Sunday, March 13, 2016

हिंदुंचे पुरातन धार्मिक ग्रंथ


कोणा व्यक्तिप्रणित (अथवा विशिष्ट समुहप्रणित) तत्वज्ञान/ आचारसंहिता/ दैवतविज्ञान/ कर्मकांडसंहिता/ मान्यग्रंथ ई. वर आधारित जे स्थापन होतात व ज्यांचा प्रचार/प्रसार करावा लागतो...मग तो प्रचारकांद्वारे असो अथवा युद्धांद्वारे...त्यांना पंथ (रिलिजन) म्हणतात. या अर्थाने पाहू जाता वैदिक / पारशी/ बौद्ध / ज्यू / ख्रिस्ती/ इस्लाम इ. हे पंथ ठरतात. ते धर्म नव्हेत. वैदिक धर्माचा प्रवर्तक वसिष्ठ ऋषी व अन्य नऊ ऋषीकुटुंबे मानली जातात.

जी दैवते अथवा तत्वज्ञान अथवा कर्मकांड ही समाजाच्या एकुणातील मानसिकतेतून निर्माण होतात, को्णी एक अथवा अनेक प्रेषित/ऋषी नसतात, मान्यग्रंथ नसतो...थोडक्यात जी सामुहिक निर्मिती असते तिच्या सामुहिक प्रकटनाला धर्म म्हणतात. ईजिप्शियन/ग्रीक/अस्सिरियन/इस्लामपुर्व पेगन ई. असे सामुहिक धर्म होते. ते नि:शेष झाले. एकच टिकून राहिला तो म्हणजे ज्याला आपण आज मुर्तीपुजकांचा शैवप्रधान हिंदू धर्म म्हणतो. हा धर्म हजारो वर्ष टिकला हे त्यांचे कौतुकास्पद कार्य. वैदिक संसर्ग झाला असला तरी तो हिंदू धर्म संपवण्यात यशस्वी झाला नाही. हिंदू समाज वैदिक बनला नाही. आपल्या पुरातन परंपरा त्याने जपल्या. काळानुसार बदलही स्विकारले. हिंदू धर्माला एकमात्र धर्मग्रंथ नाही जसा वैदिकांना मान्यग्रंथ वेद आहे. कारण हिंदू धर्म हा समाजनिर्मित आहे. सुफलनाच्या आद्य मानवी भावनेशी निबद्ध आहे.न त्यामुळे हिंदुंच्य धर्मग्रंथांना सामुहिकपणे आगम ग्रंथ म्हटले जाते. तंत्रे ही याच शास्त्रांवर आधारीत आहेत व हिंदुंचा धर्म हा आजही तंत्राधिष्ठितच आहे.

वेद अथवा वैदिक साहित्य हेच हिंदू धर्माचे आद्य स्त्रोत आहेत हा भ्रम वैदिकांनी निर्माण केला. त्यामागील कारणे, स्वार्थ काहीही असोत, पण वैदिक ग्रंथ हे हिंदुंचे कधीच नव्हते हे वास्तव आहे. याचे कारण असे की वैदिक धर्मग्रंथ व कर्मकांडांपासून हिंदू नेहमीच दूर राहिले. याचा अर्थ असा मुळीच नव्हे कि शैवप्रधान हिंदू धर्माला कसलेच ग्रंथ नव्हते किंवा नाहीत. आगमग्रंथात शास्त्र, सिद्धांत, अनुष्ठान, विज्ञान, योग, आरोग्यादिंसह तंत्रशास्त्रांवर हिंदुंचे अक्षरश: लक्षावधी पुरातन ग्रंथ  आहेत. आगम म्हंणजे "आधीचे". उलट वेदांन "निगम," म्हणजे नंतरचे असे संबोधले जाते हे वास्तव समजावून घ्यायला पाहिजे. शिव-शक्ती व तंत्र साधना ही  सिंधुसंस्कृतीइतकीच पुरातन आहे हे तेथील मुद्रांवरुन सहज लक्षात येते. वेदपुर्व कालापासून तंत्र, योग आणि भक्ती या धर्म्कल्पना अस्तित्वात होत्या असे डा. सुधाकर देशमूख आपल्या "मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती" या ग्रंथांत अनेक विद्वानांच्या साक्षी काढून सांगतात.

