Thursday, September 23, 2021

धनगरांच्या वैभवाचा ऐतीहासिक दुर्मिळ दस्ताऐवज

 संजय सोनवणी लिखीत " धनगरांचा गौरवशाली इतिहास" : धनगरांच्या वैभवाचा ऐतीहासिक दुर्मिळ दस्ताऐवज

--------------------------------------—-----------
सुप्रसिध्द साहित्यिक तथा इतिहास संशोधक संजय सोनवणी हे स्वतः अतिशय व्यक्तीगत कठीण प्रसंगातून जात असतांना हे पुस्तक लिहिले असे त्यांनी प्रस्तावनेतच नमूद केलेले आहे. तरीसुद्धा लेखनापासून तसूभरही विचलित न होता पुस्तक लेखनाचे काम अविरतपणे पूर्ण केले.
या पुस्तकाची प्रस्तावनाच एवढी जबरदस्त आहे की जणू लेखक सहज बोलत बोलत प्रचंड इतिहासाचा एकेक धागा उलगडत वाचकांना धनगरांच्या इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याची जाण करून देतात.
198 पृष्ठात जेवढा सामावता येईल तेवढा अत्यंत परिश्रमाने धनगरांचा इतिहास लेखकाने एकूण बारा प्रकरणात गुंफलेला आहे.
पहिल्या प्रकरणात भारतीय प्राचीन संस्कृतीचा वेध घेतांना पुरातन काळातील सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांचा नेमका भेद ते स्पष्ट करत पशुपालकांच्या प्राचिन संस्कृतीच्या निर्मितीचे योग्य निर्देशन मांडतात. तद्वतच शैव धर्म व वैष्णव धर्म यातील भेद स्पष्ट करत वैदिक धर्माचे वेगळेपण अत्यंत स्पष्टपणे नमुद करतात.
इस पूर्व 1000 ते 3 -या शतकापर्यंत केवळ मगधापर्यंतच वैदिक धर्म प्रबळ होता . गुप्तकाळात वैदिक धर्माला राजश्रय प्राप्त झाल्यामुळे वैदिकांचा बोलबाला वाढला.हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलेले आहे.
दुस-या प्रकरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे विस्तृत विवेचन व संशोधनिय आकलन यांचा ससंदर्भ मेळ बसवत सोनवणी यांनी पंढरपूरचा पांडूरंग ज्याला विठ्ठल देखिल संबोधतात त्याच्या भोवती जाणीवपूर्वक गुंफलेल्या वैदिकांच्या कपोलकल्पीत दंतकथांचा समाचार घेत त्या कथांची काजळी समुळ पुसत विठ्ठल म्हणजेच पांडूरंग हा पशुपालक धनगरातील वीर पुरूष तथा सम्राट होता आणि त्यांचे साम्राज्यही होते हे सिद्ध केलेले आहे. पौंड्रंक या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे पांडुरंग होय. नि पौंड्रांची राजधानी पौंड्रपूर व त्याचेच पुढे पंढरपूर झाले. ही अतिशय ताकदिची मांडणी लेखकाने केलेली आहे.
तिस-या प्रकरणात ' खंडोबा ' यांची मांडणी केलेली आहे.अगदी प्रस्तावनेतच सोनवणी यांनी पृष्ठक्रमांक 16 वर शेवटच्या परिच्छेदात विठ्ठल, खंडोबा, जोतीबा, धुळोबा, बिरोबा ही दैवते धनगरांचे पराक्रमी पूर्वजच होते असे स्पष्ट नोंदवत खंडोबाच्या विविध अंगांची अतिशय समर्पकपणे मांडणी करतात.
चौथ्या प्रकरणात अखंड भारताचा निर्माता " सम्राट चंद्रगुप्त मौर्य " यांची मांडणी करतांना ब-याच मतामतांतरांचे मोठ्या ताकदीने सोनवणी यांनी खंडण केलेले आहे. चंद्रगुप्ताच्या बालपणाच्या पूर्वपारंपारिक कथा , चाणक्य- चंद्रगुप्त बालपणीच्या भेटीच्या रंजक कथा , धनानंदाने चाणक्याचा अपमान करणे व चाणक्याने नंद राज्याचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा घेत शेंडीला गाठ बांधणे या आतापर्यंतच्या ऐकिव कल्पनांना लेखकाने पूर्णतः फाटा दिलेला आहे ." चाणक्यासारखा विद्वान मुत्सद्दी केवळ नंदाने अपमान केला म्हणून त्याच्या विनाशाची प्रतिज्ञा करत चंद्रगुप्ताकरवी ते कार्य पार पाडेल आणि त्यासाठी काही काळ का होइना देशात अराजकाची स्थिती आणत शत्रुला फायदा देईल असे म्हणने वा तसा विचार करणे हा चाणक्याचा आणि चंद्रगुप्ताचाही अवमान आहे." ( पृष्ठ क्र.53) असे सोनवणी यांचे म्हणने तथ्याला धरून आहे.
