Saturday, September 26, 2015

जनांचा राम जनांचाच रहावा...



वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे कि राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही पुष्कळ संशोधन करण्याचे प्रयत्न झाले आहेत. रामायणातील ग्रह-नक्षत्रस्थितीनुसार प. वि. वर्तकांनी रामजन्माची तारिख इसपू ४ डिसेंबर ७३२३ अशी काढली होती. कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलिकडे नेत नाहीत. भारतीय पुरातत्ववेत्ते एच. डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत. पण अलीकडेच इंस्टिट्यूट ओफ सायंटिफ़िक रिसर्च ओन वेदाज या संस्थेने प्ल्यनेटोरियम संगणक प्रणाली वापरत रामाचा जन्म इसपू १० जानेवारी ५११४ रोजी झाल्याचा दावा केला आहे. हे विधान शास्त्रीय वाटत असल्याने, संगणक-प्रणालीवर आधारित असल्याने रामकाळ पुरातन आहे असे सिद्ध झालेच आहे असे समजून "वैदिक" आनंद वाढला असल्यास आश्चर्य नाही. पण हे "संशोधन" प्रसिद्ध होताच वैदिक गोटातुनच वैदिक ज्योतिषवेत्ते श्री. नर्तक गोपाळ देवी दासी यांनी रामायणातीलच ग्रह-नक्षत्र पुराव्यांवरूनच १० जानेवारी ही तारिख चुकीची आहे असे दाखवून देत  संगणक प्रणालीत काहीतरी विसंगती आहे असे प्रतिपादन केले आहे. म्हणजे रामायणातील एकाच उल्लेखावरून केली गेलेली गणिते वेगवेगळे निष्कर्श देतात हे कसे याचे उत्तर मिळत नाही.

असो. भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्न करण्याची हौस आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलिकडे जात नाहित हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खो-यातील काही लोकांनी गंगेच्या खो-यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पुर्वी हा भाग ग्रामीण संस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी. बी. लाल यांनी केलेली उत्खनने त्यासाठी अभ्यासयोग्य आहेत. रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पुर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते. तरीही आपण या तारखेच्या दाव्याचा रामायणातीलच प्रमाणांच्या आधारावर पुनरावलोकन करु.

पहिली अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आता जे वाल्मिकी रामायण आपल्यासमोर आहे त्यातील बालकांड व उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असे बव्हंशी विद्वानांनी मान्य केले आहे. यातील रामाचे दैवतीकरण, जे अन्य कांडांत आढळत नाही ते या दोन्ही कांडांत असून भाषाशैलीही वेगळी आहे. शिवाय रामायणाचे अखेरचे संस्करण इसवी सनाच्या चवथ्या शतकात झाले अशीही विद्वमान्यता आहे.

रामाचा जन्म पुनर्वसू नक्षत्रावर पाच ग्रह उच्चीचे असतांना चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी माध्यान्ही झाला असे प्रक्षिप्त व उत्तरकालीन रचना असलेल्या बालकांडात नमूद आहे. जानेवारी महिन्यात चैत्र येवू शकत नाही हे उघड आहे. म्हणजेच प्रक्षिप्त असलेल्या बालकांडातील एक तर तिथीच चुकीची आहे किंवा १० जानेवारी ५११४ ही तारिख तरी समूळ चुकीची आहे. म्हणजे, तिथी बरोबर असेल तर १० जानेवारी ही तारिख येणार नाही आणि तिथीच चुकीची असेल तर, कितीही काटेकोर असले तरी, संगणकीय उत्तरांना अर्थच राहणार नाही. ही गफलत आधी विचारात घ्यायला हवी आणि म्हणूनच वैदिक ज्योतिषीही ही तारीख मान्य करत नाहीत.

दुसरे म्हणजे ग्रहांची समस्या. भारतियांनी राशी व ग्रह हे ग्रीकांकडून घेतले. वेदांमद्ध्ये ग्रहांचा निर्देश नाही. वैदिक साहित्यात नाक्षत्र कालगणना आहे. ग्रहाधारित पंचांग प्रथम "यवनजातक" या अनुवादित पुस्तकातून प्रथम आपल्याकडे आले ते इसवी सनाच्या दुस-या शतकात. रामायणातीत तिथी ही ग्रह-नक्षत्राधारित आहे. भारतियांना ग्रह-राशीच इसवी सनापुर्वी माहित नव्हत्या तर "पाच ग्रह उच्चस्थानी असता..." हा उल्लेखच उत्तरकालीन आहे, ग्रीकांशी संपर्क आल्यानंतरचा आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच ही तिथी "बनवण्यात" आली असून ती मुळात वाल्मिकीची नाही. बनावट तिथीवरून शोधलेली कोणतीही प्रमाणे बनावटच असणार हे उघड आहे.

याशिवायचे महत्वाचे प्रमाण म्हणजे रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणुसच कोठे होता? युगसंकल्पना मोहक असली तरी भ्रामक ठरते ती यामुळेच.

आता आपण रामसेतुकडे वळू. रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा तरंगत्या पाषाणांचा पूल वानरसेनेने बांधला अशी एक श्रद्धा आहे. श्रद्धेचे वास्तवाशी काही घेणेदेणे असतेच असे नाही. हा वालुकाष्मांनी बनलेला पुल मानव निर्मित नाही. मानारच्या उथळ सामुद्रधुनीतुन जाणारी ही रांग एके काळी श्रीलंका भारतीय उपखंडाशी जोडला होता असे दर्शवते. नासानेसुद्धा २००२ साली हा पट्टा नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही असेच म्हटले होते. कार्बन डेटींगनुसार या सेतूचे वय साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणने मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरेल हे उघड आहे.

आता आपण खुद्द रामायणातील विसंगत्यांचा वेध घेऊयात. रामायणाच्या उपोद्घातातच, एकदा नारदमुनी भेटायला आले असता वाल्मीकी त्यास विचारतात कि, "हे मुनिश्रेष्ठा, सांप्रत पृथ्वीवर गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवचनी आणि कोपला असता देवांतही भिती उत्पन्न करणारा असा गुणसंपन्न पुरुष कोण आहे?" यावर नारदमुनी म्हणतात, "इक्ष्वाकू वंशात जन्मलेला राम हा तुम्ही विचारता तसा आदर्श पुरुष आहे." वाल्मीकींच्या विनंतीवरुन नारदाने रामचरित्र सांगितले. नंतर क्रौंचवधाची घटना घडली व आदिकाव्य जन्माला आले. तदनंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वाल्मीकीने रामकथा लिहायला घेतली. या काव्याचे मुळचे नांव "पौलत्स्यवध" असे होते. यावरून एक बाब दिसते ती अशी कि वाल्मीकीला नारदाने सांगेपर्यंत रामकथा माहितच नव्हती. पण प्रत्यक्ष रामायणात वाल्मीकी हेही एक प्रत्यक्ष घटनांत भाग घेणारे पात्र आहे. म्हणजे वाल्मीकीला राम माहितच आहे. असे असतांनाही उपोद्घातातील कथा येते ही मोठी विसंगती नाही काय? मुळच्या वाल्मीकी रामायणातही फार मोठे फेरबदल केले आहेत याचेच ही विसंगती म्हणजे निदर्शक आहे.

