Saturday, October 15, 2011

सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व




(हिंदु धर्मासमोरील समस्या)

"हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)"

वरील विधानात सावरकर हिंदु आणि हिंदुत्व यात फरक करतात हे उघड आहे. हिंदु शब्द अरबांनी दिलेला नाही असेही सावरकरांचे मत आहे. पण त्याच वेळीस सिंधु वा हिंदु या स्वाभिमानी नांवाने हे राष्ट्र ओळखले जात होते असेही सावरकर म्हनतात. पण त्यांचेच अनुयायी अ.ज. करंदीकर यांच्या सप्रमाण म्हनण्यानुसार या देशाचे पौरात्य जगातील नांव हे मेल्लुहा (ताम्र उत्पादकांचा देश) आणि काही वेळा सेंकार असे होते. असे असेल तर सावरकरांचे विधान हे व्रुथाभिमानी होते कारण या देशाचे नाम हिंदु राष्ट्र कसे पडले, आणि त्या बुभागातील अन्य अनेक धर्म व जातीय सोडुन याच धर्माला हिंदु हे नांव कोणी व का दिले हे समजत नाही.
सावरकरांचे वरील विधान धर्मेतिहासाचा विपर्यास कसे करते हे आपण पाहुयात. "हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो." असे सावरकर म्हणतात. आता धर्मात धार्मिक अंगांचा समावेश नसतो तर सांस्क्रुतिक, भाषिक आणि राजकिय, भाषिक सामाजिक........." सावरकर शब्दछलात पटाइत होते हे सर्वद्न्यातच आहे जेंव्हा आपण धर्माबद्दल बोलतो तेंव्हा धार्मिक तत्वद्न्यान, कर्मकांड आणि त्यानुसार अपेक्षीत समाजव्यवस्था या बद्दल बोलायची वेळ येते तेंव्हा सावरकर संस्क्रुती...(कोनती आणि कोणाची?) भाषिक...( कोणती भाषा आणि कोणाची...कोल...मुंड, प्राक्रुत..माहाराष्ट्री कि शौरसेनी...नि मग द्रविड भाषांचे काय?) सामाजिक? सावरकरांना कोनती सामाजिकता अभिप्रेत होती आणि आहे? आणि सावरकर जेंव्हा राजकीय शब्द वापरतात तेंव्हा अश्चर्य वाटते कारण हिंदु या तथाकथित नामक धर्माचे यच्चयावत या देशाच्या इतिहासात कोनती नेमकी राजकीय तत्वद्न्यानात्मक अंगाची स्थिती होती बरे?
सावरकर माहाराष्ट्रीभाषी प्रेमी होते आणि मराठी भाषेला त्यांनी अत्यंत उत्तम व्यावहारिक शब्द दिले. त्यांचे हे ऋण मान्य करुन त्यंनी भारताला कोणते भाषिक अधिष्ठाण दिले? त्यांची काव्यात्मक प्रतिभा महाकविला साजेशी आहे हे मान्य करुनही मी विचारतो त्यांनी कोणते राष्ट्रीय काव्य लिहिले?
सावरकरांना अभिप्रेत असनारा हिन्दु धर्म हा प्रय: प्रादेशिक होता. त्या अर्थाने या देशातील ख्रिस्ती, मुस्लिम, शिख आणि आदिवासी आपसुक हिंदु ठरत होते,....गोळवलगुरुजीनीही तीच व्याक्या पुढे कायम केली. पण तेथेच हे सारे हिंदुत्ववादी फसले.
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥

- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)

असली धर्माची व्याख्या कोणी केली नसेल. ती चुकीचीही आहे सावरकरांची ही पाश्चात्यवादी
ती कशी हे थोडक्यात सांगुन हा लेख संपवतो आणि पुढील लेखाचा उपोद्घात करतो.

प्रत्येक भारतीय माणुस आपल्या देशाला पित्रुभु: नव्हे तर मात्रुभुमी मानत असतो. सावरकरांची ही पाश्चात्यवादी व्याख्या असुन ती हिंदु धर्माबाबत कसलेही ठाम विधान करु शकत नाही हे उघड आहे.
सावरकरांवर बहुदा पाश्चात्य संस्कार असल्याने ते या देशाला मात्रुभुमी नव्हे तर पित्रुभुमी कसे मानु लागले यावर संशोधन व्हायला हवे...तेच अंदमानपुर्व कालातेल गीतात तेच या भुमीला मात्रुभुमी म्हनतात आणि अंदमानोत्तर काळात याच भुमीला पित्रूभू: म्हनतात हे सावरकरांचेच नव्य धर्मांतर नव्हे काय?
आणि जसे रविंद्रनाथ टागोरांना अरुणाचल प्रदेश, आसाम, लेह-लद्दाख इइइइइ दिसले नाहित तसे या राष्ट्रवाद्यालाही दिसले नाहित...ज्यांना धर्मच समजत नाही त्यांना राष्ट्र काय कळणार?
पुढील लेखात अजुन काही...

