Thursday, March 22, 2012

गौतमीपुत्राचा विजयोत्सव...गुढीपाडवा!

गौतमीपुत्र सातकर्णी या महान सम्राटाने नहपानावर मिलवलेल्या विजयाचा दिवस म्हनजे गुढीपाडवा. माझ्या सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या शुभेच्छा! खालील लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्समद्धे प्रसिद्ध झाला आहे.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.

शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.

सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.

अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.

सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी.


Sanjay Sonawani मटा’च्या १ एप्रिलच्या अंकात माझ्या "गौतमीपुत्राच्या विजयाची परंपरा" या लेखावरील श्री. रविकिरण साने यांचा "शककर्ते सातवाहन ब्राम्हणच!" हा प्रतिसाद वाचला. महत्वाचे सर्व पुरावे सोडुन द्यायचे आणि एका शिलालेखातील "एक बम्मण" (साने म्हणतात तसे एक ब्राह्मण" नव्हे. प्रत्त्येक प्राक्रुत शब्दाचे संस्क्रुतीकरण करण्याचा हा छंद बरा नव्हे. शिवाय या शब्दापुढील शिलालेखातील शब्द कालौघात तुटले आहेत त्यामुळे त्यापुढे मुळात काय लिहिले होते हे समजायला मार्ग नाही.) या शब्दाचा अर्थ फारतर "ब्राह्मणांचा संरक्षक" एवढाच घेता येतो, "आपण ब्राह्मण आहोत" असा नव्हे. तसाच घोळ सानेंनी "खतियदपमानदमन" या शब्दाबाबत घातला असून त्याचा अर्थ ते क्षत्रियांचे गर्वहरण करणारा असा लावतात. सातवाहनांनी गर्व उतरवला तो नहपान या शक क्षत्रपाचा पुर्ण पराजय करुन. "खतीय" शब्द येथे क्षत्रियासाठी येत नसून क्षत्रपांना उद्देशुन आहे व ते ऐतिहासिक वास्तवही आहे. 

साने अजुन पुढे जातात व ते म्हणतात  यद्न्य करण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच होता. त्यांचे म्हणने अर्धवट खरे आहे. मुळात ब्राह्मणांना राजसुय व अश्वमेध यद्न्य करण्याची परवानगी मनुस्म्रुती, याद्न्यवक्ल्य स्म्रुती, नारद स्म्रुती अशा अनेक स्म्रुतींनी दिलेलीच नाही. हे यद्न्य फक्य क्षत्रियांसाठीच राखुन ठेवलेले आहेत. बहुदा सानेंनी स्म्रुत्या कधी वाचल्या नसाव्यात, म्हणुन त्यांचा असा घोळ झाला असावा. त्यामुळे सातवाहन ब्राह्मण होते हा त्यांचा बालसुलभ अट्टाहास पुरा होवू शकत नाही. वास्तव हे आहे कि ऐतरेय ब्राह्मणाने औंड्र, पुंड्र, शबर, मुतीब, पुलिंद ई. पन्नास शुद्र जाती दक्षीणेत राज्य करतात असे स्पष्ट म्हटले आहे. महाभारतात याच जमातींना असुर राजा महाबळीचे पुत्र मानलेले आहे. हा समाज पशुपालकच होता. आजचे धनगर/कुरुब/गोपालक हे त्यांचेच वंशज. मेगास्थेनीसही त्यांचा उल्लेख "आंड्रेई" ( Andarae) असाच करतो. वायु पुराण, मत्स्य पुराण ते अन्य सर्वच पुराणे त्यांना "आंध्र" व काहींना "आंध्रभ्रुत्य" असेच म्हणतात. हे बहुदा सानेंनी पाहिले नसावे. जर सातवाहन ब्राह्मण असते तर पुराणकारांनी तसे स्पष्ट म्हटले असते व त्यांना डोक्यावर घेत महाकाव्येही लिहिली गेली असती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे आंध्र राजे (अर्थात औंड्र सातवाहन) हे वैदिक व्यवस्थेने शुद्रच मानले होते असे स्पष्ट दिसते.

