Saturday, July 27, 2019

कारगिलमधील अज्ञात शिवस्थान!



कारगिल हा लद्दाखचा एक महत्वाच विभाग. द्रास, कारगिल, बटालिक हे उपविभाग. जगप्रसिद्ध  झोजिला खिंडीतून प्रवास परत आपण द्रासमध्ये पोहोचतो. हे जगातील दुस-या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण. झोजिला खिंड आणि लद्दाख कश्मीरचा महान सम्राट ललितादित्याने आठव्या शतकात गिलगिट-बाल्टीस्तान जिंकत काश्मीरला जोडले. झोजिला खिंडीवर नियंत्रण मिळवल्याने व्यापारावरही काश्मीरचे नियंत्रण आले. हा इतिहास सर्वांना माहित असायला हवा.


नुन-कुन ही दोन जोड-हिमशिखरे. भारतातील दुस-या क्रमांकाच्या उंचीची. नितांतसुंदर सुरु दरीतून या शिखरांच्या दिशेने प्रवास म्हणजे एक अद्भूत अनुभव. असे म्हणतात की कारगिल-लद्दाखमध्ये हिंदू धर्मस्थाने नाहीत. पण ते खरे नाही. या भागात बौद्ध धर्म येण्यापुर्वी या शिखरांना "शिव-पार्वती" शिखरे मानले जायचे. कैलास सोडून येथे शिव-पार्वती का आले याची एक विलक्षण आख्यायिका आहे जी मला कालिका पुराणात वाचायला मिळाली होती. सुरु नदीचे प्रजेला त्रस्त करणा-या एका दुष्ट नागाने अडवलेले पात्र शिवाने आपला त्रिशूळ फेकून कसे वाहते केले हेही त्या कथेत होते.. या शिखरांच्या पायथ्याशी सुरु नदी अवाढव्य पाषाणांना अक्षरश: चिंचोळी भेग पाडून शेकडो फुट खालुन अत्यंत वेगाने वाहते. ती त्रिशुळाने भेदलेली भेग अशी श्रद्धा आहे. निसर्गाचा हा चमत्कार. यानेच भाविकांच्या प्रतिभेला बहर आला असेल. पण पाचव्या-सहाव्या शतकात इकडे बौद्ध धर्म जसा प्रस्थापित झाला हे शिवस्थान विस्मरणात गेले हे मात्र खरे! प्राचीन काळी भाविक अमरनाथ यात्रा करुन या शिव-पार्वती पर्वताचे दर्शन घ्यायला यायचे. त्याशिवाय शिवयात्रा सफल होत नाही अशी श्रद्धा होती. पण पुढे ही प्रथा बंद झाली. ही प्रथा आजही सुरु होऊ शकते. ध्यान-धारणेसाठी तर इतकी उत्कृष्ठ जागा जगात कोठेही सापडणार नाही.


नुन-कुन (शिव-पार्वती) पर्वताच्या पायथ्याशी सुरु नदीच्या एका नागाने अडवलेल्या प्रवाहाला शिवाने त्रिशूळ फेकून मुक्त वाट दिली अशी पुराणकथा आहे ती ही जागा. ती त्रिशुळाने भेदलेली भेग अशी श्रद्धा आहे. या भेगेच्या खालून किमान सात-आठशे फुटांवरून सुरु नदी खळाळत वाहते. नेत्रांचे पारणे फेडणारे हे दृष्य!

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...