Tuesday, September 1, 2015

खंडोबा
खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुसंख्य जातींचे कुलदैवत असले तरी त्याचा धनगरांशी आदिम संबंध आहे. तो कुरूब-धनगरांचा प्रिय देव आहे. खंडोबाचा मूळ इतिहास पांडुरंगाइतकाच पुरातन असुनही खंडोबाभोवती बाराव्या-तेराव्या शतकानंतर ज्या पौराणिक कथा बनवल्या गेल्या त्यामुळे त्याचे ऐतिहासिक स्वरुप पार बदलले आहे. भक्त व काही स्वार्थी धर्मपंडित म्हणवणा-यांनी या कथा कधी प्रेमाने तर कधी स्वार्थाने बनवल्या असे दिसून येईल. या कथांच्या जंजाळात फारसे न अडकता आपल्याला मल्हारी मार्तंड खंडोबाचे मुळ स्वरुप येथे शोधयचे आहे.

मल्लारी-माहात्म्य या ग्रंथाने खरे तर अनेक भाकडकथांना जन्म दिला. खंडोबाचे कधी शिव, कधी विष्णू तर कधी इंद्राशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न केला गेला. मार्तंड-विजय, जयद्रिमाहात्म्यसारखे ग्रंथही पुरानकथांच्या पद्धतीनेच ढोबळपणे लिहिले गेले. हे ग्रंथ बाराव्या-तेराव्या शतकानंतरचे असल्याने खंडोबा या लोकदैवताला "प्रतिष्ठा" यापुर्वी नव्हती असा समज होणे स्वाभाविक आहे. महानुभाव साहित्यात खंडोबा (मैराळ) ह क्षेत्रपाळ देव असल्याचे म्हटले आहे. सन ११६० मध्ये बसवेश्वरांनीही मलैय्या, बेंतर, बिरैय्या केटय्या या देवतांची बळी मागणारे म्हणून्ज निर्भत्सना केलेली दिसते. पण पुढे जंगमही खंडोबाचे उपासक बनले हेही ऐतिहासिक वास्तव आहे. असे असले तरी संशोधकांनी सर्व कथांचा अभ्यास करुन जी मते मांडली आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात.

१) डा. माणिकराव धनपलवार यांच्या मते मैलार (मल्हार) हा शिकारी मेंढपाळ असावा. मैलाराच्या उपासनेत घोडा व कुत्र्याला महत्व आहे. हे मत डा. रा. चिं. ढेरे यांनाही मान्य आहे. हा मेंढपाळ-श्रेष्ठ मैलार एखाद्या प्रतिस्पर्धी टोळीशी झलेल्या संघर्षात क्षतविक्षत होऊन पडला असावा. खंडोबाच्या पूजाविधीत भंडा-याला (हळदीला) जे महत्व मिळाले ते मूळ जखमी झालेल्या नायकाला केलेल्या हळदीच्या उपचारांत असावे.

२) खंडेराय हा शिवजीप्रमाणेच इतिहासात होऊन गेलेला एखादा महान वीरपुरुष असावा असे मत त्र्यं. ग. धनेश्वर यांनी व्यक्त केले आहे. हा मुळात वीरदेव असावा व तो सन ६२० मद्ध्ये होऊन गेला असावा.

३) खंड म्हणजे वस्त्राचा तुकडा. मैलारास वस्त्रांच्य तुकड्याचा मुखवटा असतो म्हणून खंडोबा हे नांव पडले असावे असेही डा. रा. चिं. ढेरे म्हणतात. पण वस्त्रांच्या तुकड्याचे मुखवटे महालक्ष्मी व अनेक मुर्त्यांना असतात, पण त्यंना वस्त्रवाचक नांव नाही यावरुन ढेरेंचे मत बाद होते.

४) खंड-खांडा हे खंडोबाचे आयुध असल्याने त्यास खंडोबा म्हणतात हे मत बहुतेकांना मान्य असून जनप्रियही आहे.

५)खंडोबा हा शेळ्या-मेंढ्या व गायी-गुरांचा रक्षणकर्ता होता. त्यामुळेव पशुपालन हा ज्यांचा प्रमुख व्यवसाय होता त्यांचे तो दैवत होता. महाराष्ट्रात पैठण येथे खंडक नांवाचा यक्ष वास करत होता. खंडक यक्ष म्हणजेच खंडोबा असे मत म. के. ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे.

६) खंडोबाला बाणाई ही धनगरकन्या पत्नी आहे तशीच म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी आहे. पशुपालक व नागर सम्स्कृती, या दोन्ही समाजातील बायका करणे देवाला आवश्यक होते असे गुंथर सोंथायमर यांनी मत व्यक्त केले आहे.

७) मल्लारी, हे नांव मलय/मैलार या पर्वत-अरण्यवाचक शब्दांतुन आले असावे असेही काही विद्वान मानतात. मार्तंड या शब्दातून प्राचीन सुर्यपुजेचे अंशही खंडोबाला चिकटवले गेले असतील असेही एक मत आहे.

मुख्य मुद्दा येथे लक्षात घ्यायला हवा तो हा कि खंडोबा ही देवता जर मुळात अकराव्या-बाराव्या शतकानंतर उदयाला आली असती तर त्याच्या मुळाबद्दल एवढी मते असायचे कारण नव्हते. जी देवता पुरातन असते, तिचे मुळ स्वरुप कालौघात विस्मरणात जाते व समकालीन संदर्भ कवी/भक्त आपापल्या प्रतिभेने चिकटवत जातात. धर्ममार्तंड त्यात स्वार्थी भर घालत राहतात. त्यामुळे पुराणकथांची व वेगवेगळ्या स्प्ष्टीकरणांची एवढी रेलचेल उडते कि सत्य काय हे शोधणे दुरापास्त व्हावे.

तरीही खंडोबाशी निगडित मुख्य कथा म्हणजे मणी-मल्ल दैत्यांची. या दोन्ही दैत्यांचा संहार केला व मल्ल दैत्याला मारणारा व मरण्याआधी दैत्याची इच्छा म्हणून नांवात मल्ल-हारि=मल्हारी (मल्लाचा विनाश करणारा-ठार मारणारा) आहे हे पुराणकथा सांगतात व मणी दैत्य त्याचा भाऊ होता असेही म्हणतात. जेंव्हा मुळ इतिहास विसरला जातो तेंव्हा त्याचे पौराणिकीकरण चालु होते. तरीही खंडोबाच्या नांवात मल्हारी असल्याने यावर जरा विशेष लक्ष द्यायची गरज आहे.

मल्ल हा प्रत्यक्षत व्यक्ती अथवा दैत्य नसून ते महाराष्ट्रातील एका प्राचीन विभागाचे नांव होते. या प्रांताला महाराष्ट्र नांव का पडले याचे विवेचन करतांना चि. वि. वैद्य म्हणतात, इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इ. वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो, ते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले.

मराठी विश्वकोशात म्हटले आहे कि या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले आढळतात. बृहदारण्यकोपनिषद, रामायण व महाभारत यांतून विदर्भाचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक (राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण), कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा तो अपरांत म्हणजे कोकण, गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते. या सर्व प्रदेशांत प्राकृत भाषा प्रचलित होऊन त्या सर्वांचा मिळून एक मोठा प्रदेश निर्माण झाला व त्यालाच महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले, अशीही व्युत्पत्ती दिली जाते.

पांडुराष्ट्र म्हणजे आजच्या पंढरपुरचा परिसर हे आपण पाहिले. मल्ल राष्ट्र नाशिकच्या दक्षीणेचा होता हे उघड आहे. हे राष्ट्रिक (राष्टिक) आर्य होते हे मत चि. वि. जोशींच्या तत्कालीन आर्य-आक्रमण सिद्धांताला धरुन आहे व ते कसे अनैतिहासिक आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे.

कुसुमावती देशपांडेंच्या म्हणण्यानुसार पांडुराष्ट्र व मल्लराष्ट्र ही अनार्यांची होती.

सर्व कथांचे अवलोकन केल्यावर आणि विद्वानांची मते लक्षात घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे ते असे:
मल्ल हा दैत्य नसून ते प्रदेशाचे अथवा राज्याचे नांव होते हे ऐतिहासिक सत्य आहे. हे राज्य आजचा पुणे जिल्हा ते त्याहुनही दक्षीणेचा भाग यात पसरले असावे. ही शक्यता आहे कि जेजुरी ही मल्लराष्ट्राची राजधानी असावी. कर्हेपठार येथील गिरिदुर्ग या राजधानीचे केंद्र असावा. येथुन तत्कालीन राजा कारभार हाकत असावा व त्याचे नांव मणी असावे.

मणी-मल्ल या दैत्यद्वयाच्या नांवांची सांगड अशी लागते. मल्ल हे राज्याचे नांव तर मणी हे खंडोबाकालीन राजाचे नांव.

मल्ल राष्ट्र हे सातवाहनकाळ सुरु होईपर्यंत अस्तित्वात होते याचे पुरावे उपलब्ध आहेतच. म्हणजेच इसवी सनपुर्व पाचवे ते सनपुर्व तिसरे शतक या काळात खंडोबा नांवाचा एखादा मेंढपाळ वीरपुरुष होऊन गेला असावा. मणीही पशुपालकच समाजातील असावा पण तो अन्यायी असल्याने खंडोबाने बंड करून त्याच्या उच्छेद केला असावा. त्यामुळे मल्ल राष्ट्र हरवणारा म्हनून मल्हारी ही नावाचे व्युत्पत्ती अधिक संयुक्तिक आणि सत्याच्या जवळ जाणारी आहे. मल्लारि...मल्हारी अशी उकल करता येते. शकारि म्हणजे ज्याने शकांवर जय मिळवला अशी जी उपाधी तशीच ही मल्ल राष्ट्रावर विजय मिळवला म्हणून मल्हारी.

