Tuesday, March 5, 2013

विषमतेचे पाप करू नये!


धर्मांचा तत्वज्ञानाच्या आधारे विचार करणे वेगळे व समाजव्यवस्थेच्या अंगाने विचार करणे वेगळे. चातुर्वर्ण्य ही वैदिक धर्माची निर्मिती आहे. त्रैवर्णिक हे वेदाधिकारी असल्याने ते वैदिक धर्मीय असले तरी शुद्रांना धर्मबाह्य समजघटक असल्याने वैदिक अधिकार न देणे साहजिक होते. जे शुद्रांच्याही निर्माणकार्याच्या बाहेरचे वर्ग होते व ज्यांच्याशी वैदिक धर्मियांचा सांस्कृतिक/सामाजिक जीवनात विशेष संबंधही येत नव्हता त्यांना त्यांनी अस्पृश्य मानणेही साहजिक होते. शुद्रांना व अतिशुद्रांना वेदांशी देणेघेणेही नव्हते कारण त्यांच्या धार्मिक कल्पना स्वतंत्र होत्या. त्यांची दैवते भिन्न होती. कलौघात दुस-या शतकापासून राजकीय परिस्थितीमुळे जसे यज्ञ जवळपास थांबले वैदिकांना अवैदिक दैवतांचीही पौरोहित्ये स्वीकारावी लागली. असे करण्यासाठे त्यांनी सहाव्या शतकापासून एक प्रचंड उद्योग पुराणांमार्फत सुरू केला तो हा कि अवैदिक दैवतंचा धागा बादरायणी संबंध जोडत त्यांची पूजा वैदिकांनी करण्यात काही गैर नाही असे दर्शवायला सुरुवात केली. विष्णु ही ऋग्वेदातील दुय्यम देवता त्यांच्या कामी आली. शिवादि देवता तुलनेने अर्थप्राप्तीसाठी फारशा उपयुक्त नव्हत्या त्यामुळे विष्णुमाहात्म्य वाढवणे व त्याचेही मुर्तीकरण करणे आवश्यक बनले. जेथे अशक्य झाले तेथे शैवस्थाने बळकावून त्यांचे वैष्णवीकरण करण्याचा उद्योग सुरु झाला. उदा. पंढरपुर व तिरुपती बालाजी. पुरीसारखे स्थान तर बौद्धांकडुन बळकावले. ज्यांना हे जमले नाही ते शिवाला रुद्र मानत शिवाशी चिकटुन राहिले. पुर्वास्प्रुष्यांना मंदिरबंदी ही बव्हंशी वैष्णव स्थानांपुरतीच होती हाही इतिहास येथे लक्षात घ्यायला हवा. पौरोहित्यामुळे वैदिकांनी कुलदैवत ही संकल्पना शैवांकडुन उचलली. वैदिक धर्मात कुलदेवता नसते तर गोत्र असते. वैदिकांनी आपल्या धर्माची स्मृती म्हणुन गोत्र कायम ठेवली. वैदिक सम्स्कार व वैदिक अधिकार कायम ठेवले. वैदिक धर्मात क्षत्रीय व वैश्य उरलेलेच नसल्याने कलियुगात क्षत्रीय व वैश्य नाहीत (कलावाद्यंतयो स्थिती) असे सांगायला सुरुवात केली. यानेही अवैसिक समाजाला फरक पडत नसल्याने त्यांच्या द्रुष्टीने शुद्र असलेले सातवाहन ते यादव राजे बनतच राहिले व प्रदीर्घ काळ सत्ताही चालवल्या.

परंतू वैदिकतेशी त्या धर्माशी आपला संबंध नाही हे भान मध्ययुगात सर्वांचेच सुटले. त्याला सातत्याने येणारे दु:ष्काळ (सन १००० ते १६३० पर्यंत अडिचशे मोठे दुष्काळ भारतभर पडले.) त्यात इस्लामी राजवटीने सर्वच समाजाचे आत्मभान घालवले. जातीसंस्था जी पुरती सैल होती ती घट्ट बनली, बंदिस्त्व बनली आणि चातुर्वर्ण्यातील आपण तळचे व आपल्यापेक्षाही तळचे समाज आहेत असा गैरसमज उत्पन्न होत गेला. वा. सी. बेंद्र्यांनी Coronation of Shivaji the Great या ग्रंथात तत्कालीन समाजस्थिती व धर्मकल्पनांचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण केले आहे. चातुर्वर्ण्याची वैदिक संकल्पना समाजमनात कशी रुजली होती त्याचे विकराळ दर्शन आपल्याला घडते.

