आजच्या पिढीला खलिस्तानी शिख दहशतदाच्या झळा लागल्या नसल्याने व आता जवळपास तो सुप्तावस्थेत गेला असल्याने विशेष माहिती नाही. त्याला सुप्तावस्थेत म्हटले आहे याचाच दुसरा अर्थ असा कि तो पुन्हा कधीच उफाळुन येणार नाही असे नाही. या दहशतवादाने ८०-९० च्या दशकांत सारा भारतीय उपखंड हिंसेच्या तांडवाखाली आणला होता. या दहशत्वादाने भारताच्या आजवरच्या सर्वात समर्थ प्रधानमंत्री इंदिराजींचा जसा बळी घेतला तसाच निव्रुत्त जनरल वैद्यांचाही बळी घेतला. हजारो निष्पाप नागरिक मारले गेले ते वेगळेच. या दहशतवादाचा सखोल अभ्यास होणे जरुरीचे आहे.
सारे काही खलिस्तानसाठी...
आपले स्वतंत्र राष्ट्र असावे यासाठी जी खलिस्तानी चळवळ सुरू झाली तिची पाळे-मुळे स्वातंत्रपुर्व काळात जातात. १९०९ मद्धेच मोर्ले-मिंटो सुधारकार्यक्रमाच्या वेळीस मुस्लिमांनी जसे स्वतंत्र प्रतिनिधित्व मागितले तसेच शिखांनीही मागितले. पुढे जेंव्हा स्वातंत्र्य द्रुष्टीपथात येवु लागले तसे मुस्लिमांचा पकिस्तान तसाच शिख धर्मियांचा खलिस्तान असावा अशी मागणी जोर धरू लागली होती. यचे कारण म्हणजे शिख हा स्वतंत्र धर्म असुन जर धर्माधारित पाकिस्तानची निर्मिती होवू शकते तर शिखांच्या खलिस्तानची का नाही? शिख हा धर्म हिंदु धर्मांतर्गत आहे अशी बव्हंशी हिंदुंची समजुत आहे. पण ती शिखांनाच मान्य नाही. मुस्लिमांशी त्यांचे हाडवैर जगजाहीर आहे. १८५७ च्या उठावात शिखांनी इंग्रजांची बाजु घेवून उटाव दडपुन टाकण्यात जी मोलाची कामगिरी बाजावली याला कारण हेच होते कि उठाव यशस्वी झाला तर दिल्लीचे इस्लामी तख्त त्यांच्यावर राज्य करनार होते. आणि मुस्लिमांकडुन त्यांनी अपरंपार छ्ळ सोसला असल्याने ते तसे घडू देने अशक्यच होते.
१९४० मद्धे सत्ताप्राप्तीसाठी आतुर अशा हिंदु, मुस्लिम आणि शिखांशी ईग्रजांनी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. महात्मा गांधींनी शिखांना चुचकारुन शांत केले. एवढेच नव्हे तर पं. नेहरुंनी १९४६ च्या कलकत्ता येथे भरलेल्या अखिल भारतीय कोन्ग्रेसच्या अधिवेशनात ठराव पास करवून शिखांसाठी पुरेशी स्वायत्तता दिली जाईल असे महात्मा गांधींच्या मतानुसार घोषित केले व तशा आशयाचा ठरावही ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीत पास करुन घेतला.
यामुळे शिखांचे तात्पुरते समाधान झाले. असे घडले नसते तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानचीही मागणी इंग्रजांनी मान्य केली असती हे गांधीद्वेष्टे विसरतात. पुढे नेहरुंनी आपली भुमिका बदलली आणि मुंबईत १० जुलै १९४7 रोजी संघराज्याचे नेमके स्वरुप स्वातंत्र्यानंतर वेगळे असु शकते असे घोषित केले...यामुळे बहुतेक शिखांना आपण फसवलो जात आहोत याची जाणीव झाली. पण फालणीपुर्व पंजाबमद्धे तेंव्हा शिख हे अल्पसंख्यच होते. फालणीने सारीच समीकरणे बदलून टाकली. फालणीनंतर बव्हंशी शिखांना भारतात यावे लागल्याने पकिस्तानातील पंजाबमधील शिखांची संख्या १९%वरुन ०.१%वर आली तर भारतातील पंजाबमद्धे ती भरघोस वाढली. त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न उग्र स्वरुपाचे होते. त्यात घटनासमितीने शिखांसाठी कसलाही स्वयतत्तेचा प्रबंध न केल्याने घटना समितीवरील शिख प्रतिनिधी श्री हुकूमसिन्घ यांनी घोषित केले कि शिखांना घटना मान्य आहे या गैरसमजात राहू नका...आमची घोर फसवणुक झालेली असून आमच्याशी दुजाभाव केला जातो आहे. यात अजून तेल ओतले गेले आणि शिखांना रानटी, गुन्हेगार जमात ठरवण्याचा हिंदु शासन प्रयत्न करत आहे आणि शिखांचा संपुर्ण विनाश केला जाणार आहे अशी निवेदने प्रितमसिंग गिलसारख्या शिक्षण्तद्न्याने प्रसिद्ध केली. अर्थात त्यात तथ्य नव्हते. पण विद्वेषाची पाळेमुळे रोवली जात होती ज्याचा फार मोठा झटका भविष्यात भारतीय उपखंडाला बसणार होता.