तंत्रांचा निर्माता शिव मानला जात असून बहुतेक तांत्रिक ग्रंथ शिव-पार्वती संवादातून साधले गेलेले आहेत. तंत्रशास्त्रांत आगम, यामल व तंत्र यांचा समावेश होतो. सृष्टीतील यात्वात्मकता मानवी जीवनाचा आधार बनवत ते सुखी व संपन्न करणे हा तंत्रांचा मुख्य उद्देश आहे. योगाच्या द्वारे शिव-शक्तीशी तादात्म्य साधणे आणि मानवी जीवात्म्याला पशुभावातून बाहेर काढणे हा उच्च आध्यात्मिक दृष्टीकोन तंत्रांचा आहे. तंत्रांतुनच सांख्य तत्वज्ञानाचा उदय झाला. तंत्रे वेदप्रामाण्य मानत नसून तंत्रे ही स्वत:तच प्रमाण आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आहेत असे मानले जाते. तंत्रांत अनेक संप्रदायही असून पांचरात्र संप्रदाय महाभारत काळात अत्यंत लोकप्रिय होता असेही दिसते. हा पंथ कृष्णाच्या घराण्यात, म्हणजे सात्वतांत अत्यंत लोकप्रिय होता. पाशुपत मत सिंधू काळातही अस्तित्वात असावे असे शिवाच्या ज्या पशुपती स्वरुपातील मुद्रा मिळाल्या आहेत त्यावरुन दिसते.

तंत्रे ही अवैदिक होती व आहेत. मध्ययुगातील धार्मिक साहित्यातुनही हे मत ठळकपणे सामोरे येते. तंत्रशास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणज्वे त्यात भेदाभेद नाही. स्त्री-पुरुषातील समानता हा तंत्रांचा गाभा आहे. बुद्धपुर्व काळ ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत आगमशास्त्रांनी वैदिकांना पुरेपुर झाकोळून टाकले होते. इतके कि अनेक वैदिकही वेद सोडून तंत्रांच्या भजनी लागले. अशा मंडलींना वैदिकांनीही बहिष्कृत करुन टाकले.

तंत्र हे शिव-शक्तीशी निगडित असून ती वेदांपेक्षा पुरातन आहे. वैदिक साहित्यापेक्षाही तंत्रसाहित्याची विशालता अनेक पटीने अधिक आहे.ती अपौरुषेय अथवा अपरिवर्तनीय नसल्याने त्यांत भरही पडत राहिली. (तशी वेदांतही अपौरुषेय म्हणतात पण वेळोवेळी भर पडलेलीच आहे.) त्यामुळे तंत्रांचा विस्तारही अफाट झाला. अगदी मंदिर स्थापत्यापासुन ते पार पंचमकार साधनांपर्यंत तंत्रांचा विस्तार आहे. योग ही तंत्रांची देणगी आहे. याबाबत आपण पुढीक्ल लेखांत अधिक सविस्तर माहिती घेऊच. पण मध्ययुगात तंत्रांतील केवळ वामाचार्ताला लक्ष करत बदनाम केले गेले. पण स्वत: शिवाजी महाराज, संभाजी महाराज शाक्त होते हे वास्तव मात्र विसरले जाते. संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या शाक्त असण्याचा उपयोग केला गेला. पण तंत्र अथवा शाक्त म्हणजे फक्त वामाचार नाही, तर वामाचार ही एक उपशाखा आहे. " धर्म, कर्मकांड, विधि-विधाने, कायदा, औषधी, यातू, शेतीशास्त्र, धातू, शरीरविज्ञानशास्त्र इत्यादि धार्मिक व व्यावहारिक बाबींचा समावेश तंत्रांत होतो. डा. देशमूख उपरोक्त ग्रंथात म्हणतात की शिवशक्तीशी तादात्म्य साधने हा मुख्य उद्देश्य, व्यावहारिक गोष्टींना अधिक महत्व असलेला, तंत्र हा जीवनाकडे बघण्याचा एक्ल दृष्टीकोन आहे. ते पुढे म्हणतात की, "किंबहुना आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो वैदिक कमी आणि तांत्रिक अधिक आहे. तंत्रांचा दृष्टीकोन हा श्रौत-स्मार्त धर्माच्या विरोधात आहे." थोडक्यात वैदिक धर्म व हिंदू धर्म यांच्यात काहीएक संबंध नाही.

भग्वद्गीतेला धर्मग्रंथ मानायचे प्रथा असली तरी गीता हा अनेक तत्वज्ञानांचा संग्रह आहे. असे असले तरी गीतेवर सांख्य, योग व तंत्रांचा पुरेपूर प्रभाव असल्याने त्याला केवळ वैदिक मानता येत नाही. आणि मी पुर्वीच सांगितल्याप्रमाणे तो धर्मग्रंथही नाही. वैदिकांनी केवळ पोटार्थी भावनेने हिंदुंवर वैदिक माहात्म्य थोपण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा काही उपयोग झलेला दिसत नाही. कृष्ण हा सात्वतांत जन्मला व त्याच्याच काळात पांचरात्र या अवैदिक संप्रदायाचा प्रवर्तक बनला. तो कधीही वैदिक नव्हता. वास्तवात वैदिक हिंदू धर्मात लबाड्या करुनच घुसले आहेत. ही परंपरा सहाव्या शतकानंतर सुरु झाली व मध्ययुगात कळसाला गेली. वैदिकांनी आपले अस्तित्व मात्र स्वतंत्रच ठेवलेले असल्याने त्यांना कोणत्याही पुराव्याच्या आधारावर हिंदू म्हणता येत नाही.

