Sunday, July 31, 2011

ऋग्वेदात आधुनिक विद्न्यान?

ऋग्वेदामद्धे अगदी बिग ब्यांग थीयरी आहे असे सांगणारे सनातनी मी पाहिले आहेत. मग तत्पुर्वी मान्य असलेली स्थीर विश्व वा तेजोमेघ थियरी तेंव्हा कोठे गेली होती? बरे आता स्टीफन हाकिंगने जी सुपर स्ट्रिन्ग थियरी मांडली व आधीची थियरी जवलपास बाद ठरवली...आता ते त्याचे पुरावे वेदातील ऋचांचा हवा तसा अर्थ काढुन सिद्धही करतील...हे सोडा...आकाशात निर्माण होणारी वीज अंटेना द्वारा ग्रहित करून सा-या जगाचा वीजेचा प्रश्न फुकटात सुटेल असे शास्त्र ऋग्वेदात आहे असे सांगनारे महामुर्ख वैदिक विद्न्यान दिन साजरा करतात...यांना नोबेल काय....त्याच्या कोटपट पुरस्कार मिळेल...पण सिद्ध का नाही करून दाखवत? हजार बिल गेट विकत घेता येतील कि! एक लक्षात घ्या...वेद हे महत्वाचे आहेत ते त्या काळातील नुसते (काही भाग प्रक्षिप्त असला तरी) वैदिक समाजव्यवस्थेचेच नव्हे तर तत्कालीन सांस्क्रुतीक संघर्षाचे चित्रण अभ्यासोपयुक्त आहे म्हणुन. विष्णु ही देवता ऋग्वेदात फक्त साडेतीन ऋचांत येते आणि तीही ईंद्राचा दुय्यम मित्र म्हणुन. यातील एका ऋचेत विष्णु हा (सुर्यरुप मानला असल्याने) तीन पावलात भुमी, पाताळ आणि अवकाश व्यापतो याचा आधार घेत पुढे पुराणकारांनी बळीराजाला विष्णुने वामनरुप घेवुन पातालात गाडले अशी भाकड कथा बनवली आहे. पण प्रत्यक्षात परंपरेने देशात पुजा होते ती बळीची...वामनाची नव्हे...पुराणकारांनी शिवाला दुय्यम करण्याच्या नादात त्याचे दहा अवतार बनवले. या अवतारांचा ऋग्वेद ते ब्राह्मणे ते उपनिषदे यात कसलाही उल्लेख नाही. त्यांनी बुद्धालाही विष्णुचा अवतार बनवुन टाकले. पण गम्मत ही लक्षात घ्या या दहा अवतारांत एकही, वामन वगळता, वैदिक नाही, आणि वामनाची मंदिरेही नाहीत वा त्याची जनसामान्य कधी पुजाही करत नाहीत. उलट या कथेतुन एकच सिद्ध होते कि बळी हा महान असुनही केवळ इंद्राला त्याच्या पदाची काळजी वाटु लागल्याने (ईंद्रपद हे बदलते होते...आणि पुण्यवंतच त्यावर आपसुक कब्जा मिलवत असे) विष्णुने (वा कोणा वैदिकाने) त्याला ठार मारले. आणि ॠग्वेदातील तीन पावलात विश्व व्यापणा-या विष्णुला ते श्रेय दिले गेले. शंबर ते व्रुत्र यांच्या हत्या तर ऋग्वेदातच उल्लेखित आहेत. आता त्यात आधुनिक विद्न्यान शोधा असे म्हनना-या सनातनी विद्वानांच्या बुद्धीची कीव करणे भाग आहे. ऋग्वेदातील विष्णु हे स्रुष्टीनियमाचे तात्कालिक प्रतीक आहे. त्याबद्दल ऋग्वैदिक ऋषिंच्या प्रतिभेला सलाम केलाच पाहिजे...पण हे आधुनिक वेडगळ स्वता: विद्न्यानाच्या शोधात आजही न जाता अंधारयुगात वावरत पुर्वज महत्ता, केवळ इतरांना संस्क्रुत समजत नाही या भ्रमात, धादांत खोटी विधाने करतात त्यांची कीवच केली पाहिजे. ऋग्वेदातील संस्क्रुत ही कुटभाषा असेही ते बिनदिक्कतपणे सांगतात...मग यांना शक, हुण, कुशाण, मुस्लिम, पोर्तुगीज़, ख्रिस्ती आक्रमणे रोखायला...एवढेच नव्हे तर त्यांना जंबुद्वीपाच्या स्वामित्वाखाली आनायला कोणी रोखले होते? त्यांना तर ते कुटार्थ माहित होते ना? कशाला गुलाम झाले आणि त्यांच्या चाक-या केल्या? इतरांचे ठीक होते कारण त्या बिचा-यांना वेद कोणी शिकवतच नव्हते...तर मग त्यांना दोष कसा देता येईल? शेवटी समाजाचे जे मुख त्यांनी तरी स्वता:ची आणि आपल्या शुद्रातिशुद्र दासांची काळजी घ्यायला नको होती का? ती घेतली नाही...घेऊ शकले नाही...त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही...पण आज सारे आधुनिक विद्न्यान वेदांत ठासुन भरले आहे हे सांगणे हे अश्लाघ्य आणि स्व-वंचना करनारे आहे.

अवतार कथा मुळात ऋग्वेद वा अन्य कोणत्याही वेदांत नाहीत. ऋग्वेदाबद्दल सर्वात मोठे आस्चर्य जागतीक वेदाभ्यासकांनी व्यक्त केले आहे ते हे कि वेदांत स्रुष्टीजन्माची कोणतीही कथा येत नाही. पुरुषसुक्त हे दहाव्या मंडलात येते आणि तेही प्रक्षिप्त आहे हे मी सिद्ध केले आहे कारण मुळात वर्णव्यवस्था ही अन्यत्र ऋग्वेदात यत्किंचितही दिसत नाही. एकच मनुष्य एकाच वेळीस तीन वर्णांचा असू शकत होता. उदा. गावात राहतो तो विश...तोच मंत्र रचत असेल तर त्या क्षणी ब्राह्मन...आणि तोच ज्या क्षणी युद्धात जातो तेंव्हा क्षत्र...म्हणजे वर्ण हे एकाच्याच हयातीत प्रसंगपरत्वे बदलत होते. हे एक समाजशास्त्र आहे. आणि तेच संयुक्तिक होते आणि आहे. तुम्ही विष्णुला उर्जा रुपात पाहता कि अजुन पौराणिक द्रुष्टीने हा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण विष्णु हा आदित्यांपैकी एक मानला गेला आहे आणि आदित्य हेच मुळात ऋग्वेदानेच असूर मानले आहेत...त्याचे काय करणार?

Friday, July 29, 2011

मग कशाला हवा उद्वेग आणि क्रोध बरे?

मित्रा
अंत:करणात तुझ्या घोंगावणारे वादळ
आणि दांभिकांच्या अविरत कोसळणा-या
झुंडीबद्दलचा उद्वेग
पाहिला कि मलाही आठवतो
तो संतप्त उद्वेगी पावसाळा
जो कोसळु पहात असलेल्या सरी उरी आवरत
घेत आकुंचुन आपले विराट रूप नि
कसा सहज जातो निघून
या क्षितिजाकडुन दुस-या क्षितिजाकडे
बेपर्वा असा कि जसे
कशाकशाशीच घेणे नाही!
(एवढा संतप्त?)

पण मित्रा-
तुझ्या वर्षण्यानेच हे अद्न्य जन
आणि वर्षेची मुळात गरजच काय असे विचारणारे
वांझ भूमीपुत्र
अखेर तुझ्या कोसळण्यातच संतोष पावणार असतील...
तर जा एकदाचा कोसळुन...
त्यांना अखेर मिळू देत एक समाधान...
नाहीतरी
कोठे ना कोठे कोसळायचे तर आहेच ना तुला?
रिते करायचेच आहे ना तुझे आस्तित्व
त्या जलभरल्या मेघांप्रमाणे?

(पावूस एका भुमीवर उद्वेगला तरी तो थांबणार आहे?
दुर्दैव हे कि मित्रा ही भुमी आपली आहे...वांझ असली...अनुत्पादक असली तरी...)

हे बघ...
जशी जगाला गरज आहे
नियमित येणा-या सर्जक पावसाळ्याची
नि पावसाला गरजच कि
वाट मिळेल तेथे
आपले पान्हे सोडायची
पण तो पान्हा
सुफल भुमीवर पडेल
कि खडकाळ रानोमाळावर
जेथे
कदाचित होणार नाही कसले नवनिर्माण...
पण त्याची पर्वा पावसाने जर कधी केली नाही
तर तुच तुझा वर्षाव
का बरे रोखतो आहेस?
(या वांझ भूमीत काहीच उगवणार नाही हाही निर्णय खरा नव्हे...
किमान उगवेल एक त्रुणांकुर
सावळया आभाळाला इवल्या पात्यांत
दिठीत घेणारा?)

