Thursday, September 29, 2011

यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले ना लुटले...

(महाराजा यशवंतराव होळकरांचे चरित्र मी सध्या लिहित आहे. या महान सेनानी व पहिल्या स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल गैरसमजच अधिक पसरवुन त्यांना विस्म्रुतीत ढकलण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुर्ण चरित्र पुढील महिन्यात प्रकाशित होईलच...त्यातील हा एक भाग...)


यशवंतरावांना लावण्यात आलेला एक असह्य कलंक म्हणजे त्यांनी पुणे संपुर्ण लुटले, जाळले व प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. यशवंतरावांनी ज्यांची घरे लुटली ती फक्त शिंदें-समर्थकांची व बाजीरावाच्या सल्लागारांची. एकच वाडा जाळला तोही म्हाळुंग्याला, पुण्यात नव्हे. हा वाडा दौलतरावाचा सरदार अंबुजी इंगळे याचा होता. याशिवाय यशवंतरावांनी अन्य कोनावर जुलुमजबरदस्ती केली, लुटालुट केली वा होळकरी दंगा म्हणतात तसा प्रकार केलेला नाही वा तशा स्वरुपाचा एकही पुरावा आस्थित्वात नाही. तरीही आजही अगणित लोकांच्या मनात त्यांची एक खलपुरुष म्हणुनच प्रतिमा रंगवली गेलेली आहे...हे एक अघटितच आहे, पण त्याबद्दल पुढे.

यशवंतराव मोठ्या पेचात सापडले होते. पेशव्याची गादी रिक्त झाली होती. फौजेचे तनखे थकु लागले होते. पुण्यातही स्मशानशांतता होती. वाणी-उदीम दुकाने उघडत नव्हते. बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. काहीतरी त्यांनाच करावे लागणार होते.
त्यांनी स्वता: व्यापा-यांना आपापले व्यवसाय सुरु करायला सांगितले. जेथे वाद होते तेथे भाव बांधुन देण्यातही पुढाकार घेतला. चिंचवदमद्धेही महाराजांनी जीवन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. लोकांमद्धे भय होते ते आधी दुर करायला हवे होते. हळुहळु पुण्यातील लोकजीवन सुरळीत होवू लागले.
दरम्यान त्यांच्या मातोश्री, पत्नी व कन्या मुक्त केल्या गेल्या होत्याच. खंडेराव व त्याची माता मात्र अन्य ठिकाणी कैदेत असल्याने ती सुटका साधली नाही. पती-पत्नीची पुनर्भेट तब्बल ५ वर्षांनी झाली होती. भिमाबाई आता सहा वर्षांची झालेली होती. तिचे बालपणही पहायला न मिळालेला हा अभागी पिता. एवढा काळ हा सारा परिवार शिंदेंच्या कैदेत होता. सीतेला ज्या प्रकारे रावणाच्या कैदेत अनेक वर्ष काढावी लागली त्याचीच ही दुर्दैवी पुनराव्रुत्ती. या नीचपणाबद्दल मराठी इतिहासाने दौलतराव शिंद्यांचे वाभाडे काढल्याचे मी कधी कोठे वाचलेले नाही.

बाजीराव येत नाही हे स्पष्ट होताच यशवंतरावांनी मोरोबादादा व बाबा फडके यांच्या मार्फत अम्रुतरावाला निमंत्रित करुन त्याला पेशव्यांतर्फे कारभार करायला लावायचे त्यांनी ठरवले. . पुण्यातील बाजीरावाच्या काळात अडगळीत फेकल्या गेलेल्या काही जुन्या मुत्सद्द्यांचे पुनरुज्जीवन करण्यत आले. अम्रुतराव तेंव्हा जुन्नर येथे होता. त्याला ही संधीच होती. तो पुण्याला आला. १२ नोव्हेंबर १८०२ला त्याने कारभार हाती घेतला. पेशवा होण्याचे त्याचे जुने स्वप्न. पेशव्याचा प्रतिनिधी म्हणुन काम पहायलाही त्याची हरकत नव्हती...पण आता बाजीराव पुण्याला असा येत नाही हे स्पष्ट झाल्यावर त्याने यशवंतरावांशी करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी अम्रुतरावाला खालीलप्रमाणे मदत करायची होती...
१. रायगडावर कैदेत असलेल्या सवाई माधवरावाच्या पत्नीला, यशोदाबाईला मुक्त करुन अम्रुतरावाचा मुलगा तिला दत्तक घ्यायला लावायचा आणि त्याच्यासाठी पेशवाईची वस्त्रे सातारकर छत्रपतींकडुन देववायची.
२. या बाल-पेशव्याचा प्रतिनिधी म्हणुन अम्रुतरावने दौलतीचा कारभार पहायचा.
३. अम्रुतरावाला यशवंतरावांनी पुर्ण संरक्षण द्यायचे व शिंद्यांचा बंदोबस्त करायचा.
या बदल्यात अम्रुतरावाने यशवंतरावांना युद्धखर्च व हा वरकड खर्च यासाठी एक कोटी रुपये द्यायचे.

परंतु यशोदाबाईंना रायगडावरुन सोडवुन आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.बाजीराव तेंव्हा रायगडावरुन निसटुन सुवर्णगडावर जावून पोहोचला होता. यशवंतरावांनी मग मानेंना साता-याला पाठवुन खुद्द अम्रुतरावासाठी पेशवाईची वस्त्रे आणुन दिली व आपला शब्द पाळला. पण काही ना काही कारणाने (बव्हंशी कारणे त्याच्या सल्लागारांनीच निर्माण केली होती.) अम्रुतरावाची ती वस्त्रे स्वीकारण्याची हिम्मत झाली नाही. अम्रुतरावानेही पैसे देण्यासाठी चालढकल सुरु केल्यावर मात्र यशवंतरावांनी त्याच्यावर दबाव वाढवला. शहरातील श्रीमंतांवर पट्टी बसवुन पंचविस लाख उभे करण्याचा निर्णय अम्रुतरावाने व त्याच्या कारभा-यांनी घेतला. वसुलीचे काम हरीपंत भावेवर सोपवण्यात आले. हा अम्रुतरावाचा सरदार होता. त्याला मदत म्हणुन काही यशवंतरावांचेही लोक द्यावेत अशी अम्रुतरावाने विनंती केल्यावरुन यशवंतरावांनी सरदार नागो जीवाजी, हरनाथसिंग व शेखजी हे तीन सरदार दिले.
म्हणजेच अम्रुतरावाच्या आदेशानेच पुण्यात पट्टी वसुली सुरु झाली होती. या वसुलीचे नेत्रुत्व त्याचाच सरदार हरीपंत भावे हा करत होता. मी माझे निष्कर्ष मांडण्याआधी, कितीही पुर्वग्रहदुषित असली तरी, अन्य इतिहासकारांनी याबाबत काय लिहिले आहे ते त्यांच्याच शब्दात मांडतो...

१. रियासतकार श्री. गो.स. सरदेसाई: (मराठी रियासत, खंड ८) ..".गांवांत एकच हाक झाली. कोणी तांब्या ठेवून पैसा देत नाही. पैसा न मिळाल्यास पठाणांचे हवाली करितात. प्राणांशी गांठ आहे, ब्राह्मण म्हणजे तुच्छ, श्रीहरीचा कोप प्रजेवर झाला. होळकराचे लोकांनी तमाम शहर लुटून घरोघर खणत्या लावून द्रव्य, भांडे, सोने, रूपे, जवाहीर, कापड यांची लूट केली. तोफखाना लुटला. सोन्याची अंबारी अमृतरावांनी होळकरास दिली. पुढे राजकारण सिद्ध होत नाही असे अमृतरावास दिसों लागले, तेव्हा त्यांनीही रात्रीस लोक व कारकून पाठवून लोकांच्या घरांत शिरून घरे खणून चीजवस्त जे सांपडेल ते आपल्या डेऱ्यास नेत गेले. पुण्यांत कोणी गृहस्थ नामांकित पाहून त्याजवर पठाणांस वरात देऊन पाठवावे, पठाणांनी त्यांस धरून मारहाण मनस्वी करावी. वीरेश्वरभट कर्वे व जिवाजीपंत नेने मारतां मारतां मेले. याप्रमाणे शहर बेजार झाले. पौषापासून चैत्र वद्य १४ पावतो चार महिने अमृतरावाचे दरवडे पुण्यास चालू होते. हरि भाव्याने लोकांचे सामान लुटून ब्राह्मणभोजने घातली. चिंचवडास बहुत उपद्रव लागला. ब्राह्मण विष खाऊन मरतात. दर असामी एक तोळा अफू पदरी बांधून आले होते. होळकरांनी आज्ञा वंदन करून तेच बैठकेस मना चिठ्ठी देऊन चिंचवडास हुजरे पाठवले.'

रियासतकारांचे हे विवेचन परस्परविरुद्ध आहे हे ठळक शब्दांतील विधाने वाचताच लक्षात येईल. पण सर्वप्रथम म्हनजे पुर्वग्रहदुषित असुनही रियासतकार यशवंतरावांनी पुणे जाळले असे कोठेही म्हणत नाहीत.
दुसरे असे कि "होळकराचे लोकांनी तमाम शहर लुटून घरोघर खणत्या लावून द्रव्य, भांडे, सोने, रूपे, जवाहीर, कापड यांची लूट केली. तोफखाना लुटला. सोन्याची अंबारी अमृतरावांनी होळकरास दिली..." हे विधान पुरेपुर विसंगतीने भरलेले आहे. जर होळकरांचेच लोक लुट करत होते तर लुटुन आनलेली सोन्याची पालखी होळकरांनाच देनारा अम्रुतराव कोण? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. होळकरांच्याच लोकांनी लुट केली तर ती होळकरांकडेच जाणार हे उघड आहे. म्हणजेच काय वाट्टेल ते करुन यशवंतरावांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. लुट करणारे अम्रुतरावाचेच लोक होते हेही येथे ठळक होते.
तिसरे विधान अजुन महत्वाचे आहे. "पौषापासून चैत्र वद्य १४ पावतो चार महिने अमृतरावाचे दरवडे पुण्यास चालू होते. हरि भाव्याने लोकांचे सामान लुटून ब्राह्मणभोजने घातली..." या वाक्क्यात मात्र चार महिने सतत अम्रुतरावाचे दरोडे चालु होते असे स्पष्ट म्हटले आहे. वाक्य स्वयंस्पष्ट आहे. त्याचा सरदार हरी भावे काय लायकीचा होता हेही येथे स्पष्ट होते. लोकांचे सामान लुटुन ब्राह्मनभोजने घालणारा हा नालायक. यशवंतराव पुण्यात १३ मार्च १८०३ पर्यंत होते. पौष महिना साधारणपणे जानेवारीत येतो. अम्रुतराव पुण्यात १९ एप्रिलपर्यंत होता. येथे हा चार महिन्याचा कालावधी जुळतो. याचा अर्थ असा कि यशवंतराव जोवर पुण्यात होते तोवर ज्या वसुल्या केल्या जात होत्या त्या फक्त श्रीमंत नागरिकांकडुन आणि तोही फारसा जुलुम जबरदस्ती न करता. पण यशवंतराव निघुन गेल्यानंतर आणि बाजीराव इंग्रजी फौजेसह पुण्याला यायला निघाला आहे हे कळताच अम्रुतरावाने पुणेकरांवर मिळेल तेवढे धन काढुन घेण्यासाठी अत्याचार केले व त्याचे पाप मात्र यशवंतरावांच्या माथी थोपले असेच स्पष्ट्पणे म्हणावे लागते.
रियासतकारांचे शेवटचे वाक्य हे चिंचवडच्या देवस्थानाच्या ब्राह्मणांबाबत आहे. अम्रुतरावाने त्यांच्यावरही वसुलीचा रोखा काढला होता व ते वसुलीसाठी नादले जात होते. यशवंतरावाणी स्वत: तो रोखा रद्द करुन त्यांची परत पाठवणी केली आहे.

आता आपण दुस-या पुराव्याकडे वळुयात.
२. मराठ्यांचा इतिहास खंड - ३ ( संपादक :- अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे )
प्रकरण ८ ) ले. सुमन वैद्य
"...१८०२ पर्यंत होळकराने शिंद्यांचे सामर्थ जवळपास संपुष्टात आणले. ते पाहून अमृतरावाने पेशव्याच्या विरोधात चाललेल्या कारस्थानांना गती दिली. यासाठी मोरोबा फडणीस व बाबा फडकेची त्यास मदत होती. यशवंतरावाने दक्षिणेत येऊन पेशव्यास पाठिंबा देणाऱ्यांचे पारिपत्य करावे, खुद्द पेशव्यास पकडून शासनाची सर्व सूत्रे अमृतरावाकडे सोपवावीत. शिंद्यांचा पराभव करून दक्षिणच्या राजकारणातून त्याचे समूळ उच्चाटन करावे. या बदल्यात अमृतरावाने होळकरास एक कोटी रूपे रोख द्यावेत, मल्हारराव होळकराचा* मुलगा खंडेराव यास होळकर घराण्याचा प्रमुख व यशवंतरावास त्याचा प्रतिनिधी म्हणून मान्यता द्यावी असे ठरले. ( * हा मल्हारराव तुकोजी होळकराचा मुलगा )
बाजीराव पुणे सोडून गेल्यावर यशोदाबाईस पुण्याला आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यशोदाबाईच्या मांडीवर अमृतरावाचा मुलगा विनायकबापू यास दत्तक देऊन त्यास पेशवा बनविण्याचा त्यांचा विचार होता. यशोदाबाई रायगडावर कैदेत होती. तिला सोडवून आणायला फौज पाठवली पण याचवेळी बाणकोटच्या खाडीत ब्रिटीश आरमार आल्याने होळकराची फौज मागे आली.
जानेवारी १८०३ मध्ये दौलतराव शिंदे दक्षिणेत येत असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे अमृतराव गडबडून गेला. त्याशिवाय होळकर व अमृतराव यांच्यात तंटा निर्माण झाला. अमृतरावाने बोलल्याप्रमाणे १ कोट रुपये होळकरास दिले नाहीत. तेव्हा त्याने ते पुण्यातून सक्तीने वसूल केले. त्या लुटालुटीत अमृतरावाचा देखील सहभाग होता. मार्च १८०३ मध्ये होळकराने पुणे सोडले. जाताना औरंगाबाद, बीड, पैठण इ. तालुक्यांत त्याने मनसोक्त लुटालूट केली. ब्रिटीश फौज पुण्यानजीक आल्यावर १९ एप्रिल रोजी अमृतराव पुणे सोडून गेला. पुण्यात त्याने जी काही लुटालूट केली त्या लुटीतील संपत्ती हत्ती, उंट, गाड्या यांवर लादून नेली. वाटेत चाकण, राहुरी, संगमनेर व पंचवटीसह नाशिक हा सर्व मुलुख त्याने लुटून फस्त केला."