हिंदू शब्द सिंधूवरुन आलेला आहे व सिंधू संस्कृतीपासून हिंदु धर्माचे प्रत्यक्ष पुरावे मिळत असल्याने हिंदू नावाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण वैदिक धर्म हा नंतर आलेला, धर्मांतराने विशिष्ट घटकांत पसरलेला वेगळा धर्म आहे, त्याचे तत्वज्ञान वेगळे आहे हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

येथे वैदिक मित्राना एवढेच सांगायचे आहे कि आजही हिंदू प्रत्यक्ष तंत्रशास्त्रे अभ्यासत नसले तरी त्यांचे जीवन हे बव्हंशी तंत्रोक्तच राहिले आहे (जसे वैदिकही वेद अभ्यासत नाहीत). वैदिकांचा सन्निद्ध्यात विदेशी विद्वान आधी आल्याने त्यांचा वेदांशी आधी परिचय झाला व तेही त्याचाच पाठपुरावा अधिक करु लागले. तंत्रशास्त्रांचा आधुनिक अभ्यास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही. पण याचा अर्थ असा समजू नका कि अवैदिकांना कोणतेच धर्मग्रंथ नाहीत...उलट त्यांची संख्या वैदिक सहित्यपेक्षाही मोठी आहे. बाकी पुढील लेखांत.

15 comments:

  1. हिंदू नावाचा कोणताही धर्म/पंथ जगात कोठेही अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली वैदिक/ ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे. असे विधान केल्यास हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया वैदिकांमद्ध्ये /ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडते. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेले काही लोक टीकेचा भडीमार सुरू करतात. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवितात. हे कसे सत्य आहे, हे आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.

    धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही!
    हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.

    हिंदू हा शब्द इस्लामची देण!
    लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राजकर्त्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.
    पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. जैन, बौद्ध, शीख तसेच आदिवाशी लोकांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला.

    आनंदा पाटील

    ReplyDelete
    Replies
    1. Got new, authentic and nice information. Thanks sir!

      Vishal Salunkhe, Kolhapur

      Delete
  2. पाटील साहेब तुम्ही पूर्ण सत्य तेच लिहिले आहे, अभिनंदन!!!
    हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
    धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
    आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. जैन, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, किंवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, "मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे". आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खऱ्या अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणाऱ्यां लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदुत्ववादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे.

    सचिन जाधव, मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. Nice comment!
      Keep it up!

      Vishal Salunkhe, Kolhapur

      Delete
  3. उत्तम लेख, शैव धर्माचे ग्रंथ यावर सरांनी प्रकाश टाकला हे फारच उत्तम. आगम ग्रंथ लिखित स्वरुपात फरसे उपलब्ध नाहीत. जैन साहित्यात आगम ग्रंथांचे महत्वाचे स्थान आहे व त्यांनी ते योग्य रीतीने जपलेले आहेत. शैव व जैन हे कृषक समाजाशी निगडीत शाकाहारी पंथ होते असे वाटते, शिवाय योगाच्या मार्गाने इंद्रियनिग्रह करणे हे सिंधू कालीन नग्न साधूंचे शिक्के बघून वाटते. शैव व जैन मत तसेच जैनांचे वृषभदेव ह्यांचा सिंधू काळात घनिष्ट संबंध असावा. सिंधू वृषभाचे शिक्के, नंदी, शिव व कृषक संस्कृती ह्यांचा काहीतरी संबंध असावा. जैन संप्रदाय हा बराच पसरलेला संप्रदाय होता. शैव धर्माशी संबंधित वैदिक चालीरीती जसे संस्कृत शिव पार्वतीचे मंत्र, पूजा विधी कसे जोडले गेले हाही संशोधनाचा विषय आहे. काही संस्कृत जाणणारे लोक शैव-शाक्त संप्रदायाचे कट्टर समर्थक होते त्यांनीच रुद्र, सप्तशती हे मंत्र लिहिले का अशीही एक शंका मनात येते. नंतर रुद्र मंत्राला अधिकृत मान्यता देऊन यजुर्वेदात संकलित केले गेले असावे असे वाटते. कारण रुद्र मंत्रात शिवाचे स्वरूप हे सर्वव्यापी, कल्याणकारी, सर्व निर्मितीचे कारण असे आहे.

