Thursday, November 5, 2015

What liberty means to the farmers?

 About 60% leaders in India hail from the farming communities. The percentage was even more when we attained freedom. Rather first five year plan was dedicated to bring agriculture revolution. Yes, India since then attained self-reliability in food. But what about the farmers those were active part of green revolution?


We see the condition of farmers is declining monsoon after monsoon, forcing them to live in the devastated conditions that many a times lead to the suicides!  We have almost forgotten that unless economic condition of this 55% population is enhanced there cannot be real equitable economic revolution in the country. The main reason is though he is the producer he has no authority over deciding price of his produce! Rather he is showered with such a subsidies and packages that weaken his spirit of innovations! Unless farmer doesn’t see profitable outcome of his labor he will tend to be dependent on the mercy of the government and the shrewd politicians has been taking disadvantage of their situation.

Instead of government fixing base prices or the agents it is right of the farmer to decide price of his produce. If he cannot get such price due to market conditions at the moment, he should have been given enough facilities to store his produce in ware houses or cold storage. He should get instant loan facilities over such stock so that he has no need to sale his stock at throw away prices. He also should be given opportunities to sale his produce directly to the end consumers or the buyer of his choice so that the vicious chain of middlemen is broken. This is not impossible. Just following things are needed to be implemented on high priority.

1)    Scrap Market Yard committees which have become center of farmer’s exploitation.

2)    Make available enough cold storages and warehouses in every tehsil and district places…encourage private sector to get this done.

3)    Make available enough space in every town or city where farmers can directly sale their produce to the end users or retailers.

4)    Food processing industry is in its infancy in the country. There is no provision to process surplus hence there is about 30% wastage (vegetables and fruits) which is loss to the national as well farmer’s economy. The simple technologies like dehydration can be taught and encouraged. So that there won’t be any wastage and same time it will make available additional employment.

There are many more things associated with plight of the farmers, but root cause is he has no right to decide his price and his waiting capacity is so limited that he has to be dependent on mercy of the traders and government. Merciless mercy of the government has been of no help to him so far.

The liberty to the farmers means that he should be freed from the artificial bondages he has been thrown in. He has every right to decide which crop he should prefer and at what price he should sale it or simply process it! Snatching his right to make his own decision is not going to make farmer free from his plight and improve his economic condition.

There are other facets as well of this issue which we will discuss in next installment!


Visit Swarna Bharat Party agenda to know more what reforms we want to bring in every segment! 


5 comments:

  1. आप्पा-अहो संजय सर , लिहिले ते ठीक आहे पण ,
    बाप्पा- अरे असे गडकरी किंवा देवलांच्या नाटकातल्या सारखे पण वर थांबून राहू नकोस , पुढे बोल !
    आप्पा- पण आपले शेतकरी इंग्लिश मिडीयमचे नाहीत , आणि तुमचा पक्ष भारत देशासाठी आहे असे वाटते , तुम्हाला भाहेरून फंडिंग मिळणार असेल तर मग इम्प्रेस करायला ठीक आहे .
    बाप्पा- पण सध्यातरी तुम्ही देणग्या घेणार नाहीत असे म्हणता !
    आप्पा- एकंदरीतच आपल्या देशात देशी पोषाख घालून शेतकरी नेते हिंडत असतात , तात्पर्य समजले असेलच !, बाकी तुमची इंग्रजीवाराची पकड घट्ट आहे.
    १ला प्रश्न - आत्महत्या हा विषय अलीकडचा आहे , पूर्वी आत्महत्या का होत नसत ?
    २रा प्रश्न - बहुतेक शेतीची पार्श्वभूमी असलेले नेते शहरातचठाण मांडून असतात ते का ?
    ३रा- प्रश्न - आपण म्हणता त्या सोयी आधीच उपलब्ध नाहीत असे म्हणायचे आहे का ? नेहमीची सरकारी पद्धत काय आहे ? कोणत्याही योजनेची वाट लावणे ! हे माहित असताना आपण शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज ची अपेक्षा का करता ?सरकारी गोदामातून माल कसा सडतो ते आपणास माहित आहे , तात्पर्य सरकार कडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपापले काय ते उभारावे किंवा आपण अक्कल हुशारीने त्यातून मार्ग काढावा ,
    बाप्पा- कधीही सरकार कडे मागण्या करू नयेत , त्या कधीही फलद्रूप होत नाहीत , त्यासाठी आंदोलनांचे सत्र सुरु करून अखंड हा चक्रव्यूह ओढवून घ्यायचा आहे का ?
    प्रश्न ४था - शेतकरी वर्गाला शहरात जागा देण्याचा प्रकार कोणी करायचा ? महानगरपालिकेने ?हे हास्यास्पद विधान आहे !रस्त्याच्या कडेला मालाला उठाव सर्वाधिक असतो , महानगरपालिकांचे आराखडे म्हणजे मुर्खांचा बाजार असतो ,