यामुळे शिखांचे तात्पुरते समाधान झाले. असे घडले नसते तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानचीही मागणी इंग्रजांनी मान्य केली असती हे गांधीद्वेष्टे विसरतात. पुढे नेहरुंनी आपली भुमिका बदलली आणि मुंबईत १० जुलै १९४7 रोजी संघराज्याचे नेमके स्वरुप स्वातंत्र्यानंतर वेगळे असु शकते असे घोषित केले...यामुळे बहुतेक शिखांना आपण फसवलो जात आहोत याची जाणीव झाली. पण फालणीपुर्व पंजाबमद्धे तेंव्हा शिख हे अल्पसंख्यच होते. फालणीने सारीच समीकरणे बदलून टाकली. फालणीनंतर बव्हंशी शिखांना भारतात यावे लागल्याने पकिस्तानातील पंजाबमधील शिखांची संख्या १९%वरुन ०.१%वर आली तर भारतातील पंजाबमद्धे ती भरघोस वाढली. त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न उग्र स्वरुपाचे होते. त्यात घटनासमितीने शिखांसाठी कसलाही स्वयतत्तेचा प्रबंध न केल्याने घटना समितीवरील शिख प्रतिनिधी श्री हुकूमसिन्घ यांनी घोषित केले कि शिखांना घटना मान्य आहे या गैरसमजात राहू नका...आमची घोर फसवणुक झालेली असून आमच्याशी दुजाभाव केला जातो आहे. यात अजून तेल ओतले गेले आणि शिखांना रानटी, गुन्हेगार जमात ठरवण्याचा हिंदु शासन प्रयत्न करत आहे आणि शिखांचा संपुर्ण विनाश केला जाणार आहे अशी निवेदने प्रितमसिंग गिलसारख्या शिक्षण्तद्न्याने प्रसिद्ध केली. अर्थात त्यात तथ्य नव्हते. पण विद्वेषाची पाळेमुळे रोवली जात होती ज्याचा फार मोठा झटका भविष्यात भारतीय उपखंडाला बसणार होता.
शिख धर्म: अल्प इतिहास
खरे तर याला स्वतन्त्र धर्म मानावे कि पन्थ असा वाद जुनाच आहे. परंतु स्वतंत्र धर्मग्रंथ, उपासना पद्धती आणि तत्वद्न्यानाच्या आधारावर हा स्वतंत्र धर्म आहे असे म्हनता येते. या धर्माला जातीभेद मान्य नाहित...(पण ते प्रत्यक्षात आस्तित्त्वात आहेत.) गुरू नानक ते गुरु गोविंदसिन्घ या १० गुरुंच्या शिकवणुकीचा पुर्ण पगडा या धर्मावर आहे. निराकार, अलख आणि अकाल अशा एकेश्वरी तत्वावर या धर्मियांची श्रद्धा आहे व त्याला ते "वाहेगुरु" असे संबोधतात. आदिग्रंथ गुरु ग्रंथसाहिब, दशमग्रंथ हे त्यांचे महत्वाचे धर्मग्रंथ आहेत. स्वर्गनरकादि कल्पनांवर त्यात विश्वास नसून संपुर्ण मुक्ती हेच एकमात्र धेय आहे.
या धर्माची स्थापना १५व्या शतकात झाली. त्या अर्थाने हा फारच तरुण धर्म आहे. कोणीही हिंदु नाही कि कोणी मुस्लिम या तत्वावर गुरु नानकांनी या धर्माची सुरुवात केली. शिखांमद्धे पराकोटीची स्वातंत्र्य भावना असल्याने त्यांनी त्या काळात आपली राजकिय अस्मिता जपण्यासही सुरुवात केली. गुरु तेघ बहाद्दुर आणि गोविन्द सिन्घांनी त्यासाठी शिखांचे एका लढवैय्या समाजात रुपांतर केले. गोविंदसिंघांनी १६९९ मद्धे शिखंच्या पहिल्या सतंत्र राज्याची निर्मिती केली. औरंगजेबाशी झालेल्या अपरिहार्य संघर्षात शिखांची अपरिमित हानी झाली खरी पण शिख त्यामुळे अधिकच आक्रमक झाले. गुरु बंदासिंग बहाद्दराच्या नेत्रुत्वाखाली त्यांनी मोगलांशी पराकोटीचा संघर्श केला...शेवटी मोगल सम्राट जहांदरशहाने बंदासिंगाची अमानुष हत्त्या केली. शिख ही बाब कधीच विसरु शकले नाहीत. ते आपली सैनिकी शक्ति वाढवतच राहिले आणि पुढे महाराजा रणजित सिन्घांनी शिखांचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. शिखांची स्वतंत्र अस्मिता अशा रितीने सिद्ध झाली.