    ReplyDelete
  4. मला एक माहिती श्री पाटील किंवा श्री जाधव सांगतील का ? तुम्ही सरकारी कोणताही अर्ज भरताना आपला धर्म काय लिहिता ?तसेच आपला धर्म काय आहे असे तुम्ही सांगू शकता ? तुमची मुले किंवा आधीची पिढी स्वतःला काय म्हणवत होती ?
    तुम्हाला आदर्श वाटत असेल ते वेगळे असेल ,पण आज कायदा काय म्हणतो ?सरकारी सेन्सस मध्ये ताजी माहिती भरताना तुम्ही काय भरली आहे ? पासपोर्टवर किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला काय म्हणवून घेता ? सध्यातर जातीनिहाय सेन्सस झाला आहे त्यात आपण नक्कीच धर्म आणि जात लिहिली असेल , हो ना ?
    आपण सुरवातीलाच म्हणता की वैदिक इस्लाम ख्रिश्चन बौद्ध हे धर्म नाहीत तर ते पंथ आहेत . मग आपले म्हणणे नेमके काय आहे ? वैदिक आपले ग्रंथ हे हिंदू ग्रंथ म्हणून मिरवतात का ?
    शेवटी देशाची घटना काय म्हणते ? हिंदू कोड ऑफ लॉतुम्हाला समजते ना ? मग असे सवंग लिहून आपण काय म्हणू इच्छिता ?
    आज कोणालाही स्वतःला नवीन पंथ धर्म काढायला कायद्याने बंदी नाही .राज्यघटना डॉ आंबेडकर यांनी केली आहे त्यांचा प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक लिहिलेला आणि उच्चारलेला आहे . शैव धर्म जर वैदिक धर्मापेक्षा पुरातन असेल तर काहीच वाईट नाही ,
    तंत्र आणि विधी यातूनच अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत का ? आजची अनेक विधी आणि मूर्तीपूजा करायची पद्धती तंत्रातूनच निर्माण झाली असावी का ?
    महत्वाचे म्हणजे आपणच सांगता त्याप्रमाणे ,आजची पिढी तंत्रही अभ्यासत नाही आणि वेदही अभ्यासत नाही , मग वारंवार आपला ओढा हा शैव आणि वैदिक मध्ये भेद दाखवण्याचा का असतो , दोन्हीही गोष्टी जर कालबाह्य असतील तर ती बंद कपाटात असेनांत का ?उलट असे म्हणता येईल की इंग्रजी विद्येने सर्व धार्मिक मतांना मागे टाकून आधुनिक भारतीय समाज निर्माण केला आहे .
    आता जात पंचायत , मंत्र आणि तोडगे , अनेक तांत्रिक चालीरीती कुठून निर्माण होऊन त्याचे भ्रष्ट स्वरूप कधी अंध विश्वासात रुपांतरीत होऊन त्याने समाजाला ग्रहण लावले ते पाहिले पाहिजे . खेड्यामधून किंवा जत्रेतून बळी द्यायला सांगणारे ब्राह्मण असतात का गुरव का देवरुशी ? वैदिक असतात का ?हळदीने माखलेले कपाळ , पांढरी टोपी पायजमा असे साधारण चित्र दिसते या लोकांचे , ते कोण असतात ?
    एकूणच आपला लेख सुंदर असून माहितीपूर्ण आहे आणि त्याच्या पुढच्या भागाची मी वात बघत आहे . आपण जर अंधश्रद्धा जोपासणार्या खेडेगावातील या वर्गाबद्दल लिहिले तर बरे होईल , सांख्य असो किंवा अद्वैत असो त्याचा बोकड बळी देण्याचा सल्ला देणाऱ्या या लोकांशी काहीही अर्थार्थी संबंध नसतो ,
    मांढरदेवी किंवा अशा देवांचे प्रस्थ वाढत जाण्यात वैदिक ब्राह्मणांचा काहीच हात नसणार हे कल्पनेने हि ताडता येते . आपण प्रामाणिकपणे या प्रथांवर लिहाल असे वाटते . हजारो वर्षापूर्वी यज्ञात पशुंचे बळी दिले जात असतील पण म्हणजे आजही शेंडीवाले ब्राह्मण गरीब जनतेला मास मांस मटण देवापुढे ठेवायची जबरदस्ती करत असतील हे पटत नाही , मग हि जबरदस्ती कोण करते ते आपण नक्की सांगा !

