Thursday, May 14, 2020

गांधी, नेहरू आणि आंबेडकर

गांधी, नेहरू आणि आंबेडकर हे विसाव्या शतकातील महान माणसे होती यात शंका असण्याचे कारण नाही. या तिघांना एकत्र करुन वैचारिक व्युहनीती बनवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात. ही माणसे महान असली तरी त्यांच्यात व्यक्तीसापेक्ष वैचारिक भेदांच्या भिंतीही होत्या. बरे, या तिघांकडून परिस्थितीसापेक्ष विसंगत वर्तने झालेली नाहीत असेही नाही. त्यांचा आजच्या परिप्रेक्षातून अर्थ लावणे हेही विसंगत आहे. आणि तिघांच्या एकत्रीकरणातून सर्वस्वी नवीन अशी विचारधारा जन्माला घालता येईल असा विचार कोणी करत असेल, तर त्याचे ते स्वातंत्र्य मान्य करुनही, ते निष्फळ ठरेल असे माझे मत आहे. वरील प्रत्येक महनीयासमोरील समस्या, आव्हाने आणि त्यांना तोंड देण्यासाठी त्यांची तयार झालेली मनोभुमिकांचा स्वतंत्रपणेच आज विचार करावा लागेल.

प्रसिद्ध पत्रकार संजय आवटे आणि प्रा. हरी नरके यांच्यात गांधी, नेहरू आणि आंबेडकरांबाबत चर्चा झाली ही चांगली बाब असली तरी या चर्चेतील संजय आवटे यांची भुमिका "आशय प्राधान्याची" असल्याचे दिसते तर प्रा. नरके यांची भुमिका "तथ्यात्मकतेची" दिसते. मुळात भुमिकांतच अंतर पडल्याने चर्चेत फारसे तार्किक काही बाहेर पडण्याची शक्यता नाही. अभ्यासक आणि भावनीक विचारवंतांचे दृष्टीकोण वेगळे असु शकतात आणि मतिआर्थही तसेच आगळेवेगळे असु शकतात. पण वास्तव हे आहे की या तीन व्यक्तीत्वांची एकत्र वैचारिक मोट बांधण्याचा प्रयत्न सामाजिक दृष्ट्या वरकरणी स्तुत्य वाटला तरी मुळच्या विसंगतींचा निर्वाह त्यातुन लागणे शक्य नाही एवतेव तसा प्रयत्नही अयशस्वी होईल असे मला वाटते.

प्रा. नरकेंनीच दाखवुन दिल्याप्रमाणे आंबेडकर आणि नेहरु-गांधींत समन्वयाचे मुद्दे कमी आणि विसंवादाचेच अधिक होते. कारणे काहीही असोत. खुद्द नेहरु आणि गांधींतही समन्वय किती आणि विसंवाद किती याचा भावनीक न होता शोध घेतला तर हाती लागते ते फार आल्हाददायक असते असे नाही.

ही महान माणसे होती व त्यांनी आपल्या मतभेद/स्वभावभेदासह भारत उभारण्यासाठी आपापल्या प्रतिभा पणाला लावल्या याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञच राहिले पाहिजे. त्यांचा विचार करतांना मात्र स्वतंत्रपनेच करत त्यांचे मुल्यमापण करणे न्याय्य असेल, मोट बांधून काही उपयोग नाही असे माझे मत आहे. आणि तसेच करायचे असेल तर मग संघप्रणित समरसता मान्य करायला काय हरकत आहे?


मला वाटते, वैचारिक किंवा सैद्धांतिक वाद घालत असतांना व्यक्तीगत मैत्रीचे संदर्भ देणे गैरलागू आहे. चर्चा मुद्द्यांवरच व तथ्यांवर आधारित असायला हवी. प्रा. नरके यांनी त्यांच्याकडील पुरावे दिलेले आहेत. प्रतिपक्षानेही आपले पुरावे भावनिक न होता देत विरोधी पुराव्यांना खोडून काढायला हवे किंवा वादातुन अंग काढून घ्यायला हवे. गांधी, आंबेडकर, नेहरु किंवा कोणीही महनीय संपुर्णपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा स्वत:चा समज पुराव्यांमधुन दिसणा-या वास्तवावर लादत आपली मते मांडली तर विभुतीपुजक/भंजक आणि अभ्यासकांत फरक राहणार नाही आणि मला वाटते विचारी महाराष्ट्राचे हे काही केल्या लक्षण म्हणता येणार नाही. प्रा. नरकेंनी मुद्देसुद वास्तवे मांडली आहेत. विचारवंत त्यातून कोणी हवा तो मतितार्थ काढू शकतील किंवा तथ्येही ठोकरुन लावत स्वानुकुल तथ्यांची निर्मिती करु शकतील. तो ज्याच्या त्याच्या सामाजिक दृष्टीकोणाचा प्रश्न आहे. 

