मनुष्य जन्मतो तेंव्हा स्वतंत्र असतो पण जसा तो सामाजिक व्युहात येतो तसे पारतंत्र्याचे एकामागुन एक जोखड त्याच्या मानगुटीवर बसत जाते. "संस्कार" हे प्राय: माणसाला व्यवस्थेचे गुलाम करण्यासाठीच असतात. हे करा...ते करू नका या भडिमारात मुलांना वाढवले जाते. त्यामागे एक समाज म्हणुन त्या मुलाला जगायचे आहे आणि त्यात मान्य मुल्ये शिकवली गेली पाहिजेत ही रास्त भावना असते म्हणुन तेवढ्यापुरते ते समजावुनही घेता येते. पण संघटना मात्र व्यक्तिला एका बंदिस्त विचारव्युहात अडकवण्यासाठी सज्ज असतात. संघटना म्हटले कि तीचे म्हणुन काही तत्वद्न्यान असते. काय साध्य करायचे आहे याचा लेखाजोखा असतो. आपापल्या तत्वद्न्यानाचा प्रचार प्रसार करणारी यंत्रणा असते. त्यासाठी क्याडरही बनवल्या जातात. क्याडरमधील मंडळीला त्या=त्या तत्वद्न्यानाचे डोस देवून एक यंत्र बनवले जाते. चळवळीबाह्य स्वतंत्र विचार नाकारणे, किंबहुना त्यावर चढवता येतील तसे हल्ले चढवण्याचे प्रशिक्षण अशा रितीने दिले जाते कि अंधानुयायांची मांदियाळी निर्माण केली जाते. कोणाचे चुकुन दोळे उघदले तर त्याला हरप्रकारे संपवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रसंगी खुनही पडतात हे आपण कामगार संघटना ते काही समाज-राजकीय संघटनांच्या संदर्भात पाहिलेच आहे.
हा एक फ़्यासिझमच असतो.
एकाधिकारशाही हा समग्र मानवी जीवनाला लागलेला अभिशाप आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सम्यक...संतुलीत विचारधारा पेलण्याचे सामर्थ्य या संघटना आणि चळवळींनी गमावलेले असते. मानवी संबंध हे व्यापक परिप्रेक्षात न पहाता ते विशिष्ट वैचारिक चष्म्यातुन पाहिले जातात. त्यामुळे जीवनाचा समग्र पट त्यांच्या आवाक्यात कधीच येत नाही. ही त्यांची स्वत:चीच वंचना होवून जाते. स्वातंत्र्याच्या नावाखाली ही मंडळी मन:पुत पारतंत्र्य भोगत असते. म्हणजे इतर परतंत्र नसतात असे नाही...पण हे पारतंत्र्य सर्वच मानवी संवेदनांना ग्रहण लावणारे ठरते.
महाराष्ट्रात सध्या जातीय संघटनांची रेलचेल आहे. ब्राह्मणी वर्चस्ववाद गाजवू पहाणा-या आर.एस.एस. ची भुते जशी आहेत...मग त्यात अभिनव भारत काय वा सनातन प्रभात काय...तशीच काही प्रमाणात प्रतिक्रियात्मक...पण तशीच आणि तशीच कार्यप्रणाली असणा-या मराठा सेवा संघ आणि त्यांची उपांगे, भारत मुक्ती मोर्चा काय किंवा बामसेफ काय...या सर्वांतील एकच साम्य आहे ते म्हणजे या सर्वच संघटना फ्यासिस्ट आहेत. ब्राह्मणी संघटनांना एव-तेव ब्राह्मणी विचारधारेचे प्रस्थ...प्रसंगी दहशतवादी होवून सिद्ध करायचे आहे तर या अन्य संघटनांना मराठा-दलित वर्चस्व सिद्ध करायचे आहे. कोण श्रेष्ठ हा एक झगडा आहे. तो अव्याहत सुरुच असल्याचे आपण सध्याच्या महाराष्ट्रीय समाज वास्तवातुन पहातो आहोतच. यातून एक बाब अधोरेखित होते ती म्हनजे या सर्वांचाच वैचारिक पाया हा मुळात द्वेष आहे.