हे बघ मित्रा...
मलाही अनेकदा म्रुत्युभयाने केले होते उदास...
वाटत होते
गेलो झरून मी पुर्णपणे
तर माझे असेल ते आस्तित्व काय?
ज्यामधे असेल विरलेलो मी
ते जीवनदायी
माझ्या स्म्रुती तरी
ठेवतील काय?
पण त्या ज्या-ज्या म्रुत्तिकांत
विझलो मी
त्या कणांतुन पाहतो
पुन्हा पुन्हा येणारा पावसाळा
आणि झेलत आलो आहे
त्या थेंबाथेंबातला
तोच उन्माद आणि जिव्हाळा
त्या त्या पर्जन्य-क्षणांनी
दिलीय एक जाणीव प्रगल्भ
....
जर हेच मेघ याच थेंबाथेंबातुन स्वत: मरत असतात
नवसर्जनासाठी
आणि हेच कण-कण पुन्हा मरत
मेघ बनत असतात
पुन्हा दिव्य स्रुष्टी घडवण्यासाठी...
आकार वेगळा असेल...वेळ वेगळी असेल...
किंवा वेळ आणि आकार
हेच एकमेकांत निराकार होत व्यापलेले असतील...
आणि ज्या भुमीवर काळ आणि हे आकारविहीण मेघ आस्तित्व रीते करतील
ती भुमीही वेगळी असेल...
पण जर झरून निराकार होण्यात
खंत मानत नाहीत हे मेघ...
तर मग मला म्रुत्युचे भय
असावे तरी का बरे?

बघ मित्रा...
जे भय मला नाही
जे भय तुलाही नाही
महास्तित्त्वात आपले
आस्तित्व विलीन व्हावे
हा भासही नाही...आभासही नाही
स्वप्नही नाही...
जे असे एक वास्तव
मग उद्वेग कशाला त्यास्तव?

आपण वर्षू तेथे काटे उगवणार कि
फुले
याची पर्वा कोसळतांना पावूस जर कधी करत नाही...
मग आपणच का बरे
खंतावलो आहोत?

चल...धरुयात हात हाती
तुडवुयात हीच माती
तशीच सफर करुयात आभाळावरती
झरू जेथे
उगतील काही त्रुणपाती...
कारण....
त्या त्रुणपात्यांत पुन्हा आपणच असणार आहोत
आणि
नव्या पावसाळ्याला आपल्या इवल्या बोटांनी
तुडवले जात नाही तोवर
पुन्हा पुन्हा
निमंत्रण देणार आहोत...
ना संताप...ना उद्वेग...ना आशा...ना अपेक्षा...
ही स्रुष्टी
जोवर स्रुष्टीची होत नाही
तोवर पुन्हा पुन्हा मरणार आहोत...

मग कशाला हवा उद्वेग आणि क्रोध बरे?

Wednesday, July 27, 2011

"आजपासुन आपण मावळे...ते कावळे..."

ब्रेकींग न्युज:

आज पुण्यात रोजप्रमाणेच डोंबकावळ्यांची बैठक भरली. त्यात खेड्यातुन आलेले तसेच शहरांतुन (उपनगरांतुन...कारण शहरांत त्यांना जागाही नाही आणि पक्षीसंग्रहालयांत कोणी ठेवून घेत नाही...) आलेले आणि दिवसेंदिवस उग्र आणि हिंसक होत चाललेले डोंबकावळे होते. या बैठकीचे अध्यक्षपद निर्विवादपणे (कारण वाद घातला तर मरणाची आफत कोण घेणार?) म्हणुन भाई डोंबकावळा यांच्याकडे दिले गेले. बैठकीतील उपस्थित बहुतेक डोंबकावळे हे फ़ेसबुकवरील त्या भाईच्याच अन्य प्रतिमारुपे असल्याने ही निवड तर जवळपास स्वयंघोषित असल्यासारखीच होती. "विश्व म्हणजे माझीच प्रतिमा आहे" हे तत्वद्न्यान किती खरे आहे याचा साक्षात्कार या भाई डोंबकावळ्याने देत सरळ विषयाला हात घातला आणि विचारले..."आज कोण कोणाला किती आणि कशा शिव्या देणार?"

सर्व उपस्थितांनी काव काव केली आणि एकसुरात सांगितले..."१००० शिव्या भटांना..."
"एवढ्याच?" भाईने विचारले.
"काल ९९९ दिल्या होत्या...म्हनुन आज १०००..."
"नाही हे चालनार नाही. तुम्ही चळवळ कशी पुढे नेणार?"
"पण साहेब भटही आजकाल आम्हाला उलट शिव्या देतात....त्यांना आम्ही पुन्हा शिव्या देतो...त्या मोजल्या तर कोटभर होतील..."
"नाही, हे पुरेसे नाही..." असे भाई डोंबकावळे डोळे वटारुन बोलले. "तुम्हाला एवढे १००० फ़ेक अकाउंट फ़ेसबूकवर काय फक्त १००० शिव्या द्यायला निर्माण करुन दिले? माझे एकट्याचेच पहा...१२० आहेत...कोठे मीच ब्राह्मण असतो...तर कोठे बौद्ध...मी कोठे ओ बी सी असतू तर कोठे भटका विमुक्त...अरे गाढवांनो क्रुष्णालाही एवढे चमत्कार करता आले नसते ते मी करतो...बौद्ध होवुन ओबीसींना शिव्या देतो...आणि ओबीसी होवुन भटांना शिव्या देतो...आणि तुम्ही साले रोज फक्त १००० शिव्या हासडता?"

भाई रागावला आहे हे कळाले तसे सारे (भाईची प्रतिरुपे सोडुन) बाकी कावळे सावध झाले. भाईचे खेडे म्हनजे एक राजधानीच आहे हे लक्षात घेउन गयावया करत म्हणाले...
"भाई...बामनांच्या शिव्यांचा कोटा १०,००० ने वाढवतो...आपल्यावर जेही कोणी टीका करतात त्यांच्यावर त्याच्या हजारपटीने कोटा वाढवतो...पण एक अडचण आहे..."

"काय?" भाई कावळ्याने डोळे वटारुन विचारले.

घाबरलेल्या डोंबकावळ्याने इतस्तता: पाहिले...पण कोणी समर्थक दिसेना तसा तो गयावया करत बोलला..."पण भाई, शत्रुच्या गोटांत आपलेच कावळे आहेत...तेच साले आपल्याविरुद्ध काव-काव करतात...त्यांचे काय करायचे?"

भाई डोंबकावळ्याने आपल्या खेड्याला फोन लावला. तेथील महान डोंबकावळा नेता त्याच्याशी प्रत्यक्ष बोलला. भाइने हा...हुं केले...आणि मग फोन ठेवून कावला...
"साले....xxxxxxxxxxxxxxxxx तुम्ही कावळे ते कावळेच. जे विरोध करतात ते कावळे नाहीत तर xxxxx मावळे आहेत. त्यांना अजुन झोडा...सापडतील तेथे त्यांच्या टाळक्यावर चोचा मारा...आणि xxxxx जमत नसेल तर "क" चा "म" करा. भटांनी ध चा मा नाही केला?...आपणही वारंवार करत नाही आलो? या मावळ्यांना कावळे करुन टाका..."

"मग आपण कोण?" कोप-यात बसलेल्या एका डोंबकावळ्याने विचारायचे दु:स्साहस केले...

"आजपासुन आपण मावळे...ते कावळे..."

असे उग्र कावकावीत भाई डोंबकावळ्याने सांगितल्यावर कोनाची हिम्मत होती...आपण कावळे कि मावळे यावर वाद घालण्याची?

Sunday, July 24, 2011

मी अटक झालो त्याची कथा...!

खरे तर मी हे स्पष्टीकरण देणार नव्हतो. पण काही मित्रांनी आग्रह केलाच आहे म्हणुन हे अल्प स्पष्टीकरण देत आहे. सविस्तर येत्या किर्लोस्करच्या दिवाळी अंकात वाचावे. कारण मुळात हा प्रश्न अत्यंत गहन असून सत्ताधारी हे प्रशासनाला कसे नाचवतात याचे उत्तम उदाहरण आहे.

वाशिंग्टन सोफ्टवेअर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी असुन ती मुम्बई स्टोक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे. या कंपनीचा टर्नओव्हर हा किमान ९ कोटी ते ३२ कोटींच्या दर्म्यान गेली १६ वर्ष राहीला आहे. या कंपनीचा मी संस्थापक अध्यक्ष आजही असून या कंपनीची स्वताची IPR असनारी उत्पादने जगभर विकली जातात. याची सत्यता पडताळण्यासाठी मुंबई स्टोक एक्स्चन्ज च्या अधिक्रुत वेबसाईटवर जावे.

या कंपनीचे देशभर ३२ तर विदेशात ८ वितरक होते. बव्हंशी आजही आहेत. माय होम व माय बिझिनेस या घरगुती उपयोगाच्या व लघुअव्यावसायिकांच्या उपयोगाच्या प्रणाल्या आम्ही १९९९ सालापर्यंत विकसीत केल्या. त्याचे वितरण अधिकाधिक व्हावे यासाठी वितरक नेमण्याच्या फ़ेब. २००२ मधे जाहिराती दिल्या. त्या इच्छुकांत इस्लामपुर येथील संजय पाटील व अमोल गुरव होते. त्यांनी अर्ज दिला परंतु या भागात सोफ्टवेअर विकण्यासाठी किमान संगणक तर हवेत ना असा मी प्रश्न उपस्थित केला असता माझ्या सेल्स टीमने सांगीतले कि त्यांचा परफोर्मन्स बघु मग डीलरशीप द्यायची कि नाही हे ठरवू. त्यांनी कार्यालयातुन सी.डी. रोख पैसे देवुन (२५% कमिशन वजा जाता.) घेवुन जायच्या आणि विकायच्या असा क्रम जवळपास मे २००२ पर्यंत सुरू होता. आश्चर्य म्हणजे त्यांनी केवळ २ महिन्याच्या कालावधीत ३५ च्या आसपास उत्पादने विकली. यानंतर त्यांनी विजय पाटील हे राजकीय प्रस्थ मधे आणुन माझ्या सेल्स टीमला प्रस्ताव दिला कि कर्नाटक, गोवा हे प्रांत आम्हाला द्या. आम्ही याहीपेक्षा मोठा सेल घडवून आणु. पण त्यासाठी आम्हा तीघांना तीन कार द्या. जेंव्हा आम्ही आमचे ५००० उत्पादने विकण्याचे टार्गेट पुर्ण करू तेंव्हा त्या कार आमच्या नावावर ट्रान्स्फेर करा. २५% कमिशन तर मिळायलाच हवे. हा प्रस्ताव माझ्या टीमला आवडने स्वाभाविक होते. मी त्यात तीन महिन्याची कालमर्यादा निस्चित करून करारनामा करुन घेण्यास सांगीतले. तसे स्ट्यम्पपेपरवर तीन प्रत्येकाशी विभागुन (५०००/३) करार करण्यात आले. विजय पाटील यांना टाटा इंडिका, संजय पाटील यांना मारुती ८०० व अमोल गुरव यांना मारुती ओम्नी दिली गेली. या गाड्या त्यांच्या नावावर नव्हे तर कंपनीचे संचालक अभय शास्त्री यांच्या नावावर घेतल्या गेल्या होत्या. जर त्यांनी टार्गेट मुदतीत पुर्ण केले तरच त्यांच्या नावावर केल्या जानार होत्या.

