सैराटच्या निमित्ताने प्रदर्शनपुर्व जो काही गदारोळ झाला आणि नंतरही चालुच राहिला तो विस्मयकारक नव्हे तर चिंताजनक आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने एवढे जातीकारण, जातीद्वेष, व्य्क्तीपुजन ते व्यक्तीद्वेष हिरीरीने दाखवले जातील याची कोणी कल्पनाही केली नसेल. बरे एखाद्य ताकदीच्या, खरोखर समुळ हादरवणा-या कलात्मक चित्रपटाबद्दल असे झाले असते तर बाब वेगळी होती. पण हे घडले एका सामान्य चित्रपटामुळे हे मात्र विस्मयकारक व चिंताजनक आहे असे नमूद करणे भाग आहे.
काय आहे हा चित्रपट? खरे तर समीक्षा करण्यासाठी चित्रपटाने तुम्हाला भले-बुरे मुद्दे दिले पाहिजेत. त्यात एकसंघ आशय (भला वा बुरा) असला पाहिजे. आपल्याला नेमके काय सांगायचेय याचे भान कथाकार-पटकथाकार ते दिग्दर्शकालाही असले पाहिजे. आपल्या अभिनेत्यांच्या मार्फत दिग्दर्शक पटकथेला कलात्मक पद्धतीने पेश करत जात असतो. फ्यंड्रीमद्धे नागराज मंजुळे यांना ते चांगले जमले. गल्ला किती आणि किती नाही हा मुद्दा नाही. मुद्दा कलात्मकतेचा आणि मुल्यात्मकतेचा आहे.
सैराटची प्रदर्शनपुर्व हवा नकारात्मक झाली. हा चित्रपट मराठ्यांविरुद्ध आहे ही ती पहिली ओरड. अनेक विचारी पुरोगामी म्हणवणारे मराठेही "हे काय प्रेम करायचे वय असते का...आधी स्वत:ला जीवनात स्थिर-स्थावर करा" असे उपदेश देवू लागले तर नागराज मंजुळे, एक वडार समाजातून आलेला दिग्दर्शक मराठ्याच्या मुलीला खालच्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पाडतो याचा अतीव राग येत काहींनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून शेरेबाजी केली. किंबहुना मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटला. तोवर तर चित्रपट कोणी पाहिलाही नव्हता. प्रोमो आणि गाणी तेवढी माहित होती. नंतर चित्रपट रीलिज झाला. तुफान प्रतिसाद मिळाला कि बुकींग मिळणे अवघड व्हावे,. मराठी चित्रपटासाठी अशा वेळा दुर्मीळ, पण अभिमानास्पद.
मी चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट आवडला नाही. मी ते फेसबुकवरही लिहिले. त्यावरही वादळ झाले. मला पार जातीयवादी म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. असो. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण मला हा चित्रपट का आवडला नाही त्याची काही कारणे मात्र मी देतो.
१) या चित्रपटाचा मुख्य दोष ही त्याची अस्ताव्यस्त पटकथा आहे. त्यात कसलीही सुसुत्रता नाही. ८०% प्रसंग एकमेकांशी धागाच जोडत नाहीत. त्यामुळे सलग परिणामच येत नाही.
२) पात्रांचे व्यक्तीचित्रण करता आलेले नाही. खरे तर कोणतेही पात्र "व्यक्तिमत्व" म्हणून ठसत नाही. नायिका तेवढी बाजी मारते. पण बाजुची पात्रे ढिसाळ असली तर ठसठशीत पात्रेही कृत्रीम बाव्हले बनून जातात तसेच नायिकेचे झाले आहे.
३) हा चित्रपट जात वास्तवावर आहे हे कसे पसरले हे मला माहित नाही. नायिका पाटील आहे आणि नायक कोळी. म्हनून हा या दोन जातींतील किंवा उच्च जातीय विर्रुद्ध निम्नजातीय अस संघर्ष आहे काय? नाही. कारण तसा तो असता तर नायिका पटवण्यासाठी चिठ्ठीचपाटीपासून ते पार ती पोहोत असलेल्या विहिरीत बिनधास्त उडी ठोकणारा नायक, आपण जिच्यावर प्रेम करत आहोत ती वरच्या जातीची आहे असा विचार करत असल्याचे कोठेही दिसत नाही. त्याचे जीवलग मित्रही तसा विचार करत नाहीत. एवढेच काय कोलेजात तिचासाठी मारामारी होते, ती अवघ्या वर्गाच्या साक्षीने त्याच्याकडे एकटक पाहते तरीही वर्गात "जातीय" बोभाटा होत नाही. गांवात तर दुरच.
