Sunday, March 27, 2016

पं. दीनदयाळ...राष्ट्र आणि राष्ट्रवाद

प्रत्येक राष्ट्रात राष्ट्रवादाविषयी वेगवेगळ्या धारणा असतात. प्रत्येक राजकीय पक्षाची व विचारवंतांचे राष्ट्रवादाविषयी तत्वज्ञान असते. तत्वज्ञातील वेगवेगळे प्रवाह हे त्या त्या राष्ट्रतील विशिष्ठ सांस्कृतिक व सामाजिक परिस्थित्यांवर अवलंबुन असते. आजही राष्ट्र या संकल्पनेची निश्चित अशी व्याख्या नाही त्यामुळे राष्ट्रवादाचीही सर्वमान्य व्याख्या नसणे स्वाभाविक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्र ही संकल्पनाच आधुनिक आहे. "नेशन" हा शब्द बायबलमद्धे जसा येतो तसाच "राष्ट्र" हा शब्द अथर्ववेदात अनेकदा येतो. पण ही नेशन किंवा राष्ट्र ही संकल्पना समान वंश, समान भाषा, समान धर्म अशा संकल्पनेवर आधारित व मर्यादित भुगोलापुरती सीमित होती. या संकल्पनांनी आधुनिक काळात व्यापक रुप घेतले. एक विशिष्ट भुभाग, त्यावरील एकच एक सार्वभौम राजकीय व कायद्याची सत्ता व त्याअंतर्गत येणारे नागरिक अशी साधारणपणे राष्ट्राची व्याख्या व्यवहारात आल्याची दिसते.

ही आधुनिक संकल्पना भारतात अर्थात इंग्रजांच्या राज्यात आली. भारतेय परिप्रेक्षात राष्ट्रवादाविषयी अनेक विचारवंत व राजकारण्यांनी चिंतन करत राष्ट्रवादाचे स्वरुप कसे असते, कसे असावे व कोणते प्रारुप उत्कृष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पं. दीनदयाळ  उपाध्याय यांनी "एकात्म मानव दर्शन" या पुस्तकातील काही लेखांत राष्ट्रवाद व त्यानुषंगिक  बाबींवर आपले विचार मांडले आहेत. या विचारांना केवळ संघनिष्ठ विचार म्हणून दुर्लक्षित न ठेवता त्यावर व इतर राष्ट्रवादाच्या संकल्पनांवर नेहमीच चर्चा व्हायला हवी ती आपल्याकडे होत नाही. राष्ट्रवादाबाबत नेहमी उथळ व भावनिक चर्चा होतात त्यातून राष्ट्रवाद हा निसटुन जातो आणि घोषणांचा राष्ट्रवाद उथळपणे सामोरा येतो. 

उपाध्यायजींनी भारतातील (बव्हंशी आयात झालेल्या) राष्ट्रवादाच्या संकल्पना चर्चिल्या आहेत. मार्क्सवादी श्रमिकांच्या हुकुमशाहीची राष्ट्रवादी संकल्पना, समाजवाद, कोंग्रेसने स्विकारलेला लोकशाहीवादी समाजवाद, भांडवलशाही अशा अनेक संकल्पनांवर चर्चा करत भारताला भारतीय प्रकृतीला साजेसा कोणता वाद उपयुक्त ठरेल यावर चर्चा केलेली आहे. शिवाय प्रत्येक वादात काहीनाकाही चांगले आहे त्याचा मेळ कसा घालायचा यावरही प्रश्नचिन्ह उभे केलेले आहे. 

भारतात संधीसाधु राजकारण्यांमुळे राजकारण हे सिद्धांतहीण राजकारण्यांचा आखाडा बनलेले आहे हे उपाध्यायजींचे १९६५ सालचे विधान आजही विदारकपणे सत्य झालेले दिसते. सिद्धांतहीण युत्या (विचारधारांच्या विरोधकांतील) होणे ही बाब आज एवढी सर्रास बनली आहे कि त्याबाबत लोकांना काही घेणे-देणे उरलेले नाही. उद्या भाजप व कोंग्रेसमध्येही युती झालेली दिसली तर नवल वाटणार नाही एवढी विचारहीणतेची पातळी आजच्या राजकारणाने गाठली आहे. याचे मुलभूत कारण म्हणजे आपापल्या राजकीय तत्वज्ञानाशी कोणाचीही नाळ राहिलेली नाही. जेथे विजयाची शक्यता आहे त्या पक्षात (स्वत:ची विचारधारा कोनतीही असो) प्रवेश करण्याचाही मोठा उद्योग आज बनला आहे, आणि भाजपही त्याला अपवाद राहिलेला नाही. यात तत्वधारांत सहमती अथवा संघर्ष न होता तत्वशुन्यांचाच भरणा वाढतो आणि राष्ट्राची दिशा व राष्ट्रवाद मागे पडतो. यावर सर्वच राजकीय पक्षांनी चिंतन केले पाहिजे यात शंका असण्याचे काही कारण नाही.

परंतू दुर्दैवाने तसे घडतांना दिसत नाही. विरोध घेणे अथवा बाजू घेणे हे केवळ संधी पाहुन ठरवले जात असेल तर आपण चुकीचेच वागत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.

उपाध्यायांनी इतर राष्ट्रवादांची चर्चा करतांना त्यांना कोणता राष्ट्रवाद हवा आहे याचे संकेत दिलेले आहेत. नीतिशास्त्रांच्या जवळपास सर्वमान्य सिधांतांची थोडक्यात चर्चा करत प्रकृती व संस्कृती यावर उहापोह केला आहे. मनुष्याच्या प्रकृतीत बरे-वाईट सारे असते. त्यात वाईट टाळत आपण जे उत्कृष्ठ बनवायचा / बनायचा प्रयत्न करतो ती संस्कृती असते. यात काहीही वावगे नाही. किंबहुब्ना मानवसृष्टीचा हा चिरंतन नियम आहे. "हेच नियम आमच्या धर्माचेही आहेत" असे उपाध्याय म्हणतात. महाभारतातील युधिष्ठिराने केलेली "धारणाद्धर्ममित्याहू". म्हणजे समाजाची धारणा ज्यामुळे होते तो धर्म, अशी ही म्हटले तर व्यापक म्हटले तर कसलीही व्याख्या नसलेली व्याख्या आहे. कारण समाजाच्या धारणा या कालसापेक्ष, परिस्थिती सापेक्ष व प्रांतसापेक्ष बदलत जातात. मानवी टोळीजीवनात इतर टोळ्यांवर हल्ले करणे, त्यांना लुटणे, स्त्री-पुरुषांना गुलाम करणे हे धारणा प्रबळ होती. तोच त्यांचा धर्म होता. अपंण आज या बाबी धर्म्य मानत नाही. म्हणजे कालसापेक्ष दृष्टीकोण बदललेला आहे. शिवाय धारणा जरी म्हटले तरी समाजातील विविध गटांत वेगवेगळ्या धारणा असतातच. त्यात सत्ताधारी वर्गाच्या धारणा व धार्मिक गटांच्या धारणांत कधी संघर्ष तर कधी सहमती असल्याचे दिसते. म्हणजे सर्व समाजाची धारणा एकात्म, एकच एक कधीही असल्याचे आपल्याला आढळून येत नाही. 

असे असले तरी पाश्चात्य सर्वसाधारण धारणा आणि पौर्वात्य धारणा यात भेद आहे. पश्चिमेकडील सर्वच्या सर्व आंधळेपणाने स्विकारणे अनिष्ट आहे हे उपाध्यायंचे मत खरेच आहे. पाश्चात्यांचेच काय आपल्याच गतकाळातील जुने ते सोणेच होते असे मानत तेही तसेच्या तसे स्विकारणेही चुकीचे आहे हेही येथे लक्षात घ्ययला हवे.

अमेरिकेत रोटी तर आहे पण सुख-शांती नाही. मार्क्स म्हणतो कि रोटीसाठी लढा. मार्क्सवाद आणि भांडवलशाहीत संघर्षाचे अनेक मुद्दे आहेत. समाजवादही त्यापसून अलिप्त नाही. ते कसे हे उपाध्याय दाखवून देतात. भारताने भारतीय प्रकृती लक्षात घेऊन आपले स्वत:चे तत्वज्ञान बनवले पाहिजे हेही मान्य. परंतू उपाध्याय हा तिढा सांस्कृतिक राष्ट्रवादाने (सांस्कृतिक राष्ट्रवाद हा शब्द त्यांनी वापरलेला नाही, परंतू शरीर, आत्मा, चार पुरुषार्थ आदि बाबी महत्वाच्या मानल्याने) सुटेल असे त्यांचे मत आहे.

येथे हे लक्षात घ्यायला हवे कि भारतीय मणसाला रोटी नसली तरी त्याला सुख आहे हे मत विवादास्पद होईल. मुळात सुख ही सापेक्ष संकल्पना आहे. सुखाचे कसलेही मोजमाप होऊ शकत नाही. शिवाय कोणाला कशात सूख मिळेल हेही सांगता येणार नाही. केवळ शरीराचे सुख नको तर बुद्धी आणी आत्म्याचे सूख हे महत्वाचे आहे असे उपध्याय सुचवतात. बौद्धिक सुख हवे असेल तर मानवी बुद्धीला स्वातंत्र्याची आवश्यकता असते. कारण बुद्धीला विशिष्ट विचारांच्या पिंज-यात बंद करुन बौद्धिक सूख मिळण्याची सुतराम शक्यता नाही. बुद्धीची प्रगतीही होणे शक्य नाही. बौद्धिक प्रगती हे कोणत्याही समाजाचे व राष्ट्राचे प्रेय असायला हवे यात शंका नाही. 

भारतीय संस्कृती आत्म्याचा विचार करते हे उपाध्यायांचे म्हणणे अर्धसत्य आहे. भारतात पुरातन काळापासून आत्मा-परमात्मा न मानणा-या प्रबळ विचारपरंपरा होत्या व आहेत. उदा. लोकायतीक, बौद्ध, आजेवक ई. मुळात आत्मा म्हणजे नेमके काय याची निश्चित अशी व्याख्या नाही. आत्मा निर्विकार, अस्पर्शी व चिरंतन आहे असे गीता म्हणते. निर्विकार आत्म्याला काहीच चिकटत नसेल हे उघड आहे. त्यामुळे मग आत्म्याने पुनर्जन्म घेणे हे तार्किक पातळीवरही शक्य नाही, मग आत्मज्ञान होणे तर दुरच. ब्रह्मसुत्रे तर उच्च रवात सांगतात कि आत्मा व्यावहारिक कृत्यांत, भावभावनांत कसलाही सहभाग घेत नाही. त्यामुळे पाप-पुण्यादि संकल्पना आत्म्याला चिकटणे शक्य नाही. जर असे असेल तर कर्मविपाक सिद्धांत, म्हणजे गेल्या जन्मातील पापांमुळे या जन्मीचे वरिष्ठत्व वा कनिष्ठत्व येते हा सिद्धांतच जर टिकत नाही. त्यामुळेच उपाध्याय म्हणतात त्याप्रमाणे बुद्धीची प्रगती शक्य असली तरी आत्म्याची प्रगती कशी शक्य आहे?

मानवी जीवनाला आवश्यक वाटणारे आध्यात्मिक विचार आणि राष्ट्र म्हणून करावे लागणारे ऐहिक विचार यात मुलत: फरक करायला हवा तो यामुळेच. राष्ट्राचा पाया हा ऐहिक असतो तर लोकजीवम्नाचा पाया त्यांना पसंद असलेला आध्यात्मिक मार्ग स्विकारण्याचा असतो. शासनाने त्यात हस्तक्षेप करायचा नसतो. आणि जर "आध्यात्मिक राष्ट्रवाद" ही संकल्पना मांडायची असली तर त्यामागेही व्यापक विचारांची गरज आहे. उपाध्यायांच्या चिंतनात ती एक त्रुटी आहे असे म्हणावे लागेल. कदाचित भविष्य़ात याच विचारांना पुढे नेत नवी तत्वधारा निर्माण करू शकेल एवढे मोल त्यांच्या चिंतनात आहे हेही मान्य करावे लागेल.

समाज हा स्वयंभू असतो, स्वत:च स्वता:च्या सामुहिक मनोप्रेरणांतुन आकार घेतो हे वस्तवच आहे व ते उपाध्यायांनी पाश्चात्य मनोवैज्ञानिकांचा हवाला देवून मांडले आहे. नेहमीच वाद हा होत असतो कि व्यक्ती आणि समाजाचे संबंध नेमके कशाच्या आधारावर ठरतात आणि ते कसे असायला हवे. यावर पुष्कळ वाद झालेले आहेत व आजही होतात. पाश्चात्य जगात व्यक्ती व समाज यात होत असणा-या सामाजिक करारात ( Social Contract) पाहतात. भारतात यावर फरसा तात्व्बिक विचार झालेला दिसत नाही. जे विचार होते ते बव्हंशी राजकीय स्वरुपाचे होते. कारण भारतीय माणुसही सामाजिक असला तरी बव्हंशी तो व्यक्तिवादीच राहिलेला आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे चळवळ सोडली तर भारतात राजकीय क्रांत्या अपवादानेच झालेल्या दिसतात. राजांनी व्यक्तिजीवनात हस्तक्षेपही क्वचितच केल्याचे आढळते. आपली ग्रामसंस्था गेले हजार वर्ष टिकली याचे कारणही याच व्यक्तिवादात पहावे लागते. वैदिकांचे यज्ञ हे सामुहिक असले तरी हिंदूची प्रार्थनापद्धती ही वैय्यक्तिकच होती व आहे. त्याला उत्सव प्रसंग सोडले तर सामाजिक स्वरुप आले नाही. याचे कारण मनोवृत्तीत आहे. असे असले तरी समाज नव्हता असेही विधान करता येत नाही. पण ते संबंध गरजांपुरते मर्यादित होते असे म्हणावे लागते. आजही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही कारण आपल्या सामाजिक जाणीवा या समाजसापेक्ष नव्हे तर व्यक्तिसापेक्ष आहेत. आपल्या पारतंत्र्याचीही कारणे याच व्यक्तीसापेक्षतेत शोधता येतात. 

