Friday, July 3, 2015

"शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य"

काल अभाविपने मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या "शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य" या परिसंवादात मी मांडलेले ठळक मुद्दे:

१) मला या कार्यक्रमाला वक्त्यांत एक बहुजन असावा म्हणूण बोलावले गेल्याचे दिसते आहे. आपल्याकडची बहुजन-अभिजन ही वाटणी जातीय आहे, वास्तवाधारित नाही. संस्कृत्यांचे निर्माण सातत्याने करणारे लोक अभिजन तर संस्कृतीचे अनुगामी बहुजन असतात. पण येथे मतीमंद, निर्बुद्ध किंवा अतिसामान्य मानसे केवळ जातीमुळे अभिजन म्हणून मिरवतात.

२) संस्कृती निर्माणकर्ते घडवत असतात. संस्कृती त्यांचीच असते. भारताचे पुरातन संस्कृती त्या त्या काळच्या वडार, गवंडी, कुंभार, चर्मकार आदि लोकांनी घडवली आहे. आज आम्हाला आमचा गेल्या ४०-५० हजार वर्षांचा इतिहस समजतो तो त्यांच्याच रचनांतून. आपल्याकडे मात्र वैदिक सम्स्कृतीपासुनच भारताचा इतिहास सुरु होतो असा मानण्याचा प्रघात आहे. वैदिक संस्कृते ही अल्पसंख्यांकांची संस्कृती असून तिला भारतीय संस्कृती चा आरंभ मानता येत नाही. ही आयात झालेली धर्म-संस्कृती आहे, ती मुळचे भारतीय नाही. संस्कृत ही सर्व भषांची जननी हाही एक भ्रम आहे. प्राकृत भाषा संस्कृतची आई आहेत...कन्या नव्हेत.

३) पण स्मृती इराणी यांनी वेद, उपनिषदे व त्यातील गणित-विज्ञान वगैरेंवर भर देत शिक्षण पद्धतीत बदल घडवायचे सुतोवाच केले आहे. हे शिक्षणाचे भारतीयीकरण नव्हे तर वैदिकीकरण आहे आणि त्यामुळेच ते निंदेस व विरोधास पात्र आहे. भारतीयीकरण हा तुमचा भ्रम आहे, तथ्य आम्हाला माहित आहे.

४) भारतीयांचा विज्ञान व तत्वज्ञानात मोठा गोंधळ झाला आहे. तत्वज्ञानातील संकल्पनांबद्दल वैदिक-अवैदिक तत्ववेत्यांच्या प्रतिभेला सलाम जरी केला तरी त्या संकल्पना जोवर गणिताने व प्रयोगाने सिद्ध केल्या जात नाहीत तोवर त्यांना विज्ञान म्हणता येत नाही. वेदांतील विमानांनी अलीकडेच आपले जगभर हसू झाले. बिग ब्यंग थियरी पासून ते अणूबोंबचे शोध आमच्या पुर्वजांनी लावले होते हे दावे छाती फुगवून करणे निरर्थक व मुर्खपणाचे आहे. एक तर तुम्ही वर्तमानात तरी प्रयोग करून ते दावे सत्य आहेत हे सिद्ध करुन दाखवा किंवा त्यांना कविकल्पना म्हणून सोडून द्या. आर्यभटाने पृथ्वी परिवलन सिद्धांत पहिल्यांदा मांडला हे खरे आहे पण त्या सिद्धांताचा उपयोग आदि शंकराचार्य ते ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानातील दृष्टांतासाठी वापर केला. विज्ञानासाठी नाही. वैदिक गणित हे यज्ञवेद्या बांधण्यापुरते मर्यादित होते...विशाल वास्तुरचना करण्यासाठी शुल्बसुत्रांचा उपयोग नाही हे गणिती जाणतात. ज्याला आज वैदिक गणित म्हटले जाते ते तर विसाव्या शतकातील आहे.

५) भारत ही पुरातन काळापासून जागतिक संस्कृत्यांमधील एक पुल आहे. पोलिनिशियन, अरब, मध्य आशिया, अफगाणिस्तान, चीन-मंगोलिया इत्यादि संस्कृत्यांचे भारतावर व भारताचे त्यांच्यावर ऋण आहे. सर्वस्वी भारतीय असे शोधत बसणे वेडेपणाचे आहे. भारतातील पहिले चर्च सन ५२ म्धे बनले. ख्रिस्ती धर्मप्रचारक सातवाहनांच्या दरबारी आल्याचे पुरावे आहेत. पहिली मशीद भारतात सन ६२९ मद्ध्ये बनली. असंख्य नीतिकथा, मिथककथा यांचे आदानप्रदानही झाले. आपले शिक्षण विद्यार्थ्याला वैश्विक नागरिक करु इच्छि्त असेल तर या बाबींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

६) शिक्षण हे विद्यार्थ्याला विगतातील आभासी, खोट्या वैभवात रमवायचे माध्यम नाही. ते ज्ञानार्थी बनवत अनावर जिज्ञासेने शोध घेत नव्या ज्ञानाची विश्वे खुली करण्यासाठी आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानवंत नव्हे तर पोटवंत बनवते आणि म्हणून सध्याची शिक्षणपद्धती नाकारलीच पाहिजे व ज्ञानाधारित, विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल, आवड ज्यात आहे त्यातच शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देणारी शिक्षणव्यवस्था आपल्याला हवी आहे. पण भारतीयीकरण हे विद्यार्थ्याला संकुचित करत नेत विज्ञानातील झेप अधिकच मारत त्याला मध्ययुगात घेऊन जाईल. गतकाळाच्या वैभवाचे गुणगान म्हणजे भारतीयीकरण नव्हे. युरोपियनांनी बायबल फेकले व विज्ञान हाती घेतले म्हणून आज आपण आधुनिक विज्ञानाची फळे चाखत आहोत. वेद मात्र झुगारायची तुमची इच्छा नसेल तर ज्ञानवंतांचा देश या स्तरावर आम्ही जावू शकणार नाही. तसेही जगातील पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय विद्यापीठ नाही हे वास्तव आहे.

७) भारतात मुळात शिक्षणव्यवस्थाच नव्हती, जी होती ती एका धर्मसमुहापुरती मर्यादित होती. म्हणजेच भारतीय म्हणावी अशी जर शिक्षणव्यवस्थाच अस्तित्वात नसेल तर आज आम्हाला भारतीयीकरण करणारी शिक्षणव्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न पडणारच! शिक्षणाचे फक्त वैश्विकीकरण होऊ शकते कारण आज आपण इच्छा असो कि नसो वैश्विक नागरिक बनलो आहोत. तुमच्याशी संवाद साधतांना हा माईक...स्पीकर्स, आकोस्टिक्स...सारे पाश्चात्य आहे. भारतीय म्हणावे असे आधुनिक आमच्याकडे काही नाही. मग पाश्चात्यांनी शोध लावले त्यापेक्षा प्रबळ शोध आम्ही लावण्यासाठी आमची बुद्धीमत्ता का खर्चत नाही? उदा. बिट सिस्टमवर आजही कंप्युटर चालतात. क्वंटम मेक्यनिक्स वापरुन आम्ही नवीच प्रणाली का शोधू नये? माइक-स्पीकरशिवायही आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल असे अगदी नवे तंत्रज्ञान आम्हाला का शोधता येवू नये? शिवकाळात म्हणे असे तंत्रज्ञान होते. होते कि...असेल....पण आज ते उपयुक्ततावादी पद्धतीने पुन्हा विकसीत करत त्याला जनोपयोगी का बनवता येत नाही? केवळ होते आमच्याकडे असल्या भुलथापा विज्ञानात चालत नाहीत. पुरावे द्यावे लागतात. ज्यांचे पुरावे आजही जितेजागते आहेत त्यांना मात्र समाजव्यवस्थेत तळागाळात दाबले गेले आहे. सन्मान ना भुतकाळात दिला ना आज देत आहेत. वांझ वर्चस्वतावाद हा विघातक आहे....अकारण निर्माण केला गेलेला हीनगंडही तेवढाच विनाशकारी सिद्ध झाला आहे.

८) भारतीयीकरण म्हणजे वैदिकीकरण नाही. तसे करायचा प्रयत्न होतो आणि जोवर होत राहील तोवर मी त्याला खंदा विरोध करणारा एक पाईक असेल. फेकाफेकीतून विकृती निर्माण होते...ज्ञान नव्हे याचे भान असले पाहिजे.

72 comments:

  1. आपण आंग्ल शिक्षणाची नकल करत असल्यामुळे आपली कुठलेही शिक्षण संस्थान पहिल्या २०० येत नाही. आपली ओळख आपल्या ज्ञानाने होईल तर निश्चित आपले शिक्षण संस्थान पहिल्या १०० ही येतील. आपले पूर्वज मूर्ख होते. असे नाही. आपले जुने ज्ञान आणि अधिनिक ज्ञान जो पर्यंत यांचे मिश्रण होत नाही आपण पुढे जाऊ शकत नाही. झाडाची फांदी झाडापासून वेगळी केल्याने प्रगती होऊ शकत नाही. (आपण गेल्या ७० वर्षांपासून तेच करत आलो आहेत). डोळ्यांवरचा चष्मा बदल एवढेच म्हणेल.