रियासतकार व सुमन वैद्य यांच्या माहितीत फरक आहे हे उघड आहे. अम्रुतरावाने यशवंतरावांना १८०२ मद्धेच ते उत्तरेत असतांनाच संपर्क साधुन एक कोटीच्या बदल्यात त्यांनी दक्षीणेत येवून शिंद्यांचा बंदोबस्त करावा व खुद्द पेशव्यास पकडुन सर्व सुत्रे अम्रुतरावाकडे सोपवावीत हे विधानच मुळात अनैतिहासिक आहे हे आतापर्यंत मी यशवंतरावांचा जो इतिहास मांडला आहे त्यावरुन स्पष्ट होते. बाजीरावापेक्षा अम्रुतराव बरा असे यशवंतरावांचे मत होते हे खरे असले तरी बाजीरावाला हटवुन/अटक करुन अम्रुतरावाला पेशवा बनवायचे असते तर पुण्याच्या लढाईअगोदरच यशवंतरावांनी अम्रुतरावाला आपल्याकडे बोलावून घेतले असते व बाजीरावाला पाठलाग करुन, पकडुन अम्रुतरावाला पेशवा बनवले असते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे ही हकीगत निराधार वा ऐकीव गप्प आहे असे म्हणता येते. बाजीराव परत येत नाही व दौलतीला कारभारी नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच अम्रुतरावाला पुण्याला बोलावुन घेण्यात आलेले आहे.
अम्रुतराव पुणे सोडुन गेला तेंव्हा त्याने जी लुट हत्ती...उंट...गाड्यांवर लादुन नेली ती पहाता पुण्याचाच नव्हे तर नशिक, पंचवटी, राहुरी, चाकणचाही खरा दरवडेखोर कोण हे लगेच लक्षात येते. येथे अम्रुतरावाचे पाप यशवंतरावांवर ढकलण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. म्हणजेच जीही काही लुट झाली ती अम्रुतरावाने १३ मार्च ते १९ एप्रिल १८०३ च्या दर्म्यान केलेली आहे, तत्पुर्वी जी काही वसुली झाली त्यातील काही हिस्सा यशवंतरावांना खर्चापोटी अम्रुतरावाने दिलेला दिसतो. अम्रुतरावाने शेवटपर्यंत यशवंतरावांना एक कॊटी रुपये दिले नाही हेही वास्तव आहे. खरे तर या मोहिमेत यशवंतरावांचे आर्थिक नुकसानच झालेले आहे. त्यामुळे परततांना त्यांनी औरंगाबाद, बीड ई. भागातुन खंडण्या वसुल केल्या असतील तर त्याचा दोष कोणाचा आहे? येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि तत्कालीन राजकीय स्थितीत युद्धखर्च हा जिंकलेल्या जहागिरदार ते तेथील श्रीमंत नागरिकांकडुनच वसुल केला जात असे. तो सहजी मिळाला नाही तरच लुटालुट केली जात असे. त्यात काहीही वावगे मानले जात नसे.
अम्रुतरावाचे वैगुण्य कमी करण्यासाठी होळकरांचाच खोटा पण मोठा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न तत्कालीन कारभारी व लेखकांनी केलेला दिसतो.
३. आता आपण काही अप्रत्यक्ष पुराव्यांकडे वळुयात. बाहेरगावच्या सरदारांना, सावकारांना पुण्यात जे जे काही घडते त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पुण्यात खास बातमीदार (अखबारनविस) ठेवलेले असत. अशाच एका वेंकट बल्लाळ या बातमीदाराने हरि विट्ठल नावाच्या आपल्या मालकास पुण्यातुन पत्र गेले होते. त्या पत्रात "पदरचे सरदार होळकर व शिंदे यांची लढाई पुणेंयावर होवून महाराज वसईस गेले..." एवढाच उल्लेख आहे. होळकरी दंगा वा लुटालुटीचा कसलाही उल्लेख या पत्रात नाही. पत्रलेखक पुण्यातीलच असल्याने त्याने असे काही घडले असते तर नक्कीच उल्लेख केला असता.
जागतिक किर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार आपल्या Fall Of The Mughal Empire Vol.5 (1789-1803) या प्रसिद्ध ग्रंथात होळकरांनी उज्जैन, कोटा, मंदसोर, भानसोडा...अशा असंख्य ठिकाणी यशवंतरावांनी खंडण्या वसुल केल्याचे ठलकपणे नमुद केले आहे. काही लुटींबाबतही लिहिले आहे. पण पुण्यात मात्र कसल्याही प्रकारची लुट झाली नसुन फक्त ठराविक श्रीमंतांवर पट्टी लावुन जे देत नव्हते त्यांच्याकडुनच सक्तीने वसुली केली असे नमुद करतात. जर एवढा गहजब ज्या लुटी व जाळपोळींबाबत केला जातो तसे असते तर त्यांनी त्याचाही नक्कीच उल्लेख केला असता.
इंग्रज हे यशवंतरावांचे हाडवैरी होते हे जगजाहीर आहे. पण ब्यरी क्लोज वा त्यानंतर पुण्याचा रेसिडेंट बनलेला एल्फिस्टनसुद्धा जाळपोळीबाबत काहीएक नमुद करत नाही.
१-१०-१९४३चा शाहीर खाडिलकरांच्या पोवाड्यात यशवंतरावांचे बव्हंशी जीवन चित्रीत केलेले आहे पण त्यातही पुण्याच्या जाळपोळी वा लुटालुटीचा उल्लेख नाही.
"झुंज" या यशवंतरावांवरील कादंबरीच्या प्रस्तावनेत (येळकोट) लेखक ना. सं. इनामदार यांनीही होळकरांनी पुणे जाळले, पुर्णपणे लुटले या अफवांना कसलाही आधार नाही असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे.
काही इतिहासकार व यशवंतराव समर्थक "कदाचित इंग्रजांसोबत बाजीराव येत आहे , त्याला येथे कसलीही रसद मिळु नये म्हणुन यशवंतरावांनी "दग्दभु" धोरण स्वीकारले असावे व पुणे जाळले-लुटले असावे असे लंगडे समर्थन करतांना दिसतात. पण मुळात त्याची गरज नाही कारण ते खरे नाही. बाजीराव वसईच्या तहान्वये इंग्रजांचे सार्वभौमत्व मान्य करुन त्यांच्यासह पुण्यात आला व १३ मे १८०३ रोजी पुन्हा गादीवर बसला. दग्दभु धोरनांतर्गत जर खरेच जाळपोळ झाली असती, पुणे पुर्ण लुटुन फस्त झाले असते तर बाजीराव कसा गादीवर बसु शकला असता? शहरात नागरिक तरी नकोत काय? असले तर ते काय जळक्या वाड्या-घरांत इतके दिवस राहिले असते काय? आणि ज्या इंग्रजांनी बाजीरावाला आपला अंकित केले त्यांनी असला काही प्रकार झालाच असता तर त्याच्या तपशीलवार नोंदी केल्या असत्या. कारण बाजीराव इंग्रजांसह पुण्यात येण्याच्या आदल्याच दिवशी अम्रुतरावाने त्याच्याबरोबरीलही कथित अवाढव्य लुटीसह पुणे सोडले होते.
थोडक्यात जे स्पष्ट दिसते ते असे...पुणे जाळले गेले नाही. पुण्यातील श्रीमंतांकडुन काही प्रमानात (जेमतेम पाच ते दहा लाख रुपये) वसुली केली गेली. अम्रुतरावाकडुन , म्हनजे पुण्यातुन, पुर्ण पैसे मिळणे अशक्य आहे हे दिसताच यशवंतराव पुणे सोडुन ससैन्य-सपरिवार निघाले. यशवंतराव निघुन गेल्यानंतर आणि इंग्रज बाजीरावासह येत आहेत हे कळाल्यानंतर अम्रुतरावाने मात्र सरळसोट लुटच केली. त्याला मात्र लुटच म्हणावे लागते कारण आता त्याला पट्टी वसुल करण्याचा कसलाही अधिकारच उरलेला नव्हता. तो आता या नव्या राजकीय घडामोडीमुळे पुण्यात चक्क उपटसुंभ ठरला होता. त्याला तसा स्वत:साठी लोकांकडुन एक पै सुद्धा जमा करण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्याने संधीसाधु बनत लुट केलेली दिसते. सुमन वैद्य यांचे म्हनणे अतिरंजित असले तरी अम्रुतरावाने ब-यापैकी संपत्ती पुण्यातुन गोळा करुन नेलेली दिसते.
अशा स्थितीत अम्रुतरावाबद्दलही आजवर कोणी बोलतांना दिसत नाही. त्याला कोणी सजा देण्याची मागणी सोडा साधा गुन्हेगारही ठरवल्याचे दिसत नाही. यशवंतरावांनी लाखोंचे सैन्य आणुन शिंदेंच्घा फडशा पाडला होता. त्यांनी युद्धखर्च मागणे स्वाभाविक होते. तो तर दिला नाहीच, आणि ज्याचे कार्यकर्तुत्व फक्त पेशव्याचा भाउ आणि पेशवा न आल्यास पेशवा व्हायला उताविळ उमेदवार एवढेच, त्याने पुणे लुटावे, स्वत:चे खिसे भरावेत आणि त्याच्याकडे कोणी बोटही दाखवु नये?
बदनाम करावे ते यशवंतरावांना?
कारणाखेरीज काही होत नाही. येथे कारण आहे आणि ते आपल्या जातीयवादात दडलेले आहे. या जातीयवादी किडीने आपलाच खरा इतिहास पोखरुन टाकला आहे. खरे महानायक बदनाम करुन विस्म्रुतीच्या कालांधारात फेकण्याचे अधम कार्य या वावडीबहाद्द्रांनी केले आहे. इतिहासकारही दुर्दैवाने त्याला अपवाद नाहीत ही खंत आहेच.
यशवंतरावांची पुणे स्वारी त्यांना त्यांचा कबिला मुक्त करता आला एवढ्यापुरतीच यशस्वी झाली. खंडेरावाला सुभेदारीची वस्त्रे द्यायला पेशवा नव्हताच. त्यामुळे तेही कार्य अपुरेच राहिले. शिंदे तर अजुनही उत्तरेतच ठाण मांडुन बसले होते...आता कसला सुलह? पेशवा सरळ इंग्रजांकडे शरणागत होत पळाला होता. पेशवाई वसईच्या कराराद्वारे गहाण टाकुन शिवरायांचे स्वराज्य बुडवले होते. यशवंतरावांच्या स्वारीमुळेच पेशव्याला इंग्रजांचा आश्रय घ्यावा लागला हा आरोपही धादांत असत्य आहे कारण इंग्रजांना मिळण्याचे बाजीरावाचे बेत १८०० सालापासुन चालुच होते व युद्धाआधी १०-१२ दिवस आधीही तो इंग्रजांच्याच गुप्तपणे संपर्कात राहुन कराराचे मसुदे बनवायच्या मागे होता हे आपण आधी पाहिलेच आहे. यशवंतराव शेवटपर्यंत त्याने पुण्यात यावे व फैसला करावा यासाठी मन वळवायचा प्रयत्न करत होते....पण तरीही बाजीरावाच्या या निंद्य पापाचे खापरही, अगदी सर जदुनाथ सरकारही, यशवंतरावांवर फोडतात याला काय म्हणावे?
ज्यु धर्मात पापी माणसे एक मेंढा विकत घेवुन त्याच्या डोक्यावर आपली पापे समंत्रक टाकत आणि त्याचा बळी देत असत. असे केले म्हणजे तो माणुस पापमुक्त झाला असे समजले जाई. मला हे सर्व लिहित असतांना वाटतेय कि तत्कालीन समाजाने यशवंतरावांवर आपली सारीच पातके ढकलण्याचाच निर्धार तर केला नव्हता ना?


Monday, September 26, 2011

विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या...

(महाराजा यशवंतराव होळकरांचे चरित्र मी सध्या लिहित आहे. या महान सेनानी व पहिल्या स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल गैरसमजच अधिक पसरवुन त्यांना विस्म्रुतीत ढकलण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुर्ण चरित्र पुढील महिन्यात प्रकाशित होईलच...त्यातील हा एक भाग...)



यशवंतरावांच्या सांगण्यावरुन विठोजीराव होळकर दक्षिणेत आले होते हे आपण मागे पाहिलेच आहे. त्यांच्याकडे विशेष फौजफाटा नसल्याने त्यांनीही सर्वत्र गनीमी काव्याचाच आधार घेतला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात त्यांनी अनेक प्रांत पायतळी तुडवले, पण सुस्थिर होण्याची संधी कोठेही मिळाली नाही. उत्तरेतल्या बातम्या जशा कळत तसतसा पेशव्यांबद्दलचा त्यांचा रागही वाढत चालला होता. तेही अम्रुतराव हाच पेशवा बनावा या मताचे होते. त्यांनी अम्रुतरावाशी संधान बांधले होते. अम्रुतरावांनी त्यांना गुप्त मदतही पुरवली. सनदा दिल्या. पेशव्यांचे बालक्रुष्ण बावनपागेंसारखे काही सरदारही त्यांना सामील झाले. थोडी शक्ती वाढली तसे त्यांनी खुद्द पेशव्याच्याही प्रांतांवर हल्ले सुरु केले. कुरकुंभ, पंढरपुरादि भाग तुडवत, पेशव्यांच्या पानसे, पटवर्धनसारख्या सरदारांचा पाडाव करत पार पुरंदरपर्यंत येउन पोहोचले. बाजीराव पेशवा भित्रा होता हे सर्वविदित आहेच. विठोजी एवढ्या जवळ येउन ठेपला आहे या वार्तेनेच तो घाबरुन गेला. पण पेशव्यांच्या बापु गोखलेदि सरदारांनी विठोजीचा धोका ओळखुन तातडीने लष्करी हालचाली केल्या. मोठी फौज रवाना झाली. विठोजीकडे पेशव्यांच्या तुलनेत फारशी सेना नव्हतीच. तोफा-बंदुकांचा तर प्रश्नच नव्हता. एका अर्थाने विठोजी बागी बंडखोर होता. पेशव्यांच्या फौजांसमोर त्याचा निभाव लागणे शक्यच नव्हते. तो लढाच विषम होता. तरीही पळुन जाण्याऐवजी (गनीमी काव्याला साजले असते..) त्याने चिवट लढा दिला. हार नक्कीच होती. विठोजीला त्याच्या पत्नी-मुलासह पकडण्यात आले व पुण्यात आणण्यात आले.
शत्रु तावडीत जीवंत सापडला आहे हे पहाताच बाजीरावाला चेव चढला. आपण अतिउत्साहाच्या भरात एका विनाशाला जन्म देत आहोत याचेही त्याला भान राहिले नाही. आपण होळकरांसारख्या दौलतीच्या पुर्वीच्या सेवेदारांशी कसे वागायला हवे हे त्याला समजले नाही....आणि आपले क्रुत्य यशवंतरावांसारख्या बलाढ्य राजाशी पराकोटीचे शत्रुत्व निर्माण करेल हेही त्याला उमजले नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी...!

विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या
१६ एप्रिल १८०१.
भारताच्या इतिहासात कोणालाही कधीही एवढी क्रुर शिक्षा दिली गेलेली नाही. मानवतेची,.न्यायाची एवढी क्रुर विटंबना कधीही झालेली नाही.
शनिवारवाड्यासमोरील प्रांगण. काढण्या घातलेल्या विठोजीला भांबुर्ड्यावरुन तेथे आनण्यात आले. दिल्ली दरवाजावरील नगारखान्यात दुसरा बाजीराव आणि बाळोजी कुंजीर बसलेले. विठोजीला करता येईल तेवढे अवमानित करत प्रथम दोनशे कोरडे त्याच्या पाठीवर ओढले गेले. रक्तबंबाळ...सोलपटलेली पाठ...विठोजीला वाटले असेल एवढीच काय ती शिक्षा...अन्यायाविरुद्ध बंड केल्याबद्दल...
पण तसे व्हायचे नव्हते. बाजीराव व कुंजीर शांतपणे खालील प्रकार पहात होते. मैदानात माहुत हत्ती घेउन आला. त्याच्या पायाला विठोजीला साखळदंडांनी बांधले गेले. आता मात्र विठोजीला आपले भवितव्य कळुन चुकले. प्रथमच त्याने बाजीरावाकडे पाहिले...करुणा भाकली...पण बाजीराव ढिम्म होता तर कुंजीर आणि अन्य सरदार त्या द्रुष्याचा विक्रुत आनंद घेत होते.
हत्तीला माहुताने खुण करताच हत्ती चालु लागला. विठोजी फरफटला जावु लागला. स्वता:ला हत्तीच्या पायी न येण्यासाठी आटापिटा करु लागला. पुणेकर गर्दी करुन हे द्रुष्य पहात होते. कोनालाही कसलीही दया आली नाही. सारे हसत होते आणि म्रुत्युचा तमाशा पहात होते. पुण्याच्या विक्रुतीने कळस गाठला होता. एखाद्या समाजाचे नैतीक अध:पतन केवढ्या खालच्या पातळीवर जावू शकते त्याचे हे नीचतम उदाहरण!
असह्य वेदनांनी फरफटला जानारा विठोजी शुद्धीवर असेतोवर किंचाळत राहिला...मदत मागत राहीला...शेवटी तो बेशुद्द्ध पडला...पण तरीही तमाशा सुरुच राहिला...
त्याचे मस्तक हत्तीच्या पायाखाली आले...आणि खेळ संपला!
पण विठोजीची विटंबना येथेच संपली नाही. महाविक्रुत बाजीरावाने विठोजीचे छिन्नभिन्न प्रेत दुस-या दिवसापर्यंत स्वत:च्या आणि पुणेकरांच्या द्रुष्टीसुखासाठी (?) तसेच त्या मैदानातच पडु दिले...
विठोजीबरोबरच पेशवाईचेही मढे उठण्याची व्यवस्था या निर्दय घटनेने केली!

यशवंतरावांचे आक्रमण!

पेशव्याने उघड शत्रुत्व घेतले होते. त्याचा पेशवा म्हणुन मानसन्मान ठेवावा अशी लायकी ठेवली नव्हती. विठोजीच्या क्रुर हत्येची वार्ता काही दिवसांतच यशवंतरावांपर्यंत पोहोचली. यशवंतरावांना या वार्तेने केवढ्या वेदना झाल्या असतील, संतापाचा केवढा उद्रेक झाला असेल याची आपण कल्पना करु शकतो. पेशवे पदाचा तरी म्हणुन असलेला आदर आता चक्काचुर झाला नसल्यास नवल नाही. त्यांनी या क्रोधाच्या भरात पुण्यावर आक्रमण करुन पेशवाई तेंव्हाच बुडवली असती तरी नवल वाटले नसते.
पण यशवंतराव संतापाच्या भरात कसलेही चुकीचे पाउल उचलणा-यांपैकी नव्हते. त्यांनी अत्यंत थंड डोक्याने पुढची योजना आखली. पुण्यावर आक्रमण तर ते करणारच होते, पेशव्याला धडा शिकवल्याखेरीज राहणार नव्हते...पेशव्याचा मुलुख बेचिराख करणारच होते...
आणि आपल्या मागण्या त्याच्याकडुनच पुर्ण करुन घेणार होते...पेशव्याला कैदेत टाकावे वा मारावे असा अविचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.
पण पेशवा आपल्या सौजन्याची कदर न करता एक वेगळाच विनाश निमंत्रीत करणार आहे याची मात्र त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
ते कसे हे पुढील घटनाक्रमावरुन सिद्ध होईल.




Tuesday, September 20, 2011

...१९९० नंतरचे सामाजिक वास्तव....

१९९० नंतरचे सामाजिक वास्तव....
-------संजय सोनवणी

समाज कोणत्याही प्रदेशातील असो, कोणत्याही काळातील असो, तो एकाच वेळीस एवढ्या संम्मिश्र प्रवाहांतुन जात असतो कि त्याचा निश्चित वर्तमान आकलनात येणे जवळपास अशक्य असते. हे प्रवाह प्रतिगामी असतात तसेच पुरोगामी वा स्थितीस्थापकही असु शकतात आणि एकमेकांना अवरोध करत एकुण समाजाची गती कुंठित करत असतात. भारतात १९९० नंतर जशी नवी आर्थिक धोरणे आस्तित्वात आली तशी जागतिकिकरणाची लाट आली....आणि एरवी तुलनेने स्थितिस्थापक असलेला परंपरागत भारतीय समाज एका अत्यंत वेगवान अशा परिवर्तनाच्या लाटेवर आरुढ झाला. याची फळे वरकरणी का होईना एवढी आकर्षक होती आणि आहेत कि आज आपण जागतिकिकरणाशिवाय भारतीय समाज हा विचारच करु शकत नाही. जागतिकिकरणाचे फायदे फक्त शहरी आणि त्यातल्यात्यात उच्च-मध्यमवर्गच लाटतो आहे असे नाही तर त्याचे फायदे तळागाळात झिरपलेले आहेत हेही वास्तव आपण पहात आहोत.
या नव्य आर्थिक स्थितीत, जागतिकिकरणामुळे जे एक सांस्क्रुतीक अभिसरण घडते आहे तेही आश्चर्यजनक व काहीसे भयभीत करणारे आहे. जागतीक संस्क्रुतीच्या लाटांमागुन लाटा भारतावर कोसळत आहेत. अमेरिकन, जपानी, युरोपियन, जापानीज ते चायनीज संस्क्रुत्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव ज्या वेगाने गेल्या तीस वर्षांत वाढु लागले आहेत कि येत्या काही दशकांत येथे पुर्णतया एक नवीच संमिश्र संस्क्रुती आस्तित्वात आलेली असेल. भारतीय संस्क्रुती सर्वच संस्क्रुत्या पचवायला सक्षम असल्याने सर्वच संस्क्रुत्यांवर ही संस्क्रुती मात करुन उरेल हा अभिमान मुळात व्यर्थ आहे हे आपण इतिहासाकडे नजर टाकली तरी लक्षात येईल. पुरातन काळात ग्रीक, रोमन, अरब व चीन्यांकडुन आपण बरीच सांस्क्रुतीक देवाण-घेवाण केलेली आहे. पार धार्मिक संकल्पना, दैवते, पेहराव पद्धती, चित्रशैल्या, तत्वद्न्याने ते उत्पादनपद्धत्यांतही हे साम्स्क्रुतीक संक्रमण झालेले आहे. इस्लामी राजवटीत तर तो वेग अधिकच वाढला. ब्रिटिश काळात तर पार विचारपद्धतीवरही पराकोटीचा प्रभाव पडु लागला...इतका कि हजारो वर्ष ज्या अन्न्याय्य का होईना धर्माबाबत सारा समाज (स्त्रीयांसह) निमुट होता तो आवाज उठवायला लागला...हक्कांची, समानतेची मागणी करु लागला. या गोष्टी सनातन हिंदु धर्मात बसतच नव्हत्या...पण त्याला आव्हाने मिळु लागली. एका अर्थाने ही सामाजिकच नव्हे तर सांस्क्रुतीक क्रांती होती आणि या क्रांतीचा विचारगर्भ होता ब्रिटिश व्यवस्था....त्यांची संस्क्रुती. म्हणजे येथे ज्याही कोणत्याही सामाजिक चळवळी निर्माण झाल्या त्या स्वतंत्र नव्हत्या तर परपुष्ट होत्या. मुळच्या भारतीय संस्क्रुतीचा चेहरा मोहरा या नव्य संस्क्रुतीने पुरेपुर बदलुन टाकला.
१९९० नंतर तर नुसती सामाजिकच नव्हे तर आर्थिक संस्क्रुतीतही ज्या वेगाने विविध संस्क्रुत्यांचा प्रवेश झाला आहे आणि होतो आहे त्यातुन जी काही संस्क्रुती निर्माण होईल ती ओळखण्याच्या पलीकडची असेल.
हे घडणे योग्य कि अयोग्य याबाबत विविध मतप्रवाह असु शकतात. खरे तर सांस्क्रुतिक अभिसरण व त्यात सातत्याने बदल घडत राहणे हे सर्वत्रच होत असते. या बदलांना विरोध करणारे असतात, काही अत्यंत उत्साहाने हे बदल स्वीकारत असतात तर काही नाईलाजाने त्या लाटेवर स्वार झालेले असतात. म्हणजे आर्थिक संस्क्रुतीचे फायदे सर्वांनाच हवे असतात पण सांस्क्रुतीकतेचा जेथे प्रश्न येतो तेथे मात्र गतिरोधांची संख्या अर्थ-संस्क्रुतीपेक्षा अधिक वाढलेली दिसते. (राजकीय संस्क्रुतीही याच लाटांवर आरुढ होत बदलतात...) यातुन जे एक सातत्याने परिवर्तीत होणारे सामाजिक वास्तव आणि एकुणातील मानसिकतेचे आपसातील संघर्ष यातुन निर्माण होत असनारी स्थिती यावर साकल्याने विचार होतोच असे नाही.
वर विषद केलेल्या मुद्द्यांच्या आधारावर आज आपण महाराष्ट्रीय समाजाकडे पाहिले तर खालील मुद्दे पटकन लक्ष वेधतात.