    ReplyDelete
  2. संजय सर , कुणीही आपल्या लिखाणावर मत प्रदर्शन केलेले नाही ,रिकामटेकडे आप्पा बाप्पा सोडून द्या !याचा एकाच अर्थ होतो की कोणालाही ते तितकेसे पटलेले नाही .
    १. सहकारी किंवा सरकारी स्तरावरून अपेक्षा ठेवणे हा मार्ग निरर्थक कसा आहे ते आपण बघतच आहोत . सहकारी ब्यान्कातून कसे घोटाळे होतात ते आपण बघतो .सहकारी साखर कारखाने कसे चालवले गेले ? कसे बुडाले ? परत परत तोच फॉर्म्युला आपणही वापरला तर काय होईल ?
    २. मुळात कधीही सरकारी व्यवस्थेकडून मदत मागून कोणाचेही भले होत नसते . हा इतिहास आहे ,भ्रष्टाचाराची सुरवातच तिथून होते . फंडिंग सरकारचे , गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेज सरकारी , त्यावरील अधिकारी सरकारी , मग काय बघायलाच नको . !
    ३. आज सरकारी गोडाऊन मधून माल सडत नाही का ? मग तीच गोडाऊन आपण सरकार कडून प्रायोगिक तत्वावर घेऊन बघा !
    ४. प पु बाबा आमटे यांचे उदाहरण समोर आहेच. त्यांच्या मुलांचेही प्रयोग समोर आहेत. त्यांनी त्यांचे प्रयोग व्यावहारिक ठेवले आणि तरीही ते आंधळा ध्येयवाद सांगत गेले नाहीत.समाज हा पुस्तकी अभ्यासू प्रयोगाना साद देत नाही कारण त्याचे तीन तेरा वाजतात ,
    ५. शेतकरी वर्ग आत्महत्या का करू लागला आहे , त्याचा इतिहास मनोरंजकही ठरतो आहे . आज अनेक खेड्यातून मरणप्राय झालेल्या लोकांचा सर्व्हे करून त्याना समाज कंटक लोकांकडून ऑफर दिल्या जातात हे उघड रहस्य आहे. असे बरेच प्रकार घडत असतात .
    ६.सहकारी चळवळ - त्यात दर प्यानेल काहीतरी नवी टूम काढते , नवीन प्रयोग करतो आहोत असे दाखवून पोत्यामागे अमुक वर्गणी दाखवत शेतकरी सभासदांची लूट चालू असते.त्याचे पुढे काय होते ?ते आळीमिळी गुपचूळी असे असते !
    ७.खरेतर तुम्हाला हि माहिती नवीन नाही . सर्व शेतकरी नेते उच्च "सहकारी " पदावर राहून भत्ते खात आलिशान गाड्यातून जनतेच्या पैशाची लूट करत असतात ! शहरापेक्षा खेडेगावातून भ्रष्टचार जास्त फोफावला आहे . विकासाच्या नावाखाली अजित पवार आणि कंपूने काय केले कि त्यांची सत्ता गेली ?सामान्य शेतकरी वर्गालाही अनेक सरकारी योजनांखाली नादारी पत्करून जगण्याची चटक लागली आहे.
    ८. म्हणूनच जरी तो योग्य नसला तरी नक्षलवाद हा पर्याय अतिदूर विकासाचा स्पर्शही न झालेल्या विभागात लोकप्रिय होत आहे . त्याची काळजी करणे गरजेचे आहे .
    ९. आप्पाबप्पा यांनी मांडलेला विचार अति महत्वाचा आहे - सरकारकडे कधीही कोणतीही मागणी कारणे म्हणजे त्यांच्या हाताचे खेळणे बनणे होय , त्यापेक्षा आपले आपण सुनियोजित करणे हाच आदर्श मार्ग आहे . बाबा आमटे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे . खरेतर तेंडूलकर ला देण्यापेक्षा त्यांना भारत रत्न देणे उचित ठरले असते .
    आपणा सारख्या माणसास कोणताही नवा पक्ष काढण्याची गरज नाही बाबांचा आदर्श समोर ठेवत आपण कार्य करू शकता असे वाटते . धन्यवाद !
    शुभ दीपावली .