४) नायिका या चित्रपटात धाडसी आहे. पण अशा धाडसी नायिका चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत. भावाचा वाढदिवस. ती नायकाला तेंव्हा किस देणार हे वचन देते. झींगाट गाणे होते. नंतर नायिका केळीच्या बनात एका कारमद्धे नायकाला दिलेले वचन पाळते. छतावरून हात धुवायला आलेल्या बापाच्या काहीतरी गडबड आहे हे लक्षात येते. तो माणसे पाठवतो. हे रंगेहाथ पकदले जातात,. नायकाचा वाच ठेवणारा मित्र आणि नायक बेदम मार खातात. मामला नायकाच्या घरापर्यंत जातो. तेथेही नायक नायिकेच्या भावाचा मार खातो तसाच बापाचाही. येथेही नायकाने जातीमुळे मार खाल्ला असे नाही. कोणीही असता तरी मार खाल्लाच असता. कोणीही घराच्या आवारात पोरीशी चुम्माचाटी करतोय म्हटल्यावर मार दिलाच असता. हे वास्तव आहे. पण जातीमुळे नायकाने मार खाल्लाय काय? तर नाही.
५) शहरी पार्श्वभुमी न वापरता खेडेवजा शहराची पार्श्वभुमी असलेली ही एक सामान्य प्रेमकथा आहे. प्रेमाच्या त-हा वेगळ्या असल्या तरी त्या तद्दन फिल्मी आहेत. बरे, तसेही असायला हरकत नाही, पण प्रेम करावे तर आर्ची-परश्यासारखे असे वाटायला लावतील अशी भावनिक दृष्ये तरी आहेत काय? तर तेही नाही. प्रेक्षकाला उच्चजातीय मुलीबरोबर निम्न जातीय मुलगा प्रेम करतोय हे आधीच प्रदर्शनपुर्व ठसवले गेल्याने बाकी विचार करायच्या कोणी भानगडीतच पडत नाही. आणि मुळत त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेमही नीट ठसत नसल्याने उत्तरार्धातील संघर्ष टोकदार व परिणामकारक ठरत नाही. मुळात या चित्रओपटात नायक-नायिका प्रेमात पडतातच का? या प्रश्नाचे धड उत्तर नाही. तारुण्यावस्थेचा उंबरठा ओलांडणा-या मुला-मुलींचे प्रेम, जे बव्हंशी शारिरीक आकर्षणातून आलेले असते तसेच हे प्रेम आहे. त्यातही उत्कटता म्हणावी असे एकही दृष्य नाही.
६) खरे तर आधी साहसी वाटणारा प्रेमवीर नायक नंतर दुय्यम्न बनतो. सगळे डेरिंग करते ती नायिका. अगदी पळून जायचे, पोलिस स्टेशनमद्धे बापाला आणि पोलिसांनाही आव्हान देण्याचे, प्रियकराला मारणा-या गुंडांवर पिस्तूल झाडण्याचे डेरिंग नायिकाच दाखवते. पण या प्रसंगांतही विश्वसनीयता नाही एवढे ते नाटकी आहेत. मुळात तिचा बाप जर एवढा समर्थ आहे, पाटील आणि राजकीय नेता आहे तर पोलिसांत "माझ्या मुलीवर बलात्कार केला---अपहरण केले" अशी तक्रार करत बसण्यात व इज्जतीच फालुदा करुन घेण्यात वेळ दवडण्याऐवजी त्याने, नंतरची मारहाण करत न बसता सरळ नायकाला "वर" पाठवले असते. चित्रपट संपेपर्यंत थांबायची गरज नव्हती. बरे या सर्व प्रसंगांतही नायक निम्न जातीचा आहे म्हणून हे सारे केले जातेय याचे सुचन तरी आहे काय? तर तेही नाही. म्हणजे असे दिसतेय कि चित्रपट पहातांना कोणत्या दृष्टीने पहायचा याची अप्रत्यक्ष जाहीरात तर केली गेली, लोक कोळी परश्या आणि पाटील अर्ची अशच पद्धतीने चित्रपट पाहतात....पण चित्रपट, जी एक कलाकृती असते, त्या कलाकृय्तीत या छुप्या पुर्वप्रसिद्धीत, प्रत्यक्षात काही आहे काय? नाही. म्हणजे एक तर दिग्दर्शक तरी घाबरलाय किंवा पटकथाकार तरी. सुचक पद्धतीनेही हे जातीय संदर्भ (जर चित्रपट जात वास्तवाबाबत असता तर) देता आले असते. पण मुळात हा चित्रपट जातीबाबत नाहीच आहे. पुर्वप्रसिद्धी आणि नंतच्या चर्चा मात्र जातीय आहेत.