    ReplyDelete
    Replies
    1. मला एक माहिती श्री पाटील किंवा श्री जाधव सांगतील का ? तुम्ही सरकारी कोणताही अर्ज भरताना आपला धर्म काय लिहिता ?तसेच आपला धर्म काय आहे असे तुम्ही सांगू शकता ? तुमची मुले किंवा आधीची पिढी स्वतःला काय म्हणवत होती ?...............Religion: Humanity, Caste: - (Not applicable)

      Is it right Pateel sir and Jadhav sir!!!!

      Vishal Sakunkhe, Kolhapur

      Delete
  5. मनोरंजक बौध्दिक सुख घेण्यास मुख्य लेख व दोन्ही तिन्ही प्रतिक्रिया विरोधाभासी व उत्तम. जसे संजयसर बुध्दीबळ खेळताहेत वाटते कारण उंटाची व घोडयाचीही चाल दिसते.

    ReplyDelete
  6. चर्चा अगदी सुंदर रीतीने चालली आहे आणि मूळ ज्या शंका आहेत त्याचे नक्कीच निरसन होणार अशी आशा वाटू लागली आहे .श्री अविनाश पाटसकर सरांनी शैव आणि जैन यांच्या बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्याकडून अजूनही भरपूर वाचायला मिळेल असे म्हणूया !
    तसेच माझी शंका आहे की शैव संप्रदायात धार्मिक वाग्मय नेमके काय आहे ?
    कारण वैदिक म्हणून मानला गेलेला संप्रदाय जो आहे त्यात धार्मिक वाग्मय म्हणजे वेद श्रुती स्मृती पुराणे असे भाराभर ओतप्रत वाग्मय आहे , परंतु
    त्याही पूर्वीचा जो आजवर टिकलेला आणि फोफावत चाललेला शैवधर्म , त्यांच्या वाग्मयाबद्दल मात्र स्पष्ट असे संजय सर काहीच सांगत नाहीत,रुद्र हे म्हणे शैव नाही , त्यामुळे आज जो लघुरुद्र महारुद्र म्हटले जाते ,हे प्रकार चुकीचेच मानावे लागतात ,आणि शेवटी केविलवाणे विचार मनाला शिवून जातात की शैवांचे नेमके मंत्र काय ? ओम पण म्हणे वैदिकच आहे , मग शिवाचे ध्यान करायचे तर नेमके कसे काय ? नमः शिवाय इतकेच ? संजय सर म्हणतात की संस्कृत ही वैदिकांची भाषा , म्हणजे नमः शिवाय - शिवला नमस्कार असो हेही वैदिकच ?मग त्या भाषेतील शंकराला उद्देशून रचलेली पुराणे उदाहरणार्थ अग्नी पुराण ,जी शिवाची स्तुती करतात तीपण आपोआप वैदिक ठरतात की काय ?
    सारांशाने असा विचार मनात येतो की एकेकाळी सर्व भारतात पसरलेल्या बौद्ध धार्माची आजची लोकसंख्या काही लाखातच आहे ,८६ लाख आणि जैनही साधारण तितकेच आहेत , आणि हिंदू हा धर्मच नाही अशा चर्चा करत आपण शैव वैदिक आणि तत्सम अनेक पंथांची चर्चा करत संप्रदायांच्या अंगाने आधीच जातपात आणि भाषा यांनी एकमेकांपासून वेगळे दिसणाऱ्या विशाल समाजात अधिक तुटकपणा का करत आहोत ?
    कळीचा मुद्दा जर फक्त वैदिकांनी हिंदू धर्म हायज्याक केला असेच सिद्ध करायचे असेल तर गोष्ट वेगळी आहे ! दुसरी बाजुपण तपासायला हवी आहे !
    कारण आजकाल स्पष्टच विचार केला तर सवर्णांच्या व्यतिरिक्त इतर समाजात जो धार्मिक आचरणाचा प्रकार चालतो तो वैदिक धर्माशी अजिबातच निगडीत नसतो . त्याचे धार्मिक विधी करणारे पुरोहीतही जास्त करून भंडारा फासून यजमानाला मार्गदर्शन करत असतात ,आणि अनेक जत्रा आणि उरूस यात याच समाजाच्या विवांचनांचे निराकरण करताना कोंबडी आणि बोकडांचे बळी देण्याचे हेच लोक सुचवत असतात,कृषीवल समाजात हे अगदी नैसर्गिक आहे.उन्हाळ्यात गावोगावी भरणाऱ्या उरुसांचे आणि जत्रांचे सूत्रसंचालक कोण असतात ? वैदिक ? शैव ? का अजून कोणी ?
    आपला समाज खेडेगाव आणि शहरे यामध्ये इतका पूर्णपणे विभागला आहे की शहरी माणसाला फक्त घाइघाइने पळणारे शेंडीवाले पुरोहित दिसतात , पण अंधश्रद्धा जोपासणारे हे खेडवळ देवाचे एजंट दिसत नाहीत . अंगारे धुपारे ताईत आणि गंडे ही वैदिकांकडून आलेली परंपरा निश्चितच नाही .आणि ते सर्व कोणत्या पंथातून आले आणि का फोफावले हे जाणून घ्यायला कोणालाही आवडेल , आशा करुया की संजय सर यावर प्रकाश टाकतील आणि चर्चेच्या कक्षा अजून रूंदावतील ! संजय सरांचे अशा विषयाला स्पर्श केल्याबद्दल मनापासून अभिनंदन !

