Saturday, January 28, 2012

गीता हा धर्मग्रंथ नाही!

"भगवद्गीता" हा धर्मग्रंथ नसुन तत्वद्न्यानाचा संग्रह आहे हे उच्च न्यायालयाचे म्हनणे योग्य आहे. भग्वद्गीतेत किंचीत भर घालत वा घुसखोरी करत जरी सनातनी तत्वद्न्यान घुसवण्याचा प्रयत्न झाला असला तरी प्रत्यक्षात गीतेचा मुळ गाभा हा सनातनी तत्वद्न्यानाला आव्हान देणाराच आहे. पहिल्याच अध्यायातील अर्जुनाचे क्रुष्णाला प्रश्न आहेत ते ज्या कुळ/वंश/वर्णसंकर याबाबतचे आहेत आणि अर्जुनाचा (त्या रुपाने तत्कालीन समाजाचा) जोही काही संभ्रम होता त्याचे प्रतीक आहेत. पण क्रुष्ण दुस-याच अध्यायात त्याचे सर्वच प्रश्न उडवुन लावतो. "कुतत्स्वा कश्मलमिदं..." असा सरळ प्रश्न विचारत क्रुष्ण त्याला मुलभुत जीवन तत्वद्न्यानाचे सांख्यादि योगांतील पुरातन तत्वद्न्यानांचे हवाले देत हे भलते प्रश्न तुझ्या डोक्यातच मुळात का आले असे क्रुष्ण विचारतो.

गीता हा सांख्ययोग आणि औपनिषदिक तत्वद्न्यानावर आधारीत तत्वद्न्यानाचा सारसंग्रह आहे आणि प्रत्त्येक अद्द्यायाच्या शेवटी ते अधोरेखितही केले गेले आहे. लक्षात घ्यायची महत्वाची बाब म्हणजे येथे वैदिक तत्वद्न्यानाला कसलाही थारा नाही.एवढेच नव्हे तर विभुतियोगात क्रुष्ण आपल्या ज्या विभुती सांगतो त्यात तो आदित्यांतील विष्णु आहे. (आदित्य, वरुण, इंद्र, भ्रुगु इ. विभुती या ऋग्वेदात मुळच्या असूर मानल्या गेल्या आहेत.) रुद्रांमद्धे तो शंकर आहे तर महर्षिंमद्धे भ्रुगु आहे. हा विभुतीयोग अध्याय गीतेत उत्तरकाळात घुसवला गेला असला तरी गीतेच्या मुळ प्रेरणा काय होत्या याचा अंदाज या अध्यायावरुन येतो. यद्न्य वा ऋग्वेद याबाबत क्रुष्णाचे विचार विरोधी आहेत हे येथे नमुद केलेच पाहिजे.

तसा गीता हा ग्रंथ क्रुष्णाच्या नांवावर असला तरी ते वास्तव नाही. सध्याचे महाभारत हे इ.स. च्या चवथ्या शतकात सिद्ध झाले. मुळ व्यासप्रणित "जय" मद्धे नेमके काय होते हे कलायला आता तरी मार्ग नाही. मुळात ते फक्त १२ हजार श्लोकांचे होते. पुढे त्यात भर पडत गेली व जवळपास ९५-९६ हजार श्लोकांचे महाभारत बनले. गीता ही कधीतरी दुस-या-तिस-या शतकाच्या आसपास कोणी अनाम तत्वद्न्याने महाभारतात घुसवली असे स्पष्ट दिसते.

खरे तर गीतेत कोनतेही नवीन तत्वद्न्यान नाही. सांख्यादि योग आणि औपनैषदिक तत्वद्न्यानाचा तो एक प्रकारे सारसंग्रह आहे एवढेच. त्याला भारत युद्धाची पार्श्वभुमी देण्यात आल्याने या ग्रंथाला एक भावनिक स्वरुप मिळाले आहे हे मात्र खरे.

पण गीतेला धर्मग्रंथ म्हणता येत नाही. आणि तेच खरे तर योग्यही आहे. धर्मग्रंथांत आद्न्यात्मक कर्मकांडात्मक विचारांचे प्रचारण असते. तसे सुदैवाने गीतेत नाही. गीता प्रामुख्याने तत्वद्न्यानाचाच ग्रंथ आहे आणि त्यातच त्याचे महनीयता आहे. ज्यांना सर्वच भारतीय पुरातन तत्वद्न्यान अभ्यासता येणे शक्य नाही त्यांनी फक्त गीता वाचली तरी पुरेसे आहे.