18 comments:

  1. @ सोनवणी सर-
    .....पण त्यांचेच अनुयायी अ.ज. करंदीकर यांच्या सप्रमाण म्हनण्यानुसार या देशाचे पौरात्य जगातील नांव हे मेल्लुहा (ताम्र उत्पादकांचा देश) आणि काही वेळा सेंकार असे होते.>>>>>>

    भारताला पूर्वी सेंकर/सेंकार असे नाव होते असे काही ठिकाणी वाचले आहे. शंकर (शिव) हा भारतीय बहुजन संस्कृतीचा महानायक आणि आद्य पूर्वज मानला जातो. सर्व बहुजन समाजातील जाती-जमाती मध्ये शंकराला आदराचे आणि मनाचे स्थान आहे. अगदी हडप्पा येथे सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सुद्धा शानाकाराची पशुपती स्वरूपातील मूर्ती आढळली आहे. शंकराचे या देशातील स्थान अतिशय महत्वाचे आहे. आपला शैव धर्म/संस्कृतीचा अभ्यास आहे. त्या अनुषंगाने शंकराचे नाव या देशाला होते का यासंबंधी एक विस्तृत लेख लिहावा ही विनंती.

    ReplyDelete
  2. गाढव सोनवणी तुझी सावरकरांवर टीका करायची लायकी आहे का?

    ReplyDelete
  3. असे असेल तर सावरकरांचे विधान हे व्रुथाभिमानी होते कारण या देशाचे नाम हिंदु राष्ट्र कसे पडले, आणि त्या बुभागातील अन्य अनेक धर्म व जातीय सोडुन याच धर्माला हिंदु हे नांव कोणी व का दिले हे समजत नाही.
    =================================================
    for ur kind information,
    hindu name is present in our own scriptures which existed before the arabic invasion

    हीनश्च दुषयप्येव स हिन्दुरित्युच्यते प्रिये. ( amarkosh, 8th century)
    one who gives up wrong deeds is known as a hindu

    हिन्दु सद्धर्म पालको विद्वन् श्रौत धर्म परायणः ( ramkosh)
    hindu is a person who is righteous,scholar and a follower of dharma

    हिनस्ति तपसा पापान दैहिकान दुष्टमानसान
    हेतिभिः शत्रुवर्गः च स हिन्दुः अभिधीयते ( parijat haran play)
    the person who reduces his sin by tap(तप) and finishes the mind polluting elements and who kills his enemies is known as a hindu

    हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्परः
    वेद गो प्रतिमसेवि स हिन्दुः मुखवर्णभाक् ( vruddha smriti)
    one who hates violence,one who is righteous,one who nurses cows and vedas, is a hindu

