हिंदु धर्माची व्याख्या
हिंदु धर्मातील वास्तवे लक्षात घेवु मी हिंदु धर्माची खालीलप्रमाने व्याख्या केली आहे. ती हिंदु धर्माचे खरे रुप विषद करायला आणि हा धर्म जागतीक पातळीवर पुढे न्यायला मदत करेल असा मला विश्वास आहे.
"जो मनुष्य मानसीक पातळीवर आत्म्याचे अस्तित्व आणि त्याचे अजरमरत्व मानत मोक्षाच्या अंतिम उद्देश्यावर विश्वास ठेवतो तो...
"जो मनुष्य प्रतीक पुजा (मुर्तीपुजा-मानसपुजा) याद्वारे कर्मकांडे करत ईश्वराच्या सदय क्रुतीशील वा निरपेक्ष अस्तित्वावर विश्वास ठेवतो तो...
"जो मनुष्यप्राणी व अन्य सजीव-निर्जीव स्रुष्टीच्या मुळच्या एकाकारतेत विश्वास ठेवत सारे काही ईश्वर आहे (सर्व खल्विदं ब्रह्मास्मि) अशी भावना बाळगतो तो...
"जो ऋग्वेदादि वेदांची महत्ता वा त्याचे यद्न्यादि धार्मिक कर्मकांड मानत नाही तो...
"जो तत्वद्न्यानाच्या सर्वोच्च पातळीवर अद्वैत सिद्धांत मानतो आणि जाती-वंशभेद मानत नाही तो...
"जो कोणतेही दैवत भजण्यास वा न भजण्यास मुक्त आहे, कोणताही आध्यात्मिक आणि तात्वीक पंथ स्वीकारण्यास मुक्त असुन संपुर्ण स्त्री-पुरुषभेदातीत वैचारिक व सामाजिक स्वातंत्र्याची महत्ता मान्य करतो तो...
असा जोही कोणी असेल तो हिंदु होय"
ही खरी हिंदु धर्माची व्याख्या असुन ती देश-प्रांत-वंश भेदातीत आहे. हिंदु समाजाचे खरे वास्तवही, आज कलुषित झाले असले तरी पुरातन काळापासुन हेच आहे. वैदिक कलमे ही फार नंतर झाली आहेत, प्रत्यक्षात वैदिक धर्म हा पुरेपुर स्वतंत्र धर्म आहे. त्याचे पालन ज्यांना हवेसे वाटते त्यांनी ते खुशाल करावे, पण ते हिंदु नाहीत. सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेला हा हिंदु (सिंधु) धर्म हेच हिंदु धर्माचे वास्तव आहे आणि त्याचे अगणित पुरावे आजही उपलब्ध आहेत. या हिंदु धर्माचे तत्वद्न्यान पुरेपुर स्वतंत्र असुन त्यावर वेदांचा मुळात कसलाही प्रभाव नाही. पुढील प्रकरणांत यावर मी उहापोह करणारच आहे. वैदिक तत्वद्न्यान आणि हिंदु तत्वद्न्यानात जमीन आस्मानाचा फरक आहे एवढेच मी येथे नोंदवुन ठेवतो.

ग्रेट सर,
ReplyDeleteप्रथमच हिंदू आणि वैदिकां मधला फरक जगाला कळणार याचा आनंद होतो आहे. आज पर्यंत वैदिक व हिंदू एकच आहेत असा साधारण समज आहे. त्या सर्व पुरातन समजूतीना खिंडार पाडण्याचे काम हाती घेतल्या बद्दल तुमचं अभिनंदन.
माझ्या माहितीप्रमाणे हिंदू धर्माचे उद्दिष्ट व्यक्तीच्या सुखात भर घालणे आणि दुःखाचा निरास करणे हे आहे. सुखदुःखाच्या कल्पना व्यक्तीनुसार बदलत असल्याने हिंदू धर्माने विशिष्ट तत्वज्ञान विकसित केलेले नाही. हिंदू धर्मात वेद प्रमाण मानणाऱ्यांबरोबर चार्वाक, जैन, बौद्ध या वेद नाकारणाऱ्यानाही स्थान आहे.
ReplyDeleteआपली शेवटची व्याख्या चांगली असली तरी तिला किती लोक उतरतील याची शंकाच वाटते!
ReplyDeleteBaghuyat vedabhimani(je aaj swatahala kattar hindu mhanavitat) te tumchi gosht kiti seriously ghetat te..! :-D
ReplyDeleteसंजय जी,आर्य समाजी लोक केवळ वेदांना थारा देतात.राजर्षी शाहू महाराज ही आर्य समाजाला मानत. मग आपण असा अर्थ काढायचा का ते हिंदू न्हवते?
ReplyDeleteअसे अनेक लोक आहेत जे दोन्ही गोष्टी मानतात. माझे काही ब्राहमण मित्र आहेत. ते स्वत:ला ऋग्वेदी, यजुर्वेदी वगैरे म्हणतात, पण मूर्तीपूजेशी निगडित कर्मकांड ही करतात. मग ह्यांना हिंदू म्हणावे की नाही?