पराक्रमी पुर्वजांची पूजा करणे हा धनगर संस्कृतीतील एक महत्वाचा भाग आहे. खंडोबाने मणी राजाच्या संहारानंतर स्वत: राज्यकारभार केला असणे संयुक्तिक आहे. त्याच्या निधनानंतर त्याची शिवावतार समजून लिंगस्वरुपात पूजा करणे स्वाभाविक होते. खंडोबा नांवाचा उगम अन्यत्र शोधण्याची आवश्यकता नाही. हेच नांव मुळचे असणे अधिक सत्याच्या जवळ जाणारे आहे. तसेच खंडोबाच्या आधी मुर्त्या असणे शक्य नाही. खंडोबाची पुजा आधीपासून लिंगरुपातच होत आली असली पाहिजे. मार्तंड ही उपाधी सुर्यपुजेशी निगडित नसून त्याचा अर्थ "मार्तंडाप्रमाणे ज्याचे तेज फाकले आहे असा मल्हारी." असा घ्यावा लागेल.

तसेच बाणाई ही धनगरकन्या असणे स्वाभाविक असले तरी म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी होती ही कथा नंतर कोणीतरी (लिंगायतांनीच) बनवलेली आहे हे उघड आहे. याचे कारण असे कि लिंगायत हा शैव पंथ असला तरी त्याची स्थापना बाराव्या शतकातील आहे. बसवेश्वरांनी खंडोबाचा आधी निषेधच केलेला होता हे आपण पाहिलेलेच आहे.

राजाला दोन किंवा अधिक पत्न्या असने हे त्या काळात गैर नव्हते. म्हाळसा हीसुद्धा धनगरच असण्याची शक्यता आहे. नंतर सामाजिक संदेश देण्यासाठी दोन समाजांतील पत्न्या  दाखवल्या जाणे शक्य आहे. खंडोबाचा घोडा व श्वान (वाघ्या) हे त्याचे मुळ रुप धनगर असण्याचेच द्योतक आहे.

नंतर जवळपास दीड हजार वर्षांच्या कालौघात खंडोबा ह क्षेत्रपाळ, पशुंचा संरक्षक देवता म्हनून मानला जात त्याचे आजचे स्वरुप बनले आहे. मुळ इतिहास नीटसा लक्षात न ठेवला गेल्याने दंतकथांतुन अद्भुतरम्य कथा खंडोबाभोवती गुंफल्या गेल्या. कर्मकांडांचा त्यात समावेश झाला. वाघ्या-मुरळीसारख्या अनिष्ट प्रथाही निर्माण केल्या गेल्या. आज त्या कायद्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. होळकर घराण्याने जेजुरीच्या विकासात अनमोल योगदान दिलेले असून ते सर्वांस माहितच आहे!

* * *

53 comments:

 1. इतिहासाची इतकी ओढाताण करून हा लेख लिहायची काहीच आवश्यकता नव्हती, कारण आधीच इतिहास पूर्ण विकृत झालेला आहे, म. फुले म्हणतात कि महसुलाचा अधिपती म्हसोबा आणि खंडोबाचा अधिपती खंडोबा, त्यांनीही उगाच संजय सोनवणी सारखे ओढाताण करायचे काम केले कि काय? विचारांची बैठक चुकीची आणि पर चष्म्यातून बघायची असेल तर चालू तुमचे आख्यान, अब्बा-बाब्बा, आणि अस्थ्प्रधान मंडळ होयबा करायला हिरहिरीने हुजरे करयाला तयाराचे असतात.. फक्त खंडोबाचा हिडीस खेळखंडोबा करू नका. इतकेच.

  ReplyDelete
 2. वरील कॉमेंट लिहिण्याचे कारण,
  आत्तापर्यंत मी कुठलाच धनगर घोड्यावर फिरताना पाहिलेला नाही. इतक्या मेंढ्या पाळतो तर त्याला एक घोडा पाळणे अशक्य नाही. पण तो घोडा पाळत नाही ह्याची महत्वाचे कारण असे कि त्यांना मेंढ्यांना चारायचे असते, त्यांना पळवायचे नसते. घोडा हा लढाईच्या कमी योग्य वाटतो, ह्यात मला धनगर बांधवांना दुखवायचा अजिबात हेतू नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. Dhangar lok ajub suddha ghode vapartat.

   Delete
  2. Avinash Pataskar Mumbai-Punyat basun kasa disel dhangar ghodyavar, to pahaycha aasel tar sahyadrichya kushit aani dongarrangat dhangaransarkhe bhatkave lagate

   Delete
 3. संजय सर ,
  आपण खूप उपयोगी माहिती दिली आहे , ती वाचून आपल्या देवाबद्दल नवीन शास्त्रोक्त माहिती मिळाली , आणि असे वाटू लागले की आत्ताच जेजुरीला जाउन खंडोबाच्या पायावर लोटांगण घालावे . हा देव म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका .
  मालिका झीवर दाखवत आहेत , त्यामुळे आपली माहिती जास्त उपयोगी पडली .
  आपण म्हणता तसेच वाटते , कि खंडोबा हा फार पूर्वीपासून घोडा आणि कुत्रे यांच्या साथीने या उभ्या महाराष्ट्रात निर्भयतेचे प्रतिक बनला आहे . खंडेराय हे ६२० मध्ये होऊन गेलेले जिवंत लोकनायक असणार हे नक्की . त्यांचे देवत्व त्याना कधी मिळत गेले हे नक्की सांगता येत नाही . शिवाजी महाराजांना सुद्धा देवत्व देण्याचा प्रयत्न संजय सोनवणी सरांनी हाणून पाडला , असे ते स्वतः कौतुकाने सांगतात , या खंडेरायाच्या बाबतीत ते अशी मोहीम राबवणार का ?कारण ऐतिहासिक लोकोत्तर पुरुषांची मंदिरे झाली तर चालणार नाही असे संजय सरांचे धोरण आहे , म्हणून संजय सर चला आपण खंडेरायाला त्याच्या मूळ स्वरूपात जाणते समोर आणू आणि त्याची देवघरातून सुटका करुया !

  ReplyDelete
 4. सर , आपण दगडालाही देव मानतो आणि आपल्या पूर्वजांचे स्मरणही त्याना देव्हार्यात ठेवून करत असतो . आपण अतिशय महत्वाची माहिती खंडेराया बद्दल देवून आम्हाला खंडेरायांच्या स्वरूपाचे नव्याने दर्शन दिले आहे , आपले फार थोर उपकार आहेत !आपल्या महाराष्ट्राचे विशेषतः पुण्याच्या प्रदेशाचे नेतृत्व श्री ख्स्न्देराय करत होते हे पाहून डोळ्यात आनंदाश्रू येतात .
  मल्हारी मार्तंड आणि त्याचे रूप समोर दिसू लागते . आपण हळद आणि मल्हारी यांचे नाते सांगून एक नवीन माहिती उजेडात आणली आहे . आपण यावर अजून लिहावे . मी भारतीय आणि लिहा वाचा हे या बाबतीत अजून माहिती देणार हि अपेक्षा आहे . तसेच आप्पा बाप्पा हेही काही सांगतील , आदरणीय पाटसकर सरांनी आधीच मार्गदर्शन केले आहे . संजय सर , सलाम !
  आपण सध्या फेसबुक वर नसता म्हणून आपल्या लोकांची इथली उपस्थिती वाढेल असे वाटले होते . पण कदाचित त्याना इथे लिहिण्याची सवय नसावी .

  ReplyDelete
 5. great , please write something more about our malhari martand !

  ReplyDelete
 6. खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे, असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी > नळदुर्ग > पाली किंवा पाल (ता. कराड, जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा.

  ReplyDelete
 7. मल्हारी महात्म्य.

  संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.
  एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
  खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
  दुसरी पत्नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