    ReplyDelete
  4. सोनवणी साहेब,
    आपण म्हणता कि,
    "आणि जसे रविंद्रनाथ टागोरांना अरुणाचल प्रदेश, आसाम, लेह-लद्दाख इइइइइ दिसले नाहित तसे या राष्ट्रवाद्यालाही दिसले नाहित...ज्यांना धर्मच समजत नाही त्यांना राष्ट्र काय कळणार? "
    स्वा. सावरकरांना धर्म कळत होता कि नाही हे ठरविण्याची माझी नक्कीच लायकी नाही,मला ते कळत हि नाही नि माहित हि नाही नि माहित करून घ्यायची इच्छा हि नाही तथापि त्यांनी जीते जागतेपणी उघड्या डोळ्यांनी जे बघितले नि तत्कालीन स्वातंत्र्योत्तर सत्ताधारी नि राजकारण्यांना पाकिस्तान नि चीन बद्दल त्यांना त्या काळीच जे दिसले,समजले ,उमजले नि त्याचे गांभीर्य कळले होते ते सांगितले होते त्यावर "डोके फिरलेला वयोवृद्ध " अशीच त्यांची संभावना केली गेली हे या देशाचे करंटेपण आहे.त्यांच्या सूचने प्रमाणे प्रत्येक तरुणाला नि तरुणीला त्याच्या विशीतच सरकार तर्फे सक्तीचे लष्करी प्रशिक्षण जर तेव्हा पासूनच केले गेले असते तर १५ ऑगस्ट नि २६ जानेवारी मधला फरक आज के बी सी मधला ५-२५ लाखाचा प्रश्न झाला नसता आणि १९६१ साली चीनची आणि १९७१ साली पाकिस्तानची भारतावर हल्ला करण्याची हिम्मत झाली नसती ,आणि २००० साली काश्मीर प्रश्नाने पुन्हा कारगिल घडवले नसते किंवा शिखांनी स्वतंत्र खलिस्तानचा कधी विचारही केला नसता आणि सध्याच्या परिस्थितीत स्वतंत्र तेलंगणाचा आग्रह धरला गेला नसता.
    भूतकाळात रमणे हा मनुष्य स्वभाव आहे.तथापि भूतकाळात रमणारे त्या इतिहासापासून वर्तमान काळात काही बोध घेत नाहीत असा हि एक इतिहास आहे त्या मुळे सावरकरांच्या हिंदुत्वा मध्ये रमण्या पेक्षा त्यांनी वर्तविलेल्या सामाजिक,राजकीय,राष्ट्रीय "भविष्य कथना " बद्दल ,विचारां बद्दल अधिक काही माहिती आपणास देणे शक्य झाली तर ती द्यावी.निदान त्या मुळे सध्याच्या परिस्थितीत त्याचा काही उपयोग होत असेल तर त्याची चर्चा व्हावी असे वाटते.त्याने आपला नि वाचकांचा वेळ सत्कारणी लागेल असे सुचवावेसे वाटते. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. Thanks Mynac jee. मी अवश्य त्यावर लिहिल, पण ही लेखमालिका ही हिंदु धर्मासमोरील समस्या मांडत उपाय शोधनारी आणि त्यासाठी पुर्वाचार्यांनी हिंदु धर्माबाबत ज्याही व्याख्या केल्या आहेत वा आपापले चिंतन केले आहे त्यांचा वेध घेणे आवश्यक असल्याने त्यांची मते व त्यावरील माझी मते अशी ही मांडणी असने अपरिहार्य आहे. हिंदु धर्म आणि हिंदुत्ववाद हा वर्तमानकालातील (आणि कदाचित भविष्यातीलही) महत्वाचा मुद्दा असल्याने त्यावर चर्चा करने आवश्यक आहे. सावरकरांच्या इतर महत्कार्यांबाबत माझा अनादर नाही. ते द्रष्टे होते कि नाही हा वादाचा मुद्दा असु शकतो, पण त्यांनी वेळोवेळी आपली मते व्यक्त केली आहेत हे तर खरेच आहे. खलिस्तानबाबत मी आपल्याशी असहमत आहे....पाकिस्तानबरोबरच खलिस्तान होणारच होता पण गांधी व नेहरुंनी मुत्साद्दीपणा वापरुन तो होवू दिला नाही हे कोणी सांगत नाही. त्यासाठी क्रुपया याच ब्लोगवरील दहशतवादाची रुपे या लेबलखालील खलिस्तानी दहशतवाद हा लेख पहावा. सावरकरवाद्यांचे सावरकरांवरील आत्यंतिक प्रेम मी समजु शकतो, पण मी लेखक आहे...कोणावरही प्रेम करुन सत्य लिहिता येत नाही. गांधींचे हिंदुत्व हा पुढील लेख हे सावरकरवादी वाचतील तेंव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. हिंदु रक्षा वाले प्रशांत शिगवण त्या लेखावर प्रतिक्रिय देतांना मला काय नवीन संबोधने बहाल करतात याबाबत मी नक्कीच उत्सुक आहे. धर्म हा महत्वाचा विषय आहे. धर्माखेरीज जगु शकतो असा या विश्वात कोणी नाही. भले तो इश्वर मानेल वा ना मानेल...पण धर्म ही मानवी मनाची पुरातन उपज आहे. त्याची चिकित्सा नाकारनारे सनातनी प्रय: सर्वच धर्मांत असतात...हिंदु व हिंदुत्ववादीही त्याला विशेष अपवाद नाहीत...अत्यंत मनमोकळी प्रतिक्रिया दिल्याबदल आभार.

    ReplyDelete
  6. "धर्माखेरीज जगु शकतो असा या विश्वात कोणी नाही. भले तो इश्वर मानेल वा ना मानेल"

    Can you please elaborate this...I am quite disagree what it sounds...