संघवादी लोक तथ्यांचे शेवटी काय करतात हे आपण आजकाल पाहतच आहोत. पुरोगामी गोटाकडूनही वेगळ्या प्रकारे शेवटी तसेच घडणार असेल तर पुरोगामी या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. किंबहुना महाराष्ट्राच्या एकुणातीलच वैचारिकतेचा जो पराभव होतांना दिसतो आहे त्याच्या मुळ कारणांचा शोध घेणे आणि सामाजिक तत्वज्ञान आणि गतपिढ्यांनी आपल्यासाठी सोडलेला वारसा यांची नव्याने अभ्यास करुन नवी मांडणी करण्याची आवश्यकता वाटते. कोणा महनियांची एकत्र मोट बांधायचीच असेल तर काही अपरिहार्य विसंगतीही उत्पन्न होणारच. त्यांचा निर्वाह लावावा लागेल पण विसंगतीच नाहीत असा दावा कोणी केला तर तो काही केल्या वैचारिक पाया सुदृढ होऊ शकणार नाही हे आपल्याला गृहित धरावे लागेल. हे लेखन मी केवळ या वर्तमान वादामुळे करत नाहीय तर जे आपलेच समाज-विचारवास्तव सातत्याने समोर येते आहे त्यातून करत आहे.

* * *

मला वाटते, वैचारिक किंवा सैद्धांतिक वाद घालत असतांना व्यक्तीगत मैत्रीचे संदर्भ देणे गैरलागू आहे. चर्चा मुद्द्यांवरच व तथ्यांवर आधारित असायला हवी. प्रा. नरके यांनी त्यांच्याकडील पुरावे दिलेले आहेत. प्रतिपक्षानेही आपले पुरावे भावनिक न होता देत विरोधी पुराव्यांना खोडून काढायला हवे किंवा वादातुन अंग काढून घ्यायला हवे. गांधी, आंबेडकर, नेहरु किंवा कोणीही महनीय संपुर्णपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा स्वत:चा समज पुराव्यांमधुन दिसणा-या वास्तवावर लादत आपली मते मांडली तर विभुतीपुजक/भंजक आणि अभ्यासकांत फरक राहणार नाही आणि मला वाटते विचारी महाराष्ट्राचे हे काही केल्या लक्षण म्हणता येणार नाही. आपण मुद्देसुद वास्तवे मांडली आहेत. विचारवंत त्यातून हवा तो मतितार्थ काढू शकतील किंवा तथ्येही ठोकरुन लावत स्वानुकुल तथ्यांची निर्मिती करु शकतील. तो ज्याच्या त्याच्या सामाजिक दृष्टीकोणाचा प्रश्न आहे. संघवादी लोक तथ्यांचे शेवटी काय करतात हे आपण आजकाल पाहतच आहोत. पुरोगामी गोटाकडूनही वेगळ्या प्रकारे शेवटी तसेच घडणार असेल तर पुरोगामी या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. किंबहुना महाराष्ट्राच्या एकुणातीलच वैचारिकतेचा जो पराभव होतांना दिसतो आहे त्याच्या मुळ कारणांचा शोध घेणे आणि सामाजिक तत्वज्ञान आणि गतपिढ्यांनी आपल्यासाठी सोडलेला वारसा यांची नव्याने अभ्यास करुन नवी मांडणी करण्याची आवश्यकता वाटते. कोणा महनियांची एकत्र मोट बांधायचीच असेल तर काही अपरिहार्य विसंगतीही उत्पन्न होणारच. त्यांचा निर्वाह लावावा लागेल पण विसंगतीच नाहीत असा दावा कोणी केला तर तो काही केल्या वैचारिक पाया सुदृढ होऊ शकणार नाही हे आपल्याला गृहित धरावे लागेल. हे लेखन मी केवळ या वर्तमान वादामुळे करत नाहीय तर जे आपलेच समाज-विचारवास्तव सातत्याने समोर येते आहे त्यातून करत आहे.

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...