Wednesday, February 20, 2013

मल्हाररावांचा "धोतरबडवी सल्ला" किती खरा?


 मल्हाररावांनी जनकोजी शिंद्यांना दिलेला "धोतरबडवी सल्ला" इतिहासात फार गाजलेला आहे.
 "सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचें चरित्र" या १८९३ साली प्रकाशित झालेल्या मुरलीधर मल्हार अत्रे लिखित ग्रंथाची नवी आवृत्ती १७ मार्च रोजी प्रकाशित होत आहे. सदर ग्रंथाला माझी प्रस्तावना असून त्यातील धोतरबडवी प्रकरणाबद्दल विश्लेशन करणारा हा काही अंश... 


मल्हाररावांबाबतचा दुसरा आक्षेप म्हणजे मल्हाररावांचा जनकोजी व दत्ताजी शिंदे यांना दिलेला "धोतरबडवी सल्ला". हे प्रकरण जरा मुळातुन तपासून पाहिले पाहिजे. सर्वप्रथम ही बाब लक्षात घ्यायला हवी कि याबाबतची माहिती फक्त "भाउसाहेबांची बखर" मद्धे येते. जनकोजी व मल्हाररावांची भेट १० आगष्ट १७५८ रोजी राजपुतान्यात झाली. या भेटीचे बखरीतील वर्णन असे:
"...ते समयी जनकोजी शिंदे यांनी अर्ज केला कीं, "सुभेदार, तुम्ही आम्हांस वडील आहां, तुम्ही अटकेपावेतों मुलूख काबीज केला. आम्हास मोहिमेस असुदें (स्वतंत्र) कोणते?" तेंव्हा मल्हारराव यांनी उत्तर केले की, "तुम्हांस एक आहे. भागीरथीस पूल बांधुन अयोद्येवर जावे. सुजाउद्दौला यास तंबी पोंचवून पाहिजे ते रुपये मिळतील. रान असुदें आहे." जनकोजी यांनी उत्तर केलें की, "भागीरथीस पूल बांधने कसें घडेल?" तेंव्हा मल्हारराव यांनी सांगितले की, "नजीबखान रोहिला यास हाती धरून त्याचे हातून हे काम करुन घ्यावे." हे वचन ऐकतांच जनकोजी यांनी जाबसाल केला कीं, "नजीबखान रोहिला मात्रागमनी जन्मस्थानी लघुशंका करणार. गाजुदीखान याचे येथें वाढला त्याचें सार्थक केलें ! हें तुम्ही जाणतच आहां. त्यांत कार्यातुर होऊन काळावर नजर द्यावी तरी खावंदांचा द्रोहीं. त्यांनी आम्हांस मोहीम नजीबखान याजवरील नेमून दिली आहे, असें असता हें कर्म केलीयास श्रेष्ठ स्वामीद्रोही व्हावें. त्यांत आम्हांकडे केवळ शिलेदारी कर्म नाहीं. आम्ही सरकारचे पागेचे बारगीर असें आहे. आम्हांकडून हा विचार घडू नये. " असें म्हणताच मल्हारराव यांनी उत्तर केलें की, " बाबा, तुमचा मुल स्वभाव. अटकेपासून रामेश्वरपर्यंत एकछत्री राज्य जाहाले. हिंदुस्थानात एक नजीबखान मात्र मूळ राहीले आहे. त्याचे पारिपत्य केलिया पेशवे अटकेपासून जासुदा हातून पैसा आणवतील. मग तुम्ही आम्ही सहजच निर्माल्यवत जाहलों. मग कोणी पुसणार नाहीं. यास्तव एवढे खूळ रक्षून जें करणे तें करावें."
आता हीच बखर पुढे काय सांगते हे पाहुयात. जनकोजीनंतर मल्हारराव व दत्ताजीची भेट उज्जैन येथे झाली. या भेटीचा बखरीतील हा वृत्तांत:
 '..................उपरांतिक दत्ताजी शिंदे यांनी मल्हारराव यांस प्रश्न केला कीं, " सुभेदार तुम्ही अटकेपावेतो मुलुख काबीज केला. आतां आम्हांस मोहिमेस असूदे रान कोणते आहे ?"  तेव्हां मल्हारराव यांनी सांगितले कीं, " यावीशी सूचना जनकोजी शिंदे यांस सांगितली आहे आणि तुम्हांसही सांगतो कीं, नजीबखान रोहिला यास हाती धरून भागीरथीस पूल बांधोन पुलापलीकडे अयोध्या व ढाका व बंगाला व काऊर देश पावेतो मोहीम करावी. रानही असूदे आहे. पैसा पाहिजे तितका मिळेल. आणि सुजाउद्दौला यांस तंबी पोंचवून भागीरथी पलीकडील अर्धा मुलुख घ्यावा. त्यांत दहा - पांच किल्ले भारी असतील त्यांत ठाणी घालावी. म्हणजे चित्तास येईल तेव्हां श्वेतबंधासारिखे ( सेतूबंध ) जावयास यावयास येईल. हें न करिता तुम्ही नजीबखान याचे पारिपत्य कराल.  तर तुम्हांस पेशवे धोत्रे बडवावयास लावतील. "