  ReplyDelete
 8. अहो लिहा वाचा तुम्ही ते नेटवरील अद्यावत ज्ञान टाकून मला मोठे अडचणीत टाकले, वरील लेख वाचून मला इकडे मोठा शोध लगला होता… युरेका, युरेका , म्हणजे असे बघा कि
  आदिमानव (आद्य मानव) + घोडा + कुत्रा = खंडोबा+घोडा +कुत्रा = शिवाजी + घोडा +कुत्रा = धनगर +घोडा + कुत्रा
  म्हणजेच
  आदिमानव (आद्य मानव) = खंडोबा = शिवाजी = धनगर,
  तात्पर्य:
  १) म्हणजेच नार्मदेच्या खालचे सगळे लोक पूर्वी धनगरच होते.
  २) मानवाचे, कुत्र्याचे आणि घोड्याचे त्रिकुट जमल्याचा इतिहास किमान ६० ते ७० हजार वर्षे जुना आहे, म्हणजेच खंडोबाचा इतिहास तितकाच जुना असायला हवा.
  ३) म्हणजे ब्राम्हणेतर सर्व नार्मदेखालील लोक हे मुळात धनगर आहेत.
  ४) राम इत्यादी तुरळक वैदिक लोक इथे पूर्वी आले होते पण त्यांना हे धनगर दिसले नाहीत कारण धनगर सतत फिरत होते.
  ५) पांडुराष्ट्र, त्यातील पान्ड्रूपूर, औंद्र, जेजुरी इत्यादी हि मोठ्या यात्रा आणि एकत्र येण्याचा जागा होत्या. इथे धनगर लोक एकत्र येत, बहुतेक मेंढ्या एकत्र येत नसाव्यात. त्या कुठेतरी दूर असाव्यात.
  ६) अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र, मार्तंड, माल्लारी ह्या शब्दांवरून धनगर लोक संस्कृत किवा तत्सम भाषा उत्तम जनत होते असे दिसते.
  मग
  चि. वि. वैद्य = चि. वि. जोशीं
  हे एकच का? आर्य आक्रमण सांगणारे? म्हणजे वेद्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून धनगर आहेत.
  विच्छेद:
  १) धनगर पायात चपला घालत होते कि नव्हते? घालत असतील तर ते कोण बनवीत असे?
  २) ते लोखंडी हत्यारे ( खंडा) वापरत होते कि नव्हते? असतील तर ते कोण बनवीत असे?
  ३) धनगर फक्त मांसाहारी होते का? जर ते शाकाहारी होते तर शेते कोण पिकवित होते?
  ४) धनगर खांद्यावर घोंगडे घेतात, पूर्वी ते कमरेला आणि डोक्याला सुद्धा गुंडळात होते कि, वस्त्रे त्यावेळी होती? मग ती कोण बनवत असे?
  ५) हळद कोण पिकवित असे?
  ६) दगड फोडून मंदिरे कोण बांधत असे? असे अनेक प्रश्न् येतात.
  शिवाजी + घोडा - वाघ्या = मराठा, असे गणित मांडले तर
  खंडोबा + वाघ्या - घोडा = धनगर असे विचित्र उत्तर मिळते.
  म्हणजे घोडा = कुत्रा = आदिम मानवाचा जवळचा मित्र हा सिद्धांत पुढे येतो.
  गावांची पूर्वीची संस्कृत नावे जावून त्या ठिकाणी आत्ता आपण किती विचित्र अपभ्रंश झालेली नावें वापरतो ते बघा ना, पुणे, सातारा, यवत, चौफुला, वाडी, कुर्डू, फाटा…
  उत्तरे:
  १) म्हणजे हि कामे करणारे सगळे लोक ह्या धनगरांच्या उपजाती होत्या आणि त्या उपजाती पंढरपूर, जेजुरी ह्याठिकाणी राहत होत्या. सदैव फिरणारे धनगर ह्या ठिकाणी जाऊन वरील वस्तूंच्या गरजा पूर्ण करून घेत असावेत.
  २) आता पुढे धनगर त्या विशाल दंडक अरण्यात रस्ते नसताना कसे फिरत असत, आत्ता महामार्ग आणि मोठमोठे बोर्ड लावले असताना आपण रस्ते चुकतो, मग त्यांनी वेगवेगळ्या खाणाखुणा मार्गावर करून ठेवल्या होत्या. त्यांनाच ते हि मोठी देवस्थाने ते समजत असावेत. ते शिवाय त्या निबिड अरण्यात हिंस्त्र श्वापदे आणि जंगली मानव तर असणारच, म्हणून घोडा, भाला, खंडा आणि कुत्रे आले आहे.
  हे पहा ना सगळे कोडे एकदम मस्त उलगडले ना,
  शिवाय ते मातृ पितृ पूजा = लिंग पूजा हेही एकदम चपलख जुळतात. लिंग पूजेतूनमुर्तीपुजेकडे जाताना, बहुतेक घोडा कुत्रा घुसवले गेले असावे, आता हे कोणी करून ठेवले? ते काही का असेना. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे वरील सिद्धांताने आपोआपच मिळतात. सध्या आरक्षणाचा प्रश्न ह्याच प्रकारे किती चटकन सुटतो ते बघा, शिवाय जातव्यवस्था हा प्रश्न अगदीच निरर्थक ठरतो.

  ReplyDelete
 9. मला आता इथे माझ्या सिद्धांतामुळे अतिशय घाणेरड्या प्रतिक्रियांच्या सामना करावा लागणार आहे हे दिसतेच आहे, संजय सरांनी आमचे कुलदैवतच मुळात धनगर आहे हे अतिशय उत्कृष्टपणे सिद्ध करून दाखवले, त्यामुळे मला स्वतःला धनगर समजण्यावाचून पर्यायच शिल्लक ठेवलेला नाही, आता मी माझ्या पूर्वजांच्या उद्बोधक माहिती तुम्हाला देतो,
  १) फार पूर्वी सासवड जवळ पुरंधर किल्ल्यावर एक सोन्या धनगर नावाचा माणूस येत असे. तो पुरंधरच्या डोंगरातून अद्भुत वनस्पति आणत असे व ती वेगवेगळ्या रोगी लोकांना देऊन त्यांचे आजार दूर करत असे. किल्ल्याच्या मध्यावर शंकराचे मंदिर आहे तिथे भक्त आणि रुग्णांच्या मोठमोठ्या रांगा लागत असत. नंतर त्यातूनच नारायणपूरचे प्रस्थ वाढले. हा सोन्या धनगर कधी काळाच्या पडद्याआड गेला हे काहीच कळाले नाही. तेव्हा आम्ही अव्वल तरुण होतो. मध्यगड, बालेकिल्ला आणि केदारेश्वर ४-५ दमात पार करायचो. सासवडहून १० पैसे तासाने भाड्याच्या सायकली घेऊन जायचो. त्यावेळी तो सोन्या धनगर हा मोठा अचम्भा होता आत्ता त्याचे महत्व कळायला लागले आहे.
  २) पानवडीची खिंड, कडेपठार सासवडचा पंचक्रोशी परिसर मोठा अद्भुत आणि अविश्वनिय कथांनी गाजलेला आहे. त्यात कडेपठारच्या कथा माझी आज्जी जेजुरीची असल्याने नेहमी ऐकायचो. तिच्याबरोबर एसटी बस मध्ये गुरासारखे सोमवतीला गेलो कि नको रे बाबा तो देव असे व्हायचे. पण ती नित्यनेमाने जायची. मुळात तीच मुरळी होती. पण तिच्या आई वडिलांनी तिला मुरळी न बनवता संसारात घुसवले. तिला १४ वर्षे मुलेच झाली नाहीत म्हणून तिने सोळा सोमवारचे व्रत केले. आणि सलग ४ मुले ३ मुली झाल्या. त्यातला सर्वात जेष्ठ मुलगा तरुण वयात वेड्यासारखा वागू लागला. तो अजूनही जिवंत आहे. आणि विशेष म्हणजे तो ब्रम्हचारी राहिला. तो कट्टर हनुमान भक्त.
  चर्चा मोठी रंगात आलीये. खंडोबाचा इतिहास सगळ्यांनाच आवडतो. म्हणून लिहितोय.

  ReplyDelete
 10. जेजुरीतच माझ्या आज्जीच्या भावा बहिणींची २८ घरे अजूनही आहेत. मी सासवड कधीच सोडले नव्हे तर सोडावे लागले पण जेजुरीची नाळ कधीच तुटली नाही. तिथे गेलो कि मला माझ्या आज्जीची आठवण अस्वस्थ करून टाकते. ती पैसे, पाच पैसे, आणा पोटाच्या बटव्यात ठेवत असे. आणि नेमकी हळूच बाहेर काढत असे. भले तिने पोटाच्या पोरांना जीव नाही लावला पण नातवंडांना शिकताना बघून ती माउली इतकी धन्य व्हयाची, आणि किती कष्ट करायची हे सांगायचे म्हणजे सगळ्यांना तो आज एक विनोद वाटेल. ती जेजुरीतून आलेली माता हडपसरच्या चौकात बाजार घेऊन येताना गाडीने धडक मारल्याने पाय तुटून पडली, पण हरली नाही त्यानंतर बरी होऊन आमचे शिक्षण पूर्ण करून अजून १६ वर्षे जगली. म्हणून इथे लिहून किमान त्या माउलीला श्रद्धांजली द्यायचा अपुरा प्रयत्न मी करतोय. कारण फारच द्रावित करणारे आहे. दारिद्र्यात आणि भाऊबंदकित माझ्या आज्जीने मला मोठे केले आणि ती शेवटी लढता लढता गेली! त्यावेळी आम्ही तिला बघत होतो पण काहीच करू शकलो नाही. त्यामुळे मी आयुष्यात पैसा आणि तत्व ह्यांना वेगवेगळे करून टाकले. माझ्या थोरल्या काकाला वाघ्या करा असे सगळ्या भाऊबंदांनी सांगितले. तो तसा आधुनिक विचारांमुळे झाला नाही. पण शेवटी झाले ते झालेच! खंडोबाचे नवस म्हणजे लोकांना गम्मत वाटते. पण फार पूर्वी अतिशय कठोर नवसपूर्ती करायच्या पद्धती होत्या. त्या संजय सोनावाणींना बहुतेक माहित असाव्यात. लंगर लावणे काय असते? महाबळी काय? वाघ्या मुरली सोडणे का? अगीवरून चालायचे? देवाला जसे मागावे तसे द्यावे लागते तो कोणाचा हिशोब उधार ठेवत नाही. जय मल्हार!!