भारतावरील अलेक्झांडरचे आक्रमण चंद्रगुप्त व चाणक्य यांनी प्रखर देशप्रेमापोटी परतवून लावण्याचा संयुक्त स्वातंत्र्य लढा उभारला असे लेखकाने केलेले विधान सत्याच्या परामर्श घेणारे आहे. एवढेच नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य हे घराणे पशुपालक धनगरच होते हे ते सप्रमाण सिद्ध करत ठासून सांगतात .
पाचव्या प्रकरणात आताच्या महाराष्ट्र राज्याची उभारणी करणा-या सातवाहनांचा इतिहास मांडलेला आहे. इ.स.पूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. सिमुक (किंवा सिंधुक) हा या घराण्याचा संस्थापक होता. महाराष्ट्रासहित गुजरात, मध्यप्रदेश, दक्षिण भारत , कर्नाटक, गोवा आणि आंध्र एवढ्या प्रदीर्घ भूभागावर सातवाहनांचे साम्राज्य होते. हे साम्राज्य सुमारे 450 वर्षे टिकले. संजय सोनवणी एका बाजूने " भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे कोणतेही घराणे झाले नाही ." हे नमुद करतात तर दुस-या बाजूने " शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले . आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरलेला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवहनाचा भव्य अश्वरूढ पुतळा आहे " याची जाणीवही करून देतात. सातवाहनांना अनेक इतिहासकारांनी ब्राम्हण घराणे ठरवण्याचा प्रयत्न केला; परंतू सातवाहऩ हे पशुपालक धनगर जमातीतील होते हे लेखकांनी अनेक दाखले देत सिद्ध केलेले आहे.
त्याबरोबरच पुढील काही प्रकरणात विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना करणारे हरिहर - बुक्क व देवगिरीचे यादव या धनगर राजघराण्यांचा वैशिष्ट्य पूर्ण इतिहासाची मांडणी केलेली आहे. तद्वतच होळकर राजवंशातील महाराणी अहिल्याई, आद्य स्वातंत्र्यवीर महाराज यशवंत, शहिद विठोजी ,तुळसाबाई, आद्य महिला स्वातंत्र्य विरांगणा भीमाई यांचाही रोमहर्षक इतिहास मांडत अनेक नाविण्यपूर्ण ऐतेहासिक बाबिंना लेखकाने उजाळा दिलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकांनी अभ्यासण्यासारखे आहे.
एकंदरीत " धनगरांचा गौरवशाली इतिहास " हे पुस्तक धनगरांच्या ऐतेहासिक वैभवाचा दुर्मिळ दस्ताऐवज असून धनगरांना ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता प्राप्तीच्या दिशेने घेऊन जाणारा दीपस्तंभ आहे.
धनगर जमातीत वाचन, लेखन व संशोधन संस्कृतीचा तथा विज्ञानवादी संस्काराचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे लेखकाचे प्रयत्न स्तुत्य आहे. एकीकडे धनगरांच्या इतिहासाचे विखूरलेले अवशेष एकत्रीत करत दुसरीकडे वैदिकांनी धनगर जमातीच्या इतिहासाच्या अनुषंगाने मन, मस्तिष्कावर लावलेली कपोलकल्पित दंतकथांची काजळी समूळ पुसण्याचा प्रयत्न या दोन्ही बाबी संजय सोनवणी सरांनी योग्य व तटस्थपणे या पुस्तकातून साधलेल्या आहेत.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273
पुस्तकाचे नाव: धनगरांचा गौरवशाली इतिहास
लेखक: संजय सोनवणी
एकूण पृष्ठं : 198
किंमत: 200/- रूपये
प्रकाशक: पुष्प प्रकाशन, पुणे.