शिवाय रावणाची लंका कोणती यावरही अनेक विद्वानांनी संशोधन केले आहे. माधवराव किबे यांचे म्हणने असे आहे कि रामायणातील लंका ही श्रीलंका नव्हे कारण रामायणाचा सारा अभ्यास केल्यानंतर रामाचा एकुण प्रवास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त झाल्याचे दिसत नाही. विंध्य पर्वताच्या अमरकंटक शिखराच्या आसपास छत्तीसगड भागातच ही लंका वसली असावी. या भागातील अनेक आदिवासी जमाती स्वत:ला रावणाचे वंशज म्हणवून घेतात हेही येथे उल्लेखनिय आहे. पुरातत्ववेत्ते एच. डी. सांकलियाही रामायणातील लंका ही विंध्य पर्वतराजीतील एखाद्या मोठ्या तलावापारची वा नदीपारची नगरी असावी असे मत व्यक्त करतात. आपली मते सिद्ध करण्यासाठी त्यांनी रामायणांतर्गतच येणा-या वर्णनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे रावणची लंका नेमकी कोणती हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो हेही येथे लक्षात घ्यायला पहिजे.

खरे म्हणजे मूळ रामकथा ही एक वीरकाव्य (पवाडा) अथवा लोककथा स्वरुपात जनमानसात लोकप्रिय होती असे आता अनेक विद्वान मानतात. तिची विविध प्राकृत संस्करणेही वेगवेगळ्या भागांत प्रचलित होती. वाल्मीकीने त्यांचे संकलन करत आपल्या प्रतिभेने इसवी सनाच्या दुस-या किंवा तिस-या शतकात रामकथा पाच कांडांत फुलवली. या कांडांत राम दैवी अवतार असल्याचे कसलेही सुचन नाही. "पौलत्स्यवध" या नांवावरुन त्यात रावणाच्या मृत्युच्या घटनेपाशीच ही कथा संपत होती असे दिसते. गुप्तकाळात वैष्णव संप्रदायाला जोर चढल्यानंतर त्याला बालकांड व उत्तरकांड जोडण्यात आले व रामाचे दैवतीकरण करण्यात आले.

अन्य भागांतही महाकाव्य स्वरुपात प्राकृत भाषांतही व जैन-बौद्ध धर्मिय साहित्यातही रामकथा प्रचलित होती. पण प्रत्येक ठिकाणी रामकथेने वेगवेगळी रुपे घेतली. ती त्यांना उपलब्ध असलेल्या मुळ वीरकाव्याच्या प्रादेशिक/भाशिक रुपांतरांच्या आधारावर वेगवेगळी बनली. उदाहरणार्थ बौद्धांच्या अनामकजातकात सीतात्यागाचा उल्लेख नाही. जैन रामायणातही वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक प्रसंग आहेत. शिवाय वाल्मिकी रामायणाचेही अनेक पाठभेद आहेत. सध्या भांडारकर प्राच्य विद्यामंदिराने तयार केलेले रामायणाचे एक प्रमाणित संस्करण उपलब्ध आहे.

वरील सारांशरुपाने केलेले विवेचन पाहता, बालकांडातील तिथी प्रमाण मानून जी तारीख काढण्यात आलेली आहे ती विश्वसनीय ठरत नाही. राम ही अगदी ऐतिहासिक व्यक्ती होती असे गृहित धरले तरी ती मुळात महाकाव्यातून नव्हे तर लोककाव्यातून लोकप्रिय झालेली व्यक्ती आहे हे स्पष्ट दिसते. लोकप्रिय लोककथांवर/जनकाव्यांवर महाकाव्याचे साज आपापल्या प्रतिभेने महाकवींनी चढवले आहेत, पण काल्पनिकतेत सत्य व कथेचे मूळ हरवून जाते. त्यामुळेच विविध रामकथांत विसंगत्या व कथावस्तुत फरक दिसतात. राम ही सर्व भारतियांत सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे हे सत्यच आहे. जवळपास प्रत्येक गांवात वनवासाच्या काळात राम-सीता येवून गेलेले असतात. सीता न्हाण्याही असतात. महिलांच्या ओव्यांतुनही राम-सीता असतात. राम-सीतेची ही लोकप्रियता संस्कृतातून प्राकृतात आलेली नसून प्राकृत लोकसाहित्यातुनच आलेली आहे असे स्पष्टपणे म्हणता येईल. आपापले अजेंडे राबवण्यासाठी रामकथेचा गैरवापर करत स्युडो-सायंसचा वापर करत रामाचा काळ कितीही मागे न्यायचा प्रयत्न केला तरी तो विश्वसनीय असू शकणार नाही, कारण ज्या पायावर हे प्रयत्न होतात तेच मुळात ठिसूळ आहेत. जनांचा राम जनांचाच रहावा...त्याला अजेंड्याचे आयुध म्हणून वापरू नये एवढेच या निमित्ताने म्हणता येईल!

-संजय सोनवणी

(आज महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.)

28 comments:

  1. आप्पा - संजय सर संजय सर , लवकर लवकर , चला , अगदी पट्टक्कन
    बाप्पा - अरे हो हो काय झाले तरी काय ?
    आप्पा - अरे लेख अति सुंदर आहे रामाबद्दल , पण एक छोटीशी चूक - म्हणजे तुमच्या भाषेत प्रिंटींग एरर झाली आहे - रामाचा जन्म १० जानेवारी ५११४ असा दिला आहे . अजून ती तारीख तर यायची आहे ?नाही का ?- वरून सातवी ओळ ! जरा तपासून घ्या म्हणतो मी !
    बाप्पा - अय्यो रामा पप्पा ! किती मोठ्ठी चूक , अहो तुमचं ते थोडं इसपू लिहायच राहून गेलं म्हणतो हो आम्ही . जरा सांभाळून घ्या !
    आप्पा - वोके वोके ! पण म टा मध्ये पण तीच चूक झाली आहे !
    बाप्पा - जाऊ द्या हो आप्पा , इतक कोणी मन लाऊन वाचत नाही . त्यातले तसले किडे तुम्हीच .
    आप्पा - नो नो नो नोनोनो ! आमच्या संजयला पण असल्या चुका आवडत नाहीत . बघ त्याचा खुलासा लगेच येईल की नाही ते !

