Friday, May 31, 2019

खंडेराव होळकरखंडेरावांनी मल्हाररावांसोबत जशा स्वा-या केल्या तशाच स्वतंत्रपणेही केलेल्या आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे१७४३ साली सवाई जयसिंगाचा मृत्यू झाल्यानंतर वारसाचा वाद निर्माण होऊन संघर्ष पेटला होताया वादात युद्ध अटळ बनले तेंव्हा महाराणा ईश्वरसिंगाने मल्हाररावांकडे मदत मागितलीमल्हाररावांनी खंडेरावांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन त्यांना मोहिमेवर पाठवले.यावेळीस खंडेराव ऐन तारुण्यात होतेखंडेरावांनी राजमहल येथे युद्ध केले व महाराणाची मदत केलीखंडेराव बेजबाबदार असते तर मल्हाररावांनी महत्वाची मोहिम त्यांच्यावर न सोपवता आपल्या अन्य सरदारांवर सोपवली असतीउदयपुरच्या महाराणाशी झालेला खंडेरावांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे व त्यातून खंडेराव रजपुतांशी मैत्र ठेऊन होते हे जसे सिद्ध होते तशीच त्यांची राजकीय समजही.

१४ मार्च १७५१ ते एप्रिल १७५२ या काळात खंडेराव होळकर सफदरजंगाला सहाय्य करण्यासाठी बंगश व रोहिल्यंविरुद्धच्या मोहिमेत सामील झाले होते. फतेहगढ आणि फारुकाबादच्या युद्धांत  बंगश व रोहिल्यांचा पराभव करण्यात आला. त्यांच्या बहुतेक मोहिमा,तुकोजीराजांप्रमानेचमल्हाररावांसोबत झाल्याने मल्हाररावांच्या विजयांत त्यांचा सहभाग होतापरंतू त्यांचे स्वतंत्र वृत्तांत उपलब्ध नाहीतपण महत्वाचा वृत्तांत गोसरदेसाई देतातते आपल्या New History of the Marathas: The Expansion of Maratha Power, 1707-1772 या ग्रंथात खंडेरावास दिलेल्या स्वतंत्र व महत्वाच्या मोहिमेची माहिती देतात. सुरजमल जाटाने दिल्लीवर स्वारी करुन १० मे १७५३ रोजी दिल्ली ताब्यात घेतली. सफदरजंगाला वजीरीवरुन हटवत इंतिजामला वजीरी दिली. मीरबक्षीही बदलला. यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण पुर्ण ढवळून निघाले. यावेळीस मल्हारराव व जयाप्पा शिंदे पुण्याकडे गेलेले होते. मग २१ नोव्हेंबर १७५३ खंडेराव दिल्लीत ४००० सैन्यासह आले. खंडेरावाने जाटावर चालून जावे अशा विनवण्या पातशहाने सुरु केल्या. खंडेरावाने त्या बदल्यात आग्रा सुभा मागितला. पातशहा आग्रा गमवायला तयार नव्हता पण त्याने खंडेरावाची मनधरणी गाजीउद्दिनमार्फत सुरु ठेवली.  भेटवस्तू व मानाची वस्त्रेही (खिल्लत)  दिली पण ती न घेताच आपल्या छावणीत गाजीउद्दिनसह परतले.

पणबहुदा मल्हाररावांकडून पुण्याहून सुचना आल्याने खंडेरावांनी जाटांची मोहिम हाती घेतली. भरतपुरच्या परिसरात हल्ले सुरु केले. पलवालजवळची जाट खेडी उध्वस्त करुन टाकली. फेब्रुवारी १७५४ पर्यंत खंडेराव भरतपुरचा आसपासचा परिसर लुटत होते. सुरजमल जाट कुंभेरीच्या अभेद्य किल्ल्यात लपून बसला होता. खंडेरावांना तहाचे निमंत्रण देऊनही खंडेराव गप्प बसेना तेंव्हा त्याने मल्हाररावांकडे आपला वकील रुपराम चौधरी  पाठवला व चाळीस लाखाची खंडणी द्यायला तयार झाला. मल्हारराव,राघोबादादा व जयाप्पा पुण्याहून निघून जाट मुलखात आले. खंडेराव त्यांना तेथे सामील झाला व येथेच कुंभेरीचा वेढा सुरु झाला.