Friday, September 17, 2021

धनगरांचा गौरवशाली इतिहास

 

No photo description available.

(१८. ९. २०१५)

भारी बातमी

संजय सोनवणींचा विजय असो
आमचे परममित्र प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत संजय सोनवनी यांचे आणखी एक पुस्तक धनगरांचा गौरवशाली इतिहास हे पुण्यात प्रसिद्ध् होत आहे याचा आम्हास खूप आनंद होत आहे
संजय सोनवणी यांना सलाम
काय जबर आणि जब्राट उरक आहे या माणसाचा ! किती पुस्तके याने लिहली आणि किती पद्धतीची ...जस्ट ग्रेट
धनगरांचा इतिहास लिवन्याचे फारच मोलाचे अती मोलाचे काम भाऊने केलेय त्या बद्दल त्यांचे अभिनंदन
हां धनगरांचा इतिहास आपन सर्वांनीच वाचला पाहिजे कारण तो संजय सोनवानी या फुले गांधी आंबेडकरी या सिंथेसिस विचारधारा मानणाऱ्या एका मोठ्या तरीही दुर्लक्षित माणसाने लिहला आहे
साने गुरुजींचे स्वप्न होते आंतर भारती टागोरांच्या प्रेरणेतून आलेले की आम्हा भारतीयाना एकमेंकांच्या भाषांची माहिती असली पाहिजे आम्हास त्या आल्या पाहिजेत त्यातून आमचे एकमेकांबद्दल जाणीव व प्रेम वाढेल आणि वाढेल बंधुभाव
तसेच आम्हास जातीचा इतिहास देखील माहीत हवा त्या त्या जातितिल प्रेरणा आणि दिपस्तंभ यांची जाणीव हवी .त्यातूनच वाढेल महात्मा फुलेंच्या स्वनातील सकल एकमयता आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला रीपब्लिकन भारत
धनगर समाजाचे फार मोठे योगदान भारत विकास आणि सन्मानात आहे त्याची माहिती या पुस्तकात निश्छित मिळेल
पशुपती शिव हां देखील धनगर होता हे भाऊंनी मांडलेय की नाही माहीत नाही ज्या शिवाने तमाम जगास सत्यं शिवं सुन्दरं ऎसे स्वप्न दिले
महान मल्हारराव ते महामाता महाराणी अहिल्याबाई यांनी केलेले थोर कार्य आणि त्यातील अनेक दुर्लक्षित मुद्दे निस्चीत वाचावयास मिळतील आणि आपल्या माहितीत आणि ज्ञानात भर पडेल यात शंका नाही
धनगर समाजाचे उभरते आणि ऊभारलेले जबरदस्त नेतृत्व महाराष्ट्राची नवी प्रेरणा म्हणजे महादेव जानकर माझे मोठे बंधू यांच्या सोबत काही काळ काम केलेय त्यांचे चरित्र लिहावे ही खूप इच्छा आहे ते ही या कार्यक्रमास उपस्थित आहेत त्याने कार्यक्रम अधिक अविस्मरणीय होईल
धनगर समाजाला खुप जवळून पाहिले आहे आमच्या अंधेरीत डोंगरावर प्राचीन काळापासून धनगर वस्ती आहे त्यांच्या सोबत माझे बालपण गेले धनगर समाजाबद्दल मला लहानपणापासून प्रीति आहे ,अहिल्याबाई आणि मल्हाररावांचे पराक्रम माझ्या आईने माझ्या मनावर रुजवले आणि ते लाहांपनापासून माझे हीरो राहिले ,धनगरांचे मेंढरू ओळखण्याचे कौशल्य याचे मला नेहमी अप्रूप आईमूळे वाटत राहिले तिच्या कड़े धनगरांच्या खुप गोष्टींचा साठा होता
पशुपालनाच्या जीवावर जगात लोक कोट्याधीश झाले ऑस्ट्रेलिया असो की इस्राईल येथील प्रोफेशनल पशुपालन इतर जातींच्या व्यवसाया प्रमाणे आमच्या लोकांपर्यन्त पोचलेच नाही आणि आधुनिकतेने आमच्या लोकांच्या जगण्यात आधुनिकता येन्या ऐवजी रा.र बोराडे यांच्या कादंबरी प्रमाणे पार पाचोळा झाला याचा मुख्य दोष जैसा आमच्या देशातील राज्यकर्त्यांचा आहे तसाच किंवा त्याहुन अधिक आमच्या बुद्धिवंतांचा आहे
जैनमारवाड़ी बोहरी खोजा आणि अर्थात चित्पावन आणि सारस्वत व तत्सम जातीं कडून आम्ही काहीच शिकलो नाही ना आम्हाला व्यवसायिक मोट बांधता आली