    ReplyDelete
  2. आप्पा - संजय सर जाता जाता एक गोष्ट आठवली - छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जन्म तिथी विषयी असाच घोळ कै.नरहर कुरुंदकर यांनी अतिशय सुंदर शैलीत एका भाषणात वर्णन करून सांगितला आहे , त्याची क्लीप जमले तर मी आपणास पाठवीन म्हणतो .
    बाप्पा - अरे हो रे हो , किती प्रसिद्ध आहे ते भाषण , सेतू माधवराव पगडी यांची छान फिरकी घेतली आहे त्यात , कै कुरुन्दकर यांची साक्षात वाणी ऐकताना किती गहिवरल्या सारखे होऊन जाते म्हणून सांगू . खरच जमेल तस जमेल त्या वेळेस आपल्या संजयला आपण ती क्लिप पाठवू या ! रणजीत देसाई त्या भाषणाचे अद्ध्यक्ष होते असे वाटते .बाय द वे तुला फोन आला का संजयचा ,
    आप्पा - मला कशाला येईल त्याचा फोन आला तर तुलाच येणार ! थ्यांक्युचा -चूक दाखवल्या बद्दल .

    ReplyDelete
  3. आप्पा - संजय सर हे काय केलेत तुम्ही , आता भोगा आपल्या कर्माची फळे
    बाप्पा - काय झालं काय आप्पा ?
    आप्पा - अरे संजयाने धडधडीत जगप्रसिद्ध लेखक अविनाश पाटसकर यांच्या क्षेत्रात हात मारला , आता बघ संजयाच्या नावाने शंख सुरु होईल . संजयच्या असतील नसतील त्या सगळ्या अवयवांचा उद्धार होईल ,
    बाप्पा - म्हणजे ?
    आप्पा -म्हंजे वाघाचे पंजे , अरे ज्योतिष हे वंदनीय पाटसकर यांचे कार्य क्षेत्र आहे , तिथे फक्त उच्च तद्न्य लोकाना प्रवेश आहे , तेथे आपला संजय गेला आता धुलाई सुरु !
    बाप्पा - 😬☺

    ReplyDelete
  4. आपा-बाप्पा मला संजयला ह्या विषयावर झोडपायची गरज वाटत नाही. ज्योतिष्य हे अचूक काळावर अवलांबून असते. किमान १ तासाची अचूकता तर आवश्यक असते, त्यामुळे सव्वासात हजार वर्षापूर्वी असलेली कुंडली इथे बसून नुसते गणिते करून काढणे अशक्य आहे. ह्या सगळ्यातला एक मुद्दा फक्त पटण्यासारखा आहे तो म्हणजे सव्वासात हजार वर्षापूर्वी जानेवारी महिना हा चैत्र नवमीला येत नव्हता. त्यामुळे अमेरीकेतुन मागवलेले ते सोफ्टवेर कसे काय काम करते ह्याविषयी न बोललेलेच बरे. बाकीचा लेख हा नेहमीच्या लेखासारखाच वैदिक-अवैदिक हाणामारीच्या पार्श्वभूमीचा आहे त्यात नवीन काही नाही. वेदांत ज्योतिष्य नाही म्हणजे हसावे कि रडावे हेच कळत नाही. ऋग्वेदात जोतिष्य नाही असे फारतर आपण म्हणून शकतो पण ऋग्वेदाचा उद्देश मुळात वेगळा आहे. पण जो अग्नी वैदिक पेटवतात त्यालाच अचूक काळ वेळ माहित असावी लागते त्याचे व्यवस्थित वर्णन इतर वेदात आहे. असो. शिवाय ग्रीक लोकांनी ज्योतिष्य इस दुसऱ्या शतकात आणले हेही मोठे गमतीचे विधान आहे. शिवाय त्यामुळे वैदिक आक्रमणाच्या सिद्धांताचा घोळ निर्माण होतो, ग्रीक-यवन लोक फार पूर्वीच भारतात स्थाईक झाले होते. हे इतिहासात आधीच लिहिले आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचे ज्योतिष्य ग्रीकांनी २ र्या शतकात आणल. दुसरीकडे म्हणायचे ग्रीक हे वैदिक नाहीत तर वैदिक हे अफगाणिस्तानातून भारतात आले. बहुतेक मला तर असे वाटायला लागले आहे कि अलेक्झांदर हा दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानातून भारतात आला होता. तो वैदिक ग्रीक नसून तो एक अफगाणी होता आणि तो धर्म प्रचार करण्यासाठी किवा व्यापार करण्यासाठी इथे आला होता. हे सगळे बौद्धिक वाचून आम्हा पामर वाचकांना गणपती बाप्पांनी वाचवावे अशी किंकाळी तोंडातून बाहेर पडते. बाकी एक बळकट मुद्दा शोधून त्याला जोडून बाकीचे तेच तेच मुद्दे पुढे रेटायच हे काम वकील करून खर्याचे खोटे करतात. म्हणून ते काळा कोट घालून फिरतात. आणि सामान्य माणसाच्या डोक्याची मंडई होऊन जाते.