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हा पंथ स्थापन झाला अशी समजुत आहे पण ती खरी नाही. हिंदुंचे शत्रु मुस्लिम हेच त्यांचेही शत्रु असल्याने असा समज होतो खरा, पण त्या जागी अन्य कोणत्याही धर्मियांचे राज्य असते तर शिखांनी त्यांचाही तेवढाच कडवा विरोध केला असता. त्यात मुस्लिमांनी त्यांच्या गुरुच्या अमानुष हत्या केल्याने द्वेषात अधिकच भर पडली. पण त्याचा फायदा हिंदु राज्यकर्त्यांनी कधी करुन घेतला असल्याचे इतिहासात...अगदी पानिपत प्रकरणीही दिसत नाही.
आज जगात जवळपास २.७५ कोटी शिख असुन त्यापैकी जवळपास व्यापार-उद्योगाच्या निमित्तने २५% शिख जगभर पसरले आहेत. अत्यंत कडवी धार्मिकता आणि लढवय्येपणा यासाठी ते प्रसिद्ध आहेत. स्वतंत्र धर्म आणि स्वता:ची अशी विशिष्ट संस्क्रुती त्यांनी गेल्या ५०० वर्षांत विकसित केली असल्याने स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न त्यांना पडणे हे काही मानवी स्वभाव पहाता अस्वाभाविक नव्हते. आणि प्रत्येक धर्मात कडवे/धर्मांध असतातच. ते अशा सुप्त भावना भदकावण्यात नेहमीच अग्रेसर राहत असतात हा जगाचा इतिहास आहे. ही जागा लोंगोवाल आणि भिंद्रानवाले यांनी भरुन काढली.
हा दहशतवाद कसा भडकत गेला हे आपण येथे थोडक्यात पाहू.
लोकशाही मार्गाकडुन दहशतवादाकडे...
सन १९५०-६० च्या दरम्यान पंजाबची राजधानी सिमला ही होती. पण भाषावार प्रांतरचनेसाठी हिमाचल प्रदेश व हरियाना ही राज्ये वगळुन स्वतंत्र पंजाब राज्याची मागणी जोर धरु लागली. यामुळे पंजाब राज्यात शिख हे अल्पसंख्य न ठरता बहुसंख्य होणार होते. अकाली दलाने पंजाबी सुभ्ह्याची मागणी नेटाने पुढे रेटली. यासाठी खुप शांततामय आंदोलने केली गेली...हजारोंना अटक करण्यात आली. या आंदोलनाला अकाल तख्ताने सक्रिय पाठिंबा दिला. शेवटी सरकार नमले आणि १९६६ साली भाषावार विभाजन होवून आताचा पंजाब आस्तित्वात आला. त्यातुनच पंजाबने पाणीवाटपात पंजाबवर अन्याय होतो आहे अशी हाकाटी सुरु केली. पंजाबी लोक शेतीवरच अवलंबुन असल्याने या तक्रारीला अर्थातच व्यापक जनसमर्थन मिळाले.
त्यामुळेच कि काय अकाली दलाने आधी शांततामय मार्गाने अनेक मागण्या पुढे करायला सुरुवात केली. अर्थात त्यातच विभाजनवादाची मुळे दडलेली होती. या मागण्या अशा होत्या:
१. केंद्रशासित चंदिगढ शहराला पंजाबमद्धे सामील करणे.
२. पंजाबी भाषा बोलणार्या आसपासच्या सर्वच भागांचे पंजाबमद्धे विलिनीकरण. (येथे बेळगावची आठवन येते.)
३. केंद्र सरकारने स्वता:चे नियंत्रण कमी करुन राज्यांना स्वयतत्ता देणे.
४. शिखांची सैन्यात भरती वाढवणे.
५. अखिल भारतिय गुरुद्वारा कायद्याला मंजुरी देणे.
२. पंजाबी भाषा बोलणार्या आसपासच्या सर्वच भागांचे पंजाबमद्धे विलिनीकरण. (येथे बेळगावची आठवन येते.)
३. केंद्र सरकारने स्वता:चे नियंत्रण कमी करुन राज्यांना स्वयतत्ता देणे.
४. शिखांची सैन्यात भरती वाढवणे.
५. अखिल भारतिय गुरुद्वारा कायद्याला मंजुरी देणे.