७) प्रथमार्धापेक्षा उत्तरार्ध पुर्वार्धापेक्षा जरा बरा आहे. फिल्मीपणाने तोही भरला असला तरी विपरित स्थितीत पळून जाऊन लग्न करणा-याना जे काही अनुभव येतात ते येथे स्युडो-रिअलिस्टिक पद्धतीने येतात. पटकथा येथेही फसलेली आहे. खरे म्हणजे स्वप्नाळु जगाकडून भिषण वास्तवाकडे होणारा प्रवास व त्याशी सांध जुळवत जगण्याशी सांधलेली नाळ असा जो प्रवास आहे तो पटकथाच (व दिग्दर्शनही) फसल्यामुळे मुळात प्रत्ययकारी होतच नाही. नायक-नायिकेशी प्रेक्षक म्हणून रिलेट होताच येत नाही. चित्रपटातील अनेक घटना प्रत्येकाच्या जीवनात काहे ना काही प्रमाणात होऊनच गेलेल्या असतात. तेवढ्या स्मरणरंजनापुरते काही प्रसंग कामी येत असले तरी चित्रपटात ते एकुणातील परिणाम साधत नाहीत. बरे त्यांना तुकड्यातुकड्याने सामोरे येणारे प्रत्ययकारी सत्य म्हनावे तर तेही नाही. उदा., चित्रपटात अचानक कोळी जातपंचायतीचा कसलाही संदर्भ नसणारे अचानक दृष्य येते ...तेही अनिर्णित...कसलेही वास्तव न मांडणारे, मागचा पुढचा संदर्भ न देणारे..आणि तेही अस्थानी. असायलाच हवे होते तर ते आधीच.
८) उत्तरार्धात बालीश बाबी अनेक आहेत. त्या ख-या जीवनातही घडू शकतात हेही आपण मान्य करू. झोपडपट्टीतुन चाळीकडे व चाळीकडून फ्ल्त्यटकडे होणारा प्रवास नायक नायिका करतात. त्यांना मुलही होते. मुल तिनेक वर्षाचे झाल्यावर नायिकेचा भाऊ व काही नातेवाईक तिला भेटायला येतात. येथुन पुढचा शेवटचा भाग जवळपास मूक अहे. एका सुरुवतेचा दुर्दैवी शेवट आहे.
पण खरेच "सुन्न" व्हायला होते का?
मला तरी झाले नाही. वृत्तपत्रातील ओनर किलिंगच्या बातम्या वाचून मी सुन्न झालेलो आहे. पण येथे दृश्य मनावर काहीच परिणाम करत नाही. चित्रपटात नायक-नायिकेला प्रत्यक्ष मारतांना दाखवलेले नाही. पण गळे चिरुन मारले गेल्यानंतर व त्याआधीचा जीवन-मरणाशीचा संघर्ष त्या खोलीत दिसत नाही. शिस्तीत निपचित गळे चिरलेली प्रेते आहेत. सारे बाकी जेथल्या तेथे आहे. जणू काही त्यांनी अत्यंत शांततेने मरंण स्विकारले आहे.
राहिले आकाशचे...त्यांच्या मुलाचे. हा शेवटचा प्रसंगच बालिश वाटतो कारण आकाशची शिक्षिका (वा बालवाडीतील म्यडम) य प्रसंगाआधीच त्याला घेऊन जातात तेंव्हा नायिका, बाळ व बाई संवाद साधतात. ती मुलाला परत सोडायला येते. घराचे दार बंद आहे. ती आकाशला बंद दारासमोर सोडुन देते. निघून जाते. असे होते का? जे पहायचेय ते इवला आकाश पाहतो. त्याची रक्ताळलेली पावले काळजावर ओरखडा उमतवत नाहीत कारंण मुळात सारेच कृत्रीम वाटते.