  ReplyDelete
 11. अजूनही मला आठवते माझी आज्जी शेणाने सारवलेल्या जात्यावर दळताना आमच्यासमोर लाजून तिची गाणी म्हणायची. ती निरक्षर होती. तिचे सरस्वती हे नाव मीच तिला लिहायला शिकवले. ते लिहायला ती किमान १० मिनिटे घ्यायची पण अगदी बरोबर ती ते लिहायची. ती नेहमीच घरातल्या शिकलेल्या लोकांच्या विनोदाचा विषय बनायची. इंजेक्शन, ऑपरेशन असे शब्द मजेशीर उच्चारायची कि सगळे हसून हसून वेडे होत. ती एक भोळी भाबडी खंडोबाची भक्त, तिला मुरळी आणि सत्य जीवन ह्यातले कष्ट समान होते. ह्या वाक्यावर मोठा वाद होऊ शकतो... तो बालपणीचा काळच मोठा मंतरलेला होता. त्यात सासवड तर फारच भयंकर, तिथला इतिहास खोदून काढायला सगळ्यांचे ७ जन्म कमीच आहेत. फँड्रीची काळ्या चिमणीची मजा काय असते ते तिथेच कळते. हे आयुष्य आसे असे निघून जाते. नंतर लोक काहीही बोलतात. उद्या कोणास ठाऊक हे इंटरनेट बंद पडलेले असेल. कोणी अतिरेकी हल्ला करून सगळे उध्वस्त करून टाकेल, तरीही मला माझ्या सासवडचा अभिमान आहे, आम्ही सगळा पुसलेला इतिहास पुन्हा पुन्हा जागृत करू. आमच्या मातीची आणि आमची नाळ कोणी तोडू शकत नाही.... कोणीही परकीय कितीही श्रेष्ठ असले तरीही त्यांना इथे विजय अशक्य आहे.

  ReplyDelete
 12. आप्पा - मन अस्वस्थ करणारी माहिती श्री पाटसकरांनी दिली आहे
  बाप्पा - एका सत्य्काठेतून त्यांनी खंडोबाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातूनच त्यांचीही खरी ओळख झाली , अविनाश पाटसकर आपली आज्जी अमर आहे , तिला विनम्र अभिवादन ! अशी माणसे घराणी जिद्दीवर जिवंत ठेवतात आणि देवरूप होऊन जातात .
  आप्पा - आपली आज्जी देवपणास पोचली होती आणि तितकीच आधुनिकही होती . आपल्या घरच्यांनी बरेच काही सोसले आहे . आपणास टीकात्मक लिहिणारे बुद्धीचे दिवाळखोरच असणार !आपल्यावर या विषयात - विशेषतः आपल्या आज्जीच्या बाबतीत आपल्या शत्रुचीही टीका करण्याची अथवा अपशब्द लिहिण्याची शामत नाही ! आपल्या आज्जीस नम्र सलाम !बाकी सर्व आपण जाणताच ! म्हणजे आम्ही ब्राह्मण आणि वैदिक इत्यादी आपले शोध आपण लावलेलेच आहेत !

  ReplyDelete
 13. अविनाश पाटसकर , आपल्या आज्जीस आदरपूर्वक नमस्कार !
  प्रत्येकाचे बालपण असेच भारावलेले असायचे पूर्वी ! म्हणूनच ते मंतरलेले दिवस आणि आजचे चंगळवादी दिवस यांचा संवाद होऊ शकत नाही , संवाद किंवा वाद झालाच तर तो आपल्या जुन्या लोकातच होतो . आणि त्यातूनच वितंडवाद न होता सुसंवाद साधत नवे मैत्र गवसते . आपण मन मोठ्ठे करून कसे जगावे हे या जुन्या आज्जी आजोबांनी आपणास शिकवले म्हणून तर आपण आज इथवर आलो आहोत . आपण कसे तग धरून शिकलो आणि मोठ्ठे झालो हे आजच्या पिढीला माहीतही नसते . त्याना सांगायला गेले तर ते म्हणतात - मग त्यात काय - ते तुमचे प्राक्तन होते आणि आपण निरुत्तर होतो - आपण जे जीवन जगलो आणि त्यातून शिकलो - तो हा घेतला वसा न टाकता आपण पुढच्या पिढीस दिला पाहिजे . त्यांच्या जीवनात सुद्धा एक प्रचंड पोकळी येऊ घातली आहे , ती आपण भरून नाही काढायची तर कोणी ?
  आपल्या आज्जीच्या जीवनास विनम्र अभिवादन !

  ReplyDelete
 14. अविनाश सर , आपले मन मोकळे केले त्यामुळे आपले दुःख नक्कीच हलके झाले असेल .
  जुन्या पिढीतील लोकांनी आपले कुटुंब अतर्क्य बलिदान करून नव्या जमान्यात आणले आहे . अशा लोकाना विसरणे म्हणजे स्वतःशी प्रतारणाच ठरेल . आपण हाच वसा पुढे अशाच कारणासाठी घेतला वसा टाकणार नाही या व्रतस्थ भावनेने जपला पाहिजे .
  आज्जीस विनम्र अभिवादन !

  ReplyDelete
 15. माझी आज्जी मुरळी असल्याचे मला फारच उशिरा कळाले. पण त्याआधी मी आपल्याच पुण्यात ह्या मुरळी संस्थेकडे आकृष्ट झालो. त्यात मला काहीच उद्बोधक हाती लागले नाही. नंतर मला आपोआपच देशाबाहेर जावे लागले. तिथे परदेशात हा मुरळ्याचे प्रचंड अस्तित्व होते आणि एक घाणेरडी पुरुषी वृत्ती तिथेच दिसत होती. ह्यातून मी तिकडे घुसत गेलो. सगळे अनुभव मोठे विचित्र आहेत. मुरळी खरी खंडोबाला वाहून घेतलेली आहे त्यामुळे ती तर फारच मुक्त जीवन जगते.. शेवटी देव तारतो त्याला कोण मारतो? आणि जो संसाराच्या चक्रात अडकतो त्याचे प्रश्न आणखी कठीण होतात. त्यापेक्षा वाघ्या मुरली हे सुखी जीवन जगतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आज आपण अनेक वेश्यांना त्यांच्या सामाजिक, त्या ज्या प्रदेशातून आल्यात त्यावरून, त्यांच्या आर्थिक स्तरावरून कुत्र्यापेक्षा कमी किंमत देतो. पण कोणी त्यांचे मानसशास्त्र समजून घेतो का? त्याच समाजातील पूर्वीच्या आणि आत्ताच्या बुभुक्षित आणि अतिरेकी लोकांना झेलत होत्या. ज्यांनी स्त्री पुरुष आणि त्यांची संतती ह्या संकल्पनेला सुरुंग लावला त्या लोकांना हे मोकळे मैदान खंडोबाच्या निमित्ताने दिले गेले.. देवाने हि घाण आपल्याच भक्तांच्या ऐहिक जीवनात टाकून दिली. सगळे तेच करत आलेत. पेशव्यांनी खंडोबाला नवस केला पुत्र प्राप्त केले आणि पुण्यात बुधवार पेठ तयार केली..

  ReplyDelete
 16. श्री पाटसकर सर ,
  आपल्या आज्जीस मानाचा सलाम
  अशा हजारो आज्जीनी वेगवेगळ्या जातीत आपली कुटुंबे अडी अडचणीवर मात करत वर आणली आहेत , अशा लोकांचे आजच्या पिढीवर अनंत उपकार आहेत . ह्या कोणी थोर लेखिका नव्हत्या किंवा महान विचारवंत नव्हत्या , पण त्याना दुर्दम्य इच्छाशाक्तिनी अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे सामर्थ्य दिले म्हणूनच आपला समाज जरी जातीवर आधारित असला तरी , स्त्रीत्वाची ही लढाऊ वृत्ती सर्व जातीत दिसून येते . , नुसते लेखन करून आणि मोर्चे काढून समाज घडत नाही हेच खरे , त्यासाठी अशी जीवनाशी झुंज देणाऱ्यां घरातील माणसांची गरज असते , आज घराचे घरपण जपण्याचे अवघड काम यांच्या समोर आहे . प्रलोभने खुणावत आहेत , संसार मोडत आहेत , आपण आपल्याच हाताने आपला सर्वनाश करून घेत आहोत , आज अशी आज्जी प्रत्येकाला मिळाली तर ? तो सोन्याचा दिन येवो ,

  ReplyDelete
 17. समस्त बंधुंनो, आदरणीय अप्पा बाप्पा, आगाशे, गोरे, बेडेकर भगिनी, नक्कीच हि तुमची श्रद्धांजली माझ्या अज्जीपर्यंत माझ्यामुळे पोचली ह्यामुळे मी नक्कीच तिच्या ऋणांतून मुक्त होईल असे वाटते, आपले पूर्वज जगताना आणि मृत झाल्यावर आपल्याला त्रास देतात किवा देत नाहीत हा अध्यात्मिक विषय आहे. असो. तिने मला मुक्त नाही केले तरीही मी इथे माझे वैचारिक लढा लढतच राहणार, त्यामुळे तुमचे आभार मानायचे तितकेच कमी आहेत. शेवटी देव आपल्याला कधी माफ करतो हेही आपल्या आणि त्याच्या आत्मिक संवादातून घडत असते. आपला वसा लढायचा तो पुढे चालवायचा. कृपया पेशवे आणि बुधवार पेठ ह्यातला अनर्थ उगाच लावू घेऊन नका.