    ReplyDelete
  2. आप्पा- अरे बाप्पा , संजय म्हणतोय की आपल्याकडे शिक्षण व्यवस्था नव्हती .
    बाप्पा - असे कसे काय ? गुरु द्रोणाचार्य ? ते गुरु होते म्हणजे काहीतरी शिकवत होते . श्रीराम गुरु वशिष्ठांकडे शिकला , श्रीकृष्ण गुरु सांदिपनीकडे शिकला .
    आप्पा - दुष्ट असो सुष्ट असो , दुर्योधन असो किंवा धर्म अर्जुन असोत , ते गुरुगृहीच शिकले ! पण मग संजय असे कसे म्हणतो की " भारतात मूळात शिक्षण व्यवस्थाच नव्हती ?
    म्हणजे भारत देश त्याच्या मते कधीपासून भारत म्हणवायचा ?
    बाप्पा - कालचे जाउद्या हो ! आज आपल्याकडे आय आय टी , आय आय एम सारखी संस्थाने आहेत ज्यातून आपण जगास मनुष्यबळ पुरवत असतो ,होमी भाभा, जे आर डी टाटा , आणि विक्रम साराभाई अशा अनेक सुजाण माणसांनी भारताला लागणारे उच्च मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी प्रचंड पुढाकार घेतला आहे . त्यांचे आपणावर अनंत उपकार आहेत . नाहीतर आजही आपण श्री यंत्र आणि लक्ष्मी यंत्र अशा रांगोळी प्रकारास यंत्र म्हणून पूजा अर्चा करत बसलो असतो । एकप्रकारे टाटा आणि बिर्ला यांच्या मानासिकातेतूनच दोन वेगळी भारताची रूपे दिसतात . एक बिर्ला मंदिरे बांधतात आणि दुसरे अत्यल्प पारशी समाजातील असूनही देशाला आधुनिकतेकडे नेण्याच्या योजना आखतात !
    आप्पा - आज भाजप तर्फे त्यात ढवळाढवळ चालू आहे , आणि वैदिक ज्ञानाचा (?) आग्रह धरणे म्हणजे अत्यंत मूर्खपणा आहे .या सरकारला झाले आहे तरी काय ? आधुनिक शिक्षण म्हणजे काय हे तरी कमीतकमी आपणास माहित पाहिजे . जर आपण एन डी ए मधील अभ्यास क्रमात यज्ञ मंत्र शिकवण्याचा अट्टाहास धरला तर आपले भविष्य किती काळेकुट्ट असेल ?
    बाप्पा - आपल्याकडे कोरीवकाम , शिल्पकाम याबाबत परंपरा होती , पिढीजात शिक्षण मिळत असे जातीनिहाय कुटुंब प्रमुखां कडून घरातच प्राथमिक कौशल्य आणि कसब याचे बाळकडू दिले जात असणार - पण आपण परंपरेपासून दूर जाउन वैज्ञानिक पुनरुथ्थान घडवून आणू शकलो नाही .
    आप्पा - कारण ?
    बाप्पा - कारण आपल्याकडे समस्याच निर्माण झाल्या नाहीत ! ख्रिश्चन धर्मात संघटीत प्रार्थनेसाठी सुरक्षित आसरा निर्माण करताना चर्चेस बांधताना अनेक प्रयोग झाले . रोमन साम्राज्याच्या अस्ता नंतरही त्यातून संपन्न वास्तुशास्त्र विकसित झाले . आपल्याकडे निवृत्तीचा पाया असलेले धर्म तत्वज्ञान कसा काय सांस्कृतिक पुनरुथ्थानाचा आदर्श निर्माण करणार ?
    आप्पा - खांब विरहित मोठमोठी सभागृहे बांधताना त्याना कमानी आणि घुमटाचा वापर करण्याचे तंत्र ज्ञान विकसित करता आले . आपल्याकडे गाडी हेमाडपंती बाळबोधपणा सोडूच शकली नाही . कलाकुसर म्हणजे स्थापत्य नव्हे . वेरुळचे कैलास लेणे हे शेवटी लेणेच आहे ! निव्वळ एक कोरीवकाम !
    बाप्पा - संजय सर म्हणतात तसे आपल्याकडे अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांचा घोळ घातला गेला आहे . जुने ते सोने , नव्हे जुने तेच सोने हा भारतीय मानसिकतेचा दुर्गुण आपणास भोवतो आहे .
    आप्पा - ज्यांनी इतरांचे बोट हातात घेऊन त्याना नवा रस्ता दाखवायचा त्यांनीच हा आळस केला का ? नेमके काय चुकत गेले रे बाप्पा ? आपण सरसकट द्विजांवर शरसंधान करत त्याना जबाबदार धरत असतो नाही का ? आज शिक्षण सम्राट काय दिवे लावताहेत ?
    बाप्पा - दोष सर्व समाजाचाच आणि सर्व सत्तांचा आहे !
    आप्पा - द्विज जाणतात तेच ज्ञान आणि तो अधिकार स्वतःकडे राखून ठेवण्याचे महापाप द्विजांनी केले हा त्यांचा अक्षम्य गुन्हा !त्यामुळे आपल्या सुताराला नवीन बैलगाडी बनवावीशी वाटलीच नाही . आजही हजारो वर्षांचे जुने बैलगाडीचे मॉडेल खेडोपाडी दिसते ते कशामुळे ?
    बाप्पा -द्वीजानी काही असे म्हटले नाही की जुन्या उपकरणात काहीही सुधारणा करण्यास शास्त्र संमती देत नाही .मग हा आळशीपणा कसा समाजात मुरात गेला ? हे एक कोडेच आहे .
    आप्पा - संजय तुला काय वाटते ? आपल्याकडे शिक्षण हा समाजाला ओरबडायचा धंदा झाला आहे का ? राजकीय व्यक्तीना सहकाराच्या कुरणा नंतर हे नवे कुरण मिळाले आहे . शरद पवार , आणि इतर शिक्षण सम्राट हे आपली दुकानदारी कशी चालवतात ते जगजाहीर आहे . इन्स्पेक्शनच्या दिवशी जर मेडिकल कॉलेजात भाडोत्री पांढरे डगले घालून कोणालाही उभे केले जात असेल तर त्या देशाची स्थिती दयनीयच असणार ! ते पहिल्या १०० क्रमांकात कसे येणार ? त्यांनाच ते स्वप्न पडत नाही ! ते त्यांचे ध्येयच नाही ! भाजप देशातल्या अप्रतिम अशा आय आय टी आणि
    आय आय एम अशा संस्थाना सुरुंग लावू बघत आहे .येणारा काळ अशा राज्यकर्त्याना कधीही क्षमा करणार नाही .
    बाप्पा - संघ परिवाराचा शिक्षणात ढवळा ढवळ केल्याबद्दल धिःकार असो !स्मृती इराणी चा धिःकार असो !

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. This comment has been removed by the author.

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. चर्चित मसलों के नीचे संघ की विचारधारा से जुड़े लोगों को पदों पर चुपचाप भरा जा रहा है. इसका उद्देश्य एक लंबे समय में ऐसे तंत्र की स्थापना है, जो संघ की विचारधारा के अनुकूल हो. भगवाकरण के साथ समस्या यह है कि इसकी दृष्टि बहुत ही संकुचित है और भारत की विविधता के उत्सव से बिल्कुल अलग है.

    जैसे-जैसे संस्थाओं को भगवा रंग में रंगने की प्रक्रिया आगे बढ़ेगी, यह संकीर्ण विचारधारा क्षमता को दबाती जायेगी तथा संवाद और असहमति की जगह सिकुड़ती जायेगी.

    दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के बाहुल्य के अनुरूप ही भारतीय राजनीति में ऐसे-ऐसे शब्द सामने आते हैं, जो किसी भी भाषा के शब्दकोश में नहीं पाये जाते हैं. ऐसा ही एक शब्द ‘सैफ्रनाइजेशन’ यानी भगवाकरण है.

    किसी विदेशी पर्यवेक्षक के लिए इस कामचलाऊ शब्द में समाहित अर्थ-भंडार को समझा पाना बहुत कठिन होगा. लेकिन भारत में इसके समर्थकों और विरोधियों को इसका साफ मतलब पता है.

    भगवा भारतीय जनता पार्टी-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा व्यापक संघ परिवार की पहचान का रंग है.

    भगवाकरण संघ परिवार की विचारधारा के अनुरूप कुछ विशेष गल्पों और संस्थाओं का सुनियोजित और सायास प्रचार-प्रसार है. इस प्रयास में भगवाकरण के कार्यक्रम की स्पष्ट प्राथमिकताएं हैं. चुनाव और अर्थव्यवस्था से जुड़े राजनीतिक शोर-शराबे से परे संघ के रणनीतिकार चुपचाप तीन महत्वपूर्ण क्षेत्रों का रुख मोड़ने में लगे रहते हैं : संस्कृति और सांस्कृतिक तंत्र; बौद्धिक विमर्श, विशेषकर इतिहास की समझ; और नौकरशाही में, खासकर मध्यम और निचले स्तर पर, अपने लोगों को भरना.

    भाजपा के सत्ता में आने के शुरुआती कुछ महीने में चुप्पी बनी हुई थी, जैसा कि तूफान से पहले का ठहराव.

    ReplyDelete
  8. इस वर्ष जनवरी में हमले का निशाना बननेवाला पहला संस्थान सेंसर बोर्ड था. सूचना एवं प्रसारण मंत्रलय द्वारा हस्तक्षेप और दबाव करने तथा उसके द्वारा नियुक्त पैनल के सदस्यों के भ्रष्टाचार की शिकायत करते हुए तत्कालीन अध्यक्ष लीला सैमसन ने इस्तीफा दे दिया था. इसके बाद नये सदस्यों के साथ फिल्म निर्माता पहलाज निहलानी को अध्यक्ष बनाया गया. कुछ ही दिनों के भीतर बोर्ड द्वारा समर्थित नैतिक पहरेदारी के नये मानदंडों का फिल्म जगत ने विरोध करना शुरू कर दिया. आधुनिक समझदारियों और यथार्थवादी सिनेमाई चित्रण से बिल्कुल अलहदा सोच के तहत नये बोर्ड ने वह नैतिकता थोपने की कोशिश की, जो संघ परिवार की वैचारिकी पर सीधे आधारित थी.

    संघ के लंपट समूहों की हरकतों में इस नैतिकता की अभिव्यक्ति देखी जाती है, जो सार्वजनिक जगहों पर प्रेमियों पर हमले करते हैं, जो बताते हैं कि महिलाओं को क्या पहनना चाहिए, जो यह तय करते हैं कि बच्चों को कौन-सा धार्मिक ग्रंथ पढ़ना चाहिए और लोगों को क्या पढ़ना, देखना या खाना चाहिए. आमिर खान, दीपिका पादुकोण, शबाना आजमी और विद्या बालन जैसी अनेक प्रमुख फिल्मी हस्तियों को मजबूरन सूचना एवं प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन राठौड़ से अपील करनी पड़ी, लेकिन इसका कोई असर नहीं हुआ.

    दृश्य कला की सर्वोच्च संस्था ललित कला अकादमी निशाना बननेवाली अगली संस्था थी. इसके लब्धप्रतिष्ठ अध्यक्ष डॉ कल्याण चक्रवर्ती को पद से बर्खास्त कर दिया गया. हार्वर्ड विश्वविद्यालय से डॉक्टरेट चक्रवर्ती कला प्रशासक के रूप में बहुत अनुभवी हैं. उनके स्थान पर एक ‘अनजान’, पर ‘भरोसेमंद’ नौकरशाह बैठा दिया गया है, जिसे अकादमी के जेनरल कौंसिल, एक्जीक्यूटिव बोर्ड और फाइनेंस कमिटी के सारे अधिकार अगले तीन वर्षो तक के लिए दे दिये गये हैं. इसके बाद राष्ट्रीय संग्रहालय की बारी थी. सुस्त पड़े संग्रहालय में नयी ऊर्जा और क्षमता लानेवाले प्रशासनिक अधिकारी आर वेणु को अचानक स्थानांतरित कर दिया.