    ReplyDelete
  7. अभय पवार सर आपला छोटासा रिमार्क अगदी बरोब्बर आहे , सर्वानीच उत्कट आणि समयोचित प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत आणि त्या पुरेशा बोलक्या आहेत , अविनाश पाटसकर आनंद , अमित यांनी विचारलेल्या अभ्यासपूर्ण शंकांचे निरसन संजय सर करतील हि खात्री आहे ,
    पण, विनोदाने म्हणायचे तर , आजकाल संजय सरांची अवस्था , हगरी बिगरीतल्या राजाच्या आणि माकडाच्या गोष्टीसारखी झाली आहे
    राजाने टोपी माकडा कडून हिसकावून घेतली तर ," राजा भिकारी माझी टोपी घेतली "असे ते माकड म्हणायचे आणि टोपी राजाने रागाने परत फेकली तर ,
    " राजा मला भ्यायला माझी टोपी फेकली -" असे ते माकड वाकुल्या दाखवत राजाला म्हणायचे - तशी अवस्था संजय सर आणि त्यांच्या मित्रांची झाली आहे .
    इतरांचे हसे करण्यात संजय सर त्या माकडा सारखे हुशार आहेत !
    आम्हाला शैव धर्माचे संस्कृतेतर वाग्मय सांगा हो संजय सर !आणि ते आजकाल समाजात प्रचारात आहे का ?

    ReplyDelete
  8. आदी शंकराचार्य यांनी पंचायतन पूजा सांगून शैव गणेश विष्णू देवी आणि सूर्या असे पंचायतन साधून एक नवा एकीचा मार्ग सांगितला त्यानंतर अनेक पंचायाताने सांगितली गेली ,
    शिव पुराण लिंग पुराण स्कंद पुराण आणि श्वेतास्व तारा उपनिषद ४०० ते २०० इसपू हे तर शिवाचे स्पष्ट वर्णन करणाऱ्या वैदिक रचना आहेत. वैदिक संस्कृतात शिवाच्या बद्दल अनेक प्राचीन रचना आहेत आणि अशा अवस्थेत जेंव्हा गावीन फ्लड म्हणतो की शैव धार्माचे संकेत इसपू २०० पासून स्पष्ट मिळू शकतात तर मग फार फार तर मोहंजोदारो पासून फार फार तर शिवाची न्पुजा होत होती असे म्हणता येईल .

    ReplyDelete
  9. चोर, डाकु तोच हिन्दू ?
    असा अर्थ लोगाथ - ए - डिक्शनरी, लखनौ येथे प्रकाशित १९६४ च्या पर्शियन डिक्शनरीत आहे. असाच काहीसा अर्थ उर्दू - फिरोझ - उल - लोगाथ पान ६१५ वर देखील आहे.

    मी महाजालावर एक पान शोधत होतो तेव्हा मला एक पान मिळाले. बरीच माहिती वाचायला मिळाली. सतत सतावणार्‍या प्रश्नांची उत्तरे सापडली. ३डब्ल्यू.स्टीफेन.नॅप.कॉम ( के एन ए पी पी ) इथेच पुढे साईट डीसक्रिपशन ह्या भागात - हिंदू नावा विषयी - असा एक लेख आहे. ह्या लेखात फार चांगली माहिती उपलब्ध आहे.

    असेच दुसरे पान ३डब्ल्यू.हिन्दूनेट.ऑर्ग / हिंदू _हिस्टरि / मॉडर्न / हिंदू _कुश.एच्टीएमेल इथे अफगाणिस्थानातील हिंदुकुश पर्वताची माहिती मिळते. लाखोच्या संखेने हिंदू मारले गेले आहेत ( कतलेआम ). ह्या पानावरील माहिती वाचून माझ्या मतांना दुजोरा मिळतो, आपण आज ह्या घटकेला प्रत्यक्षात पारतंत्र्यातच आहोत.