मला हा चित्रपट आवडला नाही. मी तसे लिहिले तर काही मंडळीने मलाच जातीयवादी ठरवले. मला समीक्षण करायचीही इच्छा नव्हती, कारण त्या योग्यतेचा हा चित्रपट आहे असे मला वाटलेच नाही. जातवास्तव सोडून द्या...ते असतेच तर हैद्राबादमद्धेही नवपरिणत जोडप्याला जातीचे फटके बसलेच असते...ते नाहीत. त्यांना मारले ... का? केवळ दिग्दर्शकाला अथवा पटकथाकाराला चित्रपटाचा काहीतरी शोकांतिक शेवट असावा असे वाटले म्हनून. त्यात दिग्दर्शकीय नैसर्गिकपणा कोठे आहे? तोच अपरिहार्य शेवट असावा असे निर्देशनही कोठे आहे?
पण जातीय चष्मे घालुन बव्हंशी हा चित्रपट पाहिला जातो आहे. आता तर नायिकेची जातही शोधली गेली आहे. नायकाची जातही लवकरच घोषित होईल असे दिसतेय. भविष्यकाळात अभिनेते, दिग्दर्शक ते पार चित्रपटाचे स्पोटबोय यांची जात कोनती याचे शोध लावले जातील...त्यावर हिरीरीने चर्चा होतील..
चांगले आहे.
पण आक्षेप हा राहतो कि कलाकृतीत जे नाहीच ते आहे असे समजून जातीय वाद करावेत काय? हा चित्रपट प्रत्यक्ष सोडा, अप्रत्यक्षही जातवास्तवाबाबत बोलतही नाही कि सुचितही करत नाही. मुलगी पाटील आहे आणि मुलगा कोळी अशा विरोधाभासी जातीय जीवनाचेही चित्रण या चित्रपटात नाही. मुलगी राजकारणी बापाची आहे आणि ती एका मुलाबरोबर पळून गेली म्हणून बापाचे राजकीय जीवन धोक्यात आले आहे असे संकेत मिळतात, पण मुलगी खालच्या जातीतील मुलाबरोबर पळून गेली म्हणून तसे झाले असेही सुचन नाही. समजा तो अंडरकरंट आहे व दिग्दर्शक ते स्पष्ट दाखवू इच्छित नाही, प्रेक्षकांच्याच विचारशक्तीवरच सोडतोय....तर मग यातून अनेक अन्वयार्थ काढता येतील...ते जातीयच असतील असे नाही. हा संघर्ष सरळ सरळ "अमीर-गरीब" स्टाईलचा वाटेल...किंवा बापालाच जगजाहीर अपमानित करुन पळालेल्य मुलीचा आणि ज्याच्यासाठी हे घडले त्या मुलाचा मुलीच्या बापाने (तापट मुलाच्या माध्यमातुन) घेतलेला सूड असेही वाटू शकेल...
पण जातीय खदखद प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही या चित्रपटात नाही. हा चित्रपट एका जातीच्या (म्हणजे मराठ्यांच्या) विरोधात व कोळी (किंवा निम्नजातीय) बाजुने आहे असेही नाही. असे एकही दृष्य नाही, संवाद नाही किंवा सुचनही नाही. आंबेडकरवादी सध्या नायकाच्या शोधात आहेत. कधी त्यांना कन्हैयात नायक दिसतो तर आता नागराजमद्ध्ये. या चित्रपटाने तर नायिकाही दिली आहे. उद्या कोणात नायक-नायिका दिसेल हे माहित नाही. हे नायकबदलुपण घातक आहे हे आंबेडकरवाद्यांना समजायला हवे. कारण या चित्रपटाचे कडवे समर्थक आंबेडकरवादी आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आपला समाज जातीयवादी आहे हे हे जातवादावर दुरान्वयानेही भाष्य न करणा-या चित्रपटाने सिद्ध करावे हे दुर्दैवी आहे. मराठा समाजही यात मागे राहिला नाही. त्यानेही आपल्या वर्चस्वतावादी विकृत दुगाण्या झाडल्याच...कोणत्या ना कोणत्या बहाण्याने. आपल्या समाजात जात वास्तव आहे व जातीय अत्याचारही आहेत हे वास्तव मान्यच करायक्ला हवे. पण हे जातीय अत्याचार आता तथाकथित उच्चजातीयच करतात असे आता राहिलेले नाही. काही शारिरीक जातीय अत्याचार करतात तर काही मानसिक...एवढाच सध्या तरी फरक आहे,...उद्या उलटेही होऊ शकते.