या मागण्या मान्य होणे शक्यच नव्हते. तेही इंदिराजींसारख्या कर्तव्यकठोर पंतप्रधान सर्वेसर्वा असतांना. पण याच काळात खलिस्तानवादी दहशतवादी संघटनांची स्थापना होवू लागली होती. त्यांचे धेय स्पष्ट होते. त्यांचे तत्वद्न्यानही सुस्पष्ट होते. "आमचा संघर्ष कोणत्याही जाती-जमातीच्या धर्माच्या विरुद्ध किंवा ब्राह्मण-बनियांनी आपले तत्वद्न्यान लादलेल्या गोरगरीबांशी नाही." असे खालसा राजने घोषित केले होते. "आम्हाला जेथे वेदना आणि हाल होणार नाहीत असे आदर्ष राष्ट्र निर्माण करायचे आहे." असेही घोषित केले गेले.
ब्राह्मण आणि बनिया हे खालसा नष्ट करण्याच्या प्रयत्नांत असल्याने त्यांच्याशी संघर्ष करु अशीही घोषणा होती. ब्राह्मण आणि बनिया हेच आपले शत्रु मानुन शिखांनी आपली सामाजिक रननीति आखल्याचे यावरुन दिसते. खलिस्तान कमांडो फ़ोर्सचा नेता वासनसिन्ग जफरवाल यानेही असेच वक्तव्य पुढे केले आणि ब्राहमनांशी आम्ही कसलीही तडजोड करनार नाही असे घोषित केले.
ब्राह्मण आणि बनिया हे खालसा नष्ट करण्याच्या प्रयत्नांत असल्याने त्यांच्याशी संघर्ष करु अशीही घोषणा होती. ब्राह्मण आणि बनिया हेच आपले शत्रु मानुन शिखांनी आपली सामाजिक रननीति आखल्याचे यावरुन दिसते. खलिस्तान कमांडो फ़ोर्सचा नेता वासनसिन्ग जफरवाल यानेही असेच वक्तव्य पुढे केले आणि ब्राहमनांशी आम्ही कसलीही तडजोड करनार नाही असे घोषित केले.
थोडक्यात शिख दहशतवादाला ब्राह्मण-बनिया द्वेषाचीही धार होती हे स्पष्ट दिसते. बहुदा हा वर्ग त्यांना स्वतंत्र धर्म म्हणुन मान्यता देत नसल्याने अशी तीव्र प्रतिक्रिया उमटली असावी. यामुळेच कि काय बौध, जैन आणि शिख हे हिंदु कायद्यांतर्गत आनल्याचाही तीव्र निषेध शिख नेत्रुत्त्वाने केला होता. शिख हा सर्वस्वी स्वतंत्र धर्म आहे अशी त्यांची मान्यता आहे आणि त्यात तथ्यही आहे हेही खरे. आपले नकळत हिंदुत्वीकरण केले जात आहे असा त्यांचा समज होण्यामागे हेही एक कारण होते. सिंघ खालसानेही असाच द्रुष्टीकोन ठेवला होता हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. "आम्ही ब्राह्मण-बनियांकडुन (खलिस्तान झाल्यावर) जबरी कर वसुल करु कारण ब्राह्मण आणि बनिया हेच गरीबांचे राजकिय आणि आर्थिक शोषण करत आहेत." असे पाच सदस्स्यिय पंथिक समितीने म्हटले आहे. यावरुन खलिस्तानसाठी ब्राह्मण-बनिया द्वेषाचा उपयोग करुन घेण्याची दहशतवादी व राजकिय संघटनांची पुरेपुर तयारी झाली होती हे उघड आहे. या द्वेषाचे कारण म्हणजे पंजाबमद्धे शिख तुलनेने अल्पसंख्यच होते (फाळणीपुर्व). फाळणीनंतर असंख्य शिख जे विस्थापित झाले त्यांची आर्थिक स्थिती पुर्णपणे तळाला पोहोचली होती. त्यांचे सर्वस्व हरपले होते. या स्थितीचा पंजाबमधील फायदा बनिया व धनाढ्य ब्राहमण वर्गाने घेतला. त्याशिवाय ब्राहमण वर्गाने वारंवार शिख समुदायाचे हिंदुत्वीकरण करण्याचा चंग बांधल्यानेही ही प्रतिक्रिया उमटत होती. ( (संदर्भ: Rise of Sikh Militancy &Militant Discourses: An appraisal of the economic factor- Birender pal Sing , panjabi University, patiyala. )
१९७१ साली सर्वप्रथम अकाली दलाचे महासचीव जगजितसिन्ग चौहान यांनी स्वतंत्र खलिस्तानची जाहीर मागणी केली. यामुले त्यांना पक्षातुन हकलले असले तरी त्यांनी परदेशात जावून शिखांवर होत असलेल्या अन्यायाचे पाढे वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला जरी ते स्वतंत्र खलिस्तान हा शांततामय आंदोलनांतुन प्राप्त व्हावा असे म्हनत असले तरी त्यांची क्रुती तशी नव्हती असे दिसते.