    वेणु की नियुक्ति पिछली सरकार के दौरान हुई थी. यहां भी संस्कृति मंत्रलय के एक अनुभवहीन अधिकारी को उनकी जगह रखा गया है. इसी तरह प्रतिष्ठित शिल्प संग्रहालय की जगह शिल्प अकादमी स्थापित करने का विचारहीन प्रस्ताव लाया गया है. इन घटनाओं से चिंतित 131 जानेमाने कलाकारों, लेखकों और बुद्धिजीवियों ने एक विरोध-पत्र जारी किया. इनमें गुलजार, रोमिला थापर, अशोक वाजपेयी, कृष्णा सोबती, केदारनाथ सिंह, अदिति मंगलदास, ज्योतिंद्र जैन, ओपी जैन, अतुल एवं अंजू डोडिया, मृणालिनी और मल्लिका साराभाई, संजना कपूर तथा अर्पिता एवं परमजीत सिंह आदि शामिल थे.

    ReplyDelete
  9. इस पत्र में स्पष्ट कहा गया था : ‘अगर ये निर्णय किसी नीतिगत दिशा की ओर संकेत करते हैं, तो यह बहुत चिंताजनक है कि हमारे राष्ट्रीय संस्थाओं की स्वायत्तता, दक्षता और प्रतिष्ठा पर औसत समझ, नौकरशाही मानसिकता तथा संकुचित सांस्कृतिक दृष्टि का हमला हो रहा है.

    हम इस रुझान की कड़े शब्दों में निंदा करते हैं तथा देश के रचनाशील और विचारवान समुदाय से भ्रमित और असंवेदनशील सरकार द्वारा सार्वजनिक सांस्कृतिक जीवन में इस बुद्धिहीन हस्तक्षेप का विरोध करने का आह्वान करते हैं.’

    प्राचीन भारत ने सही मायनों में महत्वपूर्ण उपलब्धियां हासिल की थीं, जिनका रेखांकन और अध्ययन किया जाना चाहिए. लेकिन संघ के अनेक विचारक मानते हैं कि इतना काफी नहीं है.

    उनके विचार में, प्राचीन भारत का इस हद तक गुणगान किया जाना चाहिए कि तार्किक मूल्यांकन और अतिवादी अतिश्योक्ति के बीच के सारे संतुलन ही बिगड़ जायें. पौराणिकता को तथ्य के साथ और कल्पना को विज्ञान के साथ मिलाया जाता है. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े इतिहासकार हमें यह विश्वास दिलाना चाहते हैं कि प्राचीन काल में भारत के पास ऐसे विमान थे, जो महादेशों की यात्रा करते थे और गणोश की उत्कृष्ट प्लास्टिक सजर्री हुई थी, जबकि कुंती आज के कृत्रिम गर्भाधान प्रक्रिया का पहला उदाहरण थी.

    इन ‘उपलब्धियों’ की तुलना में पिछली सहस्त्रब्दी में पनपी गंगा-जमुनी तहजीब एक अवांछनीय पतनशीलता थी. इतिहास की ऐसी समझ प्राचीन भारत की वैध उपलब्धियों को मूल्यहीन बनाती है, और हमारे सभ्यतागत मूल्यों का विकृत और उन्मादी दृष्टिकोण प्रस्तुत करती है.

    पर, इस सरकार द्वारा वाइएस राव जैसे एक अपरिचित इतिहासकार को पुनर्गठित भारतीय इतिहास अनुसंधान परिषद् का अध्यक्ष बनाने जैसे अनेक संकेत हैं कि इतिहास की विकृत और विभाजनकारी समझ को स्थापित करने की कोशिश होगी. रिपोर्टो के अनुसार, वाइएस राव और परिषद् के अन्य नये सदस्य संघ की अखिल भारतीय इतिहास आंदोलन योजना से जुड़े हुए हैं.

    नौकरशाही भगवाकरण की एक आसान शिकार है. चर्चित मसलों के नीचे संघ की विचारधारा से जुड़े लोगों को पदों पर चुपचाप और लगातार भरा जा रहा है. मंत्रियों के सहयोगियों की निष्ठा की भी जांच की जा रही है. इसका उद्देश्य एक लंबे समय में ऐसी अफसरशाही के तंत्र की स्थापना है, जो संघ की विचारधारा के अनुकूल हो.

    भगवाकरण के साथ समस्या यह है कि इसकी दृष्टि बहुत ही संकुचित है और भारत की विविधता के उत्सव से बिल्कुल अलग-थलग है.

    जैसे-जैसे संस्थाओं को भगवा रंग में रंगने की प्रक्रिया आगे बढ़ेगी, यह संकीर्ण विचारधारा क्षमता को दबाती जायेगी तथा संवाद और असहमति की जगह सिकुड़ती जायेगी. यह प्रक्रिया सुर्खियां बनते राजनीतिक आरोप-प्रत्यारोपों से कहीं बहुत अधिक घातक और खतरनाक है.

    ReplyDelete
  10. अहो पाटसकर बुवा ,
    तुम्ही तर आमच्याच भागातले . पुण्यातल्या शनिवार पेठेतले ? कन्याशाळे जवळचे बरोबर ? तुम्ही अतिशय मौलिक विचार मांडले आहेत , फक्त आपणास ब्लोग वर मराठी लिहिण्याची सवय नसावी . शुद्धलेखन थोडे सुधारले की झाले . आणि खर सांगायचे तर अप्पा बप्पा संघवाल्यांवर डाफरतात म्हणून तुम्ही रागावता का ? तुम्हीपण संघवाले आहात की काय ? अप्पाबप्पा यांचे विचार तितकेसे टाकाऊ नाहीत . त्यांचा रोष बहुतेक आरक्षणावर आहे असे वाटते . पण तसे पाहिले तर आज मागास वर्गीयात सुद्धा आरक्षणाचे पिढ्यान पिढ्या फायदे उठवून एक आरक्षित आर्थिक निकोप समाज वाढीस लागला आहे .हि चांगली बाब आहे !
    मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे . पूर्वी ब्राह्मण वर्गाने जसे शासकीय नोकरीत आपल्या मुलाबाळाना चिकटवून घेण्याचे धोरण ठेवले होते तसेच काहीसे , आज आरक्षित नोकरी असलेला मागास समाज त्या वर्तुळात आपल्याच बांधवाना सामावून घेण्यास तयार नाही . हे सत्य आहे . त्यामुळेच कदाचित आज सत्तरीला आलेला हा भारतदेश एका नवीनकटकट सोसत आहे . धनदांडगे मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत आहेत . त्यामुळे धनगर आणि तत्सम समाज आरक्षणा पासून वंचित रहात आहे .
    आरक्षणाचे फायदे उठवणारा मागास वर्ग कर्तव्य बुद्धीने हेच फायदे आपल्याच समाजातील इतर कुटुंबाना देण्या ऐवजी आपल्याच मुलाबाळांची वर्णी लावताना दिसतो , हा भ्रमनिरास करणारा भाग नाही का ? डॉ आंबेडकर याना असे अपेक्षित नक्कीच नव्हते - का असेच अपेक्षित होते ? इंग्रजी शिक्षण घेतलेला हा अंतर्बाह्य आपल्या मूळ समाजा पासून दूर गेला आहे. आणि यामुळे मूळ बाबासाहेबांच्या चळवळी चा पराभव झाला का असे म्हणावेसे वाटते .
    आणि त्याच वेळेस ब्राह्मण समाजाचे आरक्षणामुळे काहीच वाकडे झाले नाही हा मुद्दा अप्पा बप्पा अतिशय अचूकपणे सांगत असतात. जणू आरक्षणापासून वंचित ठेवल्याने ब्राह्मणवर्ग स्वयंभू झाला असे त्याना सांगायचे असेल !जे असेल ते असेल , दुसर्याला कोपरखळी मारत विषय खुलवून विचार मांडायची त्या जोडीची पद्धत मार्मिक आहे .
    पाटसकर साहेब
    आपणही सुंदर लिहिता यात संशय नाही पण वृथा सज्जनांवर टोलेबाजी करणे हे अशिक्षितपणाचे लक्षण आहे . असंस्कृतपणा असा वेशीवर टांगून आपण काय साधत आहात ?

    ReplyDelete
  11. पाटसकर यांचे लिखाण आणि लिहा वाचा यांचे हिंदीतील पत्र जर वाचले तर असे दिसते की पाटसकर हे अतिसामान्य विचार करणारे आहेत , त्यांचा मी आदरच करतो , पण त्याना हा अधिकार अजिबात नाही की त्यांनी वैयक्तिक टीका करत अप्पा बप्पा वर लिहावे . हा ब्लोग संजय सोनवणी यांचा आहे आणि त्याना कोणते लिखाण गाळावे हे नेमके समजते . ते हक्क आपणाकडे दिलेले नाहीत इतकी लोकशाहीची जाणीव श्री पाटसकर बाळगतील अशी आशा करू या . . त्यानंतर , लिहा वाचा , याबद्दल .
    त्यांनी यावेळेस हिंदी हे माध्यम निवडले आहे , त्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील असा त्यांचा समाज असावा . एक गोष्ट चांगली अशी झाली आहे की अनोनिमस लिखाण या ब्लोग वर रद्द झाले आहे ,त्यामुळे कोणीही काहीही टवाळ लिहिणे बंद झाले आहे .
    मूळ विचार असा आहे की संघ परिवार आणि भगवीकरण !
    हा फारच महत्वाचा मुद्दा आहे . भाजप सरकार जम्मू काश्मिरात पाकिस्तानचे कौतुक करणाऱ्या मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करत असून ,त्यावेळेस त्याना भगव्या विचाराचा विसर पडतो .
    आता दाउद इब्राहिमला त्यावेळेस भारतात आणता आले असते असल्या बावळट चर्चा करत मूळ सुषमा , राजे आणि ललित हा विषय मागे पडत आहे . ३७० vए कलम कसे रद्द केले पाहिजे हा विचार बळावत जावा म्हणून आम्ही गप्प बसत आहोत अशीही मखलाशी संघ परिवार करेल
    १९६५ आणि १९७१ या युद्धा नंतर आज काशीर परत युद्ध झाले तर पूर्वी सारखी भारताची साथ देईल का ? दिवसा ढवळ्या पाकिस्तान झिंदाबाद पुकारत पाकिस्तानी ध्वज श्रीनगर मध्ये फडकवला जात आहे . हे चांगल्या शासनाचे लक्षण नक्कीच नाही .
    भागाविकरण म्हणजे नेमके काय ?
    इतर सर्व विधायक सर्व समावेशक विचारांची मुस्कुटदाबी करत आम्ही हिंदू सर्व श्रेष्ठ हा विचार उघड समाजमनात बिंबविणे हा जहरी विचार समाजाचे काय भले करणार आहे तेच काळात नाही .
    कारण संजय सोनवणी म्हणतात तसे - हिंदू कोण ? जातींचे काय ? जातीविरहित समाजाची बांधणी करण्याचे व्रत संघाला झेपेल काय ?
    आज मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तर भारत , या भागात जो साधू आणि गोसावी लोकांचा धुमाकूळ चालू आहे त्यातून भारताची काय इमेज होणार आहे ?
    आज भाभा विक्रम साराभाई आणि टाटा यांच्या स्वप्नातील आधुनिक भारताचे काय होणार ? आय आय एम मध्ये सत्ता हातात घेण्याचा जो कात उघडकीस आला तो काय सांगतो ?स्मृती इराणी सारखी व्यक्ती कशीकाय आधुनिक भारताचा आत्मा रक्षण करणार ?
    शबाना आझमी बद्दल कुणीतरी लिहिले आहे , पण अशा टुकार समाज सुधाराकाना त्यांची जागा दाखवली पाहिजेच ! सेलिब्रिटीज कशा समाज सुधारणेवर बोलणार , त्याना कायम क्यामेऱ्यापुढे
    नाचायची सवय असते . त्यापेक्षा जावेद अख्तर जास्त सुनिश्चित विचाराने बोलतात . असो !
    पुन्हा एकदा , लिहा वाचा यांचे मनापासून अभिनंदन , आणि श्री पाटसकर याना प्रेमाचा सल्ला - असे चिखल फेकणे थांबवा , जर संजय सोनावणी समर्थ आहेत , तर तुम्ही तोंड बंद ठेवा आणि फुकटचे सल्ले देऊ नका !

