Saturday, November 26, 2011

कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?

गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे."

खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?

मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.

त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे.
ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.

त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?

भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.

पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.

म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.
श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.


15 comments:

  1. copied from misalpav.com :
    आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून...........

    कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी.

    महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत.
    माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार...

    उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे. महाराज दिवाळी साजरी करीत असताना ही त्यांच्या आसनाखाली टोपली भरून फटाके ठेवते, म्हणजे इतर कोणी फटाके लावले की त्या टोपलीचा मोठा स्फोट होईल....आणि फटाक्याच्या दारूची लाईन तिथपासून समोर लावल्या जाणार्‍या अनार पर्यंत असते (म्हणजे एखाद्या सिनेमात पेट्रोल काडी टाकून पेटवतात आनि त्याची लाईन जळत जाऊन पुढची गाडी वा घर जळते ...तसे टेक्निक !). हा खानही तिथे पाहुणा म्हणून आलेला असतो. मग एकदा राजे, तर एकदा खान त्या आसनवर बसतात .. नेमके स्फोटाच्या वेळी कोण बसलेले असणार्...हा टिपिकल क्लायमॅक्स्...शेवटी खान बसलेला असताना ती दारू पेटत जाते...आणि तीच बाई घागरभर पाणी ओतून पुढचा अनर्थ टाळते. (आणि महाराजांची शाबासकी मिळवते)
    (२) हीच बाई सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरेंमधे अनेक गैरसमज - भांडणेही लावत असते (सास बहू स्टाईल)
    (३) जिजाबाईंची व्यक्तिरेखासुद्धा सास बहू स्टाईल आहे. त्या आपल्या सुनांना "करम जली" वगैरे म्हणताना दाखवल्या आहेत.
    (४) शिवाजी अजून "बाल शिवाजी" आहे ... पण जिजाऊ एकदम वयस्कर आहेत...

    मी आजपर्यंत दोनच भाग पाहिले. एका क्षणाचाही आपण सर्वांना माहीत असलेल्या शिवचरित्राशी ताळमेळ लागत नाही. अत्यंत "डिस्टॉर्टेड" असे सारे काही दाखवले आहे.....पुढचा भाग पहायची इच्छा आणि धाडसही झाले नाही.

    अशा मालिकांना मान्यता कशी काय मिळू शकते ? आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल काय ?


    वाजी आणि सोयराबै यान्ची भेटही अशीच फिल्मी पद्धतीने दाखविण्यात आलेली आहे.... एका कुठ्ल्याश्या "मेल्या"त की बाजारात सोयरा आपल्या मयतरीनीबरोबर हिन्डत असताना एका जोतिषाला हात दाखवून भविष्य विचारते.. तेव्हा तो एक ज्योतिषी तिला सान्गतो, की" तुझं लग्न राजघराण्यातच्च होणार आहे.. आणि तुला पुढे "महाराणी" वगैरे बनण्याचे चान्सेस आहेत.." इ. इ. ते भविष्य ऐकून झाल्यावर सोयरा त्या (भटुरड्या ) ज्योतिषाला पैसे / दक्षिणा/ मुद्रा न देताच तिच्या मयतरेनीबरोबर पळ्ळ काढते... आणि तिच्या मागे तो जोतिषी "मेरी दक्षिणा... मेरी दक्षिणा.." करत येतो...

    इकडे शिवाजी आणि त्यान्चे सहकारी शत्रूला चुकवत असताना बाजारात वाट शोधत असतात.. आणि शिवाजी - सोयरा एकमेकांना येऊन धडकतात...आणि धडकल्याबद्दल एकमेकान्ना थोडेफार "कर्सिन्ग" करतात... ("नीट चालता येत नाही का" वैग्रे) Smile आणि मग काही एपिसोडनन्तर त्यान्चे एकमेकान्बरोबर लग्न ठरत असताना.. दोघान्चेही एक्स्प्रेशन वेगवेगळे असतात...

    he lok apalech ahet ... yanche kay karnar?

    अजूनपर्यंत दादोजी नाही दाखवले गुरु म्हणून तुम्हाला काही हरकत नाही असे दिसते , कि हाच खरा इतिहास ? आहे काही उत्तर ?

    ReplyDelete
  2. Sanjay sir,we proud of you...tya french bandgulala tumchi dakhal ghyavi lagli,hehi kami nahi.