पारंपारिक समाजांतर्गतचा संघर्ष:

१. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद: १९व्या शतकातील सामाजिक चळवळींनी सनातन व्यवस्थेला हादरे दिले असले, मोकळीकीचा काही प्रमाणात श्वास प्राप्त केला असला तरी मुलभुत गाभ्याचे प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिल्याने १३०-१४० वर्षांनतरही हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीय. मराठा महासंघ, बामसेफ, भारत मुक्ति मोर्चाच्या जहाल आक्रमकतेमुळे सध्या हा वाद कदाचित १९व्या शतकात नसेल एवढा पेटलेला आहे. परंतु बव्हंशी समाज, विशेश्त: ब्राह्मण, हा वाद संपण्यासाठी समतोल भुमिका घेत ज्या कारणांमुळे वाद आहे त्यांचे निराकरण करत नाहीत असे दिसते. यातुन एक गंभीर सामाजिक स्थिती निर्माण झालेली आहे हे एक वास्तव आहेच.

२. मराठा-मराठेतर वाद: आरक्षणामुळे निर्माण झालेला हा एक नवीन वाद आहे व तोही हळुहळु सामाजिक संघर्षात बदलेल अशी शक्यता आहे. परंपरागत सत्ता भोगणारा मराठा समाजही आरक्षणाच्या रांगेत आल्याने ओबीसी व अन्य आरक्षित वर्ग अस्वस्थ झालेला असुन त्याबाबत संघर्षाच्या ठिनग्या पडु लागल्या आहेत व ओबीसी कधी नव्हे एवढे जाग्रुत होत एकत्र येत आहेत कारण खरा फटका व झटका त्यांनाच बसण्याची भिती आहे आणि ती निराधार नाही.

३. हिंदु-मुस्लिम वाद: हिंदु-मुस्लिम ऐक्याचे समंजस प्रयत्न होत असतांना मुस्लिम मुलतत्ववादी आणि कट्तर सनातनी हिंदुत्ववादी संघटना यांचा एकमेकांविरुद्धचा गरळ ओकण्याचा कार्यक्रम हा तर फार मोठा धोका आहे हे वास्तव समजावुन घ्यावे लागणार आहे. याची परिणती म्हनजे महाराष्ट्रात पुणे-मुंबई लक्ष करुन गेल्या २५ वर्षांत ब्वांबस्फोटांची वारंवार पुनराव्रुत्ती होत शेकडो माणसे ठार झाली आहेत तर हजारो जखमी झालेले आहेत. त्याचीच प्रतिक्रिया म्हणुन सनातनी कट्तरपंथी हिंदु संघटनाही या दहशतवादाच्या स्पर्धेत उतरले असुन तो भविष्यात कोठे जाइल, हे सांगता येत नाही. या संघर्षामुळे सामाजिक पातळीवर या दोन्हि समाजांत बव्हंशी आपसी संशय वा तिरस्काराचीच भावना आहे हे एक आपले सामाजिक वास्तव आहे.

४. ग्रामीण विरुद्ध शहरी संघर्ष: आज या प्रश्नाची एवढी चिंता शहरी समाजाला वाटत नाही. किंबहुना असा काही संघर्ष होवु शकतो ही कल्पनाच त्यांना हास्यास्पद वाटते, पण तसे वास्तव नाही. अर्थव्यवस्थेचा एकुणातील वाटा जेवढा ग्रामीण जनतेला मिळायला हवा तो मिलत नाही. कमी पीक आले तरी त्रास आणि जास्त झाले तरी त्रास या त्रासदीचा उद्रेक आंदोलनांच्या रुपाने सध्या होतच असतो. परंतु नेहमीच असे उद्रेक आंदोलनांच्या पातळीवर राहतील आणि त्याची परिणती शस्त्रे हातात घेण्यात मात्र होणार नाही असे समजणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील आजवर गडचिरोली-चंद्रपुरच्या जंगलांपर्यंत सीमित रहात हिंसक कारवाया करणारे नक्षलवादी आता पुण्यातही पकडले जावु लागले आहेत. हा असंतुष्ट वर्ग त्यांचे टार्गेट असु शकते याचे भान असायला हवे.

अपारंपारिक सांस्क्रुतिक संघर्ष

गेल्या ३२ वर्षात वेगाने वाढलेले हे काही संघर्ष-

परकीय संस्क्रुती विरुद्ध भारतीय संस्क्रुती: मी लेखारंभीच खरे तर हा वाद निरर्थक आहे असे स्पष्ट केले आहे, परंतु हा एक नवा संघर्ष आहेच. पास्श्च्यात्य संस्क्रुती आता ब-यापैकी भारतीय जीवन व्यापुन आहे हे एक वास्तव आहे. पाश्चात्य पेहरावच नव्हे तर त्यांचे सणही येथे उत्साहाने साजरे होत आहेत. चीनी फेंग-शुइ सापडणार नाही अशी घरे विरळीच असतील. या लाटॆत भारतीय संस्क्रुती वाहुन जाईल अशी शंका आल्याने संस्क्रुतीरक्षकांचीही एक फौज निर्माण होते आहे. महिलांनी बारमद्धे जावु नये, व्ह्यलेंटाइन डे-मदर्स डे, ख्रिस्तमस, ३१ डिसेंबरादि उत्सव साजरे करु नये यासाठी ते प्रसंगी हिंसक होतात हे आपण सातत्याने पहातच आहोत. भारतीय संस्क्रुतीची महत्ता गाण्यासाठी प्रसंगी सती प्रथेचे उदात्तीकरण करायलाही ते मागेपुढे पहात नाहीत. प्रत्यक्षात सती प्रथा ही भारतीयांनी (हिंदुंनी) सिथियन या परकीय जमातीपासुन घेतली हे या कथित संस्क्रुतीरक्षकांना माहितही नसते. हिंदु (भारतीय) संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे मुळात ठरवता येणे शक्य नाही. अर्थात प्रस्तुत लेखाचा भारतीय संस्क्रुती म्हणजे काय हे सांगण्याचा उद्देष नसुन आजचे सामाजिक वास्तव काय आहे आणि ते १९९१ पासुन कसे वेगाने बदलत चालले आहे याकडे लक्ष वेधणे हा आहे.
स्वप्रांतीय विरुद्ध परप्रांतीय: खरे तर हा सामाजिक झगडा शिवसेनेच्या स्थापनेनंतर आधी दाक्षिणात्यांविरुद्ध होता व त्यातुन महाराष्ट्राचे एक सामाजिक व राजकिय वास्तव बदलले. आता मनसेने उत्तरभारतीयांविरुद्ध त्याच मुलतत्वांवर हा संघर्ष सुरु केला आहे. अलीकडे हा संघर्ष कोमट झाला असला तरी महाराष्ट्राचे हेही एक सामाजिक वास्तव आहे.
जागतिकिकरणातील नव्य अर्थव्यवस्थेचे अपरिहार्य लक्षण म्हनजे पराकोटीची स्पर्धा...तिचा लाभ असला तरी तोटेही अभ्यासायला हवेत. त्याच वेळीस व्यवस्थेतील त्रुटी शोधुन गैरफायदा उठवत रातोरात श्रीमंत होवू इच्व्छिणा-यांची भाउगर्दी हेही एक वास्तव आहे आणि त्यावरही चिंतनाची गरज आहे.

जागतीकीकरणाने मुल्ल्यांचा जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे तो मला अधिक गंभीर वाटतो. खरे तर बाह्य संस्क्रुतीपेक्षा मुल्यांचे आंतरिक अधिष्ठाण असणारी संस्क्रुती अभिप्रेत असते. परंतु यात मात्र मोठा -हास होत असुन एक मुल्य-अध:पतीत समाज मात्र वेगाने निर्माण होतो आहे.
गेल्या काही दशकांत कुटुंबव्यवस्था खिळखिळी होवू लागली आहे. घट्स्फोटांचे आणि विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण, विशेश्त: नवतंत्रद्न्यानाच्या क्षेत्रातील,लोकांत, अवाढव्यपणे वाढत आहे. महाराष्ट्रात गांधीजी, विनोबाजींनी वा समाजवाद्यांनी एक मुल्याधिष्ठित समाजाची स्वप्ने पाहिली ती आता पुरेपुर कोलमडलेली दिसतात. सामाजिक चलवळी एन-जी,ओं.च्या हाती जात आहेत हे एक बदलते सामाजिक वास्तव आहे. एन.जी.ओ., काही अपवाद आहेत, पण बव्हंशी भ्रष्ट व स्वार्थप्रणित आहेत हे वास्तव लक्षात घ्यावे लगणार आहे. खरी समाजसेवा दुरच आहे. समाजाला आपण देणे लागतो ही भावना कमी होत चालली असुन व्यक्ती-केंद्रित समाजरचना वेगाने होत चालली आहे आणि ते एकुणातील सामाजिक मानसिकतेवर फार मोठा आघात करत आहे. याची परिणती ही अधिक गंभीर असुन खरे चिंतन यावर व्हायला हवे.
मराठी समाजात वेगाने परिवर्तन होत आहे. द्न्यान-तंत्रद्न्यानाच्या क्षेत्रात तो मोठ्या झेपा घेत साता-समुद्रापार झेंडे फडकावत आहे. अद्याप ते नोकरीच्याच रुपात असले तरी मानसिकता बदलली तर तो अवाढव्य उद्योगही उभारण्याची क्षमता असलेला आहे याची मला पुरेपुर जाणीव आहे. याच समाजात समतेची (मग ती सामाजिक/धार्मिक वा आर्थिक असोत) स्वप्ने पाहणारे, त्यासाठी प्रयत्न करणारे सम्यक द्न्यानवंत व विचारवंतही आहेत...आणि त्या सर्वांचा सार्थ अभिमानही आहे, परंतु यी गतीमान स्थित्यंतराच्या काळात त्यांना साथ देनारे नवविचारवंत द्न्यानवंतांचीही फार मोठी गरज आहे. असे घडले तर या दिशाहीण संक्रमनाला मुल्य-निष्ठता तरी देण्यात यश लाभेल व सुध्रुढ समाजाकडे काही प्रमाणात वाटचाल करता येईल असा विश्वास मला वाटतो.



Sunday, September 18, 2011

महाभारत आधीचे कि रामायण?

महाभारत आधीचे कि रामायण?

रामायण आधीचे असुन महाभारत नंतरचे आहे असे मानले जाते. याचे प्रमुख कारण असे कि खुद्द महाभारतात रामायणकथा सविस्तरपणे येते, तशी भारतकथा रामायणात येत नाही. पण महाभारतात ४थ्या शतकापर्यंत एवढी भर पडली आहे कि चक्क भगवान बुद्धसुद्धा महाभारतात डोकावतात. मग म्हणुन महाभारत बुद्धोत्तरकाळानंतरचे आहे असे समजायचे का?

तर ते तसेही नाही. महाभारत मुळातील जय नावाचे वीरकाव्य होते. ते मुळात फक्त १२,००० श्लोकांचे होते. तेही मुळ संस्क्रुतमद्धे होते काय या प्रश्नाचा निकाल अद्याप लागलेला नाही. रामायण या काव्याचे मुळ नावही "पौलत्स्यवध" असे असुन ते एक गीतिकाव्य वा वीरकाव्य या स्वरुपाचे होते आणि त्यातही ३-४ थ्या शतकापर्यंत भर पडत राहीली. अशी मान्यता आहे कि रामायण आणि महाभारतकाळात किमान ५०० ते १००० वर्षांचे अंतर आहे. "वैदिक संस्क्रुतीचा इतिहास" लिहितांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही, महाभारतकाळात रामायणकाळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे समाजकारण झाले असल्यामुळे रामायण आधी झाले असावे असे मानतांना दिसतात. काही विद्वान तर दोन्हीही काल्पनीक कथा असल्याने दोहोंनाही ऐतिहासिक महत्व देता येत नाही असेही प्रतिपादित करतांना दिसतात.
दोन्ही काव्ये ऐतिहासिक कि काल्पनिक या वादात न पडता मी कोणते काव्य आधीचे असु शकेल यावर येथे विचार मांडत आहे.
माझ्या मते महाभारतकाळ हा आधीचा असुन रामायणकाळ नंतरचा आहे. त्यासाठीचे पुरावे खालीलप्रमाणे:

महाभारतात बहुपतिकत्व, बहुपत्नीत्व आणि नियोगप्रथा सर्रास आहे. किंबहुना पांडवांची जी बाजु येते त्यात तर ती अधिकच स्पष्ट दिसते. उदा:. कुंतीने नियोगानेच विवाहपुर्व आणि विवाहोत्तर काळात पतीशिवाय मुले प्रसवली. माद्रीने सुद्धा. त्यांचे पित्रुत्व सुर्य-इंद्रादी देवतांना दिले गेले असले तरी ती उत्तरकालात केली गेलेली सारवासारव आहे हे स्पष्ट आहे. द्रौपदीने बहुपतीकत्वाची चाल पाळलेली आहे. त्याची अनैतिकता उत्तरकाळात जानवल्याने या बहुपतिकत्वाची पाच वेगवेगळी समर्थने महाभारतात आदिपर्वात येतात. म्हनजे बहुपतीकत्व/नियोगविधी हे ज्या काळात समाजमान्य उरलेले नव्हते त्या काळात या स्पष्टीकरणकथा घुसवण्यात आल्या आहेत.
समाजशास्त्रीय अंगाने पाहिले तर समाजाचा विकास हा स्त्रीसत्ताकाकडुन पुरुषसत्ताकाकडे झालेला दिसतो. स्त्रीसत्ताकात स्त्रीयांचे स्वातंत्र्य अमर्यादित होते. कोनाशी संबंध ठेवावेत, कोणाकडुन संतती उत्पन्न करावी वा किती पती ठेवावेत याचे स्वातंत्र्य स्त्रीयांना होते. द्रौपदी पाच पती असतांनाही कर्णालाही सहावा पती मानण्यास तयार होतीच. म्हनजे कुंती, माद्री व द्रौपदी या स्त्रीसत्ताक संस्थेचे प्रतिनिधित्व करना-या व स्त्रीसत्ताकतेकडुन पुरुषसत्ताकतेकेडे होत असणा-या संक्रमनकाळातील स्त्रीया होत. पांडवांनी त्याच वेळीस अनेक स्त्रीयाही केल्या होत्या यावरुन हे सिद्ध होते.
याउलट आपण कौरवांकडे पाहिले तर लक्षात येते कि ते मात्र पुरेपुर पुरुषसत्ताक पद्धतीचे प्रतिनिधित्व करतात. कौरवांच्या बाजुने कोणेही नियोगप्रथा, बहुपतीकत्वप्रथा पाळलेली नाही. कौरव व पांडव हे एकाच वंशातील होते हे ग्रुहित धरले व त्यांच्या पुर्वजांनी जरी नियोगप्रथा पाळली असली (पंडु, ध्रुतराष्ट्र व विदुर हे नियोगातुनच जन्माला आले अशी आजची महाभारतकथा सांगते. हा नियोग व्यासांशीच झाला ही भारतकथा विश्वसनीय वाटत नाही.) तरी तत्पुर्वी कुरु वंशात बहुपतीकत्व प्रथा असल्याचे महाभारतात दिसत नाही.
परंतु या प्रथेचे स्पष्ट पुनरुज्जीवन झाल्याचे कुंती-माद्री व द्रौपदीच्या रुपात दिसते.
पांडव व कौरवांतील संघर्ष भाउबंदांतील होता कि पुरुषसत्ताक पद्धती आणि स्त्रीसत्ताक पद्धतीच्या समर्थकांमधील होता हाही प्रश्न विचारणीय आहे. कौरवांचा एक पुर्वज भरताचा जन्म हा दुष्यंत-शकुंतलेच्या एकमेव मिलनानंतर तीन वर्षांनी झाला असे आजचे महाभारत सांगते. या विसंगतीकडे लक्ष वेधायचे कारण म्हनजे पुर्वीच्या बहुपतीकत्व प्रथेची उदाहरणे महाभारतकारांना द्यायची नव्हती असे मला वाटते. प्रस्तुत काव्याचा हेतु कौरव-पाडवांतील कलह हा असल्याने त्यांना मात्र पांडवाच्या बाजुने असलेली प्रचलीत बहुपतीकत्व आणि त्याच वेळीस बहुपत्नीकत्व लपवता येणे शक्य नसल्याने त्याभोवती मित्थके रचत त्या प्रथेचे अपवाद म्हणुन समर्थन केले गेलेले दिसते.
कौरव मात्र एकपत्नीकत्वाचे (काही अंशी बहुपत्नीत्वाचे) समर्थक घटक दिसतात. ध्रुतराष्ट्राला एकच पत्नी आहे व ती म्हनजे गांधारी. दुर्योधनालाही महाभारतातुन दिसनारी एकच पत्नी आहे...अन्य कौरवांच्या पत्न्यांची नावे सहसा आढळतही नाहीत. परंतु कौरव हे पुरुषसत्ताक पद्धतीकडील वाटचाल करणारे-पाळणारे होत एवढे मात्र नि:श्चयाने म्हणता येते.
पांडुच्या वनवासामुळे त्याचा संपर्क स्त्रीसत्ताक पधतींशी येवुन पांडव हे नकळत त्या व्यवस्थेशी परिचित झाले व ती प्रथा त्यांनी कायम केली असेही विधान करता येणे सहज शक्य आहे. कुंतीने विवाहापुर्वीच संतती प्रसवली होती या घटनेकडेही दुर्लक्ष करता येत नाही, परंतु त्याकडे आपण तारुण्यातील प्रमाद या द्रुष्टीने पाहु शकतो.
येथे चर्चेचा मुद्दा हा आहे कि बहुपतीकत्व/नियोग ही प्रथा पांडवांनी कायम ठेवलेली दिसते.
तर त्याउलट कौरव मात्र पुरुषप्रधान संस्क्रुतीचे प्रतिनिधी दिसतात.
हा सांस्क्रुतीक बदल घडण्याच्या काळात भारत घडले असावे.