आता ही संकल्पना आपली नाही, आपल्या धर्माची नाही हे जर एवढे स्पष्ट असेल तर ती ज्या वैदिक धर्माची आहे ती त्यांची त्यांना परत देऊन स्वत:ला क्षत्रीय/वैश्य (जे त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाहीत) शुद्र-अतिशुद्रादि संबोधत विषमतेचे पाप करू नये. सर्व शैव होते व आहेत. वैदिक शैव बनले असतील तर ते कसे हे मी वर सांगितलेच आहे!

-संजय सोनवणी

11 comments:

 1. आप्पा - या वेळेस माझ्या आधी आलात - बाजी मारली - मानला !
  बाप्पा -अहो आम्हीपण ससा कासवाची गोष्ट वाचल्ये महाराज ! तुम्हाला पुढे गेलेले पाहिले -
  म्हटलं या आप्पाचा ससा होणार ! पुढे हास्यक्लब आहे बायकांचा -तिथे स्वारी रमणार !
  आप्पा - ज्योक आवडला ! पण गम्मत आहे नाही का - पूर्वी ससा कासव आणि सगळे प्राणी बोलत होते ,आणि तेपण मराठीतून ! किती मस्त नाही का ?
  बाप्पा - काय माहित , खर खोट देव जाणे ,पण आता मुंबईत मनुष्यप्राणी पण मराठी बोलत नाहीये -
  आप्पा - ज्योक आवडला बर का !
  बाप्पा - मुंबईत फक्त पक्षीच मराठीत बोलतात !
  आप्पा - का s s य ?
  बाप्पा - कारण मुंबईत पक्षीच नाहीत शिल्लक ! करा हिशोब -
  आप्पा - ज्योक आवडला बर का !
  बाप्पा - आज काय चाललय काय - सारख ज्योक आवडला - ज्योक आवडला -अं ?
  बाप्पा - अहो , ज्योक होता तो कळला s s असे म्हणण्यापेक्षा हे बरे !
  आप्पा - ह्या मराठी भाषेची हीच तर खासियत आहे - नेमके काय म्हणायचं ते शोधाव लागत !
  बाप्पा - संजय सर दिसले का इतक्यात ?
  आप्पा - का हो - काय विशेष ?
  बाप्पा - बर झाल ,आधी तुमच्याशी बोलून घेतो , एकदम एव्हढ्या मोठ्ठ्या माणसाशी बोलण्यापेक्षा तुमच्या माझ्यात कसं s s चालतंय जरा झटापट झाली तरी !
  आप्पा - काय विशेष ?
  बाप्पा - मला बऱ्याचदा आठवण येते - मी आजोळी समुद्रकाठी वाळूची पिंड करत असे,अगदी लहानपणी- देवाचा माझा आलेला तो पहिला संबंध !- छान वाटायचं -कोकणात गेलो की !
  आप्पा - ट्रान्स मध्ये चाललात ! परत या ,बाप्पा , परत या -तुम्हाला सांगतो - बाबारे - फार डेंजर असत ते - आईकडल आजोळ नेहमीच छान वाटत !
  बाप्पा - पण हवं हवंस वाटत -मन रमत पटकन - त्या नारळाच्या झावळ्या , भरती ओहटी,वेतेश्वराच्या आवारात नाखव्यानी जाळी वाळत टाकली की
  शंकराच्या देवळातून लंगडा गुरव ओरडत येई , अरे हि एकच जागा भेटली का रे X X - -
  आप्पा - हो रे , आमच्याकडे नदीकाठी दगडी चकतीने भाकऱ्या पाडायचो आम्ही घाटावर - शांत नदीच्या काठी शंकराच्या देवळातून ओंकारनाद घुमायचा !