    ReplyDelete
  3. छत्रपती शिवाजी महाराज हे गवळी-धनगर समाजातील होते. हे १३ वर्ष संशोधन करून डॉ.रामचंद्र ढेरेणी हा निष्कर्ष काडला होता, बर मोलोजी म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांच्या समकालीन
    जयराम पिंडे या संस्कृत कवी ने पण राजा बळीप आणि मोलोजी भोसले हे गवळी -धनगर कुळातील होते असे लिहून ठेवले आहे. आता अपहरण कोणी आणि कसे केले आहे ते तुमच्या सारख्या लेखकाला काय सांगणार

    ReplyDelete
  4. पण हा मुद्दा ऐरणी वर आणल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  5. स्वत:चे खुजेपण झाकण्यासाठी महापुरुषांच्या सावल्यांवर हक्क सांगण्याचा या मातीचा गुणधर्म काही औरच आहे! राजे पुन्हा जन्माला येत नाहीत हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. कारण आज जर ते जन्माला आले तर कोणत्यातरी जातीचा शिक्का कपाळावर मारल्याशिवाय त्यांना जगताच येणार नाही. गेली साडे तीनशे वर्षं याच पद्धतीने त्यांची वारंवार हत्या करण्यात आली आहे. आता आपण सर्वांनीच एक काम करूया. रायगडावरील महाराजांचा पुतळा उखडून त्याचे तुकडे करून सर्व जातींमध्ये वाटून टाकूया. म्हणजे वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्याप्रमाणे कोणती जात महाराजांच्या कोणत्या अवयवातून पडली ते ठरवणे सोपे जाईल आणि एक नवीन चातुर्वर्ण्य निर्माण केल्याचे श्रेय महाराजांना मिळेल! म्हणजेच पर्यायाने स्वत:चे अहंकार जपण्यासाठी आणि इतरांचे अहंकार दुखावण्यासाठी आणखी एक शस्त्र आपल्या सर्वांच्याच हातात मिळेल.

    ReplyDelete
  6. jidnyasu सर मी आपल्याशी सहमत आहे पण आपल्या पुर्वाजान्विशी आपण हक्क नासंगणे पण थोडे चुकेचे आहे असे मला वाटते -

    मेश्पालक- धनगर साम्राज्य - मौर्य, विजयनगर,होळकर,पालव

    अहिर (गवळी)- धनगर साम्राज्य - होयसळ, राष्ट्रकुट, वाटाकट,सातवाहन,यादव,कदंब,भोज.

    अर्थात मी मराठा, धनगर आणि कुणबी एकच आहेत, अगदी DNA इतिहास पण हेच सांगतो पण मी विषयाला बगल न देता सांगतो कि

    याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पण गवळी-धनगराच्या होयसळ कुला तील होते हे आता संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

    आणि आपण वर्ण उल्लेख वरील ओळीं मध्ये केला आहे गम्मत म्हणजे पशुपालकांना वर्ण कोणता हि लागू होत नाही आणि झालाच तर क्षत्रिय वर्ण आहे हे मी पडताळून पहिले आहे.

    खुद्द पशुपालक -ब्राह्मण समाज हा समाज कांस्य युगामध्ये भारतीय उपखंडामध्ये दाखल झाला असून तो शिक्षित पशुपालक समाज होता असे ऋग्वेद मध्ये म्हटले आहे. त्यामुळे पशुपालाला वर्ण लागू होत नाही. हे त्याचे प्रमुख कारण असावे

    पण jidnyasu -आपण फोन वरून संपर्क करूया मी आपल्या आपल्याशी अर्थपूर्ण चर्चा करायला उत्सुक आहे साहेब .

    ReplyDelete
  7. माझ्या प्रतिक्रियेचा रोख वैयक्तिक आपल्याला उद्देशून नव्हता हे प्रथम स्पष्ट करतो. गेली साडे तीनशे वर्षं अनेक जाती महाराजांना आपल्या कळपात खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे कर्तृत्वच इतके मोठे आहे की कोणीही त्यात यशस्वी होऊ शकले नाही. गम्मत म्हणजे "राजे पुन्हा जन्माला या" असे बऱ्याच ठिकाणी लिहिलेले आढळते. पण या महाराष्ट्राच्या मातीत नवीन शिवाजी घडवण्याची ताकद आहे हा विश्वास मात्र कोणातच दिसत नाही. हा विश्वास जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हे असे प्रयत्न चालूच राहणार.
    आश्चर्य म्हणजे विशाळगडावर महाराजांची वाट अडवून उभे असलेले सुर्वे, शहाजी महाराजांना विश्वासघाताने कैद करणारे बाजी घोरपडे, शनिवारवाड्यावरचा भगवा उतरवून Union Jack लावणारे बाळाजीपंत नातू यांच्याबद्दल हीच चर्चा होत नाही. ह्या सर्वांना आपल्या कळपात घ्यायला कोणी फारसे उत्सुक नसतात. दुसरीकडे पाच सातशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैन्याचा पराभव केला या गोष्टीला म्हणावे तसे महत्व दिले जात नाही. फडके आणि चाफेकरांवर चित्रपट निघतात पण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर एक माहितीपट देखील निघत नाही.
    जगात सगळीकडे इतिहासाचा उपयोग भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी केला जातो. परंतु या देशात इतिहासाचा उपयोग उपेक्षा करणे आणि अनुल्लेखाने मारणे यासाठी केला जातो.मुख्य म्हणजे हे असे वागण्यात आपले काहीतरी चुकते आहे याची जाणीवच आपल्याला नाही. वर्णांचा आणि जातींचा इतिहास शोधण्यापेक्षा कर्तृत्वाचा इतिहास शोधणे जास्त महत्वाचे आहे हे ज्यावेळी आपल्याला पटेल त्या वेळी कोणाची जात आणि वर्ण शोधण्याची गरजच राहणार नाही आणि गोतीयेसारख्या एजंटला भारतात येण्याची संधीच मिळणार नाही.