दुसरे असे कि सातवाहनांचे नाणेघाट वगळता सर्वच्या सर्व शिलालेख बौद्ध लेण्यांत आहेत. मुळात जवळपास सर्वच लेण्यांची कामे सातवाहनांनीच सुरु केली, उदारपणे देणग्या दिल्या. मग खरे तर त्यांना आपण बौद्ध धर्मीयच ठरवायला पाहिजे. पण तसे कोणी म्हणत नाही. पण फक्त एका "एक बम्मण" शब्दावरुन सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवण्याचा जोर लावत प्रयत्न करायचा हे मात्र अनाकलनीय आहे. सत्य हे आहे कि तत्कालीन सर्वच राजे हे आजच्यासारखे जातीयवादी नव्हते. ते सर्वच धर्मांना उदारपणे सहाय्य करत. त्यामुळे त्यांनी असंख्य लेण्यांना, जैन धर्मियांना मदत केली तशीच वैदिकांच्या समाधानासाठी काही यद्न्यही केले, एवढाच त्याचा अर्थ होतो. "सालाहण" हा शब्द जसाचा तसा नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात आलेला आहे, त्यामुळे सानेंच्या अद्न्यानाधारित कुतर्कावर मी अधिक भाष्य करत नाही. एनकेन प्रकारेन इतिहासातील सर्वच महनीयांना एक तर मारुन मुटकुन ब्राह्मण ठरवायचे किंवा त्यांच्या बोकांडी ब्राह्मण बसवायचे असले असांस्क्रुतिक इतिहास विघातक उद्योग आता तरी बंद व्हावेत. 

आता त्यांनी संस्क्रुतबाबत काही अनैतिहासिक विधाने केली आहेत व ते त्यासाठी ऋग्वेदाच्या काळाचा दाखला देतात व संस्क्रुत भाषा पुरातन आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. संस्क्रुत भाषा ही मुळात प्राक्रुतावर संस्कार करत बनवली गेलेली क्रुत्रीम भाषा आहे याबाबत कोणाही विद्वानाचे दुमत नाही. म्हणजेच प्राक्रुत भाषा याच पुरातन ठरतात. प्राक्रुतचा अर्थच "मुळचा" असा आहे तर संस्क्रुतचा "संस्कारित". आता प्रश्न असा कि संस्क्रुत नेमकी बनली कधी? पहिली बाब म्हणजे संस्क्रुत म्हनता येईल अशा (प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत) भाषेतील पहिला शिलालेख मुळात शक छत्रप रुद्रदामनाच्या काळातील, म्हणजे इस. १६० चा आहे. तत्पुर्वीचे भारतभरचे व्रज, मागधी, पाली, माहाराष्ट्री प्राक्रुत, तमिळ ई भाषांतले शिलालेख इसपु 1000 पासुन आढळतात. संस्क्रुतचा एकही नाही. दुसरे असे कि संस्क्रुतमद्धे ताम्रपट, शिलालेख क्रमश: वाढण्याचे प्राबल्य हे इसच्या तिस-या शतकानंतरचे आहे व हे सर्व लेख ब्राह्मी (क्वचित खरोष्टी) लिपीतील आहेत. संस्क्रुतची स्वत:ची अशी कधीही लिपी नव्हती. आजही नाही. आज जिला आपण देवनागरी म्हणतो ती मुळची नागरी लिपी असून तिला "देव" हा शब्द उत्तरकाळात चिकटवला गेलेला आहे. ऋग्वेद हा मुळ "व्रचदा सिंधी" या शौरसेनी प्राक्रुत भाषेच्या पुरातन रुपात लिहिला गेला होता. ऋग्वेदाचा भुगोल व भाषेतील दुवे या मताशी मेळ खातात. पुढे बौद्ध धर्म वाढतोय हे लक्षात येताच पाली भाषेचे अनुकरण करत (पाली हीसुद्धा क्रुत्रीम भाषा आहे.) वैदिक संस्क्रुत भाषा क्रुत्रीमपणे (सर्वांना समजावी यासाठी) सर्वच प्राक्रुत भाषांतील शब्द घेत (अगदी द्रवीडी भाषेतीलसुद्धा) बनवली गेली. मुळ ऋग्वेद हा संस्क्रुतात नव्हता याची असंख्य प्रमाणे खुद्द ऋग्वेदातच सापडतात. उपलब्ध ऋग्वेदातील भाषा  ही पाणिनीय संस्क्रुतची पुर्वावस्था मानली जाते. पाणिनीने सरासरी इ.स. च्या पहिल्या शतकात "अष्टाध्यायी" लिहुन संस्क्रुतचे नियमबद्ध व्याकरण बनवले. रामायण, महाभारत, ते सर्वच पुराणे ही पाणिनीच्या व्याकरणाचे नियम पाळत असल्याने त्यांची संस्क्रुत भाषेतील निर्मिती ही पाणिनीनंतरच्या काळातील आहे हेही उघड आहे. मुळ प्राक्रुत ग्रंथांचे संस्क्रुत भाषांतर नंतर केले गेले. आज आढळणारी सर्वच पुरातन मानली जाणारी महाकाव्ये अंतिम संस्कार होवुन तिस-या-चवथ्या शतकातच तयार झाली याबाबतही विद्वानांत कसलेही दुमत नाही. म्हणजेच ती मुळ अन्य प्राक्रुत भाषांत लिहिली गेलेली होती...जशी गाथा सप्तशती, लीलावती, कथासरित्सागर, सिंहासन बत्तीशी इ. दुसरे असे कि संस्क्रुत हा शब्द खुद्द ऋग्वेदापासुन ते तिस-या शतकापर्यंतच्या ग्रंथांत एकदाही येत नाही. तो येतो सर्वप्रथम रामायणात, ज्याचे अंतिम संस्करण चवथ्या शतकात झाले. पाणिनीही "छंदस"चे व्याकरण लिहित होता...तो स्वत:ही आपण संस्क्रुतचे व्याकरण लिहित आहोत असे म्हणत नाही...विपुल बौद्ध व जैन साहित्यातही "संस्क्रुत" हा शब्द येत नाही. 