  बाप्पा - किती झपाझप वर्ष जातात नाही का ? दरवर्षी २ महिने आजोळी ठरलेले !. आता आजोबापण गेले - सगळच बदललं -बायकांचं राज्य आलं !
  आप्पा - एक्झ्याटली - हेच ते - नेमके तुमच्या रूपाने सापडले !
  बाप्पा - काय सापडले हो ? नदी आणि शंकर ! नदीकाठची संस्कृती आणि शिवालय ! हीच ती आपली संस्कृती -
  आप्पा - तसच अगदी नाही - समुद्रकाठी तर कोकणात असंख्य देवळे आहेत ! शंकराची आहेत , दुर्गा आहे ,दत्ताची आहेत,मुरलीधराची आहेत,गोपाळकाला हा तर कोकणातला मोठ्ठा सण !
  बाप्पा - पण संजय सरांची हि घाई का असते हो ?-विष्णुपण आपलाच नि शंकर पण आपलाच नां ?.
  आप्पा - जस आपलं लहानपणाच कोकण वेगळ आणि आत्ताच वेगळ असं तुम्हाला वाटतय ना ? तसच हे पण - तशी कल्पना करा म्हणजे तुम्हाला ऊमजेल बघा -
  बाप्पा - तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे - १ - २ - १० पिढया अशा कितीतरी - अनेक नाती अनेक स्मृती घेऊन आपण जगत असतो - जुन्या जखमा ,जुन्या कथा , अनेक विजय - अनेक पराजय या मातीने पाहिले असतील ! काय खोटे नि काय खरे ?काय अन्याय्य नि न्याय्य - ? बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे हे नुसतेच पुस्तकी वाक्य नाहीये ! शिवाजीचे सगळेच किल्ले शिवाजीने बांधले नाहीत - नाही का ? त्यापुर्वीपण किल्लेदार होताच-बदल झाला तो वृत्तीत - !
  आप्पा - लोक इकडून तुकडे हलतच होते - कधी १० - २० -तर कुणी १०० -२०० ,१००० -२०००-कधी हरलेले तर कधी जिंकण्साठी म्हणून ,कधी अन्नासाठी तर कधी हाकलून दिलेले म्हणून -
  बाप्पा - टोळ्या होत्या तेंव्हा काय ? " ओम गणानां त्वां गणपती हवामहे याचा अर्थ काय ?" सगळ गणाधीश ,टोळीप्रमुखाला अर्पण !- हे नैसर्गिक आहे - त्याकडे एक उत्क्रांती म्हणून पाहिले कि यालाच टाईम डायमेंशन म्हणायचं ! टोळीप्रमुख हाच त्यांचा देव -गणाधीश !त्यांच्या अपेक्षा पण लिमिटेड - आमचे रक्षण कर - मग आमचे सगळे आहे ते -त्झेच आमची स्त्री सुद्धा ! . मग तो टोळी प्रमुख कुठल्या रुपात मान्य करायचा ? कधी सोंडवाला तर कधी जटाधारी ,कधी स्त्री रुपात तर कधी विश्वरूप दाखवणारा !. सर्व जगभर हेच या ना त्या रुपात . कुठे अतिरेक झाला तर एखादा पैगंबर निघत असे . स्वतः पुजारी असून देवळे उखडून टाकत असे . - पण दुर्दैवाने पुढे त्यातपण पंथ आणि मतभेद होतच असत - भारतात त्यांना जाती म्हणतात इतकेच .एकाने आपली वरिष्ठता सिद्ध केली कि बाकीचे कनिष्ठ - हे ओघानेच आले !
  शेवटी तत्वज्ञान आणि त्या प्रमाणे जीवन जगणारा एकही धर्म आज मितीस नाही .