किंबहुना हेच आपले सामुहिक मन आहे.

उपाध्यायांनी मोठी मोठे राष्ट्रे समाप्त का झाली यावरही विचार केला आहे. उत्थान-पतनांचे चिंतन आवश्यकच आहे. रोमचे, ग्रीकांचे, इजिप्तचे (व इंग्रजांचेही) राष्ट्र संपले.उपाध्याय म्हणतात, राष्ट्राचे अस्तित्वच नागरिकांच्या जीवनाचा ध्येयभूत आधार आहे. राष्ट्राची व्याख्या करतांना त्यांने म्हटलेय कि एका मानवी समुदायासमोर एक व्रत, एक विचार व एक आदर्श आहे आणि जो विशिष्ट भुमीला मात्रूभावाने पाहतो त्याला राष्ट्र म्हणवे. यात एकही अंगाचा अभाव असेल तर त्याला राष्ट्र म्हणता येणार नाही. जशी आत्म्यामुळे व्यक्ति "व्यक्ती" बनते अशा प्रकारचा हा राष्ट्रवादाचा सिद्धांत आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे राष्ट्राच्या अनेक व्याख्या आहेत त्यात ही आजही नवीन भर वाटेल अशीच आहे व त्यादृष्टीने तिला मोल आहे. 

उपाध्याय म्हणतात कि आत्मा बदलत नाही, पण शरीर बदलते. राष्ट्र आत्म्यासरखेच असते, म्हणजे त्याची एक मूळ प्रकृती असते. ही प्रकृती अथवा "चिती" जन्मजात असून ती ऐतिहासिक कारणांनी बनत नाही. कर्मांच्य संकलित परिणामांनी जसे व्यक्तीचे चरित्र बनते तसेच राष्ट्राचेही बनत असते. आत्म्याला जशी कोणती वस्तु चिकटत नाही तशीच राष्ट्राच्या संस्कृतीशी ऐतिहासिक अथवा तात्कलिक करणांनी उत्पन्न स्थितीच्या साम्नुहिक कारणांनी राष्ट्राच्या संस्कृतीशी जोडल्या जातात, पण राष्ट्राचा आत्मा त्यापासून अलिप्त राहतो. पण समाजाच्या संस्कृतीची दिशा मात्र आत्मा ठरवतो. त्यालच उपाध्याय "धर्म" असेही व्यापक अर्थाने म्हणतात. 

व्यक्ति ही राष्ट्राला व्यक्त करणारे साधन असून राष्ट्र ज्या संस्थांना जन्म देते त्याचे "उपकरण" व्यक्ती आहे असे म्हणून उपाध्याय म्हणतात कि संस्थांद्वारेच राष्ट्रीय आवश्यकतांची पुर्ती होते. एखाद्या कारखान्याला चालवण्यासाठी जशा अनेक विभागांची निर्मिती करते तसेच राष्ट्रातही होते असे म्हणत उपाध्याय म्हणतात कुटूंब, जाति, वर्णश्रेणी ही संस्थात्मक रचना पुरातन काळात आपल्याकडे होती जशा आज कारख्यान्यांचे विविध भाग, श्रमिक व त्यांचे एकत्रीत उत्पादन वगैरे संस्था आहेत. जाति व वर्ण व्यवस्था आणि आधुनिक काळातील पेशे यांची नकळत ते सांगड घालत आहेत. 

हे बरोबर आहे कि कोणत्याही समाजाचा गाडा हाकण्यासाठी समाजात अनेक पेशे असतात. आपापल्या कौशल्यानुसार ते व्यक्ती करतात व त्यातुन समाजाच्या गरजा भागवल्य जातात. पण येथे उपाध्याय कळत-नकळतपने एका घातक प्रथेचे समर्थन करत आहेत. 

म्हणजे जीवनयापनासाठी कोणते ना कोणते पेशे व्यक्तींना पत्करावे लागतात, पण ते स्विकारणे अथवा न स्विकारणे ही व्यक्तीची स्वेच्छा असते. जातिव्यवस्थेत स्वेच्छेचा प्रश्नच उद्भवत नसून कितीही योग्यता असली अथवा त्याला पेशा बदलायची इच्छा असली तरी या व्यवस्थेत त्याचे ते पेश बदलण्याचे स्वातंत्र्यच समुळ नाकारले जाते. स्वातंत्र्य नाकारणा-या सामाजिक पद्धतीतुन राष्ट्र कदापि उभे राहू शकत नाही. वैदिकांची वर्णव्यवस्थाही अशीच जन्माधारित आहे. या व्यवस्थेची तुलना आधुनिक व्यवस्थेशी करता येत नाही कारण ती मुळात अशास्त्रीय, असांस्कृतिक व अधार्मिकही आहे.    

मला वाटते येथे उपाध्यायांचा एकतर तात्विक गोंधळ झालेला आहे किंवा त्यांना अशाच व्यवस्थेचे सातत्य हवे आहे. असे असेल तर त्यांची राष्ट्र संकल्पना विघातक व मानवद्रोही ठरेल. . कारण ज्या कोणत्याही व्यवस्थेत मानवी स्वातंत्र्य व मानवी प्रेरणांना नाकारले जाते त्याला राष्ट्र म्हणता येत नाही. "धर्माच्या ग्लानीने अव्यवस्था निर्माण होते:" हे विधानही या परिप्रेक्षात अवैज्ञानिक आहे कारण धर्म म्हणजे नेमके काय याची नेमकी व्याख्या अद्याप व्हायची आहे. कोणत्याही संस्कृतीने अथवा चिंतकाने ती अद्याप केली नाही. कारण धर्म ही एक अमूर्त संकल्पना आहे, मानवी मनाची एक निकड आहे व ती तशी असली तरी अमुक बाबे म्हणजेच धर्म असे निश्चयाने अविवादित ठाम असे विधान कोणी करु शकलेले नाही. 

कुटुंब आणि राष्ट्र यातील समान मुद्द्यांवरही उपाध्यायांनी चर्चा केली आहे. व्यक्ती-व्यक्तींतील नात्यांचा एकुणातील व्यापक ताळेबंद म्हणजे राष्ट्र अशीही एक राष्ट्राची व्याख्या उपाध्यायांच्या विवेचनातून निघू शकते. म्हणजे राष्ट्र हेच एक कुटुंब. वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानातील अत्यंत मानवतावादी व्याख्येच्या जवळ हे व्याख्या जावू शकते. राष्ट्र हेही एक कुटुंब अहे आणि कुटुंबियांत जे जिव्हाळ्यचे हार्दिक नाते असते ते राष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्यात असायला हवे ही अपेक्षा उदात्त आहे असे नक्कीच म्हणता येईल. 

परंतू अशी सार्वकालिक विचारसरणी मांडतांनाच पुढे उपाध्याय म्हणतात कि आम्ही समाजाच्या संस्थांत, विदेशात जसा मानला जातो, तसा स्थायी संघर्ष असतो हे मानत नाही. असे कोठे दिसत असेल तर तो विकृतीचा द्योतक आहे, प्रकृती अथवा संस्कृतीचा नाही. वर्ग-संघर्षाची कल्पना व राज्य आणि व्यक्तीतील संघर्षाची कल्पना हीच मुळात चुकीची आहे. पुढे ते म्हणतात कि आपल्याकडेही जाती बनल्या पण एक जातीने दुस-या जातीशी संफ़्घर्ष करण्याचा विचार केला नाही. वर्णांची संकल्पना ही विराट पुरुषाच्या चारी अंगांशी केली गेली. या च्घार अंगांत, म्हणजे डोके, हात, मांड्या व पाय, यात संघर्ष नसून एकात्मता आहे. परस्परपुरक असणे व एकत्म असणे हेच जीवन व्यवहाराचे मानदंड असून ते साधणे व परस्पर संघर्ष टाळण्याची वृत्ती जोपासणे महत्वाचे आहे असे उपाध्याय म्हणतात. किंबहुना एकात्म मानव या त्यंच्या संकल्पनेचे हे थोडक्यात सारांशकथन आहे. त्यामुळे यावर अधिक विचार करण्याची गरज आहे.

पहिला मुद्दा आपण संघर्षाचा घेऊयात. राष्ट्र हे कुटुंब मानले तरी कुटुंबात सुप्त किंवा उघड संघर्ष असतोच. आपली महाकाव्ये बव्हंशी कौटुंबिक संघर्षांनीच भरलेली आहेत व त्यांची परुइणती रक्तरंजित सर्वविनाशक युद्धांतही झालेली आहे. या संघर्षाचा पाया धर्म विरुद्ध अधर्म असा असला तरी एकाच कुटुंबात धर्म-अधर्म असा संघर्ष उद्भवु शकतो व जो जिंकतो त्त्याचीच बाजू धर्माची होती हे नीतीशास्त्राच्याही आधारे सिद्ध होऊ शकत नाही. काहीही असले, तरी कुटुंब हे संघर्षविरहित नसते याला आपल्याच इतिहासात दाखले आहेत. मग कुटुंब नाही अशा कुटुंबांत पण एकच समाजात संघर्ष नव्हते वा नसतात हे उपाध्यायांचे मत भाबडेपणाचे वाटते. 

पुढे जाऊन ते वर्ण हे एकाच विराट पुरुषाची अंगे असल्याब्ने अंगांतही संघर्ष कसा होईल असे मत ते मांडतात. याही मताला इतिहास अथवा पुराणकथा छेद देतात. विश्वामित्राला जन्मजात क्षत्रीयत्व सोडून ब्रह्मणत्व मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याच्या अनेक कथा वैदिक धर्मसाहित्यात येतात. क्षत्रीय विरुद्ध ब्राह्मण यांच्यात श्रेष्ठ कोण यासाठी झालेल्या संघर्षात क्षत्रीयच कसे नष्ट करण्यात आले या कथा येतात. परशुरामाच्या दंतकथा त्यातुनच बनवण्यात आल्या. वैश्य-शूद्र तर वैदिक साहित्यातून हद्दपारच झाले. जर हे चार वर्ण एकच पुरुषची अंगे होत, जर त्यांच्यात संघर्ष असू शकत नाही तर वदिक धर्मात हे सामाजिक संघर्ष कसे उद्भवले आणि त्यातून कोनती एकात्मता सिद्ध होते? 

दुसरे बाब जातींची. जात म्हणजे व्यवसाय. जातींत आपापसात संघर्ष झाला नाही हेही खरे नाही. भले तो संघर्ष रक्तरंजित नसेल, पण व्यावहारिक फायदे-तोटे समोर ठेवत अनेक वाद राजसभा-गणसभांत लढले गेले याचे दाखले जातककथा व पुराकथांतून मिळतात. व्यावसायिक हिताचे संघर्ष समाजात विविध व्यावसायिक गटांत होतच राहतात. जातींत विशिष्ट धार्मिक अधिकारांबाबतही संघर्ष झालेले आहेत. अलीकडचेच उदाहरण पाहिले तर माधवराव पेशव्याच्या दैनंदिनीत अशा जातीय निवाड्यांच्या नोंदी आहेत. 

म्हणजे पाश्चात्य विचार संघर्षावर आधारित असून आमचा विचार मात्र सामाजिक संघर्षहीण आहे हे विचार पुराव्यांवर टिकू शकत नाही. समाज संघर्षहीन असवा हा आदर्शवादी विचार झाला, पण प्रत्यक्षत संघर्षाखेरीज समाज अथवा व्यक्ती जगू शकत नाही. आचार, विचार, जीवनशैली इत्यादि अनेक बाबींवर माणसा-माणसात कधी वैचारिक तर कधी हिंसक संघर्ष सुरुच असतो. किंबहुना संघर्षहीण जीवन असते काय आणि असण्यासाठी कोणती राजकीय सामाजिक स्थिती हवी यावर चिंतन करता येईल. संघर्षाच्या पातळ्या किमान करता येण्यासाठी झटताही येईल. पण समाज व व्यक्ती यांच्यात संघर्ष नाहे अशी स्थिती आनण्याचा एकमेव अर्थ असा आहे कि समाजाला एक तर संघर्ष करता येईल अशी सामाजिक व राजकीय स्थितीच ठेवू नये अथवा अशी मुक्त स्वातंत्र्यवादी आदर्श सुखवादी स्थिती निर्माण करावी कि संघर्षाची गरजच भसू नये. 

पहिली स्थिती अर्थात हुकुमशाहीची असेल तर दुसरी मुक्तस्वतंत्रततावादी. पहिल्या स्थितीत राज्यकर्त्यांना अर्थातच दडपशाही करावी लागेल तर दुस-या स्थितीत राज्य-राष्ट्राला आपले अनेक अधिकार गमवावे लागतील. 