लाला जगतनारायण यांची हत्या: शिख दहशतवादाची सुरुवात
पंजाबमधील हिंद समाचार समुहाचे संस्थापक, पंजाबमधील सर्वाधिक खपाचे व्रुत्तपत्र "पंजाब केसरी" चे संपादक-संपादक आणि स्वातंत्र सेनानी असलेले कोन्ग्रेस पक्षाचे सदस्य श्री लाला जगतनारायन हे भिंद्रानवालेचे कट्टर टीकाकार होते. संत जर्नेलसिन्ग भिंद्रानवाले हा अत्यंत कट्टरपंथी होता. भिंद्रानवालेने १९८० च्या निवडनुकांत चक्क कोन्ग्रेस्स्चा प्रचार केला होता. (बहुदा त्यामुळे भिंद्रानवाले हे इंदिराजींनीच निर्माण केलेले विनाशक तांदव होते असे म्हतले जाते.)
शिखांच्या अनेक उपपंथांतही वाद होतेच. बब्बर खलसा, शिरोमनि गुरुद्वारा प्रबंध समिती, अखंड किर्तनी जत्था, निरंकारी असे अनेक घटक होते. निरंकारींचा नेता गुरुबचन सिंग याने १९७८ मद्धे अखंड किर्तनी जथ्याच्या १३ निदर्शकांना ठार मारवले...त्याला अटक झाली...पण त्याला पुढे दुस-याच वर्षी सोडून दिले गेले. यामुळे विभाजनवादी अजुनच आक्रमक व्हायला लागले. गुरुबचन सिंगला १९८० साली गोळ्या घालुन ठार मारण्यात आले.....भिंद्रानवालेने त्याचा जाहीर जल्लोश केला...जे संशयित अतक झाले ते भिंद्रानवालेचे निकटतम होते. त्यामुळे भिंद्रानवाले संशयाच्या भोव-यात सापडला. लाला जगतराम यांनी भिंद्रानवालेवर जाहीर टीका सुरु केली. त्याची परिनती १९८१ मद्धे लाला जगतराम यांची त्यांच्याच कार्यालयात अतिरेक्यांनी गोळ्या घालुन हत्या करण्यात झाली. येथे हे नमुद करणे आवश्यक आहे कि पंजाब केसरीने व त्यांच्या पत्रकारांनी खलिस्तानवादी दहशतवादाच्या भीषण रक्तरंजित काळात जी अलौकिक साहसी आणि निर्भीड पत्रकारितेचे दर्शन दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
भिंद्रानवालेला अटक झाली खरे...पण त्यामुळे जो क्षोभ उठला व हिंसा होवू लागली त्यामुळे तत्कालीन ग्रुहमंत्री ग्यानी झैलसिंग यांना भिंद्रानवालेची जामीनावर मुक्तता करावी लागली. भिंद्रानवाले रातोरात हिरो बनला. शिख तरुणांनी सशस्त्र बनावे अशी उघड आवहने तो करु लागला. संत लोंगोवालने त्याला त्याच्या कडव्या सशस्त्र अनुयायांसह सुवर्ण मंदिरात रहाण्यास अनुमती दिली. सुवर्ण मंदिर हा एक अभेद्य किल्लाच बनुन गेला. बहुसंख्य शिख अतिरेक्यांना सीमेलगत पाकिस्तानी आय.एस. आय. कडुन प्रशिक्षन दिले जात होतेच. धनाची गरज पुरवण्यासाठी ब्यंका लुटन्याच्या योजना तयार होत्याच.
त्यातच पुन्हा धार्मिक वाद उपःआळुन आला. घटनेतील शिखांना हिंदु कायद्यात खेचण्याची तरतुद अमान्य करत शिख हा स्वतंत्र धर्म असल्याने त्यांच्या जन्म/विवाहाच्या नोंदी शिख म्हणुनच केल्या जाव्यात अशी मागणी अकाली दलाने केली. तोवर पंजाबमधील वातावरण पुर्ण तापले होते व स्वतंत्र खलिस्तान हिच काय ती मागणी उरली होती. निष्पाप हिंदुंच्या हत्त्या बेसुमार वाढल्या होत्या. लुटालुट, बलात्कार, खंडण्या वसुलींना ऊत आला होता. राष्ट्रवादी शिखही या हिंसेच्या तांदवातुन सुटले नाहीत.
एकदा भिंद्रानवालेने आपली मानसे आनण्यासाठी एक बस पाठवली होती. ती पोलिसांनी अडवली हे कळताच त्याने, "पाच वाजेपर्यंत बस सोडली नाही तर मी एका तासात ५००० हिंदुंना ठार मारेल" अशी धमकी त्याने दिली होती. आणि तसे करण्यास तो खरोखर समर्थ होता...तेवढा क्रूरही होता. या हिंसाचारात एकुण २०,००० पेक्षा जास्त लोक ठार मारले गेले यावरून या दहशतवादाच्या भीषणतेची कल्पना यावी.