हा पहिला अध्याय झाला. याच काळात पी.टी.सी. या अमेरिकन कंपनीशी आमचा भागीदारीचा करार झाला. पाटील कंपुशी झालेला करार एवढा महत्वाचा नव्हताच. जुन २००२ मद्धे त्यांच्यासोबतच्या कराराची मुदत संपली. करार केल्यापासुन व गाड्या नेल्यापासुन या मंडळीने १ रुपयाचाही नवीन सेल केला नाही. फोनचे नंबर बदलले. संपर्क थांबवला. विजय पाटील तेवढे सतर्क होते. ते संजय पाटील व अमोल गुरवला शिव्या घालत होते कि तुम्ही काम का करत नाही. मी केवळ विजय पाटीलांवर विश्वास ठेवला. पण महिने उलटले...गाड्या परत नाहीत...हे पैसे भागधारकांचे...माझ्या बापाचे नव्हेत. मी जून २००२ ला कायदेशिर नोटिस सर्वांना पाठवली. असा अनुभय अन्य ३२ वितरकांनी मला दिला नव्हता. या नोटीशीचे उत्तर आले नाही. मग मी माझ्या श्री. पगडे या अधिका-याला कायदेशिर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला व त्यानुसार कोथरुड पोलिसांनी कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांच्या सुचनांनाही ही मंडळी जेंव्हा जुमानेना झाली तेंव्हा श्री विट्ठल शिंदे नामक पोलिस अधिकारी आपल्या ताफ्यासह इस्लामपुर येथे पोहोचले. ही रात्र १ फेब्रुवारी २००३ ची होती.

मध्यरात्री पुणे पोलिसांनी अमोल गुरव व संजय पाटील यांना अटक केली. त्यांच्या त्ताब्यातील कंपनीच्या दोन गाड्या जप्त केल्या. विजय पाटील त्यांना सापडले नाही. पोलिस जेंव्हा दुस-या
पोलिस क्षेत्रात एखाद्याला अटक करतात व आपल्या क्षेत्रात घेऊन जातात तेंव्हा पोलिस स्टेशन डायरीला नोंद अनिवार्य असते...तशी त्या दोघांची झाली.

आता गम्मत पहा...

अजामीनपात्र गुन्ह्यात अटक केली तर त्या आरोपीला सोडायचे, रिमांड द्यायचा हे सर्वस्वी न्यायालयाच्या हाती असते. पोलिस काय राष्ट्रपतींनाही त्यात हस्तक्षेप करता येत नाही.

पण....

विजय पाटील...जे अटक झाले नाही...त्यांनी जयंत पाटील यांचा उपयोग केला. तेंव्हा जयंत पाटील हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते. जयंत पाटील हे विजय पाटील यांचे काका...(हे मला तेंव्हा माहित नव्हते...) पुण्याचे पोलिस कमिशनर तेंव्हा होते श्री. Anamy Roy. श्री रोय यांनी इस्लामपुरात अटक झालेले दोन आरोपी कर्हाडपर्यंत पोहोचतात तोवर इन्स्पेक्टर शिंदे यांना एस्कोर्ट फ़ोर्स पाठवून वाटेत अडवायला लावले व त्या दोन्ही आरोपींना तेथेच सोडुन द्यायला सांगितले. ई. शिन्दे (त्यांनीच मला नंतर ही हकीकत सांगितली म्हणुन...) त्यांना सोडायला तयार नव्हते. यात त्यांचीच नोकरी धोक्यात येईल हे त्यांना कळत होते. पण अनामी रोय यांनी खात्याशी, कायद्याशी गद्दारी केली आणि विट्ठल शिन्दे यांना त्या आरोपींना सोडायला भाग पाडले. यामागे जयंत पाटील यांचा अलिखित आदेश होता हे उघड आहे. इस्लामपुरची १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी २००३ ची पोलिस डायरी कोणीही माहिती अधिकाराच्या कक्षेत मागवावी...सत्य समोर आहे.

हे येथे थांबले नाही. विट्ठल शिंदेंवर डिपार्टमेंटल मेमो निघाला. तेथील (कोथरुड पोलिस स्टेशन) मधील मुख्य ईन्स्पेक्क्टर पाटील यांची बदली केली.

नंतर २९ मार्च २००३ च्या मध्यरात्री गायकवाड नावाच्या सब-इंस्पेक्टरने भली मोठी ग्यांग घेवून मला घरात अटक केली. माझ्यावरचे आरोप सांगितले नाही वा मला इस्लामपुरच्या न्यायालयासमोर उभे न करता कस्टडी घेतली. मी व माझ्याबरोबर पुरेपुर निर्दोष असलेल्या मुकुंद मुळेलाही त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर इस्लामपुरात माझी व मुळेची धिंड या गायकवाड नामक इंस्पेक्तरने काढली. त्याचे फोटो तत्कालीन पुढारी, तरुण भारत या व्रुत्तपत्रांत आहेतच.

मी अनामी रोय, जयंत पाटील यांना जास्त दोषी मानतो. तुम्हाला आस्चर्य वाटेल...खुद्द विजय पाटील, ज्यांनी माझ्याविरुद्ध सुडापोटी गुन्हा दखल केला तेच विजय पाटील हे मी निमंत्रण देता जेंव्हा माझ्या चित्रपटाचा सांगलीत मुहुर्त होता त्याचे प्रमुख दीपप्रज्वलक होते. त्यांनी तोवर संजय पाटील आणि अमोल गुरवला कधीच बाहेरची वाट दाखवली होती.

कायदा म्हनजे नेमके काय असते रे भाऊ असा प्रश्न ज्यांना प्रश्न पदला असेल त्यांच्यासाठी सांगतो...

अमोल, संजय वा विजय....जे काही चुकले ते चुकले...

पण कायद्याच्या चौकटीत हस्तक्षेप करुन, आणि असंख्य अन्याय सहन करतात ते गप्पच बसतील या भ्रमात राहुन, आजही माझे वा सत्यान्विषेकाचे तोंड बंद करु पाहतील, त्यांना आपले नवे भविष्य शोधावे लागेल.

अनामी रोय आणि जयंत पाटील हे खरे आरोपी आहेत....
यांचे लांगे-बांधे आज ना उद्या काळच शोधेल....!

सांख्य तत्वद्न्यान: थोडक्यात परिचय

भारतीय संस्क्रुतीत सहा दर्शने अत्यंत महत्वाची मानली जातात, त्यापैकी एक म्हणजे सांख्य दर्शन. या तत्वद्न्यानाचा प्रवर्तक म्हनजे कपिल मुनी. हा असुर प्रल्हादाचा पुत्र. भग्वद्गीतेत श्रीक्रुष्णाने "मुनीनां कपिलास्मि" म्हणुन त्याचे अभिवादन केले आहे. कपिलाने प्रवर्तीत केलेले सांख्य दर्शन पुढे त्याचा मुख्य शिष्य आसुरी याने प्रचारीत केले. या तत्वद्न्यानालाच सांख्ययोग असेही म्हनतात.

या तत्वद्न्यानाला सांख्य म्हटले जाण्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे सांख्यांनी विश्वनिर्मिती व जीवनासाठी २५ विभिन्न तत्वांची कल्पना केली आहे. दुसरे व्युत्पत्ती अशी कि विवेकद्न्यान हेच या तत्वद्न्यानात महत्वाचे मानले गेले असल्याने त्यास सांख्य म्हतले जाते. हे दर्शन भगवद्गीतेच्या निर्मितीपुर्वी किमान १००० वर्ष आधी आस्तित्वात आले.

या तत्वद्न्यानाची महत्ता म्हणजे ईश्वरी सार्वभौम सत्ता यात ठोकरून लावण्यात आली असून तत्वेच विश्वाच्या निर्मितीचे कारण मानन्यात आले आहे. प्रक्रुती व पुरुष हीच आद्य दोन मुलतत्वे आहेत व प्रक्रुती ही जड असून पुरुष हा चेतन आहे असे मानण्यात आले आहे. यात पुरुष म्हणजे धनात्मक उर्जा तर प्रक्रुती म्हनजे ऋणात्मक उर्जा असे महत्वाचे वैद्न्यानिक ग्रुहितक धरण्यात आले आहे.

हे तत्वद्न्यान संक्षिप्तपणे असे आहे....

१. जर जगातील सर्वच पदार्थ सीमित (Limited) आणि परतंत्र (dependent) असतील तर त्याचे मुलकारण मात्र असीमित (unlimited) व स्वतंत्र (independent) असले पाहिजे. आजही विश्व सीमित असले तरी उर्जा मात्र असीमित आहे या निष्कर्षाशी भौतिकविद पोहोचले आहेत.