सरदार विंचुरकरांशीही दत्ताजीचा वरीलप्रमाणेच संवाद झाला असेसुद्धा ही बखर सांगते.
आता जनकोजी व दत्ताजीशी झालेल्या संवादात किरकोळ फरक सोडले तर आशय एकच आहे. या संवादावरुन पेशवे आणि होळकरांत संशयाचे वातावरण होते असे नि:ष्कर्ष इतिहासकार अत्यंत आनंदाने काढतात व होळकरांच्या स्वार्थबुद्धीपायी दत्ताजी शुक्रतालावर अडकला आणि बळी गेला असेही म्हणतात.
निर्माण होणारे प्रश्न असे कि, उत्तरेत हयात घालवलेले दत्ताजी व जनकोजी एवढे मुर्ख होते काय कि स्वतंत्र मोहीम कोठे करावी हे त्यांना समजत नव्हते? परत वर एकीकडे हेच इतिहासकार सांगतात कि शिंदे व होळकरांत बेबनाव होता. मग याच इतिहासकारांना हा प्रश्न पडला नाही काय कि दत्ताजी व जनकोजी होळकरांचा सल्ला ऐकून कसे कोनतीही स्वतंत्र मोहीम ठरवतील? आणि एकाच आशयाच्या चर्चा जनकोजी, दत्ताजीशी कशा होतील? मग विंचुरकरांनीही तसाच सल्ला दिला असेही ही बखर म्हणते...त्यांचे काय? थोडक्यात ही "धोतरबडवी" मसलत साफ बनावट आहे. ती मल्हाररावांचा, विंचुरकरांचा व शिंदेंचाही साफ अवमान करणारी आहे.
खरे तर भाऊची बखर किती अविश्वासार्ह आहे हेच यातून साबीत होते. पानीपत युद्धानंतर सर्व पापे मल्हाररावांच्या माथी मारून टाकायच्या कटाचा हा भाग दिसतो.  यावरुन धोतर बडवी मसलत बनावट आहे हे तर सिद्ध होतेच.
मग शिंदेंनी सुजावरची मोहीम हाती का घेतली?
या प्रकरणाचा खरा सुत्रधार आहे नानासाहेब पेशवा. पेशव्याने अटखस्वारीच्या दरम्यान दादासाहेबास पत्र लिहिले कि, "तुम्ही आहा तेथे पैसा मिळण्यास जागा राहिलेली नाही, सबब बाजदबरसात पूर्वेकडे जावून पटणे प्रांत जरुर घ्यावा."
नानासाहेब पेशव्यांनी २ मे १७५९ रोजी दत्ताजीला पाठवलेल्या पत्रात दिलेला आदेश पहा: "... कदाचित तो करारात वाकडा वर्तत असला तर मात्र मातबर लाभ पुर्ता दृष्टीस पडला तरच सुजातद्दवलास हाती धरावे. परंतु काशी, प्रयाग हरतजविजेने साधावी. विशेष काय लिहिणे. कर्जाची चिंता दतबास असेलच. जाणिजे. लेखनसीमा."  ( संदर्भ :- मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय = संपादक - अ.रा.कुलकर्णी )
राघोबादादा शहाणे होते, त्यांनी पेशव्याचे ऐकले नाही. ते पुण्याला निघून आले. पण दत्ताजी शिंदेंना मात्र सरकारच्या कर्जनिवारणाची चिंता होती, म्हणुन पुर्वेकडील कामगिरी त्यांनी पेशव्यांच्या इच्छेनुसार स्वीकारली. याशी मल्हाररावांचा काय संबंध?
दुसरे म्हणजे शुक्रताल येथे दत्ताजी शिंदे अडकून पडला असता मल्हाररावांनी तुकोजी होळकरांना सैन्यासह त्याच्या दिमतीला पाठवलेले होतेच. त्यामुळे होळकरांचा सल्ला ऐकून दत्ताजी फसला आणि त्याने पुर्वेकडची कामगिरी हाती घेतली म्हणुन त्याचा मृत्यू ओढवला या आरोपात काहीएक तथ्य नसल्याचे दिसून येईल.