    ReplyDelete
  3. आपले शहर नियोजन इतके कुचकामी आहे की शेतकरी वर्गाला जे गाळे थेट विक्रीसाठी मिळतील ते अतिशय बिकट ठिकाणी मिळतील , त्यापेक्षा शेतकरी वर्ग रस्त्यावर अतिक्रमण करणे पसंद करतो हे व्यावहारिक सत्य आहे . आज रस्ते अतिरुंद आहेत असा स्वघोषित अभ्यासुपणा दाखवत त्या त्या विभागातील नगरसेवक अशा अतिक्रमणाना मान्यता देत असतो , नव्हे प्रोत्साहन देत आपले खिसे गरम करत असतो . सिंहगड रस्ता , आनंद नगर कोथरूड , हि जिवंत उदाहरणे आहेत स्वारगेट आणि दांडेकर पूल हे तर सरकारी यंत्रणेचे अपयश आहे.
    शहरातून आता नियोजित निवासी गाळे घेणे अमान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही , त्यावरही आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ?
    कोणताही माणूस एकदा का काही आजार झाला आणि हॉस्पिटल मध्ये जाण्याची वेळ आली तर त्या आर्थिक विळख्यात कायमचा फसतो , त्यावर आपल्याकडे काय उपाय आहे ?
    संजय सर , आपल्याला प्रश्नांचा मुलभूत अभ्यास करायची काहीही गरज नाहीये , किंवा लंबीचौडी भाषणे किंवा लेख लिहिण्याची गरज नाहीये . सामान्य माणसाला सामान्य स्तरावरून पाठीवर थाप हवी आहे , त्या ऐवजी आपण जर समस्यांची शास्त्रोक्त चिरफाड करत प्रश्नांची उकल करत बसलात तर समाज तुमच्या मागे येणार नाही .

    ReplyDelete
  4. बिहार निवडणुका हा लोकशाहीचा विजय आहे .आतातरी मोहन भागवत जागे होतील
    आतातरी नरेंद्र मोदी यांचे डोळे उघडतील अमित शहा आतातरी शुद्धीवर येतील .
    स्मृती इराणी यांना गप्प करावे लागेल.
    राजनाथ सिंगांचे पित्ते आता हिंदू धर्माची टिमकी वाजवणे बंद करतील .
    बिहार हि विजयाची सुरवात आहे . असा इतिहास आहे .
    फक्त आता लालूंनी घाण करू नये हीच इच्छा !

    ReplyDelete
  5. किती शेतकरी बाजारात विकण्यासाठी अतिरिक्त मालाचे उत्पादन करू शकतात? उत्पादित माल न विकता किंमत येण्याची किती शेतकरी वाट पाहु शकतात?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...