  ReplyDelete
 18. शेवटी मी इतकेच सांगू शकतो कि मला खंडोबाने वाघ्या मुरळीकडे नेले आणि तिथून परत बाहेर आणले. समाजात सर्वात वांछित घटक ते हेच वाघ्या मुरळी.. अजूनही मी सीमेवरच आहे, एकीकडे पतिव्रता बायको आणि दुसरीकडे मुरळी ती मुरळी माझ्या इतिहासातून माझा पिच्छा पुरवत आहे तिला मी सोडू शकत नाही, कायद्याने भले हि हि प्रथा बंद केली पण अजून जगात ती जोरात फोफावते आहे, मला इथे हे बघून मजा वाटते सगळे झाले कि शेवटी कार्यकारण भाव तेव्हा आजीचा अतृप्त आत्मा आठवतो. मायावी जग भयंकर आहे हे द्वैत शैव ज्ञान आहे. आत्मा आणि माया हे द्वैत ह्यात भयंकर युद्ध चालले आहे. चालू द्यात. आपल्याला काय? ते आपले थोडेच आहे...?

  ReplyDelete
 19. Nice info

  खंडोबाचा घोडा व श्वान (वाघ्या) हे त्याचे मुळ रुप धनगर असण्याचेच द्योतक आहे.>>>>याbबद्दल स्पष्टीकरण मिळेल काय ? शंका उपस्थित करत नाहीये सहजच विचारतोय माहीतीsसाठी

  ReplyDelete
 20. संजय सोनवणी सर ,
  आपण खंडोबा बद्दल माहिती लिहून अतिशय समयसुचकतेने अनेक मुद्दे मांडले आहेत . आणि त्यामुळे नवीन शंका येत जातात , हेच आपल्या लिखाणाचे वैशिष्ठ्य असेल कदाचित , त्यामुळेच लेख आणि प्रतिप्रश्न असे चालू राहते ,
  सध्या दाखवत असलेल्या मालिकेत नारद आणि गणपतीचा सहभाग अत्यंत महत्वाच्या क्षणी कथेला नवीन दिशा देताना दाखवला आहे . माननीय महेश पाठारे हेही कष्ट घेऊन कथानक लिहित असतील असे जर मानले तर मग , नारद हा वैदिक मानायचा का ? आणि तो या कथेत इतका महत्वाचा कसा ठरतो ? गणपती हि देवता शैव कुटुंबातील आहे परंतु ती वेदात सुद्धा आहे का ?
  गणेश चतुर्थी जवळ आली आहे त्यामुळे आपण खंडोबा प्रमाणे श्री गणेशावर संशोधनपूर्ण लेख लिहिला तर आनंद वाटेल . कारण असे दिसते की वैदिक आणि वैदिकपूर्व दैवते कुणी कधीकाळी अशीकाही बेमालूम पाने एकमेकात गुंफून टाकली आहेत की त्यामुळे वैदिकच बाटून शैव धर्माचे पुरस्कर्ते असल्याचा बनाव करत शैव धर्म विस्कळीत करून त्याचे मक्तेदार बनले आहेत हे कोणाच्याच लक्षात येत नाही . शिव आणि शक्ती ही रूपे आपलीशी करत त्यांनी इंद्र आणि इतर देवताना बाजूला आजच्या तथाकथित हिंदू धर्माची मक्तेदारी स्वतःकडे घेतली आहे .
  मुळात आद्य शंकराचार्य यांना काय अभिप्रेत होते तेच स्पष्ट होत नाही !त्यांचा काल आपण म्हणता त्याप्रमाणे इ स १००० धरला तर , मुस्लिम येण्याच्या सुमारास त्यांचे सर्व वाग्मय आणि चार आश्रम निर्मिती झाली असे समजावे लागेल . त्याकाळात बुद्ध आणि जैन मते मोडत आपला सिद्धांत स्थापन करत असतानाच मुसलमान आक्रमणाची त्याना चाहूल लागली असेल का ?
  नवनाथ हे सुफी पंथाला दिलेले शैव धर्माचे उत्तर आहे का ? असे अनेक विचार डोक्यात येत राहतात ! आपण यावरही काही लिहावे हि विनंती आहे

  ReplyDelete
  Replies
  1. महेश पाठारे ki महेश कोठारे? त्यांनी मागे सांगितले होते कि जय मल्हार हा कमी बजेटचा कार्यक्रम असल्याने त्यात खंडोबाचे अचाट पराक्रम आम्ही अनिमेशनच्या आणि तंत्रज्ञान विषयक कमी बजेट मुळे दाखवू शकत नाही, शक्य तितक्या सामान्य पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही पुढे रेटू! शिवाय त्यांनी "होणार सून मी ह्या घराची, जुळून येती रेशीम गाठी" ह्या धर्तीवरच जय मल्हार पुढे चालवू असे सांगितले होते. महाराष्ट्र तईम्स ह्याची बातमी आली होती. आता बघा कोण कशासाठी आपला इतिहास बदलतो ते! कोणी वैदिक धर्मासाठी तर कोणी बजेट साठी. जय मल्हार!!

   Delete
  2. http://www.esakal.com/esakal/20150222/4732670231338481978.htm he wacha

   Delete
 21. कडेपठार ची कथा अशी संगितले जाते:
  मणी-मल्ल दैत्य जेजुरी परिसरात धुमाकूळ घालत होते, (ह्या दोघांचे बहुतेक त्यावेळी संघटीत राज्य असावे). ते यज्ञात विघ्न आणत होते, ऋषींच्या स्त्रिया पळवून नेत होते. तेव्हा ऋषी इंद्राकडे गेले त्याने त्यांना विष्णूकडे पाठवले, विष्णूनेच जेव्हा मणी-मल्ल ह्यांना वरदान दिलेले असल्याने त्यांना मारण्यास असमर्थता दाखवून व ऋषींना शंकराकडे जायला सांगितले. (याचा खरा अर्थ हे ऋषी अनेक दिवस इंद्र व विष्णूची उपासना करत राहिले पण दैत्याचा उपद्रव थांबला नाही) ऋषींची विवंचना ऐकून शंकराने अवतार घेण्याचे ठरवले. ( इथे ऋषी इतके असमर्थ होते याचा अर्थ वैदिक (ब्राम्हण) लोक नुकतेच इथे यायला लागले होते असा होतो.) व ते यज्ञसंस्थेचा प्रसार करीत होते असे दिसते. पुढे अचानक कडेपठार ह्या ठिकाणी लिंगरुपात खंडोबा (शिव) उत्पन्न झाले. त्यांचे शरीर गरम व लाल झाले होते. (ह्याचा खरा अर्थ कि एखादा सशक्त तरुण कुठूनतरी आत्मज्ञान घेऊन तिथे आला होता) व तो ध्यानस्वरुपात (लिंगरुपात) बसला होता. तेव्हा काही धनगर मुलांनी त्याला पहिले व त्याच्या अंगावर हळद व तूप? ओतून शांत केले) त्यावेळी इथला मानव फारच पुर्वावस्थेत होता व शेतीच्याही आधी पशुपालन करणारा असंघटीत समाज होता असे दिसते. नंतर खंडोबा नावाच्या तरुणाने त्यांना संघटीत करून युद्ध करून मनी मल्ल ह्यांना परारस्त केले. नंतर त्याने दोन बायका केल्या. पण त्यामुळे त्याचा संसारात गोंधळ सुरु झाला, या प्रकारे एकपत्नीव्रत हे उत्तम अन्यथा खेळ खंडोबा होतो हे दाखवले गेले. गोंधळ हि त्याच अर्थाने येतो. देवाच्या एका भक्तास आपल्याबरोबर येण्याची गळ घातली तेव्हा देवाने मागे न बघण्याचा अटीवर ती काबुल केली पण नेमके खालच्या जेजुरी जवळ भक्ताने मागे पहिले आणि देव अदृश्य झाले. मग तिथे भक्ताने नवीन मंदिर बांधले. हि आख्यैका बहुतेक देवी देव ह्यांच्याबद्दल आढळते.

  ReplyDelete
 22. आता मी ह्या कथेची थोडी ओढाताण करतो, इथे राहणारे ऋषी इथलेच होते कि उत्तरेतून आलेले वैदिक प्रचारक होते, ते जर प्रचारक होते आणि स्वतःबरोबर बाकीच्या वैदिक वर्णीयांना त्यांनी बरोबर आणले नसेल तर त्यांनी आपल्या उत्तरस्थ टोळ्यांना निरोप पाठवून अशा एका (जन्माने नव्हे कारण वैदिक जन्माधारित वर्ण व्यवस्था मानत नव्हते) जन्मकुंडलीप्रमाणे पूर्ण संस्कारित बलदंड क्षत्रिय वर्णी तरुणास आमंत्रित केले. तो उत्तम सेनानी, संघटक, लढवैय्या असावा. तो आपला घोडा घेऊन मणीचूल पर्वतावर काही दिवसात हजर झाला असा ह्याचा अर्थ होतो. पुढे खंडोबा हा शिवाचा अवतार कसा आहे हेही बघू, मुळात ब्रम्हा, विष्णू, महेश हे त्रिकुट काय प्रकार आहे आधी समजून घ्यायला लागेल.
  _तर ब्रम्हा म्हणजे मानवाला ज्ञान देऊन मानव जन्म प्राप्त करून देतो म्हणून त्याला ब्राम्हण वर्णाची प्रतिनिधी
  _विष्णू हा वैश्य (विश ण) वस्तूंची देवाणघेवाण करणारा व त्याद्वारे समाज पोसणारा, पालक आहे. त्याची पत्नी लक्ष्मी हि संपत्तीचे प्रतिक मानली जाते. हा वैश्य वर्णाचा प्रतिनिधी.
  _ महेश हा महीचा ईश, म्हणजे पृथ्वी नियंत्रित करणारा, क्षेत्र नियंत्रित करणारा, संहार आणि नियंत्रण करणारा क्षत्रिय वर्णाचा प्रतिनिधी आहे. शक्ती त्याची पत्नी आहे. शक्ती म्हणजे शस्त्र हेही स्पष्ट आहे.
  पुरातन शैव व वैष्णव वाद हा आजच्या ब्राम्हण- मराठा वादा सारखाच असावा असे वाटते.
  खंडोबाच्या अवतारात क्षत्रिय प्रतिनिधी म्हणून आलेला आहे म्हणून तो शिव अवतार आहे असे समजले जाते.
  संजय सरांच्या म्हणण्याप्रमाणे ३ च वर्ण पूर्वी अस्तित्वात होते हेही इथे जुळते. शिवाय वैदिक धर्म प्रचाराने पसरला म्हणजे आधी फक्त ऋषी आश्रम व्यवस्था घेऊन इथे आलेले होते हेही त्यांचे म्हणणे जुळते.
  मल्लराष्ट्रचा अर्थ मला सामान्य पणे (मल्ल) पैलवान लोकांचा प्रदेश असे वाटते. अशा मल्लाला मारायला नक्कीच तुल्यबळ पुरुष आणावा लागला व तो मल्लारी बनला हेही स्पष्टच आहे. खंडोबाचा काळ ऋग्वेदनंतरचा पण रामायण पूर्व असावा असे वाटते. या कथेनुसार खंडोबा धनगरांचा देव कसा हे स्पष्ट होते. खंडोबाचा जन्म व बालपण ह्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. तो फक्त "चंपाषष्ठी दिवशी अवतार धारीशी" इतकेच कळते. पण अशाप्रकारे अचानक अवतार घेण्याच्या कथेपेक्षा माझी कथा अधिक सयुक्तिक वाटते ना!