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. आप्पा - अरे बाप्पा - आपल्यावर आरोप होतो आहे की आपण टोपण नावाने का लिहितो .
    बाप्पा - ही नावे घरगुती आहेत शहर - खेडे , जातपात यात अडकणारी नाहीत .
    आप्पा - त्याचा इतका अडथळा होत असेल कुणाला ? आपण काही अनोनिमस सारखे वागत काहीही बीभत्स लिहित नाही . केलीच चेष्टा तर फक्त संजयची , तेही प्रेमाने ! तो पण आपल्याला , "खवचट लिहिणारे " असा चिमटा काढतोच की .
    बाप्पा - मध्यंतरी अनेकांनी भयानक लिहिले आपल्या बद्दल . कुणी "बामनाची औलाद" म्हणाले तर कुणी "दीड शहाणे "असे म्हणाले . पण आपण आपली भूमिका बदलली नाही .
    आप्पा -आजही श्री पाटसकर यांची प्रतिक्रिया रद्द कुणी केली ? स्वतःश्री पाटसकर यांनी का संजयने ?म्हणजे कळतच नाही असे झाले आहे . श्री पाटसकर यांनी इतक्या पटापट प्रतिक्रिया दिल्या आहेत म्हणजे त्यांचा आपल्यावर राग आहे का ? आपला तो उद्देशच नाही . आपण चुकतो आहोत का ?
    बाप्पा - मूळ विषय आहे शिक्षणाचे भारतीयीकरण ! त्यातही भगवेकरण . आणि आपण विक्रम साराभाई , टाटा आणि होमी भाभा यांची भूमिका सांगितली . आधुनिकता म्हणजे काय ते सांगितले . यात काय चुकले ?
    आप्पा - संजयचे जे म्हणणे आहे की आपल्याकडे शिक्षण नव्हतेच , ते पटले नाही म्हणून आपण रामकृष्ण काळात गेलो . तिथून आय आय एम आणि आय आय टी पर्यंत कालानुसार शिक्षणात जे बदल झाले ते सांगितले .
    बाप्पा - आपण खरेतर संजयाच्या फेसबुक अकौंट वर लिहिले असते , पण तिथे त्याची भलावण करणारेच फार आहेत . ते पण आपल्याला पटत नाही . संजय सांगतो ते काही १०० % आदर्श नसते . पण फेसबुक वरही अशा आंधळ्या फोलोअर्स चा त्रास होईलच . म्हणून आपण फेसबुक टाळतो . पण इथेपण वैयक्तिक टवाळी होत असेल तर ?
    आप्पा - मन निराश होते . संघाचे हेच धोरण असते . त्यांच्याशी वाकड्यात जाणाऱ्या लोकाना ते हलकेच तांदळातल्या खड्या सारखे बाजूला टाकतात .
    बाप्पा - म्हणजे आपण तसले खडे आहोत तर ?
    आप्पा - ते संजय ठरवेल !
    बाप्पा - पासलकर बुवा , आमचा तुमच्यावर राग नाही ,आमचे हे मुक्त आत्मपरीक्षण समजा . संघात आत्म परीक्षण असते का हो ?

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. नमस्कार पाटसकर आणि आप्पा बाप्पा .
    बापाच्या ( वडिलांच्या )शब्दाखातर राज्य सोडणारा आदर्श कसा असू शकतो ? त्याचे राज्याप्रती काहीच दायित्व नाही का ? आज दशरथ म्हणाला , उद्या कौसल्या काहीतरी म्हणाली , असे जर राजपुत्राचे वर्तन असेल तर तो राज्य करण्यास नालायक आहे हेच सिद्ध होते . अशा लोकांची मंदिरे कशी होऊ शकतात ? अशा वक्ती पूजनीय आहेत का ?
    संपूर्ण रामायणात कायम स्त्रीचा अवमानाच झालेला दिसतो . - शुर्पणखेचा इतका अवमान करण्याची काहीच गरज नव्हती . एखाद्या स्त्रीचे नाक कान कापण्यात रामाला काय पुरुषार्थ वाटला ?खरे म्हणजे रावणाच्या हातून शुर्पनखेचा नवरा - रावणाचामेहुणा - विद्युतजीवा चुकून मारला गेला होता आणि ती रानावनात भटकत होती .तिने रामाच्या सौंदर्याचे कौतुक केले इतकेच
    पण रामाने सितेशिवाय मला कोणीही प्यारे नाही असे सांगितले
    परंतु ,
    रावणाकडे राहिली म्हणजे मलिन म्हणून सीतेचा त्याग केला हे म्हणजे पाप नाही का ?
    एका धोब्याने संशय घेतला म्हणून पत्नीचा त्याग करणे हा तिचा घोर अपमान आहे .
    आपल्या पत्नीची पुरती ओळख त्याला नव्हती का ?
    रामायणा सारखे फालतू लिखाण नाही . खरेतर राम हा विकृत वाटावा असेच वागत गेला आहे

    वाली सुग्रीव प्रकरणात त्याने काय नैतिकता ( एथिक्स ) दाखवली ? सीता आपली खाजगी मालमत्ता असल्या सारखाच राम वागत गेला आहे . बिभीषणाला बुद्धिभेद करून आणि लंकेच्या गादीचे आमिष दाखवून त्याने फोडले म्हणजे राम बरोबर वागला का ?सुग्रीवाची बाजू घेताना रामाने त्याचे सैन्यबळ वाढवण्यासाठी राजकारण केले त्यात कोणतेही एथिक्स नाही .
    आजच्या काळात दशरथाला खडसावून प्रत्युत्तर करणारा राम हवा आहे .आज वसुंधरा राजे आणि सुषमा स्वराज काय वागत आहेत ? हीच संघाची शिकवण आहे का ?
    रामायण हे स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत अन्याय कारक वाटते . त्यामुळे राम हा देव असणेच शक्य नाही . त्याची पूजा करणे हा तर आपल्या आत्म्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे . ते एक चुकीचे उदाहरण समाजासमोर ठेवते .

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तरे विस्तृतपणे लिहित आहे.
      १)रामाने नुसती वडिलांची आज्ञा पाळली असे नाही तर सावत्र आईची आज्ञा पाळली हे महत्वाचे आहे, आणि एका स्त्रीमुळे रामायण घडले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
      २) राम लक्षमण आणि सीता हे सुट्टी घालवायला वनवासात गेले नव्हते.. तेथे पदोपदी धोका होता. त्यामुळे स्वताचे रक्षण हा मुद्दा सर्वात महत्वाचा होता. जो रावण आपल्या मेव्हण्याला ठार मारतो तो काय लायकीचा असेल?
      ३) शुर्पर्नाखा (राक्षसीण-नाही) भिल्लीण त्यावेळी नक्कीच एकटी नसणार, त्यावेळी रामाने/लाक्षमानाने तिला नकार दिल्यास तिने त्यांचे नाक कान कापण्याआधी रामाने/लाक्षमानाने तिचे कापले तर काय चुकले.
      ४) जिचा नवरा काही काळापूर्वी मेला आहे ती बाई लगेच रामाच्या सौंदर्याची स्तुती करू लागते म्हणजे ती बाई काय लायकीची असेल असे आपल्याला वाटते.
      ५) धोब्याचा आरोपाने सीतेला दूर करणे याची आजच्या राजकारण्यांशी आणि पर्यायाने त्यांना निवडून देणाऱ्या जनतेशी तुलनाच केलेली बरी,
      ६) हनुमान (म्हणजे वनमानवांची-एक प्रभावी टोळी असावी) सीतेला आणायला गेला तेव्हा तिने येण्यास नकार दिला. मग संहारक युद्ध झाले. त्याला जबाबदार राम कसा?
      ७) युद्धातील एथिक्स अतिरेक केल्याने आपल्या देशातील अनेक राजे मोठी मोठी युद्धे हरले. पानिपत हे त्यातलेच एक उदाहरण. युद्धाचे एथिक्स हा एक वेगळा विषय आहे. त्याचा सामान्य जीवनातील (सिव्हिल लाईफ) शी घोळ घालण्याची गल्लत करू नये..

      Delete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  23. भारतात इंग्रज येण्यापुर्वी अथवा त्यांनी मेकालेप्रणित शिक्षणपद्धती अस्तित्वात आणन्यापुर्वी भारतात शिक्षणपद्धती कशा प्रकारची होती हेही आपल्याला समजावून घ्यायला हवे. भारतात संस्कृत, पर्शियन व अरेबिक भाषांतून शिक्षण देनारी महाविद्यालये व विद्यालये होती. यांची संख्या अर्थातच अत्यल्प अशी होती. या महाविद्यालयांतील शिक्षण हे बव्हंशी धार्मिक व पारंपारिक असे. या तीनही भाषांमधील ज्ञान हे अत्यंत प्राथमिक दर्जाचे आणि समकालीन विचारप्रवाहांना सामावून घेणारे अथवा त्याला पुढे नेणारे नव्हते. त्यामुळे शेकडो वर्ष जुने ज्ञान हेच काय ती येथील उपलब्धी होती. कलकत्ता, बनारससारख्या मोठ्या श्हरांतच ही अत्यल्पसंख्य महाविद्यालये होती. संस्कृतच्या पाठशाळही अशाच अत्यल्प होत्या.