    ReplyDelete
  7. प्रिय झेन, धर्म आणि रिलिजन या दोन शब्दांत एक विभेद आहे. रिलिजन नाकारला जावू शकतो आणि त्याशिवाय जगता येवू शकते. रिलिजन हा शब्द तसा पंथवाचक आहे. म्हनजे ज्यु हा पंथ आद्धीच्या पेगन धर्मातुन आधीचे नाकारत कथित एकेश्वरवाद घेत रुढ झाला. ज्युंची तत्वधारा मान्य नसलेल्या मरेपर्यंत खरे तर ज्युच अस्दलेल्या ख्रिस्ताच्या अनुयायांनी नंतर ख्रिस्ती रिलिजन स्थापन केला. याच ज्यु धर्माची (आब्राहमच्या हगार या इजिप्शियन रखेलीपासुन) जन्माला आलेल्या मुलापासुन अरब वंश जन्माला आला अशी मान्यता कुराणच देते. किंबहुना इस्लाम हा जवळपास ८०% ज्यु धर्मच आहे. किंबहुना मदिनेला पैगंबर गेल्यानंतर ज्युच आपले सर्वाधिक अनुयायी होतील अशी आशा त्यांना होती. पण तसे झाले नाही. तोवर कुराणातील आद्न्या ही जेरुसलेमकडे तोंड करुन नमाज पढावा अशी होती...पण ज्युंनी त्यांची घोर निराशा केल्याने त्यांनी ती आद्न्या फिरवली व काबाकडे (ते आधीपासुनच अरबांचे सर्वश्रेश्ठ पुज्य धर्मस्थान होते.) त्याकडे तोंड करुन नमाज पढण्याची आद्न्या केली. भारतात पहाल तर बुद्ध वा महावीर काहीएक वेगळे सांगत नाही. श्रमण तत्वद्न्यान, जे वैदिक तवद्न्यानाच्या विरोधात होते, ते त्यांनी पुढे नेले. मंखली गोशाल, चार्वाक...असे विचारवंत ती तत्वधारा प्रकाशित करत होते. त्यातुन जे निर्माण झाले ते रिलिजन...धर्म नव्हेत. विशिष्ट विचारधारा, दैवत, तत्वद्न्यान यावर श्रद्धा ठेवत जे लोक आपापली जीवनश्रद्धा ठरवतात तो रिलिजन...(म्हनजे रिलिजन हा वरुन खाली येतो...) आणि जे लोक स्वत:च्या आध्यात्मिक, नैतीक, सामाजिक, राजकीय व्यवस्थात्मक प्रेरणांचा समुच्चय करत जी अंतता: व्यवस्था बनवतात त्याला धर्म म्हणतात. या अर्थाने प्रत्येकजण, तो धर्मव्यवस्थेच्या बाजुने असो कि विरोधात असत स्वत:च्या प्रद्न्येप्रमाणे धर्म पालत असो...तो धार्मिकच असतो. एकाचे पाप तसेच दुस-याने केले तर पाप (अनीति) असेलच असे नाही असे धर्म सांगतो, कारण समान क्रुत्या पण वेगळ्या परिप्रेक्षात घदल्या तर त्याची मुल्ये व धर्मनियम प्रुथक असतात. तर रिलिजन मात्र धर्माद्न्या न पाळणे हेच पाप हे घोषित करुन त्याबद्दलच्या शिक्षाही ठोठावुन बसलेला असतो. उदाहरणार्थ, खोटे बोलणे हे पाप आहे...अनैतिक आहे...पण डोळ्यांसमोर एक हरीण गेले...आणि त्याच्या मागे लागलेल्या शिका-याने त्याच मानसाला विचारले...कि हरीण कोणत्या दिशेने गेले? हा प्रश्न धार्मिक प्रश्न उपस्थित करतो. त्या मानसाने जर हरीण कोणत्या दिसेहे गेले हे सांगितले तर तो सत्यवादी ठरतो पण अप्रत्यक्षपणे त्या हरणाच्या म्रुत्युचे कारण ठरतो. खोटे बोलावे तर तेही पापच. अशा स्थितीत एक नैतीक आणि धार्मिक समस्या निर्माण होते. धर्म याचे निराकरण करतो कि जीव वाचवणे महत्वाचे आहे. रिलिजन म्हनतो जावुद्या जीव...जे सांगितले तसेच आणि तसेच्या तसे वागा. तर मला हे म्हणायचे आहे कि, रिलिजनशिवाय माणुस जगु शकतो...नव्हे जगायलाच हवे. पण धर्म (म्हणजे रिलिजन नव्हे,....) मात्र मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तोच खरा जीवनाचा उद्गार आहे. मलाही कोणताही तसा रुढ अर्थाने रिलिजन नाही...पण धर्म आहे...आणि याच अर्थाने मी धर्माशिवाय यच्चयावत विश्वात कोणी जगु शकत नाही असे विधान केले आहे. धर्म हा व्यक्तिधर्म असतो आणि अधिकाधिक लोकांच्या समान धर्मभावनांना (अनेक ठिकानी विरोधाभास जगतही) जोही एक वैचारिक, श्रद्धात्मक आणि सामाजिक परिप्रेक्ष निर्माण होतो त्याला मी प्रकट धर्म म्हणतो. सध्या मात्र रिलिजन (वैदिक) म्हनजे धर्म असे सांगणा-या वैदिक रिलिजियस लोकांविरुद्ध मी लिहित आहे....