  ReplyDelete
  Replies
  1. manniy saheb, tumchya mhannyanusar इथे राहणारे ऋषी he jar ka इथलेच asatil tar. ???..................... aani pudh jo kay dongar ubha kelay tyachi tumhalach dhanyta vatate

   Delete
  2. kon jane he lok kashamule etihasachi aai-may kartat je aahe te aamchya sarkhya bholya bhabdya lokana many aahe tyat kashala dhavala dhaval karaychi. aani punha mhanu naka he maz nahi mi nahi tyatali, kadi lav aatali) mala vatat aashach kahi goshtimule Orad sutatey(dabholkarana maral....pansarele maral.......) mhanu

   Delete
 23. वरील कथा आणि इतिहास सांगताना संजय सर अनेक संस्कृत शब्दांचा वापर करताना दिसतात, उदा
  मार्तंड (मारतोंड?), मल्लारी (मल्लाला-मल्ल=मत्त झालेल्याला- हरवणारा), खंडक हा यक्ष, प्राचीन मराठी विश्वकोश यातील त्यांचे संदर्भ: विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र, (अशोकाचा शिलालेख ‘रास्टिक’ हा वास्तव पुरावा), अशोक शब्दाची युत्पत्ती = अशोक ~ न शोक, न शुच, (कधीही मृत इत्यादी शौच न येणारा) खंडोबा (स्कंद?) गिरिदुर्ग इत्यादी शब्द हे संस्कृत आहेत. हे बहुतेक वैदिक लोकांनी प्रचलित प्राकृत शब्दांवरून घेतले असावेत असे वाटते. धनगरी भाषेत (प्राकृतमध्ये) ह्या शब्दांचे मूळ नक्कीच असणार आणि ते तुम्हाला १००% माहित असणार असे वाटते. तेव्हा वेळ मिळाल्यास ते कधीतरी आपल्या ब्लोगवर टाकावे अशी आपणास नम्र विनंती करतो. हि आमच्यासारख्या फुकट्या वाचकांची अपेक्षा!
  मैराळ, मलैय्या, बेंतर, बिरैय्या केटय्या, कर्हेपठार (कऱ्हा नदीचे पठार?), मलय पर्वत हे या सर्वांचे मूळ ह्या प्राकृत शब्दांचे अर्थ सुद्धा तुम्हाला नक्कीच माहित आहेत पण तुम्ही ते आम्हाला मुद्दाम सांगत नाहीत, आणि शेवटी त्यावर एक गुपचूप एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करता. ते विकत घेऊन आम्ही वाचावे अशी आपली अपेक्षा असते, ती अगदी बरोबर आहे. पैसा आणि पर्यायाने कष्ट केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. उलट शुद्धोधन आहेर ह्या माणसाला तुम्ही तुमच्या पुस्तकावर अजिबात परीक्षण लिहायला मना करायला हवे होते. त्यानेच अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे शेवटी मीही तुमचे पुस्तक वाचायचा हव्यास सोडून दिला. असे आजकाल मिडीयाच्या आतताईपणामुळे होतच असते, फारच आगाऊ लोक आहेत मिडिया वाले.. अहो समाजाला जे पाहिजे तिकडे जाऊ द्यात ना. उगाच कशाला आपल्याला न कळणाऱ्या गोष्टीत आपले ज्ञान पाजळायचा प्रयत्न करतात?
  संस्कृतउद्भव प्राकृत कि प्राकृतउद्भव संस्कृत ह्यातील स्पष्टतेने ह्या वरील लेखाचे महत्व १००० पटीने वाढू शकते. त्यात मातृभाषा हा मोठा घोळ आहे, जी अडाणी आई मुलाला तिच्या प्राप्त ज्ञानाप्रमाणे शिकवण देते त्याला आपण मातृभाषा म्हणतो. पण मुळात हि माता फारच थोडे शब्द उच्चारू शकत असेल तर काय आहेत तिच्या शब्दांचा अर्थ? ती कधी दया मागणाऱ्या कुत्र्यासारखी विव्हळत असे, किवा शत्रूला दमदाटी करण्यासाठी गुरगुर करत असते , शिवाय तिला जे प्रेमाने शरण देत होते त्यांना गुउ गुउ करून शरणार्थी अनुमोदन करत असे असे हे आदिमानवाच्या भाषांवरून स्पस्थ होते. तीच का हि प्राकृत भाषा? मातृ पूजक संस्कृती म्हणजे काय? माता आपल्या पिल्लाला ४-६ महिन्यात सोडून देते, पुढे त्याचे काय होते?

  ReplyDelete
 24. चर्चा खंडेराया वरून सुरु होऊन वहावत कुठे गेली ? कोण मुरली आहे आणि कोण वाघ्या आहे , कोणाची आज्जी कशी आहे आणि कोणी काय सोसले आहे याच्याशी या चर्चेचा किंवा लिखाणाचा काहीही संबंध नाही . आणि आत्ता संजय सोनावणी याना सर म्हणून उद्हृत करायचे आणि यापूर्वी त्याना क्षुद्र जंतू म्हणून हिणवायचे , हा कोणत्या मुरलीने शिकवलेला संस्कार आहे . या लोकाना स्वतः विषयी कणव निर्माण करून सर्वांची सहानुभूती मिळवण्यात काय आनंद वाटतो ? हा कसला आनंद ?अशा जीवनाचा काय अर्थ ?
  असले आचरट उद्योग या ब्लोगवर चालू ठेवणे योग्य आहे काय ? अशा कितीतरी जाती आणि व्यक्तिमत्वे आहेत ज्यांनी अनेक असह्य प्रकार भोगले आहेत . पण कधी त्याच्या कथा केल्या नाहीत !आपलीच दुःखे उगाळत जनतेची सहानुभूती मिळवायची ही न्यारीच रीत म्हणायची ,
  अरेरे अशा जातीत जन्म घेणे आणि आपली दुःखे मिरवणे यात काय पुरुषार्थ (?)

  ReplyDelete
 25. थांबव रे बाबा ,
  एकदा खडी फोडायला लावायची भाषा करतोस आणि एकदम घरातली कथा वेशीवर टांगतोस , अरेरे , हि काही आपली पद्धत नाही . अरे काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेव , तुम्हाला कसली म्हणा मनाची लाज ? लाज कोळून प्यायलेले तुम्ही लोक !
  आपल्याच घरातल्या थोराना दूषण देतो आहेस , कमाल आहे .

  ReplyDelete
  Replies
  1. गोरे आणि भूपाल हि माझी कथा नाही हजारो ठिकाणी लिहिलेली आहे. आणि तोंडाने पाठ असलेली आहे. मी कुनाला क्षुद्र जंतू म्हणत नाहीत तेच स्वतःच्या हाताने बनतात. गोरे तुझी लायकी खाडी फोडायची आहेच ती तर तुला कराव्हीच लागणार

   Delete
  2. gore tu jara he vaach tula thodi tari akkal yeil http://www.jejuri.net/kadepathar/

   Delete
 26. पाटसकर बुवा ,
  मी कौतुक केले ते आज्जीचे , तुम्ही काहीतरी बोध घ्या आणि असे अद्वातद्वा गोरे आणि भूपाल याना बोलणे सोडून द्या , कारण आपण खाडी फोडायला लावणार हि भाषा वापरता त्याचा मी तीव्र निषेध करते आणि आपण कौतुक करायच्या लायकीचे नाही हेपण ठासून सांगते .