    ReplyDelete
  5. वर संजय सोनवणी म्हणतात कि "भारतियांनी राशी व ग्रह हे ग्रीकांकडून घेतले. वेदांमद्ध्ये ग्रहांचा निर्देश नाही. वैदिक साहित्यात नाक्षत्र कालगणना आहे. ज्याला ज्योतीष्याचे थोडे कळते तोही सांगू शकेल कि नक्षत्राचे महत्व त्यात असलेल्या चंद्रामुळे स्पष्ट होते. ग्रह हे नक्षत्रापेक्षा जवळ असल्याने त्यांची गती नक्षत्रापेक्षा कमी असते. आता विचार करा कि जे वेगवान नक्षत्र आहे त्याचा अभ्यास अवघड कि जो हळूहळू चालतो त्या ग्रहांचा अभ्यास अवघड? जे दूर आकाशात आहे त्या नक्षत्राचा अभ्यास अवघड कि चंद्र-सूर्यादी जे जवळ आहेत त्यांचा अभ्यास अवघड? म्हणजे जर वैदिक नक्षत्रांचा अभ्यास करत असतील तर ते देशी (वैदिक) ज्योतिषी पुढारलेले होते हे अगदी नागड्या पोराला सुध्दा सहज सांगता येईल. राशी हि नक्षत्रांनी मिळून बनते त्यामुळे रास व नक्षत्र ह्यांना पृथक( यच्चयावत, यावज्जीव, पृथक, मिथक हे संजय सरांचे खास ठेवणीतले शब्द म्हणून आठवले) करणे अशक्य आहे. ठसठसित दिसणारे सुर्य-चंद्र म्हणे वैदिकांना दिसले नाहीत आणि त्यांचा अभ्यास म्हणे त्यांनी ग्रीकांकडून शिकला. म्हणजे ज्याला उत्तम डेरिव्हेटीव आणि इंटेग्रेषण येते त्याला २० पर्यंत पाढे येत नाहीत असे म्हणण्यासारखे आहे. पण संजय सरांचे विश्वच वेगळे आहे. त्यात ते आणि त्यांचे समर्थक रममाण आणि सुखी असतात हेच आपले सुख.
    संजयचा गणपती आणि पेशव्यांचा गणपती एकदम वेगळा आहे. संजयचा गणपती भाद्रपद महिन्यात मानवी रक्ताचा अभिषेक करून घेणारा, म्हणून त्याला शेंदूर फासून लाल करतात हे तत्वज्ञान म्हणजे ह्या महाशयांनी गणपती, मारुती, म्हसोबा, खंडोबा ह्या समस्त शेंदूर फसलेल्या दगडांना एकच दर्जा देऊन टाकला हा सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयोग आहे खरेच कौतुकास्पद आहे. भाद्रपद ह्या यौवनउत्सुक महिन्यात हा सण साजरा होतो त्याचा ना धड वैदिकांशी ना अवैदिकांशी संबंध आहे, तो फक्त स्त्री अनुकुलतेशी संबंधित ऋतुकालोद्भव सण आहे. समस्त मानवाच्या तो एक पशु असल्याशी संबधित सोहळा आहे, असे म्हटले तर संजय सरांना राग येईल. शिवाय त्यांना असे काहीतरी वाचून मनुष्य ह्या प्राण्याचा अपमान झाल्यासारखे वाटेल, पण नंतर त्यांनी मानवी विवाह व त्याचा इतिहास असे काहीतरी अश्लील वाचावे म्हणजे त्यांना ह्या वयातही गंमत वाटेल.
    वैदिक रुद्र आणि शिव हेही वेगळेच आहेत. विष्णूचेही तसेच.
    खरेतर संजय सरांनी आपली एक समांतर इतिहास संशोधन शाखा स्थापन करावी. जसे वैदिक लोक रामजन्माचा तारखेचा हिरहिरीने पुरस्कार करतात तसा संजय सरांनी आपल्या विघ्नकर्त्या गणेशाचा, शिवाचा खरा इतिहास शोधून काढावा. नुसते दुसर्यांनी केलेल्या लिखाणावर टीका करणे सोपे असते स्वतः खात्रीपूर्वक काही लिहिले फार अवघड असते. गणपती हा वैदिकांसाठी विघ्नकर्ता होता म्हणून ते त्याचे १० दिवस पूजन करून नंतर त्याचे विसर्जन करीत असा महान शोध संजय सोनावाणींना कालच लागलाय. तोही एका मूर्ख मानसी घाणेकर हिने लावून दिला. उद्या ते युरेका, युरेका करत रस्त्यावर पळणार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरणार आहेत. आजचे गणेश विसर्जन समस्त पुणे-मुंबई, बाया आणि माणसे, समस्त महाराष्ट्र करतोय. संपूर्ण वातावरण संगीतमय आहे. सती किवा सता जाताना जो धुमाकूळ घातला जायचा तोच आत्ताही चालू आहे. जगायची आणि न जगू द्यायची हीच ट्रिक होती. दग्धभू धोरण ह्यावर संजय सरांनी थोडा प्रकाश टाकावा.
    संजय सर त्यापेक्षा मोठ्या संख्येने उद्या किवा परवा किवा आणि थोड्याच काळात गणेश विसर्जन अगदी मोठ्या प्रमाणावर करणार आहेत. कागदावर लिहिणे आणि प्रत्यक्ष ह्यात काय फरक आहे?

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. संजय सर , आपण पाटसकर काकांचे मनावर घेऊ नका , आज पौर्णिमा , त्यांचे अवसेला आणि पौर्णिमेला डोके ठिकाणावर नसते . बहुतेक चंद्र निचेचा असेल आणि हर्शल त्रास देत असेल म्हणून असे चंचल वागतात ,
    त्यांची पहिली सुरवात फारच वाचनीय होती , पण नंतर त्यांच्या डोक्यात काय चालू होते कुणास ठाऊक ? तुमच्या पत्नी आणि खाजगी आयुष्या बद्दल लिहायचे स्वातंत्र्य त्याना कुणी दिले .
    हा माणूस इतका भंगार कसा ? हा मंच त्यांनी सोडून दिला होता तेंव्हा सर्वांनी आनंदाने निश्वास सोडला होता ! हुश्श्य ! , पण नाही , लुत्र्या सारखे आले परत , हा s ड म्हटले तरी जात नाही !
    आपणच काहीतरी खरमरीत लिहिल्या शिवाय ते बंद होणार नाहीत . शीः शीः हा ब्लोग वाचणाऱ्या आपल्या मित्रांचे दुर्दैव म्हणायचे का हे ?

    ReplyDelete
  9. तुमच्या म्हणण्यात ५० % मानले तरी हि कोणाच्या पत्नी बद्दल असे लिहिणे अयोग्य आहे असे मला वाटते . आपण या ब्लोगवर लिहिणे बंद करणार असे आम्हाला आशादायक आश्वासन दिले होते त्यामुळे आम्ही आनंदात होतो , तरीही आपण इथे आपली उपस्थिती लावून कशाला लोकांचे शिव्याशाप घेता , ?
    संजय सरांच्या चाङ्गुल्पनाचा का असा अंत बघत आहात ? तुम्ही खरोखरचे निर्लज्ज आहात का ?
    तुम्ही आपले वाचन पाळत नाही याला काय म्हणायचे ? चालते व्हा इथून !
    सभ्यपणाच्या मर्यादा पाळायच्या असतील तरच हा मंच आपण वापरू शकता