पण यचा अर्थ असा मुळीच नव्हे कि संघर्षच अस्तित्वात राहणार नाहीत. फारतर त्याची परिमाने बदलतील. संघर्ष हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. अगदी आध्यात्मिक पातळीवर जरी गेलो आपण तर व्यक्तीच्घा संघर्ष व्यक्तीतीलच अनिष्टाशी अविरत चाललेला असतो हे आपल्याला पहायला मिळेल. व्यक्तीत कोनत्याही प्रकारचे अनिष्ट नसेल तर मुळात अध्यात्माची गरज तरी काय? संघर्ष हाच मानवी मनाचा स्थायीभाव आहे व त्यामुळेच त्याने आजवरची ऐहिक प्रगती साधलेली आहे. व्यक्ती व समाज यातील नाते हे नेहमीच साहचर्यमय द्वंद्वाचे असते. समाजाशिवाय व्यक्ती असू शकत नाही पण सामाजिक मान्यतांच्या अनुसारच व्यक्ती चालेल असेही नाही. संस्कृत्यांत कालसापेक्ष बदल होत जातात याचे कारण हेच आहे. कोणतीही संस्कृती स्थायी, साचलेल्या डबक्यासारखी नसते. ती वाहती राहते तीच मुळात व्यक्ती आणि समाजातील आंतर्द्वंद्वामुळे. 

हे द्वंद्व अथवा विरोध अराजकाकडे जाणार नाही याचे काळजी राज्याला घ्यावी लागते. राज्यांचे प्रयत्न यशस्वी होतातच असेही नाही हे आपण भारतीय इतिहासात डोकावून पाहिले तरे स्पष्ट दिसते. क्रांत्या या अराजकाकडुन दुस-या राजकतेकडे जातात. सत्ताधारी नेहमीच क्रांत्यांच्या विरोधात असतात. ते स्वाभाविक आहे. पण समाज व व्यक्तींसाठीही बदल स्वाभाविक आहे. राज्य आणि समाज व समाज आणि व्यक्ती यांतील परस्परसंबंध कसे आहेत यावर अशा अराजकतेच्या स्थित्या येणार कि नाही हे ठरेल. 

पण संघर्ष नसतो वा भारतीय व्यवस्थेत संघर्षाला स्थान नाही हे मत मान्य होण्यासारखे नाही. या चे अजून एक कारण आहे. उपाध्याय म्हणतात कि राज्य हे सारे काही नाही. राज्य गेले तरी राष्ट्र मात्र कायम राहते. राज्य हे राष्ट्राचे एकमात्र प्रतिनिधी नाही. म्हणून भारत राज्य म्हणून परतंत्र झाले असले तरी राष्ट्र म्हणून नेहमीच जीवंत राहिले. राज्यांप्रती नेहमीच भारतीय उदासीन रहिले त्यामुळे राज्ये गेली. पारतंत्र्य आले. पण पंचायत संस्था स्थिरमुल असल्याने लोकांनी पर्वा केली नाही. ही उदासीनता भारतीयांना घातक ठरली असे उपाध्यायांचे प्रतिपादन आहे.

राज्यांप्रती उदासीनता हे उपाध्यायांचे मत अत्यंत समर्पक आहे. दहाव्या शतकानंतर तरी भरतीय राज्यांप्रती उदासीन झाले हे खरे आहे. देवगिरीचे साम्राज्य खिल्जीने वारंवार हल्ले करुन शेवटी नेस्तनाबूत केले पण त्याचे कसलेही पडसाद तत्कालीन ज्ञानेश्वर, नामदेव, चोखा मेळादि संतांच्या अथवा अन्य प्रबंध काव्ये लिहिणा-यांच्या लेखनात पडलेले दिसत नाहीत हा एक चमत्कारच आहे. पण तो झाला आहे हे खरे. एक स्वसत्ता जावून परकीय सत्ता येते आणि तिचे प्रतिबिंब साहित्यात उमटू नये हे आश्चर्यच आहे. उपाध्याय म्हणतात त्यचा हा एक जीवंत पुरावाच आहे. खरे म्हणजे समाजातील त्या त्या काळचे साहित्यिक-संत-कवी हे त्या त्या काळच्या समाजस्थितीचा उद्गार मानला तर आम्हाला तसा कोणता उद्गारच नव्हता असे म्हणता येईल. आणि ही गोष्ट आपल्याला भुषनावह आहे असे कोणी म्हणणार नाही. त्यमुळे भारतीय राज्याप्रती उदासेन होते हे त्यांचे मत मान्य केले पाहिजे.

पण भारतात राष्ट्रभावना तरी होती काय? आधुनिक अर्थाने आपण ज्याला राष्ट्र म्हणतो तशी राष्ट्रभावना भारतात नव्हती हे खरेच आहे. राज्य-राष्ट्र ही संकल्पना भरतात पाश्चात्यांच्या प्रभावाने आली. आजचे भारत राष्ट्र हे ब्रिटिश ईंडिया आहे. ते आमच्या भावनांनी बनलेले नाही. किंबहुना भुगोल हा आमच्या पुराकथांचा विषयच नव्हता. आमच्या भौगोलिक एकात्म भावना निर्माण झाल्या त्या धार्मिक कारणांनी, राजकीय नव्हे. सांस्कृतिकही नव्हे. भारत भुमी म्हनजे आसिंधु-हिमाचल अशीही संकल्पना नव्हती. आर्यावर्त (किंवा ब्रह्मावर्त) एवढाच भाग मुळात भारतभुमी मानला जात होता. ती सांस्कृतिक व्याख्या वैदिक अर्थाने होती. बारा ज्योतिर्लिंगे, ५२ शक्तीपीठे...जी देशभर विखुरली आहेत, त्यांनी देशाला देश अशी सांस्कृतिक भावना दिली, मग भाषा व प्रादेशिक सम्स्कृती कितीही विभिन्न का असेना. संस्कृतिक एकोप्याची भावना आणि रष्ट्रभावना एकच नव्हे कारभ्ण सांस्कृतिक सीमा आणि राष्ट्रीय सीमा नेहमीच वेगवेगळ्या असतात. त्यामुळे भारतीय भुगोलांतील एकधर्म्नीय राजांनी एकमेकांवर हल्ले करण्याचे थांबवले नाही. एवढेच काय एकमेकांची मंदुइरे उध्वस्त करण्याचेही थांबवले नाही हे इतिहास स्वच्छ नजरेने पाहिला तर समजून येते. उदा. मराठी सरदारांनी शृंगेरी मठावर हल्ला करुन त्याला लुटले हा एक इतिहास आहे. 

म्हणजेच भारतात लोक राज्यांबद्दल उदसीन होते पण राष्ट्रभावना मात्र होती हे मत पुराव्यांच्या प्रकाशात प्रश्नांकित बनून जाते. 

राज्य आणि धर्म

लोकंवर राज्य करत असतांना सर्वोपरि...श्रेष्ठ तत्व कोनते असले पाहिजे? नैतिक आदर्शे, धर्म कि ऐहिक आदर्शे? हे प्रश्न अनेक्दा चर्चीले गेलेले आहेत. राज्य हे नैतिकतेवरील (अथव धर्म्नावरील) पहारेक-यासारखे हवे. खजिन्याचा पहारेकरी जसा खजिन्यपेक्षा श्रेष्ठ नसतो तसेच राज्यही धर्मापेक्ष श्रेष्ठ नसते. धर्म म्हणजे मजहब (अथवा रिलिजन) नाही तर जीवनातील सर्व बाजुंना व्यापणारे एक मौलिक तत्व आहे. ही तत्वे सनातन व सर्वव्यापी असून त्याचा व्यवहार हा परिस्थितीसापेक्ष असतो. म्हंणजे धर्मनियम सार्वकालिक नसून काही अल्प काळासाठी तर काही दीर्घ काळासाठी असतात. हे सांगत असतांनाच उपाध्याय म्हणतात राष्ट्रीय घटनाही समाजाच्या (राष्ट्राच्या) धारणेसाठी असते. घटनेलाही प्रकृतीच्या नियमंचे पालन करावे लागते. राष्ट्राची धारण घटनेत अभिव्यक्त होत नसेल तर ती चूक होईल, मग घटनेत दुरुस्ती करावी लागेल. ही दुरुस्ती बहुमताच्या इच्छेवर अवलंबुन असेल. पण बहुमत सर्व काही कसे करू शकेल असा प्रश्न विचारुन उपाध्याय म्हणतात कि बहुमत हा न्याय कसा असेल?

धारणा धर्माने होते व धर्म सर्वप्रभुतासंपन्न आहे असे उपाध्यायांचे मत आहे. एवतेव घटनाही धर्मधारणेवर हवी व अन्य सर्व संस्था, सत्ता त्यापासून शक्ती ग्रहण करतील असा हा एक सिद्धांत आहे. येथे उपाध्यायांनी नेमक्या कोणत्या धारणांनी धर्म बनतो, वर्तमानातील सामाजिक धारणा काउय आहेत याचे विश्लेशन केले असते तर बरे झाले असते. अर्थात अजुनही या सिद्धांताच्या समर्थकांना तो वाव आहे. धर्म म्हणजे मजहब/रिलिजन नव्हे हे ठीकच आहे. पण मग धर्म्न म्हणजे नेमके काय याचे तरी नेटकी व्याख्या करण्याची गरज आहे. भारतीय घटनेबाबत उपाध्याय संण्तुष्ट नाहीत. त्यात एक तात्विक चूक आहे असे त्यंचे म्हणने आहे. ती म्हणजे आपले संविधान संघात्मक आहे. म्हणजे प्रत्त्येक राज्य हे केंद्राचे घटक/सहयोगी संघ आहेत ज्यांनी आपले अधिकार केंद्राला सोपवले आहेत. 

हे भारताच्या मुळ चैतन्यदायी कल्पनेशी विसंगत आहे असे सांगून उपाध्याय म्हणतात कि भारतीय संविधान संघात्मक नको तर ते एकात्मक पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांचे काही कारण नाही कारण त्यामुळे प्रादेशिक अस्मिता निर्माण होतात. पंचायती अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनाच अधिक अधिकार देवून राष्ट्राचे कार्य चालवावे असे त्यंचे विवेचन आहे. तेच आपल्या धर्मानुसार होईल असेही ते म्हणतात. 

ग्रामपंचायतींना अधिकार असावेत पण ते कितपत असावेत यावर आजवर भारतात अनेकदा चर्चा झालेली आहे. किंबहूना पंचायत राज या संकल्पनेला अलीकडे महत्व आले आहे. ग्रामपंचायतेंच्य स्वायतत्ततेमुळे भारताने कधीही राज्य कोण चालवते आहे याची पर्वा केली नाही. कोणत्याही राज्यकर्त्याने त्यात हस्तक्षेप केला नाही. म्हणून ते निर्वेध राज्य करू शकले हाही एक इतिहास आहे.  पंचायतींची सत्ता निर्वेध करणे, ती स्वयंभू मानणे हा एक विचार असू शकतो. त्यातही वावगे नाही. राज्यांच्या संघामुळे प्रदेशिक अस्मिता व प्रादेशिक पक्षांचे ओझे गेल्या काही वर्षात वाढलेले आपल्याला दिसते. त्यात फायदे जसे आहेत तसे काही धोकेही आहेत. सत्तेचे विकेंद्रीकरण हा महत्वाचा मुद्दा तर आहेच ज्यामुळे अधिकतर सत्ता ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जाईल. मग केंद्राची गरज ही फक्त संरक्षण, विदेशव्यवहारदि मर्यादित बाबींपुरती मर्यादित राहील. 

केंद्रविहिन पंचायत सत्ता हे एक राजसत्तेची आधुनिक काळातील एक अभिनव संकल्पना ठरू शकते. त्यावर आजही चर्चा व्हायला हरकत नाही. किंवा केंद्रसहित स्वयंभू पंचायतींमुळे  सत्तेचे विकेंद्रीकरण होईल हे उपाध्यायांचे मत रास्त असेच आहे. "शक्तीची अनेक स्थाने असतील पण केंद्राच्या नात्याने आमचे एकात्म राज्य असेल." असे म्हणत ते म्हणतात कि "हे आमच्या धर्मानुसार असेल." यातेल पहिला भाग व्यापकपणे चर्चा करत त्या प्रारुपावर सकारात्मक चर्चा अवश्य होऊ शकते. प्रशसकीय व्यवस्थेत बदल करत ते साध्य करणेही अश्क्य नाही. 

पण दुसरा भाग, म्हणजे धर्म. आता धर्म म्हनजे नेमके काय? नैसर्गिक उपजत कायदा (Innate law) म्हणजे एका परीने धर्म असे उपाध्याय म्हणतात. राजाला कोंणी दंड देवू शकत नाही, पण धर्म राजाला दंड देवू शकतो असे एका वैदिक विधीतील उदाहरण देवून ते म्हणतात कि राजा धर्मामुळे मनमानी करू शकत नाही. पण येथे पुन्हा प्रश्न उभा ठाकतो कि धर्म म्हणजे काय व त्याची मुलभूत तत्वे कोणती? राजा मनमानी करतो म्हणजे नेमके काय व ते कोणी ठरवायचे व कोणी त्याला अधार्मिक ठरवून त्याला पदच्युत करायचे? उपजत नैसर्गिक कायदा हा न्याय्यच असतो असे नाही. मात्स्यन्यायही मानवी उपजत नैसर्गिक कायदा आहे, म्हणून तो समर्थनीय होईल काय?