मग ज्या भाषेला चवथ्या शतकापर्यंत स्वतंत्र नांवही नव्हते ती भाषा पुरातन कशी? असती तर अन्य प्राक्रुत साहित्य जसे आपापल्या भाषांचे अभिमानाने उल्लेख करते तसे संस्क्रुत साहित्यातही घडले असते. सत्य हे आहे कि बौद्धांनी धर्मप्रचारासाठी पाली विकसीत केल्यानंतर वैदिक समाजाने संस्क्रुत भाषा तयार करायला सुरुवात केली. संस्क्रुत ही नितांतसुंदर भाषा आहे हे खरे, पण तिचा काळ कसल्याही स्थितीत दुस-या शतकाच्या पलीकडे जावू शकेल असा एकही पुरावा उपलब्ध नाही. सानेंच्या तर्काने आणि व्रुथाभिमानाने संस्क्रुत साठ हजार काय, सहा अब्ज वर्षांपुर्वीही तयार झाली असू शकेल आणि असे म्हणायला काय जाते? ज्याचे पुरावेच अस्तित्वात नसतात त्याबद्दलच अशी विधाने असू शकतात.

थोडक्यात सातवाहन ब्राह्मण तर नव्हतेच आणि संस्क्रुतचा उदयही त्यांच्या काळात झालेला नव्हता. 26 comments:

 1. गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....

  ReplyDelete
 2. संजय सर,

  गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने शकांवर मिळवलेल्या या अभूतपूर्व विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्र शकांच्या जाचातून मुक्त झाला. गौतमीपुत्राने निर्माण केलेल्या या भव्यदिव्य गौरवगाथेची कहाणी आज सर्वांना सांगून अखिल महाराष्ट्राला तुम्ही गुढीपाडव्याचा खरा इतिहासच सांगितला आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...