२. प्रत्येक पदार्थात सत्व, रज, तम हे गुण द्रुष्टीस येतात. आणि प्रत्येक पदार्थ हा सुख, दु:ख वा मोह उत्पन्न करणारा आहे. याचाच अर्थ ही सर्व वैशिष्ट्ये एकाकार असनारे मुलकारण कोठेतरी असले पाहिजे.

३. प्रत्येक कार्य हे कारणात अव्यक्तपणे दडलेले असते. हे जग म्हनजे अन्य काही एक नसून असंख्य कार्यांचा एक समूह आहे. या कार्यांत जे कारण अव्यक्त रुपाने असते ते म्हणजेच प्रक्रुती होय.

४. कोणतेही कार्य कोणत्यातरी कारणातुन निर्माण होते आणि शेवटी कार्य हे कारणातच विलीन होते. प्रक्रुती हीच सर्व कार्यांचे कारण आहे. विश्वाची निर्मिती या प्रक्रुतीमुळेच होते. प्रक्रुती (कारण) ही अद्रुष्य पातळीवर वावरत असून विश्व (कार्य) मात्र द्रुष्य असते. या दोहोंच्या संयोगाने विश्व निर्माण होते व जेंव्हा कार्य हे कारणाच्या दिशेने उलट वाटचाल सुरु करते तेंव्हा विश्व लय पावते.

एकच घटना दु:ख, आनंद वा उदासीनता निर्माण करू शकते आणि ते त्या घटनेत सहभागी असणा-यांच्या स्वाभाविक अपेक्षांवर अवलंबून असते असेही हे दर्शन सांगते आणि ते महत्वाचे आहेच. जे गुणधर्म कार्यात असतात तेच कारणातही असल्याने मुलतत्वात शेवटी एकाकारता सिद्ध होते. या सत्व-रज-तम यांतील साम्यावस्था म्हणजे प्रक्रुती होय असेही हे दर्शन सांगते. तसेच द्न्यानाची उत्पत्ती ही एकटी स्वतंत्रपणे होत नसून ती आत्मा (चैतन्य) आणि बुद्धी यांच्या सहायातेनेच होते. पुरुषाला बुद्धी, मन, इंद्रिये आणि चैतन्य याच्या समागमाने द्न्यान होते.

सर्वात महत्वाचे म्हनजे सांख्य तत्वद्न्यान हे भावनीक नाही. ते श्रद्धेवर अवलंबुन नसून निखळ बौद्धिक तर्कशास्त्रे व वास्तव अनुभव यावर आधारीत आहे. येथे कर्ता-करवित्या परमेश्वर या संद्न्येला महत्व नसून मानवी प्रद्न्या आणि तर्काच्या बुद्धीनिष्ट पातळीवर जीवनाचे, स्रुष्टीचे अवगाहन महत्वाचे मानले गेले आहे.

पुढे ही तर्कनिष्ठ परंपरा मागे पडली आणि सांख्य दर्शनही. भारत देश हा श्रद्धाळु अंधविश्वासू समुदाय बनला आणि विद्न्यानाची झेप थांबली ती थांबलीच. ईहवाद मागे पडला आणि काल्पनिक परलोकवादाच्या मागे सारे लोक लागले. या देशाची प्रागतीक गती खुंटली ती खुंटलीच. आजही कपिलाचे हे तत्वद्न्यान पुढे नेले गेले पाहिजे...फक्त तात्विक पातळीवर नव्हे तर आचरणात. आज विद्न्यानात मानले जाणारे महत्वाचे सिद्धांत बीजरुपात का होईना , सांख्य दर्शनात आढलतात याबद्दल आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे आणि त्या बुद्धीनिष्ठ तत्वद्न्यानाची आपण कास सोडली याबद्दल शरमही!

Saturday, July 23, 2011

सोमवंश....भारतीय संस्क्रुतीचे मुळ घटक...एक अभ्यास!

भारतीय धर्मेतिहास/इतिहास हा माहित करून न घेण्याच्या प्रयत्नांमुळे असंख्य गैरसमज प्रचलित आहेत. येथे मी थोडक्यात सोमवंश हा सुर्यवंशाच्याच बरोबरीने प्रसिद्ध असनारा पुरातन राजवंश/लोकसमुदाय आहे त्याबद्दल माहिती देत आहे. पुरुरवा हा सोमवंशाचा मुळ पुरुष अशी मान्यता आहे. सोम म्हणजे चंद्र हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हे चंद्राला आपले पुर्वज मानणारे लोक हे स्त्रीसत्तावादी होते. चंद्र हा तत्कालीन जनमानसात स्त्रीचा भाऊ नव्हे तर पती मानला जात होता. कारण स्त्रीचे स्त्रीत्व हे चंद्रकलांवर अवलंबुन होते/आहे. त्या काळात पुरुष हा जननक्रियेतील महत्वाचा घटक आहे हेच मुळी द्न्यान नव्हते व विवाह संस्था अद्याप अस्तित्वात आलेली नवहती. सोमवंश हा तदर्थाने आद्य संस्क्रुतीचा घटक होता. पुरुरवा यास या वंशाचा आद्य पुरुष मानले जाते. किंबहुना "पुरुष" हा शब्दच या पुरुरव्याचा आजतागायत जतन केला गेलेला महिमा आहे.

कालिदासाने विक्रमोर्शियम यात जी इतिहासकथा सांगीतली आहे ती येथे उल्लेखनीय आहे. भारतात पहिली द्न्यात राजसत्ता स्थापणारा हा वंश असूर होता हे यावरुन सिद्ध होते. पुरुरवा हा सप्तद्वीपांचा राजा होता. तो यद्न्यविरोधक होता. त्याने अनेक यद्न्यांचा नाश केल्याने चिडलेल्या ऋषिंनी नैमिषारण्यात त्याचा खुन केला व त्याचा मुलगा आयु यास सिंहासनावर बसवले. आयु हा प्रतिष्ठान (म्हणजे महाराष्ट्रातील पैठण?) येथुन राज्य करु लागला तर त्याचा भाऊ अमावसु याने स्वतंत्रपणे कान्यकुब्ज येथे राजधानी करुन स्वतंत्र राज्य बनवले. आयुने असुर राजकन्या प्रभाशी विवाह केला. त्याचा मुलगा नहुष. नहुषाची कथा महाभारतात विस्ताराने आलेलीच आहे त्यामुळे येथे मी त्याबद्दल अधिक लिहित नाही...पण नहुषानेही यद्न्यधर्मीय ऋषिंना छळले म्हणुन त्यालाही ठार मारण्यात आले. त्याचा मुलगा ययाती. ययातीने असुरांचा गुरु शुक्राचार्य (भ्रुगूवंशीय) याची कन्या देवयानीशी तसेच असूरसम्राट व्रुषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा यांशी विवाह केला. देवयानीपासुन त्याला यदु हा पुत्र झाला. यदु हे पुढे यादव म्हणुन प्रसिद्धीला आले व त्याच वंशात श्रीक्रुष्णाचा जन्म झाला. शर्मिष्ठेपासुन त्याला अनु, द्रह्यु, व पुरु हे पुत्र झाले. ययातीनंतर पुरुला राज्य मिळाले हा इतिहास सर्वांना माहितच आहे.

यदु वंशातुनच हैहय ही शाखा निर्माण झाली. सहस्त्रार्जुन हा हैहय सम्राट त्यातीलच. परशुराम याच शाखेतील. हे सर्वच असूर संस्क्रुतीचे लोक. भारताची आद्य द्न्यात राजकीय संस्क्रुती निर्माण करणारे लोक. हैहय आणि परशुराम खुप झगडले पण त्यामागील कारणे सर्वस्वी सांस्क्रुतीक होती. भारत हे नाव देशाला मिळावे असा लोकोत्तर पुरुष निर्माण करणारे हे लोक. पुरुष, पुरंध्री, पूर, ही विशेषनामे याच पुर्वजांपासून निर्माण झाली आहेत हे विसरता येत नाही. यद्न्यधर्मियांशी सातत्याने संघर्ष करनारे हेच ते लोक. प्रसंगी यद्न्यधर्मियांनी त्यांचे खुनही केले आहेत. अगदी खुद्द पुरुरव्याचाही. पण त्यांचे महिमान आजही जीवित आहे...फक्त ते आपण डोळे उघडुन पहायला तरी हवे कि नाही?

क्रुष्णाबद्दल कोणाची मते काहीही असोत, पण तो इंद्रविरोधक होता. गीतेत त्याने ज्यांनाही आपले अंश मानले आहे ते असुरच आहेत. किंबहुना ज्या सांख्य तत्वद्न्यानावर गीतेची इमारत उभी आहे ते सांख्य तत्वद्न्यान प्रवर्तीत करणारा कपिल हा असूर प्रल्हादाचाच मुलगा होता. हे असुर संस्क्रुतीचे महिमान आहे. त्यावर कितीही वैदिक पुटे चढवली तरी ती कदापी पुसता येण्यासारखी नाहीत.

आणि आजही या सोमवंशाचे वारस, अनेक उच्च-नीच जातींत वाटले गेले असले, तरीही ते एका महान वारशाचे पाईक आहेत हे विसरता कामा नये.

Wednesday, July 13, 2011

पुन्हा...पुन्हा...आणि पुन्हा....दहशतवाद!