    ReplyDelete
  10. दिनांक १०-०१-५११४ इसपू ला रवि मेष राशीत होता. असे शोधकर्ते म्हणतात.
    दिनांक १०-०१-००१५ रोजी रवि मकर राशीला होता त्या दिवशी शुक्ल पक्ष चतुर्थी हा दिवस होता.
    दिनांक १०-०१-२०१५ रोजी रवि धनु राशीला होता आणि तो दिवस कृष्ण पक्ष पंचमी असा येतो. रवि हा १६ डिसेंबर ते १४ जानेवारी ह्याकाळात धनु राशीला होता.
    १०-०१-३०१५ रोजी रवि धनु राशीला असेल
    दिवस कृष्ण पक्ष त्रयोदशी असा येतो.
    १०-०१-४०१५ रोजी रोजी रवि वृश्चिक राशीला असेल,
    हा दिवस शुक्ल पक्ष सप्तमी असा येतो.______________________________ म्हणजे
    १०-०१-५११४ इसपू चैत्र शुक्ल नवमी.
    १०-०१-००१५ इस-महिना माहित नाही (पण बहुतेक मृग कृष्ण आणि पौष शुक्ल हा रवि भ्रमाणाप्रमाणे ठरतो).
    १०-०१-२०१५ इस हा महिना पौष कृष्ण आणि माघ शुक्ल हे पंचांगात स्पष्ट आहे).
    १०-०१-३०१५ रोजी रवि धनु राशीला असेल तर तो मृग कृष्ण आणि पौष शुक्ल असा येतो.
    सगळ्यात महत्वाचे जे आहे ते गुरुत्वीय दृष्ट्या मोठे असलेल्या सूर्यादी ग्रहांचे भ्रमण ( ग्रह आणि तारे ह्यांचा मूळ अर्थ फार वेगळा आहे त्यामुळे तो इथे चर्चेचा विषय नाही) ह्यावरून अगदी स्पष्ट होते कि इस ४०१५ ला वृश्चिक राशीला असलेला रवि, पुढे ३०१५ ला धनु राशीला येतो, नंतर परत मागे गेले कि ००१५ ला तो मकर राशीला येतो. ह्याच गतीने तो पुढे मीन आणि परत इसपू ५११४ ला मेष राशीला जाणार हे अगदी सयुक्तिक आहे. आपण ह्या सगळ्या तारखा किवा वर टाकून स्वतः चेक करून खात्री करून घ्यावी.
    आता आपण चंद्र मास ह्यावर बोलू, चंद्र हा ग्रह (उपग्रह) गुरुत्वीय दृष्ट्या इतर ग्रहांच्या दृष्टीने ०.००००१११९७५६९४.... इतका लहान आहे, त्यामुळे त्याचे प्रतिपदा ते अमावस्या हे भ्रमण फारच हलके आहे, चैत्र नवमी हे त्याचेच प्रतिक आहे ह्या चंद्राची किंमत संजय सोनावान्नीच्या लेखाइतकी हलकी (ह्याला हलकट असे म्हणतात का हो मानसी-बाई,बाबा??) आहे. मेंदूचा भाग कमी असणारे आदिवासी लोक पूर्वी नरबळी देत होते उद्या हे परत गणपती उत्सवात जर असे नरबळी द्यायला लागले तर पुणे मुंबईच्या रस्त्यावर मुघलाई आल्यासारखे वाटेल. मानसी तू नर आहेस का नारी कि आणखी काही हे माहित नाही, पण उद्या गणपती समोर नरबळी आणि खुलेआम बलात्कार झाले तर तुला तोंड लपवायला जागा शिल्लक राहणार नाही. तुला जर संजय सोनावानीच्या नरबळी प्रकारचा पुरस्कार करायचा असेल तर तुझी एकच खास जागा आहे.. ती म्हणजे फरासखाना पोलिस कोठडी.. शिवाय जास्त मागे लागलीस तर तू आपोआपच तिथे जाऊन पडशील. नरबळी देतीस का ग बाई. ये ना मी नर आहे, देऊन दाखव माझा बळी. किती घाणेरडे विचार हे नरबळीचे. अरे लाज वाटून घे स्वताच्या बाजार बसवायचा. गणपती आणि नरबळी.. शी शी शी.. फक्त लबाड संजय आणि त्यांचे चाटू लोक असल्या घाणेरड्या गोष्टींचा पुरस्कार करू शकतात. सगळे शेंदूर लावलेले देव म्हणजे त्यांना नरबळी लागतो? तुमचे वयक्तिक कौटुंबिक काढले म्हणून तुम्हा बाजार बसव्यांना राग येतो? उद्या तुम्ही इथे नरबळी ह्याबद्दल लिहिता तर तुम्हाला (संपूर्ण संजय सोनवणी ग्रुप ला) सगळ्यात पहिले फारास्खान्यात पाठवायची मी सहज व्यवस्था करू शकतो हे कायदेशीर लक्षात घ्या..

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा - नका हो असे करू पाटसकर साहेब आम्ही भितो तुम्हाला आम्हाला संसार आहे , आमची लाज निघेल आम्हाला वाचवा . नका हो असे करू , प्लीज !
      बाप्पा - अरे काय झाले काय ? असा इतका घाबरून का गेला आहेस ?हे बघ मंगेश कुर्हाडे यांनी किती सुरेख लिहिले आहे असे नेमके वर्मावर बोट ठेवून लिहिले पाहिजे . त्यांचे अभिनंदन कर आधी . बोल काय म्हणतो आहेस ?त्या अविनाशने सांगितले आहे ना , फरासखाना वगैरे ? कसली ग्यांग कुणाची ग्यांग ? काय चालले आहे हे ?अरे हे पाटसकर स्वतः शिवीगाळ करत असतात , घाणेरडे शब्द वापरत असतात , आणि आपल्यालाच धमक्या देतात , संजयचा ग्रुप आहे वगैरे ? चला बघुया तरी त्यांची हिम्मत , काय करतात ते .
      आप्पा - आम्हाला आत टाकणार का ? आम्ही संजयाच्या ग्यांग मध्ये आहोत का ? कुणाकुणाला टाकणार ? सर्वाना टाकून दाखवा ! आम्हाला बघायला आवडेल .
      चला सुरवात करा , १-२- साडे माडे ३.

      Delete
    2. nakkich tumhala pratyek narabalinchi, shiv dharmachya afu charas ganjyachi jababdari mi ghyayla lavnar ahe.. karan tumhi adhich far bolun thevle ahe..

      Delete
    3. This comment has been removed by the author.

      Delete
    4. आप्पा - तुम्ही तुमचे दिव्य लिखाण ओळीने या ब्लोग वरून का डिलीट केले आहे ? ते इतके असभ्य होते की तुमचीच तुम्हाला लाज वाटली असावी .
      बाप्पा - तुम्ही संजयाच्या ब्लोग वरूनच त्यांनाच धमक्या देत आहात ? कमाल आहे !इथे समाज प्रबोधना साठी सर्व एकत्र येतात , कदाचित काहीजण पेन नेम घेऊन लिखाण करताही असतील , त्याचा उद्देश फक्त चांगलाच असणार , आपण मात्र संजयाच्या बाबत फारच भडक लिहित आला आहात !