हा गहन प्रश्न आहे. त्याचे सविस्तर विवेचन उपाध्यायांकड्न अपेक्षित होते. त्यांना पंथ-गुरुंचे राज्य (Theocratic State) मान्य नाही ही स्वागतार्ह बाब आहे. एकाच पंथांच्या लोकांना नागरिकाधिकार देत दुस-यांना दुय्यम नागरिक बनवणे त्यांना मान्य नाही. त्यांना खिलाफत नको आहे. प्रत्येक पंथाला (रिलिजनला) सहिष्णुपणे वर्तनाचे स्वातंत्र्य मिळावे असे त्यांचे म्हणने आहे. याही मताचे स्वागत केले पाहिजे. परंतू त्यांच "धर्म-निरपेक्ष" (सेक्युलर) शब्दाला मात्र आक्षेप आहे. राज्य हे धर्मराज्यच असले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. धर्मराज्यात राज्य मनमानी करु शकत नाही असे सांगत ते म्हणतात कि न्यायपालिका, संसद, संविधान यापेक्षा धर्म मोठा आहे. बहुमताने संविधानात संशोधन करणे हे धर्माविरुद्ध आहे. सर्वांनाच धर्मानुसार काम करावे लागेल. धर्मानुसार चालणारे अल्पमतही श्रेष्ठ आहे असा त्यांचा अभिप्राय आहे.

येथे आपण महत्वाच्या चर्चेशी येतो. संविधान लिखित आहे. त्यातील प्रावधाने राष्ट्राच्या त्या त्या वेळच्या स्थितीशी मेळ घालण्यासाठी बदललेली आहेत. उदा. कंप्युटर व त्याशी निगडित गुन्हेच जेंव्हा नव्हते तेंव्हा त्याविषयक कायद्यांची गरजही भासण्याचे कारण नव्हते व भासली तेंव्हा तशी प्रावधाने केली गेली. कालबाह्य झालेल्या अनेक गोष्टी रद्द केल्या गेल्या.  अर्थात हे बहुमताने झाले. न्यायव्यवस्था वेळोवेळी घटनेचे अर्थ लावत निर्णय़ देते. कोण मोठा हा सध्याचा प्रश्नच नसून संविधानच सर्वोपरि आहे व तेही कालसापेक्ष बदलनारे आहे हे गृहितत्व त्यात आहे. 

संविधानात बदल करायचा कि नाही हे जनतेचे बहुमत ठरवत नाही तर जनतेने निवडून दिलेल्या संसद सदस्यांच्या बहुमताने ठरते. तेही दोन्ही सदनांनी मान्य करावे लागते. त्यावर राष्ट्रपतीचे सही लागते. एवढे होऊनही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे जनतेचे अधिकार सुरक्षित असतात. त्यामुळे "बहुमताची मनमानी" हे तत्व येथे लागू पडत नाही. याचाही अर्थ असा नाही कि या सर्व प्रक्रिया पुर्ण करुनही केल्या गेलेल्या दुरुस्र्त्या या न्याय्यच असतात,. त्या नसतात हे शाहबानो केसमद्धे आपण पाहिलेलेच आहे. पण त्यातल्या त्यात आहे ती पद्धत योग्य असायला काही हरकत नसावी.

कारण धर्मानुसार चालणारे अल्पमतही श्रेष्ठ हे कसे ठरवायचे? हे अल्पमत असणारे कोण असतील? ते कोणत्या धर्मतत्वांनुसार निर्णय देतील? ही धर्मतत्वे लिखित व परिवर्तनीय असतील कि त्रिकालाबाधित सत्ये म्हणून ओळखली जातील? त्रिकालाबाधित सत्ये (किंवा धर्मतत्वे) नेमकी कोणती व कोणाची आहेत? ते त्रिकालाबाधित आहेत याचा निर्णय कोण घेनार? आपल्याला सांस्कृतिक लोकशाही हवी आहे कि घटनात्मक? संस्कृतीचे नेमके मापदंड काय? 

मला वाटते यावर अधिक विचार व्हायला हवा. किंबहुना अलीकडे यावर चिंतन करण्याची वेळ सर्वांवर आलेली आहे. अमेरिकेतील गुलामगिरीविरद्ध संघर्ष करण्याचा निर्णय अल्पमतातील लिंकनने घेतला हे उदाहरण येथे कामाचे नाही. जनमत गुलामगिरीच्या बाजुचे होते हे खरे आहे. पण सत्तेचे घटनात्मक मत हे ती प्रथा संपवायचे होते. तशी ती संपवली गेली. ती त्या द्रूष्टीने अल्पसंख्यंक, पण घटनेला बांधील लोकांनी संपवली. भारतातून सतीप्रथा संपली ती बहुमताच्या इच्छेविरुद्ध संपवली गेली. अमानवी बहुमत तेथे कामाला आले नाही. अल्पसंख्यंकच कायद्याचे आणि राष्ट्राचे अधिकृत प्रतिनिधी असतात. त्य्यांच्यातील विवेक हाच धर्म असतो. तो नसेल तर बहुसंख्य नागरिक त्याचा कसा विरोध करतात हे आपण आणीबाणीत पाहिलेले आहे. 

तेंव्हा विवेक म्हणजे धर्म असा अर्थ घेतला तर उपाध्यायांचे मत मान्य करता येते. हा विवेक मानवतेच्या सहृदयतेतून येतो. ती सर्वोपरी आहे यात शंका बाळगायचे यत्किंचितही कारण नाही. ह विवेक मानवाला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे, पण तिच्यावरील पुटे काढत रहायचेही व विवेकाला सतत प्रगल्भ करण्याचे काम आपल्याला अविरत करावे लागते. हा धर्म असेल तर तो वंदनीयच आहे. किंबहुना तीच अपेक्षा आहे. पण अनेकदा विवेकाचेही बोजवारे उडालेले आपण पाहतो. धर्मनिरपेक्ष कि धर्मसापेक्ष याचा निर्णय उपाध्यायांनी दिला आहे. खरे म्हणजे सेक्युलर स्टेट याचा अर्थ नीट अध्यापही केला नाही. सेक्युलर हा प्राय: इहवादाशी संबंधित आहे व सरकार इहवादी बाबतीतच नियमन करु शकते, धार्मिक अथवा अध्यात्मिक नाही असा सेक्युलरिझमचा अर्थ आहे. धर्म-अध्यात्म हे सरकारने व्यक्तींवर सोडून दिले आहे. भारतात त्याला धर्मनिरपेक्ष अथवा निधर्मीचा अर्थ रुढ धर्मकल्पनांशी लावला जातो, यात बदल व्हायला हवा.

 राष्ट्राची उभारणी कोणत्या तत्वांवर व्हावी यावर असलेल्या चिंतनांपैकी दीनदयाळजींचे चिंतनही महत्वाचे आहे. यात त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अंगांविषयीही आपले विचार मंडले आहेत. ते अर्थविचार आजच्या सर्वस्वी बदललेल्या जागतिक अर्थ परिप्रेक्षात कालबाह्य झालेले असले तरी "स्वदेशी भांडवलवाद" या संकल्पनेशे निकट जाईल अशी त्यांची एकुणातील रचना आहे. भारताच्या प्रकृतीनुसार राष्ट्राचे आणि अर्थव्यवस्थेचे सिद्द्घांतन व्हायला हवे ते आजवर झालेले नाही हे आपले दुर्दैवच आहे. आपला देश गौरवशाली होत विश्वात प्रगत बनला पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या विचारधारांत चर्चा , मंथन होत चांगले ते स्विकारत देशाच्या विकासासाठी एक प्रारुप बनले पाहिजे. कोणतेही प्रारुप दोषविहिन नसते. त्यात सुधारणेला, पुढे न्यायला वाव हा असतोच. दीनदयाळजींनी जवळपास ५० वर्षांपुर्वी व्यक्त केलेले विचार आज तसेच्या तसे कोणी स्विकारु म्हणेल तर ते योग्य होणार नाही. पण त्यात समयोचित बदल, सुधरणा करत, टीकांचीही दखल घेत अधिकाधिक निर्दोष प्रारुप बनवण्यासाठी अवसर देईल एवढे व्यापक मुद्दे त्यांच्या लेखनात आहेत. 

परंपरांचा उद्घोष करणे परंण्परावाद्यांसाठी ठीक आहे, पण वास्तवात परंपरा कालौघात एवढ्या वेळेला बदललेल्या असतात कि नेमकी कोनती परंपरा, कधेची परंपरा, कोनत्या समाजघटक्लाची अथवा प्रांताची परंपरा हे ठरवता येणे मुश्किल होऊन जाईल. भारत हे राष्ट्र अन्य राष्ट्रांपेक्षा वेगळे आहे. त्याची उभारणी करतांना स्वतंत्र, सर्वसमावेशक तत्वज्ञानाची गरज आहे. आजवर आपण जेथवर आलो आहोत त्याहुन फार मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आपल्याला स्वतंत्र प्रतिभेचे तत्वज्ञ नक्कीच हवे आहेत ते ही जबाबदारी उचलतील. ५० वर्षांपुर्वी दीनदयाळजींनी आपल्या विचारधारेनुसार असे चिंतन केले. ते अधिकाधिक निर्दोष करत त्याला पुढे, त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर कितपत चर्चा झाली याचा विचार व्हायला हवा.

वेगवेगळ्या विचारांचे स्थान समाजात असतेच आणि कोणाचेही विचार एकदम त्याज्ज्य मानून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ती चर्चा हवीच आहे. परस्पर, प्रसंगी विरोधी विचारधारांना समजावुन घेत पुढे जायला हवे. 

Thursday, March 24, 2016

वैदिक आणि हिंदूवादाचे तत्वज्ञान


भारतात वैदिक धर्मियांना कर्मकांडात्मक व तात्विक आधारावर विरोध करणारे अनेक लोक होऊन गेले. आजही आहेत. महात्मा फुलेंमुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला नवतत्वज्ञान मिळाले. या वादात ब्राह्मण/क्षत्रीय व वैश्यही हिंदुच आहेत असे गृहित धरले गेले होते व इतर दोन वर्ण सोडून टीकेचा भर केवळ ब्राह्मणांवरच होता. या वादाला ब्राह्मणांनी भीक घातली नाही, कारण त्यांचचे उच्चवर्णीय हे स्थान अबाधित राहत होते. बहुजनांमद्ध्ये धर्मेतिहासाचे अध्ययन/विश्लेशन करण्याची परंपरा जवळ जवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे वैदिक धर्मव्यवस्थेवरील हल्ले हे पोकळ, अर्धवट ज्ञानावर व बव्हंशी शि्वीगाळ करतच झाले. हा मार्गच चुकीचा होता. वैदिक धर्मच मुळात स्वतंत्र, वेगळा धर्म असून परकीयांनी एतद्देशियांना दिलेल्या हिंदू नांवाचा वैदिक धर्मियांनी खुबीने उपयोग करुन घेतला हे लक्षातच आले नाही.

पाश्चात्य विद्वान हा फरक जाणून होते. त्यांनी हिंदू धर्म व ब्राह्मणी धर्म (Brahmanical Religion) अशी आपल्या विवेचनात ठळक विभागणी केली होती. भारतातही हा धर्म सनातन अथवा सनातन वैदिक धर्म या नांवानेच ओळखला जात होता. भारतातील विद्वानही वैदिक धर्म, वैदिक संस्कृती व अवैदिक अथवा अनार्य संस्कृती या नांवाने हे दोन स्वतंत्र धर्म व संस्कृतींचे विभाजन मान्यच करत होते व आजही करत आहेत. असे नसते तर सिंधू संस्कृतीला वैदिक संस्कृती ठरवण्याचे आटोकाट प्रयत्न आधुनिक काळातही केले गेले नसते. सरळ "हिंदू संस्कृती" म्हणुन तिचा उल्लेख केला गेला असता व तेच संयुक्तिक झाले असते. वैदिक संस्कृती-धर्म हे स्वतंत्र आहेत याची जाणीव, विशेषत: ब्राह्मणांना, होती व आहे. तिचे वर्चस्व/श्रेष्ठत्व व भारतातील जेही काही चांगले आहे, अगदी भाषाही, ती वैदिक संस्कृतीची देणगी आहे असे सिद्ध करत बसण्याचे उद्योग विसाव्या शतकात तर फार वाढले. आर्य आक्रमण सिद्धांताने वैदिकही स्वत:ला आद्य आक्रमक समजत आपले मुळस्थान अन्यत्र (भारताबाहेर) शोधू लागले. अलीकडचेच मराठी पुस्तक, मधुकर ढवळीकर यांचे, "आर्यांच्या शोधात" हे पुस्तक या आर्यवादाच्याही प्रभावाचा व भारतीय संस्कृतीचे मूळ वैदिकच असल्याच्या प्रयत्नांचा एक उत्तम नमुना आहे. आर्य सिद्धांताच्या विरुद्ध आजकाल बोलायची पद्धत आली आहे तीही शास्त्रीय कारणांनी नव्हे तर आपण परकीय वंशाचे ठरतो या भयातून हेही लक्षात घ्यावे लागते.