काल १३ जुलै २०११...तीन साखळी स्फोट...रक्ताचे सडे...असुरक्षिततेची अपरिहार्य लाट, शासन-पोलिस-गुप्तचर यंत्रणांविरुद्ध पराकोटीचा संताप...निषेध...राजीनाम्यांच्या मागण्या...तेच धीर-संयमाची भाषा...या मागील आरोपी संघटना कोणत्या याची तात्काळ उद्घोषणा...काय नवीन राहिले आहे या क्रमात? मी "मुंबई २६/११...पुर्वी आणि नंतर" हे पुस्तक लिहून २ वर्ष होवून गेली..."असे पुन्हा न घडण्यासाठी..." हे प्रदिर्घ प्रकरण त्यात लिहिले...वर्षभरात पुण्यात जर्मन बेकरीचे प्रकरण घडले. आरोपी नेमके हे कि ते यात पोलिसी यंत्रणा बराच काळ घोळ घालत राहीली. आताही तेच होईल...
कोणती सुधारणा झाली आहे शासकीय यंत्रणांत आणि समाजातही? कट्टरपंथियांनी बाबरी मशिद पाडल्यापासून भारतात धार्मिक दंगलींची जागा सुनियोजित दहशतवादाने घेतली. तत्पुर्वी खलिस्तानवाद्यांच्या दहशतवादात देश होरपळला होता. त्याची जागा इस्लामी मुलतत्ववाद्यांनी घेतली. दाउदला जिंदा या मुर्दा आणतो म्हणणा-यांनी सत्ता मिळवली-घालवली...काय झाले? कडव्या हिंदुत्ववादी संघटनाही स्फोट घडवू लागल्या...कोणता चाप लावला गेला? महाराष्ट्रातील कडवे मराठे संघटकही विशिष्ट जातीयांची कत्तल करण्याची भाषा करू लागले...ते खरोखरच दहशतवादी क्रुत्य करत नाहीत तोवर वाट पाहायचे ठरवले आहे कि काय?
घटना घडुन गेल्यानंतर कारवाई करायची. लोकांनी अपराध्यांना भर चौकात फाशी देण्याची मागणी करत रहायचे हेही समाजाचे नाटकच आहे. मुळात समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. सामाजिक कर्तव्ये आणि उत्तर्दायित्वाचा पुरेपुर अभाव आहे. या स्वयंकेंद्रित समाजातुनच आलेले अधिकारी वेगळे काय वागणार? नेते तरी काय दिवे लावणार? अशा घटना घडत नाहीत तोवर नेते अधिकारी ज्या स्वार्थप्रेरित भावनांत लडखडलेले असतात तसाच समाजही बरबटलेला नसतो कि काय? तात्पुरत्या कारवाया...त्याही घटना घडुन गेल्यानंतर, निरपराधांचे प्राण गेल्यानंतर, करणे हे काही या प्रश्नाचे उत्तर नव्हे. अशा घटनाच मुळात घडु नयेत यासाठी आपण काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे.
मुंबई हे दहशतवाद्यांचे soft target आहे. शहरातील सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या...शहरात रोज येत-जात असनारे लाखोंचे लोंढे...सर्वांवर नजर ठेवणे हे अशक्यप्रायच. पण दहशतवादी गटांचे म्होरके, अनुयायी, यांची सातत्याने माहिती घेत राहणे, त्यांच्यावर नजर ठेवणे, त्यांचे फोने टेप करणे...हे अशक्य आहे काय? खलिस्तानवादी मंडळींना पंजाब पोलिसांनी अक्षरश: संपवले...तसे अशा कट्टरपंथीयांबद्दल करने पोलिसांना अशक्य आहे काय? गुंडांच्या सुपा-या घेवून शेकडो एन्कौन्टर्स करणा-या पोलिसांनी हे अशक्य आहे असे सांगु नये. वारंवार राजकीय एन्कौंटर्स करणा-या नेत्यांनी तर मुळीच नये.
दह्शतवादाविरुद्धचा लढा तेवढ्याच कठोरपणे करावा लागतो. "दहशतवाद" ही विक्रुती आहे. धर्म-पंथ-जात हे बुरखे आहेत. अन्य धर्मियांत दहशत माजवने, असुरक्षिततेची भावना निर्माण करणे, आर्थिक नुकसान घडवुन आणने, प्रगतीला खीळ घालणे आणि विभिन्न सामाजिक गटांत द्वेषाची भावना वाढवणे हे मुख्य हेतु कोणत्याही दहशतवादी क्रुत्यामागे असतात. त्यासाठी स्वधर्मियांचाही बळी घेणे...देणे त्यांना सहज चालते. अशा विक्रुतांना त्यांच्या सर्वच जातीय-धर्मीयांचा पाठिंबा असतो असे ग्रुहितक पसरवण्याचा प्रयत्न होतो, त्यावर सामान्यांचा विश्वासही बसतो, पण ते खरे नाही. अशा विक्रुतांना वेळीच संपवणे, जेरबंद करणे हाच त्यावर मार्ग असतो.
आपल्या गुप्तचर यंत्रणा आजवर सर्वार्थाने अपयशी ठरल्या आहेत. पोलिसांची "खबरी" यंत्रणा सर्वार्थाने कोलमडलेली आहे. आजकाल अत्याधुनिक साधने त्यांच्या दिमतीला असुनही त्यांचा वापर राजकीय नेत्यांवरच लक्ष ठेवण्यासाठी वापरली जातात. खब-यांना जे पैसे मोजावे लागतात त्यासाठी कसलीही सरकारी तरतुद नाही. आणि खिशातुन काढुन द्यावेत अशी उदारता पोलिस खात्यातुन कधीच संपली आहे. विविध समाजघटकांत, भले ते आज निरुपद्रवी का असेनात, माणसे पेरुन ठेवावी लागतात, हे आपले सरकार पुर्णपने विसरलेले आहे.
१३/७ हा अजुन एक काळा दिवस आहे. अजुन भविष्यात असे किती काळे दिवस येतील हे माहीत नाही. शहरीकरणे/शहरांकडे धावणारे लोंढे थांबवण्यासाठी (कोणतेही शहर विशिष्ट मर्यादेपार वाढु नये कि ज्यायोगे कोणीही सहजासहजी अशी क्रुत्ये करु शकेल) विकेंद्रीकरण ही एक दीर्घकालीन योजना असते हे तर सारेच विसरलेले आहेत. मानवी जीवनाचे मुल्य जेंव्हा सारेच विसरतात तेंव्हा हे सारे दिशांध एका विकराल खाईत कोसळनार हे तर नक्कीच. तशी वाटचाल चालुच आहे.
तोवर आपण सारेच षंढासारखे पुढच्या नव्या काळ्या दिवसाची प्रतीक्षा करूयात...जगलो वाचलो तर मग निषेध वगैरे करुयात...जयहिंद!

Friday, July 8, 2011

त्यांना काही समजत नाही....

त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही....

सडे सांडले रक्ताचे...कोणाचे हो कोणाचे?
जगणे केले निंध्य....कोणाचे हो कोणाचे?
स्पर्शावरतीही बंधन...कोणाच्या हो कोणाच्या?
जगण्यावरतीही बंधन...कोणाच्या हो कोणाच्या?
उष्ट्यावरती जेही जगले...होते कोण ते होते कोण?
हाणा रट्टे...उडवा मस्तके...म्हणनारे ते होते कोण?
पोटासाठी पोरी विकल्या...विकणारे ते होते कोण?
अबलांची ती अब्रु लुटली...लुटणारे ते होते कोण?
मंदिरांतही प्रवेश नाही...बजावणारे होते कोण?
अतिशुद्रांची नावे अभद्र असावी...सांगणारे होते कोण?
ही गतजन्माची पापसजा...हे रटनारे होते कोण?
सत्तेच्या पालख्या केल्या पुण्यवत...हे करणारे होते कोण?
ज्या सत्तांनी समाज लुटला...नागवणारे होते कोण?
जगण्या साधन येता हाती...लुबाडणारे हे आहेत कोण?

यांना काही समजत नाही...
यांना काही उमजत नाही...
सांगुन सांगुन थकले जेही
थकणा-यांना विचारी कोण?

मदमत्त पिपासा अन्यायाची
सत्ता सत्ता कित्ता गिरवण्याची
रडती त्यांना रडविण्याची
आपुल्या टे-या बडवत बडवत...
गाथा कालच्या वदणा-यांची
शोषण आणि अधिक शोषण
हीच भाषा या तद्वद्न्यांची
बोला हे जन आहेत कोण?


वेळ बदलला काळ बदलला
उगा कशा इतिहास उगळीता?
पणजोबाने जर खुन केला
शिक्षा नातवा देतो कोण?
ज्यांना द्यावी खरीच शिक्षा
असे पडद्याआडे लपले कोण?
आम्हीही बहुजन...बहुजन आम्ही
असले नारे देती कोण?
धर्माचे फळ खावून झाले
सत्तेचे बळ घेवून झाले
तरी मदांध ते असती कोण?

त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही
दिसत नाही पाठीवरचे वळ
चल उठ गड्या, जरा हिम्मत धर...!

सत्तेचे चालक...मालक...शासक
होतात जेंव्हा तेही याचक
ज्यांना लुटले अविरत काळ
त्यांच्यासाठी बनती काळ
एक शिवबाचा जपत मंत्र ते
पापांना पाठी घालत काय?
अरे डोळे उघडा...उघडा कवाडे
नवनिर्मितीची पहाल स्वप्ने
तलवारींचा मंत्र पुरा तो
माज नि गुर्म्या उतरवील तो
हे तोडु ते फोडु सोडा
उभारण्या तो येई कोण?

पण त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही
रक्ताची भाषा सुटत नाही
पण मज एकच कळते...गड्या धीर धर...गड्या धीर धर!