रामायण मात्र जेंव्हा बहुपत्नीकत्व रुढ झाले होते, म्हनजेच पुरुषसत्ताकत्व प्रचलित झाले होते त्या काळात घडलेले दिसते.
रामायनातील (सध्याच्या उपलब्ध असलेल्या) प्रतींतील बालकांड व उत्तरकांड प्रक्षिप्त आहेत हे आता असंख्य पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. मुळातील हे एक वीरकाव्य फक्त राम-रावण युद्धाचे वर्णन करणारे होते. नंतर त्यातही भर पडत आजचे रामायण बनलेले आहे. असे असले तरी त्यातील सामाजिक अवस्था काय होती याकडे मी आपले लक्ष वेधु इच्छितो. ती अशी:
१. रामायणात पुरुषसत्ताक पद्धती स्थिर झालेली दिसते, तरीही स्त्रीसत्ताकतेचे अत्यंत अवशिष्ट असे रुपही आपण कैकयी प्रकरणात पाहु शकतो.
२. स्त्रीयांना दुय्यम स्वरुप मिळाल्याचे रामायनात दिसते. उदा. रामाला वनवासात जातांना सीतेला सोबत नेण्याची इच्छआ नव्हती. उलट तिने भरताच्या आद्न्येखाली रहात अन्य धाकट्या भावांशी तिने भ्रात्रुभाव ठेवावा अशीच रामाची इच्छा दिसते. एवढेच नव्हे तर रावणावर विजय मिळवल्यानंतर "मी रावणाला जिंकले ते मआझ्यावरील कलंक मिटविण्यासाठी...तु वर्षभर रावणासोबत राहिली आहेस...आता तु कोनाचीही संगिनी...शत्रुघ्न-ते भरताची, अगदी बिभिषणाचीही... स्वेच्छेने होवु शकतेस..." अशा अर्थाचे उद्गार रामाने काढलेले आहेत. पहिली अग्निपरिक्षा सीतेला तेथेच द्यावी लागली हे सर्वविदित तर आहेच...पण पुन्हा तिला तशीच अग्निपरिक्षा अयोध्येला गेल्यानंतर द्यावी लागलेली आहे.
३. यातील प्रक्षेप लक्षात घेवुनही एक बाब महत्वाची आहे ती ही कि येथे सर्वस्वी पुरुषप्रधान संस्क्रुतीचे वर्चस्व दिसते. स्त्रीमहत्ता ही धार्मिक द्रुष्ट्या "पती-परायण स्त्री" एवढ्यापुरती सीमित झालेली दिसते. एवढेच नव्हे तर शुर्पनखेचे जे उपहासात्मक रुप रामायणात येते...तेही पुरुषवर्चस्ववादी भुमिकेचे एक रुपक आहे. स्त्रीयांना हवा तो जोडीदार निवडन्याचा एक स्त्रीसत्तअक पद्धतीचा हक्क होता तो शुर्पनखा प्रकरणात नाकारला गेलेला स्पष्ट दिसतो. तिचे नाक कापने, उपहास करने हे स्त्री-शक्ती अवमानाचे उदाहरण रामायणात दिसते... याच उलट महाभारतात हिडिंबेने करार पद्धतीने का होईना, भीमासंदर्भात आपल्या स्त्रीसत्ताकतेची महत्ता जाग्रुत ठेवलेली दिसते आणि पांडवांचा त्याला आक्षेप नव्हता हे आपण मुळ महाभारतात पाहु शकतो.
यात अजुन उदाहरनांची भर घालता येईल. महाभारत हे स्त्रीसत्ताक (पांडव) विरुद्ध पुरुषसत्ताक (कौरव) पद्धतींतील द्वंद्व असेल तर रामायण हे केवळ पुरुषसत्त्ताक पद्धतीचे समर्थन आहे असे म्हणावे लागते. रामायनातील उत्तरकांड प्रक्षिप्त आहे तसेच बालकांडही...या विद्वत्मताशी मी सहमत आहेच. परंतु रामायण हे पुरुषसत्ताक पद्दह्तीचे समर्थन करते हे मत नाकारता येत नाही. याउलट महाभारतात स्त्रीसत्ताक विरुद्ध पुरुषसत्ताक या सामाजिक संघर्षाची स्पष्ट उदाहरणे अधिक असल्याने आधी महाभारत (मग ते काल्पनिक काव्य का असेना..) मग रामायण (काल्पनिक का असेना..) घडले आहे, वा लिहिले गेलेले आहे असे मला वाटते.


Saturday, September 17, 2011

" ... आणि पानिपत "(कादंबरी) - एक सखोल चिंतन...

पुस्तक परिचय : ... आणि पानिपत (कादंबरी) - एक सखोल चिंतन...
-सागर भंडारे यांच्या www.pustakveda.blogspot.com वरुन साभार
पुस्तकाचे नाव : .... आणि पानिपत (कादंबरी)
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, पुणे
किंमत: ४०० रुपये
पृष्ठसंख्या : ४७२




पानिपताचे युद्ध आणि त्याची कारण मीमांसा यावर कित्येक कादंबर्‍या आणि संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत.
अलिकडेच मी संजय सोनवणी यांची " ... आणि पानिपत " ही कादंबरी वाचली. संजय सोनवणी हे संशोधन करुन पुराव्याच्या आधारे लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सदाशिवराव भाऊंचा तोतया , जनकोजी शिंदेचा तोतया याकडे ऐतिहासिक ग्रंथांनी जरी काणाडोळा केला तरी त्यांची स्फोटकता या कादंबरीत जाणवते.

सन १६८० ते १७६१ एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला हा थरारक इतिहास काल्पनिक वाटतच नाही एवढा जळजळीत वास्तव वाटतो.
भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या त्या काळात त्यांनी प्रचंड खळबळ उडविली होती. "...आणि पानिपत" ही देखील अशीच खळबळजनक कादंबरी आहे. "...आणि पानिपत " चे लेखक संजय सोनवणी हे वादग्रस्त विधाने करणारे लेखक म्हणून ओळखले जात असले तरी स्वतः संशोधन करुन पुराव्यासकट विचार वाचकांपुढे ठेवतात. आता कादंबरीकडे वळूयात.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या "...आणि पानिपत" या नावापासूनच खरी सुरुवात होते. वाचकाच्या मनात सुरुवातीची तीन टिंबे "..." ( खरं तर अश्रूंचे थेंब) घर करुन बसतात. आणि कादंबरी वाचून खाली ठेवल्यावर तर "...आणि पानिपत" असे आपसूकच वाचकाच्या मनात उमटते. मला वाटते हेच "...आणि पानिपत" या कादंबरीचे यश आहे.

कादंबरी सुरु होते ती सिदनाक महार या पात्रापासून. तत्कालीन महार समाज कसा रहात होता व तत्कालीन बोलीभाषा वापरल्यामुळे थोडी शिवराळ भाषा वाटत असली तरी त्यामुळे कादंबरीला एक जिवंतपणा येतो. सुरुवातीची काही पाने वाचताना वाचकाला वाटते की सिदनाक महार हे मुख्य पात्र असणार. पण जसजसे कथानक पुढे सरकत जाते तसतसे सिदनाकचा पिता आणि भिमनाक महाराचा मुलगा रायनाक हे पात्र कादंबरीचा प्राण व्यापून टाकते. सद्सद्विवेकबुद्धी , सत्य-असत्य, योग्य-अयोग्य, पात्र-अपात्र अशी कित्येक मानसिक आंदोलने लेखकाने या कादंबरीतून समर्थपणे उभी केली आहेत. आजचा समाज प्रगत आहे आणि लायकी हाच निकष लावून समाजात कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला स्वतःचे स्थान निर्माण करता येते. पण पेशवाईच्या काळात,
महारांना सकाळ आणि संध्याकाळ पुणे शहरात पाऊल टाकायची परवानगी नव्हती. का तर त्यांची सावली अंगावर पडते. आणि त्यामुळे विटाळ होतो. या असल्या खुळचट समजुतीपायी एका महाराने प्राण गमावले (हा सत्य प्रसंग आहे व याचे ऐतिहासिक दाखले देखील आहेत)
तसेच विकत घेऊन बाई ठेवण्याच्याही प्रथा होत्या.
भाऊंचा तोतया नव्हताच असे मानण्यापेक्षा ते खरे भाऊ असू शकतील काय? ही शक्यताही पडताळून तर बघितलीच पाहिजे. कारण पानिपताच्या युद्धात भाऊंचे प्रत्यक्ष प्रेत कोणीही पाहिल्याचा पुरावा नाहीये.
सिदनाक महाराच्या पात्रापासून कादंबरीची सुरुवात झाल्यावर कादंबरीच्या मध्यानंतर पुन्हा त्याचे आगमन होते, या काळात लेखकाने रायनाक महाराच्या वैचारीक प्रगल्भतेवर प्रकाश टाकला आहे. एक स्त्री केवळ निराधार झाल्यामुळे तिचा मोह नाकारण्याएवढा संयम दाखवणारा रायनाक पाहिला की गदगदून येते. त्याउलट रायनाकचा मुलगा सिदनाक लग्नानंतर त्याची बायको पोटुशी होते व बाळंतपणासाठी माहेरी जाते. तेवढ्यात सिदनाकच्या खास मित्राची बायको त्याला एकांतात घरात गाठते, त्यावेळचा त्यांचा रांगडा प्रणय वाचकाला उत्तेजित करता करता स्त्रीचा मोह नाकारणार्‍या रायनाकला अगदी उत्तुंग करुन टाकते. त्यावेळी रायनाकचे मोठेपण वाचकाला जाणवते.
पुढे सिदनाकची पुण्यात एका ब्राह्मणाच्या अंगावर सावली पडल्यामुळे हत्या होते आणि त्याचा मुलगा भिमनाक (हे पणजोबांचेच नाव ठेवलेले असते) पोरका होतो. त्यावेळी रायनाकच्या मनात त्याच्या भावाची येळनाकची विचारसरणी पटू लागते.
भिमनाक महाराला २ मुले असतात. एक रायनाक आणि दुसरा येळनाक. येळनाक संताजी-धनाजी जोडगोळीपैकी संताजी घोरपडेंच्या तैनातीत असतो आणि प्रचंड शौर्यही गाजवतो. पण रायगडाजवळच्या एका लढाईत एक मुसलमान सरदार अशरफीखान येळनाकच्या शौर्यावर भाळतो व त्याला जिवंत कैद करवतो. आणि त्याला मुसलमान होण्याचे निमंत्रण देतो व त्याचा योग्य तो सन्मान करतो. हसन अली या नावाने येळनाकचे नामकरण होते. हा कादंबरीतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यावरुन आपल्याला लक्षात येते की भारतात मुसलमान हे मूठभर आक्रमक असूनही त्यांची संख्या अमाप कशी वाढली? लेखकाने या प्रश्नाचा अप्रत्यक्षरित्या वेध घेतल्याचे जाणवते.
कादंबरी संपायला येते त्याबरोबर रायनाक , भिमनाक ही पात्रे गौण होऊ लागतात आणि येळनाक (हसन अली) या पात्रावर प्रकाशझोत जातो. पण नंतर पुढे दिल्लीचे राजकारण आणि पानिपत युद्धाचा वेध घेणे हा प्रमुख हेतू या कादंबरीमागे असल्याने तो ही विरळ होत जातो. पण तो शेवटपर्यंत असतो.
युद्धासाठी जाणार्‍या लव्याजम्यात भिमनाक त्याची नवी नवरी बाळी बरोबर जातो, त्यात त्याचा खास मित्र पेशव्यांच्या सैन्यात असतो. तो वारंवार भिमनाकला भेटायला येत असतो त्यातच बाळी त्याच्यावर भाळते व पुढे त्यांचे जमते देखील. त्यावेळीही वाचकाला सिदनाकचा रांगडा प्रणय पुन्हा एकदा दिसणार असे वाटते. पण लेखकाने याचे भान ठेवल्याचे जाणवते. ज्या गोष्टीला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच महत्त्व संजय सोनवणी यांनी दिले आहे. शेवटी शेवटी कादंबरी विस्तारीत जाते तशी ती थोडी विस्कळीत वाटू लागते. पण पानिपताच्या युद्धातील प्रश्नांचा आढावा घ्यायचा असल्यामुळे तेवढे वाचक समजू शकतो.

कादंबरी वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी वाचकाच्या मनात पूर्वी वाचलेला पानिपताचा भव्य दिव्य इतिहास उभा राहतो. विश्वास पाटील यांनी 'पानिपत' ही कादंबरी लिहून 'तत्कालिन उपलब्ध साधनांच्या आधाराने पानिपत' युद्धाचा इतिहास एका थरारक स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवला. पण या कादंबरीत जे प्रश्न हाताळले गेले नाहित ते हाताळण्याचे धाडस संजय सोनवणी यांनी दाखवले आहे. आणि मला वाटते की इथेच "...आणि पानिपत" चे वेगळे पण सुरु होते.
पानिपताचा इतिहास म्हटले की मराठ्यांचा पराक्रम आणि पेशव्यांचे कर्तृत्त्व यापलिकडे काही वाचल्याचे आपल्याला आठवते का बघा. सर्वसामान्यांच्या आयुष्यात पानिपताच्या युद्धाने केवढे मोठे वादळ निर्माण केले याचे एक परखड अवलोकन "...आणि पानिपत" च्या माध्यमातून लेखकाने केले आहे. अर्थात या कादंबरीत पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे असेल कदाचित पण लेखकाने पानिपताच्या युद्धाच्या अनुषंगाने सगळ्याच अंगाला स्पर्श केला आहे असे नाही म्हणता येणार. पण जे लिहिले आहे त्याला तोड नाही.

"...आणि पानिपत " ही कादंबरी अनेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते आणि क्रांतिकारक विचार देखील देते. कोणत्याही वेगळ्या विचारांचे स्वागतच व्हायला हवे. वाचकांनी ते करावे एवढीच विनंती. जात पात बाजूला ठेवून एका सर्वसामान्य गरीब रयतेच्या दृष्टीकोनातून या कादंबरीचे वाचन वाचकाने केले तर "...आणि पानिपत" या कादंबरीला तुम्ही न्याय देऊ शकाल. एका जातिविशेष अभिमानातून अथवा पूर्वग्रह ठेवून हे पुस्तक वाचले तर तो "...आणि पानिपत" या कादंबरीवर अन्याय ठरेल. खरे तर तो विचारस्वातंत्र्यावरील अन्याय ठरेल. मला वाटते की त्यांच्या मतांशी भिन्नता असणार्‍या संशोधकांनी वा लेखकांनी त्यांनी उभे केलेल्या प्रश्नांना हॅ... काहीतरीच असे उडवून लावण्यापेक्षा लेखनाच्या माध्यमाद्वारेच उत्तरे दिली पाहिजेत. अशा बौद्धिक आणि पुराव्यांसकट मांडल्या जाणार्‍या मतांमुळे इतिहासातील देवत्व दिलेल्या व्यक्ती खरोखर तशाच होत्या किंवा नाही यामागील सत्य उलगडण्यास सर्वांनाच मदत होईल.

तर सर्वसामान्य आणि सर्व बुद्धीवंत अशा सर्व वर्गातील वाचकांनी अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. वाचकाची अजिबात निराशा होणार नाही हे खात्रीने म्हणू शकतो.
"...आणि पानिपत" वाचा आणि कशी वाटली ते अवश्य कळवा. :)
Posted by सागर भंडारे at 12:20 PM


Friday, September 16, 2011

तरी जगण्याचा अट्टाहास!!

रक्तात अडखळले रक्त
श्वासात अडकला श्वास
भासात जगते विश्व
तरी जगण्याचा अट्टाहास!

ती प्रशांत पोकळी ऐसी
रुद्ध रुदनाने भरलेली
हास्यात क्षण तो जागे
मसनात जळत्या वेळी!

कोप-यात हासतो सुर्य
कोनाड्यातील पणतीही
मेला जोही होता तो पण
कधी नव्हताच धरतीवरती!

जो जन्माला आला नाही
मरणार कसा तो सांगा?
जाळले कोणा मग तुम्ही,
ते प्रेत कोणते सांगा...

म्रुत्युत अडखळले जीवन
जीवनात अडखळे म्रुत्यु
हा झगडा अविरत ऐसा
कि जीवन म्हणजे म्रुत्यु...!

Tuesday, September 13, 2011

महार कोण होते?

महार कोण होते?

महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असे:

१. महार समाजाला गांवकुसाबाहेरचे वास्तव्य होते.
२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
३. चोरांचा माग काढणे, गावात येणा-या जाणा-यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवुन ठेवणे हे त्यांचे कार्य होते.
४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
६. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.
७. महार हे लढवैय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करुन महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.
८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणुन आधी महारांनाच प्राधान्य दिले होते.
९. महार हे ग्राम/नगर/रज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटेल वा नगराध्यक्षाला ते देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपुर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
१०. महार समाज अस्प्रुष्य गणला गेलेला होता.
११. महारांवर शेतसारा/खजीना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आद्न्या/संदेशादिंचे दळनवळनाचेही काम होते.

असो, हे मुद्दे वाढत जातील. येथे मला सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम शोधायचा आहे. यासाठी पुर्वी अनेक विद्वान व डा. इरावती कर्वेंसारख्या विदुषिंनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.

"म्रुताहारी" (म्हणजे म्रुत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणुन) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: म्रुत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे म्रुताहारी बुद्ध धर्माच्या द्न्यात इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मुळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.

महाआहारी (खुप खाणारे) असणा-या लोकांना महार म्हणु लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रोबेर्टसन) मद्धे दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही.
दुसरे असे कि महार एक जात म्हणुन कोनत्याही स्म्रुती/पुराणांमद्धे उल्लेखिलेली नाही. अस्प्रुष्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्म्रुत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्म्रुतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्प्रुष्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार व विष्णुस्म्रुतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्प्रुष्य आहे. त्यामुळे मुलात जन्मभुत अस्प्रुष्यता भारतात नेमकी कधी आणि का आली असे सांगता येत नाही.
वर्णसंकरातुन अस्प्रुष्य जातींचा विकास झाला हे मनुस्म्रुतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्म्रुतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल ई. भारतात अस्प्रुश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही.
याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्म्रुतीकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्प्रुष्य बनवले गेलेले दिसते, त्याचेही विश्लेषन येथे आपल्याला करावयाचे आहे.
मग प्रश्न असा उद्भवतो कि "महार" ही मुळात जात होती काय?
महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक द्रुष्टीक्षेप टाकुयात. महारांमद्धे आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे ई. आडनावे आढळतात.
या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतुन कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले.
त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातुन विकसीत झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महलक्ष्मी ई.) त्याचवेळीस या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्प्रुष्तेचा काळात अन्य मंदिरांत स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहु शकतो. धनगर समाजानेही आपली अस्प्रुष्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहे.
म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. त्या-त्या व्यवसाय-सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास होवू लागतो तसतसे त्यात अन्य समाजघटकातील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो. भारतात त्यांना "जात" बनवले गेले.
आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत हे आपणास माहितच आहे. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारीत असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
त्यासाठी मी सुरुवातीलाच वर्णीत केलेली महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासुन घेवुयात.

अ. महार हे ग्रामरक्षक होते...चो-या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपु शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भुमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इ.स. च्या पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातुन जातांना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे.

म्हणजेच गावाचे/व्यापा-यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.