    येथील शिक्षणपद्धती ही मुळातच पाठांतराधारित होती. व्यावहारिक उपयुक्ततेपेक्षा धार्मिक कार्य करण्यास उपयुक्त अशा पुरोहितांची, पुराणपंडितांची अथवा ज्योतिष-न्यायशास्त्र्यांची निर्मिती करणे हाच काय तो त्यांचा प्रधान उद्देश्य होता. तेवढ्यापुरती ही महाविद्यालये यशस्वी होत होती हे मान्य केलेच पाहिजे. परंतू त्याच वेळेस हेही लक्षात घेतले पाहिजे कि अठराव्या शतकात या पदवीधरांना सामावून घेईल, म्हणजेच यथायोग्य रोजगार देईल अशी मात्र स्थिती नव्हती. १८२३ मद्धेच राजा राममोहन राय यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून ही महाविद्यालये पुर्णपणे बंद करून सरसकट आधुनिक इंग्रजी शिक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. १८३५ मद्ध्ये अशाच संस्कृत पाठशालेच्या विद्यार्थ्यांनी मेकालेची भेट घेवून बेरोजगारीचीच व्यथा मांडली होती.

    या पाठशाला अथवा मदरसे भारताला नवीन नव्हते. शेकडो वर्ष त्या सुरुच होत्या. परंतू त्या का सुरू ठेवायच्या, त्यात काय बदल घडवायचे याची मात्र कोनत्याही धुरीणाने पर्वा केली नाही. याचे कारण म्हणजे मुस्लिम जेवढे परंपराप्रिय व कर्मठ होते तेवढेच वा त्यापेक्षा अधिक वैदिकधर्मीय कर्मठ होते. जुन्या ग्रंथांतील ज्ञान हे दैवी असून त्यात कसलाही फेरफर करण्याचा आपल्याला हक्क नाही ही समजूत दोन्ही प्रकारच्या शिक्षणपद्धतींत एवढी रुजलेली होती कि त्यापारचा विचार करण्याचा विचारही कोणी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे इंग्रज आल्यानंतर अपरिहार्य म्हणुन अनेक जण इंग्रजीही शिकले असले तरी त्याचा उपयोग रोजगारासाठी करणे एवढाच उद्देश्य राहिला. शिक्षण हे ज्ञानाच्या वर्धनासाठी व त्याचा एकजीव सुसंस्कृत व सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी असते हे कोणेही लक्षात घेतले नाही.

    ReplyDelete
  24. पण हे झाले महाविद्यालयांचे. त्यांची संख्या अत्यल्पच होती. पण मग प्राथमिक शिक्षण भारतात उपलब्ध होते कि नव्हते? ते फक्त वैदिकजनांसाठीच होते कि अन्य समाजांसाठीही होते? आजवर असा प्रचार केला गेला आहे कि वैदिकजन वगळता अन्य समाजांना शिक्षणाचा अधिकार नव्हता व ते शिक्षणापासून वंचित होते. पण ते खरे नाही. अर्थात येथे शिक्षण या शब्दाचा अर्थ लिखान-वाचन एवढ्यापुरताच मर्यादित आहे. शिक्षण म्हणजे नेमके काय हे भारतियांना अद्यापही कळालेले नाही तर तेंव्हा काय कळणार? असो.

    ब्रिटिश राज्य येण्यापुर्वी भारतात, विशेषत: ग्रामीण भारतात नेमकी कशी शिक्षण पद्धती होती याबाबत आपल्या लोकांनी लिहून ठेवलेले नाही. परंतू माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने पेशवाई खालसा केल्यानंतर लगेच १८१८ मद्धेच एक अहवाल तयार केला. त्या अहवालात म्हटले आहे कि पेशवाईच्या काळात अनेक गांवांत-खेड्यांत प्राथमिक शाळा होत्या आणि ज्या कौशल्यांची सामान्य पातळीवरील प्रत्यक्ष जीवन व्यवहारात आवश्यकता होती ती कौशल्ये शिकण्यासाठी विद्यार्थी शाळेत जात.

    याच प्रकारे इंग्रजांनी वेगवेगळ्या जिल्यांतील अधिका-यांकडुन १८२० ते १८३० या काळात शिक्षणाची व्यवस्था व परिस्थिती विषद करणारे अहवाल मागवले. त्यावरून दिसते कि;

    १. जवळपास सर्वच गांवांत प्राथमिक शाळा होत्या.
    २. या शाळांचा खर्च काही व्यक्ती करत असत. संपुर्ण गांव नव्हे. कसलीही शासकीय मदत या शाळांना मिळत नसे.
    ३. या शाळा एक-शिक्षकी असून विद्यार्थ्यांची संख्या १५ ते ३५ एवढी असे.
    ४. हे शिक्षक ब्राह्मण, प्रभू, भंडारी, कुणबी, वाणी, शिंपी या जातीतून येत.
    ५. शिक्षकाला दरमहा चर ते सहा रुपये नगदी अथवा वस्तूरुपात मिळत. यातील नगदी पैसे व वस्तू विद्यार्थ्यांच्या पालकांनी थोड्याथोड्या प्रमाणात दिलेली असत. (दोन आणे ते एक रुपया, ऐपतीप्रमाणे.)
    ६. दलित व स्त्रीया वगळता सर्व जातीतील विद्यार्थ्यांचा यात भरणा असे. (गुजराथेतील अहमदाबाद जिल्ह्याच्या अहवालानुसार एकुण २७०० विद्यार्थ्यांपैकी ११०० बनिया व ४०० ब्राह्मण होते.)

    या व्यतिरिक्त हत्यारे चालवण्याचे शिक्षण, धार्मिक शिक्षण मल्लविद्या यांचेही शिक्षण स्वतंत्रपणे आपापल्या आवडीनुसर घेतले जात असे. ऐपत असनारे स्त्रीया-मुलांसाठी घरगुती शिक्षकाची सोय करत असत. ("अपूर्ण क्रांती" रा. भा. पाटणकर (पृष्ठ १२०-१२१)

    यावरुन सिद्ध होणारी बाब म्हणजे शिक्षणव्यवस्था प्राथमिक स्वरुपातील का होईना सार्वत्रीक होती. शिकू इच्छिणा-या सर्वांनाच या शाळांत प्रवेश होता. शिक्षक हे ब्राह्मणच असत असेही नाही. या शाळांत जे शिक्षण दिले जाई ते लिहिणे, वाचणे, पत्रव्यवहार, व्यावहारीक गणित अशा स्वरुपाचे असे. मुले व्यावसायिक शिक्षण आपापल्या घरीच पालकांकडुन घेत असत. संस्कृत पाठशाळा मात्र फक्त ब्राह्मणांसाठीच असत.

    येथे महत्वाचा हा मुद्दा येतो तो हा कि सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध नव्हते हा दावा जर खरा नाही तर, यात अधिक प्रगती साधावी असे येथील शासन व्यवस्था वा समाजनियंत्यांना का वाटले नाही? बरे ही वरील माहिती ही १८३० सालापर्यंतची असली तरी ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असली पाहिजे. ही परंपरा नसती तर अवैदिक संतांची परंपरा भारतात सुरुही झाली नसती हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असे असले तरी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो हा कि प्राथमिक शिक्षण मिळाल्यानंतर का होईना अध्यात्मीक रचनांपुढे जात अन्य वैचारिक/सैद्धांतिक व व्यवसायमुलक लेखन का झाले नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधल्याखेरीज आम्ही आमचा वर्तमान स्वच्छपणे पाहू शकणार नाही.

    मार्च १८२४ मद्धे एल्फिस्टनने शिक्षणविभागाला सादर केलेल्या टिपणात प्रचलित शिक्षनपद्धती आपल्या (इंग्रजांच्या) ताब्यात घेत तिला आधुनिक स्वरुप देण्याची सुसंगत योजना मांडली व त्यानुसार भारतात रयत व शासन यांच्या संयुक्त सहभागातील शिक्षणपद्धती राबवण्यात आली. तोवर भारतात अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीचा विचारही झाला नव्हता. भारतातील ही शिक्षणपद्धती पाहिली म्हणजे शिक्षणाचे भारतीयीकरण हा शब्द किती फसवा आणि नुकसानकारक आहे हे आपल्या लक्षात येईल.

    ReplyDelete
  25. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  26. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  27. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  28. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  29. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  32. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  33. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  34. http://www.ckraju.net/books/Hindi-press-release.html

    ReplyDelete
  35. https://en.wikipedia.org/wiki/C._K._Raju

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. आप्पा - फिलीप जोन्सन या आर्किटेक्ट चे नरिमन पोइंट ला सुंदर नाट्यगृह आहे तिथे अजिबात कोणतेही उपकरण वापरले जात नाही . नैसर्गिक आवाजात ध्वनी आपल्या पर्यंत पोचतो .
    बाप्पा -आमचा एक नातेवाइक आहे त्याचा भारतीय माल वापरण्याचा अट्टाहास असतो .आपल्या पदरचा पैसा घालून तो हाताने लेख लिहून ते झेरोक्स करून सर्वाना वाटून भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतो .
    आप्पा - आम्ही त्याला सांगितले की असाच हा विचार ताणात गेला तर पहिली गोष्ट तुला वीज वापरणे बंद करावे लागेल कारण तो शोध पाश्च्यात्य आहे . अजून पुढे जाउन सायकल , शर्ट प्यांट , चष्मा , टेलिफोन मोबाईल ग्यास स्टेनलेस स्टील चे ताट , नळाचे पाणी सर्व परदेशी शोधातून आलेले आहे . त्याचा त्याग तुला जमणार आहे का ? तरी त्याचा हट्टीपणा जात नव्हता .
    बाप्पा - त्याला जेंव्हा सांगितले की तुझा जन्म झाला त्यावेळेस वापरलेली औषधे , उपकरणे आणि ज्ञान हे सर्व परकीय ज्ञानावर आधारीत होते तेंव्हा त्याला थोडेसे पटले की असे या जगात कप्पे आणि तुकडे करून जगणे अशक्य आहे . तरी त्याचे भगवे ज्ञान तो सोडायला तयार नसतो .
    आप्पा - परकीयांनी आपल्याला अपग्रेड केले त्याचे कारण , त्यांच्या मालाला आणि नाव तंत्रज्ञानाला उठाव हवा ना ? आज ग्रीस का बुडू द्यायचा नाही ? तर युरोपीय समुहाचे मार्केट जाइल म्हणून . इतकाच त्याचा अर्थ आहे . सर्व देश एकमेकांवर अवलंबून असतात . अगदी सिंधू काळा पासून !
    बाप्पा - अरे थांब थांब , एकदम तिकडे सरकू नकोस . लगेच संजय धावत येईल .तो बघ तो आलाच . तो बघ काय म्हणतोय . माझे घाग्गर वरचे पुस्तक वाचा . मी हे सर्व त्यात लिहिलेच आहे !
    आप्पा - संजयाने फिरती लायब्ररी केली आहे . आठवड्याला पुस्तक बदलायचे . मोफत फिरती लायब्ररी . तरीही कोणी येत नाहीत . कारण तो सर्व वाचकाना प्रश्न विचारतो . आणि कुणालाच उत्तर देता येत नाही .
    बाप्पा - संजय तू फिरते वाचनालय सुरु कर , त्यात सर्व पुस्तके ठेव , बाबुराव अर्नाळकर , या दि फडके , पु ल देशपांडे , सुहास शिरवळकर , ह मो मराठे , संजय सोनवणी ,जयवंत दळवी , आणि बघ . तुझ्या आणि ह्मो च्या शिवाय सर्वांच्या पुस्तकाना उठाव असेल .
    आप्पा - लागली पैज ?
    बाप्पा - लागली !