याच युद्धात आघाडीवर लढत असतांना तोफेचा गोळा लागुन खंडेरावांचा मृत्यू झाला.

वरील वृत्तांत पाहिल्यानंतर खंडेराव व्यसनी होतेनशेत बेधुंद असतांना झोकांड्या खात आघाडीवर आले असता गोळा लागुन ठार झाले हे इतिहासकारांचे विधान कोणाला मान्य होईलमल्हाररावांनी आपल्या अनुपस्थितीत खंडेरावांना उत्तरेची जबाबदारी सोपवली होती. ती त्यांनी पार पाडली. जाटासारख्याज्याने दिल्लीही जिंकली होतीयोध्याला एकट्याच्या जीवावर सळो-कि-पळो करुन सोडणा-या खंडेरावाला व्यसन करायला फुरसत कधी होतीपातशहाही त्याची मनधरणी करतो ती तशी योग्यता असल्याखेरीज कायदिल्लीचे अन्य राजकीय मुत्सद्दी त्यांच्या सोबत असत. पातशहाच्या भेटवस्तू नाकारण्याचा बाणेदारपणा त्यांच्यात होता.

बरे जाटाविरुद्धची लढाई त्यांनीच आधी सुरु केली होती. मल्हारराव व अन्य सेनानी नंतर आले. अशा वेळीस खंडेराव नशेच्या अंमलाखाली आघाडीवर आला या इतिहासकारांच्या समजात खोट आहे हे उघड आहे. खरे तर खंडेरावाने जाटाच्या प्रदेशाची धुळधान केल्याने जाटाचा त्याच्यावर राग असणे स्वाभाविक आहे. जाट सैन्याने आघाडीवर असलेल्या खंडेरावाला मुद्दाम नेम धरुन टिपायचा प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. हा मृत्यू अपघात नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. एक भविष्यातील उमदा योद्धा व मुत्सद्दी आपण गमावला. यामुळेच मल्हाररावांचा प्रचंड क्रोध झाला. "सुरजमल्लाचा शिरच्छेद करुन कुंभेरीची माती यमुनेत टाकीन!" अशी घोर प्रतिज्ञा मल्हाररावांनी संतापाच्या भरात केली होती. पण जयाप्पा शिंदेंनी जाटाशी परस्पर तह करुन त्यावर पाणी फिरवले हे येथे लक्षात घ्यायला हवे. 

Saturday, May 11, 2019

'नमोकार' मंत्रात भेसळ कशासाठी?

Image result for namokar mantra

णमो अरिहंताणं
(अरिहतांना नमस्कार असो)
णमो सिद्धाणं
(सिद्धांना नमस्कार असो)
णमो अयरियाणं
(आचार्यांना नमस्कार असो)
णमो उवज्झायाणं
(उपाध्यायांना नमस्कार असो)
णमो लोए सव्व साहूणं 
(विश्वातील सर्व साधू-साध्वींना नमस्कार असो)
एसोपंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
मंगला णं च सव्वेसिं, पडमम हवई मंगलं
(हा णमोकार महामंत्र सर्व पापांचा विनाश करणारा सर्व मंगलांहून सर्वाधिक श्रेष्ठ मंगल आहे.)

हा आहे जैन धर्मातला सर्वात महत्वाचा मंत्र. या मंत्राला मूलमंत्र, महामंत्र, पंचनमस्कार मंत्र किंवा पंचपरमेष्ठी मंत्र असेही म्हटले जाते. खरे म्हणजे जैन तत्वज्ञानाचे मुलभूत सार या मंत्रात आले असल्याने अभ्यासकांच्या दृष्टीनेही हा मंत्र महत्वाचा आहे.

