सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करण्यासाठी वैदिक आणि युरोपियन विद्वानांनी कसकशा कोलांटउड्या मारल्या याचा इतिहास मनोरंजक आहे.
सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडण्यापुर्वी:-
१. वसाहतवादी इंग्रजांना आणि राष्ट्रवादी जर्मनांना आपले वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करायचे होते आणि इतिहासही मागे न्यायचा होता.(युरोपचा इतिहास अन्य जागतिक संस्कृत्यांपेक्षा ब-यापैकी अर्वाचीन आहे, ग्रीसचा अपवाद.) विल्यम जोन्सपासुन ख-या अर्थाने ही सुरुवात झाली. ऋग्वेदाचा, त्यातील भाषा व ल्यटीनादि युरोपियन भाषांतील काही वरकरणी साधर्म्य पुर्वीच त्यांच्या लक्षात आलेले होते. म्यक्समुल्लरने वेद व अवेस्ता यातील आर्य/ऐर्या/अरियाना वगरे समान वाटलेल्या शब्दांतून आर्य वंश सिद्धांत प्रथम मांडला. निळ्या डोळ्याचे, सोनेरी केसाचे, उंच धिप्पाड गोरे आर्य आणि त्यांचे धडाडत आक्रमनासाठी धावणारे रथ याची युरोपवर एवढी मोहिनी पडली कि आपण आशिया-युरोपला संस्कृती देणारे, आर्यभाषांचे निर्माते आहोत असे वाटू लागले. अर्थात म्यक्समुल्लरच्या लक्षात यातील वांशिक धोका लक्षात आल्यावर "आर्य वंश" ही संज्ञा मागे घेतली आणि आपल्याला आर्य भाषा बोलण-या लोकांचा भाषिक गट असे म्हणायचे होते असे त्याने स्पष्टही केले. पण जो काही परिणाम व्हायचा होता तो झालाच.
२. भारतीय लोकांनी, विशेषता: वैदिकांनी, स्वाभाविकपणे ते आक्रमक आर्य म्हणजे आपलेच पुर्वज असा ग्रह करून घेतला. कारण हा शब्द वेदांतुनच आला होता. या सिद्धांताने सत्ताधारी ब्रिटिश आणि वैदिक एकाच मुळाचे ठरत होते. ते ब्रिटिशांच्या पथ्यावरच पडणारे असल्याने त्यांनी या सिद्धांताला खतपाणीच घातले. पुढे टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहून वेदांचे निर्माते हे मुळचे उत्तर ध्रुवाजवळ राहणारे होते हे ऋग्वेदातील प्रमाणांवरुन सिद्धही करुन दाखवले. तत्पुर्वी महात्मा फुल्यांनी याच सिद्धांताचा आधार घेत विदेशी आक्रमक आर्य आणि येथील शुद्राति-शूद्र मुलनिवासी अशी मांडणी करत वैदिक व्यवस्थेवर हल्ले चढवले.
३. जर्मनांनी मात्र जर्मन हेच मुळचे आर्य आणि जर्मनी हेच त्यांचे मुळ स्थान असून त्यांच्याच पुरातन पुर्वजांच्या एका शाखेने वेद लिहिले असे दावे सुरु केले. आर्यांच्या मुळ स्थानाबाबत युरोपात अनेक ग्रंथ लिहिले गेले. भारतातही काही वेगळे झाले नाही. या सिद्धांताचा प्रभावच तेवढा होता. पण यामुळे देशात वांशिकदृष्ट्या दोन तट पडले. भारतातील लोकसंख्येची रचनाही मानवशास्त्राच्या संशोधकांनी, रिस्ली वगैरे. विविध वांशिक आधारांवर केली गेली. (दुर्दैव म्हणजे आपण आजही तेच संदर्भ वापरत असतो.)
सिंधू संस्कृती सापडल्यानंतर:
१. १९२० साली सिंधू संस्कृतीचे अवशेष उजेडात यायला लागले. एवढी प्रगत आणि भव्य संस्कृती येथे असू शकेल याची कल्पनाही त्यावेळीस केली गेलेली नव्हती. उलट आर्य येण्यापुर्वी येथे आदिवासी, अडाणी, भाषाही धड न बोलणारे लोक राहत होते असा समज होता. पण उत्खनित पुरावेच येथील लोक अत्यंत पुढारलेले होते असे सरळ दाखवत असल्यानेअसल्याने ते नाकारताही येत नव्हते.
२. मग आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृते नष्ट केली व तेथील लोकांना हरवून दक्षीणेत हाकलले असा सिद्धांत पुढे आणला गेला. ऋग्वेदातील काही द्राविडी शब्द यासाठी आधार म्हणून वापरले गेले. यामुळे द्राविडी लोकांचा वेगळा राष्ट्रवाद उफाळला. उत्तरेतील भाषा आणि तेथील लोक हे त्यांच्या द्वेषाचे कारण बनले. स्वतंत्र द्राविडीस्थान मागण्यापर्यंत मजल गेली. तेथील राजकारण द्राविड्सेंट्रीक बनले. आजही ते तसेच आहे.
