Wednesday, March 16, 2011

जगण्यावर नि मरणावर प्रेम करावे असे म्हणतात ....

जगण्यावर नि मरणावर प्रेम करावे असे म्हणतात
ते ठीकच आहेत
कारण तसाही मी
जगण्याच्या गटाराकडुन
ती घाण अतीव स्नेहाने
(जगणा-यांच्या गर्दीत तेवढेच शक्य असते म्हणून....)
हुंगत...हुंगत
दूर...दूर जात
त्या क्षितीजापारच्या
स्नेहल म्रुत्युला
अनिवार
शोधत आहे.
माझे जगण्यावर आणि मरणावर अनिवार प्रेम आहे!

पण शोध अविरत पुन्हा आणि पुन्हा एकच...
जगण्याच्या आणि मरणाच्या
पार नेमके काय आहे?

माझ्यावर आहे केवढे त्या
ओढाळ म्रुत्युचे
नि त्या स्नेहल जीवनाचे
अनिवार प्रेम...
एक मला जगू देत नाही
नि दुसरा मला मरू देत नाही...
आणि या दोहोंपार
आहे तरी काय
हे ते मला जाणू देतच नाहीत!

कधी देतो मी जीवनाला हुलकावनी...
तर कधी म्रुत्यूला
सापडेल म्हणतो कोठे तरी सांदड
निसटुन जायला
पण
अभद्र असा मी कि
कधी जीवनाच्या
तर कधी
म्रुत्युच्या
दामटीत सापडलेला...

मग कसा होणार तो शोध मपल्याला?

काहीतरी आहे एवढेच काय ते कळते
धुसर असले तरी सत्य ते गमते
कि नसे जीवन हे सत्य, परि आभास
कि वस्तू नसे येथे...फक्त निरामय अवकाश...
(एकमेकांत विरजल्या गोष्टी...
ही व्यष्टी नसे समष्टी...)

मी सांगत बसलो गोष्टी म्रुत विश्वात
म्रुतांच्या म्रुत लोकांना
मी गात राहिलो गाणी
श्रवणा-या मूकबधीरांना
मी गिळत आहे जगणे
म्रुत्युला धीर देण्याला...

हे भयभीत तू जो म्रुत्यू
ये पी हा अधर-प्याला
येईल तुला मग धीर तो
मजला अविरत प्यायाला...
धुंदी अशी तुज बघ कशी मिळते
मजला प्याल्यानंतर...
म्हणशील वेड्या तू
जीवनाची मिळली हाला...

म्रुत्यू...
बस एक जरा मला सांग
तुझ्यापार आहे ते काय़?
एक अनावर जिद्न्यासा
सांग उपाय तिजवर काय?

चल भेटु स्थळी अशा कि
जेथे तु नि जीवन
हातात घालता हात
देत अम्हावर मात
त्यापार असे काही
जे मला असे अद्न्यात...

मरणात म्रुत्यु तू जगतो...
जीवनात म्रुत्यु तू जगतो
जीवनात जीवन मी जगतो...
तरी म्रुत्यु...अमर तू असतो...

मग जीवन असते जेही...
पर्वा मी कशाची करतो?

2 comments:

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...