    ReplyDelete
  8. I am agreed with the fact that the Real Bahujan History was still hidden. I am not at all in field of History and Literature. But I am not denying that it is much more interesting then our Science & Management.

    ReplyDelete
  9. सर्व होयसाळ राजे हे अतिशय धर्माधिष्ठित हिंदू होते हे कसे काय सगळे विसरताय ???

    ReplyDelete
  10. मी पूर्ण पणे सहमत आहे श्री-उदय कागलकर साहेबांबरोबर होयसळ हे कट्टर वेदिक / हिंदू होते
    . मी काही इतिहास कुरूब-धनगर समाजाच्या विजयनगर साम्राज्याचा वाचत असताना मला असे कळले कि विजयनगर साम्राज्याचा उदय झाला तेह्वा होयसाळा साम्राज्य हे क्षीण झाले होते. अर्थात ते विजयनगर साम्राज्यामुळे नाही तर होयसळ साम्राज्यावर मुस्लीम आक्रमण झाले होते. आणि होयसळ राजांची निर्घुण, अमानवी हत्या केल्या होत्या असा मला काही संधर्ब सापडला आहे. अर्थात ते वेदिक / हिंदू असल्या कारणामुळे हे झाले असावे हि शक्यता नाकारता येत नाही.

    ReplyDelete
  11. विठ्ठल खोत साहेब ,
    होयसाळ राजे हे अत्यंत धर्माधिष्ठित हिंदू होते यात काहीही संशय नाही .
    होयसाळ राजे यांची राजधानी हलेबीडू (कर्नाटक जिल्हा हासन ) ही होती . राजधानीमधील शिवशंकराचे मंदीर हे अतिशय दैदिप्यमान व स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे .
    मल्लिकाफ़र या धर्मांध मुस्लीम सरदाराने होयसाळ साम्राज्यावर हल्ला करुन जोरदार कत्तल केली , राजधानी लुटली , शिवशंकराचे मंदीर फ़ोडले .
    त्यातूनच होयसाळ साम्राज्याचा क्षय सुरु झाला.
    जवळच बेल्लूर नावाच्या शहरात होयसाळ साम्राज्याचे दुसरे अतिसुंदर मंदिर आहे . ते मंदीर शिवविष्णूचे असून . हलेबिडू येथील मंदीरा इतकेच सुंदर आहे .
    हलेबिडूच्या मंदीरातील बाहेरील शिल्पकला अतिशय देखणी आहे तर बेल्लूर मंदीरातील आतली शिल्पकला देखणी आहे .

    बेल्लूर मंदीरात होयसाळ राणी शांतला देवी नृत्य अराधनेत मग्न असे अशाही अख्यायिका आहेत .

    विजयनगर साम्राज्याचे संस्थापक होयसाळ राजेच आहे होयसाळ राज वीरबल्लाळ तिसरा याचेच सरदार हरिहर राय व बुक्क राय यांनी वीर बल्लाळ याच्याच नेतृत्वाखाली दक्षिणेतील सर्व हिंदू राजांची मुस्लिमांविरुद्ध एकजूट सुरु केली.

    वीर बल्लाळ राजा तिसरा याचा खिल्जींनी पराभव केला . नंतर विजयनगर साम्राज्य उदयाला आल्यावर होयसाळ साम्राज्य हे विजयनगर साम्राज्याला जोडण्यात आले .

    ReplyDelete
  12. कोण हा संजय सोनावनी? महाराजांना आम्ही कोणत्या रुपात पाहावे वा पाहू नये हे सांगणार्या ह्या पुस्तके लिहून पोटाची खळगी भरणाऱ्या अति सामान्य माणसाची लायकी काय? गोतीये यांनी ५० कोटी उभे केले आणी शिवश्रुष्टी उभारली. या स्वयंघोषित बुद्धीजीवी माणसाने त्याच्या मताप्रमाणे तसे काही करून दाखवावे, आम्ही अवश्य भेट देऊ...उठसूट नुसती टीका करणाऱ्या माणसा साठी आमच्या अस्सल सातारी भाषेत एक म्हण आहे...कुत्रं भूकं बोचा दुखं!!!

    ReplyDelete
  13. Dhairyasheel, you are "perfectly right", LOL!

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...