    ReplyDelete
  8. सर, पुन्हा तुम्ही सुद्धा शब्द छळाच करताय, धर्माला इंग्रजीत रिलीजन म्हटले म्हणू फरक पडत नाही. तुम्ही फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी झालेला नाही. किवा तुमच्यासारख्या विचारवंतानी फरक दाखविला तरी तो ९७% लोकांना कळणार नाही...ते धर्माचा आर्थ रूढ अर्थाने च घेणार. तो अर्थ म्हणजे "हिंदू" "इस्लाम" क्च्रीस्ती" बौद्ध,शिवधर्म इत्यादी इत्यादी...आता बौद्ध धर्माला धर्म नसून धम्मा म्हणून स्वताची फसवणूक करणारे लोक आहेतच.....(बुद्धाच्या मूर्तीची पूजा करून शांती मागणारे - माफ करा हा आपला विषय नाही ) मग त्या तुमचं अर्थाला काही उपयोग नाही. आणि मी हा पुरावा आहे कि मला जगण्यासाठी धर्माची आवशकता नाही. आता धर्म म्हणजे सत्य वगैरे म्हणू नका (तेवा कुठे गेला होता तुझा धर्म राधा सुता सारखे ). धर्म म्हणजे लोकांना गुलाम बनविण्यासाठी हुशार आणि चालू माणसांनी बनविलेली एक संकल्पना आहे. याचा अर्थ मी गौतम बुद्धाना , ख्रीसताना किवा पैगाम्बाराना चालू म्हणत आहे असा होत नाही....त्यांनी त्या त्या काळात लोकांना चांगल्या मार्गाला लावण्याकरिता संदेश दिले परंतु त्याला कट्टर धर्माचे स्वरूप धर्माच्या दलालांनी दिले. धर्म जर नष्ट झाले तर तर जगातील ६०% हिंसाचार कमी होईल.....हिंसाचार बंद होणे अशक्य आहे कारण It will go against the nature. जगाची निर्मिताच न्याय तत्वावावर झाली नसल्याने हिंसा थांबू शकत नाही आणि प्रत्येकाने न्यायाची अपेक्श्या करणे चुकीचे आहे. आणि धर्म सांगतात कि न्याय आहे..कोण म्हणते जन्नत , कोण म्हणते स्वर्ग कोण काय्णु बायानू

    ReplyDelete
  9. आपणासारखे तथाकथित विचारवंत फक्‍त शब्‍दांचे बुडबुडे उडवतात. क्रियेविण वाचाळता व्‍यर्थ आहे. आपले भव्‍यदिव्‍य विचार जनसमुदायासमोर व्‍यक्‍त करुन त्‍यांना आपल्‍या अमूल्‍य मार्गदर्शनाचा लाभ द्यावा ही विनंती.