  ReplyDelete
 2. आप्पा - जरा दमान - पाणी प्या ,उकाडा सुरु झालाय !. आपण हे सगळ संजय सराना सांगायचं असं ठरवलंय ना ?मी बघा - जेव्हढे झेपेल तितकेच घ्यायचे , बाकीचे सोडून द्यायचे - असे धोरण ठेवतो ,
  बाप्पा - तुमचं बर आहे हो , आमची आणि संजय सरांची एकजात - इतिहासकाराची ! आम्ही सारखे सिद्धच करत असतो !
  आप्पा - बरोबर आहे - चहाच्या दुकानात गेलात की सुरु-
  चहा भारतात किती साली आला - त्यापूर्वी लोक काय पीत असत !- तो ऑर्डर घेणारा पण आता सुरु होतो - आपल्याला पाहिल्यावर !- तो इराणी तर तोंडच फिरवून बसतो - कारण आपलं हिंदी आणि त्याचं हिंदी आणि मध्ये हा चहा -
  आप्पा - तो इराणी तर म्हणतो कि भारतात चहा मीठ ,कार ,सगळ टाटाच ( पारशी हे मुलाचे इराणीच ) बनवतात असे तो एकदा डेअरिंग करत म्हणाला तेंव्हा किती राग आला तुम्हाला !
  बाप्पा - तात्पर्य काय जो तो आपापल्या परीने जीवनाचे नि जगाचे अर्थ लावत असतो ! - बळी तो कान पिळी हे चिरंतन सत्य आहे !
  आप्पा - आपण इमर्जन्सीत लढलो हुकुमशाही विरुद्ध आणि तुम्हीच असे बोललात तर नवीन पिढीने काय म्हणायचे
  बाप्पा - अहो - या लोकांची अजून तीच चर्चा चालू आहे ! कसं जगायचं एका छपराखाली ?काय आहे आपल्यात महान ?नद्या ? त्या तर बरबटल्या आहेत - आकाश धुराने भरून गेलाय - धरणे कोरडी झाली आहेत ! हे वेडे देवालाच पाण्यात कोंडत आहेत ! आणि आपण भांडतो आहोत कि शैव भारी का वैष्णव - तो प्रश्नच नाही हो आजच्या जगण्याचा - आजपासून सगळे १०० वर्ष शैव आहेत असे धरा - सगळी पुस्तके कपाटात ठेवा - सगळ्या यज्ञावर बंदी घाला - काय होणार आहे ? लाच लुचपत संपणार आहे का ?कोण हमी घेतोय का की सगळे वैष्णव हे शैव झाले तर भारतात एकही बलात्कार होणार नाही -एकही भृणहत्या होणार नाही -एकही वर वधूकडून हुंडा घेणार नाही -? मग कशाला हा वाद ? मी तर याला बुद्धिभेदच म्हणतो !
  विषमतेचे पाप करू नये हेच खरे !

  ReplyDelete
  Replies
  1. आप्पा-बाप्पा, तत्वत: तुमचे म्हणणे बरोबर आहे. परंतु धर्माचा प्रभाव जेंव्हा आजच्याही काळात समाजाला ग्रासून असतो तेंव्हा धर्मेतिहासाकडे नाईलाजाने वळावे लागते. आपल्या जातीय आणि वर्णीय वास्तवाकडे कशी डोळेझाक करता येईल? समता ही कायद्याने येत नाही तर तिला धर्माचाच आधार द्यावा लागतो. मी स्वत: इश्वरावर/धर्मांवरच एकुणात विश्वास ठेवत नाही. पण धर्म नसलेला समाज हे सध्यातरी एक स्वप्नच असतांना धर्माची पुन्हा चिकित्सा करत पाळेमुळे शोधणे आवश्यक बनून जाते ते त्यामुळेच. ज्या व्यवस्थेमुळे विषमता येते ती धार्मिक पायावरच नाकारणे आवश्यक बनून जाते. असंख्य जातींचा अभ्यास करत असतांना मनात रुजलेल्या धर्मकल्पना किती घट्ट आणी जनमानस व्यापून उरलेले आहे याची कल्पना आली आहे. तुम्हालाहे असेलच. असो. नेहमीप्रमाणेच दिलखुलास प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

   Delete
  2. बाकी तुम्ही जे सामाजिक प्रश्न उपस्थित केले आहेत ते तर कळीचे आहेतच व त्यासाठी लढा द्यावाच लागणार आहे. पण स्त्रीभृणहत्येचा प्रश्नही शेवटी धार्मिक समजुती (स्त्रीयांना गौण स्थान) पर्यंत पोहोचतोच!

