Thursday, December 2, 2010

ही रिमझीम श्रावणाची

ही रिमझीम श्रावणाची
का तुझा डोळ्यांत?
ग सखे सांग मला
काय सलतय उरात?

आभाळाला पंख निळे
श्रुष्टीचे तेज नवे
ग सखे सांग मला...
काय तुझी वेदना?

सागराची गाज किती
गंभीरता ही नित्य नवी
ये सखे बाहुंत
घे नवी संवेदना

जीवनाचे रंग किती
जशी माझी तुझी प्रिती
ग सखे हास जरा...
तुझे अश्रु दे मला...
ही रिमझीम श्रावणाची...
का तुझा डोळ्यांत?

No comments:

Post a Comment

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

     चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए....