काही बळीचे बकरे बनवण्यासाठी नसुन इतिहासाचे नव्याने आकलन करुन घेत भविष्याची वाटचाल सुसंगत व्हावी यासाठी असते असा माझा समज आहे...आणि तो या देशात चुकीचा ठरत असेल तर कोणीही नव्याने संशोधने करायला पुढे येनार नाही.

मला येथे एक उदाहरण द्यायचा मोह आवरत नाही. जेंव्हा म्याक्समुल्लरने "आर्य" सिद्धांत भाषिक परिप्रेक्षात मांडला आणि त्याचा उपयोग वांशिक श्रेष्ठत्वाच्या मांडणीसाठी जर्मनीत केला जावू लागला तेंव्हा हादरुन त्याने आपला सिद्धांत हा भाषाशास्त्रीय गटांबाबत असुन त्याचा वंशांशी काहीएक संबंध नाही असे क्षमा मागत घोषित केले. स्वार्थी लोक संशोधनांचा असा दुरुपयोग जगभर करत असतात....किंवा स्वउपयोगीच संशोधन व्हावे असा हट्ट त्यांच्याकडे धरत असतात. यतुन शेवटी संशोधक-विचारवंतांची एकतर ससेहोलपट करत त्याला वैचरिक गुलाम तरी बनवले जाते वा त्याचा अंत घडवला जातो. सोक्रेटिसच्या बाबतीत काय झाले हे सर्वांनाच माहित आहे.
४. मराठा आरक्षण याबाबत वाद झाला...नरके हे मराठा आरक्षनाविरुद्ध आहेत व त्यांनी ही बाब लपवून ठेवलेली नाही. मी स्वता: सर्वच आरक्षणांविरुद्ध आहे हेही माझ्या वाचकांना माहितच आहे. परंतू या मुद्द्यावर मतभेद आहेत हे वास्तव आहे आणि त्याचा कायदेशीर लढा उभयपक्षांनी द्यावा. नरके म्हणाले म्हणुन आरक्षन मिळेल असे तर नक्कीच नाही. याबाबतचा वाद केवळ अडानीपणाचा आहे.
५. प्रा. नरके यांच्या लोकप्रभातील लेखामुळे संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा प्रक्षुब्ध झाले हे एक वास्तव आहे. मलाही तो लेख प्रथमदर्शी आवदला नव्हता हे मी मागेही स्पष्ट केले आहे. पण त्यामागे एक परंपरा होती ती ही कि "मुलनिवासी नायक या दैनिकाने त्यांच्याविरुद्ध एक अत्यंत अश्लाघ्य अशी आघाडी उघडली. हरी नरके हे पुरुष वेश्या आहेत, त्यांची डी.एन.ए. चाचणी करायला हवी, ते नरक ओकतात, ते शाहु-फुलेंना अपमानित करतात, इ.इ.इ. अत्यंत धादांत असत्य बातम्यांच्या नावाखालील पोर्नोग्राफी प्रसिद्ध करत होते, तेही एक-२ वेळा नाही तर तब्बल ३-४ महिने...आजही तेच चालु आहे...अशा स्थितीन नरके यांनी काय करायला हवे होते अशी यांची अपेक्षा आहे? गप्प बसायचे? निमुट मार खात रहायचा? बदनामी सहन करत रहायची?