या दोन मुद्द्यांवरुन मला स्पष्ट दिसते कि "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राक्रुत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे.
आणि हीच सद्न्या महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोनतीही नाही हे जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुनच सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकिय अस्थिरता, धामधुम आणि कधी पुर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जीवंत राहुच शकत नव्हती.

उदय

महार समाजाचा उदय कधी झाला याचे भौतिक/लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतु समाजेतिहासाचा अंदाज घेतला तर जेंव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेंव्हाच हा समाज आपल्याच समाजातुन लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभुत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रु सैन्यावर तुटुन पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासुनची आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशीरा लागेल म्हणुन कधीतरी रक्षकांनी गाव/शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: क्रुषिप्रधान होती व शत्रु नगर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणा-या रक्षकांची वसती केली गेली असावी असे मला वाटते. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भुषवत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणुन ओळखली जावु लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती-स्म्रुती-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवुन ठेवले असेल याचे हेच कारण आहे कि परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मुलभुत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी द्न्यात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमने/पर-आक्रमने यात तर वाटेत येतील त्या गावांत लुटालुट- जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहुन गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जीवाचा धोका पत्करुन उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहीली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागलेले आहे.
२. महार समाज प्राय: गरीबच राहीला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालुन करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत द्न्यात इतिहासातही दिसत नाही.
३. जमीनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत एवढ्या त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मद्धेच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
५. महार समाजावर अस्प्रुष्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असुनही आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती क्रुतद्न्य असले पाहिजे हे लक्षात येइल.

अवनती कशी व का झाली?

महार समाजाला नेमके कधी अस्प्रुष्य ठरवले गेले याबाबत इतिहास मुक आहे. या समाजाची आर्थिक व सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतु तर्काने या प्रश्नांचा उलगडा होवू शकतो. तसा अल्प प्रयत्न मी येथे करत आहे.
१. गावाचे रक्षण करणा-यांना, आणि जे आधी सर्वच समाजघटकांतुन आले होते त्यांना आरंभापासुन अस्प्रुष्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
२. ज्या काळात भारतांतर्गतचा व विदेशी व्यापारही भरात होता तेंव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करना-या महाराष्ट्रातील महारांना अस्प्रुष्य मानले जात असण्याची शक्यता नाही. किंबहुना ८व्या शतकापर्यंतच्या स्म्रुतीही महारांचा अस्प्रुष्य म्हणुन निर्देश करत नाहीत.
असे असले तरी महार समाजाची हळुहळु सामाजिक पातळीवर अवनती होत गेली, त्यांना सर्व जबाबदा-या पुर्ववत तर ठेवल्याच, पण त्यांत अमानुष वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल.
यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.

१. अखिल समाजाची आर्थिक अवनती: पुराणांनी लागु केलेली समुद्रबंदी. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळला. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थाही संकुचित झाली.
यादवकालापर्यंत तरी आपण तुलनेने बरे असलेले स्थैर्य पहातो. परंतु तरीही आंतरराज्यिय व्यापार मात्र उत्तरेकडील धुमधामीने संपत गेला.
अस्थैर्याच्या कालात व्यापाराला फटका बसतो तसेच पर्यायाने तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसतो. उत्पादक घटक आपले उत्पादन सीमित करत नेतात. जेवढी मागणी तिही स्थानिक, वा परिसरातील, तेवढेच उत्पादन करु लागतात. सेवा क्षेत्रावर त्याचा पहिला आघात होत असतो. महार समाजा हा सेवाघटक असल्याने त्यांच्यावर सर्वात आधी आघात होणे स्वाभाविक आहे.
इ.स. १२-१३ व्या शतकाच्या काळात कधीतरी बलुतेदारी पद्धत सुरु झालेली दिसते. ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात अपरिहार्य मानली, आणि तिचा फटका सर्वच घतकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे. कारण वस्तु निर्मात्यांना किमान एक द्रुष्य अस्तित्व असते. ते बहितिक गरजांची पुर्ती करत असतात. म्हणजे शिंपी कपडे शिवत असतो तर सुतार शेतीउपयोगी वस्तुंचे निर्माण/दुरुस्त्या करत असतो. परंतु ग्रामरक्षण ही अद्रुष्य सेवा असते. भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढी एकुणातीलच आर्थिक अवनतीच्या काळात भासणे असंभव होते. हे समाजमानसशास्त्र येथे समजावुन घ्यायला हवे. त्यामुळे शेतीउत्पादनातील (जेही काही असेल ते) सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी आपण बिदरच्या बादशहाने विठु महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतुनही पाहु शकतो. (खरे तर ही सनद म्हणजे महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती हे मला नाईलाजाने म्हनावे लागते.)
व्यापार थांबल्याने व्यापरी तांड्यांचे रक्षण आपसुक थांबले. म्हनजे तोही उत्पन्नाचा स्त्रोत संपला.
म्हनजे अल्प बलुते, अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनुपजावु इनामी जमीनी यातुन होणारा एकत्रित पर्रिणाम म्हनजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जावुन पोहोचणे. बाकी अलुतेदार/बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवर जो आर्थिक आघात झाला त्याचे समाजमानसशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे.

आरंभकाळ
१. चरितार्थासाठी आहे त्या जबाबदा-या पार पाडत मिळेत त्या उत्पन्नात भागत नाही म्हणुन अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्क्रुत माणुसही करतो. गावाच्या एकक उत्पन्न घतकातुन मिळणारा वाटाच कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते. अशा स्थितीत गाव पातळीवर कोनती कामे मिळनार?
आधीच आपापल्या व्यवसायांत सुस्थिर असलेलल्या जातीघटकांच्या व्यवसायात त्यांना वाटा मिळणे शक्यच नव्हते.
इतर जती घटकही पुरेशा उत्पन्ना अभावी अर्धवेळ शेतमजुर असल्याने तेथेही अप्वाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळने शक्य नव्हते.
ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जावू शकत नव्हते. यात दुसरी अडचण अशी होती कि पगारी सैनिक हा प्रकार शिवकाळाचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता.

पर्याय
१. गाव सोडुन रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतांत जाणे. हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जातीघटकांनीही अवलंबिला आहे.
२. गावातच मिळेल ती, कमी प्रतीची का असेनात, कामे प्राप्त करणे. हो\य. हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला. ग्रामरक्षनाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे, म्रुत जनावरांची विल्हेवाट लावणे, गावातील मयतांची सरणे रचने वा खड्डॆ खोदने अशी कामे अन्य कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणुनच करायला मिळाली ती क्रमश:: स्वीकारत जाणे. महारांनी जगण्यासाठी ही सुद्धा कामे करायला सुरुवात केली.
३. इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्या-सुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवर गंडांतरे कोसळु लागली होतीच. त्यांची तिव्रता पाच शाह्यांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षांमुळे वाढु लागली. त्यात अवर्षनांनीही भर घातली होती हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवरुन कळते. भल्या भल्यांना आपल्या पोरी कुनबिणी/बटक्या म्हणुन विकायची वेळ आली होती. गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यश: झाल्या होत्या. अशा स्थितीत जर पोशिंदेच पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय त्या महारांनी जगण्यासाठी म्रुताहार सुरु केला असेल तर त्यात कसलेही आस्च्चर्य वाटण्याचे कारण नाही. महारांच्या म्रुताहाराचे कारण त्यांच्या संस्क्रुतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे महारांनी ग्रामरक्षण आणि सरकारी कामांसोबतच शेतकामे, रस्ते साफ करणे, मढी उचलणे,त्यांची विल्हेवाट लावणे, उकिरडे साफ करणे, अशी हलकी (तरी समाजोपयोगी) कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्य पर्यायच उपलब्ध नव्हते.
जेंव्हा अन्नाचीच ददात पडली असेल तेंव्हा म्रुत मांस खाणे त्यांना भाग पडले असेल.
कारण अखिल समाजच जेंव्हा दारिद्र्याच्या खाईत लोटला जातो तेंव्हा तो अधिकाधिक क्रुपण होत जातो आणि आपल्या उत्पन्नातला न्याय्य वाटा इतरांना देण्यात कुचराई करु लागतो हे एक वास्तव आहे. दुष्काळ पडला म्हणुन धान्याची कोठारे राजाद्न्या टाळत भुकेल्यांसाठी खुले करणारा दामाजीपंत जेंव्हा एखादाच असतो तेंव्हा तशाच दामाजिपंताला राकक्रिधापासुन त्याच्या सुटकेसाठी दंड भरणारा एखादाच विठु महार असतो.
एरवीची स्थिती ही जीवो जीवस्य जीवनम अशी बनुन जाते.
परंतु या काळातच धर्मसंस्था सर्वच मानवी जीवन व्यापुन उरायला लागली होती. पैठण, काशीच्या ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपुर अपहरण करुन स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरु केली. ज्या बाबी मुळ धर्मात कोठेही निर्दिष्टच नव्हत्या त्या लादायला सुरुवात केली. एका परीने एक ब्राह्मननिष्ठ नवाच धर्म या काळात नव्याने निर्माण झाला. या काळात पुर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्या चाकर बनलेल्या होत्याच. सरदारक्या, पाटिलक्या, सरंजामे, देशमुख्या ई. ची स्वार्थप्रणित प्राप्ती करण्याची चढाओढ जेंव्हा लागली तेंव्हा ब्राह्मण तरी का म्हणुन मागे राहतील? परकीय चाकरांना आपल्या समाजाशीच घेणे-देणे राहिले नाही. जहागीर मोगलाईत मिळो कि आदिलशाहीत कि निजामशाहीत...त्यांना जहागिर्यांशिच मतलब उरले. त्यांचा पराक्रम हा आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला. सर्वच मुस्लिमांना यासाठी दोष देता येत नाही.
अशा स्थितीत, जो समाज एवढा हवालदिल झालेला, आर्थिक द्रुष्ट्या पुर्णपणे नागवला जावुनही त्याच जबाबदा-या झेलणारा...त्याची काय अवस्था झाली असेल?
१३व्या ते १५व्या शतकाच्या दर्मयान त्यांना क्रमश: अस्प्रुष ठरवण्यात आले असावे असे मला उपलब्ध पुराव्यांवरुन अंदाजिता येते. उदा. चोखा मेळा या महान संतास विट्ठल मंदिर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्प्रुष्य मानत नव्हते आणि अगदी द्न्यानेश्वरही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात. महारांना ५२ हक्कांची सनद १४७५ साली बेदरचा बहामणी बादशहा महंमदशहा (दुसरा) याने दामाजीपंत, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे वतनदार व १२ बलुतेदारांच्या साक्षीने विठ्या महार यास पातशहाच्या व दामाजीपंतांच्या कामी पडला म्हणुन लिहुन दिली. (पुर्ण सनदेसाठी पहा-"शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, ले. अनिल कोठारे.) हिंदु धर्मांधांनी एक महार ब्राह्मण दामाजीच्या कामी आला हे नाकारण्यासाठी "झाला महार पंढरीनाथ"चा घोषा लावला पण ते अनैतिहासिक आहे.
या सनदेत महार अस्प्रुष्य आहेत असा उल्लेख नाही हे सर्वात महत्वाचे आहे. पण या सनदेत महारांना जे अधिकचे हक्क मागितले व दिले गेलेले आहेत ते मात्र सर्व महार समाजाची आहे त्या स्थितीतील उपजीविका तरी कायदेशीरपणे टिकुन रहावी यासाठी आहे. या सनदीमुळे ,अहारांचे तात्कालिक स्थितीत हित झाले असेल, पण दुरच्या काळात मात्र हीच सनद त्यांच्या पायातील बेडी बनली हे मी आधीच म्हटलेले आहे.
या सनदेची पार्श्वभुमी मुळात पराकोटीचा दुष्काळ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. आजच्याही राजकीय मागण्या या वर्तमानातील प्रश्नांशी संबंधीत असतात...भविष्यात मंगळावरुन कोणी हल्ला केला तर आताच त्याला प्रतुय्त्तर देण्याची मागणी कोणी करत नाही...केली तरी त्याला वेडगळ म्हटले जाते. उद्या आपल्याला तीन मजली शेती करावी लागेल असे जेंव्हा मी म्हणतो तेंव्हा मला मुर्खातच काढले जाते. असो. पण कोणत्याही मागण्या या त्या कालसापेक्षच असतात हेच काय ते वास्तव आहे.
या सनदेनुसार गावातील म्रुत प्राण्यावरचा पहिला आणि एकमेव हक्क महारांचा. कातडीवरील मांगांचा. (मातंग समाज कातडी कमावुन स्वतंत्र उपजिविका करतच होते. त्यांच्याबद्दलही नंतर लिहायचेच आहे...पण ते नंतर...) बाकी हक्क बलुत्यातील वाट्याबद्दलही आहेत. ते हक्क फारसे पाळले गेलेच नाहीत हे वेगळे. पण म्रुत प्राण्यावरील हक्क महारांचा अधिक्रुत आणि राजाद्न्येप्रमाने झाल्याने एक वेगळी सामाजिक व धार्मिक घटना घदली ती म्हणजे महार समाज अस्प्रुष्य ठरवण्यात आला.
पुन्हा सांगतो, तत्पुर्वी, अगदी बेदरच्या बादशहाने सनद देईपर्यंत महार हा अस्प्रुष्य आहे अशी नोंद नाही. कोणत्याही (अगदी १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या) स्थलपुराणांतही महार अस्प्रुष्य आहेत याची नोंद नाही. अंत्यज म्हणजे महार नव्हेत.
परंतु दुर्दैवाने वंशपरंपरागत व्यवसाय पोट भरण्यास अक्षम ठरल्याने आणि अन्य पर्यायांच्या अभावात हीण वाटणा-या सेवा कराव्या लागल्याने ब्राह्मणी धर्मसंस्थांनी महारांना अस्प्रुश्य ठरवले आणि त्यांचा सामाजिक आणि धार्मिक दर्जाच नष्ट करुन टाकला.
तो अमान्य करण्याच्या अवस्थेत तेंव्हा महार होते काय? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते. तेच काय अन्य काही अस्प्रुष्य मानल्या गेलेल्या जातीही त्या विद्रोहाच्या अवस्थेत नव्हत्या. कारण त्याला प्रतिरोध करण्यआसाठी जी आर्थिक, मानसिक स्थिती लागते त्या स्थितीत हा समाज होता काय? त्यांच्या लढवैय्या परंपरांचा राजकीय उपयोग करुन घेण्यात या काळातील राजसत्ता निरुपयोगी ठरल्या. शिवाजी महाराजांचा अल्प काळ एवढाच अपवाद करता येतो...आणि तोही अल्प स्थितीत महार समाजाला थोडा आत्मभान देनारा ठरला. परंतु महार समाजाला (आणि अन्य खालच्या मानल्या गेलेल्या जातींना) वेठबिगारी हीही एक नव्य गुलामी ठरली. चोखा मेळ्यचा अंत हा तो वेठीवर वेशीचे काम करत असतांनाच मरण पावला हे सर्वद्न्यात आहेच. शिवाजी महाराज ते राजाराम महाराजांच्या काळातच, आणि तीही स्वराज्याच्या कक्षेत, वेठबिगारी बंद होती. अन्यत्र ती कायम राहीली आणि नंतर कथित स्वराज्यातही कायम झाली.
वेठबिगारी ही राज्यसंस्थांच्या आधी आर्थिक भिकारपणातुन तसेच नंतर उद्दामतेतुनही निर्माण झालेली अत्यंत शोषक पद्धत. ही तर काही ब्राह्मनांनी निर्माण केली नाही. ती केली तत्कालीन शासक समाजांनी. पण वेठीमुळे जो समाज आधीच गांजला गेलेला होता त्याची अजुनच अवनती घडत गेली. हा महाराष्ट्रीय समाजव्यवस्थेचे एक भिषण अध:पतन आहे.
या काही शतकातच बदललेल्या स्थितीमुळे जो समाज फक्त रक्षण आणि रक्षण हा मंत्र जोपासत एकुणातील समाजाचा, गावांचा, शहरांचा आजच्या पोलिसांप्रमाणे कार्यरत होता, त्याला ढासळलेल्या सामाजिक/आर्थिक स्थितीमुळे हीण दर्जाची कामे करायला भाग पडले. धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का मारुन अमानवी धर्माचे एक जागतीक उदाहरण घालुन दिले. एक पराक्रमी, लढवैय्या समाज रसातळाला नेवुन पोहोचवला. याला स्थिती जशी कारण आहे तशीच सामाजिक मानसिकताही. आज तरी जे गाव-खेडे जतन करुन आहेत त्यांने तरी त्यांना मानाचे अभिवादन करावे...
हा मला उमगलेला इतिहास आहे. तो अगदीच पुरावाहीण नाही, प्ण सर्वत्रच पुरावे उपलब्ध नसल्याने मला तर्काचा आधार घ्यावा लागलेला आहे. यात काही चुक असेल तर ती दुरुस्त करत पुढे जाण्यासाठी मला विचारवंत/अभ्यासुंनी मदत करावी वा स्वत: यात नवीन संशोधन करावे हे माझे विनम्र आवाहन आहे.