या मंत्राची विशेषत: ही आहे की यात कोणाही अमूर्त देवी-देवतेला वंदन केलेले नाही कारण विश्व निर्माता, मानवी जीवनाचा नियंता असलेला, पार्थना करुन संतुष्ट होणारा देव किंवा ईश्वर ही संकल्पना जैन धर्मात नाही. जैनांच्या दृष्टीने प्रत्येक जीव किंवा आत्मा हाच देव आहे पण कर्मामुळे आपल्या उच्च कोटीवरुन तो खाली घसरलेला आहे. त्यावर मात करत तो उच्च कोटी प्राप्त करु शकतो व आपल्या मुळच्या इश्वरी रुपाला पोहोचू शकतो. एकमात्र देव तर नव्हेच एकमात्र अरिहंत ही संकल्पनाही जैन धर्मात नाही. हा धर्म समष्टीमधील देवपणाला पाहतो. त्यामुळेच या मंत्रात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधु-साध्वींना वंदन केलेले आहे. कोणत्या अमूर्त दैवत संकल्पनेला नाही. किंबहुना मानवी जगापारच्या महाशक्तीशाली अद्भूत आणि कर्ता-करविता अशा ईश्वराची संकल्पना जैनदर्शन मान्य करत नही तर उलट मनुष्यमत्रात किंवा सर्व जीवांत जैन नुसता देव पाहत नाहीत तर तेच देवकोटीला पोहोचू शकणारे देव आहेत  असे मानतात.

अरिहंत म्हणजे ज्याने आपल्या काम-क्रोध-लोभ-मत्सर आदि विकारांचा पराजय केला आहे, त्यांच्यावर विजय मिळवला आहे तो अरिहंत. सिद्ध म्हणजे मूक्त जीवात्मा. भारतात एके काळी सिद्ध संस्कृती वेगवेगळ्या धर्मांत व पंथांत पसरलेली होती आणि "सिद्ध" या शब्दाचे पारिभाषिक अर्थ प्रत्येक संप्रदायाने आपापल्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लावले आहेत. जैन धर्मात अभूत सिद्धी मिळवतो तो सिद्ध असा अर्थ नसून निर्वाणप्रसंगी जो सर्व पाशांतून मूक्त आणि स्वतंत्र झालेला असतो तो सिद्ध असा अर्थ आहे. (आचारांग सुत्त १.१९७) मूक्त जीवात्मा म्हणजे सिद्ध असे येथे थोडक्यात म्हणता येईल. किंबहुना अरिहंतानंतरची उच्च कोटी म्हणजे सिद्ध अशी ही संकल्पना आहे.

आचार्य म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शक. ज्याची यात्रा केवलज्ञानाच्या दिशेने सुरु आहे आणि जो मनुष्यमात्राला दिशा देतो, नवे ज्ञान प्राप्त करून समाजाला देतो तो आचार्य तर उपाध्याय म्हणजे शिक्षक किंवा सामान्यातिसामान्यांनाही कोणत्या दिशेने आणि कसे जायचे हे शिकवणारी व्यक्ती. साधू म्हणजे अशी व्यक्ती की ती स्त्री असेल अथवा पुरुष, सर्वांग परित्याग केलेला आहे, तपस्या हाच ज्याचा एकमात्र उद्देश आहे आणि केवलज्ञान मिळवण्याचा अविरत प्रयत्न सुरु आहे ती.

या मंत्रातील विशेषत: अशी की ती सर्व अरिहंत, सर्व साधू, सर्व उपाध्याय, सर्व सिद्ध आणि सर्व आचार्यांना एकत्रीतपणे नमस्कार केला आहे. कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीला यात स्थान नाही. ही समष्टीची मुलभूत संकल्पना आहे. सर्व मानवजातीत या पाचही परमेष्ठींपैकी एक होण्याची योग्यता आहे आणि जे झालेत त्या सर्वांना कोणताही धार्मिक अभिनिवेष न आणता नमन करण्याची उदारता आहे. शिवाय या पाचही पदांना विशिष्ट अर्थ आहे आणि आध्यात्मिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही ही संकल्पना लागू पडते. या सर्वांना नुसता नमस्कार करणे हे अनुस्युत नसून प्रत्येक व्यक्तीने यातील पाय-या ओलांडत केवली बनावे असे अभिप्रेत आहे. थोडक्यात कोणत्याही कर्ता-करवित्या ईश्वरी संकल्पनेच्या आहारी न जाता मनुष्यालाच देव होण्याची संधी आहे कारण तोच देव आहे असा व्यापक मानवविचार मांडणा-या जैन धर्माचा हा मंत्र आहे आणि साररुपात ते तत्वज्ञान मांडनारा हा मंत्र आहे.