बंधुभाव तर आमच्यातून केन्हवाच सटक्ला ,आणि याचा फ़ायदा मग बरोबर लांडग्यांनी घेतला
त्या काळात दलित समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या कट्टर भारतीय द्रष्टा युगपुरुष ,जागतिक विचारवंत ,महामानव महापुरुष असलले बाबासाहेब स्वतः त्या काळी 100 मुले परदेशी आधुनिक शिक्षण (इंग्रजी शिक्षण न्हवे) घेण्यासाठी परदेशी पाठवत ,त्या विजनची नेतृत्व आज नाही ,फक्त सत्ता लोलुप अभिनिवेशी लांडगे उभे राहिले ज्यांना फक्त सत्ता राखायाची होती त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले लांडगे माजोरडे झाले आणि त्यातूनच जात्यंताचे व गरीबी निर्मूलनाचे वाजले तिन तेरा आणि आता आम्ही वेगाने सरक्तोय यादवीकड़े .ज्याचा रिमोट अभिजनांकड़े आहे .
ना आम्हाला धर्माची धार्मिकता कळते ना जातीची व्यवसायिक निति .ज्यातुन घरात आणि दारात ममत्व गणत्व येते त्याचे आम्हास ना जाण ना भान .जिसकी जीतनी साजिदारी उसकी उतनी भागीदारीचे जीवनसूत्र ताकद बनते जे लिंगभेद पार करून डीकास्ट आणि डीक्लास बनते .
जातिनिहायमधुन जातिनिर्पेक्ष समाज आकारास येतो विकसित होतो हे आम्हाला अजून कळत नाही याचे सगळ्यात थोर उदाहरणे आपल्या देशातील संताच्या मांदियाळी कड़े पाहिले तर सहज दिसते .
अभिमान आणि गर्व मधला फरक आम्हास कळतच नाही .अभिमान स्वाभिमान देतो तर गर्व बेचिराख करतो
जातीच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून केलेल्या व्यवसायिक सक्षमते मध्येच भारत विकास आणि जात्यंताचे आणि भारतीयकरणाचे बिज आहे .ज्याची भाषा भोजन आणि भुवन ही त्रिसूत्री आहे ,यातूनच भारत भा-रत होईल आणि होईल बलशाली .महामाता महाराणी महिला सिंधुराणीचा हाच वारसा होता .सप्त सिंधुनी आणि त्यांच्या गावागावातील मातांनी यातूनच भारत सोन्याचा देश बनला जो चित्पावनि वैदिकांनी बिघडवला .अर्थात वंशवादी चित्पावनांमध्ये अपवाद होते , त्याच्यांतील अपवादात्मक महात्म्यांनी याचे नुसते भाँडेच फोडले नाही तर जात्यांत भारतासाठी आयुष्य पणाला लावले पण त्यात स्वतःला पणाला लावणारे सॉक्रेटीस न्हवते ना विचारवंत व्हालतेयर आणि हे ही खरे पण बहुतांशी चित्पावनि समाजाने समस्त ब्राम्हण जातिला केवळ हिंदू धर्मापासून तोड़ले नाही तर आपली अस्मिता आणि अस्तित्व अनिवासिनप्रमाने वेगळे राखण्याच्या नादात भारताशि प्रतारणा केलि आणि कहर म्हणजे जातीयतेल घेट्टोचे रूप देताना अमानुषतेचा कहर गाठला (सद्गति गिद्ध आणि दामुल या चित्रपटात त्याची क्रूर झलक दिसते ) ,बोहरी आणि खोजा जाती सारखे त्यानी स्वतःची वेगळे अस्तित्व राखले नाही आणि आज लोकहितवादींचा इशारा संघनितीतुन खरा होण्याची वेळ आली आहे .आणि आज जगात ट्रैप सांस्कृतिक युद्ध ...यादवी पद्धतशिरपणे पुढे आणली जात आहे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड यांना कमी करायची आहे न्यू वर्ल्ड आर्डरसाठी डिसेप्शन चित्रपटा प्रमाणे आधुनिक जातीयता आनत श्रेष्ठ वंशांचे वर्चस्व यांना प्रस्थापित करायचे आहे
हां सगळा गोंधळ ज्यांना नीट समजतो आहे त्या पैकी संजय भाऊ एक आहेत ,त्यामुळे भाऊंच्या या पुस्तकातुन मला खात्री आहे पिंडाच्या जानिवेतून ब्रह्मांडाचे भान येइल .आणि आपल्या धनगर मूल्यांकन निमित्ताने जातीय व्यवसायांना आधुनिक रूप येवून अनेक व्यवसायिक उभे राहतील त्यातून बेकारी निर्मूलनचे साइड प्रोडक्ट आपोआप मिळेल आणि आपल्या युवकांचा भयानक उपयोग कोणास करता येणार नाही आणि कौशल्य व कार्यकुशलतेस वाव मिळेल ,हो हे मुमकिन आहे कारण धनगरांचा गौरवशाली इतिहास फक्त धनगरांना प्रेरणा देणारा नाही तर तो महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे .भाऊंच्या लिखानात आपले पणाची जाणीव अधिक अधोरेखित होत असते .