६. दुर्दैवाची बाब म्हनजे या समयी एकही महाराष्ट्रातील विचारवंत त्यांच्या मागे उघडपने उभा राहिला नाही. महाराष्ट्राची ती परंपराच आहे. उदाहरण देतो. जेंव्ह्या आनंद यादव यांच्या संतसुर्य तुकाराम या कादंबरीबाबत वारकरी संप्रदायाने झोड उठवली, ते पुस्तक मागे घ्यायला लावले तेंव्ह्या "वारकरी हे तालीबानी बनले आहेत" असे पत्रक काढनारा मी एकमेव लेखक होतो...आणि तीच कादंबरी केवढी हीनकस होती हे सिद्ध करुण दाखवनाराही मीच होतो...कादंबरी न आवडणे हा एक भाग असतो आणि ती मागे घ्यावी यासाठी जो दहशतवाद माजवला जातो ती एक बाब झाली. हे महार्स्स्श्ट्रातील लेखक विद्वानांना क्वचित कळते. हीच बाब गिरिजा कीर नावाच्या लेखिकेची...त्यांच्या दलित-झोपडपट्टीवाल्यांना काय साहित्य कळते या विधानावर हल्ला चढवनारा...पत्रक काढणारा मीच एकमेव लेखक होतो. हे सांगण्याचे कारण असे कि मराठीतील तथाकथित विचारवंत आणि लेखक हे विकले गेलेले आणि साहित्य-विचार हे केवळ स्वार्थाच्या कारणासाठी वापरणारे दल्ले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. ही अशीच घतना युरोप-अमेरिकेत घडली असती तरी सारे वैचारिक मतभेद दूर ठेवून त्या विचारवंताच्या स्वतंत्र विचारांची आब राखत त्याला समर्थ्न देत रक्षिले असते. पन या महाराष्ट्रीय भेकड आप्पलपोट्ट्या लेखक-विचारवंत म्हनवणा-यांचा मी निषेध करतो. मी प्रा. नरके यांच्या पाठीशी उभे राहुन अल्प-स्वल्प योगदान देतो आहे ते त्यांचे विचार मला सर्वस्वी मान्य आहेत म्हणुन नव्हेत तर केवळ त्यांना एक्मात्र लक्ष्य करत त्यांना जीवनातुन उठवण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्यांची कोंडी करत त्यांना नको त्या आधारांची गरज भासवली जात आहे त्याबद्दल.
७. प्रा. नरके यांना भांडारकरमद्धे सरकारने नेमले. डा. आ. ह. साळुंखेंनाही नेमले. या नेमनुकीनंतर जवळपास २-२.५ वर्ष झाल्यानंतर नरके यांनी व साळुंखेंनीही भांडारकरचा राजीनामा द्यावा असा विनंतीवजा ठरावही पारित केला गेला. हीच वेळ का निवडली गेली? साळुंखेंनी राजीनामा दिला नाही तसाच नरकेंनीही दिला नाही. पण रोष मात्र नरकेंवर. हा अजब न्याय जातीय नाही तर कशासाठी आहे?
पण मला वाटते बहुजनीय संशोधक-विचारवंत अशा संस्थांवर नेमले जात असतील आणि त्यातुन त्यांना आपापल्या भुमिका/संशोधने मांडायची संधी मिलत असेल तर त्याला आक्षेप घेणारे हे कोण? त्या संस्थेवर गेले म्हनजे ते ब्राह्मनालले...भटालले...त्या १४ जनांचे हस्तक बनले...असे आरोप करतांना थोडीतरी शरम नको? ही कोनती हिटलरशाही आहे? भारतात पुरातत्वेय उत्कनने करत पुरातन संस्क्रुती उजेडात आननारे बव्हंशी ब्राह्मनच आहेत कारण त्या पुरातत्वीय खात्यात तेच काम करतात...तशी संधी तुम्ही त्या सम्स्थांत गेलेच नाहीत तर कशे मिलणार आहे? नाहेतर तुम्ही तशाच दर्जाच्या संस्था काढा ना. ते कोण खंदारे नावाचे संशोधक (?) तारे तोडत शिवमानवादी संकल्पना मांडतात आणि तेही विकिपेडियाचा आधार घेत...हेच संशोधन अभिप्रेत आहे कि काय? याला मुळात सम्शोधन म्हनतात काय? किती मराठ्यांनी आपल्या पुर्वजांची कागदपत्रे जपली? किती ताम्रपटे मोडुन खाल्ली याचा जाब विचारला तर? भांडारकरीय संस्थेला बहुजनीय पर्याय आजही का दिला जात नाही? या बहुजनीय तथाकथीत संशोधकांपैकी किती जणांना मोडी वाचता येते? साळुंखे सर सोडले तर किती जणांना संस्क्रुत समजते? किती जणांनी स्वतंत्रपणे पुरातन स्थळे उजेडात आनली? काय अन्वेषन केले? जगातील आदिमानव हा मराठा होता हे? परशुरामाचा बाप मराठाच होता हे? मराठा नावाची जात इ.स. च्या २-३ -या शतकापर्यंत मुळात आस्तित्वातच आली नव्हती आणि ती मिश्रवंशीय आहे हे सत्य का साम्गत नाही? डा. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात एकही शुद्ध रक्ताचा उरलेला नाही म्हणुन वंश्शुद्धीची कल्पन पोरकटपची आहे यासाठी ब्राह्मनांना वेगळे करण्यासाठी आंबेडकर विरोधी नाही काय? सारेच कालौघात मिश्र झाले आहेत. तुम्हेही अपवाद नाहीत. पण वांशिक गंड चढ्ला आहे आणि तो उघड करणे क्रमप्राप्त आहे.