  ReplyDelete
 3. Maharashtra Times article Link : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12374520.cms

  ReplyDelete
 4. सकाळी वर्तमान पत्रातील लेख वाचला आणि खूप आनंद झाला..धन्यवाद .अहिर समाजाच्या या महान योद्याचा इतिहास का माहित का नसावा याचा प्रश्न पडला...
  लेख संशोधनात्मक असून मराठी भाषेवर तुमचे प्रभुत्व फार सुंदर आहे.

  बरीच माहिती मी महाराष्ट्र गेझीटियर आणि विकिपीडिया यातून सातवाहन साम्राज्या बद्दल माहिती पडली. आणि अजून वाचण्याचा जरूर प्रयत्न करीन.

  ReplyDelete
 5. your writing is thought provoking.

  ReplyDelete
 6. "saal" is farsi word....how could it be present in 78AD???

  ReplyDelete
  Replies
  1. Since thousands of Prakrut words are existant in Pharasi (see Avesta) there is no reason why pharasi words couldnt have ben borrowed by Prakrit...(if at all they are borrowed.)

   Delete
 7. I don't that you have done PHD in Prakrut and EPIGRAPHY..OTHERWISE I WOULD ASK THE PROOF'S AS USUAL..
  शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.
  According to my small knowledge the original word is sadvahaan or satvahaan . these two names are found in early inscriptions and coins. refer Prof .Ajay mitra Shashtri's book on coinage of satavahana.
  PLEASE PUBLISH THE SHILAALEKH'S OF THAT ERA TO SUBSTANTIATE YOUR FALSE CLAIMS.

  ReplyDelete
 8. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक.
  please give the reference of above statement .
  if shudra can become king 2000 years back then why the brahmins are targeted? the so-called only kshatriya can be king theory simply rejected..and if the shalivahana's ruled for 400/450 years , then they can easily eradict the caste system or char varna system. King is always right as we have seen it from the king of madina preached another religion and force it to all arabs to accept it . WHY SATAVAHANA'S CHOOSE TO DO YAGNA AND ALL THAT VAIDIK STUFF? MAY BE YOU HAVE NOT FOUND AND EPIGRAPH ABOUT THAT.

  ReplyDelete
 9. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा.
  गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे.
  ABOVE BOTH FACTS PROVED BOGUS BY LATEST RESEARCH..

  ReplyDelete
  Replies
  1. Refer Aitarey Brahmana, and Va. Vi. Mirashi on satvahan history.And dont ever use arrogant language. Who's research has proved it being bogus? you?

   Delete
 10. VA.VI.MIRASHI HAS EXPRESSED HIS OWN VERSION ABOUT THE SATVAHANA , MANY HISTORIANS AND ARCHAEOLOGIST DIDN''T AGREE WITH HIM. THIS FACT YOU KNOW VERY WELL BUT FOR SAKE OF YOUR CONVENIENCE YOUR ARE ONLY REFERRING MIRASHI .
  IN AITAREY BRAHMANA(7,92.18) THE REFERENCE OF ANDHRA PEOPLE WITH PUNDRAS,SABARAS,PULINDAS,PUTIV ETC AS THE PEOPLE LIVED ON THE SOUTH SIDE OF THE VINDHYA RANGE .THE AITAREY BRAHMANA CLAIMS THE ANDHRAS AS, THE EXILED AND DEGENERATE SONS OF VISWAMITRA.
  SHAK MAHAKSHATRAP CHASHTAN HAS STARTED SHAKA SANVAT WHEN HE BECAME KING.PLEASE READ PROF.AJAY SHASHRI'S BOOK ON SHALIVAHANA.
  गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. WHO IS THIS GAUTAMIPUTA? ABOVE REFERED NASHIK EPIGRAPH NOT MAADE BY THE गौतमीपुत्र सातकर्णी ..

  ReplyDelete
  Replies
  1. In my entire study I find Ajay Mitra Shastri being most biased historian. In my opinion all Brahmins are hell bent to prove Satvahana's were Brahmins. My dear, this is not fact at all...I know what hurts you in my writing...Truth hurts you...let it be so...enjoy your versions of truth and be happy!