Tuesday, July 5, 2011

पानिपत शोकांतिकेची दुसरी बाजू...

पानिपत युद्धास युद्धाने मराठ्यांची कधीही भरुन न येणारी हानी झाली. घरटी बांगडी फुटली, एवढा संहार या युद्धात झाला. त्याचा दुखरा सल आजही मराठी बांधवांत आहे.
पण पानिपतचे युद्ध ही एकाएकी घडलेली घटना नव्हती. अशा संहारक घटना एकाएकी होत नसतात. मराठे आणि मोगलांचा जो शिवाजी महाराज व औरंगजेबानंतर सामाजिक/सांस्क्रुतीक/राजकीय तत्वद्न्यानाचा जो क्रमश: -हास होत गेला त्याची अपरिहार्य परिणती म्हणुन पानिपत युद्धाकडे पहायला हवे. ताराराणीनंतर इकडे छत्रपती नामधारी बनून पेशवे सर्वोपरी बनले तसेच तिकडे औरंगजेबानंतरचे पातशहा वजीराहातची कठपुतळी बनले. रयतेसाठी म्हणुन राज्यकर्ते असतात ही भावना शिवोत्तर काळात जवळपास नष्ट होत गेली. मराठा सरदारांची स्वतंत्र बेटे बनत गेली. उत्तरेतही जवळपास असेच झाले. केंद्रीय सत्ता क्रमशा: नामशेष होत गेली.
मराठी इतिहासकारांनी नादिरशहाच्या १७३९ मधील आक्रमणाकडे जवळपास दुर्लक्षच केलेले आपल्याला दिसते. त्याला निमंत्रीत करण्यात मोठा वाटा होता तो शाह वलीउल्लाह या कट्टरपंथी जिहादी विचारांच्या हाजीचा. भारतातील मुस्लीम हे हिंदुंच्या साहचर्याने अजलाफ (हीण) बनले आहेत, त्यासाठी सच्चा मुस्लिमांचीच देशावर सत्ता असावी असा प्रचार तो करत असे. नादिरशहाचे आक्रमण न्रुशंस आणि रानटी होते. कर्नाळ येथे झालेल्या युद्धात खुद्द पातशहाला अटक होण्याची वेळ आली. मुस्लीम सरदार/वजीरांतील स्वार्थलोलुपतेमुळे नादिरशहा दिल्लीपर्यंत पोहोचला. हजारो दिल्लीवासी ठार मारले गेले. मोगलांनी ३८० वर्ष जमवलेली संपत्ती नादिरशहाने एका झटक्यात लुटली. या धक्क्यातुन मोगल कधीच सावरले नाही.
आणि याच परिस्थीतिचा फायदा मराठ्यांना झाला. एरवी जे अशक्यप्राय होते ते साध्य करण्याची संधी मराठ्यांना मिळाली. तख्ताची मांडलिकी करत (पहिले शाहू महाराज महाराष्ट्रात आले तेच मांडलिकीच्या सनदा घेवून.) राहिले. आधीच निर्बल-कंगाल-लुटल्या गेलेल्या प्रांतांवर स्वा-या करणे, रयतेजवळ जे उरले-सुरले आहे तेही लुटने हा मराठ्यांचा एकमेव उद्योग बनला. त्यामुळे उत्तरेत मराठे रयतेच्या मनात कधीही आत्मीयतेचे स्थान मिळवू शकले नाहीत, हे वास्तव आजही अनुभवाला येते. याचा फटका पानिपत युद्धात बसला. ज्या तख्तासाठी म्हणुन ते पानिपतवर लढायला गेले, त्या तख्ताचे त्यावेळीचे स्वयंघोषित दोन्ही पातशहा दुरुन तमाशा बघत बसले. एकही मुस्लिम सरदार त्यांच्या बाजुने आला नाही....याचे एकमेव कारण म्हणजे मराठ्यांची पराकोटीची स्वार्थलोलुपता आणि त्याआधारीत सोयीचे राजकारण.
१७५२ मद्धे नादिरशहानंतर पुन्हा शाह वलीउल्लाहच्या जिहादी प्रेरणेने अब्दालीने पहीली स्वारी केली. दुस-या स्वारीच्या वेळीस सफदरजंगाने पातशहाच्या वतीने मराठ्यांशी अहदनामा (तख्ताच्या रक्षणाचा करार) केला. नंतर याच प्रकरणी सफदरजंगालाही दुखावले. पुढे अब्दालीने अनेक वेळा भारतावर स्वा-या केल्या, दिल्ली लुटली...लुट घेवून गेलाही...पण मराठे अहदनामा पाळायला आले नाहीत. एकदाही अब्दालीशी भिडले नाहीत. हा एका प्रकारे अहदनाम्याचा भंगच नव्हता का?
मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले याचा आपल्याला खुप अभिमान वाटत असतो...पण त्यांत काही पराक्रम होता असे इतिहासातुन दिसत नाही. अब्दालीने चार वेळा स्वा-या करुन पार नागवलेल्या, उध्वस्त केलेल्या प्रदेशात घुसणे हे खरे तर राजकीय आणि आर्थिक दु:साहस होते. आणि त्याचे फळ हे कि अटकेपार झेंडे रोवुनही राघोबादादा कोटभराचे कर्ज करुन आला. आणि ते स्वाभाविकही होते. राघोबादादाला नानासाहेब पेशव्यांनी या कर्जप्रकरणी दोष दिला. नवी लुट मिळायला अब्दालीने काहीतरी सोडायला तर हवे होते ना याचा तारतम्यभावाने नानासाहेब पेशव्यांनी विचार केल्याचे दिसत नाही. पुढे पानिपतच्या मोहिमेतुन त्यांचे नाव वगळले हे सर्वस्वी अन्याय्य होते. राघोबादादाला उत्तरेचा अनुभव होता आणि तो लढवैय्या तरी होता...पण त्य्याच्या ऐवजी फडावरच्या कागदोपत्री मुत्सद्दी भाऊंची निवड या युद्धासाठी केली गेली याबद्दल शेजवलकरांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे आणि ते संयुक्तिकही आहे. भाऊला प्रत्यक्ष युद्धाचा कसलाही अनुभव नव्हता.
अहदनामा झाल्यापासुन तीन वेळा अब्दालीने स्वा-या करुनही तिकडे न फिरकलेले पेशवे याच वेळीस का गंभीर झाले आणि भाऊसाहेबांच्या व विश्वासरावांच्या नेत्रुत्वाखाली एवढे सैन्य तिकडे पाठवले? जर बुराडी घाटातील धामधुमीत दत्ताजी शिंदे अपघाती पडले नसते तर पेशव्यांनी हे पाऊल उचलले असते की नाही हा एक प्रश्न आहे.
हा तह कोणी फिस्कटवला?
बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी शिंदेंचा झालेला अपघाती म्रुत्यु हा एकार्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. उत्तरेत जरी पवार-शिंदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली तरी कोनत्याही सरदाराला डोइजड होवु देवु नये म्हणुन त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी याही बाबतीत वापरले होते. प्रत्यक्षात शिंदे आणि होळकर यांच्यात वैमनस्य निर्माण होईल अशा घटना घडुनही (उदा. कुंभेरीचा वेढा आणि त्यात झालेला खंडेराव होळकरांचा म्रुत्यु अणि तरीही शिंदेंनी केलेला तह.) होळकर आणि शिंदे उत्तरेतील पेशव्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी कसे का होईना एक राहिलेले दिसतात. खरे तर दत्ताजीच्या म्रुत्युमुळे शिंदेंची बाजु कमजोर झाली होती. जनकोजी तरुण आणि अनुनभवी व त्यात जखमी होता. तरीही मल्हारराव होळकरांनी सुरजमल जाटाचीही मदत घेत शिंद्यांसह १४ जानेवारी १७६० ते २८ फ़ेब्रुवारी १७६० या काळात गनीमी काव्याने वेगवेगळ्या पद्धतीने चढाया करत पार सिकंदराबाद ताब्यात घेत अब्दालीच्या नाकावर टिच्चुन चौथाई वसुल केली.
अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता हे सर्वच इतिहासकारांनी नोंदवले आहेच. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. त्याचा इतिहास उपलब्ध आहे तो असा..."अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुचं ठेवली होती. १२ जून १७६० रोजी होळकर लिहितो, " गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले." ( मराठी रियासत - खंड ४ )"
पण लढायचे होते काय?
पानिपतच्या युद्धाचा सारा घटनाक्रम पाहिला तर भाऊला खरोखर अब्दालीशी भिडायचे होते असे दिसत नाही. पानिपतचे युद्ध हे अपघात होते असे नाईलाजाने म्हणावे लागते. या स्वारीत भाऊ अत्यंत संथपणे प्रवास करतांना दिसतो. त्याला युद्धाची घाई दिसत नाही. उलट अब्दाली गेल्या वेळीस जसा परभारे निघुन गेला तसाच याहीवेळी जाईल अशी आशा त्याला असल्याचे दिसते. या काळात तो अन्य मुस्लिम सरदार ते हिंदू राज्यकर्त्यांना युद्धात सामील होण्याचे आवाहन करणारे खलिते मात्र पाठवतांना दिसतो. शिवाय त्याला आपल्या सरदारांत मनैक्य नाही याचीही जाण असलेली दिसते. ज्या शुजाउद्दौल्ल्याच्या अयोध्या प्रांतावर दत्ताजी शिंदे खंडणीसाठी नजिबाच्या मदतीने स्वारी करायला निघाला होता, त्याच शुजाला आपल्या बाजुने वळवण्याचे वा त्याने तटस्थ रहावे असे प्रयत्न करतांना भाऊ दिसतो. पण ज्याचा बाप, सफदरजंग, मराठ्यांच्या स्वार्थलोलुपतेमुळे हाय खावुन मेला तो मराठ्यांच्या बाजुने उभा राहील ही अपेक्षाच चुकीची नव्हती काय?
पण ज्या तख्ताच्या रक्षणासाठी भाऊ येवढा सरंजाम घेवून निघाला होता, त्याच तख्ताचा मराठ्याना मान्य असलेला पातशहा अली गौहर मात्र बिहारमद्धे जावुन तमाशा बघत राहीला होता. त्याने मराठ्यांना मदत करावी असा तख्ताच्या सरदारांना एकही आदेश काढला नाही. इकडे मराठे उपासमारीने मरु लागले होते. जनावरे दानापाण्याअभावी मरत होतीच. पोटाला मिळावे म्हणुन कुंजपु-यावर हल्ला केला. केवळ येथे आणि येथेच, ज्या इब्राहिमखान गारद्याची पलटनी सेना आणि तोफखाना कामाला आला. खुद्द पानिपत युद्धात त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.
कुंजपु-यात एक विजय काय मिळाला मराठे निघाले कुरुक्षेत्राकडे तीर्थयात्रा करायला. याच दर्म्यान २५-२६ ओक्टोबर १७६० ला अब्दालीने पराकोटीचे साहस करुन बागपतजवळ पुराने अलांघ्य झालेली यमुना ओलांडली. तेंव्हा मराठे सोनपतजवळ होते. अब्दालीने यमुना ओलांडली या वार्तेने मराठ्यांना एवढी धडकी भरली कि ते जे पळत सुटले ते सरळ पानिपत येथे येवून पोहोचले. पानिपत हे युद्धस्थळ पुर्वनियोजित नव्हे तर अपघाताने स्वीकारावे लागलेले एक संकट बनले ते असे.
येथे मराठ्यांनी जवळपास अडीच महिने तळ ठोकला. अब्दालीवर मात करण्याच्या मराठ्यांकडे आधी सुविधा होत्या....संधीही होत्या. याही प्रदिर्घ काळात भाऊ सर्वकश युद्धाच्या योजना न करता तहाचाच प्रयत्न करतांना दिसतो. त्याच वेळीपण सरदारांतील जातीय तेढींमुळे एकदा अब्दालीला पराजित करण्याची संधी गमवावी लागली. एकेक सरदार व्यक्तिगत लढला तर दुसरे काय होणे अपेक्षित होते? बळवंतराव मेहेंदळ्यानी केवळ इरेला पेटुन हकनाक प्राण गमावले व आधी विजयाची संधी असतांना शिंद्यांना मदत केली नाही याचे प्रायश्चित घेतले...पण मराठ्यांना त्याचा लाभ काय झाला?
पलायन
१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे जिंकु किंवा मरु या भावनेने अब्दालीच्या सेनेवर तुटुन पडले हे खरे नाही. सत्य सांगते ती आदल्या रात्रीची सर्वांची मसलत: "गिलच्यांचे बळ वाढत चालले. आपले लष्कर पडत चालले......तेंव्हा हा मुक्काम सोडुन बाहेर मोकळे रानी जावे...दिल्लीचा राबता सोडुन दुसरीकडे जाउ...पण झाडी मोठी मातब्बर....गिलचा जावू देणार नाही...यास्तव बंदोबस्ताने निघावे." म्हणजे निकराच्या युद्धाचा बेतच नव्हता. करायचे होते ते सुरक्षीत पलायन. आणि अशा सुरक्षीत पलायनासाठी इब्राहिमखान गारद्याने विलायती पद्धतीच्या गोलाची कल्पना सर्वांना समजावुन सांगीतली. मल्हारराव होळकर त्याशी सहमत नव्हते. गनिमी कावा देत निसटून जावू असे त्यांचे म्हणणे होते. उत्तरेतील सर्व लढाया शिंदे-होळकरांनी याच तंत्राने जिंकलेल्या होत्या. पण भाउंचा गारद्यावरच सर्वाधिक विश्वास होता. त्यामुळे त्याचीच कल्पना मान्य झाली.
दुस-या दिवशी गोलाची सुरक्षित रचना करुन मराठे यमुनेच्या दिशेने सरकु लागले. गारद्याचे पूर्णपणे ऐकले असते तर कदाचित एवढी हानीही झाली नसती. पण विलायती पद्धतीच्या गोलाची वैशिष्ट्ये न समजलेले विट्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड गोल मोडुन अमीर बेग व बरखुरदाराच्या वाट अडवायला आलेल्या सैन्यावर तुटुन पडले. गारद्याचा तोफखाना मग कुचकामी ठरला. हातघाईच्या लढाईला तोंड फुटले. असे काही होईल याबाबतीत अनभिद्न्य असलेल्या भाऊने कसलीही पर्यायी योजना बनवलेली नव्हती. सेनापती म्हणुन भाऊची ही गंभीर चुक होती. पुढे काय झाले हे सर्वद्न्यातच आहे. मराठे या युद्धात नंतर ज्या शौर्याने लढले त्याला जागतीक इतिहासात तोड नाही, पण योजनाच नीट नसल्याने विनाश आणि पराजय अपरिहार्य झाला.
मराठ्यांची या युद्धात अतोनात हानी झाली. मोगल तर मोडकळीस आलेच पण अन्य हिंदु सत्तांनाही नवी राजकीय पोकळी भरुन काढता आली नाही. नागपुरकर भोसल्यांचा अशाच चुकामुळे बंगालमद्धे पाय रोवलेल्या इंग्रजांना संधी मिळाली. दिल्लीच्या तख्ताचे पारतंत्र्य जावुन इंग्रजांची गुलामी स्वीकारायची वेळ आपल्यावर आली. कारण देशाचे एकंदरीत राजकारणच भरकटत गेले. धर्म-जातीय विग्रहाची बीजे तिकडे शाह वलीउल्लाहने पेरली, तशीच इकडे मराठेही फक्त "मराठे" न राहता जातीयतेत अडकत गेले त्याची ही एक अपरिहार्य राष्ट्रीय शोकांतिका होती.
पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही तर तो विजयच होता. कारण पानिपत नंतर अहमदशाह अब्दालीने पुन्हा हिंदुस्तानावर आक्रमण करायची हिंमत केली नाही, असं काही विद्वान हिरीरीने सांगत असतात. पण ते वास्तव नाही हे समजायला पाहिजे.
अब्दालीने भारतावर एकंदरीत सात स्वाऱ्या केल्या. अब्दालीचं पहिलं आक्रमण १७४८ मधे झालं. पानिपतचं युद्ध त्याच्या पाचव्या आक्रमणाच्या वेळीस झालं. लागोपाठ त्याचं सहावं आक्रमण १७६२-६३ या काळात पंजाबवर झालं तर १७६४-१७६७ या काळात सरहिंदेलगतच्या सियालकोटवर सातवं आक्रमण झालं. शिवाय जम्मू-काश्मीरवर त्याने अफगाण सत्ता बसवली जी जवळपास १८१६ पर्यंत टिकली.
इतिहास हा शिकायचा असतो तो त्याचे उदातीकरण करत आपल्या सुप्त भावनांना मलम लावण्यासाठी नव्हे तर त्या इतिहासाचे तटस्थ आकलन करुन घेत त्यातुन बोध घेण्यासाठी. पण आपण काहीच शिकलो नाहीत हे आजही ज्या पद्धतीने जातीवाद/धर्मवाद फुलवला जात आहे त्यावरून लक्षात येईल. आपण नवे पानिपत घडवण्याचा चंग तर बांधला नाहीय ना?
-संजय सोनवणी