शिख धर्माची मुलतत्वेच मुळात लढवय्ये अनुयायी बनवण्यासाठी असल्याने दहशतवाद हा या धर्माचा एक पाया आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. धर्मांनी दहशतवादाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थनच केले असल्याने राजकिय वा आर्थिक उद्दिष्त्ये साध्य करण्यासाठी धर्माचा कसा वापर केला जातो हे आपण अन्य धर्मांच्या बाबतीत पाहिलेच आहे. शिख धर्म त्याला अपवाद राहिला नाही. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हा पंथ निर्माण झाला असे म्हणणार्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे.
ओपरेशन ब्ल्यु स्टार
सुवर्ण मंदिर हा दहशतवाद्यांचा मोठा अड्डा आणि मुख्य केंद्र बनल्याने केंद्र सरकारचा तो मोठा चिंतेचा विषय बनला होता. विभाजनवाद कोणत्या पातळीवर जावुन ठेपेल याचा नेम नव्हता. राज्य सरकारची यंत्रणा खुद्द दहशतवाद्यांच्या आहारी गेली होती. कोणत्याही क्षणी स्वतंत्र खलिस्तान होईल असे दिसू लागले होते. पण सुवर्ण मंदिर हे सर्वच शिखांच्या द्रुष्टीने सर्वात पवित्र धर्मस्थान असल्याने त्यावर हल्ला करुन अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा विचारही कोणाच्या मनात आला नसता. किंबहूना भिंद्रानवालेचीही हीच अटकळ असावी.
पण इंदिराजींनी ते धाडस केले. ३ जुन १९८४ला जनरल अरुण वैद्यांच्या देखरेखीखाली ले. जनरल कुलदिपसिंग ब्रार यांनी या कारवाईचे नेत्रुत्व केले. मंदिराला वेढा घातला गेला. वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न झाला. दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले गेले. मंदिरात असलेल्या शेकडो निष्पाप भाविकांना बाहेर पाठवण्याच्या विनंत्या केल्या गेल्या. शे-सव्वशे व्रुद्ध/आजारी भाविकांचीच तेवढी सुटका झाली. नंतर जवळपास २४ तास युद्ध झाले. दहशतवादी आत्याधुनिक शस्त्रसामग्रीसह जोरदार प्रतिकार करत होते. शेकडो जवान आणि दहशतवादी यात मारले गेले. या गोळीबारात मंदिरातील निष्पाप भाविकही ठार झाले. महत्वाचे म्हनजे भिंद्रानवालेही यात ठार झाला. सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या तावडीतुन मुक्त झाले. पण येथेच नव्या विनाशकारी हिंसाचाराची नांदी झाली. ती पुढे अनेक वर्ष हजारोंचा बळी घेवूनच तात्पुरती थांबली.
पण इंदिराजींनी ते धाडस केले. ३ जुन १९८४ला जनरल अरुण वैद्यांच्या देखरेखीखाली ले. जनरल कुलदिपसिंग ब्रार यांनी या कारवाईचे नेत्रुत्व केले. मंदिराला वेढा घातला गेला. वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न झाला. दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले गेले. मंदिरात असलेल्या शेकडो निष्पाप भाविकांना बाहेर पाठवण्याच्या विनंत्या केल्या गेल्या. शे-सव्वशे व्रुद्ध/आजारी भाविकांचीच तेवढी सुटका झाली. नंतर जवळपास २४ तास युद्ध झाले. दहशतवादी आत्याधुनिक शस्त्रसामग्रीसह जोरदार प्रतिकार करत होते. शेकडो जवान आणि दहशतवादी यात मारले गेले. या गोळीबारात मंदिरातील निष्पाप भाविकही ठार झाले. महत्वाचे म्हनजे भिंद्रानवालेही यात ठार झाला. सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या तावडीतुन मुक्त झाले. पण येथेच नव्या विनाशकारी हिंसाचाराची नांदी झाली. ती पुढे अनेक वर्ष हजारोंचा बळी घेवूनच तात्पुरती थांबली.
यामुळे शिख पराकोटीचे संतप्त झाले होते. हा त्यांच्या धर्मश्रद्धेवर मोठा आघात होता. भिंद्रानवाले हा शिखांच्या (अपवाद वगळता) नवीन श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला.
इंदिराजींनी सर्व धोक्यांची पुर्वकल्पना असुनही आपले शिख शरीररक्षक होते तसेच ठेवले. हा निर्णय त्यांच्या बलिदानास कारणीभुत ठरला. ३१ ओक्टोबर १९८४ च्या सकाळी सतवंत सिंग आणि बेअंतसिंग यांनी गोळ्या घालुन इंदिराजीची हत्या केली. सारा देश सुन्न झाला...बधीर झाला...
मग उठली संतापाची लाट.
मग उठली संतापाची लाट.