   Delete
 11. YOUR ARE HIGHLY MISTAKEN . I AM HISTORY LOVER, NOT CASTE-SUB CASTE OR RELIGION LOVER.
  MY POINT IS SIMPLE.... YOU PROVE YOUR POINT WITH SOLID EVIDENCE..
  SOME SAYS THAT THE SATVAHANAS WERE MAHAR'S AS THERE FACES ON COINS RESEMBLE LIKE MAHAR'S. IF SUCH FACT PROVES BEYOND DOUBT THEN WE HAVE TO ACCEPT IT, AS PER YOUR THEORY, SAHVAHANAS WERE SHUDRAS THEN SIMPLY PROVE IT WITH SOLID EVIDENCE, SOME SAYS THEY WERE BRAHMINS( I NEVER CLAIMED THAT) . IF PROF. AJAY SHASTRI IS MOST BIASED HISTORIAN, THEN I CAN GIVE ANOTHER REFERENCES REGARDING THIS MATTER. I HAVE AMPLE COLLECTIONS OF BOOKS( PURCHASED) , BUT WILL YOU ACCEPT IT OR STICK WITH YOUR GUNS ONLY.. HISTORY SHOULND BE WRITTEN ON PROOFS,NOT ON PERSONAL WHIMS. NOTED HISTORIAN V.C.BENDREY SAYS.."HISTORY COULD ONLY BE WRITTEN WHEN ONE HAD TRULY EXAMINED THE PROOFS THAT WERE PROVIDED." I THINK THIS IS SUFFICIENT FOR THE DISCUSSION.

  ReplyDelete
 12. In my opinion all Brahmins are hell bent to prove Satvahana's were Brahmins. My dear, this is not fact at all...I know what hurts you in my writing...Truth hurts you...let it be so...enjoy your versions of truth and be happy!
  I READ TO INCREASE MY KNOWLEDGE , NOT FOR TO BE HAPPY. TRUTH NEVER HURTS ME, I ALWAYS WELCOME THE TRUTH.
  IN MY OPINION ALL OTHERS ARE VERY MUCH HELL BENT OR TROTTED TO PROVE SATVAHANAS AS THEIR FOREFATHERS..
  YOU ASAKED ME TO REFER , ACCORDING I GAVE REPLY, BUT INSTEAD OF GIVING GOOD REPLY ,YOU CHOOSE TO PLAY WITH WORDS AND WITH CASTE.

  ReplyDelete
 13. IF AJAY SHASHTI IS BIASESD ONE. OK. BUT THERE IS NO UNANIMITY ABOUT THE GAUTAMIPUTRA SATKARNI STARTED THE SHAK IN 78 A.D. ALL ARE AGREED ON ONE POINT THAT HE HAS DEFEATED THE STRONG NAHPAN . SO WE CAN NOT TRUST ONLY VA.VI.MIRASHI.
  FIRST IT WAS ARGUED THAT THE SATVAHANA'S FROM ANDHRA, LATER ON WHEN THE EARLY SATVAHN KING'S COINS AND EPIGRAPHS FOUND IN MAHARASHTRA IN LARGE NUMBERS THEN EARLIER THEORY HAS BEEN REFUTED.
  PLEASE NOTE ONE THING .. VIKRAMADITYA STARTED VIKRAM SANVAT( HIS OWN NAME)

  ReplyDelete
 14. THEN WHY THE GAUTAMIPUTRA STARTED THE CALENDER IN HIS ENEMIES NAME?
  IT SHOULD BE SHATAVAHAN/SHALIVAHAN ( WHATEVER YOU LIKE) SANVAT OR ANOTHER PHRASE NEED TO BE USED. IT IS QUITE LOGICAL THAT THE ORIGINAL SHAK IS STARTED BY SHAKA KING NAHPAN OR CHATTAN , LATER THE SATVAHANA'S ADOPTED IT AS THEIR OWN AS THEY COMPLETELY DESTROYED THEM. THIS IS MY PERSONAL THINKING AFTER CAREFULLY READING VARIOUS BOOKS ON THIS SUBJECT . I AM WRITING A BOOK ON THIS SUBJECT VERY SOON. REST IS HISTORY.