Also read:
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_20.html

15 comments:

  1. खरे तर भाऊची बखर किती अविश्वासार्ह आहे हेच यातून साबीत होते. पानीपत युद्धानंतर सर्व पापे मल्हाररावांच्या माथी मारून टाकायच्या कटाचा हा भाग दिसतो. तसेच हा आरोप करण्याच्या नादात बखरकाराने अटकेच्या स्वारीचे श्रेय मल्हारराव होळकर यांचेच होते हे अनावधानाने सांगून टाकले आहे. यावरुन धोतर बडवी मसलत बनावट आहे हे तर सिद्ध होतेच. शिवाय अटकेपार झेंडे कोणी फडकवले याचे ही स्पष्ट उत्तर भाऊसाहेबांची बखर नजरचुकीने का होईना पण देते.
    aapli malharrao holkar yanche prati aasleli nishta aani prem disun yete. pan mag aapan bhauchi bakhar unbelievable manata aani tatil aapla soyicha kinva malhararao chya gauravacha bhag khara manata. i have observed your writing for so many years, its completely partial and biased. to protect malharba , u have taken lot of efforts , one way that is admirable but when the question comes to equate the profs, you weigh your weight in favour of malharba . this is not a good sign of a history writer or commentator.according to your interpretation of bhau bakhar , the victory upto attock is due to malharba and panipat defeat is due to sadashiv rao bhau.. all other writing of bhau bakhar is an unbelievable writing. all new history writers must take lessons from you .

    ReplyDelete
    Replies
    1. मनुष्य खोटे बोलतांना एखादी तरी बाब नकळत सुचवून जातो हा मानवी स्वभाव आहे. भाऊ बखरीतील हा धोतरबडवी सल्ल्याचा भाग अत्यंत अतार्किक आणि म्हणुणच बनावट आहे हे उघड आहे. पण ती बनावटगिरी करतांना मल्हाररावांना अटकेचे श्रेय दिले आहे, हेही नाकारता येत नाही. आणि वास्तवात होळकर-शिंदेंच्या मुळेच अटक प्रकरण यशस्वी झाले हेही अमान्य करता येत नाही. अतकेवरुन मराठे सैन्य परत आले तरी तेथील व्यवस्था ठेवायला व सीमा सांभाळायला तुकोजी होलकर आणि साबाजी शिंदेच दीड-दोन वर्ष तेथे होते हेही वास्तव आहेच!