शिखांच्या वेचून हत्या
शिखविरोधी हिंसक दंगली कोंग्रेसने जाणीवपुर्वक घडवल्या कि ती लोकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती? खरे तर यात दोन्ही बाबींचा समावेश होता. शेकडो निष्पाप शिखांचे शिर्कान केले गेले आणि ही नक्कीच मानवतेला काळीमा फासणारी बाब होती. द्वेषाचे उत्तर प्रति-द्वेषाने द्यायचे ही मानवी आदिम भावना आजही नष्ट झालेली नाही हेच खरे.
भारतात हिंदु-मुस्लिम दंगे होत-होतात हे आपल्याला माहित आहे, पण दहशतवादी म्हणता येतील अशा कारवाया बाबरी मशिद उध्वस्त करेपर्यंत मुस्लिम दहशतवाद आपल्याला माहितही नव्हता. दहशतवाद म्हणजे काय असतो हे भारतियांना शिकवले ते शिख दहशतवाद्यांनी...खलिस्तानवाद्यांनी.
भारतात हिंदु-मुस्लिम दंगे होत-होतात हे आपल्याला माहित आहे, पण दहशतवादी म्हणता येतील अशा कारवाया बाबरी मशिद उध्वस्त करेपर्यंत मुस्लिम दहशतवाद आपल्याला माहितही नव्हता. दहशतवाद म्हणजे काय असतो हे भारतियांना शिकवले ते शिख दहशतवाद्यांनी...खलिस्तानवाद्यांनी.
स्वतंत्र देश हवा ही शिखांची भावना चुकीची आहे असे मानता येत नाही. धार्मिक आधारावर एक फालणी झालीच होती त्यामुळे शिखांनाही तशी स्वप्ने पडणे वावगे नव्हते. कदाचित त्यांनी आपल्या मागण्या रेटण्यासाठी घतनात्मक पद्धतीने आंदोलने केली असती. पण त्याच वेळीस चुकीचे राजकारण आणि प्रस्नांवर तात्पुरते उत्तर शोधणे या भारतीय राजनैतीक व्रुत्तींमुळे शिखांना भदकावले गेले आणि दहशतवादाचा आश्रय घेणे भाग पडले असे आता स्पष्टपणे म्हनता येवू शकते. म्हणजे एका राजकीय दहशतवादाला शिखांनी हिंसक दहशतवादाने उत्तर दिले. एका परीने विचार केला तर दोन्ही बाजु अन्याय्य आणि मानवताविरोधी होत्या असे आपल्या लक्षात येईल.
अति-हिंसक प्रतिक्रिया आणि एन्कौंटर्स.
खलिस्तानवादी दहशतवादी फक्त भारतातच नव्हे तर युरोप -अमेरिका आणि क्यनडातही होते. २३ जुन १९८५ रोजी एयर इंडियाचे एक विमान आयर्लंडच्या किनार्यालगत आकाशातच उडवले गेले. यात ३२९ प्रवासी ठार झाले. त्यात क्यनेडीयन नागरीकच जास्त होते. शिख दहशतवादाचे पडसाद यामुळे जगभर उमटले. भारतात तर सर्वत्रच हिंसेचे थैमान उठले. कोनतेही शहर त्याला अपवाद राहिले नाही. खुद्द पुण्यात शिख दहशत्वाद्यानी अनेक काळ ठाण मांडुन ब्यंका लुटने, सर्रास गोळीबार करत दहशत माजवणे असे प्रकार तर केलेच पण रिटयर्ड जनरल अरुणकुमार वैद्य यांचीही हत्या केली. पंजाबमद्धे तर हिंसेचे तांडव उठले होते. २९ एप्रिल १९८६ रोजी स्वतंत्र खलिस्तानची घॊषणाही करण्यात आली. खलिस्तानचे भूत भारताच्या मानगुटीवरुन उतरायला तयारच नव्हते.
आणि शेवटी पोलिसांना एन्कौंटरचाच आश्रय घ्यावा लागला. शेकडो दहशतवादी (यात काही निष्पापही आले) पोलिसांनी ख-या-खोट्या एन्कौंतरमद्धे ठार मारले. पोलिसांचा हा पवित्रा दहशतवाद्यांना अपेक्षित नव्हता, त्यामुळे ते अक्षरश: हबकुन गेले. खलिस्तानी चळवळ १९९४-९५ पर्यंत संपत गेली ती केवळ या एन्कौंटर्समुळे असे आता सारेच मान्य करतात. अर्थात स्व. राजीव गांधी यांनीही शांततामय मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राजीव-लोंगोवाल यांच्यात तसा करारही झाला...पण काही महिन्यांत लोंगोवालांचीच हत्त्या झाल्याने पुन्हा अदसर निर्माण झाला.
येथे मराठी माणसांना अभिमान वाटण्यासारखी बाब म्हणजे माझे मित्र व वंदे मातरम संघटनेचे संस्थापक, श्री. संजय नहार यांनी मराठी तरुणांना सोबत घेत पंजाबमद्धे जीवाचा धोका पत्करत अनेक पदयात्रा केल्या...तेथील लोकांचे अश्रु पुसले आणि ऐक्याची-स्नेहाची ग्वाही दिली. एक मराठी तरुण तेथेच एका अभियानात शहिदही झाला. पंजाब केसरी दैनिकाने तर जे कार्य बजावले त्याला तोडच नाही.
