Saturday, April 25, 2020

No ‘ideological synergy’ between Ambedkar and RSS: Hari Narke



No ‘ideological synergy’ between Ambedkar and RSS, Rajiv Tuli can read my book for facts
There is no evidence to support the claims that Ambedkar visited an RSS workshop or that Thengadi was Ambedkar’s election agent in 1954 Bhandara bypoll.

HARI NARKE 

25 April, 2020 11:42 am IST


Rajiv Tuli has made imaginary, baseless and fabricated claims.


Tuli, in his article, echoes Arun Anand by reiterating that Dr Ambedkar appointed Dattopant Thengadi as the secretary of the Scheduled Castes Federartion. He also claims that Thengadi, allegedly Ambedkar’s most trusted person, was also appointed as an election agent in the1954 Bhandara Lok Sabha bypoll in Maharashtra. But Tuli has not provided any authentic evidence to support this claim. He must know that a polling representative is not appointed orally; a letter is submitted to the election officials in this regard.


Tuli should submit any written document in connection with the appointment of Thengadi by Ambedkar, instead of building castles in the air.


Far from Tuli’s claim, Ambedkar had appointed P. N. Rajbhoj, General Secretary of All India Scheduled Castes Federation, and Babu Haridas Avle, Secretary of Scheduled Castes Federation of Madhya Pradesh as the chief election agents The evidence of this can be found in my book, Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, DBAWS, Vol.18, Part 3.

As per the constitution of Scheduled Castes Federation, appointment of non-SC person as a member or office bearer was illegal and unconstitutional. In the same fashion, induction of a person in Scheduled Castes Federation who happens to be a member of any other party or organisation was “unconstitutional”. (DBAWS, Vol. 17, Part Two, pp. 459).


Thengadi was a non-SC and a Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) man and a Bharatiya Jana Sangh office bearer of Madhya Pradesh. Therefore, his appointment as the secretary of SCF was highly impossible.


Moreover, election was at Bhandara and Thengadi did not belong to that constituency. He was from Arvi district, Wardha. Logically speaking, there was no point in appointing an incongruous person like Thengadi as the election agent at Bhandara.


Claims without evidence


Bhandara by-election happened between 2 to 5 May 1954 (Dr. Dhananjay Keer, Dr. Babasaheb Ambedkar, Biography, first edition 1966, 9th Edi. 2014, Mumbai, pp.630).


The Scheduled Castes Federation activities during this election — campaign, meetings, rallies, speeches etc. —were comprehensively and frequently reported in Janata by Ambedkar in April and May 1954. All the leaders who participated and addressed the rallies have been listed in the Janata reports.


If Thengadi was a trusted associate of Ambedkar, then how come he was absent from all the meetings and rallies of the Scheduled Castes Federation? Thengadi finds no mention, either as the speaker or as the guest of honour, in the election coverage done in Janata by Ambedkar.


Communist Party of India (CPI) and many others had supported Ambedkar in Bhandara by-election. A. B. Bardhan of the CPI participated in the campaign rallies of SCF (DBAWS, Vol. 18, Part Three,pp.374). Does Tuli want to suggest that the CPI and the Jana Sangh were in coalition in this election?


Tuli indicates a one-year interval between Ambedkar’s statement about the RSS and the 1952 elections and states that anything was possible in politics during the span of one year.


But, the fact was that the manifesto of Scheduled Castes Federation pertaining to the rejection of the possibility of an alliance with the Hindu Mahasabha and the RSS was for the Lok Sabha elections, which took place on 4 January 1952.


It was not decided one year earlier as Tuli puts, but in October 1951 only. It is quite natural that the manifesto for the election to be held on 4 January 1952 would be drafted at least three months before, i.e. in October 1951.


But, Tuli counts this three-month duration as one whole year. Perhaps, he does not know the facts or doesn’t want to accept them. Either way, he should refer to my book on Ambedkar’s writings and speeches. (DBAWS, Vol. 17, Part One, dated 3 Oct. 1951, pp. 402).


Ambedkar called RSS ‘poisonous’

Tuli further says, “His views on Partition and radicalism in Islam also reflect clear ideological synergy between the two.” He, very enthusiastically refers, for this cunning inference, Dr. Ambedkar’s Pakistan or Partition of India. But he conveniently forgets Ambedkar’s scathing remarks on the RSS in the same book. As a matter of fact, there was not an iota of ideological resemblance between Ambedkar and the RSS.


In fact, Golwalkar Guruji’s Bunch of Thoughts is the Bible for the RSS. Guruji believes in Chaturvarna syatem. He prefers protection and promotion of Sanatan Sanskriti and construction of a Hindu Rashtra. Dr. Ambedkar says, “If Hindu Raj does become a fact, it will, no doubt, be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality, and fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.” (Pakistan or The Partition of India, 1946, pp. 358. DBAWS, Vol. 8, 1990, 358)


On 07 September 1949, Golwalkar Guruji met Law Minister Ambedkar in Delhi. He sought Ambedkar’s help to curb Marathas. Ambedkar said at that time, “RSS is a poisonous tree. RSS is dreaming of Peshwa rule. It is not possible to be with you. I can’t support you.”