म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे, श्रेष्ठ आहे याची स्पष्ट जाणीव वैदिकांच्या जाणीवेत व नेणीवेत असतेच. वैदिक धर्म स्वतंत्र असल्याची मान्यता पुरातन काळातच होती. हिंदू धर्माचा उदय पौराणिक काळात झाला असे विद्वान मानतात. पण वैदिक धर्म वेगळाच राहिला. म्हणजे वैदिकांसाठी वेदांतील मंत्र तर हिंदूसाठी पौराणिक मंत्र अशी वाटणी आरंभीपासुनच होती. जेही काही संस्कृतात आहे ते म्हणजे केवळ वैदिकांचे हा समज तर नंतरच्या क्लाळात एवढा प्रबळ बनवला गेला आणि इतर भाषांना अपभ्रंश अथवा संस्कृतोद्भव ठरवत एतद्देशियांना स्वतंत्र भाषाही नव्हती कि काय असे वाटायला लावणारा न्यूनगंड निर्माण केला गेला. वैदिक वर्चस्व ठेवत ही सर्व मांडणी केली गेली व हिंदुंच्या बोकांडी वैदिक भूत बसले. ते कसे क्रमश: बसत गेले, कोणत्या काळापासून आणि त्यासाठी कोणत्या राजकीय/सामाजिक/आर्थिक परिस्थित्या कारणीभूत ठरल्या याचे विवेचन मी स्वतंत्रपणे केलेलेच आहे. येथे एवढेच सांगणे महत्वाचे आहे कि वैदिक कर्मकांडे आणि तत्वज्ञान सर्वस्वी वेगळी होती तर शिव-शक्तीदि मुर्तीपुजा करणा-यांची संस्कृती व धर्म हा वेगळाच होता. शिव-शक्तीप्रधान पुजकांच्या संस्कृतीचे स्पष्ट भौतिक पुरावे सिंधू कालापासून देशभर आढळतात...आज तर ते मोजता येत नाहीत एवढे विपुल आहेत. पण त्यांची गणना अर्वाचीन केली गेली. य धर्माची हजारोंने आगमादि शस्त्रे उपलब्ध असतांना वैदिक साहित्याच्या अभ्यासाकडे जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे लक्ष दिले गेले नाही. त्याला दोष देत नाही. काही कारणही नाही. आम्हीच आमच्य धर्माभ्यासाची परंपरा त्यागली असेल तर कोणाला का म्हणून दोष द्यावा?

अनेक विद्वान (व माझे विरोधकही) दावा करत असतात कि वैदिक व अवैदिक (आर्य व अनार्य) धर्मांत संम्मीलन होउन हिंदू धर्म निर्माण झाला आहे. दोन विभिन्न टोकांच्या धर्मात होणारे सम्मीलन स्वागतार्ह आहे यात शंका नाही. समजा तसे झालेच असते तर खालील बदल दिसले असते:

१) वैदिक कर्मकांड व वेदोक्त अधिकार, ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सरसकट खुले झाले असते.
२) अवैदिक देव स्विकारतांना त्यांच्यावर वैदिक "संस्कार" करण्याची व भाकडकथा निर्माण करण्याची गरज न भासता त्यांना त्यांच्या मुळच्याच स्वरुपात वैदिकांनी स्विकारले असते.

थोडक्यात वैदिक व अवैदिक हा फरकच शिल्लक राहिला नसता. ते खरे समान पायावरील सम्मीलन झाले असते. विभेद राहिलाच नसता. सर्वांना एकधर्मीय म्हणवुन एकत्र येता आले असते. पण तसे झालेले नाही.

पण विभेद आहे. स्पष्ट व ठळक विभेद आहे. व तोही वैदिकांचे हिंदुंवरील वर्चस्व या पद्धतीचा आहे. जणु काही हिंदू धर्माची मालकी कोणीतरी वैदिकांना देवून टाकली आहे. इतकी कि वैदिक म्हणतील तोच हिंदू धर्म असे मानण्याची प्रथा जनमानसात निर्माण झाली आहे. या देशातील सर्व काही निर्मिती वैदिकांचीच असून हिंदू हे त्यांचे गुलाम होते, त्यांचे पुर्वज हे कुचकामी, वैदिकांनी हरवलेले, जातीव्यवस्था लादून घेत स्वत:ला अजुन अवमानित करुन घेणारे होते अशी विचारधारा सामान्यांचीच नव्हे तर सुशिक्षित हिंदूचीही बनल्यामुळे ते हीणगंडाचे शिकार झाले आहेत. बरे, तशी वस्तुस्थिती असली...तसे पुरावे असले तरी मान्य करायला हरकत नाही...पण या बौद्धिक आंधळेपणातुन वास्तव शोधायचही प्रयत्न कोणी केला नाही व हिंदुंचे योगदान उच्च रवाने संशोधन करत मांडण्याचा प्रयत्न केला नाही. जेंव्हाही कोणी असा प्रयत्न केला त्यांना, "कशाला हिंदू धर्मात फुट पाडता...?" असे विचारत नाउमेद करण्याचे प्रयत्नही कमी झालेले नाहीत.

जी फुट होती व आहे ती सांगण्यात फुट पाडण्यासारखे मुळात काही नाही. कोणाला यामुळे आपले वर्चस्व संपेल, माहात्म्य संपेल असे वाटत असेल तर तो त्यांच्या न्यूनगंडाचा प्रश्न आहे. स्वतंत्र धर्म असुनही, तसे वागत असुनही ते मान्य न करुन त्यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करण्याचे खरे तर काही कारण नाही. ज्यांना हे माहित नाही त्यांना माहित करुन स्वत्व समजावुन घ्यायला प्रेरित करण्याचा हा प्रयत्न आहे. असंख्य सामाजिक समस्या या अभ्यासातून सुटतील याची मला खात्री आहे.

आणि वैदिक गेली दोनशे वर्ष आपली पाळेमुळे शोधण्याच्या आकांतात शेकडो ग्रंथ आणि हजारो लेख लिहित असतांना हिंदुंनी मात्र आपली पाळेमुळे शोधु नयेत, शोधली तर त्याला "फुट पाडणे" म्हणायचे ही विकृती आहे, दांभिकपना आहे. असे करतांना तात्विक प्रश्न अथवा उत्तरे न घेऊन येता वैदिक मंडळी प्राय: दिशाहीण प्रश्न विचारुन भरकटवण्याचा मुर्ख प्रयत्न करत बसतात. याचे कारण यातुन आपण एकाकी पडू अशी भिती त्यांना वाटते हे आहे. म्हणजे आपल्या वैदिक रक्षणाला आयते हिंदू गुलाम भेटावेत हे त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यामुळेच समतेच्या विरोधात हेच नेहमी असतात. त्यांना प्रश्न न विचारणा-या समाजाची "समरसता" हवी असते. संस्कृती म्हणजे त्यांच्या दृष्टीने वैदिक संस्कृतीच असते व तिचेच माहात्म्य गायचे असते. हिंदुंनी मात्र आपल्य संस्कृतीबाबत बोलायचे नाही. बोलले तर तुम्ही फुट पाडणारे, ब्रिगेडी, कम्युनिस्ट अथवा ब्राह्मण द्वेष्टे ठरवले जाता. मला हे चारी ठरवण्यचे प्रयत्ब्न आजतागायत झालेले आहेत.

कारण त्यांना वैदिक गुलामीतुन हिंदुंना स्वतंत्र होऊ द्यायचे नाही. हिंदुंना मुस्लिम-ख्रिस्त्यांचे भय दाखवत वैदिक धोका मात्र समजू द्यायचा नाही. ते स्वाभाविक आहे. वर्चस्ववादी मनोवृत्त्या हेच करणार, त्यात वावगेही काही नाही.

पण आम्हाला आमचे अस्तित्व व परंपरा समजावून घेण्याचा आम्हा हिंदुंना अधिकार आहे कि नाही?

मी तोच प्रयत्न करतो आहे. मी वैदिक धर्माचाच काय कोणत्याही धर्मियाचा द्वेष करत नाही. मी माझे...माझ्या धर्माचे अस्तित्व समजावून घेत माझ्या बांधवांना ते समजावुन सांगण्याचाच नव्हे तर त्यांनीही आपल्या धर्मेतिहासाचे स्वतंत्र अध्ययन करत वैदिक कचाट्यातून हिंदू धर्म सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत हा प्रयत्न आहे. ज्याचे योगदान त्याला दिले जायलाच हवे यात शंका असण्याचे कारण नाहे. पण ज्यात ज्यांचा काडीइतकाही संबंधच नाही त्यांनी ते योगदान लुबाडावे हे काही योग्य नाही. वर्तमानातही मी पाहतो आणि या प्रवृत्तीचा खेद वाटतो. माझा विरोध असेल तर या प्रवृत्तीला आहे.

असे समजा ही सांस्कृतिक स्वातंत्र्याची लढाई आहे. सत्य समजावून घेत विद्वेषरहित आत्माभिमानाने प्रेरित हिंदू समाज हवा...वर्चस्वाखली पिचलेला नाही हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. लबाड्या दाखवल्या कि वैदिक आणि बाटगे वैदिक फारच चिडतात. ते चिडतात हाच त्यांच्या लबाड्यांचा मोठा पुरावा आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही...!

याला अल्प अपवाद आहेत आणि मी त्यांच्याबदल कृतज्ञच असतो.

थोडक्यात, वैदिक धर्म आणि हिंदू धर्म पुर्णतया वेगळे आहेत. हिंदुंनी हे समजावून घेतल्याखेरीज त्यांच्या मानसिकतेत क्रांतीकारी बदल होत त्यांचा अभ्युदय होणे शक्य नाही. 

Wednesday, March 23, 2016

....अन्यथा आयसिसचा दहशतवाद....




आयसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला आहे तो समस्त मानवजातीला काळीमा फासणारा आहे यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल. परंतू हा मध्यपुर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला मामला उरोपच्याच भुमीवर जावून पोहोचेन याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांच्या बदल्यासाठी हा आतंकवाद फ्रांसमद्ध्ये घुसला. नुकताच ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे येतो.

प्यरिस हल्ल्यातील एक संशयित दहशतवादी सालह अब्देस्लाम गेल्या शुक्रवारी ब्रुसेल्स येथे पकडला गेला होता. त्यानंतर लगोलग झालेला हा हल्ला या अटकेचा सुड घेण्यासाठी व एक माणुस अटक झाल्याने आमचे अस्तित्व संपत नाही हे दाखवण्यासाठी केला गेला असे मत व्यक्त केले जाते आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी जरा उशीराने स्विकारली. त्यामुळे हा हल्ला आयसिसच्या हेडक्वार्टरवरुन नियोजित केला गेला नसून आयसिसच्याच युरोपमधील शिस्तीने विखुरलेल्या स्वतंत्र गटांनी केला असावा असेही मत माध्यमे व्यक्त करीत आहेत.

ही स्थिती अमान्य करण्याचे काहीच कारण नाही. युरोपभर आयसिस पसरली आहे, त्यांना नवेनवे नवखलिफातच्या स्वप्नांनी भारावलेले तरुण रिक्रुट्स जगभरातुन मिळत आहेत. युरोपमद्ध्ये एकीकडे सिरियन स्थलांतरितांबद्दल रोषही आहे तर दुसरीकडे मानवतावादी भावनेने त्यांना आश्रय द्यावा असाही मतप्रवाह जोरदार आहे. या स्थलांतरितांत दहशतवादीही मिसळून गेले असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.  २०१२ ते २०१५ या काळात एकट्या बेल्जियममधून किमान ४०० लोक आयसिस नियंत्रित इराक व सिरियात स्थलांतरील झाले होते. त्यातील 117 लोक परत आले ते केवळ बेल्जियमला युरोपातील आयसिसचे केंद्र बनवण्यासाठी असे मानले जाते.

याचाच अर्थ आयसिसने युरोपमद्ध्ये भकम पाय रोवले आहेत. आताचा ब्रुसेल्सवरील हल्ला हा तुलनेने छोटा असला तरी आम्ही केंव्हाही, कधीही आणि युरोपभर्तात कोठेही दहशतवादी कारवाया करु शकतो हा इशारा म्हणजे आताचा हल्ला आहे. या हल्ल्यांमुळे युरोप युनियनची एकी भंग पावत चाललेली आहे व ती उध्वस्त व्हवी असच आयसिसचा कट दिसतो.

येथे एक बाब लक्षत घ्यायला हवी व ती म्हणजे ओसामा बिन लादेनचे भूत आता आयसिसच्या मानगुटीवर बसलेले आहे. जगभरचे विद्वान या दहशतवादासाठी इस्लाम धर्म व कुराणला जबाबदार धरण्यात मग्न आहेत व या दहशतवादाचे विश्लेशनही तसेच केले जात आहे. खरे तर युरोपियन व अमेरिकन ख्रिस्त्यांनी आणि इझ्राईल स्थापन झाल्या दिवसांपासून ज्युंनी अरब राष्ट्रंत जी विशिष्ट भुराजकीय परिस्थिती निर्माण केली ती य दहशतवादाला अधिक जबाबदार आहे. धर्म कोणताही असता तरी लढाऊ अरबांनी आपली प्रतिक्रिया अशीच दिले असती.

युरोपिय जग सतराव्या शतकापासून सेमेटिक गटाशेची आपली सांस्कृतिक नाळ तोडण्यच्या प्रयत्नात होते. त्यातुनच आर्य वंशवाद फोफावला व सेमेटिक व अन्य वंश हिणकस ठरवण्यात आले. येशू ख्रिस्त आर्य ठरवण्याचेही हिरीरीने प्रयत्न झाले. हिटलरने ज्युंविरोधात क्रुरकर्म्याची भुमिका निभावल्याने आर्य वंश हा शब्द बदनाम झाला. पण युरोपियन विद्वानांने त्यावर आर्य-भाषा-गट सिद्धांताच्या मध्यमातुन तोच सिद्धांत जीवंत ठेवला. त्यामुळे अरबी जगतालाही ते शत्रु बनवणार हे उघड होते. मध्यपुर्वेतील मुबलक तेल याने आधी त्यांचे स्वार्थी लक्ष वेधले असले तरी अरब जगतात राजकीय व सामरिक लुडबुडींचा इतिहास जुना आहे.  सद्दाम हुसेनवर  रासायनिक अस्त्रे आहेत असा धादांत खोटा आरोप करत त्याच्यावर युद्ध लादत, खुनशी फाशी देणारे अमेरिकन व युरोपियन जग व त्यांचा अनुनय करणारे त्याबद्दल मूग गिळून असतात. इझ्रएलचे आतंकवाद नुसते खपवुन घेतले जात नाही तर अश दहशतवाद्यांना चक्क शंततेचे नोबेल दिले जाते. यचा रोष उफाळून येणार नाही असे नाही. लादेनने चक्क अमेरिकेतील ट्विन टोवरवर हल्ला चढवून या रोषाची चुणूक दाखवली.

