Sunday, March 7, 2021

हिंदू शब्दाचा इतिहास

 

 


 

हिंदू-हिंदवे हे शब्द सिंधू नदिपारचा प्रदेश व तेथील लोकांना उद्देशून वापरल्याचे उदाहरण पारशी धर्मग्रंथ अवेस्त्यात सर्वप्रथम येते. हा काळ इसपू १५०० आहे. ऋग्वेदात हाच शब्द सिंधू म्हणून येतो. पर्शियन भाषेत ध्वनीबदल होऊन स चा ह होतो म्हणून हे रुपांतर आहे. पश्चिमेतल्या लोकांनी अवेस्त्यातले रूप स्वीकारले, वेदातले नाही.

 

चीनी लोक भारताला “सिन्तु” म्हणत तेही सिंधू किंवा हिंदू नावाचे चीनी रूप आहे. इंडिका हे ग्रीक रूप आहे. बायबलमध्ये हिब्रूत “हिडू” हे नाव येते.

 

हिंदू हे प्रदेशधर्माचे नाव होते. तत्कालीन समाजात सर्वच धर्म हे   लोकधर्म  असल्यामे  (पेगन) त्या प्रदेशाचे अथवा जमातीचे नाव हेच त्यांच्या धर्माचेही नाव असे. उदा. इजिप्शियन शर्म, असिरीयन धर्म, पारशी धर्म इ.  किंबहुना भारतात तोवर अन्य कोणतेच विसंवादी धर्मच आलेला नसल्याने लोकांना आपल्या धर्माला नावे देण्याची गरज नव्हती. ते कोणा व्यक्तीने स्थापन केले नसल्याने त्यांना विधेविधान व धार्मिक कर्मकांड असले तरी एकमेव धर्मसंस्थापक अथवा धर्मग्रंथही नव्हते.

 

जगात्तील पहिला व्यक्तीस्थापित धर्म म्हणजे पारशी धर्म. पाठोपाठ आर्यांचा (म्हणजे नंतर वैदिक) धर्म दहा ऋषीकुटुंबानी स्थापन केला व वेदातून त्याला संघटीत रुप दिले. वसिष्ठ हा मुळ ऋषी असल्याने तोच या धर्माचा संस्थापक होय.

 

वैदिक भारतात येईपर्यंत येथील लोकांना आपल्या धर्माला नाव देण्याची गरजच भासली नव्हती. वैदिकांनी येथील धर्माला शूद्रांचा धर्म म्हटले कारण वैदिकांनी येथे प्रथम आश्रय घेतला तो शूद्र (सुद्द) टोळीच्या राज्यात. त्यांना या सर्वच प्रदेशात सुद्दांचे वास्तव्य आहे असे वाटले. अन्य उतर व दक्षिणेतील जमातिन्शी त्यांचा परिचय खूप नंतर झाला. वैदिकांच्या वेगळ्या अस्तित्वामुळे येथील लोक स्वत:च्या धर्माला नंतर शैव धर्म, तंत्र धर्म (आगमिक धर्म) असे म्हणवू लागले. नंतर येथे बुद्ध-महावीरापर्यंत कोणीही नवा संघटीत धर्म स्थापन केला नाही. हिंदू हे बाह्य जगासाठी नाव प्रदेश व धर्मवाचकच राहिले. अशोकानेही हिंद हे नाव याच अर्थाने शिलालेखात घेतले. पण येथील लोक स्वत:ला हिंदू धर्मीय असे मात्र म्हणवून घेत नव्हते. ते स्वत:ची पारंपारिक नावेच वापरत होते.

 

पूर्वी आर्य धर्मीय म्हणवून घेणा-या लोकांनी भारतात आल्यावर स्वत:ला वैदिक व नंतर आर्य धर्मी म्हणवून घ्यायला सुरुवात केली व स्मृतीन्मधून त्यांच्या धर्माला प्रमाणित केले तर तेच काम हिंदूंनी तंत्रग्रंथांतून केले.

 

सहाव्या शतकातील मेरुतन्त्र या तांत्रिक ग्रंथात हिंदू हे नाव  काही प्रमाणात धर्मवाचक म्हणता येईल असे वापरले गेले. हिंदू म्हणजे जे वैदिक (त्रेवर्निक) किंवा मुस्लीम नाहीत किंवा जैन/बौद्धही नाहीत, ते मूर्ती/प्रतीमापुजक असा अर्थ होता. इंग्रजांनीही तोच अर्थ जवळपास चालू ठेवला व वैदिक धर्माला “ब्राह्मणी धर्म” असे वेगळेच नाव बहाल केले. ते ब्राह्मणांनी स्वीकारले नाही उलट स्वत:पुरती वैदिक धर्म हीच ओळख कायम ठेवली.

 

पुढे ब्राह्मणी, बौद्ध, जैन व हिंदू धर्म एकत्रच समजले गेले किंवा तशी समजूत निर्माण केली गेली. आताआतापर्यंत याच समजात लोक राहिले व संघ आजही या सर्व धर्मांना “हिंदू” या नावाखाली घेऊन वैदिक वर्चस्ववादाचे राजकारण करत असतो. वस्तुता: ते वैदिक धर्मातात्वान्चाच प्रसार करत असतात व इतरांना दुय्यम अथवा वैदिकोद्भाव ठरवायचा प्रयत्न करत असतात.

 

प्रत्यक्षात हे चारही धर्म (हिंदू, वैदिक, जैन आणि बौद्ध) वेगळे व स्वतंत्र आहेत. त्याचे तत्वज्ञान व विधीविधान वेगळे आहे.

 

असिरीयन, इजिप्शिअन इत्यादी प्रदेशावाचक धर्म कालौघात नष्ट झाले. हिंदू हा प्रदेशवाचक नाव असलेला धर्म मात्र टिकून राहिला व या धर्माचे नाव अवेस्तात इसपू १५०० मध्येच येते. त्यामुळे हिंदू या धर्म/प्रदेशवाचक नावाबद्दल गोंधळ घालण्याचे बुद्धीभेदी कारस्थान काही कामाचे नाही. वैदिक धर्माचे “आर्य” हे मुळ नावही प्रदेशवाचकच होते हे लक्षात ठेवावे. इराण हे प्रदेशाचे नाव आर्य या शब्दाचेच आजचे रूप आहे हे सर्वांना माहित आहे. हा धर्म इराणमध्ये स्थापन झाला म्हणून आर्य धर्म. पर्शियात स्थापन झाला-वाढला म्हणून पारशी धर्म. तसाच हिंदुस्तानात निर्माण झाला म्हणून हिंदू धर्म.

1 comment:

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...