      Delete
  2. बखरकाराने अटकेच्या स्वारीचे श्रेय मल्हारराव होळकर यांचेच होते हे अनावधानाने सांगून टाकले आहे.
    why the writer of bhau's bakhar will lie? and even if he wanted to make false statements then he will not by any mistakes write the above statement . in your previous article , you degrade the victory of attock and degrade the raghobadada..now you are giving the credit to malharba.. do you want to fool all your readers?your all articles about the panipat are full of contradictory statements, i request you to kindly check all articles and writing again and then decide your opinion( it may be wrong) but atleast you will not confuse others and yourself.

    ReplyDelete
    Replies
    1. Look at the sequence of Bakharkar's writing and what it indicates. Attock episode anyway didnt help maratha (peshva if you like) empire but amassed huge loan. Here we are not talking its monetary relevance but how Attock was won and the people who actually led it.

      Delete
  3. on 4 march 1760 , abdali's sardar jahankhan defeated malharaba and shinde at shinkadarabad. this was the last nail in the coffin of the northern maratha empire , so the maratha army on 13 march 1760 left for north. jankoji, damaji gaikwad, malharba ,yashwantrao pawar etc joined this army midway. according to rajwade , malharba has failed to fulfill his duties, the declaration of abdali and poet mit in hid autobiography depicted malharba as a bhagoda-i.e.run away from battle,in panitchi bakhar,holkar yachya thailya aani vinchurkar gharanyacha ethihas , all are saying that the malharba left with parvatibai as he was told by bhau to take his wife safely back, riyasatkar wrote that as per the promise by the najib , he save the life of malharba. Prof. Shejawalkar wrote that as per the situation malharrao safely escapes and returned back and it was a right thing done by him. in panipatchi bakhar ( raghunath yaday ) edited by Dr. R.V.Herwadkar , venus publication ,edition 3 rd, 1997 july, on page no 42,it is clearly written as follows -- parvati bai and other womens with some servants were at the back end with 10000 person with malharrao holkar. this version clearly throw light on the battle of the panipat and why the malhar rao escape without any hurt or injury. now its upto each person to make or write his own version . however one thing is crystal clear that that subhedar malharba left the battle ground ( when? why? on who's order? or whether he simply run away? ) i am not blaming malharba alone for the defeat of panipat, there are many aspects and reasons , but to glorify one person and de glorifying another should not be allowed and never be tolerated, and that too with taking suitable references should be strongly criticised. NOW A DAYS THE NEW BREED OF SELF DECLARED HISTORY WRITERS HAS EMERGED WITH A SINGLE AGENDA TO DEGRADE ALL BRAHMIN PERSONALITIES AND THEIR WORK. IN SHORT WHENEVER THE BATTLE WAS WON UNDER THE BRAHMIN PESHAWA OR SARDAR, IT WAS WON BY THE MARATHA ARMY, AND WHEN THE MARATHA ARMY DEFEATED THEN THE BRAHMIN SARAR OR PESHAWA HAS TO BLAME. JINKALE TE MARATHE AANI HARLE TE PESHVE HI NAVIN MHAN (PHRASE) HAS BEEN CREATED BY THESE IDIOTS. AND ALL THEIR WRITING IS BASE ON THIS PRINCIPLE, SO I REQUEST YOU TO NOT JOIN THAT WAGON OF FOOLS.

    ReplyDelete
    Replies
    1. Now you are telling false things. First Holkar had captured Sikandarabad and recovered tribute. Gangobatatya was sent to loot Abdali's treasure and he was defeated in that endeavor. It didnt make any difference as after Sikandarabad episode only Abdali started negotiations.