मंत्र हे गुढ वाटतात कारण मंत्र सारे काही स्पष्ट करत बसत नसतात तर सूत्र रुपाने तत्वज्ञानाचा सारगर्भ मांडत असतात. पण अनेकदा मंत्रोच्चारच महत्वाचा बनून जातो, त्यातील अर्थ मात्र समजावून घेतला जात नाही. मग केवळ शब्द उरतात आणि निष्फळ जप उरतो. नमोकार मंत्राचे असेच काही झाले असावे असे वाटावे अशी स्थिती आहे.

हा मंत्र किती जुना आहे? ह मंत्र अनादि आहे काय? हा मंत्र कोणी दिला? मला वाटते या इतिहासात जाण्यापेक्षा किती काळ खात्रीलायक रित्या हा मंत्र असाच्या असा उपलब्ध आहे हे पाहणे रोचक ठरेल.

राजा खारवेल हा एक जैन समाट होता. इसवे सन पूर्व १६२ मधील त्याच्या उदयगिरी टेकड्यांमधील हाथीगुंफा शिलालेखात हा मंत्र असाच्या असा कोरलेला सापडतो. म्हणजे हा मंत्र त्याहीआधी नुसता उपलब्ध नव्हता तर जैन समुदायाच्या आध्यात्मिक जीवनाचा महत्वाचा भाग होता. हा मंत्र असाच्या असा आजही म्हटला जातो.
पण अलीकडेच माझ्या नजरेला एक दादा भगवान आराधना ट्रस्ट्ने प्रसिद्ध केलेल्या काही पुस्तिका वाचनात आल्या. त्यात सुरुवातीलाच नमोकार मंत्र दिला असून त्यात अधिकच्या तीन ओळी जोडण्यात आलेल्या आहेत, त्या अशा-

"ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नम: शिवाय
जय सच्चिदानंद"

खरे तर हा ट्रस्ट आणि अनुयायी गुजराथमध्ये खूप चांगले कार्य करतात हे माझ्या ऐकीवात होते. किंबहुना त्यामुळेच या पुस्तकांत रस निर्माण झाला होता. पण हा नवीन घुसवलेल्या ओळी पाहून मात्र मी चकीत झालो कारण मुळ बाबींत बदल करता येत नाही ही सामान्य बाब नजरेतून कशी सुटावी हे समजले नाही.

आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की कोणत्याही पुरातन लेखनात, मग ते लेखन धार्मिक असो, तत्वज्ञानात्मक असो की राजकीय इतिहास सांगणारे असो, त्यात कोणताही बदल घडवणे, अगदी कानामात्रा बदलणे किंवा त्यात अधिकचे काही जोडणे सर्वस्वी गैर मानले जाते, त्याला प्रक्षिप्तीकरण म्हणतात. त्यामुळे भावी काळात मुळचे काय होते याबाबत सावळागोंधळ निर्माण होऊ शकतो आणि जे काही मुळचे आहे ते अशा प्रक्षिप्तीकरणामुळे धुसर होऊ शकते. खरे तर मूळ तत्वज्ञानालाच बदलण्याचा अश्लाघ्य प्रकार घडू शकतो.