A detailed report of this visit has been published in Ambedkar’s Janata on 10 September 1949. Moreover, Sohanlal Shastri, chief of Delhi Bauddh Mahasabha — founded by Ambedkar — and a well-known scholar, was present at the moment. He has elaborated this meeting in his book- Babasahab Dr. Ambedkar ke Sampark mein 25 warsha, Bhartiya Bauddha Mahasabha, Delhi Pradesh, (New Delhi, pp. 54-55).


During the same period, RSS was obstructing the constitution being written by Ambedkar. RSS was against the Hindu Code Bill. and its members had broken into the auditorium gallery to drive away the constitution assembly; the incident is reported in the parliamentary records. (Contitutional Assembly Debates, Govt. of India Publication, New Delhi, Vol. 7 p. 1233, Dated, 4 January 1949).


Documentary sources are counted as more authentic than the oral narratives. And moreover, Thengadi and Observer belong to RSS, hence there is no authenticity and validity of their claims.


Thengadi wrote the book several years after Ambedkar’s demise. Thengadi, Arun Anand or Tuli have not given any evidence from Ambedkar’s time.


Even Ambedkar’s visit to the RSS workshop is imaginary. No evidences, such as photos, correspondence or the news published in contemporary papers have been provided by the RSS.


Has RSS abandoned ‘Ramrajya’?

Ambedkar burned Manusmriti, renounced Hindu religion, refuted Hinduism and embraced Buddhism. While embracing Buddhism he took 22 pledges, of which, eight are:-

1. I shall have no faith in Brahma, Vishnu, Mahesh nor shall I worship them.
2. I shall have no faith in Ram and Krishna nor shall I worship them.
3. I shall have no faith in Gauri, Ganapati and other Gods and Goddesses of Hindu religion nor shall I worship them.
4. I do not believe in the theory of incarnation of Gods.
5. I do not and shall not believe that the Lord Buddha was the incarnation of Vishnu. I believe this to be, mischievous and false propaganda.
6. I shall not perform “shraaddha” nor shall I give “pind dan”.
7. I shall not perform any ceremony through Brahmins.
8. I hereby embrace Buddhism by renouncing my old Hindu religion, which is detrimental to the prosperity of the humankind and discriminate human beings and treat them low. (DBAWS, vol.17, part Three, pp.531).


If so, then, whether RSS has abandoned the idea of Ramrajya is an interesting question. Does RSS advocate Ambedkar’s books — Riddles in Hinduism, Riddles of Ram and Krishna and Revolution and Counter Revolution? RSS wants merging (samarasata), while Ambedkar wants Annihilation of Caste, which is his basic ideological position.


In a nutshell, even if viewed microscopically, there is no resemblance between Ambedkar and the ideologies of the RSS. They are shrewdly attempting to hijack Ambedkar who has been globally accepted and recognised as the most crucial philosopher leader of the oppressed, while the image of RSS is that of a fascist.


The author is the Editor of Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 17 to 22, published by the Government of Maharashtra.

Views are personal.

https://theprint.in/opinion/no-ideological-synergy-between-ambedkar-and-rss-rajiv-tuli-can-read-my-book-for-facts/408612/


Friday, April 24, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!"- @ प्रा.हरी नरके




संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी श्री. राजीव तुली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संघाच्या जवळकीचे दि प्रिंटमध्ये २३ एप्रिल २०२० रोजी केलेले सर्व दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आर.एस.एस. हा तर विषवृक्ष आहे! ते पुढे असेही म्हणतात की, हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे! काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे. ते संघाला जवळ करणेच शक्य नाही.

ठेंगडींची नियुक्ती ह्या निव्वळ हवेतल्या बाता-
१. तुलींनी दावा केला आहे की संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून डॉ. आंबेडकरांनी नियुक्ती केली होती. टुली यांचा असाही दावा आहे की ठेंगडी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी १९५४ मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत त्यांना आपला निवडणूक प्रतिनिधी नेमले होते. असेच दावे याआधी आनंद मोहन यांनी केले होते. ते मी पुराव्यानिशी फेटाळले होते. पण संघाचा खोटारडेपणा असा की खोटे दावे पुन्हापुन्हा करीत राहायचे. पण ठेंगडींच्या ह्या नियुक्तीचा लेखी पुरावा टुलींनी सादर केलेला नाही. निवडणूक प्रतिनिधी तोंडी नेमला जात नाही. निवडणूक अधिकार्‍यांना तसे लेखी कळवावे लागते. टुली यांनी ठेंगडींच्या नियुक्तीच्या कपोलकल्पित कहाण्या सांगणे, तोंडी दावे करणे आणि हवेत महाल बांधणे सोडून ठेंगडींच्या नियुक्तीचे लेखीपत्र सादर करावे. विषय संपला.