ज्याची दृष्टी निर्मळ आणि जे प्रेमळ असतात त्यांचे बरेच ब्लॉक भाउंच्या लिखानामूळे तटातटा तूटतात आणि दबक्याना येते ओढ्याचे स्वरुप जो हळू हळू नदीत प्रवर्तित होतो .वाईट एवढेच वाटते की भाऊ नेमके काय करताहेत हे वैदिक हितसनबिधिताना कळलेय ,भाउं जे काय करताहेत त्याचा भविष्य परीनाम त्यांना नेमका कळला आहे त्यामुळे ते सुरवातीला त्यांना दुर्लक्षित करत होते आता नंतर टवाळी करू लागले आणि आता विखारी टिका करून गैरसमज निर्माण करत आहेत .त्यातून जातीय आणि पुरोगामी अभिनिवेशि मण्डली पूर्वग्रहातून त्यात माती कालवत आहेत
झायोनिझम आणि वांशिक वैदिक आर्यवाद महायुति आगामी भयान यादवीपूर्व काळात भयंकर आक्रमण करणार आहे ,ज्याची सुरुवात मुस्लिम यादवितुन मुस्लिम झेनोसाइड कड़े चालली आहे .त्या आक्रमनांची मीमांसा आणि भयानकता फिरोज मिठीबोरवाला आणि आम्ही सातत्याने करतो आहोत अजुन आम्ही पायापुरते पहात आहोत आणि आमच्या सगल्यांच्याच् जातीय धार्मिक भावना तालिबानी आणि आयसिसच्याच् वळनावर चाललेल्या आहेत अशावेळी आंबेडकरी जातवर्चस्व निर्मूलन फॉर्मूला हाच रामबाण उपाय आहे त्यास गांधी संजीवनीची गरज आहे हे आपल्या जितके लक्षात येइल तितके बरे अन्यथा विनाश अटळ आहे आमच्या रीएक्शन मध्ये सुद्धा साचलेपन आले आहे आणि आमचा नवा धोपट मार्ग तयार झाला आहे जो मोडण्याची गरज निर्माण झाली आहे
ते आधुनिकतेचा उपयोग वर्चस्वासाठी करतात आणि आम्ही फक्त रडत राहतोय आमच्याकड़े दैदीप्यमान वारसा असताना हे अत्यंत वाईट आहे आणि संजय सोनवनी नेमका हस्तक्षेप इथे जबरदस्त करताहेत की त्यांना रीएक्शन द्याविच लागते
त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्ताने मी आगावू सांगू इच्छितो की आपल्या डोल्यावरील दूषित चश्मे बाजूला काढल्यास या माणसाची दूरदृष्टि जानवेल
ती जानवो ही तीव्र इच्छा
मला खुप बरे वाटते भाऊ आणि मी बऱ्यापैकी लाइक माइंडेड लोक आहोत .लिंगवंशभाषावजातवर्गवर्ण वर्चस्व विरोधी लोक आम्ही आहोत ,देशीय जाणीव आमच्यात तीव्र आहे ,प्राचीन सांस्कृतिक इतिहासाच्या योगदानाची जाणीव आमच्यातला सामान धागा आहे
प्रखर विचारवंत द्रष्टा लेखक नेमाडे यांच्या नंतर तोलामोलाचा संविधानवादि मराठी लेखक म्हणजे संजय सोनवनी
प्राच्य पण्डित शरद पाटिल ,आह साळुंखे आणि नेमाडे यांच्या मिक्सचर मधुन आलेले हे अभिनव रसायन आहे.छोटेखानी पुस्तकांमधून अनेक सूत्रे हां समजावत आहे आणि मांडत आहे ज्याने अनेक गनितांची उत्तरे मिळत आहेत ऎसे मला वाटते ऐसा माणूस मला खरा भारताचा महाराष्ट्राचा पोशिंदा वाटतो ज्यास जातीय अभिनिवेशामूळे आम्ही समजून घेत नाही
असो तर मला खुप घाई झाली आहे कधी हे पुस्तक वाचतो
आपणही जरूर वाचा
भाऊंचे खूप खूप अभिनन्दन आणि मनःपूर्वक सदिछा
हां माणूस इतिहासातून वर्तमानाचे जबाबदारी सांगताना भविष्याच्या आव्हानांची जाणीव निर्माण करतो आहे त्या कार्यास सलाम
किशोर जगताप

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...