      Delete
    5. मी माझे मुद्दे व्यवस्थित लिहित होतो, भले त्यामुळे संजय सोनावानीला राग आला तर मी काय करू? पण मध्येच ती अवदसा कडमडली. ती दरवेळी असेच करत असते. असो म्हणून मी घाबरून गप्प बसणारा नाही. जे मला पटत नाही त्याबद्दल लिहिणारच. तुम्ही हि लिहा. तुम्ही वाकड्यात गेलात तर मीही जाणार.

      Delete
    6. असो, पण हि मानसी व आप्पा बाप्पा निरर्थक मुद्दे घेऊन मध्ये मध्ये कडमडतात व लिखाणाची लिंक तुटते. तर मी असे म्हणत होतो कि जर २००० वर्षाच्या कालखंडात रवि एक राशी पुढे सरकतो तर आपला सौरमास आणि चांद्रमास आपोआपच बदलतो. म्हणजे जानेवारीत चैत्र महिना येणे शक्य आहे. २९ सप्टें १८९० ला भाद्रपद कृष्ण प्रतिपदा येते तर २९ सप्टें २१०० ला भाद्रपद कृष्ण दशमी येते याचा अर्थ सौर मास व चांद्रमास पुढे सरकत चालला आहे, याच प्रकारे उलटे गणित काढत गेल्यास चैत्र महिना जानेवारीत येतो. रामाचे नक्षत्र पुनर्वसु, त्याप्रमाणे तो शुद्र वर्णीय देवगणचा होता. त्याला राजा बनविण्याचा विरोध त्याचा सावत्र आईचा होता कि त्यामागे असलेल्या विप्रांचा होता? खरी लढाई लक्षमणाने लढली व जिंकली असे आहे का?

      Delete
    7. प्लानेटोरियम गोल्ड हे उच्च दर्जाचे सोफ्टवेर आहे, आपण ट्रायल वर्जन फुकट डाउनलोड करू शकता.. आता बेडूक बाई, अप्पा-बाप्पा, आणि नेहमी अकलेचे दिवाळे वाजलेली स्त्रीवादी मानसी (तिला मानसी शब्दाचा अर्थ तरी कळतो का हे तिनेच सांगावे) नेहमीच बोंबाबोंब करत सुटते. पण मी ट्रायल वर्जन वरून रामजन्माच्या काळातील आकाशाचे दर्शन माझ्या ब्लोगवर टाकले आहे. प्लानेटोरियम गोल्ड मध्येही काही त्रुटी आहेत. त्यामुळे सव्वासात हजार वर्षापूर्वी नक्की ग्रहिय बलाबल काय होते हे सध्याच्या पद्धतीने कल्क्युलेत केलेला आहे. पण त्यातही एक महत्वाची चूक आढळते, कि मुळात रवीची गतीही स्थिर नाही. ती मुलभुत मानून आणि नाक्षात्रासापेक्षा रवीची गती हे मुलभूत तत्व मानून प्लानेटोरियम गोल्डने सव्वासात हजार वर्षापूर्वीच्या ग्रहांचा अभ्यास केला हे फार महत्वाचे आहे. मी एक्ष्चेल मध्ये माझी गणिते करतो आणि त्याचे पुरावे आधीच दिले आहेत. हि माझी व्यक्तिगत रचना आहे. त्याप्रमाणे मी माझी प्रमाणे मांडली आहेत. इथे दुसर्यांचे लिहिलेले घेऊन छापायचा घाणेरडा प्रकार केला नाहीये. संशोधन करायचे तर स्वतःचे नाहीतर करू नये. बाकी लोक काय बोलतात ह्यामागे प्रत्येकाचा स्वार्थ असतो.

      Delete
  11. Rama never attended to public business. He never observed the ancient rule of Indian kings of hearing the wrongs of his subjects and attempting to redress them. Only one occasion has been recorded by Valmiki when he personally heard the grievance of his subjects. But unfortunately the occasion turned out to be a tragic one. He took upon himself to redress the wrong but in doing so committed the worst crime that history has ever recorded. The incident is known as the murder of Sambuka the Shudra. It is said by
    Valmiki that in Rama's reign there were no premature deaths in his kingdom. It happened, however, that a certain Brahman's son died in a premature death. The bereaved father carried his body to the gate of the king's palace, and placing it there, cried aloud and bitterly
    reproached Rama for the death of his son, saying that it must be the consequence of some sin committed within his realm, and that the king himself was guilty if he did not punish it: and Finally threatened to end his life there by sitting dharna (hunger-strike) against Rama unless his son was restored to life.
    Rama thereupon consulted his council of eight learned Rishis and Narada amongst them told Rama that some Shudra among his subjects must have been performing Tapasya (ascetic exercises), and thereby going against Dharma (sacred law); for according to it the practice of Tapasya was proper to the twice-born alone, while the duty of the Shudras consisted only in the
    service of the twice-born. Rama was thus convinced that it was the sin committed by a Shudra in transgressing Dharma in that manner, which was responsible for the death of the Brahmin boy. So, Rama mounted his aerial car and scoured the countryside for the culprit.
    At last, in a wild region far away to the south he espied a man practising rigorous austerities of a certain kind. He approached the man, and with no more ado than to enquire of him and inform himself that he was a Shudra, by name Sambuka who was practising Tapasya with a view to going to heaven in his own earthly person and without so much as a warning, expostulation or the like addressed to him, cut off his head. And to and behold! that very moment the dead Brahman boy in distant Ayodhya began to breathe again. Here in the wilds the Gods rained flowers on the king from their joy at his having prevented a Shudra from gaining admission to their celestial abode through the power of the Tapasya which he had no right to perform.
    They also appeared before Rama and congratulated him on his deed. In answer to his prayer to them to revive the dead Brahman boy lying at the palace gate in Ayodhya, they informed him that he had already come to life. They then departed. Rama thence proceeded to the Ashrama which was nearby of the sage Agastya, who commended the step he had taken with Sambuka, and presented him with a divine bracelet.
    Rama then returned to his capital. Such is Rama.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. सीतेच्या चरित्रावर कुणाच्या संशयाने रामही को बिथरला याचे अश्रूभरल्या नयनांनी गीत सुरू होते. बाईच्या जन्मी वनवास सुटत नाही, असाच कोहीसा हा सूर असतो.