शेकाफेचे महासचिव राजभोज तर म.प्र.सचिव आवळे- ठेंगडी नव्हेत-
२. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून शेकाफेचे अ.भा. जनरल सेक्रेटरी पां. ना. राजभोज व मध्यप्रदेश शेकाफेचे सेक्रेटरी बाबू हरिदास आवळे यांची नियुक्ती डॉ. आंबेडकरांनी केलेली होती. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड,१८ वा, भाग ३ रा ]

३. शेकाफेच्या घटनेनुसार नॉन श्येड्युल्ड कास्ट व्यक्तीची सदस्य वा पदाधिकारी म्हणून जशी नियुक्ती शक्य नव्हती तशीच जी व्यक्ती इतर संघटनेची वा पक्षाची सदस्य असेल तर तिचीही नियुक्ती करता येत नव्हती. ठेंगडी हे नॉन शेड्युल्ड कास्ट असल्याने व ते आर.एस.एस. RSS तसेच भारतीय जनसंघाचे मध्यप्रदेशचे पदाधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती शेकाफेचे सचिव म्हणून होऊ शकत नव्हती. शेकाफेच्या घटनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, Any person belonging to the scheduld castes and Who is not a member of any other political or any social or religious organisatoin can be become a member of SCF. { डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग दुसरा, पृ. 459}

 निवडणूक भंडार्‍याला ठेंगडी वर्ध्याचे- आणि नवखे-

४. शिवाय निवडणूक भंडार्‍याला होती आणि ठेंगडी त्या मतदार संघातले मतदार नव्हते. ते वर्ध्याचे आर्वीचे होते. अशा अपरिचित व्यक्तीच्या इलेक्शन एजंट म्हणून केलेल्या नियुक्तीचा निवडणुकीत काय फायदा? ठेंगडी तेव्हा अगदी नवखे होते.

५. टुली एकुण दोन वेगवेगळ्या निवडणुकांबद्दल एकत्र बोलत आहेत. पहिली १९५२ सालची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि दुसरी भंडार्‍याची १९५४ सालची ची पोटनिवडणूक. भंडारा येथील लोकसभा पोटनिवडणूक २ ते ५ मे १९५४ रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेले प्रचार दौरे, भाषणे आणि निवडणुकीची वार्तापत्रे एप्रिल आणि मे १९५४ च्या जनता या डॉ. आंबेडकरांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात सविस्तरपणे अनेकदा प्रकाशित झालेली आहेत. जनताचे अंक पुराव्यासाठी आजही उपलब्ध आहेत. या सर्व सभांना उपस्थित असलेले नेते, सभेत भाषणे केलेले नेते यांच्या नावांची मोठी यादी जनतामध्ये आलेली आहे. भंडार्‍याच्या एकाही प्रचार सभेला ठेंगडी हजर नव्हते. ते जर डॉ. आंबेडकरांचे विश्वासू असे निवडणुक प्रतिनिधी होते तर मग ते सर्वच प्रचारसभांना गैरहजर का होते? याचे उत्तर संघ देत नाही. ठेंगडींचा प्रचार सभांमध्ये वक्ता वा मंचावर उपस्थित सदस्य असा साधा उल्लेखसुद्धा जनता या डॉ. आंबेडकारांच्या वर्तमानपत्रामध्ये नाही.
यावरूनच सिद्ध होते ठेंगडी बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रतिनिधी नव्हते.

काय जनसंघ- कम्युनिस्टांची युती होती?
६. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षासह इतर अनेक पक्ष,संघटनांनी स्वत:हून डॉ. आंबेडकरांना पाठींबा दिलेला होता. कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्री ए. बी. वर्धन हे भंडार्‍याच्या प्रचारसभांना हजर असत. या निवडणुकीत कम्युनिस्ट आणि जनसंघ यांची युती होती व ते एकत्र काम करीत होते असे टुलींना म्हणायचे आहे काय?

एक वर्ष नाही अवघे तीन महिने-
७. राजकारणात एका वर्षात काहीही होऊ शकते असे विधान करून डॉ. आंबेडकरांचे आर.एस.एस. ही प्रतिगामी व विघटनवादी असल्याबाबतचे विधान व लोकसभा निवडणूक यात वर्षाचे अंतर होते असे टुली सांगतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे इथे टुली १९५२ च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलत आहेत. " हिंदु महासभा व आर.एस.एस.बरोबर शेकाफेची निवडणुक युती होऊ शकत नाही हा शेकाफेचा बाबासाहेबांनी स्वत: लिहिलेला निवडणूक जाहीरनामा ४ जाने १९५२ रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचाच आहे. टुली म्हणतात तसा तो एक वर्षे आधीचा नसून ऑक्टोबर १९५१ चा आहे. जाहीरनामा लेखन, प्रकाशन, प्रदीर्घ, देशव्यापी प्रचारमोहीम आणि अनेक आठवड्यांमध्ये पार पडलेली निवडणूक या तीन महिन्याच्या काळातील सलग गोष्टी आहेत. १९५१ च्या शेवटी जाहीरनामा व निवडणूक प्रचार झाला व ४ जानेवारी १९५२ ला मतदान झाले असा हा एकत्र कार्यक्रम होता. त्यात १९५१ आणि १९५२ असे वर्षाचे वर्षाचे अंतर नव्हते. [ डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग पहिला, दि. 3 ऑक्टोबर 1951, पृ. 402]