उदाहणार्थ या ज्या तीन ओळी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे मुळच्या जैन तत्वज्ञानालाच कसा हरताळ फासला गेला आहे ते आपण पाहुयात. नमोकर मंत्र मुळात कोणा विशिष्ट व्यक्तीला नमन करत नाही आणि येथे तर वासुदेव कृष्णाला नमस्कार केला गेलेला आहे. शिव ही विश्वाची उत्पत्ती, स्थिती अणि लयाची कारक ईश्वर असलेली एक मंगलदायी संकल्पना आहे. ती पुजणीय असली तरी आहे संकल्पनाच. आणि जैनांना मुळात विश्वाची निर्मिती कोणी ईश्वराने केली आहे आणि त्याच्या इच्छेवर विश्वाचा गाडा सुरळीत चालला आहे, तो पूजा केली तर संतुष्ट होतो आणि मानवी जीवनात हस्तक्षेप करतो हेच मान्य नाही. मग शिव येथे कोठून आला? कृष्ण येथे कोठून आला? आणि कोणत्या सच्चिदानंदांचा जयजयकार केला आहे?

जैन तत्वज्ञानालाच विसंगत असलेल्या या तीन ओळी घुसवत आपण मूळ मंत्राचा तत्वगर्भच उध्वस्त करत आहोत हे असे करणा-यांच्या कसे लक्षात आले नाही? आणि मुळात "मूलमंत्रात" असा विक्षेप घडवण्याचे काम का केले गेले? ते करण्यासाठी कोणते "केवलज्ञान" प्राप्त झाले होते?

मी नम्रपणे आवाहन करेन की नमोकार मंत्राच्या शेवटी घुसवलेल्या या तीन ओळी काढून टाकल्या जाव्यात. शिव, कृष्ण, सच्चिदानंद यांनाच काय, अजुनही कोणी जे प्रेय वाटते त्यांनाही अवश्य वंदन करावे. किंबहुना या मंत्रात सर्वांनाच वंदन केले आहे आणि ते कोणत्या धर्माचे आहेत याची पर्वा केली गेलेली नाही. समजा अमूर्त संकल्पनांना नमस्कार करण्याचे नवे "जैनतत्व" निमाण करायचे असेल तर त्यालाही हरकत असण्याचे कारण नाही पण त्यासाठी मग स्वतंत्र नवा मंत्र व स्वतंत्र नवे तत्वज्ञान बनवावे लागेल हेही लक्षात घ्यावे लागेल. पण पुरातन आणि तत्वज्ञानाने विशुद्ध असलेल्या मंत्राला काही घुसवुन विकृत करू नये. वैदिक धर्मीयांनी जी चूक केली ती अन्य धर्मियांकडून होणे योग्य राहणार नाही.

प्रत्येक धर्माचे आपापले असे तत्वज्ञान असते. जैन तत्वज्ञान हे इतर धर्मांपासून स्वतंत्र पडते कारण ते मु्ळात अल्ला, शिव, इंद्र-वरूण, अहूर माझ्दा यासारख्या अमूर्त देवतांच्या संकल्पनांपासून दूर राहते. ते अधिक मानवकेंद्रीत आहे. प्रात्यक्षिक आहे. समष्टीचे तत्वज्ञान आहे...व्यकीकेंद्रित नाही. मग अशा धर्माचे तत्वज्ञान अल्पाक्षरी पंच नमस्कारात सांगणा-या मंत्रात विक्षेप करून ती तत्वज्ञानाचीच अवहेलना होते हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही अंगाने असे विक्षेप सहन केले जाता कामा नयेत असे मला वाटते. कारण कोणत्याही धर्माच्या मूळ लेखनात अशी कोणतीही भेसळ आता तरी केली जावू नये. अभ्यासक आणि भाविकांना मूळ जे आहे तेच मिळायला हवे. अन्य कोणाच्या वेगळ्या संकल्पना असतील तर त्या अवश्य मांडाव्यात पण मुळात जेही काही आहे त्यात बदल करू नये अशी एक धर्मेतिहासाचा अभ्यासक म्हणून माझी भूमिका आहे.


Monday, May 6, 2019

चिनी विस्तारवाद कसा रोखणार?