      Delete
  4. please read again, I have given the date of battle of Sikandarabad, you are not giving anything and by mistake admited that previously you was lying.... , if you are writing a novel then I will not object to your any fantastic ideas but if you write a historical article then you must prove it with evidence , and not only by selective evidence( which is your bad habit). IT IS BEEN OBSERVED BY ME IN ALL YOUR HISTORICAL WRITINGS , YOU ARE TAKING SELECTIVE REFERENCES. YOU HIMSELF BECOME JUDGE AND DISCARD UNSUITABLE EVIDENCE AS FALSE AND USE THE SUITABLE INCIDENT OF THE SAME WRITER AS TRUE.

    ReplyDelete
  5. मल्हाररावांबाबतचा दुसरा आक्षेप म्हणजे मल्हाररावांचा जनकोजी व दत्ताजी शिंदे यांना दिलेला "धोतरबडवी सल्ला". हे प्रकरण जरा मुळातुन तपासून पाहिले पाहिजे. सर्वप्रथम ही बाब लक्षात घ्यायला हवी कि याबाबतची माहिती फक्त "भाउसाहेबांची बखर" मद्धे येते. जनकोजी व मल्हाररावांची भेट १० आगष्ट १७५८ रोजी राजपुतान्यात झाली. या भेटीचे बखरीतील वर्णन असे:
    WHICH EDITION YOU ARE REFERRING? NEVER GIVE THE DETAILS OF EDITOR AND PUBLICATIONS. PLEASE PROVIDE THE ALL DETAILS .

    ReplyDelete
    Replies
    1. First blame those who always misrepresented history! And this is preface...all the evidences are in the book...

      Delete
    2. Dear Sanjayji, I am eager to know which edition and publication you are using and the name of the editor also, why you always evade such questions and write absurd? tell me who has written the wrong history as per your opinion,I will not hesitate to protest AND WILL WRITE ARTICLE ON THAT ALSO. YOU ALWAYS SELECT SUITABLE HISTORY FROM HISTORICAL BOOKS. EXAMPLE IS YOUR ABOVE ARTICLE. IF WE START INTERPRETING EACH AND EVERY WORD AND THAT TOO WITH SUITABLE MEANING THEN THERE IS NO POINT IN IT.

      Delete
    3. राहुलजी, तुमची समस्या ही आहे कि तुम्हाला हवा तसाच इतिहास तुम्हाला वाचायला आवडतो. भाऊ बखर र. वि. हेरवादकरांनी संपादित केली असून १९९० ची व्हिनस प्रकाशनाची आव्रुत्ती मी जरी रेफर करत असलो तरी इतर काही आवृत्त्यांतही कानामात्र्याचा फरक नाही हे तुम्हाला माहित नसेल असे वाटत नाही. द्य्सरे म्हनजे २८ फेब्रुवारी १७६० ला होळकरांनी सिकंदराबाद लुटुन फस्त केले व खंदणीही वसूल केली. तेथेच त्यांना बातमी मिलाली कि नजीबखानाचा दहा लाखांचा खजिना अब्दालीकडे निघाला असून अनुपशहरी जाणार आहे. या खजिन्याच्या लुटीची जबाबदारी गंगोबातात्यावर सोपब्वण्यात आली व होळकर-शिंदे मथुरेच्य दिशेने निघून गेले. तुम्ही म्हणता त्या ४ मार्च रोजी जहानखानने गंगोबातात्यावर छापा मारला. गंगोबातात्या या छाप्यातून निसटुन गेला पण शेट्याजी आणि त्याचा मुलगा फकीरजी या लढाईत कामी आले. याला तुम्ही जर शिंदे होळकरांचा पराभव म्हणत असाल तर अवघड आहे. होळकर-शिंदे अब्दालीशी गनीमी काव्याने युद्ध देत होते...कोठे वार करत होते तर कधी अब्दालीला पाठीवर घेत होते. मल्हारराव त्यावेळी वृद्ध होते, तरीही ते बयाना येथे मथुरेवरुन आग्रा करत गेले कारण जाट-रजपुतांची मदत अब्दालीला मिळु नये. असो, ज्यांना ऐकायचेच नसते त्यांना सांगून तरी काय उपयोग?