३. बहूजनांना सिंधू संस्कृतीचा मात्र मोठाच भावनिक आधार मिळाला. सिंधू संस्कृतीचे निर्माते बहुजन आणि ती नष्ट करणारे आक्रमक आर्य वंशीय असा हा सामाजिक संघर्ष बदलला.
४. वैदिक जनांना आपण या भुमीत परके ठरण्याचा धोका लगेच लक्षातही आला. गोळवलकर गुरुजींनी तर "पुरातन काळी उत्तर धृव वाराणशीला होता असे विधान करून आर्यही एतद्देशियच ठरवायचा प्रयत्न केला. पुढे डा, नि. र. व-हाडपांडे यांनी नवा ग्रंथ लिहून टिळकांचा सिद्धांत ऋग्वेदाच्याच आधारे रद्दबातल ठरवला व आर्यांचे मुळस्थान भारत आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
५. युरोपियन विद्वान आता "आर्य" हा वंश निदर्शक शब्द वापरायचे बंद झाले. पण त्यांनी इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत पुढे आणला. या सिद्धांतानुसार या इंडो-युरोपियन भाषाकुटुंबाचे पुर्वज पुरातन काळी कोणत्यातरी एकाच ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या लाटा क्रमश: भारत, इराण, अनातोलिया, ग्रीस ते युरोप अशा पसरल्या असे सांगितले जावू लागले. बरे मूळ स्थान कोणते या वादाचा निकाल अजुनही लागलेला नाही. दक्षीण रशियातील अंड्रोनोवो, सिन्थास्टा संस्कृती ते अनातोलिया अशी वेगवेगळी मुलस्थाने आजही धडाडीने भांडली जात आहेत. विशेष म्हणजे सारेच विद्वान तेच ते पुरावे वापरत सोयिस्कर अर्थ काढत असतात.
६. १९७० नंतर उपग्रहीय छायाचित्रांमुळे आजची घग्गर ही एके काळी खूप मोठी होती असे जाणवू लागले. मग ती म्हणजेच ऋग्वेदातील हरवलेली सरस्वती नदी होय असे दावे केले जावू लागले. या दाव्यांमागे खरे कारण होते ते हे कि या नदीच्या काठांवर हजारापेक्षा अधिक सिंधू संस्कृतीची स्थाने सापडली आहेत, ती पाकिस्तानातील एकुण संख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहेत. घग्गरला सरस्वती बनवले कि आपोआप त्या संस्कृतीवरही वैदिक मालकी सांगता येणार होती. स्वाभाविकच अनेक विद्वान हरवलेली सरस्वती सापडली असे दावे करू लागले. खरे तर सर आरेल स्टीन यांनी १९४० च्या आसपास तसा दावा केला होता. पण त्यावेळी आक्रमक आर्यांच्या कैफात असले, आणि सिंधू संस्कृतीची प्रगल्भता न समजलेल्या वैदिकांच्या तेंव्हा लक्षात आले नाही. पण आता घग्गरच्या प्रत्यक्ष पात्रांत व उपनद्यांत जी भुशास्त्रीय आधुनिक तंत्रज्ञानांनी जी परिक्षणे केली त्यावरून घग्गर ही कधीही मोठी बारमाही, ऋग्वेदात वर्णण केलेल्या सरस्वतीसारखी हिमालयातून - पहाडांतुन उसळ्या घेत, सर्व नद्यांपेक्षा मोठी नदी, "नदीतमे" नव्हती. ती पावसाळ्यावर अवलंबून असलेली एक सामान्य नदी होती. सनपुर्व १७५० मद्ध्ये जलवायुमान बदलल्याने ती पावसाळ्यापुरतीच वाहणारी नदी बनली आणि सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आपल्या वसाहतपद्धती बदलल्या
हे सर्व भु-पर्यावरण-शास्त्रज्ञांनी व पुरातत्वविदांनी मान्य केले आहे. त्यामुळे सरस्वती म्हणजे घग्गर हा दावा सर्वस्वी निराधार ठरलेला आहे.