Sunday, September 11, 2011

हिंदु सामाजिक ऐक्यातील अडथळे आणि उपाय

हिंदु सामाजिक ऐक्यातील अडथळे आणि उपाय
-----------------संजय सोनवणी


हिंदुत्व हा शब्द आधुनिक काळात अत्यंत कळीचा आणि विवादास्पद मुद्दा बनलेला आहे. म्हनजे कागदोपत्री या देशातील किमान ८२% हिंदु आहेत पण हिंदुत्व हा शब्द आला कि सावध होणारे अगणित हिंदु आहेत. याचा अर्थ हिंदु आणि हिंदुत्व यात काही मुलभुत फरक आहे कि काय यावर विचार करणे आवश्यक आहे, त्याशिवाय सर्वच हिंदु असुनही हिंदुत्ववादाशी फारकत का घेतली जाते याचा उलगडा होणार नाही. उदाहरनच द्यायचे तर मी स्वता: हिंदु आहे परंतु मी हिंदुत्ववादी नाही. म्हनजे माझ्याही मानसिकतेत हिंदुत्ववाद हा वेगळा असून मी हिंदु असुनही हिंदुत्ववादी नाही. असेच असंख्य हिंदुंबाबत घडत असेल आणि हिंदुत्ववादाच्या मशाली कितीही पेटल्या असतील आणि तरीही सारेच त्या मशालींचा उजेड आपला मानत नसतील तर काहीतरी चुक होते आहे हे मान्य करावे लागते.
आपला धर्म श्रेष्ठ आहे, त्यात सामाजिकतेची सर्वच महनीय मुल्ल्ये आहेत आणि इहलोक आणि परलोकवादासाठी सारे उच्च तत्वद्न्यान आणि सोयी आपल्या धर्मात आहेत असे सारेच धर्मीय समजत असतात, तसा प्रचार-प्रसार करत असतात. हिंदु धर्मीयही त्याला अपवाद नाहीत. असुही नये. कारण एखाद्या धर्मात असण्याचे सामाजिक फायदे त्या-त्या धर्मातील लोक अविरत उपभोगतच असतात. हे फायदे प्राय: मानसिक जेवढे असतात तेवढेच व्यावहारिकही असतात. या दोन्ही फायद्यांपासुन मनुष्याला वंचित व्हावे लागते तेंव्हाच तो पर्याय शोधतो. हा पर्याय अर्थातच अन्य धर्माचा असतो. भारतात बौद्ध व जैन धर्म निर्माण होण्यापुर्वी दोन धर्मच काय ते आस्तित्वात होते. एक होता शैवप्रधान मुर्ती-प्रतिमापुजकांचा सुफलता विधीवर आधारित धर्म आणि त्याची प्रतिक्रिया म्हणुन सुदासाच्या काळात निर्माण झालेला यद्न्याधारित, अमुर्त दैवत्तांची आराधना करनारा वैदिक धर्म. तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी यांनी नोंदवुन ठेवले आहे कि वैदिक धर्नाचा भारतातील उदय ही मध्योद्घट घटना असुन पुढे या दोन्ही धर्मांत सरमिसळ होत आजचा हिंदु धर्म आस्तित्वात आला. पुराणांनी (महाकाव्यांनीही) या मिश्रनास फार मोठ्या प्रमानावर हातभार लावला, त्यामुळे एका अर्थाने हिंदु धर्म हा पौराणिक धर्म आहे.
परंतु त्याच काळात यद्न्यांनाही (वेदांनाही) आणि मुर्ती/प्रतिमापुजक धर्मांनाही प्रतिक्रिया म्हणुन ज्याला आपण आधुनिक परिप्रेक्षात religion म्हनतो असे व्यक्तिप्रणित धर्म निर्माण झाले..ते म्हणजे बौद्ध व जैन होत. खरे तर या दोन्ही धर्मांची पाळेमुळे मुळच्या स्रमण सम्स्क्रुतीत जातात. पण ही अवस्था निर्माण करायला दोन्ही धर्म (वैदिक व शैवप्रधान) कारणीभुत झाले हेही अमान्य करता येत नाही. वैदिक धर्मातील यद्न्यातील पशुहिंसा आणि पारंपारिक धर्मांतील मुर्तीपुजा, मोक्षादि संकल्पना, जातीव्यवस्था आणि स्रुष्टीनिर्माता परमेश्वर या संकल्पना जैन व बौद्ध धर्माने (किमान आरंभी तरी) नाकारल्या. अन्य तत्वद्न्यान बव्हंशी एकच राहिले असले तरी कर्मकांडे मात्र बदलली. आज या दोन्ही धर्मांना (शिख धरुन) हिंदु मानण्याची प्रथा आहे पण ते वास्तव नाही.
हिंदु शब्दाची धर्म म्हणुन सर्वमान्य व्याख्या नाही. माझ्या द्रुष्टीने तरीही हिंदू धर्माची व्याख्या करता येते. प्रत्येक धर्म हा कोणत्या तरी तत्वद्न्यान आणि कर्मकांडावर उभा असतो. तत्वद्न्यान आणि कर्मकांड हे परस्परपुरक असते. य दोहोंचा संबंध तत्वद्न्यानात्मक पातळीवर कधी परस्परसमर्थनीय वा विरोधाभासात्मकही असू शकतो. परंतू ते सर्वस्वी एकमेकांना छेद देनारे नसतात. यासाठी आपण आधी प्रथम या धर्माची अव्यवच्छेदक कर्मकांडात्मक व तत्वद्न्यानात्मक वैशिष्ट्ये पाहुयात, जी या धर्माला अन्य धर्मांपासुन आपसूक वेगळे करतात.

१. प्रतिमा/मुर्ति पुजा: वैदिक म्हणवणारे ब्राह्मण ते आदिवासीं हे आज मुर्तिपुजक आहेत. या सर्वच, श्रेष्ठ ते सर्वच गौण दैवते ही कोणत्या-ना-कोणत्या प्रकारे पुरांणांत वा स्थलपुराणांत निर्दिष्ट आहेत.
२. पुजा, व्रते-वैकल्ये, योग, तप, संन्यास ही इष्ट दैवताला प्रसन्न करणे ते मोक्ष मिळवणे या धेयासाठी वापरली जाणारी, प्रत्येकाच्या आध्यात्मिक कुवतीनुसार वापरण्यास दिलेली कर्मकांडात्मक साधने आहेत. (पहा सर्वच पुराणे)
३. तत्वद्न्यानात्मक पातळीवर अद्वैत सिद्धांत हा परमोच्च सिद्धांत असून तो मनुष्य, प्राणिमात्र आणि सर्वच दैवतांत एकत्व/अभिन्नत्व पहातो. (पहा: आदी शंकराचार्य: ब्रह्मसुत्र भाष्य)
४. हे सिद्धांत सेश्वर असूनही इश्वर मानवी जीवनात कसलाही हस्तक्षेप करत नाही, तो सदय नाही कि निर्दय नाही, हे वैद्न्यानिक तत्वद्न्यान परमोच्च पातळीवर स्वीकारले गेले आहे.
५. आध्यात्मिक प्रगतिच्या पाय-या स्वयंनिर्दिष्ट असून स्थुलाकडुन सुक्ष्माकडे आणि सुक्ष्माकडुन शुन्याकडे नेणारे तत्वद्न्यान उपलब्ध आहे. (पहा-ब्रह्मसुत्रे)
६. जोवर प्राणिजात स्थुलाकडुन सुक्ष्मात आणि शेवटी शुन्यात जाणा-या पाय-या ओलांडत नाही तोवर पुनर्जन्म अटळ आहे हा एक सिद्धांत. (त्याला मी कर्मविपाक सिद्धांत म्हणत नाही.) याला खरे तर मी चढत्या प्रगतीचा सिद्धांत मानतो.
७. आत्मा हा अमर असून त्यावर कसल्याही क्रुत्याचा परिणाम होत नाही एवढा तो अलिप्त आणि निर्विकार आहे.
८. विश्वाची निर्मिती ही शिव आणि शक्ति या एकातुनच दोन अशा विभक्त झालेल्या अद्वैताचे द्वैत यातुन झालेली आहे. (वैष्णव शिव-शक्तीऐवजी वैष्णव सद्न्या वापरतात...पण मुलार्थ एकच आहे. )
९. जन्माधारित जाती आणि वर्णव्यवस्था हे या धर्माचे अविभाज्य आणि एकमेवद्वितीय लक्षण आहे.

थोडक्यात नाव काहीही दिले तरी वरील नऊ मुद्दे या धर्माला अन्य सर्वच धर्मापासुन वेगळे करतात. धार्मिक/आध्यात्मिक आणि कर्मकांडात्मक स्वतंत्र वैषिष्ट्ये येथे विद्यमान आहेत. ही अन्य धर्मांत नाहीत. ही वैशिष्ट्ये वैदिक ते ज्यु धर्मातही आढळनार नाहीत. यामुळे हिंदु धर्माची व्याख्या करणे अशक्यप्राय बाब नव्हती हे तरी स्पष्ट व्हावे. कोणत्याही धर्मात विश्वनिर्मिती, तत्वद्न्यान आणि धार्मिक कर्मकांड हेच त्या-त्या धर्माला आस्तित्व देणारे घटक असतात. या आधारावरच हिंदु धर्माची व्याख्या करता येईल. असो.
हिंदु धर्माचे आजचे वास्तव
हिंदु धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि कालौघात बदल स्वीकारत (कधी प्रतिगामी तर कधी पुरोगामी) टिकुन राहिलेला जगातील एकमेव धर्म आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. असे असुनही या धर्माला पराकोटीची गळती लागलेली आहे हे वास्तवही अमान्य करता येत नाही. एवढेच नव्हे तर धर्मांतर्गत संघर्ष हा विकोपाला जावुन पोहोचला असुन धर्मालाच नाकारण्याची प्रथा वाढत चालली आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन हिंदु धर्माला आव्हान दिले होते हे सर्वद्न्यात आहेच. अलीकडे तर शिव धर्म नामक धर्मही स्थापन झाला आहे. अशा प्रयत्नांना हसण्याआधी मुळात हा विद्रोह का निर्माण झाला आहे यावर चिंतन केल्याखेरीज हा तिढा सुटनार नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. समाजातीलच घटक परस्पर द्वेष करत असता धर्माचे काही कल्याण होईल असे समजणे वेडगळपणाचे आहे.
आजचा हिंदु धर्म हा ब्राह्मनी धर्म आहे म्हणुन तो नाकारला पाहिजे अशी आग्रही भुमिका अनेक विचारवंतही घेत आहेत. विद्रोही चळवळ करणारे या मतावर ठाम आहेत. धर्मावरील ब्राह्मणी वर्चस्वतावाद खटकणारे तर असंख्य आहेत. काहींची मजल तर ब्राह्मणांना कापुन टाका/कत्तली करा अशी आवाहने करण्यापर्यंत गेली आहे. या तक्रारीत/आरोपात तथ्य नाही असे म्हणुन चालणार नाही.
दुसरे असे कि रा.स्व.संघ, सनातन प्रभात, बजरंग दलादि कडव्या हिंदुत्ववादी संघटना हिंदु ऐक्यात बाधक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. या संघटनांवर ब्राह्मणी शिक्का बसलेला आहे आणि तो अमान्य करण्याचे कारण नाही. किंबहुना त्यामुळेच असंख्य लोक त्यापासुन नुसते फटकुन रहात नाहीत तर त्यांच्यावर जहाल टीकाही केली जाते हे एक वास्तवच आहे.
तिसरे असे कि जातीव्यवस्थेचे निर्माते हे ब्राह्मणच आहेत असा आरोप केला जातो. त्यामुळे जी सामाजिक विषमता निर्माण होवुन त्यांचे (स्त्रीयांचेही) धार्मिक समतेचे अधिकार तर नाकारले गेलेच पण अस्प्रुष्यतेचा मानवताहीण कलंकही ब्राह्मणांवर आहे असे प्रतिपादित केले जाते. ते सहजी पटण्यासारखे असल्याने ब्राह्मण सामाजिक रोषाला बळी पदतात.
जातीव्यवस्थेबाबत माझी वेगळी मते आहेत. समाजात आधी एक व्यवस्था निर्माण होते आणि नंतर त्यांचे नियमन धर्मनेते करत असतत. ब्राह्मणांनी सांगितले आणि सर्व समाजांनी विनातक्रार ऐकले असे कोठेही घडत नाही. सर्वच समाजाने जन्माधारित जातीव्यवस्था स्वीकारली असेच मला इतिहासावरुन दिसते. येथे त्याबाबत अधिक विवेचन न करता एवढेच म्हणतो कि जातीव्यवस्थेचे पाप सर्वस्वी ब्राह्मणांवर ढकलणे अन्याय्य आहे. फार तर त्यांनीही ही व्यवस्था स्वीकारली आणि त्यांचे नियमन केले एवढेच म्हणता येईल.
परंतु वरील अनेक जे काही आक्षेप मी नोंदवले आहेत त्याबाबत ब्राह्मण समाजाने अपवाद वगळता सर्वस्वी दुर्लक्ष केलेले आहे असे स्पष्ट दिसते. उलट इस्लाम-ख्रिस्त्यांचा द्वेष पसरवत त्यामुळे हिंदु एकत्र येतील अशीच त्यांची व त्यांचे वर्चस्व असना-या संघटनांची भावना दिसते. पण तसे झालेले नाही...आणि होण्याची शक्यताही नाही. याचे कारण म्हनजे धर्मातच कालसुसंगत परिवर्तन घडवायला हवे, त्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही.
आज हिंदु धर्म ६५०० जातींत वाटला गेलेला आहे. यातील असंख्य जातींना मंदिर प्रवेशही नाकारला जातो. काही मंदिरांत स्त्रीयांनाही प्रवेश नाही. त्यांचे किमान धार्मिक अधिकारही नाकारले गेलेले आहेत. अनेक जातीयांचे लग्न लावायला ब्राह्मण पुरोहित (उपलब्ध असले तरी) नकार देतात. पेशवाईतही सासवड येथे महार समाजाने याबाबत फिर्याद गुदरली होती....आजही परिस्थिती फार बदलली आहे असे म्हणता येत नाही.
महाराष्ट्रातील हिंदु समाजाचे आजचे दुसरे वास्तव म्हनजे सत्ताधारी जातींचा झालेला नवोदय. १९०९ साली एकही आमदार नसलेल्या महाराष्ट्रात आज ७०% सत्ता एकाच मराठा जातीच्या हातात एकवटली गेली आहे. ५-६ राज्यांचा अपवाद सोडला (जेथे हिंदुच नाहीत वा अल्पसंख्य आहेत) तर पुर्वी क्षत्रीय म्हणुन मिरवणा-या जातीच पुन्हा सत्तेत नवे सरंजामदार बनले असुन जवळपास वंशपरंपरागत सत्ता भोगत आहेत. विद्रोहींचा आरोप आहे कि धर्मसत्तेचे चालक ब्राह्मण आणि सत्ताधारी जाती यांच्यातील पुरातन युती पुन्हा अवतरलेली आहे. जी आहे ती लोकशाही केवळ नावाची आहे.
या आरोपातुन जो एक हिंदुधर्मांतर्गत विद्रोह निर्माण झाला आहे तो असा कि ही एका परीने मनुस्म्रुतीची नव्या पद्धतीची अम्मलबजावनी आहे. प्राचीन काळातही धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालुनच काम करत होते. ब्राह्मणांनी धर्माविषयक निर्णय दिला तर त्याची अम्मलबजावणी करणारे हेच वर्ग होते. त्यामुळे धार्मिक बाबींत जेही काही अन्याय्य घडले आहे त्या पापापासुन या वर्गाची मुक्तता होण्याची सुतराम शक्यता नाही, आणि ते खरेही आहे.
यामुळे संख्येने अधिक असुनही जे निर्माणकर्ता ओबीसी, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी ई. घटक लोकशाही असुनही नव्य गुलामीत अडकलेले आहेत आणि याबाबतचा विद्रोह हिंदु ऐक्याच्या मार्गातील महत्वाचा अडसर ठरणार आहे हे क्रुपया समजावुन घ्यावे. ब्राह्मण नेहमीच सतीच्या बाजुने असतात (अपवाद आहेत....पण किती?) हा आरोप महत्वाचा ठरतो तो यामुळेच. ब्राह्मण समाजाबद्दल एक प्रकारचा असंतोश आहे आणि एकाच धर्माचा समग्र विचार केला तर मुळात असे आक्षेप निर्माण होनार नाहीत यासाठी ब्राह्मण समाज काय करणार आहे हा मला येथे प्रश्न पडतो.
अन्य धर्मियांमुळे निर्माण झालेल्या समस्या
मी धर्मांतर्गतच्या काही महत्वाच्या समस्यांचा धावता आढावा घेतला आहेच. त्यामुळे धर्माची इमारत खिळखिळी होत आहे याचे धर्मप्रेमींना दु:ख होणे स्वाभाविक आहे. पण हे येथेच थांबत नाही. अन्य धर्मियांमुळे होणारे आघात तेवढेच भयंकर आहेत. आणि या आघातांचा इतिहास पुरातन आहे. भारतावर प्राचीन काळांपासुन अनेक आक्रमने झाली. ग्रीकांनी येथील धर्मावर आघात केले नाहीत. शक-हुण-कुशाणांनी तर येथीलच धर्म स्वीकारले. पण कुशाण राजा कनिष्काने प्रथम हिंदु (खरे तर शैव...तो स्वत:ला शिवपुत्र मानत असे.) आणि नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याची ही शिफ्ट भारतीय धर्मेतिहासाला वेगळेच वळन देणारी ठरली यावर आजतागायत कोणी विशेष भाष्य केल्याचे मला तरी कोठे आढळलेले नाही. बौद्ध धर्म हा जेंव्हा विस्कळीत आणि विखुरण्याच्या मार्गावर होता तेंव्हा त्याने तिसरी धर्मसंगिती भरवुन बुद्ध धर्माला नवे संजीवन दिले. यानंतर बुद्ध धर्मही खुप बदलला. त्यामुळे बौद्ध धर्माला कितपत लाभ झाला याबाबत स्वतंत्र विवेचन करता येईल, परंतु राजाश्रयाची नवी सुरुवात झाली आणि ती सातवाहनादि सम्राटांनी पाळली हे वास्तव आहे. परंतु इस्लामचा झंझावात मात्र या धर्माला अधिक संकुचित करत गेला. अमानवी बनवत गेला हे वास्तव विसरता येत नाही.
अन्यत्र इस्लाम जेथेही गेला तेथे तेथे काही दिवसांत संपुर्ण जनसंख्या मुस्लिम बनवण्यात त्यांना यश आले, पण जवळपास ५०० वर्ष इस्लामला दुर ठेवण्यात यशही आले होते हा स्वर्णकाळ महत्वाचा आहे तसेच सत्तास्थापन झाल्यानंतर जरी लक्षावधी लोकांना बातवण्यात इस्लामला यश आले असले तरी संपुर्ण देश त्यांना मुस्लिम बनवता आला नाही हेही एक वास्तव आहे. नंतर आलेली लाट ख्रिस्त्यांची होती. त्यांनीही जमेल त्या पद्धतीने हिंदुंचे धर्मांतर करण्याचा घाट घातला. इशाण्यपुर्व राज्ये संपुर्ण वा बव्हंशे ख्रिस्ती बनली. असंख्य आदिवासी ख्रिस्ती बनले. ते स्वाभाविक होते कारण त्यांना हिंदु हा धर्म आपला असे कधी वाटण्याचा प्रसंगच आला नाही.
आज भारतात १३% लोक मुस्लिम आहेत. त्यातील किमान १०% हे मुळचे हिंदुच आहेत. ते सर्वस्वी हिंदुंचे शत्रु आहेत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न रा.स्व. संघाच्या स्थापना काळापासुन होत आहेत. ५७ चे बंड (त्याला कोणी जिहाद म्हणतो तर कोणी स्वातंत्र्यसमर...हवे ते घ्या.) बहाद्दुरशहा जफरलाच सत्तेवर बसवण्यासाठी होते. तत्पुर्वी पहिला शाहु ते पेशवाईच्या अंतापर्यंत हिंदु सत्तांनी (त्यात जाट, रजपुथी आले) दिल्लीचे तख्त राखण्याचीच प्रतिद्न्या केली होती. म्हनजे एतद्देशीय मुस्लिम हे हिंदुंचे शत्रु आहेत असा अभिनिवेश या प्रदिर्घ काळात दिसत नाही.
परंतु स्वातंत्र्य द्रुष्टीपथात आल्यावर मात्र लोकशाहीमुळे सत्तेची केंद्रे हिंदुंकडे जातील या समजातुन म्हणा कि अपसमजातुन, हिंदु-मुस्लिम संघर्षाची ठिणगी पेटली. पुरातन सौहार्द नष्ट झाले. यात कट्टर पंथीय हिंदुंनी हिंदु म्हणुन आपली मुस्लिमांबद्दलची पुर्वापार भावनाही बदलली. त्यातुनच अनेक अनर्थ झाले. आजही होत आहेत. त्यातुनच बाबरी मशिद असो कि मुस्लिम दहशतवाद्यांची अनवरत हिंसक क्रुत्ये असोत यांचा उगम झाला.
हिंदु धर्मासमोरील समस्या कमी झाली तर नाहीच प्ण एक न्रुशंस आव्हान उभे ठाकले.
दुसरी समस्या म्हणजे धर्मांतरांची. इस्लामी कालातही सर्वच धर्मांतरे बळजबरीने झाली असे म्हनता येत नाही. अनेकांनी हिंदु धर्माने नाकारलेली समता मिळेल वा सत्तेत वाटा मिळेल म्हणुन स्वेच्छेनेही धर्म बदलला. काहींनी तर जिझिया कर माफ होईल म्हणुन धर्म बदलला. ब्राह्मण हे हिंदु नाहीत म्हणुन जिझिया कराला पात्र नाहीत असे म्हणुन काहींनी त्या जाचक करातुन सुटकाही करुन घेतली.
या सर्वातुन एकच झाले ते म्हणजे हिंदुंची संख्या घटत गेली. बरे आजही ते प्रमाण थांबले आहे काय? उत्तर आहे...नाही. डा. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली असली तरी त्यांनी तब्बल २० वर्ष वाट पाहिली...का तर त्यांचे एकमेव अपेक्षा होती ती ही कि हिंदु धर्मातील अस्प्रुष्यता काढुन टाका आणि मंदिर प्रवेश सर्वांना खुला करा. ही मागणी नक्कीच धर्मसुसंगत (अद्वैतता मानणारे कोण आहेत?) होती आणि मानवतावादी होती. परंतु ती मागणी मान्य झाली नाही. ही हिंदु धर्माच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे हे मी येथे स्पष्टपणे नमुद करतो. हीच बाब लक्षमन माने यांनी अलीकडेच धर्मांतराची घोषणा केली आणि कोणाही धर्ममार्तंडाने कसलेही प्रयत्न केले नाहीत याबाबतची.
थोडक्यात धर्माला गळती लागावी अशीच काय ती भावना दिसते.
हिंदु धर्मात दुस-यांना घेणे ही प्रक्रिया तर २००० वर्षांपासुन जवळपास थांबलेली आहे. शक, हुण, कुशाण ते सिथियनांना व्रात्यस्तोम विधी करुन हिंदु धर्मात घेण्याची प्रथा एके काळी होती. तेंव्हा फक्त वर्णव्यवस्था प्रबळ असल्याने त्यांना शक्यतो क्षत्रीय वर्ण दिला गेला. मगी लोकांना ते सुर्यपुजक असल्याने ब्राह्मण वर्णात प्रवेश दिला गेला. चित्पावनांना ते एतद्देशीय नसले तरी ब्राह्मण वर्णात प्रवेश दिला गेला. परंतु आज वर्ण म्हणुन फक्त ब्राह्मण आणि शुद्र हेच शिल्लक असल्याने अन्य धर्मियाने समजा हिंदु व्हायचे ठरवले तरी ते प्रकरण तेथेच थांबत नाही तर त्या धर्मांतरिताला कोणती जात देनार? आणि तुम्ही द्याल ती तो कसा स्वीकारेल?
त्यामुळे वैचारिक तात्विक पातळीवर हिंदु धर्माचे महनीय तत्वद्न्यान पगडा टाकु शकले तरी अन्यांना हिंदु बनणे एवढे सोपे नाही. त्यामुळे हिंदु धर्माची तशा पद्धतीने वाढ होण्याची शक्यता नाही आणि भविष्यात तो राहील कि नाही असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. परंतु प्रस्तुत लेख मी फक्त रडगाणे गाण्यासाठी लिहिलेला नसुन मला वाटतात ते उपाय सुचवण्यासाठी आहे.
नव्या कालसुसंगत धर्मरचनेची गरज!
जोही कोणी वर्नवर्चस्ववादी/जातीय हिंदु आहे त्याला मी म्हणतो हे पटनार नाही ही जानीव ठवुनच मी पुढील मुद्दे मांडत आहे.
हिंदु धर्मात वेगवेगळ्या काळात किमान १८ स्म्रुत्या लिहिल्या गेलेल्या आहेत. सर्व स्म्रुती परस्परसुसम्गत नसुन त्या-त्या काळाच्या परिप्रेक्षात आणि सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या आहेत. मग २१ व्या शतकाच्या वर्तमानस्थितीला अनुसरुन संपुर्ण मानवतावादी-समतावादी स्म्रुती का लिहिली जावु शकत नाही?
मी वर हिंदु धर्माची महत्वाची लक्षने मांडली आहेत. त्यात अद्वैतता, पुजनीय दैवतांची हव्या तशा निवडीचे स्वातंत्र्य, अगदी अनिश्वरही राहण्याची मुभा (जी अन्य कोणत्याही धर्मात नाही) इं या धर्माची महनीय तत्वे मांडलेली आहेत आणि सर्वच हिंदु त्या तत्वांचा लाभ घेतात. अगदी पीरालाही जाण्यावर हा धर्म बंधन घालत नाही.
हा एवढा उदार आणि महनीय तत्वे मांडनारा धर्म जर आहे तर सर्वच धर्मियांना सामाजिक पातळीवर समता देण्यास या धर्माला कोणी अडवले आहे? चांडाळवेशात आद्य शंकराचार्यांना शिव अद्वैताचा शेवटचा धडा देतो या दंतकथेतुन तरी आपण शिकायला हवे कि नाही?
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, हिंदु धर्मांतर्गतचे संघर्ष जोवर संपत नाहीत तोवर या धर्माला भवितव्यच नाही.
आणि या संघर्षाचे मुलकारण आहे ते हे कि समतेचे तत्वच तत्वद्न्यानात्मक पातळीवर असले तरी व्यावहारिक/कर्मकांडात्मक पातळीवर नाही. जात-गत धार्मिक आरक्षणे ही हिंदु धर्मांतर्गतच्या समतेच्या तत्वांना पुरेपुर छेद देतात. आणि त्यामुळे रोष आहे आणि तो वाढत आहे याकडे मी लक्ष वेधु इच्छितो.
याच विषमतेमुळे हिंदु तत्वद्न्यान हिंदुच दुर्लक्षित करतात...कारण आत्मिक पातळीवर ते समाधान देत असले तरी वास्तवात ते निरुपयोगी ठरते.
थोडक्यात गरज आहे ती ही...
१. धार्मिक पातळीवर जन्माधारित वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था पुर्णतया नाकारणे. (ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसुक्त हे तर प्रक्षिप्त आहेच पण "ब्राह्मण मुखमासिद....वै. दोन ऋचा या अत्यंत विसंगत आणि वर्णव्यवस्थेला वैदिक बळ देण्यासाठी कोणीतरी घुसवलेल्या आहेत. प्रत्यक्षात ऋग्वेदात वर्णव्यवस्थेचे कसलेही दिग्दर्शन नाही.)
२. धार्मिक पातळीवर सर्वच हिंदुंना समान अधिकार. यात नुसती सामाजिक समानता अभिप्रेत नसुन धार्मिक कर्मकांडांत कोणीही हवे तेंव्हा इच्छा असेल तर बरोबरीने भाग घेण्याची मुक्त सोय. मग ते वैदिक कर्मकांड असो कि पुजादि विधींबाबत. यासंबंधीचे सर्वच निर्बंध उठवले पाहिजेत. थोडक्यात सारे हिंदु समान हे तत्व लागु केले पाहिजे.
३. पौरोहित्यादि धार्मिक कर्मांची जात-निरपेक्ष धर्मिक अनुमती.
४. धर्मांतर ज्यांनीही केले असेल त्यांना हीच समानतेची ग्वाही देत त्यांना पुन्हा धर्माकडे आकर्षित करणे. पुन्हा धर्मात घेणे...आणि जे जात असतील त्या कारणांचा शोध घेत त्यांना थांबवने.
५. अन्य धर्मियांना या धर्मातील उदात महनीय तत्वद्न्यान (जे सत्यच आहे आणि अस्तित्वात आहे) सांगत या धर्मात अन्य कोनत्याही धर्मापेक्षा अधिक समता आहे हे वास्तव दर्शवत त्यांना धर्मात घेण्याची योग्य सोय लावणे.
६. सर्व वंचित घटकांना अधिक महत्व देत त्यांना पुरेपुर (जे अधिकार आज ब्राह्मनांहाती आहेत) देत त्यांना धार्मिक समतेचा आणि आत्मनिष्ठेचा गौरव मिळवु देणे. ( फार कमी येतील...पण मलाही तो अधिकार आहे ही भावना फार महत्वाची असते.)
७. सर्व वर्चस्वतावादी तत्वद्न्यानांना तिलांजली कशी दिली जाईल हे पहा. हिंदुत्व म्हणजे वैदिकत्व/ब्राह्मणत्व असे सिद्धांत अडगळीत टाकुन द्या.
आता प्रश्न असा आहे कि हे कोणी करायचे? धर्मातील गळती कशी थांबवायची? धर्मांतर्गतचा संघर्ष कसा थांबवायचा?
मग ही शंकराचार्यांची १६ पीठे कशासाठी आहेत? काशी विद्वत्सभा कशासाठी आहे? धर्माचे नियमन करणे ही त्यांची जबाबदारी नाही कि काय? कालसुसंगत परिवर्तन घडायला त्यांनी काहीएक करायचे नाही असे ठरवले आहे कि काय? हा धर्म मरावा, आपापसात संघर्ष करत संपावा अशी त्यांची अंतिम इच्छा आहे कि काय? धर्मच उरला नाही तर धर्मगुरु अखेर काय करणार आहेत? त्यांची महत्ता काय राहणार आहे? केवळ एक समतेच्या तत्वाची अपेक्षा आहे....तीही धार्मिक पातळीवर देता येत नसेल तर आम्ही तुम्हाला धर्मगुरु का मानावे? समता ही काही हिंदु धर्माला वेगळी बाब नाही. ऐतरेय महिदास या दासीपुत्राचे, म्हणजे धर्मार्थाने शुद्र असलेल्याचे ऐतरेय ब्राह्मण जर पुज्य ठरु शकते तर आज एखादा विद्वान धर्मार्थाने शुद्र असुनही ब्राह्मनांपेक्षा द्न्यान/व्यवहार/तत्वद्न्यानात्मक पातळीवर जर श्रेष्ठ जागतीक पातळीवर ठरत असेल आणि तरीही धर्मानुसार त्याला आज शुद्रच ठरवत असाल तर माफ करा हा धर्म टीकनारच नाही.
समता तात्विक पातळीवर आहे पण व्यावहारिक पातळीवर नाही एवढेच हिंदु धर्माचे वैगुण्य आहे...पण ते अतिभयंकर आहे. ते दुर करा....तरच या धर्माला काही भवितव्य राहील.
अन्यथा..........?