सैराट एक फसलेली साधी शोकांतिक प्रेमकहानी आहे, तीही दिग्दर्शकीय फसलेली. ओनर किलिंगचा त्याला टच दिलाय पण तो कृत्रीम आहे. काहीतरी शेवट हवा म्हणून लांबलेल्या चित्रपटाला अचानक थांबवण्यापुरतीची ती क्लुप्ती आहे.
एवढेच!
खूप तंतोतंत व मार्मिक विश्लेषण साहेब...
ReplyDeleteमस्तच. . एकमेव आवडवेलं परिक्षण
ReplyDeleteमस्तच. .
ReplyDeletegreat analysis you are just great in your thoughts and expressing it
ReplyDeleteBest
ReplyDeleteयापैकी बर्याच गोष्टी माझ्याही मनात आल्या होत्या.मी चित्रपटासाठी पैसे वाया न घालवता सेन्सोर कॉपी ची वाट पाहून मगच पाहिला, तेही सैराटलेल्यांचे म्हणणे कितपत खरे आहे हे पाहण्यासाठी.खुपच चांगले विश्लेषन
ReplyDeleteफोन वर बोलू नकोस असे मास्तर म्हणाले म्हणून मास्तरला प्रिन्स ने मारलेले दाखावालय आणि असा माणूस बहिणीबरोबर चुम्माचाती आणि ते पण त्यांच्याच घरात करणाऱ्या माणसाला जिवंत तरी सोडेल का? काहीपण दाखवलाय झाल?
ReplyDeleteHMMMMMMMMMM
ReplyDeleteलेखन चांगले आहे , काही मुद्दे पटले , चित्रपट स्वतःचे कच्चे पक्के दुवे घेऊनच येतो. चान्गले विश्लेषण आहे
ReplyDeleteछान विश्लेषण, खरच आपल्या भावना जश्या बनवल्या जातात त्याच पद्धतीने आपण चित्रपट पाहतो. आपण केलेलं विश्लेषण हे सर्वात जास्त neutral म्हणावं लागेल.
ReplyDeleteसर , जर हा चित्रपट केवळ आर्थिक विषमतेवर भाष्य करतोय असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ; भारतातील आर्थिक विषमतेचे मूळ कारण काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितच असेल . सिनेमा मध्ये सगळे कांही शब्दा मध्ये मांडायची गरज नसते . प्रेक्षक 'त ' म्हणले कि 'ताक कि तलवार ?' हे समजण्या मध्ये समर्थ आहेत . तुम्ही वर्ल्ड सिनेमा पाहिला असेल अशी आशा आहे . नागराज ला कोणत्याही एका style मध्ये अडकवणे योग्य नाही . तुम्ही एकदा एक फिल्म maker /समीक्षक म्हणून नव्हे तर एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा पहा
ReplyDelete'सैराट ' मध्ये कांही चुका आहेत हे मान्य पण म्हणून पूर्ण सिनेमा च नाकारणे हा मला केवळ दुराग्रह वाटतो . दलित समाज नागराज आणि कन्हैया मध्ये 'Hero ' नाही तर साथी शोधत आहे जो मानवमुक्ती च्या विचारांना 'आवाज' देत आहेत .
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत केलेले विश्लेषण सराहन्या योग्य आहे धन्यवाद सर .......
ReplyDeleteअतिशय मर्मभेदी,तटस्थपणे केलेले विश्लेषण. याबाबतचे वेगळेपण संजयसरांकडून अपेक्षितच होते. उथळपणाचा धाक म्हणून साथी शोधणे हे भावनिकदृष्टया एकीकरणासाठी अपेक्षिले असले तरी ते फसवेसुध्दा असू शकते. लग्न संस्थेबाबतचे जाती व्यवस्थेचे कडक निर्बंध सर्वच जातीत सोयीने बडेजावासाठी वापरले जातातच.मग त्यात आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे निकषही आहेत. शहरी भागात थोडीफार परिस्थिती बदलशील आहे. शहरी समुहाची मानसिकता त्यामानाने अगतिक अपरिहार्य किंवा ईव्हेंट म्हणूनची सुतोवाच आहे. त्यामुळे संजय सरांनी म्हटल्याप्रमाणे एक सामान्य कथा या पलिकडे फारसे बघू नये.निदान तसे पुरोगामित्वाचे पोकळ ढोल तरी बडवू नयेत. यात हाती काहीच हशील नाही.