("....आणि पानिपत" या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक.)
९८६०९९१२०५

हेही हवे...तेही नको

हेही हवे...तेही नको
जात हवी...जात नको...
याला झोडु... त्याला तोडू
पण स्वजातीचा?... अरे नको नको...

त्या जातीचा...त्या धर्माचा
त्या वस्तीतील...त्या वेशाचा
त्या गटातील...त्या पक्षाचा
शत्रू बरा तो...ठोक ठोक तो...

विचार जेवढे जुळती तोवर
माथा असतो झुकला त्यांवर
क्षणी विपरीत होता पळभर
लाथा घालत त्या मुर्खावर...(?)
उठती गर्जना...उठती शस्त्रे
मारा काटा....आवाज गगनभर...

याला मारा...त्याला काटा...
विकत घ्या कोणी विकत द्या...
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या
रावण घ्या कोणी रामही घ्या...
नाहीतर जरा उचल मुंडके
शेवटचे "...हे राम!" म्हणुन घ्या!

"जात जात जात" हा मंत्र असा जो
श्रेष्ठ असे सर्व मंत्रांहुन
एक अनाहत ध्वनी निघतो ...जो
जळत्या ज्वालांच्या चितेंतून...
"म्रुत्यु हा बरवा...जातही बरवी
प्रजा ही भडवी...ना जानें तू..."

Monday, July 4, 2011

महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल म्हणजे कोण?


महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल हे एक रहस्यच बनुन बसले होते. विष्णुच्या 24 अवतारांत आणि विष्णु सहस्त्रनामांतही न सापडणारा आणि तरीही एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठुन आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेवून संशोधकांनी श्री विट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लोकदेव इटल-ब्रमल पासून ते विष्णू शब्दाच्या अपभ्रंशित रूपातही तो शोध घेतला गेला. खरे तर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या व्यक्ती/स्थलनामांतच श्री विट्ठलाचे मुळ चरित्र दडलेले आहे या्कडे दुर्दैवाने संशोधकांचे लक्ष गेले नाही. परंतु श्री विठ्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसुन पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणुन पुजतो आहोत.भजतो आहोत, हे वास्तव अनेक पुराव्यांच्या प्रकाशात दिसते.