पण हे असतात दाखवण्याचे दात. अनुयायांच्या सहजी ते लक्षातही येत नाही. म्हणजे ज्या गोष्टी ब्राह्मणी संस्क्रुतीच्या आहेत असे ब्राह्मणी चळवळीवाल्यांना वाटते त्यांना सत्त्याचा कसलाही मुलाधार नसतो. सरस्वती पुजन हा जेथेही ब्राह्मणी पक्षप्रेणीत सरकारे आली तेथे राबवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण सरस्वती ही तथाकथित हिंदु मांदियाळीतील देवीच नाही हे मात्र ते सांगत नाहीत. तीला कोणतेही पुराण नाही. ज्या काही पुराणकथा आहेत त्या काही तिची शोभा वाढवणा-या नाहित. पण ऋग्वेदाची रचना सरस्वती नदीच्या काठी झाली असल्याने वैदिकाभिमानी मंडळीला सरस्वती पुज्य वाटने स्वाभाविक असले तरी तिचे अन्यांवर थोपन करणे हे असांस्क्रुतीक आहे. हे मात्र कोणी लक्षात घेत नाही. आर.एस.एस प्रणित शाळांमद्धे सती प्रथेच्या उदात्तिकरणाचे धडे आहेत. पण मुळात सती प्रथा भारतीय नाही...ती परकीय शक-हुण लोकांमुळे आली हे त्यांनाही समजत नाही. महाभारतात माद्री सती गेली असे सांगणारे महाभारताचा नीट अभ्यास करत नाहीत. पांडुचे शव हस्तिनापुराला आनले होते...आणि माद्री तत्पुर्वीच दिवंगत झाली होती. ती कशी मेली हे माहित नाही. पण ती सती गेली नव्हती हा इतिहास आहे. (महाभारताची चिकित्सक आव्रुत्ती.) राजपुत या सिथ्हियन जमातीमुळे (त्यांच्यात ती प्रथा अपरिहार्यपणे असल्याने) सती प्रथेचे उदात्तीकरण होवू लागले आणि सोयीने ब्राह्मणी संस्क्रुतीने ती नुसती उचलली नाही तर तिचे उदात्तिकरण केले. भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "मनु" या क्षत्रियाच्या नावावर खपवली...अशी अस्म्ख्य उदाहरणे सांगता येतील. सावरकरांचे उदातीकरण हे त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक केल्यानेच त्यांच्यावर टीका होते आणि त्यात नथुरामाचे उदात्तीकरण करणे हा सांस्क्रुतिक मुर्खपणाचा कळसच आहे.
आता असे धडधडीत खोटे सांगणारी अभिजनीय (?) संस्क्रुती असल्याने बहुजनीय म्हणवणारे आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे आम्ही बळी आहोत असा आक्रोश करत शाहु-फुले-आंबेडकरांचे नाव घेत समाज सुधारणेचा वसा घेतला असे दर्शवणारे तरी कसे मागे राहतील? "खोटारडेपणा हे भारतीय संस्क्रुतीचे अव्यवछेदक लक्षण आहे." असे मी पुर्वीच्या लेखांत म्हटलेच आहे. :"ठोकून देतो ऐशा जे..." यात कोण कशाला मागे राहील? सिंधु संस्क्रुती ही फक्त नागवंशीयांची होती...जातीप्रथेचे निर्माते ब्राह्मण आहेत...शिवाजी महाराज हे नागवंशीय होते...म्हणुन दलित आणि मराठे एकवंशीय आहेत...सईबाईच्या समाधीस्थळी कुत्र्याचा पुतळा बसवला...शनिवार वाडा हाच लाल महाल आहे...आद्य मानव हा मराठा होता इ.इ.इ.इ.इ.इ.
खरे तर भारतात प्रतिक्रांतीची गरज होती आणि आजही आहे. पण या अशा बावळ्या लोकांमुळे ती वायफळ जात असून तिचा कोणालाच उपयोग नाही. ब्राह्मण स्वांतसुखात जाण्यासाठी पु.ना.ओक ते मधुकर ढवळीकरांच्या कोशात लपतात तर कथित बहुजनीय खंदारे, सदार ते नावे घेण्याएवढीही योग्यता नसणा-या विचारवंतांच्या पदराआड लपतात आणि शरसंधान करत राहतात. जे शहाणे असतात...मानवतेचे खरे मुल्य समजते ते निराश होवून यांना लाथ मारत दूर जातात.