ReplyDeleteकाही असो हे परीक्षण अजिबात पटले नाही, जेव्हा परश्या सांगतो कि त्याला ७२% मिळाले आहेत तेव्हाच तो उजवा ठरतो, बाकी कोळी असून तो दिसायला चिकना चॉकलेट आहे असे अनेक चेहरे आहेतच कि!! नुसते मराठा मराठा काय करता मराठ्यात सुद्धा मी पाटील मी देशमुख हा भेदभाव काही कर्तृत्व नसताना चालू असतोच. त्यापेक्षा परश्या लहान असतानाही ७२% मुळे उजवा ठरतो, तरुणाई आततायी असते ती दोघांकडून झाली म्हणून एकट्या परश्याला दोष देण्यात काय अर्थ? अर्ची अशी सहनशील स्त्री नाही ती खरी अवखळ हे व तिला तिचे आवडते नावडते स्वीकारायचा पूर्ण अधिकार आहे, म्हणून सगळ्यांना ती खुलेआम चालेंज देते हे अगदी सहज आहे, आणि का स्त्री पुरुषांनी आपले कौटुंबिक पैसे अडके जुने हुद्दे बघून प्रेम कराव? का वर्तमानात जे आहे त्याची प्रतारणा करावी? हि काय राजेशाही आहे का? ह्या भावना संजय सरांना कृत्रिम वाटत असतील तर उगाचच ते करत आहेत. फान्द्री चाच हा सिक्वेल आहे, तो एन्जोय करा आणि करू द्यात, असे अनेक आहेत ह्यांना हे कथानक आवडले आहे, म्हणूनच आज २० कोटीच्या पुढे गेलाय सैराट,खरच सैराट म्हणजे जंगली wild अगदी पटते!!
ReplyDeleteसंजयजी,
ReplyDeleteउत्तम परिक्षण केलं आहे तुम्ही,चित्रपट आवडणे/न आवडणे हा प्रत्येकाचा चाॅईस आहे.
पण त्यामध्ये जातीयता नाही असे तुम्ही म्हणत आहात ते चूकीचे आहे,
कारण दिग्दर्शक दुसरा कोणी असता तर मी समजू शकलो असतो,पण इथे नागराज आहे आणि तो दलितांचा मसीहा असल्यामुळे चित्रपटामध्ये जातीयवाद असणार यात शंका नाही.मराठ्यांचा संरंजामी उन्माद त्यामध्ये चित्रित केला आहे हे उघड आहेच.
बाकि,कलाकृती छान आहेच!
Sanjay Sir,
ReplyDeleteKalamtaak movie sathi tumhi bangali anhitar kerali director che movie pahat ja tithe tumha pahije asleli kala khup aste.
Sarva Marathi/hindi movie chya suru honya adhi ek pati yete, hi katha kalpanik aahe.
Sanjay Sir,
ReplyDeleteIshakzde movie chya shoot sathi pariniti chopra 6 mahine lakhnow la hoit. Tine mulakhatit sangitle tya 6 mahinyat 4 honor killing chya fakt lakhnow city madhe zalyche tine vachly.
MI CHITRAPAT PAHILELA NAHI. TUMCHYA MULE KATHA KALALI. BAGHANAR HI NAHI . TYAT UNDERAGE MULGA/MULGI PREMAT PADATAT W LAGN KARATAT. HE SAMAJALA, TYA VAYACHYA MULA MULLINA GHATAK NAHI KA/ NIRMATA PAISE KAMAVUN BAJULA HOIIL, PARINAM AAI BAPALA BHOGAVE LAGATIL. CENSOR BOARDANE YALA A CERTIFICATE DHYAYALA HAVE HOTE. DILIP ALONI
ReplyDeleteपन सैराट पेक्षा जोग्वा उत्तम चित्रपट आहे, तिथे वेगळे अयाम विचारत घेतले अहेत, पण सैराट असहि wait chitrapat nahiye, thodefar prekshakanwar sodle ahe mhanun kay chukle?