   Delete
 3. आप्पा - सर्वांनी यात सहभाग घ्यावा हि मनीची इच्छा !
  बाप्पा - यथाशक्ती संजय सरांनी जो ज्ञानयज्ञ चालवला आहे त्यात आम्ही चार समिधा अर्पिल्या !
  आप्पा - धन्यवाद! सर आपल्या उत्कट प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  बाप्पा - यज्ञ शब्दाबद्दल क्षमस्व , !
  सर आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अजून आपल्याशी संवाद होत रहातील असे वाटते !
  इतरानाही नम्र विनंती की आपण सर्वानी चर्चा करुया !
  आप्पा - बाप्पा , मी नियमित वाचत असतो सरांचे लेख , तू पण नियमित भेटत जा - काय ?

  ReplyDelete
 4. संजय सर ,
  आपण आप्पा बाप्पाना दिलेले उत्तर अनावश्यक डिफेन्सिव्ह मूड मध्ये दिलेले वाटते,
  आपला वैचारिक गोंधळ होणार नाही ही खात्री आहेच !
  तरीही ,
  असे म्हणावेसे वाटते की ,
  धर्माचा प्रभाव हा फक्त कर्मकांडाच्या रूपाने आज शिल्लक आहे ,
  एरवी आपण बहुतेक जण पूर्ण धर्मभ्रष्ट आहोत असे म्हटले तर ते सत्याला धरूनच होईल !
  निधर्मी प्रजासत्ताकात सरकारनेच आपल्याला जात आणि वर्ण यांची नव्याने जाग आणून देत
  एक अवघड परिस्थिती निर्माण केली आहे. - प्रत्येक राजकीय कृती हे दुधारी शास्त्र असते हे गृहीत धरले
  तर येणारे दिवस कसे असतील याची थोडी कल्पना येते आणि मन उद्विग्न होते.
  समता हि कायद्याने येत नाही हे आपले वाक्य भीतीदायक आहे.त्याला धर्माचा आधार द्यावा लागणे ही तर अजूनच भयाण गोष्ट ठरते .
  हल्ली शब्द ,शब्दार्थ आणि त्याचे झपाट्याने होणारे अवमूल्यन ही चिंतेची बाब ठरत आहे.धर्म हा शब्द - जेंव्हा कर्णाला " तेंव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म "
  असा विचारण्यात येतो तो धर्म वेगळा आणि आपण वापरतो तो शब्द वेगळा . स्वातंत्र्यानंतर आपल्याला छान संधी आली होती पण we missed the bus !
  आता हत्तीचे पुतळे आणि जिवंत माणसांचे पुतळे दिसू लागले आहेत - विषमतेचा धिःकार करणारेच नवे विषमतेचे दंडक तयार करत आहेत . ती धार्मिक पायावर नाकारली तर तुम्ही प्रतिगामी आणि सर्व धार्मिक रचनाच लाथाडली तर तुम्ही अति पुरोगामी म्हणून ओळखले जाउन मूळ प्रवाहातून फेकले जाता - एकदा फेकले गेलेल्यांना समाज परत फार आत्मियतेने जवळ करत नाही हेपण व्यवहार्य सत्य आहे. समाजवाद्यांचे हेच कायमचे दुःख होते आणि आहे. त्यातच आज मुक्त बाजारपेठेमुळे आलेली आर्थिक ताकद भल्याभल्याना गुलाम करत आहे.
  प्रश्न उरतो - धर्माचे समाजमनात आणि देशाच्या उभारणीत स्थान काय ? निधर्मी देशबांधणीत हिंदू असणे आणि हा देश पूर्वी मुसलमान किंवा ख्रिश्चन नव्हता असे म्हणणे म्हणजे मनुवादी असणे असते हे मनाला पटत नाही .
  मीपण आपल्यासारखाच निरीश्वरवादी असलो तरी मला धार्मिक ताकदीची पण पूर्ण जाण आहे. - तुम्हालाही असणारच ! ते वरदानही आहे आणि शापही आहे असेपण वाटते .
  मार्केटचा विचार करणारे नेहमी धर्म आणि उत्सवी जनमानसाला संस्कृतीच्या नावाखाली उचलून - टिकवून धरणार ! त्यामुळे रोजगार आणि आर्थिक उलाढाल या नावाखाली अनेक भ्रष्ट प्रथा अशाच चालू रहाणार हे नक्की !आपल्या इथे असलेले मनुष्यबळ हि पण एकाच वेळी समस्या आणि वरदान आहे . तो पण मुद्दा चर्चिला गेला पाहिजे !