    ReplyDelete
  38. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  39. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  40. अहो पाटसकर बुवा , तुम्ही ? त्या काळात जखम भरायला गायीचे साजूक तूप वापरत , किल्ल्यावर तुपाचा साठा असे . म्हणून आज काय तस्साच साठा शनिवारवाड्यात केला पाहिजे असे तुमचे म्हणणे का ?
    गायीचे मांस किती सुंदर चवीचे असते . तुम्ही जग फिरून आला आहात . तुम्हाला माहीतच असेल . आम्हाला तर त्याशिवाय जेवणच जात नाही . या भगव्या लोकांनी त्यावर पण बंदी आणली आहे . मूर्ख लेकाचे !
    गाय जोपासून निरोगी गाय कापणे आणि तिचे मांस विकणे हा उत्तम व्यवसाय आहे त्यात धर्माचे काय काम आहे?आपलेऋषीमुनी यज्ञात मांसाहार करत असत (संजयला विचारा ) तुम्हाला मातीचा गंध घेतलात तर कळेल , की या दंडकारण्यात असंख्य यज्ञात ऋषीमुनींनी मांस भक्षण आणि सोमरस प्राशन केले होते , आला का तो गंध ?अहो जर सर्व शाकाहारी झाले तर तुम्हाला खायला अन्न मिळणार नाही .
    नुसते काव्यमय बोलून पोट भरत नसते .
    शिवाजी महाराजांनी तरी काय केले हो ? आज जे राजकीय नेते करत आहेत तेच केले . धर्माच्या नावाखाली लोक जमवले . त्याना बोलून भुरळ घातली , जमिनी आणि किल्ले जिंकले . स्वतः राजेपद भोगले आणि पुढच्या पिढ्यानी पेशवेपद ब्राह्मणांच्या पिढ्यांना वंशपरंपरा बहाल केले आणि शाहू महाराज हुक्का पीत बसले , असले हे शिवाजीचे घराणे .
    शिवाजीने प्रत्यक्ष स्वतः लढाई कधी केली ? तो आमच्या मते एकदाच जखमी झाला , ते सुद्धा ब्राह्मणाने हल्ला केल , अफझलखान वधाच्या वेळी . असे हे ब्राह्मण !
    नुसते काव्यमय लिहून लोकाना आपलेसे करण्याचे दिवस संपले आहेत . देव वगैरे कल्पना या द्विजांनी पोटे भरण्यासाठी निर्माण केल्या . देव वगैरे काहीही जगात नाही . सोमनाथाचा शंकर किंवा काशीचा विश्वेश्वर कधीही स्वसंरक्षण करू शकले नाहीत .विश्व प्रलय करू शकणारा स्वतचे पावित्र्य राखू शकला नाही . वेदामध्ये मूर्तीपूजा , मुर्तीस्नान , नैवेद्य, नाही , आपण मूर्तीपूजेला कसे मानता ? आपण वैदिक आहात का नाही ?
    तुमचा अभ्यास इतका तोकडा , तुमच्या अर्ध्या चड्डी सारखा आहे की तुम्ही जरा कमी बोलणे जास्त योग्य ठरेल किंवा आपण आपल्या इतिहासाचा अभ्यास करा . सगळा गोलमाल आहे . आपली पुराणे तर स्वप्नरंजन करणारी आहेत .
    रामाचा जन्म मारुती जन्म , पायस , वगैरे थोतांड आहेत का आपण ते सत्य मानता ?
    कानिफनाथ हे कानातून जन्माला आले ? कुणी म्हणे घामातून जन्माला आले ? आपल्या पुराणात काहीही सांगितले जाते आणि पुराणिक बुवा आपले पोट भरत असतात . त्याना लाजही वाटत नाही . ३०० वर्षापूर्वी लोक जन्माला नक्कीच येत , वर्षाला पाळणा हलत असे , स्त्रीयांना मत नव्हते . १०-१२ पैकी एखादे जगत असे . कसा आपला देश आधुनिक होणार ?पुराणिक आणि प्रवचनकार यांच्याबद्दल काय सांगावे . ? त्यांची नैतिकता झाकली मूठच ठेवलेली बरी !आज अंधश्रद्धेच्या लढ्यात एखादा ब्राह्मण असतो पण , बहुसंख्य ब्राह्मण पुरोहित द्विज शंकराच्या पिंडीला कोंडून पाउस पडेल असे सांगणारे असतात -सत्य आहे ?. ब्राह्मण वर्गाने अंध श्रद्धांचे पोषण केले , त्यांनीच खरेतर मनुस्मृती जाळायला हवी होती , तसे का नाही घडले ?
    नुसते अप्पा बप्पा यांच्या प्रत्येक वाक्याला चालेंज देत सुटण्यात काहीही पुरुषार्थ नाही . स्वतःची घोर फसवणूक आहे . ३ पिढ्यांचे श्रम केल्यावर शिवाजीला स्वतःची जहागीर करता आली . त्यासाठी असंख्य मावळ्यांचे प्राण गेले . पण , शाहू महाराजाना त्याची काहीही लाज नाही . हे जसे सत्य आहे तसेच ब्राह्मणांच्या पंक्तीवर पंक्ती उठवण्यात रयतेचे हजारो पैसे उधळण्यात धन्यता मानणाऱ्या पेशव्यांनी तरी काय केले ?आपली पेशवाई सुरक्षित रहावी म्हणून शिंदे होळकर गायकवाड असा पट्टा निर्माण करून पुण्यात कलावंतिणी नाचवल्या !ब्राह्मण भोजने घातली !

    कोणत्याही जातीच्या धर्माच्या वर्गाने कितीही हुशारी दाखवली तरी इंग्रज राज्य येणारच होते . हे नक्की होते , फक्त , कधी हे ठरायचे होते . इंग्रज राज्य आले आणि आधुनिकतेचा सूर्य भारतावर उगवला . मराठा राज्य लयास गेले मुघल राज्य लयास गेले ,हि जणू तुमच्या भाषेत ईश्वरी रचना होती , नाहीतर आपण आजही आफ्रिकन देशांप्रमाणे राहिलो असतो .
    इंग्रज आले नव विचार आला . नवीन कल्पना आल्या . १८५७ चे बंड हा मूर्खपणा होता . झाशीला वारस राज्य दिले असते तर तिने उठाव केला असता का ? तीच कथा सर्व संस्थानांची होती .

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. उदाहरणार्थ संत तुकाराम कसे मेले हे मला माहित नाही. पण ते सदेह वैकुंठी गेले हे मात्र त्यांच्या मृत्यू नंतर २०० वर्षाने पसरायला सुरुवात झाली असे माझे ठाम मत आहे. तुम्हाला काय वाटते? आहे का काही पुरावा?
      6) वर्षाला पाळणा हलत असे , स्त्रीयांना मत नव्हते . १०-१२ पैकी एखादे जगत असे.. हे जरा चुकीच्या क्रमाने लिहिले आहे असे वाटते.. हे वाचा. १०-१२ पैकी एखादे जगत असे "म्हणून" वर्षाला पाळणा हलत असे. वर्षाला पाळणा हलला नसता तर तुम्ही इथे वाद घालायला असला नसता. माणसाशिवाय जवळजवळ सगळ्याच प्राण्यात मादी वर्षातून एकदा हिटवर येते. तिला स्त्रीत्व नसते का?
      मधले मुद्दे तेच तेच आहेत, त्याला उत्तरे काय देणार? म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे वळतो,
      ७) इग्रजांच्या आधी मुस्लिम आले, त्यावेळी ईश्वरी संकेत नाही का मिळाला? आफ्रिकेत काय युरोपच्या अगदी जवळ इराकमध्ये काय काय चालते आणि तुमचे इंग्लंड अमेरिका ढुंकूनही पाहत नाहीत. त्यांना जे दुर्बल आहेत त्यांच्या हातातले हिसकावून खायला आवडते, म्हणून तर ते गाय खातात. युरोपिअन अमेरिकेत गेले आणि तिथल्या रेड इन्दिअन लोकांना गट्टम करून शिवाय त्यांची भूमिही हडप केली. तसे इथे केले असते तर तुमचा (सारखा) एक पुतळा (जसे अमेरिकेत रेड इंडिअन लोकांचे लावले आहेत) तसा लावलेला दिसला असता. मग कशी खाल्ली असती तुम्ही गाय? त्याआधी वाघोबाने तुम्हाला गट्टम करून टाकले असते. तुम्ही कधी आफ्रिकेत गेलात का? ते लोक आपल्यापेक्षा बरेच पुढे गेलेत.
      शेवटी शिक्षणाचा मुद्दा असा भरकटला म्हणून परत मूळ मुद्द्याकडे येतो, खाटकाचा व्यवसाय कसा वाटतो ? नुसते गाईचे १-२ तुकडे खाण्यापेक्षा असंख्य गाई कापायचा किती आनंद मिळेल त्यात. शिवाय त्यात कोणाची लादालादी नाही, स्वेच्छा, अभ्यासक्रम, पूर्ण समाधान, विचार करून ठेवा. कोन्ग्रेस आले कि गाडी पुढे रेटता येईल.