Image result for china road project


व्यापारी महामार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी झालेल्या युद्धांचा इतिहास किमान आठव्या शतकापर्यंत मागे जातो. मध्य आशियातून चीनला जाणाऱ्या रेशीम मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अरब, भारतीय, तिबेटी आणि खुद्द चिनी सत्ता सतत संघर्षात व्यग्र असत. काश्मीरच्या कर्कोटक घराण्याच्या दुर्लभवर्धन ते ललितादित्याने दीर्घकाळ या मार्गावर नियंत्रण ठेवले होते. अरबांनी जेव्हा बल्ख (उत्तर अफगाणिस्तान आणि रशियाचा काही भाग) काबीज केला तेव्हा ललितादित्याने पश्चिमोत्तर भारतातील अरबांना हुसकावून लावत काबूलमार्गे बल्खवर (तेव्हाचा तोखारीस्तान) स्वारी करून तोखारीस्तानलाही अरबांपासून मुक्त केले होते आणि विस्तारवादी तिबेटलाही गिलगिट, बाल्टिस्तान आणि लडाख भागांतून हटवत सर्व व्यापारी मार्ग मुक्त केले होते. हा इतिहास सांगायचा तो अशासाठी की, तत्कालीन आंतरराष्ट्रीय युद्धे, आक्रमणे झाली ती धर्मप्रचार हा मुख्य उद्देश ठेवून नाही, तर व्यापारी मार्गांवर व बंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी. त्या वेळी चीन भारताचा मित्र होता, तर तिबेटी आणि अरब सामायिक शत्रू. तत्कालीन स्थितीत अंतर्गत समस्यांमुळे चीन दुर्बळ झालेला होता.
ललितादित्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अरब आणि तिबेटींना वारंवार पराजित केले व मध्य आशियातून जाणाऱ्या मार्गांवर नियंत्रण मिळवले. आज स्थिती वेगळी आहे. तिबेट चीनचा उपनिवेश बनलेला आहे, तर मध्य आशियातील इस्लामी सत्ता तुलनेने फार दुर्बळ झालेल्या आहेत. चीनने आज त्याच पुरातन रेशीम मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याचा घाट घातलेला आहे. पाकिस्तानला जोडणारा महामार्ग भारताचा भाग असलेल्या, पण आता पाकिस्तानने बेकायदा ताब्यात घेतलेल्या गिलगिट/बाल्टीस्तानमधून जातो. भारताने आजवर निष्फळ निषेध करण्यापलीकडे फारसे काही केलेले नाही. फार फार तर या महामार्ग निर्मितीच्या कामात सहभागी असलेल्या २८ देशांच्या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. यंदाही याच बहिष्काराची पुनरावृत्ती झाली आहे. पण यामुळे या मार्गांचे काम थांबणार नाही हे उघड आहे.
व्यापारी मार्गांवर ज्याचे नियंत्रण त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण' ही पुरातन म्हण आजही सत्यात येताना दिसते आहे. आठव्या शतकात काश्मीरच्या ललित्यादित्यासारखे धोरणी आणि मजबूत शासक भारतात होते. कनौजच्या यशोवर्मनची त्याला साथ होती. त्यांनी तत्कालीन विस्तारवादी सत्तांना रोखण्यात यश मिळवले. आज मात्र दुर्दैवाने तशी स्थिती राहिलेली नाही. चीनचा विस्तारवाद आपण बहिष्कार घालून थांबणार नाही याचेही भान आम्हाला उरलेले नाही. डोकलाममध्ये भारताला कशी नामुष्की स्वीकारावी लागली हे आताचे छप्पन इंची म्हणवणारे सरकार सांगायला तयार नसले तरी वास्तव सर्वांना माहीत आहे. चीन पुरस्कृत व्यापारी महामार्ग भविष्यात भारताची आर्थिक कोंडी करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात. आम्हाला पर्यायी आणि सक्षम प्रतियोजनेची आवश्यकता आहे ती यामुळेच!
(Published in Divya Marathi)

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!

  प्राचीन  इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्य...