ReplyDeleteSanjay Sir... Honestly I don't agree. The points you are mentioning as weakness of the movie are the strong points IMHO. Nagraj has kept the caste issues very subtly and that's the strength.. otherwise we wouldn't have seen the movie making crores that it's making now. He has maintained a very delicate balance between the message and entertainment. Take out entertainment and the message will not reach to the masses. I felt there was a message on caste... not absolutely encompassing all angles/aspects.. but it had a good message.
ReplyDeleteThe current generation would not say much but I have observed they understand the subtle message accurately.
P.S. I agree with Avinash Sir.
Cheers,
Niraj.
what ever your comments may be, but Sairat is not "Fasaleli Premkahani", it is 'A Successful Kahani." The collection more than 50 crore indicates it. I am proud that such movies are in MARATHI.
ReplyDeleteसर मला वाटते-
ReplyDeleteअभिनेता हा मुळात कोळी समाजाचा नाही, किंबहुना तो भुई समाजाचा असावा कारण हा समाज गोड्या पाण्यात मासेमारी करणारा समाज आहे. हा समाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळतो.
ह्या समाजाची बोली भाषा अहिराणी आहे, आणि घराबाहेर हा समाज मराठी बोलतो.
हा चित्रपट सर्वांना आवडणार कारण उत्तम अभिनय
-विठ्ठल खोत
काही गोष्टी सर्वांच्याच नजरेतूत सुटताना दिसत आहेत.
ReplyDelete१. किस देण्याच्या प्रकरणात पकडल्या गेल्यानंतर परशाला मारहाण करून त्याच्या घरी नेऊन टाकले जाते. तेव्हा परशाचा बाप त्याला म्हणतो, ‘तुला सांगत होतो, मराठ्याच्या नादाला लागू म्हणून.’ हा संवाद नीट ऐकू येत नाही. बहुधा त्यातील मराठा हा शब्द थोडा (पूर्ण नव्हे) ब्लर केला असावा.
२. परशा कोण आहे? त्याचे कुटुंब मासेमारी करते, म्हणून कोणी त्याला कोळी म्हणता. तर कोणी भोई म्हणतात. करमाळ्याच्या घरात होणा-या चर्चेत तसेच नंतर जात पंचायतीसमोर परशाचा बापाच्या तोडी आलेली भाषा ही पारधी समाजाची आहे. सिनेमाच्या श्रेय नामावलीत भाषातज्ज्ञ म्हणून दोघांची नावे आली आहेत. त्यातील एक नाव तेलगू भाषा तज्ज्ञाचे, तर दुसरे पारधी भाषेच्या तज्ज्ञाचे आहे.
३. कोळी, भोई आणि पारधी या जाती बहुजन असल्या तरी दलित नव्हे. दलित ही संज्ञा गावकुसाबाहेर राहणा-या अस्पृश्यांसाठी आहे. कोळी, भोई अथवा पारधी या जाती अस्पृश्य नव्हेत. कोळी आणि भोई हे समाज पूर्वीपासूनच गावात इतर सर्व जातींसोबत राहतात. त्यांचा अन्य समाजासोबत रोटी व्यवहार आहे. पारधी ही जात फिरस्त्यामध्ये मोडते, अस्पृशांत नव्हे. मला असे वाटते की, नागराज मंजुळे यांनी परशाची जात संदिग्ध ठेवली आहे. व्यवसायिक गणित त्यामागे असावे. मराठेतर बहुजन समाजाचा हक्काचा प्रेक्षकवर्ग मिळविण्याची खेळी त्यामागे असावी.
४. सोशल मीडियात तसेच वर्तमान पत्रांत नागराज मंजुळे यांनाही दलित संबोधले जात आहे. हेही चूक आहे. मंजुळे यांना हे वडार समाजाचे समाजाचे आहेत. वडार हे अस्पृश्य नव्हेत. अलीकडे दलित म्हणवून घेणे लाभदायक झाले आहे. मीडियासह सर्वांचेच अटेन्शन खेचून घेता येते. त्यामुळे सगळ्यांनाच दलित व्हायचे आहे.
And Sairat marathi movie earn more than 100 crores. This is a record of marathi movie!Think now! Today this movie completed 1 year of release, enjoy!
ReplyDelete