हिंदूराष्ट्र हे महाभयानक संकट-
८. डॉ. आंबेडकरांचे व संघाचे देशाची फाळणी व इस्लाम याबाबतची मते यात खूप साम्य असल्याचा दावा टुली करतात. यासाठी डॉ. आंबेडकरांच्या ज्या पाकीस्तान किंवा भारताची फाळणी या पुस्तकाचा हवाला ते देतात, त्याच पुस्तकात आर.एस.एस.बद्दल आंबेडकरांनी संतप्त उद्गार काढलेले आहेत. त्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की आर.एस.एस.आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेत काडीचेही साम्य नव्हते. गोळवलकरगुरूजींचे "बंच ऑफ थॉट" हे आर.एस.एस.चे बायबल आहे. गुरूजी चातुर्वर्ण्य मानतात. सनातन संस्कृती रक्षण, हिंदुराष्ट्राची स्थापना ह्याला प्राधान्य देतात. डॉ. आंबेडकरांचे व संघाचे देशाची फाळणी व इस्लाम याबाबतची मते यात खूप साम्य असल्याचा दावा टुली करतात.

संघ म्हणजे मान न मान मैं तेरा मेहमान-
आंबेडकर म्हणतात, " हिंदु राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये." { पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८, डॉ. बा.आं.ले.भा. खंड 8 वा, 1990, पृ. 358} या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आणि हिंदू राष्ट्रवाला संघ यांच्यात कसलेच साम्य नव्हते. हे म्हणजे " मान न मान मैं तेरा मेहमान" असला लोचट गळेपडूपणा संघाने चालवलेला आहे.

मराठाविरोधी गोळवलकरगुरूजी- संघ हा विषवृक्ष-
९.]  ७ सप्टेंबर १९४९ ला आर.एस.एस.सुप्रिमो गोळवलकरगुरूजी कायदामंत्री डॉ. आंबेडकरांना दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडॆ मदत मागितली. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, " आर.एस.एस. हा विषवृक्ष आहे. आर.एस.एस.ला पेशवाईची स्वप्नं पडत आहेत. माझे तुमच्याशी जमूच शकत नाही. मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही."  या भेटीची विस्तृत बातमी तिसर्‍या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या जनताने १० सप्टेंबर १९४९ ला दिलेली आहे. शिवाय या दोघांच्या भेटीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोहनलाल शास्त्री प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे. { पाहा: बाबासाहेब डॉ. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली,पृ. ५४/५५}


संविधान आणि हिंदुकोडबिलाला संघाचा विरोध-
१०. याच काळात डॉ. आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर.एस.एस. विरोध करीत होती. हिंदु कोड बिलालाही संघाचा विरोध होता. घटना सभेचे कामकाज उधळण्यासाठी आर.एस.एस.चे सदस्य संसदेच्या सभागृहात गॅलरीत घुसले होते अशी नोंद पार्लमेंटच्या दप्तरात आहे. [ पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७ वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९, CAD7/1233 ]


हवेतल्या गप्पा मारू नका लेखी  पुरावे द्या-
११. लिखित दस्तावेज आणि तोंडी माहिती यात लिखितला प्रथम दर्जाचा पुरावा मानले जाते तर तोंडीला दुय्यम महत्व असते. संघाकडे एकही त्याकाळातला लेखी पुरावा नाही तर आम्ही आंबेडकरवादी ठोस, सबळ, लेखी आणि त्याकाळातल्या पुराव्यांच्या आधारे बोलत आहोत. शिवाय ठेंगडी आणि ऑर्गनायझर हे आर.एस.एस.चे असल्याने त्यांना फारशी विश्वासार्हता नाही. ते या घटनेचे लाभार्थी असल्याने त्यांचा नंतरच्या काळातला आणि तोही तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.

ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा-
१२. ठेंगडीचे पुस्तक डॉ. आंबेडकर हयात असताना त्यांनी लिहिलेले नसून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कितीतरी वर्षांनी लिहिलेले आहे. समकालीन एकही लेखी दस्तावेज ठेंगडी, आनंद वा टुलींनी सादर केलेला नाही. त्यामुळे ही तोंडी माहिती कल्पित आणि नंतर रचलेली आहे. बनावट आणि सांगोवांगी असल्याने ती टिकू शकत नाही.