    सीता सांगती वनवास, राम ऐकू न घेईना
    भरल्या सभेच्या पाणी, डोळय़ात येईना
    सीताबाई वनवासी, रथ येशीला तटला
    सीताबाईला घालवाया, राम सभेचा उठला
    सीताबाई वनवासी, दगडाची के ली उशी
    एवढय़ा वनामंदी, झोप तिला आली क शी
    एवढय़ा वनामंदी, कोय दिसतं लाल-लाल
    सीतामाई बाळातीण, लुगडय़ाचं दिलं पाल
    सीतामाई बाळातीण, रानाची के ली सेज
    सीतामाई बोले, लवांकु श बाळा नीज
    सीतामाई बाळातीण, झाली गोसाव्याच्या मठी
    चेचला गं पाला, वाटी लवांकु शा देती घुटी
    एवढा वनवास सीतासारीक्या नारीला
    बारा दिसाची बाळातीण, दोन बाळूती नदीला
    राम गं म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाची
    हिरक णी सीताबाई, राम हलक्या दिलाचा

    ReplyDelete
  15. राम हा वाल्मिकीने लिहलेल्या रामायणाचा नायक. रामायणाची कथा तशी लहानशी आहे. पण साधी आणि सरळ आहे त्यात खळबळजनक असे काही नाही. राम हा भक्तीचा विषय व्हावा असे या कथेत काहीच नाही, तो आज्ञा पुत्र आहे एवढेच आहे. पण वाल्मिकीने रामामध्ये काही असामान्य गोष्टी पहिल्या आणि म्हणूनच रामायणाची रचना त्याने केली आणि राम हा विष्णूचा अवतार आहे या गोष्टीवर भर देवून त्याने रामायणाची रचना केली आहे. आता राजा म्हणूनरामाचे चरित्र कसे आहे. विचार करूया एक व्यक्ती म्हणून मी रामाबद्दल बोलताना मी फक्त रामाच्या काही गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. पहिली रामाने वालिशी केलेलं वर्तन व दुसरी सीतेला दिलेली वागणूक. रामाने वाली व सुग्रीव या दोन भावांच्या भांडणात जी शुद्र भूमिका वठवली तीच भूमिका त्याने लंकेत पार पडली. पण राम एवढ्यावर थांबला नाही. तो सोतेला पुढे जावून सांगतो "हे जनक कन्ये तुझ्याशी मी कसलाही सबंध ठेवू इच्छित नाही तुका हवे तेथे निघून जाण्याची मुभा मी तुला देतो तुला परत जिंकून घेतली तेच माझे उद्दिष्ट्ये होते ते साध्य झाल्यावर मी समाधानी बनलो आहे तुझ्यासारख्या लावण्यवती स्त्रीचा उपभोग घेण्यात रावणाने कसलीच कसूर केली असेल असे मला वाटत नाही". हात जोडून नतमस्तक उभ्या असणाऱ्या सीतेने शपथ घेतली कि रामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुरुषाचा विचार काठी मनात आणला नाही. धरणीमाते मला पोटात घे. काया वाचा मने सदैव मी रामावर प्रेम केले आहे. धरणी माते मला पोटात घे सीतेने शपथ नुसती घेतली आणि धरणी दुभंगली सुवर्ण सिंहासनावर बसलेली सीता आत गेली. याचा अर्थ सीतेने दृष्टाप्रमाणे वर्णन करणाऱ्या रामाकडे परत जाण्यापेक्षा मरण पत्करले. तसेच रामाने राजा म्हणून राज्य केल्याचा पुरावाच रामायणात सापडत नाही कारण रामाने राजा म्हणून कधी राज्य केले नाही. जनानखान्यात राम कसा आयुष्य जगायचं याचे वर्णन वाल्मिकीने केले आहे. रामाने राज्याचा कारभार म्हणता येईल असा कधी केलाच नाही. प्रजेची गाऱ्हाणी ऐकून घेवून ती दूर करण्याची भारतीय राजांची परंपरा त्याने पाळली नाही. इतके अपराध स्वतः करून ठेवला तपस्या करण्याचा अधिकार नसताना हि ती करून स्वागत येवू पाहणाऱ्या शूद्राला रामाने प्रतिबंध केला. याचा देवतांना आनंद होतो. रामापुढे अवतीर्ण होवून ते त्याच्या कृतीबद्दल त्याचे अभिनंदन करतात, असा हा राम आहे.

    ReplyDelete
  16. आप्पा - अगदी आमच्या मनातले बोललात तुम्ही डॉ कुऱ्हाडे क़ारन रामाचे कर्तृत्व काय असा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो.आणि सितेवार्तर धडधडीत अन्याय केला आहे रामाने. युद्धासाठी राजकारण म्हणून त्याने माकादांमध्ये फूट पाडून आपले कार्य साधले , झाडामागून बाण मारण्यात काय शौर्य दाखवले ?
    बाप्पा - सितेविषयी तो जेंव्हा अविश्वास दाखवतो त्याच वेळेस रावणावर सुद्धा अन्याय करतो हे स्पष्ट आहे . नितिमत्ता फक्त इक्ष्वाकू कुलातच होती आणि इतर राजेकुळात नव्हती असा दंभ यातून दिसतो राम सोडून इतर सर्व भाऊ बरे असे म्हणायचे अनेक प्रसंग रामायणात आहेत.बिभीषणाला राज्य देण्याचे आश्वासन देण्यातही रामाचे फसवे राजकारण दिसते
    आप्पा -भरत लक्ष्मण हे रामाशी एकनिष्ठ आहेत,जटायू सुद्धा ! "तुला सीतेविषयी आकर्षण आहे" असे लक्ष्मणाला म्हणायलाही राम कचरत नाही. असा सर्व रामाच्या भावना रंगवताना,इतर पात्रांवर झालेला अन्याय उघड उघडपणे रामाचेच अवमूल्यन करतो . त्याकाळातले नीतीनियम आणि प्रथा यावरून जर अभ्यास केला तर , एका कोळ्याच्या कुटुंबातील माणसाने ही कथा वर्णिली आहे.त्याच्या घराच्या लोकांनी त्याच्या पापात वाटा घ्यायला नकार दिल्यावर त्याने तपस्या करून नंतर ही कथा सांगितली आहे.
    बाप्पा - कृष्णाचे त्याच्या उलट आहे ,त्याने आपल्याला हवे तेच केलेले दिसत//.