प्रतिक्रांती हवीच आहे. ब्राह्मणी सम्स्क्रुतीने स्वत:ची वंचना करत करत इतिहासाची असह्य मोडतोड केलेली आहे. बहुजनीय व्यक्तींचे-देवतांचे अपहरण केलेच आहे. ते त्यांनी केले ते फार बुद्धीवंत होते म्हणुन नव्हे तर बहुजन महामुर्ख होते म्हणुन. बुद्धाला विष्णुचा दहावा अवतार घोषित का केला हे तरी या मुर्खांना माहित आहे काय? असुरांच्या मनात संभ्रम निर्माण करून बुद्धाने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणुन बुद्धाला वैदिकांनी हा सन्मान दिला. पण बहुजनीय चलवळवाले आजही महामुर्ख आहेत आणि तात्कालिक यशांनी शेफारुन जात आपल्या अक्कलेचे दिवाळे काढत आहेत. द्वेष आणि फक्त द्वेषाने जागरण होत नसून ते सत्य मांडल्यामुळेच होवू शकते.
मानवी स्वातंत्र्याची कदर जे करू शकत नाहीत त्यांनी पुरोगामी म्हनवून घेण्यात मुळात अर्थ नाही. उलट सर्वांना व्यापक स्वातंत्र्य मिळेल हाच चळवळीचा निर्धार असायला हवा.
चुका सर्वांच्या झाल्या आहेत...होत आहेत...पण त्यांची पुनराव्रुत्ती होवू नये अशीच सर्वच चळवळवाल्यांकडुन अपेक्शा आहे. धन्यवाद.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
BRAVO.....SANJAYJII I SALUT YOU SIR
ReplyDeleteअसुरांच्या मनात संभ्रम निर्माण करून बुद्धाने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणुन बुद्धाला वैदिकांनी हा सन्मान दिला.आदरणीय सोनवणीजी; उपरोक्त विधानाला पूरक असे उदाहरण दिल्यास ते जास्त स्पष्ट होईल.
ReplyDeleteधन्यवाद !
डौ. संजीव गायकवाड
गायकवाडसाहेब, "सन्मान" हा शब्द मी उपहासाने वापरला आहे. पुराणांत बुद्धाला दहावा अवतार का ठरवले आहे हे स्पष्ट करतांना वरील विधान केले आहे. ते मला अर्थातच मान्य नाही. सांस्क्रुतीक मोडतोड अद्न्यानापोटी कशे केली जाते त्याचे हे एक उदाहरण आहे. बहुजनेयांच्या महानायकांचे कसे अपहरण केले जाते त्याचेही हे ध्योतक आहे. पण यावर न बोलता बहुजनीय विद्वानही अक्कलेचे तारे तोडत बाश्कळ गोष्टींवर भर देतात त्याचे वाईट वाटते.
ReplyDeleteमग आता सत्य काय ते सांग प्लीज !!!
ReplyDeletesach...just wait and you will have it. Regards.
ReplyDeleteसंजयजी छान लेख लिहिलात. waiting for next article...
ReplyDeleteI agree with your statement.
ReplyDeleteबहुजन महमूर्ख होते हे जरा जास्त कडवट नाही का हो ज़ाल. बर हे जर वस्तुस्तीती असेल टेर अस माहणायला हरकत पण नाही पण खरच अस होत का?
ReplyDeleteब्रिटिशनाई या देशा वर राज्या केल, आगदी ब्राम्हणा वर सुद्धा आता हा देश च मूर्ख ज़ला का?. . .की ब्राम्हण संकरती नि इतिहासाची मोड टॉड केली, बहुजन वयक्ती, देवतांची अपहर्न केले, ते तास करू शकले कारण 1) त्यानी हे लपून केले मॅहणजे त्यानी त्याच्या पुस्तकात काय लिहले हे कुणाला माहीत नव्हत 2)बहुजन या बाबतीत एक टेर अनभीग होते आणि उदासीन पण होते. . .त्यानी ह्या प्रश्नाना खूप महत्वा दिले नाही. . . आता कुठे ते ह्या प्रश्नाना महत्व देऊ लागले आणि परत वार करू लागले. . .हा प्रश्न उदासिंतेचा होता. . .मूर्ख पणा च नाही. . .