  ReplyDelete
 27. तुम्ही इतके असभ्य कसे , सार्वजन आपल्या आज्जीचा सन्मान करत आहेत तेंव्हा ठीक पण जरा कोणी विरुद्ध लिहिले तर ते पचनी पाडायची मानसिक ताकद आपल्यात नाही . लगेच अत्यंत असभ्य भाषेत बोलू लागता , तुम्ही मूळ रूप दाखवता हेच खरे , तीच तुमची लायकी आहे !, तुमचा निषेध करावा तितका थोडाच , आणि म्हणूनच आज्जीने तुम्हास असे वागवले .
  अत्यंत हिडीस विचाराचा हा माणूस आहे !

  ReplyDelete
 28. तुमचा निषेध करावा तितका थोडाच आहे . लाज नाही मना आणि कुणी काही म्हणा अशी तुमची गत आहे . अहो काका , इतके कसे तुम्ही मागासलेले ? मागासलेला माणूसही सुसंस्कृत वागतो , पण आपण तसेही नाही , खाडी फोडायला लावणार हि भाषा ? कशाबद्दल ? आणि तुम्ही कोण ? टिनपाट ?
  काय आहे काय जगाच्या उपयोगाचे ? आणि जगासाठी काय केले आपण वेगळे ? तुमचा समाजाला उपयोग काय ? असे वागले तर आज्जीही असेच वागणार तुमच्याशी !अगदी बरोबर वागली आजी !
  एकतर तू घमेंडखोर आहेस आणि समाजा साठी निरुपयोगी आहेस !
  तुझा मी निषेध करते . आदरार्थ बहुवचन वापरण्याच्या लायकीचा तू नक्कीच नाहीस ,
  खाडी फोडायला जाशील असे शब्द वापरणे हा तुम्ही शब्द वापरता , इतके तुम्ही खालच्या विचारांचे आहात ? तुम्ही कसे काय पाटसकर ? अहो पाटसकर थोर माणसेपण होती ,
  पाटसकर ह गो हे आपल्या घटनातद्न्य होते , पद्मविभूषण होते . आपण त्यांचा आदर्श जरी समोर ठेवला असतात तरी थोडीफार अक्कल आली असती , पण तुम्ही दळभद्री !ह गो पाटसकर भारताच्या कोंस्टीटयूशनल असेम्ब्लीचे मेंबर होते , जरा सभ्य बना ! आपल्याच आडनावाचे आदर्श ठेवा .
  तुमचा धिक्कार असो !

  ReplyDelete
 29. अरे अविनाश पाटसकर , इतरांच्या लिखाणाचा दर्जा बघ , तू आपला उठसुठ लोकांवर अतिशय गलिच्छ लिहित असतोस . लोकांकडून शाबासकी नको असेल , अगदी सडेतोड लिहिणारा असशील असे म्हणावे तर तेही नाही , नुसतीच बडबड ,
  किती कचरा लिहित असतो ?त्यापेक्षा लिहा वाचा यांचा अभ्यास बघ , ते तुझ्यासारखे खाजगी लिहून सहानुभूती वर जगात नाहीत . . स्वतः संजय सरांचे उदाहरण बघ , किती कष्टांनी त्यांनी आपले करियर केले !
  अतिशय अभ्यासपूर्ण त्यांचे लिहिणे असते आणि त्यांचे वाचनही दांडगे आहे ! तू असा इतका निरर्थक कसा रे बाबा ? आणि दुसर्याना अडचण का होतोस ?

  ReplyDelete
  Replies
  1. Bhupal- charcha sarva vyavsthit chalu hoti tumhich vada la survat keli.

   Delete
 30. http://sanjaysonawani.blogspot.in/2015/08/blog-post_23.html ह्या लेखावर
  गोरे ह्याने मला उद्देशून किती घाणेरडे शब्द वापरलेत ते बघा ...................""नको असलेल्या मुलाला " फटे निरोधके बच्चे " - असे म्हणायची पेपर गल्लीमध्ये पद्धत आहे , ती तुमच्या मुळेच सुरु झाली असावी . - त्याचा . आई वदिलनाहि त्याचा जन्म नको होता पण निरोधाच फाटला आणि हा जन्माला आला , ..................'"
  _हे वैचारिक संजय सोनवणी ह्या ब्लॉग मालकाला चालते का?
  _ संजय सोनावाणींना आपल्या मातांना होयबा करणाऱ्या लोकांना गोळा करायचे असेल तर तशी tantrik व्यवस्था ब्लोग्गर वर करता येते.
  _ गोरे ह्याच्या घाणेरड्या वृत्तीमुळे तो माझ्याबद्दल आणखी घाण लिहिणार हे नक्कीच आहे. तेव्हा खडी फोडायची व्यवस्था ते स्वतःच्या हातून करून घेत आहेत, मी निमित्त मात्र आहे.
  _ गोरे सारख्या लोकांना मांडलेल्या मुद्द्यांना मुद्देसूद उत्तरे देत येत नाहीत तेव्हा आज्जीचे नाव घेऊन शिव्या देतात. शिवाय वरील प्रमाणे हिडीस भाषा वापरतात. अत्तापार्यात चर्चेत मी सभ्य भाषा वापरली होती,
  भूपाल अचानक माझ्यावर घसरला, नंतर गोरे घसरला ह्याचा अर्थ त्यांनी एकतर पावशेर माल डोक्यात घालून घेऊन डोक्यातील किडे वालावालायला लागल्यावर काहीही लिहित सुरुवात केली. गेल्या २-३ ब्लोगवर हेच झालेले आहे. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

  ReplyDelete
 31. अहो पाटसकर दादा ,
  तुम्ही मात्र संजय सोनावनी या ब्लोग लेखकाला भिकारचोट असल्या अश्लाघ्य शब्दात बोलता ? लाज नाही वाटत , ज्याच्या घरी जावे त्यालाच बदनाम करायचे आणि वर तुम्हाला कोणी बोलले तर त्याला खाडी फोडायची भाषा सुनावायाची ? वारे वा , कुठे शिकलात हे असले चाले ? नक्कीच तुमच्या घरच्यांनी असे शिकवले नसणार , कारण आम्ही तुमच्या आज्जीला सलाम करतो , अशी माउली असे संस्कार करणार नाही ! , आम्हाला खाडी फोडायची भाषा शिकवता आणि संजय सोनवणी याना काहीही बोलता , आणि पाल्पुतेपणे त्या टिपण रद्द करता ? काय हा पाल्पुतेपाना ! , अरेरे , संजय सर तुम्हाला क्षमा करोत हि सदिच्छा !
  आम्हाला तुमच्या आज्जीबद्दल परम आदर आहे पण तुमच्या बद्दल किळस आहे .
  आम्ही पेपर गल्लीतले लोक असेच म्हणणार
  तुमचे आडनाव भगिनी , इतर विदुषी , आणि वयस्कर लोक , आपणास सुधारण्याची संधी देत आहेत , असे कुणासही छोट शब्द वापरून अपमानित करू नका , बदल्यात मग असेच ऐकत बसावे लागेल ,
  आमच्या पेपर गल्लीचा हाच न्याय आहे

  ReplyDelete
  Replies
  1. Gore saheb tumchya kal lavya swabhava mule nehmi ya blog chya charche madhe vyatay yeto. tumchya dokyatle galicha vichar fakt susanskrutpane lihale mhanje te susanskrut hot nahit ulat tumcha kaptipana ughad hoto.

   Delete
 32. हा पाटसकर अस्सल चिकट माणूस आहे हे नक्की . कुणी काय बोलले हेच चिवडत बसायचे अहो तुम्ही संजय सोनवणी याना भिकारचोट म्हणता ते बरोबर आणि सभ्य आणि तुम्हाला कुणीतरी उदाहरण देत म्हटले की त्यांच्या गल्लीत अशा लोकाना काय म्हणतात , तर तो तुमचा अपमान ? तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? अहो हरी गोविंद पाटसकर हे पद्म विभूषण होते , महान होते आणि तुम्ही ? पाटसकर या आडनावाचे बदनामिकरण करत आहात !
  या सर्वांनी तुमच्या आज्जीला सन्मान दिला , सर्व संकेत पाळले , आपल्या लिखाणाचे कौतुक केले आणि तुम्ही एकाच पालुपद चालू ठेवले आहे . यातून कोनाचे हसे होत आहे ? लिहा वाचा , मी भारतीय , आणि आप्पा बाप्पा , आगाशे , आणि स्वतः सोनवणी सर आपापल्या बुद्धीने आणि तर्काने या ब्लोगाची महती वाढवत असतात . इथे पूर्वी कितीतरी अश्लील लिहिले गेले आहे , अनोनिमस लिखाण संजय सरांनी बंद करवले त्यावेळे पासून लिखाणाची पातळी खूप सुधारली आहे , आपण कितीही कांगावा केलात तरी असभ्य लिखाण करायची आपली सवय दिसते हे स्पष्ट आहे , उगाच दुसऱ्यावर त्याचे खापर फोडू नका ! आता नवनवीन लोक लिहू लागले आहेत , निशांत ,स्नेहप्रभा , हिर्डोशिकर ,संजय क्षीरसागर ,झेन ,मोहन पाटील असे लोक आता आवडीने बोलते होत आहेत , अशावेळी आपण असले तमाशे करू नका , त्यासाठी वेगळी जागा असते , हे तुम्हास मी सांगायची गरज नाही , सुज्ञास अधिक सांगणे नलगे
  जयजय रघुवीर समर्थ