-----------संजय सोनवणी
९८६०९९१२०५


पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (3)

प्रतिगामत्वाचा कळस: पेशवाई....

महाराश्ट्रात प्रतिगामिता आणि पुरोगामीतेची काही मुलतत्वे यांचे सह-अस्तित्व कसे होते व त्यात प्रतिगामीता हीच कशी वरचढ राहिली याचा धावता आढावा आपण वर घेतला आहे. पेशवाई आल्यानंतर मात्र क्रमशा: प्रतिगामीतेने कळस गाठला. पहिल्या बाजीरावाचा अपवाद करावा लागतो. तो खराखुरा सेनानी होता. धर्माधारित ब्राह्मण्याचा त्याने कधी अवलंब केलेला दिसत नाही. मल्हारराव होळकर, शिंदे यांना हुडकुन त्याने त्यांना पराक्रमाच्या संध्या उपलब्ध करुन दिल्या. आहाराच्या बाबतीतही त्याने कसलेही विधि-निषेध पाळले नाहीत. त्याने मस्तानीशी विवाह करुन खरे तर अभूतपुर्व क्रांती घडवली. त्याचे राजकीय परिणामही वेगळे होवु शकले असते पण शनिवारवाड्याने त्याचे सारे बेत ढासळवुन टाकले. बाजीरावानंतर मात्र पेशवाई नैतीक पातळीवर घसरतच गेली. जातीयतेचे स्तोम वाढु लागले. दलितांवरील अन्याय अत्याचारांनी परिसीमा गाठली. त्यांच्यावर पराकोटीचे सामाजिक निर्बंध लादले जावु लागले. पानिपत युद्धातील पराजयामागे सरदारांमधील जातीय तेढ हे एक महत्वाचे कारण मी किस्त्रीम (२०१०) मधील लेखात सविस्तर नोंदवलेले आहेच. पुणे हे भटभिक्षुकांचे उदार आश्रयस्थान बनले. दान-दक्षिणा, ब्राह्मण भोजने आणि धार्मिक कर्मकांडांत पेशवाई गुरफटत गेली. स्त्रीयांवरील अत्याचार एवढे वाढले कि त्याला सीमा राहीली नाही. शनिवारवाड्यासमोरच चक्क कुणबिणी/बटक्यांचे बाजार भरु लागले. १० रुपये ते ७० रुपये भावात स्त्रीयांची खरेदी विक्री होवू लागली. या नव्य गुलामी प्रथेला साकार करणारे पेशवेच होते. हा एक सामाजिक अमानुषपणाच होता पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवल्याचे दिसत नाही. या काळात एकुणातील सामाजिक मानसिकता पुर्णतया रसातळाला जावुन पोहोचल्याचे दिसते. अर्थात याला नागरिकांची खालावलेली आर्थिक स्थिती हेही कारण होतेच. स्वत: पेशवेच कर्जबाजारी. सामाजिक अर्थ व्यवस्थेला बळ देण्यासाठी कसली धोरणेही त्यांच्याकडे नव्हती. मग अम्मलबजावणी कसली करणार?
उत्तरपेशवाईने या सा-यावर अक्षम्य कळस चढवला. पुण्यात सावल्या लांब पडतात अशा सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी अस्प्रुष्यांना पुण्यात प्रवेश बंद करण्यात आला. शहरात येतांना त्यांनी पाठीवर खराटा आणि गळ्यात मडके लटकावण्याची सक्ती करण्यात आली. एकदा एका ब्राह्मणाच्या अंगावर महाराची सावली पडली तेंव्हा त्याचा शिरच्छेद करुन पर्वतीसमोरील मैदानावर त्याच्या मस्तकाचा चेंडु करुन खेळण्याची महाविक्रुत घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. (या घटनेचे ह्रुदयद्रावक वर्णन मी "...आणि पानिपत" या कादंबरीत केले आहे.) या काळात महारांना लग्नप्रसंगी घोड्यावर बसण्यास, वाजंत्री असण्यास बंदी घातली गेली होती. सतीप्रथा, स्त्रीभ्रुणहत्या, विधवांचे केशवपन अशा विक्रुत चालींनाही पराकोटीचे समर्थन मिळाले. स्त्रीयांना एक स्वतंत्र आस्तित्व असते तेच पुर्णतया नाकारले गेले.
हा असा प्रतिगामीत्वाचा कळस उत्तर पेशवाईत गाठला गेला. त्याचा संतप्त सुड महारांनी कोरेगावच्या लढाईत घेतला आणि एक अन्यायी पर्व संपले...तरी प्रथा मात्र सुरुच राहिल्या.

पुरोगामीत्वाचे पर्व

जेंव्हा प्रतिगामीता एक उच्च टोक गाठते, समाज नैतीक पातळीवर रसातळाला जातो, अन्यायाची एक परिसीमा होते तेंव्हा समाजातीलच काही घटक जाग्रुत होतात आणि प्रति-व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरु होतात. ब्रिटिश राज्य आल्याने शिक्षणव्यवस्थेत बदल झाले आणि त्याची व्यापकताही वाढली. त्यातुन युरोपातील समाजव्यवस्था, तेथे घडलेल्या सामाजिक क्रांत्या व सुधारणांशी येथील ब्राह्मण वर्ग परिचित होवु लागला. १९ वे शतक त्या द्रुष्टीने समाज जाग्रुतीचे, महाराष्ट्राला ख-या अर्थाने पुरोगामित्वाकडे नेणारे शतक होते. या काळात आपली व्यवस्था आणि पाश्चात्य व्यवस्थेची तुलना होणे अपरिहार्य होते. त्यातुन आपल्या परंपरा, वर्तमान आणि त्यातुन निर्माण झालेली अन्याय्य विषमावस्था आणि त्यावर पर्याय याचे मंथन होणेही अपरिहार्य होते. या नव्या द्न्यानपरंपरेशी सर्वात आधी परिचित झाला तो नव-शिक्षित ब्राह्मण वर्ग. सनातनी ब्राह्मण अद्यापही पेशवाईच्या भुलीतुन बाहेर यायला तयार नव्हतेच. बाळशास्त्री जांभेकरांनी सतीप्रथा व स्त्रीभ्रुनहत्येविरोधात बोलायला सुरुवात केली. शतपत्रकारांनी ब्राह्मण समाजातील सर्वच अनिष्ट प्रथांवर टीकेची झोड उठवली. डा. रा. गो. भांडारकर आणि न्या. रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापन करुण सामाजिक सुधारणांचे प्रयत्न सुरु जकेले तर महात्मा फुलेंनी त्यावर कळस चढवला. स्त्री शिक्षण, अस्प्रुष्यता निर्मुलन हे त्यांचे क्रांतीकारी कार्य होय. याचबरोबर शेतक-यांचा आसुड लिहुन त्यांनी शेतअक-यांच्या मुलभुत प्रश्नांना हात घातला. सामाजिक समता व न्यायासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. या काळात असंख्य समजसुधारकांची लाट आली आणि महाराष्ट्राला अनिष्ट प्रथा-परंपरांतुन बाहेर पडत मोकळा श्वास घेण्याची संधी मिलाली. बाबासाहेबांचे कार्य तर कोणीही विसरु शकणार नाही. त्यांनी फक्त दलितांसाठीच नव्हे तर अखिल समाजाच्या अभुदयासाठी जे क्रांतीकारी कार्य केले त्याला भारतीय पुरोगामित्वाच्य इतिहासात तोड नाही. येथे मी सखोल इतिहासात न जाता एवढेच नमुद करुन ठेवतो कि महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा ख-या अर्थाने मिळाला तो या महान विचारवंत, सुधारक आणि सामाजिक क्रांतिकारकांमुळे.
स्वातंत्य्रोत्तर काळात कला-साहित्य आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातुन ही पुरोगामित्वाची लाट पुढे काही दशके तरी सरकत राहीली. दलित साहित्याने मराठी साहित्याला नुसता वेगळा चेहरा दिला असे नाही तर त्याला जागतिक प्रतिष्ठाही मिळाली. तसेच पुरोगामी साहित्य प्रयोग उच्चभ्रु म्हणवणा-या साहित्य-विचारक्षेत्रातही झाले व त्यामुळे महाराष्ट्र हा विचारवंतांचा, सामाजिक प्रश्नांबाबत सजग असणा-या लोकांचा प्रदेश अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली.
परंतु हा चेहरा कितपत प्रामाणिक होता व आहे यावर आता चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. ज्या महान समाज नेत्यांनी आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत प्रयत्न केले त्यांना त्यांचेच नाव घेत पायतळी तुडविण्याचे प्रयत्न होत असतांना पाहुन खेद वाटणे स्वाभाविक आहे. आज महाराष्ट्र प्रतिगाम्यांच्याच ताब्यात वेगाने जात असल्याचे भिषण चित्र सामोरे येत आहे. ते कसे हे आता पाहुयात.

प्रतिगामी महाराष्ट्र

पुरोगामी वारसा घेत महाराष्ट्र हा अधिक सामाजिक ऐक्याच्या दिशेने वाटचाल करत क्रमश: सर्वच अनिष्ट प्रथांना तिलांजली देत एका आदर्श समाजाच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैब्वाने महाराष्ट्राची वाटचाल उलट्या दिशेने, म्हणजेच प्रतिगामित्वाच्याच दिशेने, वेगाने होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. हे प्रतिगामत्व धर्म, अर्थ आणि राजकारण या तिन्ही मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या महत्वाच्या बाबींशी निगडीत असल्याने त्यावर गंभीर चिंतन करण्याची आवश्यकता आहे.