@Satya..अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारला आहे याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद. शिवाजी महाराज ते शाहु महाराज (दुसरे) यांना मुळात वेदांत काय आहे हे ठाउक नव्हते पण त्याचा निर्माण केला गेलेला प्रभाव होता, त्यामुळेच त्यांनी वैदिक राज्याभिषेक/धर्मक्रुत्यांचा आग्रह धरला. त्याबद्दल दोष धर्मसत्तेकडे जातो. वेदांना मुर्तीपुजा, आत्मा, मोक्ष, संन्यास अशा संकल्पनाच मुळात मान्य नाहीत. त्यामुळे वेद ज्यांना मान्य आहेत ते हिंदु ठरुच शकत नाहीत कारण धर्मकल्पनाच वेगळ्या आहेत. कुराणही मान्य आणि बायबलही मान्य असे जसे असु शकत नाही तसेच हे आहे. येथे मी वैदिक धर्म चुकीचा कि बरोबर हे म्हनत नाही. पण स्वत: वैदिक रहायचे आणि वेदांना मुळात जे मान्यच नाही तेही (मुर्तीपुजादी) करायचे याला माझा सख्त विरोध आहे. खुप ब्राह्मणांनी मुळत वेद वाचलेलेच नसतात. इतरांना बंदीच होती त्याचे कारण याच विवेचनात आहे. वेद मान्य केले तर शिव/विष्णु ते जगदंबा/लक्ष्मी या देवता नाकाराव्या लागतात. कारण वेदांत या देवतांना स्थानच नाही. एवढेच काय, इंद्र, वरुण, मित्रादी असंख्य वैदिक देवतांना खुद्द ब्राह्मण समाजही पुजत नाही, त्यांची भारतात मंदिरेही नाहीत.
ReplyDeleteएवतेव, वेद मानणारा हिंदु असुच शकत नाही.
संजयजी, तुमचे म्हणणे शिवाजी महाराज ते शाहू महाराजांना वेदात काय आहे हे माहित न्हवते हे पटते.पण वैदिकांना हिंदू धर्मापासुन पूर्णपणे वेगळे करणे मनाला पटत नाही.आज काल कोण त्या धार्मिक पुस्तकांना मानतात हो? हिंदू धर्म हा एकेमेव धर्म आहे जेथे पंथांची सोय आहे.तुम्ही कॊणत्याही पंथाचे असू शकतात.त्यात तुम्ही वैद्क हा सुद्ध उपासनेचा एक पंथ आहे असे म्हणू शकतात.ईश्वर हा वेदांप्रमाणे निराकार निर्गुण आहे.पण तो काही वैदिकांनी साकार रूपात मानला तर ते काही हिंदू धर्मापासुन वेगळे होत नाहित. शिवाय, तुम्ही ज्या हिंदू देवतां बद्दल बोलत आहात शंकर, विष्णू इत्यादि त्यात ही एक गोष्ट लक्षात घेण्यात जोगी आहे की ह्यांच्या कथेत देखिल इंद्र , वरूण आदिंचा उल्लेख येतो. हे इंद्र वगैरे तर वैदिक देव न? ह्यांचा उल्लेख तुम्हाला इस्लाम, पारशी लोकांच्या धर्मात दिसतो का?ते सुद्धा निराकारवादी आहेत. मग ह्यावर काय विवेचन करावे? इंद्राचा उल्लेख हा जैन पंथात हमखास येतो.जैनांना तर निरीश्वर्वादी सहसा म्हणतात.असे का?माझा असा तर्क आहे की जरी हे सगळे एक वेग वेगळे विचार म्हणुन सुरू झाले असतिल तरी शेवट हा सर्व धर्मियांनी एकमेकाचे तत्वद्न्यान काही अंशी स्वीकार केले आणि सद्य हिंदू धर्माला जन्म दिला.त्यात परत फ़ूट पाडणे हे सामाजिक द्दृष्ट्या योग्य नाही.अधिच आपण भारतात स्वत:ला भारतीय म्हणण्या पेक्षा धर्म अथवा जातींना प्राधान्य देतो.उरल्या सुरल्या हिंदू धर्मातल्या एकीला ही आपण केवळ उपासनेच्या फ़रका मुळे भेद करू लागलो तर हिंदू हा शब्द इतिहास जमा व्हायचा.एक अभंगाच्या विठ्ठला बाबत ओळी आठवतात "निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर".हे फ़क्त एकच दाखवते की सर्व सामान्य समाजाने एकेमेकांच्या विचारांचा आदर केला आहे आणि इतिहासकालात असे धर्म शास्त्रात लिहिले आहे असे म्हणुन आपणच आपल्याच धर्मात संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.भारतीय जनता अजुन एवढी समजदार नाही की ह्या गोष्टींंना एक अभ्यास म्हणुन घेईल.विभाजन हे आपल्यासाठी किती धोकादायक आहे हे इतिहासाने दाखवलेच आहे.
ReplyDeleteधन्यवाद.....!!!
सर, विचार करायला लावणारा लेख आहे. पण सत्याजी यांनी जे तथ्य मांडले आहे ते ही विचार करण्या सारखे आहे. इंद्र, वरुण हे वैदिक देव आहेत पण नंतर ते जनमानसात मिसळल्या गेले. मग त्यांना हिंदू धर्मापासुन वेगळे कोणत्या तत्वावर करावे?
ReplyDelete