  ReplyDelete
 5. संजयजी ,
  आत्ताच बातमी दाखवत आहेत ,की पंढरपूरच्या पांडुरंगाची देवस्थानाची कमिटी म्हणत्ये आहे की ,
  त्यांना दुष्काळाला मदत करण्याबद्दल अधिकारच नाहीत , ती समिती सोप्या भाषेत तकलादू आहे ऽसे अण्णा डांगे ( ? ) नावाचे कमिटीचे मुख्य म्हणत आहेत.
  संत दामाजीच्या मदतीला धावून जाणारा हाच तो पांडुरंग !.त्यालाच अधिकार नाही हे वाचून त्याच्या देवत्वाची हे लोक धिंड काढत आहेत असे वाटू लागले आहे .

  कालच आपण म्हणत आहात की समता हि कायद्याने येत नाही तर तिला धर्माचा आधार घ्यावा लागतो !आणि आज हे धर्माचे ठेकेदार काय म्हणत आहेत ?

  आज गरीब प्रजा दुष्काळामुळे तडफडत आहे आणि धर्माचे रक्षणकर्ते जर आपापली दारे कुठल्यातरी नियमांच्या आधारे बंद करू लागले तर काय होणार या देशाचे ?

  अशावेळी ख्रिश्चन मिशनरी सरसावून पुढे आले आणि काही गावे त्यांनी येशूच्या प्रेमाच्या पंखांखाली घेतली तर त्या प्रजेला दोष देण्यात काय अर्थ आहे ?
  ही प्रजा कशी आपल्या शिवाच्या वा विष्णूच्या मंदिरांचे रक्षण करेल ?
  हिंदुंच्या रक्षणाचा तोरा मिरवणाऱ्या तथाकथित संस्था आणि भगवा राष्ट्रवाद कुठे लपून बसला आहे ?
  यावर आपण जरूर लिहा हि विनंती !
  स्वरदा

  ReplyDelete
  Replies
  1. स्वरदाजी, य विषयावर मी लिहितच असून २३ मार्च रोजी ठाण्यात माझे याच विषयावर व्याख्यान आहे. लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.

   Delete
 6. संजयजी ,

  आपण हजार वर्ष जुन्या गोष्टी सांगत आहात . आणि त्यावरून काय बदल आज करावा ते सांगत आहात

  हे अत्यंत चुकीचे वाटत नाही का ?

  याच तत्वाने आपण मुस्लिम अथवा क्रिस्तिधार्मियाना सांगल का की तुम्ही हिन्दू होतात हजारो वर्षा पूर्वी - तेव्हा आता परत मूळ धर्मा कड़े परत या ?

  ReplyDelete
 7. धर्मपीठ , मठ ,किंवा धार्मिक संस्था यांची सामाजिक बांधिलकी काय असते किंवा असावी
  हा मुद्दा सरकारच्या नाकर्तेपणाशी जोडण्यात काहीच हशील नाही . दुष्काळाच्या व्यथांचा शोध घेताना
  जर सरकारी अपयश आणि सरकारची पैसा आणि मनुष्यबळ यांचे नियोजन करण्यातली कमजोरी,
  यावरील लक्ष वळवण्यासाठी जर धर्म संस्था आणि त्यांची कर्तव्ये यावर कुणी भाषणे देत सुटले
  आणि धार्मिक संस्थांची कर्तव्ये ठरवत दडपण आणू लागले तर तो एक अतिशय चुकीचा पायंडा पडेल
  म्हणून माझा संजय सराना विनंतीवजा सल्ला आहे की त्यांनी धार्मिक संस्थाना दावणीला बांधण्याचा प्रयत्न करू नये !