धार्मिक/सामाजिक प्रतिगामित्व:

कडव्या हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार अत्यंत आक्रमकतेने करणा-या संघटनांचा उदय हा महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा फाडायला पुरेशी असणारी घटना आहे. आज देशव्यापी बनलेल्या या संघटनांचा उदय महाराष्ट्रातुनच व्हावा याला निव्वळ योगायोग म्हणता येत नाही. रा.स्व. संघ, सनातन प्रभात व अभिनव भारत या त्या महत्वाच्या प्रतिगामी संघटना आहेत. हिंदुंचे संघटन हा मर्यादित हेतु नसुन धार्मिक वर्चस्वतावाद प्राप्त करत सत्ताकारण करण्याचे स्वप्न या संघटना पाहतात व त्यात त्यांना ब-यापैकी यशही मिळालेले आहे. पुरातन धर्मतत्वांचा आधुनिक काळात अट्टाहास धरत प्राचीन संस्क्रुतीच्या पुनरुत्थानाच्या नावाखाली होत जाणारी ही प्रतिगामी वाटचाल आहे. या संघटना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्त्या सतीप्रथेचे उदात्तीकरण करतात, मनुस्म्रुतीची, वर्णव्यवस्थेची शास्त्रीयता (?) आजही पटवतात व मान्य करतात. वेदांमद्धे सर्वच विद्न्यान ठासुन भरलेले आहे याचाही प्रचार-प्रसार करत असतात. मंदिरांत स्त्रीयांना प्रवेश का नको यावर खोट्या शास्त्रीय कल्पना सांगत स्त्रीयांना विशिष्ट (उदा. कोल्हापुरचे महालक्ष्मी मंदिर.) मंदिरांत प्रवेश नाकारण्याचे अंध समर्थन करतात. या संघटना आजही स्त्रीयांवर सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न करत असतात. व्यलेंटाईन डे ला विरोध, बारमद्धे स्त्रीयांना जाण्याला विरोध ई. ते फक्त शाब्दिक नव्हे तर अनेकदा हिंसकपणे क्रुतीतही उतरवत असतात. एवढेच नव्हे तर अभिनव भारत व सनातन प्रभात आता धर्माच्या नावाखाली हिंसक दहशतवादी क्रुत्यांत उतरलेली आहे हे आता मालेगाव, नांदेड व गोव्यात झालेल्या स्फोटांवरुन पुढे येत आहे.
याचा अर्थ असा कि महाराष्ट्रीय मानसिकतेत प्रतिगामितेची ही बीजे आता फोफावु लागलेली आहेत. समाजाला पुढे नेण्यासाठी अनिष्ट प्रथांचे/समजुतींचे समुळ उच्चाटन करण्याचे प्रदिर्घ प्रयत्न करण्याऐवजी समाजाला एकुणातच पुन्हा मध्ययुगात ढकलण्याचे हे कारस्थान आहे यात शंका नाही. या कडव्या प्रतिगामी संघटनांचा उदय महाराष्ट्रातुन व्हावा आणि त्या प्रत्यही फोफावत असता समाज एकुणातच उदासीन असावा हे समाज कसा प्रतिगामी होत चालला आहे याचे निदर्शक आहे.
बरे हे येथेच थांबत नाही. फक्त ब्राह्मण प्रतिगामी असतात हा आरोप आता कालबाह्य झालेला आहे. फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेत ज्या प्रतिगामी संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आहेत ती तर अजुनच भीषण स्थिती आहे. सामाजिक समतेच्या चळवळीत ही तीन नावे सर्वच समानतावाद्यांसाठी वंद्य आहेत. एवढी कि त्यांची नावे घेतल्याखेरीज पुरोगामी या शब्दाला अर्थच रहात नाही ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आहे.
ब्राह्मणी वर्चस्ववाद/जातीयवाद टाळत समता साधने, बहुजनांचे नैतीक/आर्थिक व सामाजिक उत्थान घडवुन आनने हा बहुजनीय चळवळीचा प्रमुख हेतु होता. ब्राह्मणांनी लिहिलेला असत्य इतिहासाचे बहुजनीय अंगाने पुनर्लेखन करत बहुजनांचे आत्मभान जागवने हाही हेतु होता. विद्रोही साहित्य सम्मेलने मुळात ब्राह्मणी परंपरेने नाकारलेल्या साहित्त्यिक-कवींसाठी विचारमंच देण्यासाठीच भरायला सुरुवात झाली. या चळवळीने सुरुवातीला महाराष्ट्राला उत्तमोत्तम कवि/लेखक/विचारवंत दिले हे वास्तव आहेच.
पण: प्रतिगामितेचे वीष याही चळवळीत घुसले. उदा. ज्या जातीनिर्मुलनाचा मुख्य उद्देश होता तो तर राहिला दुर पण जवळपास प्रत्येक जातीची स्वतंत्र साहित्य सम्मेलने भरण्याची प्रथा आली. आपल्याच जातीचा लेखक/विचारवंत काय तो श्रेष्ठ बाकी शुद्र हा नवा मनुवाद रुजलेला आहे. प्रत्येक जात आपापल्या अस्मिता बळकट करत प्रतिगामी बनु लागल्या. जातीय अभिमन कमी करण्याऐवजी तो वाढवण्याचे कार्य त्या त्या जातीतील नेते विचारवंत करु लागले. थोडक्यात जातीच्या बेड्या तोडण्याऐवजी त्या घट्ट कशा होतील हे पाहिले गेले, पाहिले जात आहे...हा प्रतिगामीपणा नव्हे तर काय आहे?
धर्मातील/समाजातील सर्व अनिष्टाला ब्राह्मणांना जबाबदार धरत त्यांच्यावर होनारी फुले-आंबेदकरी काळातील परिस्थिती ठीक होती आणि समजावुन घेण्यासारखी होती. परंतु ज्या कारणासाठी ब्राह्मणवादाचा विरोध केला गेला होता ती आणि तशीच प्रव्रुत्ती आणि विचार बहुजनीय चळवळीचे म्हनवणारे (सर्वच नव्हेत) बाळगु लागले, मांडु लागले आणि प्रचारही करु लागले...

बहुजनीय प्रतिगामी संघटना

गेल्या २०-२५ वर्षातील महत्वाची घटना म्हणजे मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ अशा काही संघटनांचा महाराष्ट्रातील उदय. शाहु-फुले आंबेडकरांचा झेंडा उचलत या संघटना स्थापन झाल्या. बहुजनांचे/दलितांचे ऐक्य आणि त्यातुन ब्राह्मणी वर्चस्ववादाला संपवणे हे त्यांचे वरकरणी उदात्त वाटणारे हेतु. प्रत्यक्षात मराठा सेवा संघ ही फक्त मराठ्यांची तर बामसेफ/भारत मुक्ती मोर्चा ही दलितांची संघटना आहे हे सत्य समोर यायला बराच काळ लागला. तोवर या दोन्ही संघटनांनी ओबीसींचा मात्र बहुजनीय चळवळीच्या नावाखाली भरमसाठ वापर करुन घेतला. तो होता तो केवळ संख्याबळ वाढवण्यासाठी आणि आपले छुपे अजेंडे राबवुन घेण्यासाठी. (छुपा अजेंडा फक्त रा.स्व. संघाचाच असतो या भ्रमात आता कोणी राहु नये.)
प्रत्यक्षात या जातीय संघटना आहेत हे सत्य लपुन राहिलेले नाही. मराठा आरक्षनाची बांग देवुन मराठा सेवा संघाने ते सिद्धही केले आहे. सर्वच समाजाने प्रगती करत जात एक दिवस आरक्षनाचीच गरज भासु नये असे प्रयत्न करण्याऐवजी बहुजनीय चलवळ चालवतो असे म्हणणारेच आरक्षण मागु लागले तर ते कोण मान्य करेल? स्वाभाविकच यांचा प्रतिगामी चेहरा उघडा पडला आहे.
असे करत असतांना या संघटनांनी ब्राह्मण द्वेषाची जहरी तत्वधारा (?) वापरली आहे. प्रसंगी ब्राह्मणांना कापुन टाका/कत्तल करा असा विक्खारी नाराही ते देत आहेत. ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करत ते स्वता:च त्यांचापेक्षाही अत्यंत खोटा इतिहास लिहित आहेत, समाजात पसरवित आहेत. जाती नष्ट करण्याचा जो मुळ प्रामाणिक हेतु बहुजनीय चळवळीचा होता, तो नष्ट न करता मराठा आणि कुणबी एकच आहेत असे नवे सत्यापलाप करनारे सिद्धांत मांडत आरक्षणाच्या रांगेत मराठा सेवा संघ उभा आहे. हे प्रतिगामित्वाचे नव्हे तर अन्य कशाचे लक्षण आहे?
ही प्रतिगामिता निखळ सामाजिक चळवळीची म्हणुन असती तर एक वेळ समजता आले असते. परंतु यामागे सत्ताधा-यांचाच वरदहस्त असेल तर?
सत्ताधारी जातीच सामाजिक बहुजनीय चळवळींना स्वजातीयांच्या नेत्रुत्वाखाली वाढवण्याची संधी देत असेल तर?
त्यांना सर्वार्थाने आर्थिक/राजकीय पाठबळ मिळत असेल तर?
दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत. ७०% सत्ताकेंद्रे ज्यांच्या हाती आहेत तेच या मंडळीच्या मागे ठामपणे उभे आहेत. म्हणजेच सत्ता जी सर्वांना समान लेखत सर्वांच्या हितासाठी राबवली पाहिजे या घटनात्मक चौकटीलाच ठार करण्याचा हा उद्योग नाही काय?
फुले-शाहु-आंबेडकरांच्या मुलतत्वांची ही अक्षरश: पायमल्ली आहे हे उघड आहे. या बाबींना विरोध करणारे बहुजनीय विचारवंत महाराष्ट्रात नाहीत असे नाही, पण यांची दहशत आणि बुलंद आवाजापुढे ते क्षीण ठरताहेत हेही एक वास्तव आहे.
म्हणजे ब्राह्मनच प्रतिगामी आहेत असे नाही. ब्राह्मनांनी आगरकर/लोकहितवादी/शतपत्रकार/न्या. रानडे/केतकरांदि पुरोगाम्यांना दुर ढकलुन दिले आहे. ब्राह्मण सम्मेलने ही आता प्रतिगामित्वाच्याच दिशेने भरकटलेली आहेत. असंख्य लेखक/विचारवंतही प्रतिगामी धारांना सामावुन घेत आहेत. अपवाद असतातच. पण ब्राह्मण समाजही सोयीचे पुरोगामित्व मिरवत अंतत: प्रतिगामी विचारधारांना आश्रय देत आहे. पण त्याच्याही पुढे आता बहुजनीय चळवळ चाललेली आहे आणि हा एक प्रकारे फुले-शाहु-आंबेडकरी तत्वधारांचा त्यांच्याच अनुयायांकडुन झालेला पराजय आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते.
भविष्यात ब्राह्मण-मराठा एकीकडे, ओबीसी व अन्य सर्व दुसरीकडे असे चित्र निर्माण झाले तर मला आश्चर्य वाटनार नाही. परंतु हे काही पुरोगामितेचे लक्षण म्हणता येत नाही. याचे कारण असे कि या पुरोगामी म्हनवणा-या प्रतिगामी महाराष्ट्रात आजही दलितांवरचे अन्याय कमी झालेले नाहीत. स्त्रीयांवरील अत्याचारांबद्दल कोणतीही जात मागे नाही. स्त्रीभ्रुणहत्या ही या महाराष्ट्रात नित्यश: घडनारी घटना आहे. यातील महत्वाचा भाग असा कि यात सुशिक्षित, आर्थिकद्रुष्ट्या प्रगत असलेला समाजच अग्रभागी आहे. गडचिरोली, धुळे-नंदुरबार सारख्या अप्रगत भागांत मात्र स्त्री-पुरुष प्रमाण हे संतुलित आहे तर पुने-नाशिक-कोल्हपुरादि प्रगत भागांत मात्र ते चिंता करावी एवढे असंतुलित आहे. महाराष्ट्राच्या प्रतिगामीपणाचे हे अत्यंत क्रुर उदाहरण आहे.

राजसत्तेचे जातीय केंद्रीकरण

सत्तेचे सर्वच समाजघटकांत न्याय्य वाटप व्हावे हा राजकीय पुरोगामीतेचा एक महत्वाचा निकष आहे. त्याशिवाय सर्वच समाजांना सत्तेत सहभाग मिळणार नाही आणि सर्वांगिण प्रगती साधता येणार नाही हे एक नुसते समाजशास्त्रीय वास्तव आहे असे नव्हे तर भारतीय घटनेलाही तेच अभिप्रेत आहे. सातवाहन काळापासुन नव्याने निर्माण झालेली सत्ताधारी जात म्हनजे मराठा. हा समाज गाव पातलीपासुन ते प्रादेशिक पातळीपर्यंत कोनत्या ना कोणत्या रुपात सत्ताधारी होताच, मग राजवट कोनाचीही असो. सरंजामे टिकवण्यासाठी राजकीय पक्ष बदलण्याची यांची रीत पुरातन आहे हे इतिहासच स्पष्ट करतो. पेशवाईत प्रथमच ब्राह्मण सरदार (पुर्वी फार तर ते मंत्री असायचे) तसेच मल्ल्हारराव होळकरांसारखे अमराठा सरदार आस्तित्वात आले. फार तर त्याला नंतर पेशव्यांनीच नष्ट केलेल्या नौदलाचे प्रमुख असतील. परंतु खरी सत्ता ही प्रय: मराठा सरदारांच्या, पाटलांच्याच हाती होती, हे ऐतिहासिक वास्तव आहे. अर्थात या जातीची जनसंख्याच कालौघात वाढत गेल्याने सर्वच मराठ्यांना सत्तेची फळे चाखायला मिळाली नाहीत हे खरे असले तरी संधी असली तर त्यांनाच प्राधान्य होते हे वास्तव आहे. ब्राह्मण जातीबद्दलही असेच वास्तव आहे. सर्वच ब्राह्मण वेदशास्त्रसंपन्न नव्हते. सर्वांनाच इनामे/कुळकर्ण्या मिळालेया नाहीत. त्यामुळे सर्वच ब्राह्मण हे धर्माचे नियंते होते असे म्हणायला वाव नाही. तसेच हे आहे.
लोकशाही परंपरा आल्यानंतर मराठा समाज लोकशाही प्रक्रियेच्या आरंभी विरोधातच होता असे दिसते. म्हनजे १९०९ साली फक्त एकच मराठा निवडनुकीला सामोरा जात आमदार बनला. पण जसजसा काळ बदलला मराठा समाज लोकशाही (?) प्रक्रियेत नुसता सामील झाला नाही तर जात म्हणुन अल्पसंख्य असतांनाही सत्तेवर विराजमान झाला. यात चुकीचे काही नाही कारण ते लोकांनीच निवडुन दिले असे म्हनणे वरकरनी योग्यच आहे.
परंतु आपण महाराष्ट्रातील निवडनुकांचा आणि सत्तेचा इतिहास नीट पाहिला तर लक्षात येईल कि मराठा समाजातील काही घराण्यांनी सत्ताकेंद्रे बनत, सत्ता वंशपरंपरागत करत नवी सरंजामशाहीची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सर्वच तंत्रे वापरलेली आहेत. तोच सरंजामशहांचा उद्दामपना-मस्तवालपना त्यांच्यात आहे. उदाहरनच द्यायचे झाले तर मुळात अण्णा हजारेंची जनलोकपालाची मागणी हे प्रतिगामी आहे हे अरुंधती रोय यांनी स्पष्ट म्हटले आहे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. पण हजारेंनी उपोशन सोडण्यापुर्वी ज्यांची मध्यस्थी मान्य केली ते विलासराव देशमुख हे एक तर स्वत:च भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले असता भ्रष्टाचाराविरुद्ध राष्ट्रीय आंदोलन छेडनारे हजारे त्यांची मध्यस्थी कशी मान्य करतात? कारण साधे आहे, हे दोघे नुसते मराठा आहेत असे नव्हे तर नातेवाईकही आहेत! अन्य जाणत्या नेत्यांबद्दल आणि त्यांच्या संबंधींबद्दल काय बोलावे? हा राजकीय प्रतिगामीपणा नव्हे तर अन्य काय आहे? वंशपरंपरागत नेतुत्वाची आणि नवी सरंजामे निर्माण करण्याची पद्धत ही नि:संशयपने प्रतिगामीपणाची हद्द आहे यात मला शंका वाटत नाही. ही लागण अन्यांना होते आहे, झालेली आहे हेही कठोर वास्तव आहे, परंतु अस्तित्वाच्या युद्धात "महाजनो गत:स पंथा..." या नियमाने अन्यही जमेल त्या पद्धतीने अनुकरण करु लागत असतील तर दोष सत्ताधारी जातीकडेच जातो.

प्रतिगामित्वाचे भिषण वास्तव

थोडक्यात सामाजिक असो, धार्मिक असो वा राजकीय असो, महाराष्ट्र समतेच्या मुलतत्वांपासुन हटत नव्या विषमतेकडे वाटचाल करत आहे हे उघड वास्तव आहे. येथे बहुसंख्य समाजाच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांची परिपुर्ती करण्याची साधी भावनाही नष्ट होत चालली आहे. भिका-याला तुकडे फेकावेत त्या पद्धतीने धर्मात व सत्तेत स्थानच नसलेल्या लोकांसाठी केवळ भावनिक आणि तात्पुरती सामाजिक/आर्थिक सोय लावण्याचे कारस्थान प्रत्यही होते आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी" असल्याने सत्ताधारी जातींना त्याचे वैषम्य नाही...दुसरीरीकडे आरक्षन मागण्यासाठी हेच निर्लज्ज कुनबी व्हायला तयार आहेत. मेळघाटात शेकडो बालम्रुत्यु आजही होत आहेत आणि त्या भागात एक नव्हे तर जवळपास ६५० एन.जी.ओ. कोट्यावधींचे अनुदान लाटत कार्यरत आहेत असे म्हनतात. ब्राह्मणद्वेष हा मुलमंत्र जपत आजच्या बहुजनीय चलवळी एक विघातक परंपरा पुढे नेत आहेत. ब्राह्मणी संघटना पुरातन माहात्म्यांचा गौरव गात गतकाळातच रममाण आहेत. राजकीय सत्ता एका जातीच्या हाती एकवटत चालली आहे.
मग पुरोगामीपणा कोठे राहिला? कोठे राहिली समता? कोठे गेला तो जातीनिर्मुलनाचा महनीय कार्यक्रम? कोठे गेले ते अर्थसत्तेचे न्याय्य वाटप?
महाराष्ट्र पुरोगामी होता असे म्हनायची वेळ आता आली आहे. यातुन जे नवे सामाजिक तान-तनाव निर्माण होत आहेत, होनार आहेत त्याचे भान आज ठेवले नाही तर एका सामाजिक विनाशाला आपण जन्म देत राहु आणि त्याची विषारी फळे आपल्याच पुढच्या पिढ्यांना खावी लागनार आहेत याचे भान सर्वांनीच ठेवने अत्यावश्यक आहे.



वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...