७. प्रा. नरके यांचे काय चूक काय बरोबर यावर चर्चा होवू शकते आणि ती व्हायलाही हवी. पण ती द्वेषाच्या पायावर नको तर तर्काच्या आणि पायावर व्हायला हवी. त्यातुनच सामाजिक भले साध्य होवू शकते. चर्चा आणि विद्वेश्रहीत भावनेतुनच समाजाची समग्र प्रगती होवु शकते. साळुंखे सरांचे नाव उगा आले म्हणुन गळा काढणा-यांनी नरके आणि विलास वाघांना धमक्या आल्या होत्या हे तर मान्य आहे? त्याचा तरी निषेध कोणी केल्याचे मला दिसत नाही. साळुंखे सर का नाही आले त्या परिसंवादाला हे त्यांनाच माहित...पण आले नाहित हे वास्तव आहेत आणि पुण्यात येवूनही.,..पण अलेकडेच सरांनाही ठरावात स्ॐय का होईना लक्ष्य बनवणारे आज त्यांचाच कळवळा दाखवतात...मलाही खोटे...अफवा पसरवणारे ठरवतात...तेंव्हा ही वाटचाल वैचारिकतेकडे नव्हे तर विध्वंसाकडे चालली आहे असे म्हणने भाग आहे. तुम्हाला ब्राह्मणांचा द्वेष हेच तुमच्या यशाचे गमक वाटत असेल तर खुशाल द्वेष करत बसा...तुमच्या या वंशद्वेषी भुमिकेला विरोध करणा-यांचाही द्वेष करत बसा. मराठी माणुस तसा स्वार्थी-व्युहातच रममान असतो हेही मी पहातो आहे...पण तुमच्या या द्वैषिक मोहिमेला त्यामुळे मोकळे रान नेहमीच मिळत राहील असेही समजु नका.

८. मी प्रा. नरके यांना पुर्ण पाठिंबा दिला आहे तो केवळ त्यांचा सोक्रेटीस होवू नये म्हणुन...मते पटोत वा ना पटोत...पण मत मांडण्याचे स्वातंत्र्य अशा संघटना वा व्यक्ति हिरावुन घेत असतील तर त्यांचा निषेध केलाच पाहिजे. मला नरकेंची सर्वच मते मान्य नाहीत...पण म्हणुन त्यांचे उघड्या डोळ्यांनी कोणी शिर्कान करण्याच्या नादात असेल तर मी ते जीवात जीव असेपर्यंत होवू देनार नाही.
एखाद्याला एकाकी पाडत त्याच्यावर रानटी हल्ले करणा-या प्रव्रुत्तींचा मी निषेध करतो. जर अजुनही मराठी विचारवंत, साहित्यिक, पत्रकार इ.ची थोडीफार विवेकबुद्धी जाग्रुत असेल तर त्यांनीही स्वर्थ सोडुन अशा प्रव्रुत्तींचा धि:कारच केला पाहिजे. अन्यथा उद्या त्यांचेही असेच शिर्कान होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि शेवटी आवाहन या देशातील सुबुद्ध नागरिकांना...जागे व्हा...अन्यथा तुमचेही गळे कधी चिरले जातील हे तुम्हालाही कळनार नाही.

प्रा. नरके, मी आणि हा जातीयवादी संघटना....

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...