बाबासाहेबांची संघशिबिराला भेट? नाही, हीही थापच-
१३. डॉ. आंबेडकरांच्या संघ शिबिराच्या भेटीची १९३९ ची कहाणीही अशीच कपोलकल्पित आहे. बनावट आहे. तिचे त्याकाळातले लिखित पुरावे, फोटो, संघ व बाबासाहेब यांच्यातील भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे पुरावे संघ देऊ शकलेला नाही. ते दिल्याशिवाय त्यांच्या म्हणण्यावर चर्चासुद्ध शक्य नाही. विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

बाबासाहेब आणि संघ, तत्वज्ञानात १८० डिग्रीचा फरक-
१४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला परमप्रिय असलेली मनुस्मृती जाळतात, संघ ज्या डोलार्‍यावर उभा आहे तो हिंदू धर्म ते सोडतात, हिंदुत्व सपशेल नाकारतात, बौद्ध धर्म स्विकारताना आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ते लाखोंच्या जनसमुदायाला २२ प्रतिज्ञा देतात, त्यात हिंदूंच्या देवता राम, कृष्ण यांना मी मानणार नाही अशा प्रतिज्ञा आहेत. आर.एस.एस.ने रामराज्याची कल्पना सोडून दिलेली आहे काय? "रिडल्स ऑफ हिंदुइझम,"  "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" "रेव्होल्युशन अ‍ॅण्ड काऊंटर रेव्होल्युशन" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे ग्रंथ आर.एस.एस.ला मान्य आणि प्रिय आहेत काय? "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुलभूत तत्वज्ञान आहे. तर आर.एस.एस.ला समरसता हवीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती नष्ट करा म्हणतात, तर जाती टिकवा आणि त्यांचातले भेद कमी करून ते समरसता निर्माण करा असे संघीय म्हणतात. या संपुर्ण विरूद्ध दिशा आहेत.

फॅसिस्ट संघाचा बाबासाहेबांच्या अपहरणाचा डाव-
थोडक्यात आर.एस.एस. आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीत काडीचेही साम्य नाही. डॉ. आंबेडकराना हायजॅक करण्यासाठी संघ हे प्रयत्न करीत आहे. डॉ. आंबेडकरांना आज सारे जग महान विद्वान, घटनाकार, जगभरच्या उपेक्षित वंचितांचा मसिहा म्हणून वंदन करते तर संघ हा फॅसिस्ट म्हणून कुविख्यात आहे. म्हणून संघाला आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तसेच आंबेडकरांना मानणार्‍या व्होटबॅंकेला भुलवण्यासाठी ही पळवापळवी करायची आहे. संघाला आम्ही जागृत आंबेडकरवादी त्यात कदापिही यशस्वी होऊ देणार नाही!

- प्रा. हरी नरके,२३/४/२०२०
[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत]

Tuesday, April 14, 2020

कोरोनोत्तर जगासाठी बुद्ध-महावीर-गांधी तत्वनीति



 सारे जग याक्षणी कोरोना विषाणूच्या महामारीच्या संकटात सापडलेले असतांना, माणसा-माणसांत व राष्ट्रा-राष्ट्रांत एकीकडे संशयाचे वातावरण वाढत असतांना दुसरीकडे प्राणभयाने जागतीक समाज-मानसिकता विस्कळीत होऊ लागली आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा थांग कोणाला लागेनासा झालेला आहे. काही राष्ट्रीय नेतृत्वेही संभ्रमित झालेली आहेत, परिस्थितीसमोर हार मानु लागली आहेत. सा-या जगाचे चक्र ठप्प झाल्यासारखे झाले आहे. जवळपास सारे जग आपापल्या घरात बंदिस्त झाले आहे. मानसिक समस्यांची शिकार होऊ लागले आहे. कोरोनाचे संकट लवकरच हटावे यासाठी जगभरचे शास्त्रज्ञ आपली प्रतिभा पणाला लावत आहे. हे संकट पुर्णपणे दूर व्हायला नेमका किती काळ लागनार आहे आणि त्याच वेळेस कोरोनानंतरचे जग कसे असेल या प्रश्नानेही जगभरच्या विचारवंतांना भेडसावले आहे.