  जशी एक राष्ट्र - देश घटना बनवते - नीतीनियम कायदे बनवते तद्वतच धार्मिक संस्था पण त्यांच्या घटनेशी बांधील असतात. त्यांची कर्तव्ये त्यांनी ठरवलेली असतात.!
  आज दक्षिणेत हजारो मंदिरे आहेत - ज्यांची कोठारे सोन्या नाण्यांनी ओतप्रत भरलेली आहेत, पण कोर्टाने त्यांच्या संपत्तीला हात लावता येणार नाही असा निर्णय दिला आहे ना ?
  आणि तो योग्यच आहे. त्या दानामागे भक्तांचा वेगळा दृष्टीकोन आहे - असतो ,

  भिकारी हा चोर का होत नाही ? किंवा तो भिकारी कसा होतो ? आवडीने का परिस्थितीने ?
  चोर हा भिकारी का होत नाही ? तो चोर का होतो ?स्वयं निर्णयाने ? का अपघाताने ?
  सत्ताधारी हा चोर कसा होतो ? अपघाताने का आवडीने ? त्याना हे स्वनात्र्य कुणी दिले ?
  प्रजेचा पैसा यांची घरेदारे भरण्यासाठी वापरला जातो - ते कसे -
  हा एवढा पावसाला नीट होऊ दे असे पांडुरंगाला महेकादशीला साकडे घालताना
  मंत्रीगणाच्या मनात नेमके कोणते भाव दाटतात हे कोण ठरवणार - न तुम्ही आम्ही न तो पांडुरंग

  ReplyDelete
  Replies
  1. anonymous article dtd. 08/03/2013 is the best....if we first dig the houses of all politicians then we will get ample wealth which is actually public money gathered by them by way of corruption.. on the contrary any religious temple/church/mosque or institution the people voluntarily offer the money to the God...now some so called socialist and communist minded people started saying like that if the religious institutions gave their fund then the drought will run away... some area of maharashtra the rain has not pouring enough for last several years e.g Man taluka. for last 60/ 65 years no efforts ( sincerely) had not taken place..however the wealth of our politicians is growing by amazing speed..only to blame the religious institutions for the sake of publicity is very wrong attitude..

   now about ate main article..
   शैवस्थाने बळकावून त्यांचे वैष्णवीकरण करण्याचा उद्योग सुरु झाला. उदा. पंढरपुर व तिरुपती बालाजी. पुरीसारखे स्थान तर बौद्धांकडुन बळकावले. ज्यांना हे जमले नाही ते शिवाला रुद्र मानत शिवाशी चिकटुन राहिले. पुर्वास्प्रुष्यांना मंदिरबंदी ही बव्हंशी वैष्णव स्थानांपुरतीच होती हाही इतिहास येथे लक्षात घ्यायला हवा.
   every history lover and reader know that with the change of ruler , the religion or religious belifs changes by force or by will. the barbaric musalman rulers demolished thousands of hindu or shaiv/vainshav temples and also jain maths., bodhi maths. they forced conversion by way of force. atleat the shiv or vainshav people never tried to convert each other by Islami ways..you are very much silent on this part of history. Portuguese did the same in goa. I m not going to king Ashoka's period where so called shaiv( as u like to terminate them) and all other vaidik peoples tortured and converted to Buddhism. Even the Jain's also suffered from peaceful aggression of Buddhism at that time.पुर्वास्प्रुष्यांना मंदिरबंदी ही बव्हंशी वैष्णव स्थानांपुरतीच होती हाही इतिहास येथे लक्षात घ्यायला हवा. this is a very wrong statement as usual with no proofs. are you trying to create a division or partisan on this basis?
   why you are always creating division or using divisive language once used by Barrister Jinnah?
   it is very easy in maharashtra atleast to blame brahmins(vaidik as per your wish) for anything or everything bcoz as per the great writer UPARA'KAR Laxman Mane, the culture of Maharashtra is of 3.5% peoples culture.( sadhe teen takkynchi sansruti).
   Lastly no religion of world is pure and cannot be a static one. change is the rule of nature.. so new religions crated, some lost totally, some manage to survive in minority like Parshi's. if we start to dig on religious ground then we will find that all religions did some injustice to another whenever they got a chance to do it.. If we want to build a modern progressive nation then we must adopt modern views and learn from the mistakes of our forefathers did and rectify it. however by doing so if we again start blaming each other , then we will perish or become slave again, nothing else.

   Delete