      Delete
  41. राजमान्य राजश्री पाटसकर साहेब ,
    आपला उद्देश आणि मांडणी चांगली असते तरी कुठेतरी कमतरता राहते , आपले बरेचसे लेखन रद्द केलेले दिसते . ते कोणी केले आणि अशी वेळ का आली ?याचा खुलासा आपण कराल का ?
    आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमरा बद्दल बरेच संशोधन झालेले आहे . आणि आता हे सर्वमान्य आहे की त्याची प्रखरता फक्त तुरळक होती . ती एक प्रतिक्रिया होती . इंग्रजांच्या विरुद्ध , तो काही स्वातंत्र्य संग्राम नक्कीच नव्हता . अनेक संस्थाने वारसा अभावी खालसा होत होती . ते कंपनीचे धोरण होते , त्याना एकसंध भारत आपल्या अमलाखाली हवा होता .
    दक्षिणेत त्यामानाने काहीच जोर नव्हता , शीख त्यातून लांब होते . झाशी किंवा तत्सम संस्थानांची सत्ता मान्य करून राज्य करणे शक्यच नव्हते . जुजबी कारणे सांगत एकेक राज्य इंग्रजांनी ताब्यात घेतले . पण अशा लढ्याला स्वातंत्र्य संग्राम म्हणणे चुकीचे आहे .

    दुसरा मुद्दा , वास्तवातला ,
    नियमा प्रमाणे कामे होत नसल्यामुळेच दर्जा घसरतो . पूर्वी १९६० च्या सुमारास जी सार्वजनिक कामे होत असत त्यांचा दर्जा उत्तम होता . रस्ता खणल्यावर त्यातून जो कच्चा माल निघतो तो नीट दाबून धुमसून परत सर्व जिरवला जात असे , आणि पद्धतशीर दाब देऊन डांबरीकरण होत असे . आजकाल टेंडर मध्ये तरतूद असूनही हि कामे अतिशय गावठी पद्धतीने उरकली जातात . कुणीतरी पुढाकार घेऊन त्याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली तर बरेच काही माहित पडेल .
    आपल्याकडे इंग्रजी शिक्षण लोकमान्य होत आहे . त्यामुळे सर्व देशाची भाषावार प्रांत रचना करणे अनावश्यक ठरत आहे . अमेरिकेत जसे मोठमोठे प्रांत आहेत तसेच इथेपण असले पाहिजेत .
    सातारा रोड ला तर रस्त्याची हद्द कधी सातारा तर कधी पुणे जिल्हा अशी असते , त्यामुळे रस्त्याची कामे रखडतात . असे बरेच मुद्दे सांगता येतील .
    उद्या समजा सर्व देश भगवा किंवा हिंदू झाला तर सर्व अडचणी संपणार आहेत का ? इस्लाम एक असताना इतके इस्लामी देश कसे ?
    धर्माच्या आधारावर राष्ट्र बांधणी करणे धोकादायक आहे . उद्या तुम्हाला नेपाळ भारतात सामावून घेण्याची इच्छा होणार नाही कशावरून ?
    आपल्या भाजपचे शिक्षण धोरण अगदी तकलादू आहे . त्यांची स्वायत्त शिक्षण संस्था ताब्यात ठेवायची सुप्त इच्छा आहे . आय आय टी , आय आय एम आणि तत्सम संस्थात सरकारने हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे .
    आपण ज्याला शिक्षण समजत होतो ते शिक्षण होते का ? नाही . पाठांतराने हुशारी वाढते का ? हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो .
    आज आपणास इतिहासाची गरज किती स्वरूपात हवी आहे ?
    पाटसकर सर आणि संजय सर , आपल्याला जो इतिहास असेल तो १०० वर्षांनी आपण अभ्यासू या ! इतिहास हा पोरकट विषय बनत चालला आहे . तो फसवा प्रकार आहे . देश ही कल्पनाच दिवाळखोरीत निघायचे दिवस फार दूर नाहीत , तर तिथे इतिहासाचे काय प्रयोजन . ?

    ReplyDelete
  42. पाश्चात्य संशोधनाचे दुष्परिणाम लोकसंख्येच्या स्फोट खायला अन्न नाही दुष्काळ मोदी काय करणार प्लास्टिक चा धोका जंगले नष्ट प्राणी नष्ट अनुयुद्धाचा धोका सगळ्यात आधी मरणार तिसऱ्या जगतले लोक

    ReplyDelete
  43. गोरेसाहेब ते मीच काढून टाकले होते,
    _ १८५७ आणि पानिपत या इतिहासाची मला फार भीती वाटले मी चुकून काही अवाक्षर बोललो तर क्षमा असावी.
    _मी सरकारी कामे करत/किवा केलेली नाहीत. खाजगीत गुणवत्ता असावीच लागते.
    _ इंग्रजी शिक्षणाला माझा अजिबात विरोध नाही. भाषा हे एक मध्यम आहे तेसुद्धा वाढणार्या ज्ञानाइतके विस्तृत हवे, म्हणून माझा संस्कृत चा अजिबात आग्रह नाही.
    _ मी कुठल्याही धर्माचा अजिबात पुरस्कार करत नाही, पण प्रत्येक धार्मिक कृत्याची कारणीमिमांसा करतो, त्यातून मला जे पटते ते मी घेतो. जसे हिंदू गाय का खात नाहीत?
    आपले कुटुंब म्हणजे १ बायको २-३ मुले, १ ते ५ BHK वाला ग्रहस्थ २ बायका केल्या तर स्वताचे केस उपटून घेईल, "जयमल्हार" बघतोच आपण आपल्या कुटुंबाला एक मेंढी किवा बकरी पुरेशी असते, मटण शिल्लक राहून वाया जात नाही. आणि आम्हाला शिळे मटण पचवायची शक्ती नाही. इस्लाम मध्ये (पूर्वी) ४-५ बायका २०-३० मुले असत त्यांना एका गाईचे मटण पुरले तर नवल! उत्तर धृवाकादाचे लोक कायम बर्फ असल्याने मटण बरेचसे जास्त दिवस शिळे न होता खाऊ शकत होते. त्यामुळे ते सगळे गाय खातात. माझ्या निसर्गाने तशी व्यवस्था केलेली नसल्याने मी बळेच का गाय खाऊ? जसा देश तसा भेस अशी एक म्हण आहे, असो.
    _ भाजप शैक्षणिक कामात ढवळाढवळ करतो, याच्याशी माझ्या मुद्द्यांचा काही अर्था-अर्थी संबंध नाही. शिक्षण मिळवून योग्य प्रगती होण्यासाठी कमीत कमी ३ गोष्टींची गरज असते, १- ज्ञान- ते जगात भरपूर आहे, २- सुपीक डोके, जे आपल्याकडे फक्त @५% लोकांकडे आहे. ३-ज्ञानाचा योग्य उपयोग, हा मोठा विस्तृत विषय आहे. संशोधक लोकांनी ज्ञान वाढवून मोठे मोठे शोध लावलेत पण त्याचे बरेच दुष्परिणाम देखील आहेत, ते थोडक्यात मी वर लिहिले आहेत. त्याचा विचार हे संशोधक का करू शकले नाहीत? आपल्या महाभारत ह्या महाकाव्यात याचा उहापोह "अश्वत्थामा आणि ब्रम्हास्त्र " या प्रकरणात झालेला आहे, हि आपल्या संस्कृतीची मोठी उपलब्धता आहे.
    _पेत्रोलिअम ला अजून रोबस्ट असा पर्याय उपलब्ध झालेला नाही, आणि आत्ताच्या संशोधनाची दिशा आणि प्रगती ( ते फक्त इलेक्ट्रोनिक्स मोबाईल) पाहता येत्या १०० वर्षात पाणी आणि पेट्रोल लोकांच्या तोंडाला फेस आणणार हे नक्की. आधीची जी संस्कृती हजारो वर्षे निसर्ग नियमाने चालली, ती आता आधुनिक बनून एखाद्या तकलादू दोलार्यासारखी उभी राहत चालली आहे आणि १००-२०० वर्षात कोसळायच्या बेतात आहे, तसे इशारे आपले पाश्चात्य देव (शास्त्रज्ञ) त्यांना त्यांच्या योगसाधनेतून जाग आली कि देत असतात. मग तो बिचारा दगडातला का होईना योग करणारा शंकर वाईट का हे योग करणारे? किमान ते आपल्या कृत्यातून अखिल मानव समाजाची वाट तर लावत नव्हते ना !! अहो बापूसाहेब आतातर खरा इतिहास लिहायची वेळ येतेय, हिरोशिमा झाले, नंतर पाणी, पेट्रोल संपणार, मग जमीन संपणार.. फार फार तर ५०० वर्षे. मजा येणार आहे.

    ReplyDelete
  44. आपण सर्वार्थाने परिपूर्ण विवेचन केले आहे त्यातील गायीचा प्रश्नच मला मानवत नाही .
    गाय हि पूर्वीच्या काळी शेतीला उपयुक्त असे बैल देत असे म्हणून शेतकरी वर्गाला त्याचे महत्व असे . बैलपोळा हा वंदनीय सण आहे . दिवाळी सारखाच महत्वाचा !कारण प्रत्येक उपयोगी प्राण्याला एक दिवस विश्रांती देण्याची सांस्कृतिक इच्छा असणे हेच बरेच काही आपल्या मनाची घडण सांगून जाते . आपल्या संस्कृतीत अशी गुंफण अनेक ठिकाणी दिसते . नागपंचमी बैलपोळा वटपौर्णिमा हे अंधश्रद्धेचे विषय नसून आपण निसर्गाशी जोडलेले ते एक सुंदर नाते आहे .
    सर आपण वैदिक प्रमाणे मानता का ? यज्ञ आणि वेद मानता का ते समजून घेण्यास मी उत्सुक आहे . कारण एकीकडे संजय सोनवणी सरांची मते काहीशी पटत असतात आणि त्यांच्या वैदिक विरोधातील ब्राह्मणद्वेष अनेक पैलू उघड करत असतो .
    आरक्षणाचे समर्थन हे इतर देशात विनोदाचा भाग ठरत आहे . त्याबद्दल पण आपले मत काय आहे ?
    आपण जिद्दीने अप्पा बप्पा , आणि इतराना ( माझ्यासकट ) संतुलित मनाने उत्तरे दिली आहेत त्यावरून आपण सच्चे संघवाले आहात हे समजते . श्री विनय सहस्त्रबुद्धे यांची आठवण होते . तेपण अतिशय संतुलित उत्तरे देत असतात .
    या विचार मंचावर अनेक प्रश्नांची छाननी बाकी आहे . अंधश्रद्धा आणि त्यास जणूकाही ब्राह्मण जबाबदार आहेत असा एक छुपा कार्यक्रम या विचार मंचावर राबवला जात असतो , आणि त्याचे समाजवादी विचारांशी असलेले नातेही जगजाहीर आहे . समाजवादी विचार हा एक वांझोटा विचार आहे असे धाडसाने सांगणे गरजेचे आहे , यावर आपले काय मत आहे ? असे अनेक प्रश्न विचारून चर्चा अर्थपूर्ण करता येईल , सदा न कदा बहुजनांचा डांगोरा पितायचा देखावा करत सवर्णांची नालस्ती करण्याचा अनेकांचा आवडता उद्योग असतो हे आपणास पटते का ?
    मनापासून धन्यवाद !