    झाइटगिस्ट दी मूव्ही माझ्या जवळ ही ७१० एम्बी ची डीव्हीडी आहे ज्यांना ही हवी असेल त्यांनी संपर्क साधावा. मो. ९९६० ६३७ ६४६. भाग एक - क्रिश्चन धर्म व इजिप्त मधील फेरोचा धर्म ह्यामधील शब्दाला शब्द साम्य असलेले सिद्ध केले आहे. तसेच श्रीकृष्ण जन्माचा व त्या घटनांचा उपयोग, साम्य प्रत्येक धर्मग्रंथातून कसा आहे हे दाखवले आहे. भाग दोन - जगातील वाणिज्य पद्धतीतून मिळवलेला ताबा तसेच पहिल्या जागतिक माहायुध्द्दा पासून रॉकरफेलो व इतर घराणी कशा प्रकारांनी जगावर ताबा, आपले नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले व होत आहेत, तसेच कोणते प्रयत्न करीत आहेत ते पुराव्या सहित आहे. भाग तीन - ९/११ चा अमेरिकेतील हल्ल्यातील सूत्रधार व घटनांचे पुरावे अभ्यासूंना फार महत्त्वाचे आहेत. कोणावर, केव्हा, का, कसा विश्वास असावा ह्याचे मार्गदर्शन ह्या डीव्हीडीत मिळते.

    ह्यावर वाचकांनी अवश्य विचार करावा अशी विनंती मी करतो.

    VK

    ReplyDelete
  10. हिंदू शब्दाची उत्पत्ती मुळातच 13 व्या शतकानंतरची ■■
    ★★★★★
    ● सुरेन्द्र पोहरे, अकोला
    प्राचीन काळी वैदिक ब्राह्मणाची मक्तेदारी असलेली ग्रंथसंपदा व ज्ञानभंडार आता सर्वासाठी खुले झाल्याने विविध ग्रंथ, पुस्तके, भारतीय व विदेशी विद्वानांनी लिहिलेला इतिहास, संशोधनपर लेख व नेट या माध्यमातून बर्‍याच सार्‍या गोष्टींचा उलगडा होत आहे. यामधूनच कळू लागले की, भारतीय वह विदेशी विद्वानांच्या संशोधनानुसार ‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा याबाबत एकही प्राचीन शिलालेख कोरून ठेवलेला नाही. त्यामुळे स्पष्ट होते की ‘हिंदू’ धार्मिक शब्द नाही किंवा तो एखादा धर्म सुद्धा नाही. याबाबत सुप्रीम कोर्टाने सुध्दा शिक्कामोर्तब केले आहे.
    सत्य हेच आहे की, हिंदू या शब्दाची निर्मितीच मुळात मुस्लीम आक्रमणानंतर झाली. त्यामुळे ‘हिंदू’ हा पुरातन शब्द नसून मुसलमानांच्याद्वारे आलेला शब्द आहे तसेच त्याला दिल्या गेलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे. परंतु आजही बहुसंख्य भारतीय लोक हिंदू शब्दाचे मूळ व त्याची उत्पत्ती या संबंधात अनाभिंज्ञ आहेत. भारतात हिंदू ह्या शब्दाचा वापर मुख्यत: वैदिक वंशाचे लोक (ब्राम्हण) व मुस्लीम अधिक करतांना दिसतात. बहुसंख्य मुस्लीम हे कट्टर धर्मवादी असतात. मुस्लिमांच्या या धर्मवादामुळे ते दुसर्‍यांकडे सुद्धा धर्माच्या चष्म्यातून बघतात. म्हणून हिंदू शब्दाचा प्रचार करण्यात मुस्लिमांचाच सिहाचा वाटा आहे.
    भारतीय लोक धर्म म्हटले की, चटकन आकृष्ट होतात विवेक गुंडाळून अंधश्रध्द होतात हे उघड गुपित उमगलेल्या येथील मनुवादी लोकांनी व त्यांच्या इशार्‍यावर नाचणार्‍या मिडियाने भारत या शब्द ऐवजी हिंदुस्थान या शब्दाचा कंठशोष सुरू करून जनमानसावर बिंबवण्याचे षडयंत्र अवलंबिले आहे. विशेषतः येथील वैदिक ब्राह्मण लोक ‘हिंदू’ या शब्दाला इतर धर्माच्या विरोधात अधिक ठरविण्याचा प्रयोग करून मनुवादाची मुळ घट्ट करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. स्वदेशी स्वदेशी म्हणून नाचणार्‍या या विदेशी वैदिक लोकांना विदेशी लोकांनी आणलेला 'हिंदू' हा शब्द फारच आवडलेला दिसतो.
    वास्तविक पाहता ‘हिंदू’ हा शब्द संस्कृत मध्ये तर नाहीच नाही परंतू तो इतर कोणत्याही भारतीय भाषेतला नाही.