आता आयसिसच्या रुपात भस्मासूर पुढे ठाकला आहे. हा दहशतवास्द अक्षम्य आहे यात शंका नाही. पण म्हणून युरोप-अमेरिकन "आर्यन" वर्चस्वतावादी विचारांनी भारावलेल्या जगताने अरबांविरुद्ध वारंवार आर्थिक व सामरिक दहशतवाद करावा, राजरोस दरोडे घालावेत व ते केवळ आपल्या बलाढ्य ताकदीच्या जोरावर खपवून न्यावेत हेही योग्य आहे असे कोण म्हणेल? तालिबान, ओसामा ही भुते अमेरिकेच्या पापातुन उभे रहिले होते. आयसिसचे भूत ही त्याचे पुढची आवृत्ती आहे. आयसिसने आजवर जवळपास वीस देशांत ७५ दहशतवादी हल्ले चढवले आहेत. सध्या युरोपची भुमी हिट लिस्टवर आहे. उद्या ती अमेरिकाही असू शकेल. आयसिसमद्ध्ये समील व्हायला जाणारे काही इस्लामी भारतीय धर्मांधही आहेतच. कुराणचे तत्वज्ञान दहशतवादी कुशलतेने वापरुन घेतात. दहशतवादी तत्वज्ञानच काढायचे तर कोणर्त्याही धर्मग्रंथातून काढता येते. उद्देश मात्र तो असला पाहिजे.

आयसिस दहशतवादी आहे. कुराण हा त्यांचा आधार आहे. अरबी लोक टोळी जीवनातुन वाढलेले. तो बेदरकारपणा त्यांच्यात पुरेपूर आहे. सरळ युद्धात आपण युरोपियन राष्ट्रांशी अथवा अमेरिकेशी कालत्रयी जिंकू शकत नाही हे त्यांना माहित असल्याने त्यांनी हा दहशतवादी मार्ग निवडला आहे. त्यासाठी व्यापक इस्लामिक स्टेटची स्थापना, नवी खिलाफत ही त्यांची गरज आहे.

कोणी बनवली ही गरज? त्यांच्यावर अन्याय करणारे, युद्धे लादणारे कोण होते? मला वाटते, ब्रुसेल्समद्ध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतांना यावरही विचारी जागतिक समुदायाने विचार करत उत्तर शोधले पाहिजे. अन्यथा अयसिसचा दहशतवाद संपुर्ण युरोपला पोळून काढल्याखेरीज राहणार नाही.

Monday, March 21, 2016

Origin of the languages

There are various theories those deal with the origin of the languages and their spread. We will take an overview of some most debated theories in academic circles. 


Linguistic psychology or psychology of the languages is an interdisciplinary branch that deals with the psychological and neurobiological factors those enable humans to acquire, use, comprehend, utter and produce the language. Its area is limited to cognitive science as it moreover deals with how the language is processed in the brain and the meaning derived and expressed thereof. Moreover, it deals with a major question how the child acquires and comprehends the language. The language production is a factor that deals with how people produce language, either in written or spoken form, which can be comprehended by others. To convey meaning language produced should be rule-governed otherwise the language spoken or written may not be able to convey what the speaker intended.

In short, linguistic psychology deals with peripheral objectives but does not try to touch the very subject i.e. origin of the languages. It is limited to cognitive science and deals with the associated issues about learning and speaking of the languages.

Chomsky believes that the language is an innate faculty of humans, making them distinct from other animals. He also postulates the universal grammar that makes a child in early age to understand the complex nature of the language. He also proposed that some random mutation took place, maybe after some strange cosmic ray shower, and it reorganized the brain, implanting a language organ in an otherwise primate brain in remote past. Some linguists posited that the languages must have emerged in primates those gradually developed with increase in brain volume over the ages. Broca's and Wernicke's areas in the brain have been considered to be responsible for the languages. However, it was learned later that various parts of the brain participate while producing and uttering the language.

There is no doubt that the origin of the languages is mostly attributed to the need of communication. Proponents of continuity theory, such as Pinker, hold that the language is being mostly innate and some hold that it has developed from animal conversation of primates. A few, like Anderson, believe that the language was invented only once and that all modern spoken languages, being descendent, are somehow related to each other.

Though there are various other theories as well, we have taken overview of the major theories those have been prominent at the present. We can easily determine that the main question of the origin remains unanswered and most of the theories are speculative.

Humans have an ability to think and produce complex sounds because of his developed larynx. Other animals too have larynx those produces certain meaningful sounds, cognizable with their sounds and actions. They too pass on the certain message, though limited. Unlike Humans other animals lack the cohesive thinking process and memory. 

It can be postulated that the faculty of thinking emerged in the human brain first which helped him to construct meaningful language. The complexity of the language developed with the growing complexities of the life. The journey was from sounds coupled with gestures to primary words devoid of any grammar. It sufficed his early needs. Because of developed larynx, he easily could imitate sounds from nature and the other animal kind with independent sounds. This must have amazed him at the early stage, which he transformed in the useful tool, i.e. language.

Word is a sequence of sounds. How early human could have decided a certain sequence of sounds uttered by one delivers some certain meaning? Language is to be understood by others and to the speaker of it, if not, it is meaningless. It cannot make a language in the absence of the meaning.

Here we come across the social mind. People living in a certain band (or geography) possess a certain set of mind to which we call general psychology. Universal mind helped the human being to develop languages from his imminent need of survival. But languages did differ because there were sets of the people spread across the globe living in their specific geographies having special geological characteristics. Specific thinking order in human belonging to certain set could have recognized easily what certain series of sounds meant. Language groups differ based on the sequel of the sounds those form words and the grammar.

It would depend on the general psychology of the people among whom the particular language is developed. Choices of the sounds to make a certain word that has specific meaning differ from language to language. The order of the words set in making a sentence, grammar, too is influenced by the psychology of the people.

The cognitive process of the people living together in the similar geological and geographical conditions become geo-related and hence net of the languages is formed. Language is a manifestation of the collective psychology.  With the growing complexities of the life languages tend to become complex, it gets modified, polished, perfected over the time hence it undergoes various changes. Even today in tribal societies where lifestyle is less complicated their languages too are simple. Even some languages do not need tenses or genders. 

 Language is an expression of the inner self of the human being. A word comes later, meaning comes first, to which we can call innate ability of the human being to process language. He thinks and thinking process takes place in the biological or neurological language in the brain which later is converted into certain meaningful series of sounds, pauses and full stops. The brain processes it before it is uttered.

In the development of early languages, we also find the hand of ritualistic needs.

We have little proofs to understand how and what early human could have been thinking. However, around 40,000 years ago we find cultural explosion across the globe. We have many proofs from excavated finds to show that elaborate burials, pottery and ornaments were part of their life. The concepts of early beauty and eternal curiosity and threat of the death can be understood from these remnants. From cave paintings of Altamira to Bhimbetka, we can see while fighting with the odds he was entertaining himself with art and dance. Innate need of expressing the self and thinking about life and afterlife is evident from such proofs. Material culture and languages go hand in hand in every human civilization.

Michael Maystadt (Illinois State University), says that around this time anatomically humans started to behave and think like modern humans.

Origin of the language is not an isolated phenomenon. It is a collective process of social mind of the people residing in certain geographical areas. Because it is geography that decides social mind and so its expressions, all the language are the cumulative outcome of it. As a universal mind acts the same, every group of the people has developed languages, in their own way. Influence of territorial elements clearly exhibits in human language and culture. This is why we find variety in the languages and regional cultures. In similar territories, adjoining or distant, having common geological features we find different languages, but as their basic structure is similar, we set it in some or other group of the languages.

We have to understand this. It is postulated that the language families have a single ancestor source language that emerged in the distant past in certain hypothetical tribe to spread later because of the human movements.

If we consider the migration theory to be true, first we have to agree that from some place, some group of the people, speaking a certain proto - language did move in many directions in batches. Wherever these groups finally landed, those lands must have been occupied by different groups of the people speaking some kind of the language. To impact the languages of the local people the newcomers must outnumber them or establish a permanent rule over them to enforce language upon them. If we take the Indo-European group of languages for example, we find its spread right from Europe to most part of Asia. To make settlements in such a vast region, PIE speakers, originally settled in any hypothetical homeland, should be too large in number to impact their language on the local people spread over that vast region, no matter how they achieve this. Even if they had to invade such a vast territory they would need enough trained manpower to subjugate all the populations. Even if we consider this was the case, in batches they migrated in different directions in two or three waves, how could they leave any significant mark on the local languages, unless they outnumber them?

Indian case is quite typical. In the Indian subcontinent, there are two distinct language groups, IE and Dravidian. Both the regions are geographically connected… not separated by sea or difficult mountain range. We cannot imagine any reason why IE should stop its spread to the southward of Maharashtra and leave further regions uninfluenced?

Didn’t IE speakers reach there any time in remote history?  It is not the case. So-called IE speakers, whether migrating from original homeland or from North India, sure had reached southern regions. Still, we find no IE impact on those languages.

The surprising fact is, beyond these four Dravid speaking States, in an island country, Shri Lanka, separated by sea, is spoken so-called IE language. The people those could not influence the language of the geographically connected region could impact the language of the people living in the land far beyond, but not in the land that lay between. This sounds like a fairy tale, isn’t it?

But proponents of the PIE speakers’ migration theories staunchly believe in this hypothesis. Some scholars think that the original migrants mingled with the local populations, but left a linguistical genetic mark on the languages of the local people, thereby making them part of the IE speaking group.

Coming back to the questions, in human pre-history the populations were limited. Human beings had settled in respective regions long before 10,000 BC. They were semi-nomadic for their profession of cattle herding and primal agriculture. In 2013, the archaeologists unearthed evidence of early agriculture at a 12,000-year-old site in the Zagros Mountains in eastern Iran. Mehrgarh site indicates that the human beings of that region knew agriculture 10,000 years ago. There may be more sites indicating to the earliest agriculture on the globe. The fact remains that it helped the human being to settle in the respective regions. Kenoyer asserts that, “….These data indicate that foragers were present in the exact locations where we later see the emergence of settled agro-pastoral communities during the Early Food Producing Era (7000-5500 BCE) and the Regionalization Era (5500-2800 BCE).”

Population movements were rare and that too occurring in extreme circumstances, such as climatic disasters or epidemics. There were wars between the tribes, but they too don’t suggest demographic migration of the subjugated tribes. Battle of ten kings, described in the Rig Veda and the battles enumerated in Avesta suggests that either victorious king would enslave the subjugated people or extract heavy ransoms from them. Largely most of the tribes mentioned in the battle of Ten Kings still reside in their respective regions and are known after them.

India has experienced foreign aggressions since known history. From Greeks to Shaka, Hun, Kushan invaded India. Few ruled temporarily some for several centuries. They too had their own distinct culture and languages. But could they impact on the linguistic structure of northern India? There could have been a slight exchange of vocabulary and cultural elements, but it could not change the basic soul of the culture and languages. Rather the invaders adapted to the local languages and cultures, which is evident from the languages and symbols used on the coins of the foreign rulers. 

So, even if the invaders are superior, they cannot enforce their languages. Albeit human has an innate ability to learn other languages, either for political compulsions or religious studies, but original language do not disappear unless such speakers are too small in number. Otherwise, though people can learn many languages, the basic structure of the own language remains unaffected.

There have been rule of north Indian kings or emperors on southern States. There have been religious and commercial exchanges between south and north since the time unknown. Still, we do not find any language impacting other to change its basic linguistic structure, except the exchange of some vocabulary.

The migrations, invasions or rule of some people, thus cannot alter the structure of the languages local people speak. Known examples from the history don’t support this theory. Biological relationship with the group of languages is thus a deliberately nourished hoax. It rather stresses the superiority of some people those migrated and enforced their language upon the local people.

Even in the group language, every language significantly differs from the others. Every language has its own specialized vocabulary. The group languages are said to be having the genealogical relationship or the languages those share common innovations those are not attributed to contact or borrowing. Genealogically related languages present shared retentions, i.e. features of the proto-language. But there are many features in some group languages those are absent in proto or common ancestor language. Still, they find a place in the certain family because they are said to be established with shared innovations, though not directly descending from the common ancestor of the entire language family. Germanic language is a fine example of this. Germanic language share vocabulary and grammatical features those are believed to be not present in Proto Indo-European language. Rather linguists believe that the innovations took place in proto-Germanic which was a descendant of PIE.  

We can see clearly that the concept of the common ancestor language, shared features and innovations in descendent family languages cannot be the explanation to the formations of a language family. The group languages are categorized by common features those can be reconstructed in some proto language and if not those are simply treated as innovations, but thought to be in descending line with the common ancestor language.

However, such proto-language does not exist today. No one knows what could be the exact form of the languages our distant ancestors spoke. It is reconstructed from the most common words, those are found in the hypothetical language family to ascertain the original or source word/root. This is an artificially constructed language; many a times with the help of computer programs those give different results with different programs and hence mostly become speculative and controversial. Rather the PIE language issue is treated by many scholars as a theoretically disguised racist propaganda.

However, we must admit that there are languages those have some or more common features that form a family. To form a family there is no need of physical movement of the people speaking some kind of proto-language.  

We have seen in the previous chapters that the faculty of languages in human is very ancient and is related to the human psychology. The  human genetics too  is influenced by the regional characteristics and do carry recognizable regional markers.

Hence, we can define net of the languages, to which some call language family, with the help of geological characteristics those influence psychology and language of the people. We do not need to trace it back to the population movements of the past as it has no proof to substantiate and hence remains controversial.