भारत युद्धाच्या समयी गीता सागीतली गेली यावर आता कोणीही अभ्यासक विश्वास ठेवत नाही. गीता ही हिंसेचे समर्थन करते हा दावा काही विद्वान करतात, रशियात तर पार खटला झाला, हेही खरे नाही. म. गांधी गीतेचे समर्थक होते म्हणुन ते हिंसेचेही समर्थक होते असे एका इंग्लंडनिवासी भारतीय लोर्डने म्हतले हे तर त्याच्या अक्कलेचे दिवाळे आहे. जन्म आणि म्रुत्यु या नियत बाबी आहेत, तु युद्ध केले नाहीस म्हणुन अजरामर होनार आहेस आणि जे युद्ध करनार ते मात्र मरणार आहेत हा समजच तत्वद्न्यानाच्या पातळीवर कसा चुकीचा आहे हे काही ठिकानी गीता सांगते....हे हिंसेचे समर्थन नाही तर तत्वद्न्यानात सर्वकाळी चर्चीला गेलेला मुलभुत विषय आहे. गीतेतील पहिला आणि शेवटचा अध्याय तसेच विभुतियोग हा अध्याय मात्र सरळ सरळ भक्तीमार्ग फोफावु लागल्यानंतर झालेली घालघुसड आहे हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे गीतेकडे एक तात्विक प्रवास (जो उच्चतेकडुन अत्यंत स्थुल पातळीकडे येतो) म्हणून पहात त्याचा अभ्यास करने हेच श्रय:स्कर आहे. गीता हा धर्मग्रंथ कधीच नव्हता. तो भारतीय तत्वद्न्यानाचा एका विशिष्ट प्रसंगाच्या पार्श्वभुमीवर कल्पुन लिहिला गेलेला, कालौघात भर पडत गेलेला सारसंग्रह आहे हेच बरोबर आहे.




4 comments:

  1. गीतेत वेद प्रमाण न मानणाऱ्या हिंदू संप्रदायांचा ठळक उल्लेख नाही.

    ReplyDelete
  2. संजयजी, जिथे कर्मकांड असते तेच धार्मिक ग्रंथ आहे असे म्हणणे पटत नाही. तसे पाहिले तर कुराण मध्ये सुद्धा तत्वद्न्यानच आहे सुरा ९ -सुरा अल तौबाह तर सरळ सरळ मुसलमानांनी काय करू नये व नास्तिकां वर कसा व्य्वहार करावा ह्यावर भर दिला आहे.किंबहुना तो एका राजाने द्यावा असा आदेश आहे. ह्या धर्मामध्ये कुठे कर्मकांड आले? तरीही हे पुस्तक त्यांचे धर्मग्रंथच आहे.तसेच गीतेचे आहे.

    ReplyDelete
  3. @ satya,
    इस्लाम धर्म हा राजकीय स्वरूपाचा किंवा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय मार्गाचा अवलंब करणारा धर्म आहे! त्याची स्थापना होतानाच्या सामाजिक व राजकीय स्थितीचा अभ्यास केल्यावर हि गोष्ट सहज लक्षात येते. कुराण हे इस्लामी राज्याची म्हणजेच ईश्वरी राज्याची स्थापना करते धर्माची नव्हे!! खालीपा हा त्याचा प्रमुख असतो. एकीकडे तो राज्यप्रमुख असतो तर दुसरीकडे तो धर्मप्रमुख हि असतो- इस्लामचे धर्म हे स्वरूप हि समाजाच्या एकतेसाठी आणि राज्याच्या अखंडतेसाठी केलेली सोय आहे. कुराणात असे राज्य चालवण्याचे नियम घालून दिले आहेत! म्हणून कुरण एकीकडे धर्मग्रंथ ठरतो त्याचवेळी तो एक राज्याघटनाहि ठरतो! सर्वात महत्वाचे इस्लाम हा कर्मकांड ना मानणारा धर्म आहे! त्यामुळे त्याच्या धर्म ग्रंथात कर्मकांडे येणे शक्य नाही, "जिथे कर्मकांड असते तेच धार्मिक ग्रंथ आहे" हि व्याख्या भारतात उत्पन्न झालेल्या आणि इतर धर्माबद्दल लागू होते इस्लामबद्दल नाही!

    ReplyDelete
  4. हे लेखन म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे सुरुवातीला म्हणायचे अर्जुनाचे जे सनातन धर्मानुसार समज गैरसमज होते ते सगळे श्रीकृष्णांनी खोडुन अवैदिक मते मांडली आणी पुन्हा म्हणायचे पहिलाच अध्याय घुसडलेला आहे लेखन करताना आधी आपल्याला काय लिहायचे आहे ते निश्चित करायला हवे एकाच लेखात परस्परविरोधी मते मांडणे हे हास्यास्पद आहे पहिलीचे पोर सुद्धा यापेक्षा उत्तम निबंध लिहु शकते

    ReplyDelete

Classical Language Status: Marathi

  Why the Marathi language should get Classical Language Status?   The Marathi language has been spoken in Maharashtra and adjoining reg...