    ReplyDelete
  11. उलट एक मतप्रवाह हा सुद्धा आहे की, ग्रीक लोक इंदू नदीला सिंधू म्हणायचे. आणि ग्रीकांच्या काळापर्यंत केवळ सिंधू हा शब्दप्रयोग होत असे. परंतु त्यानंतर भारतात आलेल्या पर्शियन लोकाना “स” चा बरोबर उच्चार करता येत नसल्यामुळे ते ‘स’ ला ‘ह’ म्हणत त्यामुळे पुरातन पर्शियन लोक सिंधूला हिंदू म्हणू लागले. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या सिंधू नदीच्या आसपास राहणारे लोक म्हणजे हिंदू अशी त्यांची नामावली होवून गेली. परंतु ते 'स' ला 'ह' म्हणून सिंधु ला हिंदू म्हणायचे हे स्विकारायचे तर सरस्वतीला सुद्धा हरस्वती म्हणायला हरकत नसावी.
    काहीही असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, हिंदू या शब्दाचा कोणत्याही धार्मिक परंपरेशी नातेसंबंध नाही. भारतावर आक्रमण करणार्‍या अरब व मुघल यांनी सिंधू नदीच्या पलीकडे राहणार्‍या या सर्व लोकांना हिंदू म्हणने सुरु केले. ग्रीकांनी इंदूचे सिंधू केले तर अरब व मोगलांनी सिंधूचे हिंदू केले.
    हिंदू या शब्दाची मूळ उत्पत्ती कशी झाली असावी याचा सर्वात पहिला लेखी दस्तावेज म्हणजे मोरक्कन मुस्लीम प्रवासी इब्न बतुता याने लिहिलेले "रीहला" हे पुस्तक यात “अल हिंद” हा शब्दप्रयोग आलेला आहे. “अल हिंद” हा शब्द अरेबिक आहे.
    आता या इब्न बतुता या तुघलकांच्या काळातील काद्रीचा 1304-1369 हा कालावधी पाहू जाता स्पष्टपणे सांगता येते की हिंदू हा शब्द अलिकडच्या तेराव्या शतकापासून आस्तित्वात आला आहे. यानंतर भारतात पसरत गेलेल्या मुस्लीम राजवटी मधील मुस्लिमांनी भारतातील स्थानिक लोकासाठी हिंदू व भूभागासाठी हिंदूस्थान संबोधित करने सुरु केले आणि मुस्लीम नसलेल्या सर्व लोकासाठी पर्याय म्हणून हिंदू हा एकच शब्द वापरला. यावरून हे ही स्पष्ट होते की, हिंदू या शब्दाला कोणत्याही धर्माचे वा संस्कृतीचे वा विशिष्ट समुदायाचे देणे घेणे नाही.
    दुसरीकडे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की, पूर्वी वैदिक ब्राम्हण वर्ग सोडला तर संपूर्ण बहुजन समाज हा फक्त जैन व बौद्ध धर्मियामध्ये विभागलेला होता. त्याचे “हिंदू धर्म” या संकल्पनेसी काडीचाही सबंध नव्हता.
    हिंदू हा शब्द मुस्लिम शासकांनी मुस्लिमा व्यतिरिक्त भारतीयांसाठी वापरला तसाच नंतरच्या इंग्रजी शासकांनी ख्रिश्चन व मुस्लिम सोडून इतर भारतीयांसाठी वापरला हा शब्द या दोघांनीही केवळ प्रशासकीय सोयीसाठी वापरला यात या दोन्ही विदेशी शासकांचा हेतू येथील प्रदेशातील लोक ओळखू यावेत हा म्हणजेच प्रदेशवाचक होता धर्मवाचक अजिबात नव्हता परंतु या शब्दाचा उपयोग स्वतःचे वैदिकत्व जपणार्‍या वैदिक ब्राह्मणांनी धुर्तपणे करून मुळच्या स्वतंत्र धर्मीय जैन, बौध्द व सिख धर्मियांच्या मानगुटीवर आस्तित्वात नसलेल्या हिंदू या नवीनच धर्माचे लेबल चिकटवून आपली पोळी शेकायचे व आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची बेमालूम खेळी खेळली.
    ● सुरेन्द्र पोहरे, अकोला

    ReplyDelete
  12. धर्मावर टीका करणाऱ्या ९९% लोकांनी धर्माचा मुळापासून अभ्यासच केलेला नसतो.---स्वामी विवेकानंद

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...