  ReplyDelete
  Replies
  1. Best of luck for your book. Let me know when it is published.

   Delete
  2. I AM WRITING NOT A NOVEL, SO IT WILL TAKE SOME MORE TIME TO CROSS CHECK ALL AVAILABLE WRITINGS, BUT SURELY TELL YOU AS SOON AS ITS GET READY.

   Delete
 15. In my entire study I find Ajay Mitra Shastri being most biased historian. ---your opinion.
  now read your article.. you quote only ajay shastri. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.'
  who is hell bent to prove ? selective suitable references...other wise ajay shastri is biased historian..kamal aahe buva.......
  सत्य हे आहे कि तत्कालीन सर्वच राजे हे आजच्यासारखे जातीयवादी नव्हते. ते सर्वच धर्मांना उदारपणे सहाय्य करत. this is very true statement..
  वास्तव हे आहे कि ऐतरेय ब्राह्मणाने औंड्र, पुंड्र, शबर, मुतीब, पुलिंद ई. पन्नास शुद्र जाती दक्षीणेत राज्य करतात असे स्पष्ट म्हटले आहे. I am asking about satvahana's, not for the other peoples or castes.. here you are not giving the historical period of the aitrey brahmana. need direct answer to direct question...

  ReplyDelete
  Replies
  1. If you dont know period of Aitarey Brahman...then you really need start from basic....

   Delete
  2. I KNOW THE PERIOD , I AM EXPECTING FROM YOU TO REPLY , HERE ALSO YOU CHOOSE TO PLAY WITH WORDS AND AVOIDED TO REPLY. THIS HABIT IS OBJECTIONABLE..
   YOU HAVE NOT READ MY ENTIRE COMMENT ON AITAREY BRAHMANA WHICH LINKED THE SHATVAHANA'S WITH VISHWAMITRA( KSHATRIYA CLAN ). I THINK YOU MUST INTROSPECT BEFORE WRITING ABOVE FOOLISH SENTENCE.