  ReplyDelete
 33. आता शेवटी मी गणपतीची खरी कथा सांगून ह्या ब्लोग वरून कायमची राजा घेतो. कारण इथे माणसे जोडायचे नाही तर तोडायचे काम चालते,
  शंकर पार्वती हे राजन्य जोडपे, पिता बर्याच काळाने घराकडे परतला, तेव्हा एका अनोळखी पुत्राने त्यांची वाट अडवली, त्यांच्यात अतिभयंकर वाद झाला. इतका कि पित्याने पुत्राला मरणप्राय शाब्दिक यातना दिल्या. (महाभारतात धर्मराजाच्या एका चुकीसाठी अर्जुनाला त्याचा वध करणे भाग होते, पण पर्याय म्हणून श्रीकृष्णाने अर्जुन ला त्धार्माराजाची निर्भात्सना करायले सांगितले, म्हणजे निर्भत्सना करणे वध करन्या इतकेच वाईट कृत्य समजले जायचे) तिथे पार्वती आली आणि हा आपला स्वतःचा पुत्र असल्याचे रहस्य सांगितले, तेव्हा मात्र पिता पुत्राचे वादविवाद कौशल्य पाहून खुश झाला व ह्या मुलाला मी भरपूर ज्ञान देईल असे कबूल केले. अश्या ज्ञानामुळे त्याचे डोके हत्तीसारखे मोठे असेल असा त्याचा मूळ अर्थ होता त्याच्या अपभ्रंशाने गणपतीला सोंड लावली गेली. काळाच्या ओघात हा अपभ्रंश होत असतो. तो अवैदिक बोलीभाषेतच जास्त झालाय. वैदिक वान्ग्मायात गणपती फार उशिरा आलाय. वैदिक तो अपभ्रंश जाणून बुजून करत असेल तर त्याचा स्वार्थ काय आहे? वैदिक जन्माधारित वर्ण संस्थेचे पुरस्कर्ते नव्हते. त्यांना गुणाधारित समाज अपेक्षित होता. जातीव्यवस्था हि अवैदिकांनी निर्माण केली पण अवैदिक शेवटी वैदिकांनाच त्याचा दोष देतात. हा सगळा प्रवास चुकीच्या दिशेने चालला आहे. इतिहास जोडायचा असतो तोडायचा नसतो. इतकेच आपल्याला कळले तरी हा श्रीगणेशा झाला असे आपण समजू!!

  ReplyDelete
 34. नक्की नक्की कायमची रजा घेता ? अतिउत्तम !
  आम्हाला तुमच्या पुराण कथांचे कौतुक नाही आणि तुमचेही नाही !
  आता कधी मांजरा सारखे आडवे येऊ नका ! उपकार होतील आमच्यावर इतके केले तरी !

  ReplyDelete
  Replies
  1. Mansi Tai- tumhi blog chya malkin nahi ahat.... Avinash bhadak tat te hyach mule aani tumhi tyanchi majja baghat tyanchi tarr udavta..

   Delete
  2. अमितदादा अमितदादा ,
   भागलास का - लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का
   लिंबोणी च झाड करवंदी
   अमितचा वाडा चिरेबंदी ,
   अमित्दादा , सर्वांच्या शंका स्वतः संजय दादाने उत्तर दिल्याने संपल्या आहेत , ना मी या ब्लॉगची कुणी आहे , ना तू ना अजून कुणी ! ओ के ?

   Delete
  3. संजय हि डबल ढोलकी आहे हे मीच त्याला स्पष्ट सांगितले आहे, तो ब्लॉगर वर तुमच्या लोकांच्या जाळ्यात फसला आणि फेसबुक वर मस्त गम्मत फिरतो, त्याने काय खरे खोटे ठरवावे? ब्लोगाची कमी झालेली किंमत ह्यामुळे तो अजिबात इकडे लक्ष देत नाही, आणि ज्या कोणी ह्या चांदोबावाल्या बाई आहेत त्यांनी आपल्या छकुल्यांना चांदोबाच्या गोष्टी सांगून झोपवावे. इथे सूर्याच्या उजेडात येउन थून्केगिरी करायची गरज नाही, ते आपोआप आपल्याच थोबाडावर पडते हे तिने आपल्या छकुल्यांना सांगावे, म्हणजे ते पुढे थोडे सुधारतील. संजयला हा ब्लोग खाजगी करायचा असेल आणि तुमच्यासारख्या डबक्यातल्या लोकांचा उदोउदो करायचा असेल तर त्यांनी तो आधीच करून ठेवावा. बाकी संजय सांगत फिरतो कि खंडोबा पशुपालक धनगरी लोकांचा, पण हेच मुळात चूक आहे. कारण मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात महाराष्ट्र व दक्षिण प्रदेशात पशुपालक लोक हे शेती करणाऱ्या लोकांच्या फारच पूर्वी अस्तित्वात होते. संजय हे सिंधु ह्या शेतकरी संस्कृतीवरून अचानक विना पुराव्या हजारो वर्षे मागे जाऊन पशुपालक धनगर इतिहास मांडतात हेच मोठे मिथक आहे. त्यांना मानवी उत्क्रांतीचे टप्पे कळलेच नाहीत. किवा ते फेकाफ्की करून आत्ता धनगर सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न करताहेत. हे चुकीचे आहे. मला अगदी मान्य आहे कि उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यात विशेषतः महाराष्ट्र व दक्षिणेत मानव शेती आणि पशुपालन असे इकडे तिकडे उद्या मारत असणार. स्वतःची अवस्था वाईट झाली कि पाळलेली बकरी कापून खात असणार. पण तुमच्या हे सगळे विचार करणे आकालेबाहेराचे आहे. तुम्ही तुमी आपले तेच तेच शेत शोधात खात बसा. बाकी मी आणि संजय ह्या जन मंचावर आलोय त्याचे मी माझे बघतो तुमच्या फुकट सल्ल्याची इथे गरज नाही.

   Delete
 35. खरच ग मानसी , अगदी माझ्या मनातले बोललीस !
  आपली कायमची यांच्या भाकड कथा पासून सुटका झाली
  एकीकडे फाफट पसारा मांडत पुराणातलेच दाखले देत वैदिकाना बदनाम करत जगणारे हे काही एकटेच नाहीत .
  बरे झाले कटकट गेली , सुंठीवाचून खोकला गेला ! आता ही अवदसा परत यायला नको इकडे !
  खाडी फोडायला लावणारे ! आमच्या संजयला भिकारचोट म्हणता ना ?
  परत भेटू नका !

  ReplyDelete
 36. आप्पा- असे कसे झाले ?
  बाप्पा - काय झाले ?
  आप्पा - आपल्या संजयला " भिकारचोट " कोण म्हणाले ?
  बाप्पा - कुणीतरी म्हणाले , त्यात काय एव्हढे ?
  आप्पा - प्रश्न तो नाही , संजयने असे अनेक लढे लढले आहेत , त्या शब्दांचे त्याला काहीच नाही , कारण शब्दांपेक्षा ते बोलतो कोण याला महत्व असते .

  म्यानातुनि उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात !

  ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
  सरदार सहा सरसावुनि उठले शेले
  रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
  उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
  वेडात मराठे वीर दौडले सात !

  आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
  अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
  छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
  कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
  वेडात मराठे वीर दौडले सात !

  खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
  समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
  गर्दीत लोपले सात जीव ते मानी
  खग सात जळाले अभिमानी वणव्यात
  वेडात मराठे वीर दौडले सात !

  दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
  ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
  क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
  अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
  वेडात मराठे वीर दौडले सात !
  जेंव्हा महाराज जिव्हारी लागणारे बोलले त्यावेळेस काय घडले ,
  म्हणूनच कोण बोलले याला महत्व आहे , काय बोलले ते नंतर .
  संजय सर खंबीर आहेत आणि त्यांचे भक्तही भक्कम आहेत !

  ReplyDelete
 37. हा ब्लोग संजय सरांचा आहे .
  हा ब्लोग माणसे जोडण्यासाठी आणि मत मतांतराची नोंद घेण्यासाठी आहे
  भांडणे करण्यासाठी नाही . तत्वाची भांडणे ही स्वागतार्थ आहेत , पण अशी भांडणे हास्यास्पद ठरतात आणि पोरकट पणाला अंत नसतो !
  आमचे संजय सर त्याना कोणी अपशब्द बोलले तरीही गांभीर्याने त्याचा प्रतिवाद करतील , पण त्यात दम हवा ! तात्विक चर्चेपासून ते कधी दूर पळणार नाहीत , पण आचरत पणाला संजय सर कधीही खतपाणी घालणार नाहीत .

  ReplyDelete
 38. काय आहे आगाशे सर आणि आप्पा-बाप्पा आणि इतर सर्व, मला कोणी काहीही म्हटले तरी मला फरक पडत नाही. माझ्या अंगाला भोके पडत नाहीत. उलट जो काही विकृत शब्द वापरतो त्याची लायकी दिसते. मला माझ्या समोर बरेच काम आहे. ते परिपुर्ण नाही हेही मला माहित आहे पण मी नवीन संभावनांचा भोक्ता आहे. त्या बाद झाल्या तरी त्या बाद करायला नवीन प्रतिभावंत यावे लागतील हेही मला माहित आहे. इतिहासात नवीन संभावनांना स्थान मिळाले तरच ते जळमटे चढलेले पौराणिक सिद्धांत बाद करता येतील. येथे गंभीर चर्चा होत नाही त्यामुळे मी प्रतिक्रिया वाचून हसून पुढे जातो. हे लोक मला काय नाउमेद करणार? असो. धन्यवाद.

  ReplyDelete
 39. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 40. Khandoba was Dhangar worrier but our ancestors never documented any history....documents are lacking and some people made him god. We are living in India. Ha ha ha ha ha ha ha...they don't know value of documentations

  ReplyDelete