कोणत्याही वैश्विक संकटाचा अटळ परिणाम म्हणजे आहे त्या व्यवस्थेची तोडमोड होणे. नवीन प्रमेये पुढे येणे व नवी संस्कृती जन्माला येणे. विनाशक अशा द्वितीय महायुद्धानंतर जगाची भुराजकीय संरचना तर बदललीच पण मुल्यव्यवस्थेचीही फेररचना झाली. अस्तित्ववादासारखी नवी तत्वज्ञाने जशी पुढे  आली तशीच अतिरेकी भांडवलशाहीचा किंवा स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करणारी तत्वज्ञानेही पुढे आली. विनाशातुही मानवाने नवी संस्कृती उभारली. आताही करोनाचे संकट हटेल तेंव्हा जागतीक भुराजकीय, अर्थव्यवस्था आणि मुल्यव्यवस्थांत काही फेरबदल होती. प्रश्न एवढाच आहे की कोरोनोत्तर फेरबदल कोणती दिशा घेतील? केवळ भौतीक पगतीकडेच मानव जाईल की शाश्वत अर्थव्यवस्था आणि मानवतावादी मुल्यव्यवस्थेला प्राधान्य देईल? प्रश्न गंभीर आहेत व आम्हाला त्यावर आत्ताच विचार करण्याची गरज आहे.

खरे तर भारतात इसपू सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या महान तत्ववेत्ते व धर्मसंस्थापकांनी एक मार्ग देऊन ठेवला आहे. गेल्यच शतकात त्यांच्याच तत्वज्ञानाला आधुनिक परिप्रेक्ष देत महात्मा गांधींनी भारतच नव्हे तर जगाला दीपस्तंभ व्हावे असे कार्य केले आहे. जगाने येथून पुढे त्यांचा आदर्श ठेवत त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाला आजच्या परिप्रेक्षात पुनर्मांडणी करत जगाची संरचना अधिकाधिक मानवधिष्ठित करण्याचा आटोकाट रयत्न करण्याची गरज आहे.

बुद्ध महावीरांनी सांगितलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य., सम्यक मार्ग, पंचशीलादि हे सिद्धांत सर्वपरिचित आहेतच. पण संयम हा त्यांनी सांगितलेला सर्वात महत्वाचा सद्गुण होय. कोणत्याही बिकट स्थितीवर मात करायची असेल तर संयम गुण हा अंगी बाणवावा लागतो असे महावीर सांगत असत. संयम प्रत्येक व्यक्तीला आहे त्या स्थितीकडे पहायची व्यापक दृष्टी देतो. सहनशक्ती हे संयमाचेच उपफल आहे. या संकटातुन मानवजात तरेल ती केवळ संयमानेच. महावीरांच्या अपरिग्रहाच्या तत्वाने आपल्याक्डे जे अतिरिक्त आहे ते समाजाला दिले तर आज आपल्या देशातील किमान चाळीस टक्के जनता जी भुकेचा सामना करत आहे तिला जगवु शकेल. कोरोनामुळे सारे एकजुटीने या संकटाचा सामना करतील अशी आशा होती पण दुर्दैवाने धार्मिक तेढ माजवण्याचे व भविष्यातील हिंसाचाराची पायाभरणी करण्याचे काम झाले आहे. मानवी भविष्य हे हिंसाचाराच्या स्तरावर जाता कामा नये. आणि ही भिती जागतीक आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील मतभेद नंतर उग्र स्वरुपात वर डोके काढण्याची भिती आंतरराष्ट्रीय विचारवंत आताच व्यक्त करु लागले आहेत. अहिंसेचे तत्व जर जगाने अंगीकारले नाही तर आपण या संकटातून काहीच शिकलो नाही असे म्हणावे लागेल. जग पुन्हा रक्तपाताचा छायेत येण्याचा धोका आपल्याला टाळायचा असेल तर आताच आपली तत्वनीती बुद्ध-महावीर केंद्रित करावी लागेल.

यात अधिक उपयोगाला येऊ शकतो तो जैनांचा अनेकांतवाद. हा वाद प्रत्येक प्रश्नाकडे अनेक दृष्टीने खुल्या मनाने पाहतो व उत्तमात उत्तम समाधान शोधतो. कोणत्याही जागतीक प्रश्नाचे उत्तर एक-दोन पर्यायांत असू शकत नाही. अनेक पर्याय धुंडाळले पाहिजेत. परंपरागत पर्याय आजतागायत तात्पुरते यशस्वी ठरले असले तरी ते अंतता: मानवजातीला विनाशकच ठरलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. जगाला अहिंसेची जशी गरज आहे तशीच संयमाचीही आहे. सयमानेच आपण कोरोनाशी लढू शकतो आणि संयमानेच कोरोनोत्तर जगाची मानवताचादी मुल्याधारित रचनाही करु शकतो. अस्तेय, अपर्ग्रहाच्या महावीरांच्या तत्वांवर आपण शाश्वत अर्थव्यवस्थाही उभारु शकतो जी निसर्गाजवळ जानारी असेल. आज कोरोना किंवा आधी ज्याही विषाणुंच उदय झाला आहे व लोकांचेच प्राण गेलेले आहेत ते मानवाने पर्यावरणाचा समतोल समूळ घालवल्यामुळे निसर्गात होत असलेल्या विषाणु-उत्क्रांतीमुळे. "खेडयाकडे चला" ही गांधीजींची हाक वृथा नव्हती. तिचा अर्थ नीट समजाऊन घेत आम्ही शहरांचे व प्रगतीचेही विकेंद्रीकरण करायला हवे हा धडा आम्हाला मिळाला आहे. आम्ही त्यातून काही शिकणार आहोत काय हा खरा प्रश्न आहे.