We shall see in next chapters how geological characteristics separate one language from other. 

Thursday, March 17, 2016

राष्ट्रवाद

भारतात राष्ट्रवादाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यात भारतात सांस्कृतिक अथवा धर्मवादी राष्ट्रवाद कि घटनात्मक राष्ट्रवाद असा वाद जास्त चर्चेत राहिलेला आहे. र्त्यासठी आपण आधी या दोन राष्ट्रवादांची चर्चा करु.

सांस्कृतिक राष्ट्रवाद:

एक संस्कृती व त्या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व भुगोल व तीत राहणारी माणसे यांचे मिळून राष्ट्र अशी थोडक्यात ही संकल्पना आहे. यात हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) धर्माचे प्राबल्य मुळ केंद्रबिंदू असून हा राष्ट्रवाद हिंदुत्ववादी राष्ट्रवाद बनतो. यात अन्य धर्मियांना दुय्यम स्थान द्यावे असे गोळवलकरवादी विचार जसे आहेत तसे वेळोवेळी बदललेले सावरकरी विचारही आहेत. हे दुय्यम स्थान कायद्याने अथवा वर्तनातून द्यावे असे सूचन यात आहे. किंबहुना सांस्कृतिक राष्ट्रवादाची ती पुर्वअट आहे.
सांस्कृतिक एराजकारणातील मोठी खोट ही आहे कि जीही कोणती संस्कृती केंद्रबिंदू मानायची, मग ती वैदिक असो कि हिंदू, ती नेमकी कोणती? करण दोन्ही धर्मात कालौघात चढौतार आलेले आहेत...उत्थाने व अध:पतनेही झाली आहेत. कोणत्या काळातील संस्कृती अणि कोणती संस्कृती आदर्श मानायची?
बरे, भारत हा खंडप्राय देश आहे. येथे प्रत्येक प्रांतात स्वत:ची स्वतंत्र छाप असणारी संस्कृती आहे, भाषा आहे. तीची स्वतंत्र अनेक वैशिष्ट्येही आहेत. धर्मापुरते बोलायचे तर उत्तरेतील वैदिक धर्म दक्षीणेपेक्षा वेगळा तर हिंदू धर्मही वेगळा. मग कोणत्या प्रदेशातील, नेमक्या कोणत्या काळातील संस्कृती आदर्श मानत त्यावर आधारित "समरस" राष्ट्रवाद आणयचा?
कशी समरसता येईल?
बरे संस्कृती बदलत असते. प्रवाही असते. या प्रवाहीपणाचे भान सांस्कृतिक अथवा धार्मिक राष्ट्रवादात आहे काय? संस्कृती अथवा धर्म हे शब्द राष्ट्रवादाशी भाबडेपणे संलग्न करणे सोपे आहे व तशाच भाबड्यांनी "गौरवशाली संस्कृती" च्या नांवाखाली ती डोक्यावर घेणेही सोपे असते. पण त्यातील मुख्य समस्या ही आहे कि तिच्या अंमलबजावणीत लोकशाही हाच मुख्य अडथळा असतो. आपली लोकशाही असे राष्ट्रवाद मान्य करत नाही. त्यासाठी राष्ट्रघटनाच बदलणे अपरिहार्य ठरते. सांस्कृतिक/धर्मवादी राष्ट्रवादाचा हा एक अपरिहार्य भाग आहे. त्याखेरीज विशिष्ट संस्कृती, ती कोणती हे ठरवणार कोण हे माहित नाही, लादण्याची शक्यताच निर्माण होत नाही. सध्या शक्षणिक अभ्यासक्रमात कोणती संस्कृती घुसवायचे प्रयत्न होत आहेत हे पाहिले कि सांस्कृतिक वैदिककेंद्री राष्ट्रवाद हाच सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे असे ठळकपणे दिसते.

घटनात्मक राष्ट्रवाद:

आपली घटना इहवादी आहे. स्वातंत्र्य-समता-बंधुता या तत्वांना उदात्त मानणारी आहे. कोणताही धर्म मानणे अथवा न मानणे हे ती नागरिकांवर सोडुन देते व वर्तन मात्र घटनात्मक व कायद्यांच्या चौकटीतच असेल असे स्पष्ट करते. ती मानवी स्वातंत्र्य मानते त्याच वेळेस ते अनिर्बंध होणार नाही याचीही काळजी घेते. घटना प्रवाही असून कालसुसंगत असे आवश्यक बदलही ती लोकशाही पद्धतीने स्विकारते. अनेक दुरुस्त्या झाल्या आहेत. अनेक नवे कायदे बनले आहेत तर अनेक रद्दबातलही झालेले आहेत.
घटनेला मानवी चेहरा आहे, विशिष्ट संस्कृती अथवा धर्मलोलुपांचा लालसी चेहरा तिला नाही. ती इहवादी आहे. माणसाचे लौकिक जीवन सुखकर व्हावे हा तिचा उद्देश आहे, पारलौकिक नाही, व सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था ते सामान्य नागरिक त्यासाठी कटीबद्ध रहावेत अशी रास्त अपेक्षा त्यात आहे. जे नाहीत त्यांसाठी कायद्याचा आसुड आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद हा पक्षपाती असणार हे उघड आहे. कोण संस्कृतीप्रमाने वागतो आणि कोण नाही हे कोण ठरवणार? उदाहरणार्थ गोमांस. वैदिक संस्कृतेत एके काळी ते त्याज्ज्य नव्हते. नंतर त्यांनी मांसभक्षणच (काही वैदिक समाज अपवाद) सोडून दिले. पण गोमांस खाणा-या अनेक हिंदू जाती/जमाती आजही आहेत. अन्य धर्मीयही आहेत. गोमांसावर बंदी आणने हा कोणता सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे? कोणत्या काळातील व कोठली आणि कोणाची संस्कृती याला प्रमाण मानली गेली? एखाद्या प्राण्याल, तो दुर्मिळ होत आहे हे लक्षात आले तर त्याच्या हत्येवर अणि त्याचे मांस खाण्यावर बंदी घालणे वेगळे आणि सांस्कृतिक कारणासाठी बंदी घालणे वेगळे.
हे एक उदाहरण झाले. अशी अनेक देता येतील. सांस्कृतिक राष्ट्रवाद तुम्हाला तुमचा धर्म - संस्कृती पाळू देत नाही तर जेही कोणी सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रणेते असतील त्यांचीच इच्छित संस्कृतीच पाळण्याची हुकुमशाही आणली जाते. नव्हे तिची चुणूक आम्ही पाहिलेलीच अहे...पाहत आहोत.
आम्हा नागरिकांना पुन्हा एकदा विचार करायला हवा...तो हा कि आम्ही आमचे राष्ट्र कसे घडवू इच्छितो. आम्हाला नेमका कोणता राष्ट्रवाद हवा आहे हे आम्हीच ठरवायचे आहे. आम्हाला परिवर्तनशील राहणारी इहवादी (सेक्क्युलर) घटनात्मक राष्ट्रवाद हवा कि माणसाच्या आशा-आकांक्षांचा बट्ट्याबोळ करत त्याला माथेफिरु बनवणारी सांस्कृतिक/धर्मवादी राष्ट्रवाद यावर सर्वांनीच गंभीरपणे आणि सातत्याने विचार करायला हवा.

Sunday, March 13, 2016

हिंदुंचे पुरातन धार्मिक ग्रंथ


कोणा व्यक्तिप्रणित (अथवा विशिष्ट समुहप्रणित) तत्वज्ञान/ आचारसंहिता/ दैवतविज्ञान/ कर्मकांडसंहिता/ मान्यग्रंथ ई. वर आधारित जे स्थापन होतात व ज्यांचा प्रचार/प्रसार करावा लागतो...मग तो प्रचारकांद्वारे असो अथवा युद्धांद्वारे...त्यांना पंथ (रिलिजन) म्हणतात. या अर्थाने पाहू जाता वैदिक / पारशी/ बौद्ध / ज्यू / ख्रिस्ती/ इस्लाम इ. हे पंथ ठरतात. ते धर्म नव्हेत. वैदिक धर्माचा प्रवर्तक वसिष्ठ ऋषी व अन्य नऊ ऋषीकुटुंबे मानली जातात.

जी दैवते अथवा तत्वज्ञान अथवा कर्मकांड ही समाजाच्या एकुणातील मानसिकतेतून निर्माण होतात, को्णी एक अथवा अनेक प्रेषित/ऋषी नसतात, मान्यग्रंथ नसतो...थोडक्यात जी सामुहिक निर्मिती असते तिच्या सामुहिक प्रकटनाला धर्म म्हणतात. ईजिप्शियन/ग्रीक/अस्सिरियन/इस्लामपुर्व पेगन ई. असे सामुहिक धर्म होते. ते नि:शेष झाले. एकच टिकून राहिला तो म्हणजे ज्याला आपण आज मुर्तीपुजकांचा शैवप्रधान हिंदू धर्म म्हणतो. हा धर्म हजारो वर्ष टिकला हे त्यांचे कौतुकास्पद कार्य. वैदिक संसर्ग झाला असला तरी तो हिंदू धर्म संपवण्यात यशस्वी झाला नाही. हिंदू समाज वैदिक बनला नाही. आपल्या पुरातन परंपरा त्याने जपल्या. काळानुसार बदलही स्विकारले. हिंदू धर्माला एकमात्र धर्मग्रंथ नाही जसा वैदिकांना मान्यग्रंथ वेद आहे. कारण हिंदू धर्म हा समाजनिर्मित आहे. सुफलनाच्या आद्य मानवी भावनेशी निबद्ध आहे.न त्यामुळे हिंदुंच्य धर्मग्रंथांना सामुहिकपणे आगम ग्रंथ म्हटले जाते. तंत्रे ही याच शास्त्रांवर आधारीत आहेत व हिंदुंचा धर्म हा आजही तंत्राधिष्ठितच आहे.

वेद अथवा वैदिक साहित्य हेच हिंदू धर्माचे आद्य स्त्रोत आहेत हा भ्रम वैदिकांनी निर्माण केला. त्यामागील कारणे, स्वार्थ काहीही असोत, पण वैदिक ग्रंथ हे हिंदुंचे कधीच नव्हते हे वास्तव आहे. याचे कारण असे की वैदिक धर्मग्रंथ व कर्मकांडांपासून हिंदू नेहमीच दूर राहिले. याचा अर्थ असा मुळीच नव्हे कि शैवप्रधान हिंदू धर्माला कसलेच ग्रंथ नव्हते किंवा नाहीत. आगमग्रंथात शास्त्र, सिद्धांत, अनुष्ठान, विज्ञान, योग, आरोग्यादिंसह तंत्रशास्त्रांवर हिंदुंचे अक्षरश: लक्षावधी पुरातन ग्रंथ  आहेत. आगम म्हंणजे "आधीचे". उलट वेदांन "निगम," म्हणजे नंतरचे असे संबोधले जाते हे वास्तव समजावून घ्यायला पाहिजे. शिव-शक्ती व तंत्र साधना ही  सिंधुसंस्कृतीइतकीच पुरातन आहे हे तेथील मुद्रांवरुन सहज लक्षात येते. वेदपुर्व कालापासून तंत्र, योग आणि भक्ती या धर्म्कल्पना अस्तित्वात होत्या असे डा. सुधाकर देशमूख आपल्या "मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती" या ग्रंथांत अनेक विद्वानांच्या साक्षी काढून सांगतात.

तंत्रांचा निर्माता शिव मानला जात असून बहुतेक तांत्रिक ग्रंथ शिव-पार्वती संवादातून साधले गेलेले आहेत. तंत्रशास्त्रांत आगम, यामल व तंत्र यांचा समावेश होतो. सृष्टीतील यात्वात्मकता मानवी जीवनाचा आधार बनवत ते सुखी व संपन्न करणे हा तंत्रांचा मुख्य उद्देश आहे. योगाच्या द्वारे शिव-शक्तीशी तादात्म्य साधणे आणि मानवी जीवात्म्याला पशुभावातून बाहेर काढणे हा उच्च आध्यात्मिक दृष्टीकोन तंत्रांचा आहे. तंत्रांतुनच सांख्य तत्वज्ञानाचा उदय झाला. तंत्रे वेदप्रामाण्य मानत नसून तंत्रे ही स्वत:तच प्रमाण आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आहेत असे मानले जाते. तंत्रांत अनेक संप्रदायही असून पांचरात्र संप्रदाय महाभारत काळात अत्यंत लोकप्रिय होता असेही दिसते. हा पंथ कृष्णाच्या घराण्यात, म्हणजे सात्वतांत अत्यंत लोकप्रिय होता. पाशुपत मत सिंधू काळातही अस्तित्वात असावे असे शिवाच्या ज्या पशुपती स्वरुपातील मुद्रा मिळाल्या आहेत त्यावरुन दिसते.

तंत्रे ही अवैदिक होती व आहेत. मध्ययुगातील धार्मिक साहित्यातुनही हे मत ठळकपणे सामोरे येते. तंत्रशास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणज्वे त्यात भेदाभेद नाही. स्त्री-पुरुषातील समानता हा तंत्रांचा गाभा आहे. बुद्धपुर्व काळ ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत आगमशास्त्रांनी वैदिकांना पुरेपुर झाकोळून टाकले होते. इतके कि अनेक वैदिकही वेद सोडून तंत्रांच्या भजनी लागले. अशा मंडलींना वैदिकांनीही बहिष्कृत करुन टाकले.