   Delete
 16. सोनवणीसर, आपण संस्कृत-संस्कारित वगरे मांडलेल्या मतांशी सहमती दर्शवतानाच हे नजरेस आणून देऊ इच्छितो की आपण सांगितलेली व्रचदा सिंधी हे अपभ्रंश प्राकृतचे नाव आहे. हा संदर्भ आपल्याल कुठून मिळाला हे सांगता येईल? यां बोलीचा काळ तहक़ीक़ मां'लिल-हिंद यां ग्रंथात बेरुणीने सांगितला आहे. केवळ काही शब्द रीटेन झाल्यामुळे ऋग्वैदीय भाषेविषयी अशी सम्भावना करणे अतिशयित बेजबाबदारपणाचे आहे. हेच वाक्य मी अन्यत्र 'एका जुन्या ब्लॉगवर'ही वाचले होते आणि तिथे हाच खुलासा केला असता माझी प्रतिक्रिया बेशरमपणे निग्लेक्ट करण्यात आली. आज मी ती पोस्ट त्या ब्लॉगवर तपासली असता, ती पोस्ट उडवून देण्यात आली असल्याचे समजले. पण आपण समजून, आकळून लिहिणारे लेखक आहात म्हणून आपल्या सौहार्दपूर्ण चर्चा लक्षात घेऊन मी इथे आवर्जून पुन्हा तीच प्रतिक्रिया लिहीत आहे. माझे इथले थिसीसचे मार्गदर्शक असलेल्या, प्राकृत-संस्कृत व्याकरणाचे नामांकित जर्मन भाष्यकार पौल थिमे यांचे विद्यार्थी असलेल्या डॉ.थॉमस ओबर्लीज यांच्याStudien zur Indologie und Iranistik या पुस्तकात व त्यांच्या प्राकृत-संबंधीच्या लिखाणातही किंवा अनेक अभ्यासकांनी असे आवर्जून नमूद केले आहे की प्राकृतच्या अनेक रिटेण्ड रूपांतून तिचा ऋग्वेदशी संबंध सिद्ध होत असला तरी ऋग्वेदाची भाषा कुठल्याही एका प्राकृत बोलीसमुहाशी जोडणे अतिशय बेजबाबदारपणा ठरेल. आणि आपण दिले असलेले किंवा एरवी देत असलेले संदर्भसुद्धा आदरणीय अभ्यासकांचे असले तरी पुलाखालून पाणी वाहत गेले आहे. ते तुलनेने खूप जुने झाले आहेत-असतात. त्यानंतर ऋग्वेदीय भाषाशास्त्र किंवा सातवाहन वगैरे इतिहास यांच्यावर नव्याने प्रकाश टाकणारे विपुल संशोधन भारतीय व जागतिक स्तरावर बरेच झाले आहे.
  तस्मात्, अशी बेधडक विधाने बुद्धिभेदजनक वाटतात. आपला हेतू तसा नसला तरी नकळतदेखील तसे होणे मला पटणारे नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. हेमंतजी, मतभेदांचे स्वागतच आहे...मी उपरोक्त लेख वृत्तपत्रासाठी लिहिला असल्याने तेथे संदर्भांची रेलचेल उडवणे हे अप्रशस्त आहे. पुलाखालून वाहून गेलेले व वहात असणा-या पाण्याचे मलाही भान आहे. ऋग्वेदाची भाषा मुळात संस्कृत असू शकत नाही असे विधान मी "बेधडकपणे" केलेले नाही. छंदस, भाषा या नांवाने ओळखल्या जाना-या (संस्कृत हे नांव मिळण्याआधी) भाषेला एकही प्रादेशिक अथवा वांशिक संदर्भ नाही जो अन्य सर्वच जागतीक भाषांना अपरिहार्यपणे आहे. व्रचदा सिंधी ही अपभ्रंश भाषा आहे असे विद्वत्मत मलाही माहित आहे, परंतू उपरोक्त लेख लिहिल्यानंतर अधिकचे जे पुरावे समोर आले त्यानुसार "सिंधुई" असे सिंधी भाषेचे मुळ रुप आहे हे लक्षात आले...पण तरीही व्रचदा सिंधी ही अपभ्रंश भाषा आहे हे सिद्ध झालेले नाही... कोणत्याही प्रदेशात सर्वस्वी भिन्न रुपाच्या भाषा एकसमयी अस्तित्वात नसतात. आर्य सिद्धांत खरा मानला तरच काही प्रमानात आपले मत खरे आहे असे म्हनता येईल...परंतू आर्य हा वंश होता व त्याने कधीकाळी भारतावर आक्रमण केले हा सिद्धांत आता कालबाह्य झालेला असल्याने ऋग्वेदाच्या मूळ भाषेचा निर्वाह कसा लावायचा हा खरा प्रश्न आहे. या विषयावर माझे सविस्तर संशोधन चालुच असून त्यावरील पुस्तकात तुम्हाला ते अवश्य पहायला मिळेल. दरम्यान आपण म्हनता त्याप्रमाणे ऋग्वैदिक भाषेशी प्राकृताच्या संबंधांबद्दल अगदी जर्मन अभ्यासकांचीही काही नवी पुस्तके माझ्या वाचनात आली आहेत. मी तुम्हाला त्यांच्या लिंक्स पाठवतो. माझे अन्य अभ्यासकांपेक्षा पुढचे मत म्हणजे ऋग्वैदिक भाषेवर प्रकृताचे काही सम्स्कार नसून मुलात ऋग्वेद हा आज दिसतो त्या भाषेतच नव्हता...तर आहे हा उत्तरकालीन अनुवाद आहे.