    ReplyDelete
  45. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  46. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  47. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  48. यज्ञ हा एक सोहळा होता असे माझे ठाम मत आहे. संजय सोनावानिंच्या मताला मानणारे करोडो लोक आहेत असे मी मानतो, पण काही कृती करण्यासाठी एकत्र येणारे किती असतात? ५, १०, १००? का नाही येत? नमाज पढायला सगळा समाज एक होतो, एक संदेश (फतवा) दिला जातो. तसाच यज्ञाचा प्रकार आहे. प्रस्थापित हिंदू समाजापेक्षा किवा युरोपीय समाजापेक्षा झटकन एक होणारा इस्लामी समाज त्यांच्याशी काट्याची टक्कर देत आहे. हेही यज्ञाचे मोठे गमक आहे. नमाज नम-यज आणि यज (यज्ञ) यात भाषिक साम्य आहे.

    ReplyDelete
  49. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  50. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  51. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  52. आप्पा - अहो संजय सर , बचाओ ! बचाव ! वाचवा ! धावा धावा !
    बाप्पा - अरे काय झाले तरी काय ? मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना ?
    आप्पा - नाही रे , या पाटसकर महाराजाना आवरा कुणीतरी . संजयला झाले तरी काय ? हे बौद्धिक सहन होत नाही . पूर्वी मारुतीच्या जन्मोत्सवात अशी कीर्तने होत , आता हे विचित्र वाटते . वाल्याकोळ्याची गोष्ट आम्ही कीर्तनात ऐकली होती ,आज्जीबरोबर .
    बाप्पा - एका रांजणात किती खडे धरले होते रे आपण ? ५००० का ५०० ?
    आप्पा - म्हणजे बख्खळ ५०० च्या हिशोबाने १५०० मारले , तरी त्या रस्त्याने लोक का जात असतील , कारण जाणारा जर प्रत्येक जण गायब झाला असेल तर ? आणि वाल्याने किती कमावले असेल ? सगळे पूर्वी अंगठ्या आणि चेन घालून हिंडत असतील का , आजच्या वांजळे सारखे ? आसाराम बापुंपेक्षा भारी होता हा वाल्या ?
    बाप्पा - किती प्रश्न पडले होते नाही आपल्याला ? आणि तो रस्ता आपण लहानपणी कोणता मानला होता आठवतंय का ? आपल्या शाळेचा - आठवल का ? तिथे कुणीच फिरकायच नाही , त्यामुळे आपल्याला किती प्रश्न पडले होते .
    आप्पा - आणि नारदाने त्याला घरी विचारून ये म्हणून सांगितल्यावर वाल्या गेला , त्याला असे वाटले नाही की नारद मुनी पळून जातील - किती विश्वास होता त्यावेळी खुनी आणि मुनी लोकांमध्ये , नाहीतर आजकाल मुनिच खुनी असतात !आसारामचेच बघा ना ?
    बाप्पा - असे बोलू नये स्मृतीताईना काय वाटेल त्या हि गोष्ट आय आय टी च्या अभ्यास क्रमात टाकणार होत्या . रामायणाचा रायटर - वाल्या कोळी आणि त्याची गोष्ट ! कित्ती कित्ती छान ?
    आप्पा - आणि राजमान्य राजश्री बोलत आहेत . कमाल आहे . हे एक सोप्पे आहे . तुम्ही असेच का ? तर , मागच्या जन्मातील दोष , पितर दोष ! पाप आले , पुण्य आले पुनर्जन्म आला , सगळ्याची उत्तरे मिळण्याची सोय झाली . सगळेच कोडे उलगडले . कित्ती कित्ती महान होता आपला भारत . मुसलमान आले नि सगळ्याचा बट्याबोळ केला . कशाला आले इकडे . आमच मस्त चालल होत . सगळ कोड सुटल होत या विश्वाच !
    बाप्पा - अरे असं टोचून बोलू नकोस . त्यांचे विचार किती उच्च आहेत . खरोखर आपले मुनी लोक कित्ती कित्ती महान . राख फासून , आता नाशिकला येतील , हमरी तुमरी होईल . पहिला मान कोणाचा ? काय पण धर्म आहे ! कसले स्नान , कुठचे पाणी , इतर वेळी त्र्याम्बाकेश्वराला गेले आणि त्रीपिंडीच्या विसर्जनाच्या ठिकाणी पाहिले की पोटात मळमळू लागते . कसले पितर आणि काय आपण करतोय असे वाटते . आणि कशासाठी तर तसे लिहून ठेवले आहे म्हणून . कोणी तर या ब्राह्मणांनी . काय कमाल आहे . लोक आजही येतात . आशा अमर आहे . धर्मात लिहिले असेल तर भौतिक मुक्तीसाठी आणि सुखासाठी लोक गाधावाचेही पाय धरतील . धन्य तो धर्म !

    ReplyDelete
  53. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  54. वेदांची निर्मिती ब्राह्मणवर्गाकडून झाली हे आपले गृहीतच संशयास्पद वाटते. वेदांचे संहितीकरण केल्यावर त्या संहितांच्या रक्षणाचे काम ब्राह्मणवंर्गावर सोपविले गेले असणे जास्त शक्य वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. वेद हे कोणी देवाने किवा ब्राम्हणाने निर्माण केलेले नाहीत. (जसे कुराण देवाने पाठवले नाही) तसेच! हि सगळी निर्मिती माणसांचीच आहे. डॉ. बाबासाहेबांनी नाही का देशाची घटना लिहिली. ती आत्ता जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना आहे हि (आणि ती एका शुद्र घरात जन्मलेल्या माणसाने लिहिली) महत्वाची बाब. माझे लिखाण पूर्ण वाचा. आज आणि पूर्वी खेड्यातील मजुराचा मुलगा हा सद्सद्विवेक वृत्तीचा आणि देशाचे अचूक प्रतिनिधित्व करणारा असेल तर तो देशाचा पंतप्रधान (राजा विक्रम-चंद्रगुप्त-शिवाजी-असे अनेक) बनू शकतो. ती कोण्या जातीची, घराण्याची, समजाची मक्तेदारी नाही.

      Delete
  55. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  56. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  57. संजय सरांच्या ब्लोगवर एकूण प्रतिक्रिया ६९, त्यात अप्पा बाप्पा यांच्या ३ लिहा वाचा ३ , संजयाच्या ३ आणि अविनाश पाटसकर यांच्या साधारण पाने अधिक उणे ५० , ! बापरे , इतरांच्या एकेक , अशा एकूण ६९ . काय हा उत्साह आहे ? काय म्हणावे याला ? विषय होता - " शिक्षणाचे भारतीयीकरण " - आणि विषय वहावत गेला गाय , ज्योतिष , आणि दगड नि धोंडे .
    इथे विषयाला धरून फारच कमी लिहिले जाते , अप्पा बाप्पा - हे तर टवाळ्या करण्यातच स्वतःला धन्य समजतात . त्यावर कडी म्हणजे राजमान्य , ( आता संघ्वाल्याना ५ वर्षे ही पदवी मिरवायला हरकत नसावी ). लोकमान्य ही पदवी वेगळी आणि ती देणारे पण लोकोत्तर !ती अशा अर्ध्या चड्डी वाल्याना मिळत नसते .
    सांगायचा मुद्दा असा की , अविनाश पाटसकर हे हिंदमातेचे खरे रक्षणकर्ते आहेत .
    आरएसेस चा अनुभव आम्ही घेतला आहे . अतिशय होतकरू लोकाना , पातास्कारांनी सुमारे ७१% प्रतिक्रिया देऊन केला आहे . एकूण टिपण्या ७० त्यात त्यांच्या ५० . कमाल आहे . इतका विषय त्याना महत्वाचा वाटला का ? तर तसे दिसत नाही . त्यांच्या टिपण्या हे प्रत्युत्तरात्मक होत्या .आणि संघाचा अघल पाघाल्पना पण होता . श्री विनय सहस्त्रबुद्धे हे फार महान वक्ते आहेत त्यांची इंग्रजी मराठी आणि हिंदी वरील हुकमी पकड त्यांचे वक्तृत्व फुलवत नेते आणि ते विषयाला धरून बोलतात , विषय भाराकातावत नेणाऱ्या प्रतिक्रियांवर ते बोलतच नाहीत . फार थोर आणि भारून टाकणारे वक्तव्य असते त्यांचे !, पण ,
    श्री पाटसकर हे त्यांच्या नखाची सर नसलेले लेखक ठरतात . कुठेही चीन्तान्शिलाता नाही . विचार प्रगल्भता नाही , त्यामुळे उर्वरीत संघ कार्य कर्त्यांच्या सारखे ते रटाळ वाटतात .

    ReplyDelete
  58. सर विषय होता "शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य". तुम्ही पहिल्याच मुद्यात म्हणाले कि, "मला या कार्यक्रमाला वक्त्यांत एक बहुजन असावा म्हणूण बोलावले गेल्याचे दिसते आहे. " असे का वाटले तुम्हाला ? आणि सर बहुजन/ अभिजन म्हणजे काय? कदाचित इतर सर्व प्रतिक्रियांत माझा प्रश्न क्षुल्लक असेल , तरी आपण उत्तर द्याल असे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. आयोजकांनीच मला तसे आधीच माझी तारिख घेतांना सांगितले होते. शिक्षणाबद्दल चर्चा असतांना असे असू नये हे मी त्यांना समजावले. संघात जात मानत नाही असे म्हणतात...पण ते अत्यंत जातीयवादी आहेत हे मला आता अनेक अनुभवांवरुन माहित झाले आहे. (पुरोगामीही तेवढेच जातीयवादी आहेत हेही मी नमूद करतो. अभिजन-बहुजन ही जातीयवादी व जातीआधारित विभागणी फेटाळायला हवी.)

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...