श्री विट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निर्देश होत असला तरी विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. विठ्ठलाला आता विष्णु वा कृष्णाचे चरित्र बहाल केले गेले असले तरी ते त्याच्या मुळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे असे मत माणिकराव धनपलवार व डा. रा.चिं.ढेरे यांनी सिद्ध केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मीणीची समजुत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणुन विट्ठलाचे आगमण झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणुन जी समाधी आज आहे ते प्रत्यक्षात शिवालय आहे हेही डा. ढेरेंनी सिद्ध करुन दिले आहे. स्थलपुराणात पंढरपुरचा निर्देश पौन्ड्रिक क्षेत्र म्हणुन येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव "पांडुरग माहात्म्य" असे आहे, "विट्ठल माहात्म्य" नव्हे हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पौंड्रिक क्षेत्र म्हणुन पुरातन काळापासुन प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपुर हे स्थलनाम यावरुन मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. "पांडुरंग" ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपुर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ते पौंड्रिक...या शब्दातच दडली आहे.

पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ "पौंड्र" कोण होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद्र समाजाचे मुळ सापडते ते इसपु. आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात. विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब ई. ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते.  विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र झाले असेही ऐतरेय ब्राह्मण सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनी दक्षीण भारतातही आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले होते.

पंढरपुर हे पौंड्रपुरचे ९अथवा पुंड्रपूरचे) सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच आहे. दक्षीणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपुर अशी आहेत. महत्वाची बाब म्हणजे  या शहरांत विठ्ठल मंदिरेही आहेत. बंगालमधील पौंड्रांनी तेथील पुंड्रपुर नावाच्या शहरातुनच  राज्यकारभार चालवला होता असे ह्यु-एन-त्संगने नोंदुन ठेवले आहे व महास्थानगढ येथे या नगराचे आता अवशेषही सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडीत असणार. पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षीण भारतात वसाहती केल्या हे यावरुन सिद्ध होते आणि हा काळ औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पुर्वीचा, म्हनजे किमान इसपु पाचव्या शतकापुर्वीचा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील, पंढरपुर (मूळ पौंड्रपुर वा पुंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती हे यावरुन स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे हे आता सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिकक्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे.

श्री विट्ठलाची विशेष उपाधी आहे...पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे.. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणुन राजा होता. तो "पौंड्रंक वासुदेव" या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पर्धी असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला "पौंड्रंक" अशी उपाधी लावत होते हे यावरुन स्पष्ट होते. "पौंड्रंक" या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे "पांडुरंग" होय. "पौंड्रंक" विट्ठलाचेच पुढे "पांडुरंग विट्ठल" असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता.

याचा साधा सरळ अर्थ असा कि पौंड्र समाजातील, जे पशुपालक, धनगर, कुरुब होते, त्या समाजातील विट्ठल नामक आद्य वसाहतकार वा शिवभक्त सम्राटाची पशुपालक वेशातील ही मुर्ती आहे. तो स्वता: विष्णुही नाही कि कृष्णही नाही, पण त्याचे हे गोपध्यान पाहून यादव काळात विट्ठलाचे वैष्णवीकरण करतांना त्याचे गोपवेषधारी कृष्णाशी तादात्म्य साधले गेले असे स्पष्ट होते. (प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे कृष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले हे मी वर लिहिलेच आहे.) मुळच्या अवैदिक पण देवतास्वरुप मानल्या गेलेल्या शुद्रवंशीयाचे हे वैदिकीकरण अक्षरश: स्तीमित करणारे आहे. असे असले तरी पांडुरंगाचे मुळ अवैदिक स्वरुप त्यांना बदलता आले नाही म्हणुन आपण आज सत्यापर्यंत पोहोचु तरी शकतो.

पौंड्र, औंड्रादि मंडळी हे शिवभक्त होते. आंध्रात असंख्य शिवमंदिरे आहेतच. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही कारण येथील मुळ वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय स्थापन करणे स्वाभाविकच होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते. पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/पौंड्रिकेश म्हणुनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो तसा केला गेलेलाही आहे. भक्त पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही. विट्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्या एकमेकांशी विसंगत आहेत. त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते तसेच पौंड्रिकेशाचे संक्षिप्तीकरण पुंडरिक झाले हे स्पष्ट आहे. ते नाम कधीही "विट्ठलेश्वर" नव्हते, याचा दुसरा अर्थ असा कि तो शिव केवळ "विट्ठल" या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपुर्ण पौंड्र समाजाचा अधिदेव होता. स्वत: श्री विट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.

विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. बिट्टीदेव या राजाच्या नावापासुन वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतुन इटल-विट्ठल नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत पंढरपुरच्या एका "जयद्विठ्ठ" नामक ब्राह्मणाला जमीन दान केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हनजे तोवर विठ्ठ-विट्ठल हे सामान्य नाम बनावे एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत झालेलीच होती. म्हनजे विट्ठल हा त्याहीपेक्षा पुरातन असुन दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून बसला होता. इटल-ब्रमल हे नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातुन आलेले वीरदेव असावेत. पंढरपुरच्या विट्ठलाशी त्याचा संबंध दिसत नाही, कारण विठ्ठल पुरातन आहे. विट्ठलमुर्ती अनादि आहे अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुरानता पहाता ती योग्यही आहे. विट्ठल नावाची व्युत्पत्ती अन्यत्र शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणुन स्वीकारावे लागते. (हे नाव विष्णुच्या 24 अवतारांतही नाही वा विष्णु सहस्त्रनामातही नाही हेही येथे लक्षात घ्यावे लागते. किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही, पण जेथे जेथे पौंड्रांच्या राजधान्या होत्या तेथे मात्र विट्ठलाच्या मुर्ती मिळालेल्या आहेत. यावरुन विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.)

थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपुर (पुंड्रपूर) तथा आजचे पंढरपुर. या पौंड्रांचा, जे अवैदिक असल्याने पुराणांतरीही शुद्र मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/कुरुबांचा सम्राट वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग) विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान असून 11 व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मुर्ती हे दुय्यम स्थान होते हे आता लक्षात येईल. शके 1111 च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपुरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले असे नोंदले आहे. पुंडरिकेश शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्म्रुतीत गेलेल्या महानायकाची पुजा तत्पुर्वीही उघड्यावर होतच होती. त्याच्या मुर्तीसाठी मंदिर बनवणारा सुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे. दिवंगत महापुरुषांच्या मुर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे प्रतिमाग्रुह) विठ्ठलमंदिर मुळचे बौद्धधर्मीय स्थान असावे असे मानण्याचा एक प्रघात आहे. प्रत्यक्षात सन ११८९ पर्यंत मुळात विठ्ठलाचे मंदिरही अस्तित्वात नव्हते, त्यामुळे या तर्कात काहीही अर्थ नाही. भगवान बुद्धाचेही वैदिकीकरण करण्याच्या नादात त्यांनाही विष्णुचा अवतार घोषित केल्याने आणि श्री विठ्ठल विष्णुचेच रूप आहे अशी मान्यता पसरल्याने विठ्ठल ह बुद्धरुपातही पाहिला जाणे स्वाभाविक होते, एवढेच!

थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानने व विट्ठलाला विष्णू/कृष्णरुपी मानने हे अनैतिहासिक आहे हे यावरुन सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण/वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या त्यामुळे मुळ सत्यावर जळमटे पडली होती...पण आता तरी नवीन दृष्टीकोनातुन त्याकडे पहावे.

(या विषयावर माझे "विठ्ठलाचा नवा शोध" हे पुस्तक सुगावा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे.)

Saturday, July 2, 2011

एक तुला सांगायचे होते....

एक तुला सांगायचे होते
सांगता सांगता राहुनच गेले
जेंव्हा तू होता रांगता बाळ
इवल्या निरागस डोळ्यांत
भरू पाहत अवघे आभाळ
मी संकोचलो...
मी बावरलो...
कसे सांगू तुला
ही निरागसता उरेल क्षणकाळ....?

जेंव्हा तू उतरलास
आशा-आकांक्षा घेउन
इवल्या ह्रुदयात
जीवनाच्या मैदानात
हिंस्त्र श्वापदांचा सामना करत
जेंव्हा होता तु संवेदनांच्या शोधात
ह्रुदय घेवून हातात...
तेंव्हाही नाही बोललो मी
म्हटले लढु द्या
माझ्या जिगरी रक्तास
जरूर हटवेल तो या
क्रुतघ्न दाटुन आल्या धुक्यास!

मी बोललो नाही...
घनतिमिराचे घेवून पांघरून
मुक राहिलो सुर्यास
पहात राहीलो तुझा झगडा
त्या हिंस्त्रतेत बरबटल्या
शोकग्रस्त आक्रोशांनी भरलेल्या
विश्वात
मी तुला सांगू इच्छित होतो...
पण मी काही बोललोच नाही...
मूक राहिलो....
जणु
तुझे अर्ध्य दिले होते मी
या रानटी समाजास!

माती ओघळते आहे आता
माझ्या धमण्यांतुन
आणि विझल्या श्वासांतून
मी पण तुला सांगायलाच हवे होते
जेंव्हा निरागसता
स्पंदत होती
तुझ्या इवल्या ह्रुदयातुन
सांगायचे पण राहुनच गेले....

आता
काय सांगु तुला
आणि कसे
जेंव्हा
मी बोलुही शकत नाही
आणि तु ऐकुही शकत नाहीस?

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...