   दुसरे म्हनजे सातवाहन हे अगदी ना. के. बेहरेंसारखे लेखक एकोणिसाव्या शतकात सातवाहन हे शुद्र होते असे स्पष्ट लिहितात तर एकाएकी त्यांना ब्राह्मण ठरवायची घाई, तीही कोलांटौड्या मारत, अजय मित्र शास्त्रींना, विसाव्या शतकात का झाली असावी? तेही फक्त एका शाब्दिक उल्लेखाने? याचा अर्थ ऐतरेय ब्राह्मण, ते पुराणे ते मेगास्थिनिज खोटे बोलतात असेच गृहित धरावे लागेल. सातवाहन काही माझे पुर्वज नव्हेत. मला त्यात पक्षपात करण्याची गरज नाही. असो. आपण आपापल्या पद्धतीने संशोधन करत राहुयात.
   सत्याप्रत पोहोचायचा एकच आणि फक्त एकच मार्ग असतो तो म्हनजे सत्य! आपला संफ़्घर्ष त्यासाठीच आहे. कोणीही सत्याप्रत पोहोचो...पण पोहोचावे हे नक्की!

   Delete
  2. त्यानंतर ऋग्वेदीय भाषाशास्त्र किंवा सातवाहन वगैरे इतिहास यांच्यावर नव्याने प्रकाश टाकणारे विपुल संशोधन भारतीय व जागतिक स्तरावर बरेच झाले आहे.
   तस्मात्, अशी बेधडक विधाने बुद्धिभेदजनक वाटतात. आपला हेतू तसा नसला तरी नकळतदेखील तसे होणे मला पटणारे नाही.
   I totaly agree with Hemant, I am also harping this point.सातवाहन काही माझे पुर्वज नव्हेत. मला त्यात पक्षपात करण्याची गरज नाही. ( AAHO AAPLYA KONACHEHI NAHIT, MAG KA BHANDATOY AAAAAPAN?)
   गरज नाही. असो. आपण आपापल्या पद्धतीने संशोधन करत राहुयात.
   सत्याप्रत पोहोचायचा एकच आणि फक्त एकच मार्ग असतो तो म्हनजे सत्य! आपला संफ़्घर्ष त्यासाठीच आहे. कोणीही सत्याप्रत पोहोचो...पण पोहोचावे हे नक्की!
   VERY TRUE..

   Delete
 17. अत्यंत सुंदर लेख. संजय सर तुमचे अभिनंदन.
  आता राहुल आणि हेमंत विषयी.
  पहिला मुद्दा असा कि संजय सोनवणी ह्यांचा लेख वाचून झाला तसा तुम्हा दोघांचे काही लिखाण वाचनात आलेले नाही. तुम्ही हि लेख लिहून आम्हा वाचकांपर्यंत पोहचवत चला म्हणजे सत्या जवळ कोण जास्त गेले आहे ते समजेल. राहुल तुम्ही पुस्तक लिहीत आहेत असं म्हणालात. ते मराठीत असेल तर बरे असेल म्हणजे शब्द भेद टाळता येतील. दादाकोंडके स्टाईल ने शब्दांचे खूप वेगवेगळे अर्थ निघतात. तसे व्हायला नको. बौद्धिक चर्चा व्हावी. ती गरजच आहे. म्हणून चर्चा करताना कोणी हि मनात उदास भाव ठेऊ नये. आपण सर्व शेवटी सत्याकडे जाणार आहोत.
  आता संजय सोनवणी यांस. तुमचे ब्लॉग वरील सगळे लेख वाचून झालेले आहेत. वाचकांस समजतील असे अतिशय सुंदर लिखाण तुम्ही करता ह्यात कुठलीहि शंका नाही.
  लेख अभ्यासपूर्ण आणि नावीन्यपूर्ण असतात. तुम्ही असेच लिहीत चला आणि आम्ही असेच तुम्हाला फॉलो करत चालू. तुम्ही अत्यंत उत्कृष्ट इतिहास संशोधक आहात.
  मी ज्याचे लेख वाचेल त्यालाच खरं समजून चालेल. त्यामुळे इतरांची हि खूप लिहावे म्हणजे सत्य सर्वांना कळेल. सर्वांना शुभेच्छा.

  ReplyDelete