    ReplyDelete
  10. धर्म आणि रिलिजन या नक्कीच दोन वेगळ्या बाबी आहेत. हवी ती दैवते आणि विचारधारा मान्य करण्याचे स्वातंत्र देतो त्याला धर्म म्हनतात. इंग्रजीत यालाच एके काळी पेगन म्हटले जात होते आणि रिलिजन स्थापनांनंतर त्याकडे उपहासात्मक द्रुष्टीने पाहिले जावू लागले. उदाहरणार्थ सुफी विचारधारा अरब जगतात इस्लामच्या स्थापनापुर्वकालापासुन चालु होती. सुफी हा शब्दच मुळात जी जरड-भरड वस्त्रे त्या विचारधारेचे अनुयायी घालायचे त्यावरुन पडलेला आहे. धर्म ही एक प्रवाही बाब आहे तर रिलिजन हा पोथीनिष्ठ असतो...त्या विचारधारेच्या निर्मात्यालाच महत्ता देत ती विचारधारा अंतिम आहे अशी धमकी मानवजातीला देत असतो. म्हनजे रिलिजन हा बंदिस्त असतो तर धर्म हा प्रवाही असतो. तो बव्हंशी मानवी संद्न्या, प्रद्न्या, श्रद्धा आणि विवेकाला स्वातंत्र्य देनारा असतो...रिलिजनमद्धे हे जवळपास अशक्य असते. त्यातही वैचारिक वादळे होतात व रिलिजनांत उप-रिलिजन बनतात...परंतु ते व्यक्तिनिष्ठ विचारधारेच्या आपापल्याला उमगलेल्या अर्थामुळे...ते ती आराध्ये नाकारत नाहीत. तत्वद्न्यानाचा अर्थ नाकारतात...येथे बुद्ध धर्म व ख्रिस्ती व इस्लामचा इतिहास पहा.
    भारतात वैदिकत्व लादणे म्हनजे हिंदुत्व हा जो गतशतकात नवाच शोध लावून वैदिकत्व हाच धर्म असून तीच भारतीय संस्क्रुती आहे आणि तिची महत्ता कायम राहिली पाहिजे हा जो नवा फ्यसिझम आहे त्याला विरोध आहे. कारण वैदिक हा रिलिजन आहे...धर्म नाही...कारण तो रिलिजन हा व्यक्तिप्रणित आणि सत्ताप्रणित आहे. सुदास राजाच्या काळात वशिष्ठाच्या प्रेरणेने हा रिलिजन जागवला गेला...आणि सुदास वंशाच्या अस्ताबरोबरच संपला. सुदास हा पुरु वंशीय. महाभारतातील आदिपर्वात पुरु वंशाच्या वंशावळीत कोठेही सुदास वा त्याच्या वंशीयाचे नांव येत नाही. उलट ऋग्वैदिक नाकारली गेलेली घराणी, उदा. यदु, इश्क्वाकु, अनु, मत्स्य इ. महाभारतात येतात. वैदिकत्वाचा टेंभा व्यक्तिगत वा स्मसामाजिक लोकांच्या आत्मस्तुतीसाठी कदाचित मदत करतही असेल...पण ते वास्तव नाही. उदा...महाराष्ट्रातील वा दक्षीणेतील एकही ब्राह्मन ऋग्वैदिक अर्थाने ब्राह्मण नाही.

    ReplyDelete
  11. सोनवणी साहेब....आपण सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा उल्लेख केला आहे...पण मला वाटते त्याचा मतितार्थ जो अभिप्रेत आहे तो लक्षात आला नाही..कारण पितृभू: म्हणजे पितरांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची भूमी.म्हणजेच ती प्रत्येक व्यक्ती जी असं समजते कि हि भूमी म्हणजेच भारत भूमी हीच आपल्या पूर्वजांची भूमी आहे. शतकानुशतके आपले पूर्वज याच भूमीला आपली मातृभूमी,आपले सर्वस्व मानत आले आहेत आणि म्हणूच हि आपली जन्मभूमी आहे.आपल्या पूर्वजांची भूमी म्हणून पितृभू: असं अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. मात्रुभू च्या विरुद्ध पितृभू असं अर्थ इथे नसावा.
    आणखी एक गोष्ट म्हणजे सावरकरांना जे हिंदुत्व अभिप्रेत होते ते हिंदू religion या अर्थी नक्कीच नाही...तर ते राष्ट्रवादाच्या भूमिकेतून अभिप्रेत होते. त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यात त्यांनी हिंदू धर्मातील (religion) चातुर्वार्नाचे उच्चाटन, जात्युच्चेदन, तसेच रोटीबंदी,बेटीबंदी...यासारख्या हीन दर्जाच्या गोष्टींचे निर्मुलन करण्यासाठी जे कार्य केले ते लक्षात घ्याला हवे..ते स्वातंत्र्यवीर तर होतेच पण त्याचबरोबर ते एक सुधारक हि होते.
    त्याचबरोबर मंदिर बंदी(ज्यात अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंद होता.) ती उखडून टाकण्यासाठी रत्नागिरीत पतितपावन मंदिर उभे केले. पण त्याच बरोबर मोठी मोठी मंदिरे सुद्धा सर्वांसाठी खुली व्हावीत म्हणून सुद्धा प्रयत्न केले...उदाहरण द्यायचे झाले तर नाशिकचे काळाराम मंदिर......
    सामाजिक अर्थाने हिंदुत्व म्हणजे सर्व हिंदू धर्मियांनी आपल्या जाती बाजूला ठेवून या राष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचे आहे.
    आणि मला वाटते कि आजही तीच गरज आहे. एकमेकांवर टीका करत बसण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा पूर्वग्रहदोषविरहित दृष्टीने सर्वानीच सखोल अभ्यास करून जर विचारांची देवाण घेवाण केली तर आणि सर्वांनी एकत्र येऊन देशहिताचा अन राष्ट्रहिताचा विचार केला तर लवकरच आपले राष्ट्र नक्कीच जागतिक महासत्ता होईल.