      Delete
    4. DEAR SANJAYJI, ONE CANN'T PURCHASE ALL BOOKS, SO THE REFERENCE'S IS REQUIRED, OTHERWISE IT IS DIFFICULT TO UNDERSTAND THE TRUTH AND FALSE. I ALREST WRITTEN IN MY ONE OF REPLIES TO YOU THAT IF YOU WRITE A HISTORICAL NOEV ON PANIPAT ( WHICH YOU HAVE WRITTEN) IN SUCH CASE THERE IS NO POINT TO ARGUE, BUT YOU WRITE AN ARTICLE THEN YOU MUST GIVE THE REFERENCES.

      Delete
  6. राहुलजी, तुमची समस्या ही आहे कि तुम्हाला हवा तसाच इतिहास तुम्हाला वाचायला आवडतो.
    reply__ not at all.. I want the truth, based on the solid proofs and evidences.
    द्य्सरे म्हनजे २८ फेब्रुवारी १७६० ला होळकरांनी सिकंदराबाद लुटुन फस्त केले व खंदणीही वसूल केली. तेथेच त्यांना बातमी मिलाली कि नजीबखानाचा दहा लाखांचा खजिना अब्दालीकडे निघाला असून अनुपशहरी जाणार आहे. या खजिन्याच्या लुटीची जबाबदारी गंगोबातात्यावर सोपब्वण्यात आली व होळकर-शिंदे मथुरेच्य दिशेने निघून गेले. तुम्ही म्हणता त्या ४ मार्च रोजी जहानखानने गंगोबातात्यावर छापा मारला. गंगोबातात्या या छाप्यातून निसटुन गेला पण शेट्याजी आणि त्याचा मुलगा फकीरजी या लढाईत कामी आले. याला तुम्ही जर शिंदे होळकरांचा पराभव म्हणत असाल तर अवघड आहे. होळकर-शिंदे अब्दालीशी गनीमी काव्याने युद्ध देत होते...कोठे वार करत होते तर कधी अब्दालीला पाठीवर घेत होते. मल्हारराव त्यावेळी वृद्ध होते, तरीही ते बयाना येथे मथुरेवरुन आग्रा करत गेले कारण जाट-रजपुतांची मदत अब्दालीला मिळु नये. असो, ज्यांना ऐकायचेच नसते त्यांना सांगून तरी काय उपयोग? here the question is --- the above para is from which book or its your own research? for the last sentence-I think you are writing a article , so everybody has right to question you the genuineness about the contents. YOU MEAN TO SAY THAT ONCE YOU HAVE PENNED IT , ITS 100% RIGHT ,NOBODY SHOULD ARGUE WITH YOU. THIS IS LIKE A TALIBAN OR DICTATORIAL VERSION.

    ReplyDelete
  7. जावद्या सर, या लोकांना इतीहास फक्त त्यांच्याच सोयीने वाचायला आवडतो,
    कारण खरा इतीहास अभ्यासायची बुद्धी यांच्याकडे नसावी.

    ReplyDelete
    Replies
    1. who the hell are you? if you don't have manners then don't comment Mr.Anand Kokare..
      asking the proofs does not mean that the history should be written as per one's like or dislike..YOUR FILTHY COMMENT SHOWS HOW MUCH YOU ARE INTELLIGENT.., DEAR SANJAYJI.. I AM HERE NOT FOR ANY DISPUTE, I LIKE YOUR WRITING( SOMETIMES EXAGGERATED), BUT I RESPECT THE FREEDOM OF A WRITER.. IF YOU FEEL THAT I HURT YOU , I AM QUIETING MY WRITING AS YOUR MOST OBEDIENT PUPIL HAS TOLD YOU TO NOT TO LISTEN TO ME , AND I HAVE LOT OF BETTER THINGS TO DO.. THANKS FOR GIVING OPPORTUNITY TO EXPRESS MY VIEWS..

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...