भारताला विश्वगुरु व्हायचे आहे. स्वप्न अगदी आदर्श आहे पण त्यासाठी वैश्विक मानवतावादी तत्वज्ञानाचा विकास केला जायला हवा अन्यथा ते एक पोकळ स्वप्न होऊन आईल. बुद्ध-महावीर आणि गांधीजींनी अखिल मानवजातीसाठी त्या तत्वज्ञानाची पायाभरनी केली आहे. त्यात भर घालत आम्ही त्या आदर्शांच्या दिशेने मानवजातीला जायला प्रेरित करु शकलो तर कोरोनोत्तर जग हे नवसंस्कृतीने झळाळनारे, अधिक विचारी, प्रगल्भ व निसर्गाच्या कुशीत जगणारे आनंदमयी जग बनेल अशी आशा करायला वाव आहे.

-संजय सोनवणी



Monday, April 13, 2020

करोनाने भारताला दिलेली संधी

करोनाच्या याच काळात पुरेपुर सावधानी बाळगत भारताने उत्पादन आणि सेवा क्षेत्र सुरु केले तर भारत जागतीक मरगळलेल्या आणि हताश जगात आपले आर्थिक नेतृत्व सक्षमतेने पुढे आणु शकतो. लवकरच जगभरात असंख्य उत्पादनांचा तुटवडा होणार आहे आणि पुरवठ्याच्या काही बाजू याच काळात सांभाळण्याची व जागतीक बाजारपेठेत आघाडी घेण्याची एक संधी भारताकडे चालून आली आहे. करोनोत्तर जगात या आघाडीचा फायदा तर मिळेलच पण जागतीक गुंतवणुकदार चीनऐवजी भारत हेच आपले उत्पादन केंद्र असावे यासाठी पुढे येतील.
पण त्यासाठी काही तातडीचे प्रलंबित धोरणात्मक बदलही करावे लागतील. अजुनही भारत गुंतवणूकसुलभता असलेला देश नाही. कालबाह्य समाजवादी कायदे, बाबुशाही आणि लालफीत, विविध परवाने देतांना होणारे भ्रष्टाचार यामुळे गुंतवणुकदार भारत हे लक्ष्य ठेवण्यात काचकुच करत होते. हे चित्र बदलायचे असेल, देशांतर्गत उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर उभारी द्यायची असेल तर उदारीकरणाच्या कक्षा वाढवाव्या लागतील. यामुळे अर्थव्यवस्था लवकरच उभारी घेऊन झपाट्याने वाटचाल तर करेलच पण बेरोजगारीच्या गेली सहा वर्ष भेडसावणा-या समस्येलाही दूर करता येईल.
शेती, पशुपालन या उद्योगांना उदारीकरनापासून वंचित ठेवण्यात आले आहे ते आता थांबवावे लागेल. शेतमालाच्या बाजारपेठा खुल्या कराव्या लागतील. या क्षेत्रातील कालबाह्य कायदेही रद्दबातल करावे लागतील. शेती आणि पशुपालन उद्योगात मोठी झेप घेण्याची क्षमता आहे. ती एक्स्प्लोइट करावी लागेल. त्यासाठी सर्वस्वी नवे धोरण याच काळात आखावे लागेल.
करोना हे संकट आहे हे खरे आहे पण उद्यमी, साहसी, कल्पक लोकांसाठी आणि देशांसाठी करोना ही एक प्रचंड मोठी संधीसुद्धा आहे. आपण भारतीय या संधीचा लाभ घेतो की तिची माती करतो हे या नेतूत्वाने तर ठरवायचे आहेच पण आम्हा सामान्य नागरिकांनीही ठरवायचे आहे. चिंता करत बसल्याने संकट हटत नाही. पुरेपुर काळजी घेऊन आमच्या उत्पादन क्षमता आम्ही कशा पणाला लावतो यावर आमचे राष्ट्रीय चारित्र्य ठरणार आहे.

Monday, April 6, 2020

वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी भगवान महावीर


 www.orissapost.com/wp-content/uploads/2019/04/M...