हळु हळु खलिस्तानी दहशतवाद मवाळ होत संपला हे खरे...पण तो तात्पुरत्या स्वरुपाच्या आहे...
कारण सध्या विखुरलेल्या खलिस्तानवादी संघटना पुन्हा बळ धरण्याचा, एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरचे शिख अजुनही भिंद्रानवालेला विसरले नाहित...त्यांच्या द्रुष्टीने ते शहीद हुतात्मा आहेत. "पिण्याच्या पाण्यापेक्षा खलिस्तान आस्तित्वात येणे आवश्यक आहे." असा प्रचार हे घटक जगभर करत असतात. मुस्लिम-शिखांत भांडण लावण्यासाठी रिसर्च & अनालिसिस ही गुप्तचर संघटना कार्यरत आहे अशा अफवाही ते पसरवत आहेत.
आज पकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या भिषण छायेत आहे म्हणुन नाहीतर कदाचित खलिस्तानी दहशतवादाचे पुनरुज्जीवन कधीच झाले असते असे म्हनता येईल अशी स्थिती आहे.
आज पकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या भिषण छायेत आहे म्हणुन नाहीतर कदाचित खलिस्तानी दहशतवादाचे पुनरुज्जीवन कधीच झाले असते असे म्हनता येईल अशी स्थिती आहे.
म्हणजेच सध्या ही चलवळ/दहशतवाद सुप्तावस्थेत आहे असे वाटत असले तरी ते वास्तव नाही.
शेवटी धर्मच!
धर्मच शेवटी जागतीक दहशतवादाला कसे जबाबदार आहेत हे आपण सर्व धर्मियांच्या दहशतवादांवरुन पाहिलेच आहे. शिख हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचाच एक भाग आहे असा प्रचार करत, कायदे-प्रणालीही वापरत शिखांचे स्वतंत्र अस्तित्व पुसण्याचा हिंदुंनी जो अविरत प्रयत्न केला त्यातुन हिंदु धर्मियांबद्दल...विशेषता: ब्राह्मणांबद्दल त्यांच्या मनात राग भरायला सुरुवात झाली हे स्पष्ट दिसते. बनियांमुळे त्यांचे आर्थिक शोषण होत होते ते वेगळेच. धर्म वाढवण्याच्या सुरुवातीच्या काळात जरी आधीच्या गुरुंनी हिंदुशी जुळवून घेतले असले तरे पुढे तशी स्थिती उरली नाही. आधी घिंदु घरातील एक तरी मुलगा शिख होण्यासाठी द्यावा असा आग्रह असे...पण तेही पुढे थांबले. राजकिय व सांस्क्रुतीक द्रुष्ट्या ते आपले वेगळेपण ठळक करत गेले. हिंदुंमद्धे एरवी क्वचित असणारी कट्टरता ते जोपासत गेले.
खरे तर स्वतंत्र धर्मीय म्हणुन त्यांनी स्वत:ची अस्मिता जोपासली होतीच. त्यामुळेच इंग्रजांनी हिंदु-मुस्लिमांबरोबरच शिखांनाही स्वातंत्र्याआधी चर्चेस बोलावले होतेच. म. गांधी व नेहरुंनी त्यांना काही प्रमाणातील स्वयत्ततेची आश्वासने दिली नसती तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानही अस्तित्वात आले असते. आणि ते अन्याय्य म्हनता आले नसते कारण जो नियम मुस्लिमांना तोच शिखांना लागला असता. पण स्वतंत्र भारताने आपले आश्वासन पाळले नाही त्यामुळे "हिंदु" सरकारने शिखांना फसवले असाच त्यांचा समज झाला. त्यात तत्कालीन अनेक अन्यायांचीही भर पडली. त्यातुन शिख दुखावत जात धर्माच्या नावाखाली एक होवू लागला...
आणि एक रक्तरंजित इतिहास लिहिला गेला.
आपला लेख वाचला आपला खूप अभ्यास आहे .. मला या विषयावरती माहिती नव्हती . धन्यवाद ! एक गोष्ट ऐकून आहे कि गुरु गोविंदसिंग जी रामनाम जप करायचे आणि त्यांची श्री समर्थ रामदास स्वामींची त्यांच्या भारतभ्रमणात भेट झाल्याचे मी ऐकले होते मला संदर्भ आठवत नाहीत आत्ता .. तशी माहिती असल्यास कळवावे हि विनंती
ReplyDeletethis indicates,one of reson was that terorists dont wanted to rulled socially and politically by bramin-baniya.sedule castes also dont wanted tobe rulled by them but they accepted democrasy with concession of reservation.
ReplyDeletethanks for writing.newspapers and magzine of maharastra never told about this.