७. मायकेल ड्यनिनो (नांवावर जावू नका, पाश्चात्य असला तरी हा वयाच्या सतराव्या वर्षापासून हिंदू आहे.) यांनी The Lost River: On The Trail of the Sarasvati हे पुस्तकही लिहिले. आर्य येथीलच हा सिद्धांत बळावला. यात अनेक सामील झाले. त्यात महत्वाचे नांव म्हणजे श्रीकांत तलागेरी. यांनी वैदिक आर्य (तेही फक्त भरत टोळीचे व त्यातीलही पुरु गटाचे) ऋग्वेदाचे निर्माते आहेत आणि ते कसे भारतातून (हरियानातून) क्रमाक्रमाने इराणमद्ध्ये गेले व तेथून पुढे युरोपात कसे आर्य भाषा व संस्कृती नेली याचे विवेचन सुरु केले. इराणी लोकही त्यांच्या दृष्टीने भारतीयच, अनू टोळीचे लोक असा त्यांचा दावा.
८. आता युरोपियन विद्वान कसे गप्प बसतील विशेषत: मायकेल विट्झेल या हार्वर्ड विद्यापीठाच्या भाषाविद असलेल्या प्राध्यापकाने तलागेरी यांच्या सिद्धांतावर हल्लाच चढवला. तलागेरीही मग काय गप्प बसतात? त्यांनी दुप्पट आवेशाने त्यांच्यावर हल्ला चढवला. विशाल आगरवाल, कल्याणरमन ई. भारतीय विद्वान त्यांच्या मदतीला आले. एवढेच नव्हे तर कझानास हेही मदतीला धावले. अर्थात कझानास यांचा सिद्धांत तलागेरींसारखा नाही. त्यांचे मत असे कि आर्य हे सनपुर्व दीड नाही तर सनपुर्व तीन हजार वर्षांपुर्वी आले, ऋग्वेद हा सिंधू काळापुर्वीचा आहे आणि एवढ्या आधी आर्य भारतात आल्याने ते भारतीयच! अर्थात हे हल्ले फेसबुकवरील भांडणांत जेवढी मर्यादा सोडली जाते त्यापेक्षाही खालच्या पातळीवरचे होते.
९. आता सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य ठरवायचे म्हटल्यावर ऋग्वेदाचा पुर्वी मान्य असलेला इसपू १५०० हा काळही मागे नेणे गरजेचे होते. रथ आणि घोडॆ तर आर्यांचे प्रिय. सिंधू संस्कतीत त्यांचे अवशेष दुर्मिळातिदुर्मीळ...जे अल्प आहेत तेही उत्तर-सिंधू काळातील. मग आयडियाची आयडिया अशी वापरली गेली कि मानवी प्रतिभा थक्क होईल.
१०. आधी एस. आर. राव व बी बी लालांसारखे अर्किओलोजिस्टस सिंधू संस्कृतीला घोडे माहित होते, आ-यांची रथचक्रे माहित होती असा दावा करत होते. आता नवे विद्वान (उदा. विशाल आगरवाल, कल्याणरमण ई.) उलटा दावा करत आहेत. त्यांचे म्हणणे असे कि ऋग्वेदात कोठेही आ-यांच्या चाकांचा उल्लेख नाही. ते रथ होते कि साध्या गाड्या होत्या हेही स्पष्ट नाही. विट्झेल यांनी शतपथ ब्राह्मणात "श्याम-अयस" हा शब्द आला असल्याने, व हा शब्द लोखंडाचा वाचक असल्याने ते इसपू ५०० मद्ध्ये तयार झाले असावे असा दावा केला होता. गंमत म्हणजे "श्याम-अयस" चा अर्थ लोखंड होतच नाही, शतपथ ब्राह्मण खूप आधी, म्हणजे लोहयुग येण्यापुर्वीच लिहिले गेले आहे असाही प्रतिदावा केला गेला.थोडक्यात ऋग्वेद हा सिंधु संस्कृतीपुर्व आहेअसे सिद्ध करायला कोलांटउड्या मारल्या गेल्या.
११. काही युरोपियन विद्वान मात्र या वादंगाकडे इकडे दुर्लक्ष करत उत्खनने आणि त्यातून समोर येणारे पुरावे पाहता आपली मते सुधारतही होते. यात एडविन ब्रायंट, केनोयेर, शाफर यांसारखे विद्वान अग्रणी म्हणता येतील. भारतात गेल्या सनपुव सात हजार वर्षांपासून शेती, गृहरचना, खाद्य पद्धती ई. मद्धे सातत्यपुर्ण प्रवाह दिसून येतो असे त्यांनी उत्खनित पुराव्यांवरून सिद्ध केले. त्यामुळे काही इंडो-युरोपियन विद्वानांची पंचाईत झाली असली तरी ते मोठ्या प्रमाणावर इंडो-युरोपियनांचे भारतात आगमन झाले नसले तरी "झिरपण्याच्या सिंद्धांता"प्रमाणे (ट्रिकल डाऊन थियरी) सातत्याने आगमन होत राहिले असले पाहिजे व त्यातूनच आर्य भाषा भारतात (उत्तरेत) पसरल्या असाव्यात अशी मांडणी चालुच ठेवली.