    ReplyDelete
  17. आप्पा - अगदी आमच्या मनातले बोललात तुम्ही डॉ कुऱ्हाडे क़ारन रामाचे कर्तृत्व काय असा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो.आणि सितेवार्तर धडधडीत अन्याय केला आहे रामाने. युद्धासाठी राजकारण म्हणून त्याने माकादांमध्ये फूट पाडून आपले कार्य साधले , झाडामागून बाण मारण्यात काय शौर्य दाखवले ?
    बाप्पा - सितेविषयी तो जेंव्हा अविश्वास दाखवतो त्याच वेळेस रावणावर सुद्धा अन्याय करतो हे स्पष्ट आहे . नितिमत्ता फक्त इक्ष्वाकू कुलातच होती आणि इतर राजेकुळात नव्हती असा दंभ यातून दिसतो राम सोडून इतर सर्व भाऊ बरे असे म्हणायचे अनेक प्रसंग रामायणात आहेत.बिभीषणाला राज्य देण्याचे आश्वासन देण्यातही रामाचे फसवे राजकारण दिसते
    आप्पा -भरत लक्ष्मण हे रामाशी एकनिष्ठ आहेत,जटायू सुद्धा ! "तुला सीतेविषयी आकर्षण आहे" असे लक्ष्मणाला म्हणायलाही राम कचरत नाही. असा सर्व रामाच्या भावना रंगवताना,इतर पात्रांवर झालेला अन्याय उघड उघडपणे रामाचेच अवमूल्यन करतो . त्याकाळातले नीतीनियम आणि प्रथा यावरून जर अभ्यास केला तर , एका कोळ्याच्या कुटुंबातील माणसाने ही कथा वर्णिली आहे.त्याच्या घराच्या लोकांनी त्याच्या पापात वाटा घ्यायला नकार दिल्यावर त्याने तपस्या करून नंतर ही कथा सांगितली आहे.
    बाप्पा - कृष्णाचे त्याच्या उलट आहे ,त्याने आपल्याला हवे तेच केलेले दिसत//.

    ReplyDelete
  18. आप्पा - अगदी आमच्या मनातले बोललात तुम्ही डॉ कुऱ्हाडे क़ारन रामाचे कर्तृत्व काय असा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो.आणि सितेवार्तर धडधडीत अन्याय केला आहे रामाने. युद्धासाठी राजकारण म्हणून त्याने माकादांमध्ये फूट पाडून आपले कार्य साधले , झाडामागून बाण मारण्यात काय शौर्य दाखवले ?
    बाप्पा - सितेविषयी तो जेंव्हा अविश्वास दाखवतो त्याच वेळेस रावणावर सुद्धा अन्याय करतो हे स्पष्ट आहे . नितिमत्ता फक्त इक्ष्वाकू कुलातच होती आणि इतर राजेकुळात नव्हती असा दंभ यातून दिसतो राम सोडून इतर सर्व भाऊ बरे असे म्हणायचे अनेक प्रसंग रामायणात आहेत.बिभीषणाला राज्य देण्याचे आश्वासन देण्यातही रामाचे फसवे राजकारण दिसते
    आप्पा -भरत लक्ष्मण हे रामाशी एकनिष्ठ आहेत,जटायू सुद्धा ! "तुला सीतेविषयी आकर्षण आहे" असे लक्ष्मणाला म्हणायलाही राम कचरत नाही. असा सर्व रामाच्या भावना रंगवताना,इतर पात्रांवर झालेला अन्याय उघड उघडपणे रामाचेच अवमूल्यन करतो . त्याकाळातले नीतीनियम आणि प्रथा यावरून जर अभ्यास केला तर , एका कोळ्याच्या कुटुंबातील माणसाने ही कथा वर्णिली आहे.त्याच्या घराच्या लोकांनी त्याच्या पापात वाटा घ्यायला नकार दिल्यावर त्याने तपस्या करून नंतर ही कथा सांगितली आहे.
    बाप्पा - कृष्णाचे त्याच्या उलट आहे ,त्याने आपल्याला हवे तेच केलेले दिसत//.

    ReplyDelete
  19. आप्पा - अगदी आमच्या मनातले बोललात तुम्ही डॉ कुऱ्हाडे क़ारन रामाचे कर्तृत्व काय असा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो.आणि सितेवार्तर धडधडीत अन्याय केला आहे रामाने. युद्धासाठी राजकारण म्हणून त्याने माकादांमध्ये फूट पाडून आपले कार्य साधले , झाडामागून बाण मारण्यात काय शौर्य दाखवले ?
    बाप्पा - सितेविषयी तो जेंव्हा अविश्वास दाखवतो त्याच वेळेस रावणावर सुद्धा अन्याय करतो हे स्पष्ट आहे . नितिमत्ता फक्त इक्ष्वाकू कुलातच होती आणि इतर राजेकुळात नव्हती असा दंभ यातून दिसतो राम सोडून इतर सर्व भाऊ बरे असे म्हणायचे अनेक प्रसंग रामायणात आहेत.बिभीषणाला राज्य देण्याचे आश्वासन देण्यातही रामाचे फसवे राजकारण दिसते
    आप्पा -भरत लक्ष्मण हे रामाशी एकनिष्ठ आहेत,जटायू सुद्धा ! "तुला सीतेविषयी आकर्षण आहे" असे लक्ष्मणाला म्हणायलाही राम कचरत नाही. असा सर्व रामाच्या भावना रंगवताना,इतर पात्रांवर झालेला अन्याय उघड उघडपणे रामाचेच अवमूल्यन करतो . त्याकाळातले नीतीनियम आणि प्रथा यावरून जर अभ्यास केला तर , एका कोळ्याच्या कुटुंबातील माणसाने ही कथा वर्णिली आहे.त्याच्या घराच्या लोकांनी त्याच्या पापात वाटा घ्यायला नकार दिल्यावर त्याने तपस्या करून नंतर ही कथा सांगितली आहे.
    बाप्पा - कृष्णाचे त्याच्या उलट आहे ,त्याने आपल्याला हवे तेच केलेले दिसत//.

    ReplyDelete
  20. एखादी परंपरागत लोककथा घेऊन त्यावर रचलेली हि रामकथा आहे . राम हा इतिहास नाही . आणि असला तर त्याला देवपद देण्याइतका तो महान नाही. त्याला कोणत्या खात्यावर देवपद द्यायचे ?रावणाचा विनाश केला म्हणून ? रावण कधीही अयोध्येत त्रास द्यायला गेला नव्हता किंवा युद्ध करायला गोदावरी पार गेला नव्हता.यद्न्य संस्थेचा विस्तार दंड कारण्यात होत होता आणि त्याच्या प्रसाराआड रावण येत असेल तर त्यात नवल ते काय ?यज्ञसंस्था मानणारे आक्रमक आहेत हे इथे मानले पाहिजे. नजिकच्या गात इतिहासात जसे इंग्रजांनी भारतात वाखारींचे संरक्षण करायला सवलती मागत चांचू प्रवेश केला तसाच हा अतिक्रमणाचा प्रकार आहे. कोणाची बाजू खरी खोटी हा मुद्दाच नाही. त्यामुळे शुर्पनाखेला विद्रूप करून पहिली छेद रामाने काढली आहे , आणि खरोखर यद्न्य्सन्स्क्रुतिचा विस्तार हा एकमेव उद्देश जर रामाचा असेल तर सीतेला त्या राजकारणात वापरून रामाने तिचा अपमान केला आहे आणि शेवटी तिला दोष देऊन तर महा अपराध केला आहे.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...