    आणि आपण राविन्द्रनाथांबद्दल जे लिहिले आहे त्याबद्दल मला असे वाटते कि त्या गीतात जे काही उल्लेख आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपातील आहेत.नाहीतर भारतवर्षातील सर्व राज्ये,नद्या,पर्वत, सगळ्या लोकसंस्कृती, कला या सगळ्या एका काव्यात गुंफण्याचा प्रयत्न केला तर ते काव्य कदाचित कधीच पूर्णत्वास पोहोचणार नाही...आणि त्याहूनही ते राष्ट्रीय काव्य म्हणून कधीच मान्यताप्राप्त होणार नाही.

    तळटीप:या संपूर्ण लेखात आपल्यावर टीका करण्याचा कुठलाही विचार नाहीये...हे एक मत आहे..

    ReplyDelete
  12. वरील comment मध्ये थोडेसं अधिक..जे वर लिहायचं राहून गेलं
    पण मला वाटते त्याचा मतितार्थ जो अभिप्रेत आहे तो लक्षात आला नाही..कारण पितृभू: म्हणजे पितरांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची भूमी.म्हणजेच ती प्रत्येक व्यक्ती जी असं समजते कि हि भूमी म्हणजेच भारत भूमी हीच आपल्या पूर्वजांची भूमी आहे. शतकानुशतके आपले पूर्वज याच भूमीला आपली मातृभूमी,आपले सर्वस्व मानत आले आहेत आणि म्हणूच हि आपली जन्मभूमी आहे, आपली मातृभूमी आहे असे मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू. असा अर्थ इथे घेतला तर हि व्याख्या तत्कालीन राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने केली होती हेही लक्षात येईल.

    ReplyDelete
  13. अक्षयजी, पित्रुभु: बद्दल आपण जी आपली व्याख्या मांडली ती नि:संशय आपली स्वता:ची आहे. तशी ती मुळात खरेच असती तर मलाही आनंद झाला असता. पण ते तसे वास्तव नाही. पण ते येथे एवढे महत्वाचेही नाही. सावरकर हे स्वत:च आपले शब्द बदलवत आहेत. पित्रुभु: ऐवजी ते मात्रुभु: हाही शब्द वापरु शकत होते, पण त्यांनी ते तसे केलेले नाही. या माझ्या लेखमालिकेचा उद्देश क्रुपया समजावुन घ्या. सावरकर हे हिंदु नामक धर्माच्या परंपरेतील व्याख्या करु पाहणा-यांपैकी एक आहेत आणि म्हणुन मला त्यांच्या व्याख्यांवर चर्चा करणे भाग पडले आहे. त्यांनी अन्य काय महनीय कार्ये केली त्यावरील चर्चा हा मुळात या लेखमालिकेचा उद्देशच नसल्याने ती भरकटु नये यासाठी मी प्रस्तुत लेखाचा अंत आम्हाला त्याबद्दल कोणी सांगु नये असे मी स्पष्ट म्हतले आहे, कारण ते माहित आहे आणि त्याबद्दल असायला हवा तेवढा आदर आहे. रविंद्रनाथांचा उल्लेख मी केला कारण स्पष्ट आहे, जे भुभाग त्यांनी नोंदले नाहीत ते भारत राष्ट्रात आहेत असा त्यांचा समज नव्हता...आजही भारतीयांचा नाही...अन्यथा हेच लोक त्या भागांतील लोकांशी कितपत व्यवहार करतात याची उदाहरणे आपणच द्यावीत. आसिंधुहिमाचल म्हणणे सोपे आहे. काव्यात नका गुंफु. पण भावनीक नाळ जुळवायला आजही कमी का पडतो आपण? कारण साधे आहे, हिंदुत्व म्हनजे राष्ट्रीयत्व हा समज पसरवना-या विचारधारा एकीकडे तर प्रादेशिक भेदभाव (जातीय/वांशिक/वर्णीय याबद्दल मला येथे काही भाष्य करायचे नाही) बाळगणारी आपलीच विचारधारा एकीकडे. पण हाही माझ्या या लेखमालिकेचा हेतु नाही. खरे तर आसाम, मणीपुर, मेघालय या भागातील लोक आपल्यापेक्षा अधिक पुरातन हिंदु आहेत हे मी पुढे सिद्ध करुन दाखवणारच आहे. माझ्या लेखमालिकेचा उद्देस्श हा आणि हाच आहे कि हिंदु नावाखाली सर्वांची...अगदी तुमचीही फसवणुक होते आहे....याचे दर्शन घडवत या धर्माच्या मुलतत्वांची चर्चा करणे. सावरकरवादी, टिळकवादी...असे वादीसुद्धा मनमोकळ्या मनाने या चर्चेत सहभागी व्हायला हवेत..शेवटी आपल्याला धर्माबद्दल एक विचार पुढे न्यायचाय ना? आणि आपण माझ्यावर कसलीही टीका केलेली नाहीहे. केली असती तरी मी तिचे स्वागतच केले असते याबाबत खात्री बाळगा.