तंत्र हे शिव-शक्तीशी निगडित असून ती वेदांपेक्षा पुरातन आहे. वैदिक साहित्यापेक्षाही तंत्रसाहित्याची विशालता अनेक पटीने अधिक आहे.ती अपौरुषेय अथवा अपरिवर्तनीय नसल्याने त्यांत भरही पडत राहिली. (तशी वेदांतही अपौरुषेय म्हणतात पण वेळोवेळी भर पडलेलीच आहे.) त्यामुळे तंत्रांचा विस्तारही अफाट झाला. अगदी मंदिर स्थापत्यापासुन ते पार पंचमकार साधनांपर्यंत तंत्रांचा विस्तार आहे. योग ही तंत्रांची देणगी आहे. याबाबत आपण पुढीक्ल लेखांत अधिक सविस्तर माहिती घेऊच. पण मध्ययुगात तंत्रांतील केवळ वामाचार्ताला लक्ष करत बदनाम केले गेले. पण स्वत: शिवाजी महाराज, संभाजी महाराज शाक्त होते हे वास्तव मात्र विसरले जाते. संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या शाक्त असण्याचा उपयोग केला गेला. पण तंत्र अथवा शाक्त म्हणजे फक्त वामाचार नाही, तर वामाचार ही एक उपशाखा आहे. " धर्म, कर्मकांड, विधि-विधाने, कायदा, औषधी, यातू, शेतीशास्त्र, धातू, शरीरविज्ञानशास्त्र इत्यादि धार्मिक व व्यावहारिक बाबींचा समावेश तंत्रांत होतो. डा. देशमूख उपरोक्त ग्रंथात म्हणतात की शिवशक्तीशी तादात्म्य साधने हा मुख्य उद्देश्य, व्यावहारिक गोष्टींना अधिक महत्व असलेला, तंत्र हा जीवनाकडे बघण्याचा एक्ल दृष्टीकोन आहे. ते पुढे म्हणतात की, "किंबहुना आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो वैदिक कमी आणि तांत्रिक अधिक आहे. तंत्रांचा दृष्टीकोन हा श्रौत-स्मार्त धर्माच्या विरोधात आहे." थोडक्यात वैदिक धर्म व हिंदू धर्म यांच्यात काहीएक संबंध नाही.

भग्वद्गीतेला धर्मग्रंथ मानायचे प्रथा असली तरी गीता हा अनेक तत्वज्ञानांचा संग्रह आहे. असे असले तरी गीतेवर सांख्य, योग व तंत्रांचा पुरेपूर प्रभाव असल्याने त्याला केवळ वैदिक मानता येत नाही. आणि मी पुर्वीच सांगितल्याप्रमाणे तो धर्मग्रंथही नाही. वैदिकांनी केवळ पोटार्थी भावनेने हिंदुंवर वैदिक माहात्म्य थोपण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा काही उपयोग झलेला दिसत नाही. कृष्ण हा सात्वतांत जन्मला व त्याच्याच काळात पांचरात्र या अवैदिक संप्रदायाचा प्रवर्तक बनला. तो कधीही वैदिक नव्हता. वास्तवात वैदिक हिंदू धर्मात लबाड्या करुनच घुसले आहेत. ही परंपरा सहाव्या शतकानंतर सुरु झाली व मध्ययुगात कळसाला गेली. वैदिकांनी आपले अस्तित्व मात्र स्वतंत्रच ठेवलेले असल्याने त्यांना कोणत्याही पुराव्याच्या आधारावर हिंदू म्हणता येत नाही.

हिंदू शब्द सिंधूवरुन आलेला आहे व सिंधू संस्कृतीपासून हिंदु धर्माचे प्रत्यक्ष पुरावे मिळत असल्याने हिंदू नावाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण वैदिक धर्म हा नंतर आलेला, धर्मांतराने विशिष्ट घटकांत पसरलेला वेगळा धर्म आहे, त्याचे तत्वज्ञान वेगळे आहे हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

येथे वैदिक मित्राना एवढेच सांगायचे आहे कि आजही हिंदू प्रत्यक्ष तंत्रशास्त्रे अभ्यासत नसले तरी त्यांचे जीवन हे बव्हंशी तंत्रोक्तच राहिले आहे (जसे वैदिकही वेद अभ्यासत नाहीत). वैदिकांचा सन्निद्ध्यात विदेशी विद्वान आधी आल्याने त्यांचा वेदांशी आधी परिचय झाला व तेही त्याचाच पाठपुरावा अधिक करु लागले. तंत्रशास्त्रांचा आधुनिक अभ्यास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही. पण याचा अर्थ असा समजू नका कि अवैदिकांना कोणतेच धर्मग्रंथ नाहीत...उलट त्यांची संख्या वैदिक सहित्यपेक्षाही मोठी आहे. बाकी पुढील लेखांत.

Saturday, March 12, 2016

एक मृत्युंजयी महाकाव्य



-राकेश पाटील



'मी मृत्युंजय... मी संभाजी' ही संजय सोनवणी लिखित कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. संभाजी हा विषयच मराठी जनमानसाला शेकडो वर्षे भुरळ घालणारा... मराठी माणसाच्या नसनसात चैतन्य, अंगार, अस्मिता फुलविणारा.  महाराष्ट्राच्या भावविश्वाला सतत आव्हान देणारा हा शिवाचा छावा, शंभूराजा साहित्यविश्वासहि तितकाच आव्हानात्मक ठरलाय. वा.सी.बेंद्रे, तिहासकारांनी हे आव्हान पेलून संभाजीचे धवल चरित्र साकारले. शिवाजी सावंत, विश्वास पाटील सारख्या कादंबरीकारांनी शंभूचरित्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु संभाजी हि व्यक्तिरेखा इतिहासात (आणि आजही) तितकीच रहस्यमय आणि आव्हानात्मक सिद्ध होऊन राहिलंय. 'मी मृत्युंजय... मी संभाजी' च्या माध्यमातून संजय सोनवणींनी ह्या आव्हानाला हात घालून शंभूचरित्राचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

साधारण तीनचार वर्षे फेसबुकवर संभाजी ह्या विषयावर अनेक चर्चा घडल्या. स्वत: सोनवणी ह्यांनी संभाजीराजांच्या हत्येसंदर्भात '१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज' आणि 'संभाजी...मृत्युंजय पण हतबल!' असे दोन ब्लॉग लिहून रहस्यभेद करणारी भूमिका मांडली होती. त्यावर अत्यंत सखोल आणि वादग्रस्त चर्चासत्रांच्या अनेक फैरी फेसबुक आणि ब्लॉगवर आजवर घडून गेल्या...आणि अगदी अलीकडेहि ह्या विषयावर हिरहिरीने वाद-प्रतिवाद घडतच आहेत. शंभूचरित्र किती आव्हानात्मक आहे ह्याचा अंदाज त्यातून करता येईल. ह्या पार्श्वभूमीवर 'मी मृत्युंजय... मी संभाजी' हि कादंबरी शंभूराजांच्या वादळी व्यक्तिरेखेचा आणि रहस्यमय इतिहासाचा झंझावात पेलण्यात यशस्वी ठरेल काय?

लेखकाने कादंबरीची रचना पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन काहीशी अभिनव स्वरुपात केली आहे. ऐतिहासिक कादंबरी असूनही लेखकाने कटाक्षाने फाफटपसारा टाळून केवळ १२८ पानांत एक वेगळी मांडणी केली आहे. संगमेश्वर इथे संभाजी राजांना मुघलांनी कैद केले इथपासून ते त्यांची हत्या ह्या सुमारे ४० दिवसांच्या प्रवासात कादंबरी आपल्यासमोर इतिहासाची पाने उलगडीत राहते. ह्या ४० दिवसाच्या  मृत्युमार्गावरून संभाजीचे भावविश्व उलगडून दाखविण्याचा लेखकाच्या संकल्पनेची दाद द्यायला हवी.

कादंबरीची सुरुवात होते ती संगमेश्वर इथे.  शंभूमहाराजांचा तळ पडलाय... शिर्क्यांना नमवून राजे रायगडाकडे निघालेत...हरबा देसायाच्या, अर्जोजी यादवाच्या वतनाचा निवडा करताहेत... सोबत कवी कलश आहेत... म्हलोजी-संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ सारखे सहकारी आहेत... स्वराज्यातील निबिड अरण्यात दऱ्याखोऱ्यानी वेढलेले सुरक्षित असे संगमेश्वर... लेखकाने अत्यंत कौशल्याने त्या  क्षणचित्रांच्या माध्यमातून वाचकांना थेट संभाजीच्या छावणीत नेवून पोहोचवण्यात यश मिळवलंय. कादंबरी ह्या सुरुवातीच्या नाट्यमय रचनेनंतर थेट संभाजीराजांच्या संवादाकडे , मनोगताकडे वळते. ही क्षणचित्रे कादंबरीत अधिक वापरता आली असती आणि त्यातून कादंबरीची पारंपारिक रंजकता खुलवता आली असते असे नमूद करावेसे वाटते.

...आणि संगमेश्वरच्या तळावर अचानक पडलेली मोगली धाड...अकस्मात झालेली कैद...शेख निजाम संभाजी आणि कलश ह्यांना घेऊन तडक निघालाय. खुद्द स्वराज्यातील गड किल्ल्यांच्या, सह्याद्रीच्या घाटवाटांच्या साक्षीने मराठ्यांचा छत्रपती कैद होऊन मोघली तळाकडे निघालाय...हा प्रवास मृत्युच्या दिशेने ४० दिवसांचा... सुटकेची आशा, विश्वास ते असहाय..अगतिक हतबलता...संतापजनक, वेदनादायी फसगत ते साक्षात मृत्यूला आव्हान देणारा दुर्दम्य स्वाभिमान! संभाजीच्या ह्या काळालाही जिंकून जाणाऱ्या मृत्युंजयी प्रवासाची हि कहाणी.     .

कवी कलश ह्यांना उद्देशून संभाजी आपल्याशी संवाद शंभूराजे कलशाला उद्देशून वाचकाशी थेट संवाद साधतात. छत्रपती राजा स्वत:च आपल्या चरित्राचा आणि इतिहासातील घडामोडींचा लेखाजोखा मांडतो. इतिहासातील एकेक रहस्यावरून पडदा उलगडीत राहतो.   शिवरायांचे महनीय स्वराज्य, सत्तालोलुपांची कटकारस्थाने आणि स्वत:चे मनस्वी भावविश्व ह्यांचा इत्यंभूत धांडोळा शंभूराजे स्वत:च आपल्यासमोर सादर करतात. ह्या संवादात शेख निजाम येउन जातो... स्वत: औरंगजेब हजर होतो...संभाजीचा भूतकाळदेखील साक्षात उभा राहतो...

कादंबरी ऐतिहासिक घटनाक्रमावर आधारित अस्सल पुराव्यांशी बांधिलकी ठेवून आपल्यासमोर इतिहासाचे विश्लेषण करीत राहते, हे उल्लेखनीय. जेधे शकावली, फुतहाते आलमगिरी (ईश्वरदास नागर), मासिरे आलमगिरी (साकी मुस्तैदखान) ह्यांची उद्धृते अस्सल पुरावे म्हणून सातत्याने आपल्यासमोर येत राहतात. त्यातून कादंबरी वाचकाला अस्सल इतिहासाशी कायम सलग्न ठेवून वाटचाल करीत राहते. ह्या चाळीस दिवसांच्या मृत्युच्या दिशेने झालेल्या प्रवासात संभाजीराजे आधी आशावादातून हतबलतेकडे आणि मग कैदी असूनही साक्षात मृत्यूला आव्हान देत उभा ठाकलेल्या झुंझार योद्धयाच्या दुर्दम्य आत्मशक्तीने मृत्युंजय कसे सिद्ध झाले ते लेखकाने कौशल्याने लेखणीबद्ध केलंय. आजवर शोकांतिका म्हणून पाहीलेल्या ह्या कथानकाला  एका मृत्युंजयी महाकाव्याच्या रूपाने सादर करण्यात कादंबरी नक्कीच यशस्वी ठरलीय. संभाजीराजांच्या आयुष्यावर अनेक नाटके लिहिली गेली. अत्यंत विपर्यस्त अशी संभाजीची  व्यक्तिरेखा त्यातून प्रदर्शित झाली. हि कादंबरी स्वत:च एक महानाट्य आहे. रंगभूमीला आव्हान देणारा शंभूराजा ह्यातून नक्कीच साकार होईल!

एकीकडे रायगडावरील मुत्सद्द्यांची-घरभेद्यांची कारस्थाने ह्यात फसगत झालेला राजा संभाजी तर दुसरीकडे बादशाह औरंगजेब, दिलेरखान, शहजादा अकबर ह्यांच्या गोटात घुसून त्यांनाच मात देणारा दिल्लीच्या तख्ताला उलटवण्याची खेळी खेळणारा धुरंधर मुत्सद्दी शंभूराजा...एकीकडे मोगलांसह इंग्रज-पोर्तुगीज-सिद्दी अशा शत्रूंची टोळधाड एकदाच अंगावर घेणारा रणझुंझार योद्धा तर दुसरीकडे शाक्त-वैदिक अशा धर्मसत्तांच्या भोवऱ्यात अडकेला छत्रपती...असा इतिहासाच्या महत्वपूर्ण पण अस्पर्श पैलूंचा सारीपाट मांडून लेखकाने  शंभूराजाच्या झंझावाती आयुष्यातील चिरंतन द्वंद्वाचे रहस्य ह्या कादंबरीतून उजळून काढले आहे. शंभूराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला उंचावणारी, सार्थ न्याय देणारी हि कादंबरी!

-राकेश पाटील

'मी मृत्युंजय... मी संभाजी'
लेखक: संजय सोनवणी
प्राजक्त प्रकाशन.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...