आज श्रेष्ठ मानवी मुल्यांची उद्घोषणा करणा-या भगवान महावीरांची जयंती आहे. अखिल विश्वाला शांतता अहिंसेसह उदात्त जीवनमुल्यांची शिकवण देणा-या भगवान महावीरांनी जगाला अभिनव तत्वज्ञानही दिले जे सार्वकालिक आहे. सारे जग याक्षणी करोना विषाणूच्या महामारीच्या संकटात सापडलेले असतांना, माणसा-माणसांत राष्ट्रा-राष्ट्रांत एकीकडे संशयाचे वातावरण वाढत असतांना दुसरीकडे प्राणभयाने जागतीक समाज-मानसिकता विस्कळीत होऊ लागली आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा थांग कोणाला लागेनासा झालेला आहे. काही राष्ट्रीय नेतृत्वेही संभ्रमित झालेली आहेत, परिस्थितीसमोर हार मानु लागली आहेत. सा-या जगाचे चक्र ठप्प झाल्यासारखे झले आहे. जवळपास सारे जग आपापल्या घरात बंदिस्त झाले आहे. मानसिक कुंठांची शिकार होऊ लागले आहे. अशा स्थितीत भगवान महावीर आपल्यासमोर आजही पथदर्शक होऊन दिलासा देत आहेत. या जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीरांपासून आपण काय घेऊ शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे.

सनपुर्व ५९९ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला. त्यांचे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे धर्म-सिद्धांत सर्वपरिचित आहेतच. पण संयम हा त्यांनी सांगितलेला सर्वात महत्वाचा सद्गुण होय. कोणत्याही बिकट स्थितीवर मात करायची असेल तर संयम गुण हा अंगी बाणवावा लागतो असे महावीर सांगत असत. संयम प्रत्येक व्यक्तीला आहे त्या स्थितीकडे पहायची व्यापक दृष्टी देतो. सहनशक्ती हे संयमाचेच उपफल आहे. संयमामुळे मनोवत्ती छोट्या-मोठ्या कारणाने उत्तेजित होत नाहीत उलट आहे त्या स्थितीतून मार्ग काढायची शक्ती प्राप्त होते. संयमी माणसांच्या मनोवृत्तीही सुदृढ असतात. आणि अशा संयमी लोकांचा समुच्चय कोणत्याही संकटावर भारी पडतो. आज आपण पाहिले तर भारतीय समाज एका वेगळ्या मानसिक संक्रमणातुन चालला आहे. भय, अनिश्चितता, अस्थिरता आणि परस्परांबाबतच्या संशयाने विघातक प्रवृत्ती जोपासत सामाजिक दुही निर्माण करण्याच्या कार्यात नकळत सहभागी झाला आहे आणि आपण काही चुकीचे करत आहोत याचे भान नाही. स्वत:ला घरात काही दिवस बंदिस्त राहण्याची आवश्यकता निर्मण झाली आहे तर त्य बंदिस्ततेतही आपल्याला करण्यासारखे सकारात्मक असे पुष्कळ काही आहे याचे भान गमावून तो संयम सोडून रस्त्यांवर धाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक जीवन त्यामुळे धोक्यात येईल याचे भानही त्यामुळे गमावले जात आहे. मानसोपचार तज्ञांकडे आता या एकांतवासाच्या समस्येने अस्वस्थ झालेल्या मनोरुग्णांच्या रांगा लागत आहेत. पण त्यांनी संयम ठेवला, आत्मचिंतन केले, स्वत:च्या आत उतरुन स्वत:चा शोध घेतला तर स्वत:बाबतचीच अनेक रहस्ये त्यांना उलगडू शकतात. मग मानसिक विकारांचा स्पर्शही होणार नाही. उलट स्वत:ला जिंकणारा, म्हणजेच जिन, होण्याकडे, आदर्श मानव होण्याकडे त्याची वाटचाल सुरु होईल हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

आज शहरी भागांतील लाखो मजुर हाल-अपेष्टा सहन करत शेकडो मैल चालत आपल्या गांवी परतत आहेत. गरीब-बेघरांना दोन काय, एक वेळही खायला मिळत नाहीय. डाक्टर्स, पारिचारिकांना सुरक्षेसाठी लागणा-या साधनांची कमतरता आहे. सरकार काय करायचे ते प्रयत्न करेनच पण प्रत्येक व्यक्तीचीही यात सहायता करण्याची जबाबदारी आहे. भगवान महावीरांनी अपरिग्रहाचे महान तत्व मानवजातीला दिले. अपरिग्रह म्हणजे संग्रह करणे. संग्रह मानवी दु:खाचे कारण बनतो. आपल्याकडील जे अतिरिक्त आहे त्याचे समाजाला वाटप करणे म्हणजे अपरिग्रह. आज प्रत्येकाला हे तत्व आचरणात आणण्याची संधी आहे. आपल्या भवतालात मनुष्यच नव्हे तर इतर प्राणीसृष्टीचीही उपासमार होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. भगवान महावीरांचे तत्वज्ञान एखाद्या सागरासारखे आहे. पण आजच्या या आपत्तीत भगवान महावीरांना जयंतीनिमित्त अभिवादन करत असतांना महावीरांची ही दोन तत्वे जरी अंमलात आणली तर आपण करोनाच्या संकटावर मात करु शकू याचा विश्वास वाटतो.

-संजय सोनवणी

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...