    ReplyDelete
  14. सावरकरांची कर्मे समजणे अवघड जात असेल तर विं. दा. करंदीकरांच्या कवितेतून कदाचित अर्थबोध होऊ शकेल असे वाटते...

    त्यातीलच येक माझ्या मना बन दगड ही जरा सहज समजायला उपयुक्त वाङ्मय वाटते...

    ReplyDelete
  15. सावरकरांची ही पाश्चात्यवादी व्याख्या असुन ती हिंदु धर्माबाबत कसलेही ठाम विधान करु शकत नाही हे उघड आहे.----सावरकरांनी धर्माची व्याख्या केलेली नसून हिंदु कोणाला म्हणावे याची व्याख्या केलेली आहे.तथाकथित हिंदू धर्म आणि सावरकरांचे हिंदुत्व यात अंतर आहे.बाबासाहेबांनी या व्याख्येस with great care and caution तयार केलेली व्याख्या म्हटले आहे.या व्याख्येअंतर्गत येणार्या सर्व समुदायांचा बाबासाहेबांनी हिंदु कोड बिलात समावेश केला होता.

    ReplyDelete
  16. काय लिहिताय समजतंय का ??
    ते जर कवी होते.. तर त्यांना भारत देशावरच कवित्व करायचा अशी अट नव्हती घातली कोणी, आणि त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले... आता भारतात फक्त मराठी हीच भाषा नसून शेकडो भाषा आहेत.. मग त्यांनी प्रत्येक भाषेसाठी शब्द शोधात बसणे अपेक्षित आहे का ?

    "कारण या देशाचे नाम हिंदु राष्ट्र कसे पडले, आणि त्या बुभागातील अन्य अनेक धर्म व जातीय सोडुन याच धर्माला हिंदु हे नांव कोणी व का दिले हे समजत नाही."

    साहेब जरा इतिहासाचा अभ्यास करा.. जेव्हा भारत हिंदू लोक अति उच्चजीवन जगात होते..तेव्हा हे अरब आणि पश्चिमे कडचे लोक पानं लावून हिंडत होते.. त्यांना भाषा, संस्कृती काय असतं हे माहित पण नव्हता मग ते कसे काय "हिंदू" असं नाव देतील. जगातला सगळ्यात जुना धर्म,संस्कृती जर हिंदू म्हणून ओळखली जात असेल तर त्याला "हिंदू" असं नाव देणारे साहजिकच हिंदूच असणार..आणि त्या भूभागात हिंदू हा एकाच धर्म होता..

    ReplyDelete
  17. "सावरकर माहाराष्ट्रीभाषी प्रेमी होते आणि मराठी भाषेला त्यांनी अत्यंत उत्तम व्यावहारिक शब्द दिले. त्यांचे हे ऋण मान्य करुन त्यंनी भारताला कोणते भाषिक अधिष्ठाण दिले? त्यांची काव्यात्मक प्रतिभा महाकविला साजेशी आहे हे मान्य करुनही मी विचारतो त्यांनी कोणते राष्ट्रीय काव्य लिहिले?"
    काय लिहिताय समजतंय का ??
    ते जर कवी होते.. तर त्यांना भारत देशावरच कवित्व करायचा अशी अट नव्हती घातली कोणी, आणि त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले... आता भारतात फक्त मराठी हीच भाषा नसून शेकडो भाषा आहेत.. मग त्यांनी प्रत्येक भाषेसाठी शब्द शोधात बसणे अपेक्षित आहे का ?

    "कारण या देशाचे नाम हिंदु राष्ट्र कसे पडले, आणि त्या बुभागातील अन्य अनेक धर्म व जातीय सोडुन याच धर्माला हिंदु हे नांव कोणी व का दिले हे समजत नाही."

    साहेब जरा इतिहासाचा अभ्यास करा.. जेव्हा भारत हिंदू लोक अति उच्चजीवन जगात होते..तेव्हा हे अरब आणि पश्चिमे कडचे लोक पानं लावून हिंडत होते.. त्यांना भाषा, संस्कृती काय असतं हे माहित पण नव्हता मग ते कसे काय "हिंदू" असं नाव देतील. जगातला सगळ्यात जुना धर्म,संस्कृती जर हिंदू म्हणून ओळखली जात असेल तर त्याला "हिंदू" असं नाव देणारे साहजिकच हिंदूच असणार..आणि त्या भूभागात हिंदू हा एकच धर्म होता..

    ReplyDelete
  18. धर्म आणि रिलिजन = Pothinishta.
    धम्मा = Nitimatta, Naisargik niyam.

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...