१२. भारतीय विद्वान उत्खनित पुरावे लक्षात घेत उलट आपली "भारतीय आर्य" थियरी रेटतच राहिले. अर्थात त्यांनी अनेक बाबींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. भारतात जसे कोणते नवीन लोकांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले नाही तसेच ते भारताबाहेर भारतातून झाल्याचेही पुरावे नाहीत. जगभर मनुष्य जवळपास दहा हजार वर्षांपुर्वीच स्थायिक झाला होता याचे अनगिनत पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यामुळे वैदिक लोक भारतातून अफगाणिस्तानच्या मार्गाने युरोपापर्यंत फोचले, ऋग्वेद हा हरप्पापुर्व आहे वगैरे दावे युरोपियन विद्वानांनी हास्यास्पद ठरवले.
१३. बरे, अवेस्ता आणि खुद्द ऋग्वेदातील भुगोल हा ब-यापैकी समान आहे हे तर उघडच आहे. भाषा, संस्कृती, धर्म, देवासूर संकल्पना यात कल्पनातीत साम्य तर आहेच पण दोन्ही धर्मांना आपापसातील व्यक्तीही माहित होत्या हेही स्पष्ट आहे. यामुळे तलागेरी असे म्हणतात कि भारतीय पुरु आर्य जेंव्हा विस्तारासाठी इराणमद्ध्ये आले त्यापुर्वीच भारतीय अनू टोळीचे लोक तेथे वसलेले होते. ऋग्वेद जेंव्हा निम्म्याहून अधिक रचला गेला होता तेंव्हा अवेस्ताची रचना सुरु झाली. म्हणजे ऋग्वेद हा अवेस्तापुर्वच आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाच्या मंडलांची कालानुक्रमणिका सर्वस्वी नव्याने बनवली आहे. यासाठी जिज्ञासुंनी त्यांची “Rigveda: A Historical Analysis” व “The Rigveda and The Avesta: The final Evidence” ही पुस्तके अवश्य वाचावित.
१४. तलागेरींचे विधान चुकीचे अशासाठी आहे कि भारतातून सनपुर्व सात हजार वर्षांपासून जसे नवे लोक आलेले नाहीत तसेच अन्य भागांत विस्थापित झाल्याचे त्या-त्या भागात (इराण-अफगाणिस्तान ई.) कसलेही भौतिक पुरावे नाहीत. व्यापारानिमित्त सिंधू संस्कृतीचे लोक अन्यत्र (मेसोपोटेमिया-इजिप्तपर्यंत) जात होते तसेच तिकडचेही व्यापारी इकडे येत होते. ब्यक्ट्रिया-मार्जियाना अर्किओलोजिकल कोम्प्लेक्स नांवाने ओळखल्या जाणा-या उत्तर-पुर्व इराण, उत्तर अफगाणिस्तान वगैरे भागातील उत्खननांत सापडलेली ही संस्कृती. हिचा काळ सनपुर्व २३०० ते सनपुर्व १७०० एवढा आहे. तिथे सिंधू लिपी असलेली पण त्या संस्कृतीची स्वतंत्र रचना असलेल्या मुद्रा जशा सापडल्यात तशाच सिंधू संस्कृतीच्याही सापडल्या आहेत. अर्थ एवढाच कि त्या दोन्ही संस्कृत्या व्यापारी (व सांस्कृतिकही) आदान-प्रदान होत होते. असे आदानप्रदान जगभरच्या सर्वच संस्कृत्यांत झाले आहे.भारतात वैदिक धर्म कसा आला याचे पुरावे शतपथ ब्राह्मणाने दिलेले आहेत. पण घग्गर म्हणजेच सरस्वती या आग्रहापोटी तिकडेही दुर्लक्ष केले जाते आहे.
असे असुनही युरो-सेंट्रिक आणि वैदिक-सेंट्रिक विद्वान काही केल्या आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. यात सर्वस्वी युरोपियनांची व म्हणून कदाचित वैदिक विद्वानांची सांस्कृतिक वर्चस्ववादी मानसिकता आहे हे उघड आहे. मुळात संस्कृती व भाषा यांच्या निर्मितीचे श्रेय हडपण्याचे व मानसिक अधिराज्य गाजवत बसण्याचे दिवस संपले आहेत हे यांच्या लक्षात येत नाही. . संस्कृती, भाषा या आपल्या जगभरच्या पुरातन पुर्वजांची सामुहिक उभारणी आहे ज्या पायावर आजचा समाज उभा आहे. संस्कृत्यांचे उत्थान-पतन-त्यातुनच नवीन संस्कृत्यांचा उदय ही परंपरा जगभर राहिली आहे याचे भान वर्चस्वतावादी लोकांनी ठेवायला पाहिजे.